आपण यांना पाहिलंत का ?

पगला गजोधर's picture
पगला गजोधर in काथ्याकूट
11 Sep 2014 - 11:55 am
गाभा: 

जम्मू आणि काश्‍मीरमध्ये पुराच्या वेढ्यात अडकलेल्या लाखो लोकांचे प्राण वाचविण्यासाठी (फक्त आणि फक्त) भारतीय केंद्रसरकार आणि राज्य सरकार, लष्कराचे शर्थीचे प्रयत्न करत असून, हवाई दल, नौदलाचे कमांडो आणि निमलष्करी दलांचे लाखो जवान या बचाव मोहिमेत सहभागी झाल्याचे दिसते. अश्यावेळी हे मीरवैझ फारूक, गिलानी, यासीन मलिक वैगरे फुटीरतावादी प्रभूती कुठे लपून बसल्या आहेत, असा प्रश्न पडतो.
वरील फुटीरतावादी मंडळी पुरात वाहून बेपत्ता झाल्या काय ? म्हणूनच 'आपण यांना पाहिलंत का' , या दूरदर्शनच्या कार्यक्रमात यांचे फोटू दाखवावे का ?

प्रतिक्रिया

योगी९००'s picture

11 Sep 2014 - 12:31 pm | योगी९००

अश्यावेळी हे मीरवैझ फारूक, गिलानी, यासीन मलिक वैगरे फुटीरतावादी प्रभूती कुठे लपून बसल्या आहेत, असा प्रश्न पडतो.
गप्प बसा. या महान प्रभूतींच्या वर शिंतोडे उडवू नका. या संकटातून बाहेर पडल्यावर पुढे काय करायचे याचा विचार हे सध्या एका सुरक्षित ठिकाणी राहून करत आहेत.

स्पार्टाकस's picture

11 Sep 2014 - 6:24 pm | स्पार्टाकस

या सर्व भुंकसंप्रदायी मंडळींनी पूर येत आहे अशी खबर येताच विमानाने दिल्ली गाठल्याचं वृत्त आलं आहे.

माझ्या मिपावरच्या आयुष्यात पहिल्यांदा गजोधरांच्या प्रश्नाला अणुमोदन देतोय. बाकी ते पण पुरात अडकले असावेत असे वाटतेय :) ते काय ते ६ लाख आहेत ना, त्यात हे पण.

डॉ सुहास म्हात्रे's picture

11 Sep 2014 - 1:04 pm | डॉ सुहास म्हात्रे

+१००

पण याबद्दल माध्यमांत अजून तरी काहीच बातमी नाही. संकटकाळ संपल्यावर अश्या हरामखोरांना काश्मिरी लोकांनीच धूवून काढले पाहिजे ! तशी आता अब्दुल्ला आणि कंपनीची जनता धुलाई करू लागली आहेच.

प्रसाद१९७१'s picture

11 Sep 2014 - 2:09 pm | प्रसाद१९७१

असे काही होणार नाही, पुढचे सरकार PDP चे असते की नाही ते बघा. PDP म्हणजे त्या मुफ्ती महंमद सैद ची.

मृत्युन्जय's picture

11 Sep 2014 - 1:06 pm | मृत्युन्जय

पगला गजोधर यांचा आयडी हॅक झाला आहे काय?

बादवे वरील फुटीरतावाद्यांनीच कदाचित काल जीवतोड मेहनत करुन पुरात अडकलेल्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करणार्‍या जवानांवर हल्ला करुन त्यांना जखमी केले असावे.

पैसा's picture

11 Sep 2014 - 1:24 pm | पैसा

काल जीवतोड मेहनत करुन पुरात अडकलेल्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करणार्‍या जवानांवर हल्ला करुन त्यांना जखमी केले असावे.

हद्द झाली!

अनुप ढेरे's picture

11 Sep 2014 - 1:52 pm | अनुप ढेरे

कश्मिरी लोकं (कश्मिरात आत्ता रहात असलेले लोक) अत्यंत भिकार*ट आहेत असं कश्मिरात काम करत असलेल्या एक-दोघांकडून ऐकलं आहे. फुकटे, आळशी आणि कृतघ्न. त्यामुळे सामान्य लोकांनीच ही दगडफेक केलेली असणं अशक्य नाही.

पगला गजोधर's picture

11 Sep 2014 - 5:17 pm | पगला गजोधर

आयडी हॅक वैगरे झाला नाही, मी कधीही या फुटीरतावादी लोकांचे समर्थन केलेले नाही.
बाकी उगीचंच कान्फाडात ठेवून द्यावी, असा चेहेरा असलेला यासीन मलिक व त्याच्यासारखे, पुरात वाहून
कायमचे पाकिस्तानात गेले (संदर्भ: हीना चित्रपट) तर बरे.

मृत्युन्जय's picture

11 Sep 2014 - 1:08 pm | मृत्युन्जय

बाकी फुटीरतावादी मंडळी खरेच पुरात वाहुन गेली तरे किती बरे होइल नाही? पण जाउ देत असली स्वप्नरंजने केल्याने आपल्यालाच त्रास होइल.

प्रसाद१९७१'s picture

11 Sep 2014 - 2:04 pm | प्रसाद१९७१

काही फुटीरता वादी आणि फुटीरता वाहुन जाणार नाही. उलट आपले हजारो कोटी वाया जातील.
पुराचा फायदा घेउन, सैन्याने सर्व घरांची तपासणी करुन शत्र , कागद पत्र ताब्यात घ्यावीत.

प्रसाद१९७१'s picture

11 Sep 2014 - 2:08 pm | प्रसाद१९७१

बाकी फुटीरतावादी मंडळी खरेच पुरात वाहुन गेली तरे किती बरे होइल नाही

म्हणजे काश्मीर खोर्‍यातील ( जम्मु लडाख सोडुन ) ९५ टक्के लोकच वाहून गेली पाहीजेत असे म्हणणे आहे तुमचे.

प्रसाद गोडबोले's picture

11 Sep 2014 - 1:52 pm | प्रसाद गोडबोले

अहो फुटीरतावाद्यांचे सोडा , पण इथल्या आपल्या मिपावरल्या मोदीदेष्ट्यांचे काय मत आहे ते विचारा मोदींनीच्या अन लषकराच्या तत्परते विषयी अन बचावकार्या विषयी !!

काळा पहाड's picture

11 Sep 2014 - 2:25 pm | काळा पहाड

या गोष्टीचा फायदा घेवून फुटीरतावाद्यांना अपघाती मृत्यू येईल हे पाहिलं तर भारत सरकारची डोकेदुखी कमी होईल. यांना पुराच्या पाण्यात बुडून मृत्यू येवू शकतो.

अरेच्च्या ! हा धागा काश्मीर ला नेण्याची गरज च नाही :)

रवीराज's picture

11 Sep 2014 - 7:19 pm | रवीराज

बहुतांश काश्मिरी जनता भारताविरोधी आहे, हे लोक तिरंगा झेंडा फडकऊ देत नाही तिथे, भारताविरोधी घोषणा देणे, भारतीय लष्कराविरोधी मोर्चे काढणे, अतिरेक्यांना मदत करणे असली कारस्थाने करतात हे लोक.
यांना म्हणावे आता, कोण आले आहे यांच्या मदतीला धावून…..पाकिस्तान?

बॅटमॅन's picture

11 Sep 2014 - 7:31 pm | बॅटमॅन

जस्ट २-३ आठवड्यांमागे काश्मीरला गेलो असता याची झलक दिसून आलीच होती. भर १५ ऑगस्टला श्रीनगरमध्ये कर्फ्यू असल्याने प्रसिद्ध हॉटेले बंद, सबब वाझवान डिषेस खाताच आल्या नाहीत :(

तिथे 'रायझिंग काश्मीर' नावाचा पेपर येतो तो वाचला, तोही अशाच फुटीरतावादी विषारी विचारांनी भरलेला. काश्मीर ह्यांव, काश्मीर त्यांव, भारत-दादागिरी-काश्मीर-गळचेपी इ.इ. काश्मीर जणू एक वेगळा देश असल्याच्या थाटात सगळं चाललेलं.

माझ्या एका मित्रानं सांगितलेला अण्भव, त्याला तिथला एकजण ***** म्हणतो कसा, "हम तो आपकी खूब खातिरदारी करेंगे. आप हिंदुस्थान से जो आये हैं!" हिंदुस्थान से??????????? अरे भो****** तू काय पाकिस्तानात राहतोस काय मग?

काश्मिरी भाषा शिकायचे पुस्तक घेतले, त्यातही तेच!!!!! म्हणे स्वतंत्र भारतात लोकांनी काश्मिरीचा संबंध संस्कृतशी जोडण्याचा उगीचच प्रयत्न केला. त्याच्या लेखकाला सरकारविरोधी आंदोलनांत भाग घेतल्याने अटक झाली हेही आणि प्रौडलि लिहिलेले होते त्याच्या लाष्ट पेजला. ही तर हैट्ट होती.

हे लोक प्रचंड माजलेले आहेत असेच मत झाले त्यामुळे. यद्यपि प्रत्यक्ष व्यवहारात सगळे नीट वागलेबोलले तरी हा भाव असतोच. सुंभ जळून कोळसा झाला तरी पीळ काही जायला तयार नाही. स्वतःचं रक्षण करायची औकात नाही ती नाहीच, वर माज फालतूचा! फार राग आला होता ते सगळं पाहून.

मृत्युन्जय's picture

11 Sep 2014 - 8:01 pm | मृत्युन्जय

मला स्वतःला हा अनुभव आला होता. जिकडे जाइन तिकडे ते काश्मिरी आम्ही हिंदुस्तानी हे ऐकायला लागले होते. भारतीयांच्या बद्दल कमालीच द्वेष आणी दिखाऊ आतिथ्य आहे त्यांच्या मनात. कलम ३७० तोंडपाठ आहे सगळ्यांना पण त्याचा अर्थ भलताच लावला जातो. आमचा टेक्सीवालाही आमच्याशी ३७० वर चर्चा करायचा.

थोडे इथेही लिहिले आहे

मृत्युन्जय's picture

11 Sep 2014 - 8:02 pm | मृत्युन्जय
काळा पहाड's picture

14 Sep 2014 - 1:06 am | काळा पहाड

भाग ३ कुठाय?

बॅटमॅन's picture

11 Sep 2014 - 8:08 pm | बॅटमॅन

यांना भडकावणारी जमात वेचून वेचून त्यांना फटके दिले पाहिजेत तरच लोक वळणावर येतील.

बाकी लेख लैच भारी!!! एका रात्रीत दहा कप काहवा प्यालो होतो ते आठवलं. :) लै सुंदर पेय.

भारतीय सैन्य या नैसर्गिक आपत्ती मध्ये जम्मु-काश्मीर च्या जनतेला सर्वतोपरी मदत करत आहे.सैन्याने PoK मध्ये देखील मदतीची तयारी दर्शवली आहे.असे होउ नये की मदत घेतली आणि परत भारताबद्दल बोंबलायला मोकळे.
आता त्यांना विचारावेसे वाटते की कुठे गेले अल-कायदा,इंडियन मुजाहिदीन आणि ईतर दहशतवादी संगठन वाले.

हाफिज सईद ने अकलेचे तारे तोडले आहेत :D पाकमध्ये पूर भारतामुळेच - हाफीज सईद

प्रसाद गोडबोले's picture

11 Sep 2014 - 11:55 pm | प्रसाद गोडबोले

नेफळे , माई , सचीन आणि पोटे कुठे आहेत हो सध्या ?

हे लोक लष्कराच्या चुका शोधत असतील !!
रच्याकने - एका मित्राने चेपू वर टाकलेला संदेश इथे द्यायचा मोह आवारत नाहीये.

आतंकवादी हाफिज सईद का बयान पाकिस्तान में आई बाढ़ के लिए भारत जिम्मेदार, आखिर भारतीय नदियों से ही पानी पाकिस्तान में आया ।
आतंकी हाफ़िज़ सईद एक बात कान खोल कर सुन लो चीन ने ब्रम्हपुत्र नदी पर बाँध बनाया हुआ है, उसकी जब मर्ज़ी वो पानी छोड़ कर बिहार आसाम को डूबा देता है , तुम नपुन्सको की तरह आतंकवादी भेज कर पीठ पर वार करते हो पर ये हिंदुस्तान है, ये तुम्हारी तरह पीठ पर वार नहीं करेगा या चीन की तरह पानी का खेल नहीं खेलेगा, जब भी मारना होगा, तुम्हारे घर में घुस कर मारेगा
और ये वो भारतीय नदिया है जो पाकिस्तान की प्यास बुझाती है, अगर हम कश्मीर की तीनो चारो नदियों पर बाँध बना दे तो तुमको पानी की बूँद तक नहीं मिलेगी
ना पीने को ना धोने को ,नाहाते तो शायद वैसै भी नही तुम ।

अर्नबजी महाराज गोस्वामींच्या म्हणण्यानुसार पुराच्या पाण्यात अडकलेल्या गिलानीची सुटका लष्करानेच केली म्हणे..

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

14 Sep 2014 - 8:41 pm | निनाद मुक्काम प...

ह्या नैसर्गिक आपत्तीचा फायदा घेऊन आपल्या लष्कराने फुटीरतावादी प्रभूतींना मारून ते पाण्यात वाहून बेपत्ता झाल्याचे घोषित करावे.
सध्या काश्मिरी जनतेला त्यांच्या फुटक्या नेत्यांसाठी आसवे गाळण्यासाठी फुरसत नाही आहे.

रवीराज's picture

14 Sep 2014 - 11:08 pm | रवीराज

अरे अरे,दल सरोवर पार 'ब'दलले की,

काळा पहाड's picture

14 Sep 2014 - 11:21 pm | काळा पहाड

झालं ते खरं तर चांगलंच झालं. एकतर यामुळं आर्मीला असणारा विरोध कमी होईल. दुसरं म्हणजे काश्मीर ची अर्थव्यवस्था आता पूर्णपणे भारताच्या मदतीवर अवलंबून असेल (अर्थात आधी काय वेगळं होतं हा प्रश्न आहेच) त्यामुळे त्यांचा भारतविरोध आता बराच बोथट होईल. अन्यथा भारत मदतीच्या नाड्या तत्काळ आवळू शकतो.

खटपट्या's picture

15 Sep 2014 - 12:54 am | खटपट्या

काश्मीर मध्ये मदतकार्य करणाऱ्या लष्करावर काही लोक आता दगडफेक करू लागले आहेत
आता बोला ! काय होणार या लोकांचं …
http://maharashtratimes.indiatimes.com/nation/Kashmir-Relief/articleshow...

काळा पहाड's picture

15 Sep 2014 - 1:19 am | काळा पहाड

काय होणार? जरी तो संपूर्ण प्रदेश बेचिराख करावा लागला तरी भारत काही त्यावरचा ताबा सोडणार नाही. सध्या आर्मीला थंड घेण्याच्या सूचना आहेत. बाकी एकदा पूर ओसरला की आर्मी आहे, ते लोक आहेत आणि ओले झालेले बांबू आहेत.

हिच बातमी पोस्ट करणार होतो.

खाल्या ताटात *गणारी लोकं ही, हरामखोर साले.

व्हॉट्सअ‍ॅपवर आलेला एक संदेश...थोडासा दवणीय आहे पण आशय अगदी नेमका आहे.

काश्मीर की जनता को भारतीय सेना के एक जवान का संदेश -

"तुम्हारी नफरत पर भी लूटा दी जिंदगी हमने,
सोचो अगर तुम मोहब्बत करते तो हम क्या करते!"