नमस्कार मंडळी!
घरोघरी गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. काहीजणांकडे बाप्पांना पुढच्या वर्षी यायचे निमंत्रण देऊन निरोपही दिला आहे. सगळी मंडळी मोदकांवर ताव मारून सुस्त झालेली असणार!
गेल्या वर्षी आपण घरोघरच्या गणेशासाठीच्या सजावटी, मखरे यांच्या फोटोंची स्पर्धा आयोजित केली होती आणि तिला उत्तम प्रतिसाद मिळाला होता.
यावर्षी मात्र छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त "महास्पर्धा" चालू असल्याने श्रीगणेश सजावटीची स्पर्धा रद्द करत आहोत. मात्र घरबसल्या सर्वांना इतर मिपाकरांच्या घरच्या गणपतीबाप्पाचे दर्शन व्हावे म्हणून हा धागा काढत आहोत. आपापल्या घरच्या सजावटीची छायाचित्रे इथे सादर करा, आणि इतरांची छायाचित्रे पाहून आनंद मिळवा!
गणपती बाप्पा मोरया!
------------प्रतिक्रिया
ही सजावट करण्यासाठी आमच्या दुकानातील जाहिरातीच्या जुन्या बोर्डची मेटल फ्रेम सायल्यानी सजवलीय!

अतिशय सुन्दर मुर्ति!
मी पहिली की काय?
*yahoo*
सॉरी.
सॉरी काय?
मामलेदार आवडले हो बाप्पा आपले !
-दिलीप बिरुटे
आभारी आहे
गणपती आणि आरास दोन्ही छान..
अगदी प्रसन्न मुद्रा आहे!
हा आमचा मयुरेश.... सजावटीसाठी फक्त हिरवे गवत वापरले होते आणि त्यावर चौरंगावर मूर्ती :)
.

त्या गवताच्या सजावटीचा फोटो असला तर दे की रे!
साधे आणि सुंदर!
हा आमचा बाप्पा!

अनन्या, अजया, माम्लेदारचा पंखा, मस्त वाटले फोटो पाहून.
@ माम्लेदारचा पंखा, मूर्तीचा रंग असा आहे की लाईटिंग केले आहे?
हा माझा या वेळचा बाप्पा.. :-)

व्वा मस्त सजावट :)
सगळ्यांचे बाप्पा मस्तं आहेत +++१११११
खूप सुरेख __/\__
सर्व बाप्पा अतिशय मनमोहक !!!
मस्त फोटू!
गणपती बप्पा मोरया
मस्त सजावट केलेले बप्पा पाहुन मन प्रसन्न झाले.
मागा वत्सांनो मागा काय आशिर्वाद देउ तुम्हाला?
पैजारबुवा,
हे गणपतीच्या अंगावर धागेदोरे कसले आहेत? म्हणजे हा काही वेगळा विधी वैगरे आहे का?
बाकी सगळ्याच गणेशमुर्ती व सजावट सुंदरच आहेत.
मला वाटतं सजावटीसाठी लावलेल्या लाईट्सच्या केबल आहेत त्या...
ओह...अच्छा. आत्ता निरखून पाहील्यावर लक्षात आलं.
धन्यवाद.
गणपतीच्या अंगावर सजावट करणे शक्यतो टाळावे बाकी तुमची इच्छा
सगळ्यांचे सगळे बाप्पा आणि त्यासाठि केलेली सजावट आवडुन गेली.
मूर्ती पाहून प्रसन्न वाटतेय.
सगळॅ बाप्पा अगदी गोड आहेत :)
माझ्या सासरच्या गौरी गणपती
गणपती
गौरी
आणि माझ्या माहेरच्या गौरी गणपती
गणपती
गौरी

तुमच्या सासरच्या गौरीच्या चेहर्यावरचे भाव आश्वासक आणि माहेरच्या गौरीचे करारी आहेत. :)
त्यांच्या वयातही फरक दिसतो आहे ना! सासरच्या तरूण आहेत तर माहेरच्या जरा प्रौढ.
माहेरच्या गौरी ५० - ६० वर्षांपासुन याच आहेत. सासरच्या त्या मानाने अलिकड्च्या साधारण १५ - २० वर्षांपुर्विच्या आहेत.
गौरी म्हणजे बायकांच्या जिव्हाळ्याचा विषय!! त्यामुळे वयाबद्दल जाणीवपूर्वक लिहीलं नाही म्हणा. ;) ह. घ्या. हो.
@ सूड -
इतक्या वर्षांत त्या चेहर्यांवर फक्त मायाच दिसायची मला त्यामुळे हा नविन दॄष्टिकोन आवडला.
धन्यवाद!
@ सूड -
इतक्या वर्षांत त्या चेहर्यांवर फक्त मायाच दिसायची मला त्यामुळे हा नविन दॄष्टिकोन आवडला.
धन्यवाद!
ह्या आमच्या गावच्या घरच्या महालक्ष्मी / गौरी.. ही सजावटीची पद्धत पुर्वापार (किमान पणजोबांपासून) तशीच आहे. जेष्ठा-कनिष्ठा गौरीसमोर कुमार आणि कुमारीपण मांडल्या जातात. दुसर्या फोटोत केळीच्या पानावर मांडलेले पुजेचे-प्रसादाचे ताट आहे. पक्वान्नांसोबतच आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्रसादात सोळा प्रकारच्या भाज्या असतात.
यंदा महालक्ष्म्यांकरीता गावी जाऊ शकलो नाही, त्यामुळे व्हॉट्सअॅपवर दर्शन घेऊन, प्रसादाच्या ताटाच्या आठवणीत उसासे सोडण्याखेरीज काहीही हाती नाही. :(
लव उ आणि चिगो, गौराया, महालक्ष्म्या मस्त आहेत!
@चिगो, एवढ्या सगळ्या प्रकारच्या भाज्या कुठून गोळा करतात?
हा आमचा बाप्पा...
या गौरी
.

यानबूत बसल्या बसल्या, गौरी-गणपतींचे दर्शन झाले.
एक मिपाकर म्हणून आनंद झाला.
फेटेवाले बाप्पा!
हा आमच्या घरचा बाप्पा!