मंदिर काढा..

समीरसूर's picture
समीरसूर in काथ्याकूट
2 Sep 2014 - 2:11 pm
गाभा: 

एक बालाजी/साई बाबा/हनुमान/शंकर/वैष्णोदेवी यांचे मंदिर उभारायचे. हा सगळ्यात सोपा मार्ग. देव नॅशनल (इंटरनॅशनल) अपील असणारा हवा. प्रदेशिक देवांच्या मंदिरात कमाई फारशी नाही. म्हणूनच दत्त, खंडोबा, स्वामी समर्थ आदी मंदिरे इतकी श्रीमंत नाहीत. स्टार लेव्हलचा देव असला की मंदिर आपसूकच ग्लॅमरस बनते. उद्घाटनाला एखादा सेलिब्रिटी बोलवायचा. भरपूर जाहिरात करायची. हळूच 'नवसाला पावणारा' अशी बातमी सोडून द्यायची. दगडूशेठ गणपती हा पूर्वी (९० च्या दशकात) नवसाला पावणारा म्हणून फेमस नव्हता. गेल्या १०-१२ वर्षात जोरदार मार्केटिंग करून त्याला हे बिरूद मिळाले आहे. त्यासाठी बिझनेस डेवलपमेंट ऑफीसर्स नेमायचे. त्यांना क्लायंट्स आणायला सांगायचे आणि त्यावर ५% कमिशन द्यायचे. काही मोठी माणसे भक्त म्हणून नेमायची. गरज पडल्यास दान पेटीतला कट त्यांना द्यायचा. मंदिरात चविष्ट असा प्रसाद अहोरात्र ठेवायचा. जसा तिरुपती बालाजीचा लाडू प्रसिद्ध आहे तसलं काहीतरी स्पेशल ठेवायचं. ब्रँड डेवलप करण्यात प्रसाद मोठी भूमिका बजावतो. काजूकतली किंवा पिस्ता बर्फी असा तगडा प्रसाद ठेवायचा. आंडू-पांडू साखरफुटाणे वगैरे नाही ठेवायचे. सुरुवातीचा खर्च गुंतवणूक म्हणून नेटाने करत रहायचा. मंदिरासाठी सुरुवातीला कुठेतरी आडवळणाला ५०० स्क्वे. फू. जागा पुरेशी आहे. नंतर ती आपसूकच वाढत जाते. सगळ्या मिपाकरांनी मिळून दहा-दहा हजार रुपये काढले तर असे एक छानसे मंदिर सहज उभे राहू शकते. गुंतवणुकीच्या प्रमाणात मंदिराच्या उत्पन्नाचा शेअर वाटून घेण्याचे ठरवून टाकायचे. मंदिरात छान-छान भजने सतत चालू ठेवायची. एक दिवा/धुनी सतत पेटत ठेवायचे. समोर एका सुरेख बोर्डावर त्याची कपोलकल्पित कहाणी लिहायची. "श्री ---- यांच्या या पवित्र देवळाच्या बांधकामासाठी पाया खोदतांना या जागेवर जमिनीच्या आठ फूट खाली एक पुरातन समई सापडली. समई बाहेर काढताच ती तेवत असल्याचा भास सगळ्यांना झाला. नंतर त्या समईची विधीवत पूजा करून ज्योत पेटवण्यात आली. समईमधले तेल संपले तरी समई अखंड तेवत असते. ही श्री ---- यांची किमया! त्यांच्या या कृपेचा प्रसाद आपणा सर्वांवर अखंड बरसत राहो ही प्रार्थना!" अशी ष्टोरी लिहिली की मंदिर फेमस व्हायला वेळ लागणार नाही. अशी समई सापडेल अशी व्यवस्था पाया खोदण्याच्या आधी करून ठेवावी.

अजून एखादे वैशिष्ट्य डेवलप केल्यास ब्रँड व्हॅल्यू कैक पटीने वाढेल. उदाहरणार्थ १००१ वेळा विशिष्ट मंत्राचा जप पौर्णिमेच्या दिवशी मंदिरात उपाशीपोटी बसून केल्यास घरातल्या सगळ्यांचे आरोग्य चांगले राहते किंवा उपास करून देवाचे दर्शन घेतल्यानंतर अन्नदान केल्यास घरादाराला बरकत राहते वगैरे वैशिष्ट्य हळूहळू एस्टॅब्लिश करत जायचे. त्यासाठी सुरेख अभिनय करणारे भोळे भक्त वाटणारे एजंट्स नेमायचे. मंत्र नवीन शोधून काढायचा. नेहमीच्या मंत्रामुळे भक्त इंप्रेस होतीलच असे नाही. मिळणारे फळ मोघम ठेवायचे. म्हणजे आरोग्य चांगले राहील किंवा बरकत राहील वगैरे. तात्काळ मिळणारी स्पेसिफिक फळे मेनु मध्ये ठेवू नयेत. अशी फळे न मिळाल्यास लोकांचा विश्वास उडण्याचा धोका असतो.

अशा ष्टोर्‍या प्रसिद्ध झाल्या की मग मस्त ब्रँड तयार होईल. अधून-मधून धार्मिक कार्यक्रम घेत रहायचे. सेलिब्रिटीजना बोलवत रहायचे. अगदी सुरेखा पुणेकर, बाबासाहेब पुरंदरे, राजकुमार तांगडे, सई ताम्हणकर, राखी सावंत, परिणीती चोप्रा, पूनम पांडे, माधुरी पुरंदरे, सुधीर गाडगीळ, अतुल पेठे, भाई वैद्य (थोडा निराळा कार्यक्रम ठेवून), मेधा पाटकर, भैय्युजी महाराज, सैफ अली खान, जेनेलिया डिसुझा, मानसी नाईक, बाबा आढाव, शमसुद्दीन तांबोळी, फादर फ्रान्सिस दिब्रिटो, सिंधूताई सपकाळ, सुरेश कलमाडी, अनिल शिरोळे, जितेंद्र आव्हाड असे सगळ्यांना बोलवायचे. कुठलाच भेदभाव ठेवायचा नाही.

दहा वर्षात आपण सगळे मर्सिडीझ मधून फिरत असू. मला 'नोकरी बदलायची आहे' असं आर्जव टाकण्याची गरज पडणार नाही. :-)

एकच अडचण आहे; हे सगळं करण्यासाठी जे मन लागतं ते कुठून मिळवायचं? बाकी सब तो चुटकी में अरेंज हो जायेगा... :-)

प्रतिक्रिया

सुहास झेले's picture

2 Sep 2014 - 2:18 pm | सुहास झेले

हा हा हा ... मागे मी आणि एक मित्र ह्याचा सिरीअसली विचार करत होतो. एक प्लॉट घ्यायचा आणि मस्त मंदिर बांधायचे... बाकी सगळे आपोआप चालून येते, बघितलाय अश्या अनेक मंदिरांचा प्रवास.. असो !!

अजूनही आयडिया हिट आहे हेवेसांनल... बोला करायची का सुरुवात? :D ;-)

आदूबाळ's picture

2 Sep 2014 - 3:48 pm | आदूबाळ

छ्या... विकत घेतलेल्या जमिनीवरचं कोरंक्रिंग स्टार्टप मंदिर काय पैसे खेचणार नाही. त्यापेक्षा कुठल्यातरी गल्लीबोळातलं जुनाट मंदिर टेकओवर करणं सोपं पडेल.

त्या देवळाला "कोपर्‍या गणपती" वगैरे नाव असलं तर त्यावरून ष्टोर्‍याही रिवर्स एंजिनियर करता येतील...

पैसा's picture

2 Sep 2014 - 3:52 pm | पैसा

नाहीतर "मला रात्री दृष्टांत झाला, मला जमिनीतून बाहेर काढ!" टैप श्टोर्‍या आधी पसरवायच्या. मग गाजावाजा करून शोध आणि मग जमीन खणून मूर्ती सापडेल अशी व्यवस्था करायची. हाकानाका!

सुहास झेले's picture

2 Sep 2014 - 5:29 pm | सुहास झेले

हा हा हा =))

खटपट्या's picture

3 Sep 2014 - 6:15 am | खटपट्या

असा प्रकार खरोखर घडला आहे कळव्यामध्ये. एका उत्तर भारतीय महिलेला स्वप्न पडले.… दुसऱ्या दिवशी ती पारसिकनगर च्या एका टेकडीवर एका दगडाला शेंदूर फासून बसली. नेहमीप्रमाणे लोकांची रीघ लागली. शेवटी पोलिसांनि हस्तक्षेप केला. अजूनहि लोक जात असतील.
देर्देकरांना हा प्रकार माहित असेल.

प्रमोद देर्देकर's picture

3 Sep 2014 - 9:38 am | प्रमोद देर्देकर

नाही रे क खटपट्या पण विचारुन बघतो.

मला वाटतं आजच्या सगळ्या छोट्या मोठया देवस्थानांबाबतीत असे प्रकार होत आहेत. जसे जो पर्यंत मनोजकुमारचा पिक्चर आला नव्हता तो पर्यंत साईबाबा तरी कुठे फेमस होते.
तसेचा वैष्णवदेवी , शनी शिंगणापुर या देवतांबद्दल बोलता येईल. ताजं उदा. म्हणजे अगदि १९९० पर्यंत मुंबईतल्या लालबागचा गणेश गल्लीतला गणपती मोठा म्हणुन प्रसिध्द होता आम्ही तोच पाहायला जायचो तेव्हा लालाबागच्या राजाचं नाव सुध्दा नव्हतं.
फक्त एक आश्चर्य वाटतं की कोट्यावधी रुपये खर्च करुन बिर्ला मंड्ळींनी भारतात सर्व ठिकाणी मंदिरे बांधली अगदि सगळ्या सोयी सुविंधांसकट मग समीरसुर यांनी म्हंटल्या प्रमाणे तिकडे भक्तगण म्हणावे तसे का गर्दी करत नाहीत?

चमत्काराशिवाय नमस्कार नाही

पगला गजोधर's picture

3 Sep 2014 - 2:33 pm | पगला गजोधर

या मंदिरात जो कोणी फक्त फक्त १११११ रु चा अभिषेक करतो, त्याला ऐका देशाचा ह१ब प्रकारचा विसा लगेचच मिळतो, असे पिल्लू सोडून द्यायचे… देवाचे नाव विसा-मारूती/गणेश वै ठेवता येईल.

शिद's picture

3 Sep 2014 - 2:54 pm | शिद

Chilkur Balaji Temple (Telugu: చిలుకూరు బాలాజీ దేవాలయము) popularly known as Visa Balaji Temple or Visa God is an ancient Hindu temple of Lord Balaji on the banks of Osman Sagar Lake near Hyderabad, India.

डॉ सुहास म्हात्रे's picture

2 Sep 2014 - 2:44 pm | डॉ सुहास म्हात्रे

हे सगळं करण्यासाठी जे मन लागतं ते कुठून मिळवायचं?
च्च्च्च्च्च ! असा विचार केलात तर मग तुम्ही चलाख आस्तिक कसे बनणार ? आणि ते नाही बनलात तर आस्तिकतेच्या आधारे धनदंडगे कसे बनणार ?? मला तर तुमची काळजी वाटायला लागलीय ;) :)

समीरसूर's picture

2 Sep 2014 - 2:46 pm | समीरसूर

आपण आयडियाज द्यायच्या. तेवढं काँट्रिब्युशन चोख द्यायचं. अंमलबजावणी करण्यासाठी 'चलाख आस्तिक' असतीलच ना! ;-) आणि एकदा नोटांची बंडलं दिसायला लागल्यावर आणि सोनं-चांदी चमकायला लागल्यावर कसलं मन आणि कसलं काय्...फिर रुकने का नही, बस गिनते रहने का...और सबसे बडी बात, सोचने का भी नही...जो ज्यादा सोचता है, वो अक्सर पीछे रह जाता है...

मग काय, जमिनीवर जमिनी घेत रहायच्या. भक्तीमार्गातले सगळे बिझनेस सुरु करायचे. आता मिटली काळजी? शेवटी मिपावर कुणीतरी म्हणतंच ना 'देवाक काळजी'. तसंच आहे हे. ;-)

मृत्युन्जय's picture

2 Sep 2014 - 2:47 pm | मृत्युन्जय

अंमलबजावणी करण्यासाठी 'चलाख आस्तिक' असतीलच ना!

अंमलबजावणीसाठी चलाख नास्तिकच हवा. तो प्रसंगी देवालाही विकुन पैसा कमावेल. कारण त्याला असेही देवाशी काही घेणेदेणे नसते,

डॉ सुहास म्हात्रे's picture

2 Sep 2014 - 3:25 pm | डॉ सुहास म्हात्रे

चलाख आस्तिक आणि चलाख नास्तिक यांच्यातील सीमारेषा फार धूसर असते... "ती कशी ?" यावर मागच्या माझ्या "आस्तिक-नास्तिक" धाग्याचा उत्तरार्ध लिहायचे मनात आहे. वेळ मिळाला की पाडून टाकावा म्हणतो :)

कवितानागेश's picture

2 Sep 2014 - 2:50 pm | कवितानागेश

आता आधी जुनी समई शोधणं आलं.. ;)

धन्या's picture

2 Sep 2014 - 2:56 pm | धन्या

खोदा म्हणजे सापडेल.

डॉ सुहास म्हात्रे's picture

2 Sep 2014 - 5:40 pm | डॉ सुहास म्हात्रे

पितळेची समई चिखलात लोळवा आणि आठवडा दहा दिवस त्याचच्याच बुड्वून ठेवा. मस्त प्राचीन "लूक" येइल. ।हाकानाका ! +D

सर्वसाक्षी's picture

2 Sep 2014 - 2:53 pm | सर्वसाक्षी

मला वाटल 'वैद्य पाटणकर काढा' सारखा 'मंदिर काढा'. प्या आणि सुखी व्हा.

विवेकपटाईत's picture

2 Sep 2014 - 2:54 pm | विवेकपटाईत

ग्यारंटी देतो कुणी ही फिरकणार नाही, पैसा व्यर्थ जाईल.

कोणत्या विदाच्या आधारे तुम्ही या निष्कर्षाप्रत आलात?

विवेकपटाईत's picture

4 Sep 2014 - 10:51 am | विवेकपटाईत

कोणत्या विदाच्या आधारे तुम्ही या निष्कर्षाप्रत आलात?

उत्तर : मराठी लोकांना धंधा जमत नाय

समीरसूर's picture

4 Sep 2014 - 11:49 am | समीरसूर

अनिरुद्ध बापू मराठीच! चितळे मराठीच. डीएसके मराठीच. नरेंन्द्र महाराज मराठीच. पर्सिस्टंटचे देशपांडे आणि केपीआयटीचे पंडित मराठीच. देसाई बंधूवाले देसाई मराठीच. दगडूशेठ गणपतीवाले आणि सिद्धिविनायकवाले भक्तीमार्गातील व्यवसायी मराठीच. ;-)

आम्हाला पण जमेल! :-)

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

2 Sep 2014 - 3:24 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

हल्ली नविन धंदा चालू करणे ह्याला 'स्टार्ट-अप' म्हणतात असे ऐकलय.मंदिर स्टार्ट-अप ही संकप्ल्पना फायदेशीर वाटते. तुमच्या त्या इन्व्हेस्टर का काय लोकांना सांगून पहा.
(येथे कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा उद्देश नाही. मंदिर स्टार्ट-अप सारखे मसजिद स्टार्ट-अप,चर्च स्टार्ट-अप असाही विचार करता येईल.)
(दर्गा स्टार्ट-अप बर्यापैकी चालेल असे मानणारी सेक्युलर्)माई

डॉ सुहास म्हात्रे's picture

2 Sep 2014 - 5:42 pm | डॉ सुहास म्हात्रे

मंदिर स्टार्ट-अप सारखे मसजिद स्टार्ट-अप,चर्च स्टार्ट-अप असाही विचार करता येईल.
तुम्ही कोठून (कुठल्या देशातून) पैसा खेचू शकाल त्यावर हे अवलंबून आहे ;)

यावरुन व्यंकटेश माडगूळकरांची "एका नवीन देवस्थानाचा जन्म" ही अफलातून कथा आठवली. माणदेशी अन हेलदार शब्दांत त्यांनी कथाकथनही केलंय तिचं..

पोटे's picture

2 Sep 2014 - 4:42 pm | पोटे

खड्डा खणुन त्यात भरपुर कडधान्ये घालावीत.

त्यावर समै मूर्ती ठेवावी.

माती घालुन बुजवावे.

मग दृष्टान्त झाला म्हणुन कोकलावे.

ऱोज खड्ड्यावर पाणी घालावे.

कडधान्ये फुगुन मुर्ती वर येते.

याला स्वयम्भु मुर्ती म्हणतात

फक्त मूर्तीवरचा प्राईस ट्याग काढायला विसरू नये.

बॅटमॅन's picture

2 Sep 2014 - 5:33 pm | बॅटमॅन

ठ्ठो =)) =)) =))

इरसाल's picture

2 Sep 2014 - 5:02 pm | इरसाल

त्यात तुळशीचे बी टाकायला इसरु ने !

मंदार दिलीप जोशी's picture

2 Sep 2014 - 4:55 pm | मंदार दिलीप जोशी

एका रिकाम्या जागेवर हिरवी चादर अंथरायची
मग काही दिवसांनी तिथे चौथरा बांधायचा
मग लाईट मीटर
मग हलू हळू टोलेजंग मशीद होतेच.

नानासाहेब नेफळे's picture

2 Sep 2014 - 7:44 pm | नानासाहेब नेफळे

एवढे करण्यापेक्षा दाढी करणे बंद करावे ,तीन महीन्यानंतर नावामागे स्वामी वा श्रीश्रीश्री वा महंत योगीराज वगैरे जोडावे,
आश्रम, भक्तगण( यात सुंदर ललनांचा जास्त भरणा असतो ),पैसा ,इंम्पोर्टेड गाड्या, गेलाबाजार परदेशात एखादे बेट व आश्रम. कशाला हिरव्या चादरीला पैसे खर्च करायचे?

मंदार दिलीप जोशी's picture

4 Sep 2014 - 10:38 am | मंदार दिलीप जोशी

सुंदर ललनांचे ISIS काय करत आहे पहावे ही विनंती.

च.फु.

नानासाहेब नेफळे's picture

4 Sep 2014 - 12:23 pm | नानासाहेब नेफळे

नित्यानंद,आसारामने काय केले ते पण लिवा...जोशीबुवा

मंदार दिलीप जोशी's picture

4 Sep 2014 - 12:59 pm | मंदार दिलीप जोशी

तुम्ही काय केले ते पण तुम्ही लिवा

विलासराव's picture

14 Sep 2014 - 10:16 pm | विलासराव

मला काही रोल आहे का रेवतीताई; हे पहा अनुभव:

DEWGAD

NARMADA PARIKRAMA

DHARAMSHALA

DHARAMSHALA

BRAZILIAN MONK

DHARAMSHALA

BHAKTGAN

टवाळ कार्टा's picture

14 Sep 2014 - 10:19 pm | टवाळ कार्टा

"पहुंचे हुए बाबा" म्हणुन मंदिरात बसाल का? ;)
(क्रु. ह. घे.)

विलासराव's picture

14 Sep 2014 - 10:20 pm | विलासराव

हे तर राहीलंचः

HIHAHA

सगळे फोटू भारी आहेत! तुम्ही आमच्या मंदिर संस्थानासाठी 'काम के आदमी' आहात.

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 Sep 2014 - 9:31 am | डॉ सुहास म्हात्रे

नक्कीच ! दाढीवाले आणि बिनदाढीवाले असे डबल-ट्रिपल (किंवा जास्तही) रोल देता येतील ;)

विलासराव's picture

15 Sep 2014 - 10:13 am | विलासराव

म्हणुन्च तर ईतके फोटो टाकले कॉपीटीशन नको म्हणुन.
आता पाठवा नेमणुक लेटर पॅकेजसह********.
दिसणे जास्त महत्वाचे या रोलमधे त्यामुळे वाटाही तसाच असावा.
भक्ताच्या सोयीस्कर प्रश्नांना उत्त्रे देउन इतर वेळी मौन.
चुकुन काही उत्त्र गेलेच तर अवलीया म्हणुन प्रसीद्धी आहेच.
फोटोत दिसत नाहीत पण अजुनही बर्याच पुरक कला आहेत आपल्याकडे.

काळा पहाड's picture

15 Sep 2014 - 5:56 pm | काळा पहाड

"सिनीयर अ‍ॅडव्हायजरी बाबा" या पोस्टचं म्हणून लेटर पाठवलंय. प्रोबेशन मध्ये १० लाखाचं टार्गेट आहे. २ भक्त आणि १ भक्तीण अनुयायांचा जत्था तुम्हाला देण्यात येईल. ६ महिन्यांपर्यंत प्रोबेशन, त्या नंतर "व्हाईस प्रेसिडेंशियल बाबा" या पदावर कायम्स्वरूपी नेमणूक करण्यात येईल व अनुयायांची संख्या जरूरीप्रमाणे वाढवण्यात येईल. अपॉईंटमेट लेटर च्या पहिल्या पानावर आपला "हॅलो" असलेला आणि पद्मासनातला फोटो (पूर्ण कपडे घालून आणि शक्यतो चिलिम घेवून) आणि शेवटच्या पानावर आपल्या डाव्या पायाचा ठसा उमटवून स्पीड पोस्टाद्वारे मंदिराकडे पाठवावा (उगीच मनातल्या मनात फॅक्स केलाय अस्लं आमाला सांगू नये, ते पब्लिक साठी).

रेवती's picture

15 Sep 2014 - 6:09 pm | रेवती

पर्फेक्ट!

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 Sep 2014 - 6:10 pm | डॉ सुहास म्हात्रे

चला विलासराव ! काय म्हणता ? =))

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 Sep 2014 - 6:11 pm | डॉ सुहास म्हात्रे

मी विचारता विचारता CEO ची संमती पण आली. ;)

विलासराव's picture

15 Sep 2014 - 8:28 pm | विलासराव

शुभकार्याला मुहुर्ताची गरज नसते. हा घ्या फोटु:
लगेच कामाला लागा आता......

1

2

3

टवाळ कार्टा's picture

15 Sep 2014 - 8:43 pm | टवाळ कार्टा

आइईशप्पत...आता १ मौलवी पण बोलावु...सर्व धर्म समभाव मंदिर होउन जैल :)

काळा पहाड's picture

15 Sep 2014 - 9:40 pm | काळा पहाड

ज्यास्त करू नका.. खेड्यातले लोक सर्व धर्म समभाव वगैरे नस्तात. आहे ते पण यायचे नाहीत.

टवाळ कार्टा's picture

15 Sep 2014 - 9:47 pm | टवाळ कार्टा

मग जरा बाजुला बसवु...मार्केट वाढेल की :)

llपुण्याचे पेशवेll's picture

4 Sep 2014 - 5:14 pm | llपुण्याचे पेशवेll

हा सेफ मार्ग आहे. इन्वेस्टमेंट फार नाही. आणि आपले सगळे भाई कसे एका हाकेसरशी मदतीला येतात. :-)

कोण पुढाकार घेणार आहे ते सांगा?
श्याला 2 टक्के भागीदारी करीन.

मिपाकडे जबरदस्त म्यान (आणि वुमन) पावर देखील आहे.

गुरुजी आहेत, हुकमी संस्कृत श्लोक-स्तोत्रं रचून देणारे आहेत, पाहिजे त्या स्केलवर उत्तम प्रसादाच्या पाकृ देऊ शकणारे बल्लव आहेत, व्यवस्थापन तज्ज्ञ आहेत, "तमक्या चौल राजाच्या शिलालेखात या मंदिराला देणगी दिल्याचा उल्लेख आहे" हे शाबीत करणारे आहेत, कमाल ष्टोर्‍या रचणारे आहेत, ग्राफिक डिज्जायनर आहेत. बोलभांड लोकांची तर ददातच नाही...

बॅटमॅन's picture

2 Sep 2014 - 5:35 pm | बॅटमॅन

आयला खरंच की!

सगळे सगळे आहेत. काढाच येक मंदिर आता! शिलालेखांचे नमुने देईन म्हणतो. श्लोक पाडून झाले की ब्राह्मी किंवा खरोष्ठी लिपीत कोरायची व्यवस्था करू, म्हणजे बाय डिफॉल्ट मंदिर सातवाहन काळात जाणार.

इरसाल's picture

2 Sep 2014 - 5:38 pm | इरसाल

ते जरा सहावाहन नायतर पाचवाहन करता येईल तर बघ ना जरा तेव्ह्ढच मंदिर जरा पुरातन वाटेल अजुन ;)

नाही नाही. सातवाहनच प्राचीन वाटेल.

एक प्यारलल उदा. देतो. नौवारी अगोदर, मग सहा/पाच (चूभूदेघे) वारी आली. तद्वतच अगोदर सातवाहन, मग सहा मग पाच आलं. ;)

आदूबाळ's picture

2 Sep 2014 - 5:47 pm | आदूबाळ

हो आता "नो-वारी" आलीय...

बॅटमॅन's picture

2 Sep 2014 - 5:49 pm | बॅटमॅन

अगदी अगदी ;)

चुकुन प्यारे लाल असे वाचले

डॉ सुहास म्हात्रे's picture

2 Sep 2014 - 5:50 pm | डॉ सुहास म्हात्रे

शिलालेखात सिंधू संस्कृतीची अक्षरे जास्त सोईची पडतील... त्यांचा आजपर्यंत पुरेसा अर्थ लागलेला नसल्याने "हे नक्की काय?" हे समजेपर्यंत भरपूर कथा = भरपूर माया करता येईल. किंबहूना चार नोकरदार संशोधक आपल्याला हवा असलेला अर्थ लावायला १% समभागावर ठेवता येतील... मग काय जगात सर्वात प्राचीन १०,००० वर्षांपासूनचे जागृत देवस्थान आपल्याच हाती =))

(स्वगत : मिपावर कल्पनेचे मजले रचणार्‍यांची कमी नाही. संमं ला त्यांची एक स्पर्धा घ्यायला सांगायला हवे. :) )

बॅटमॅन's picture

2 Sep 2014 - 5:53 pm | बॅटमॅन

हाहाहाहा, एकच नंबर =)) =)) =)) =)) =))

सिंधू + ब्राह्मी + इजिप्शियन असा त्रैभाषिक लेख लिहून पार फॅरो रामसेसपासून सर्वांनी मंदिराला देणगी दिल्याचे सिद्ध करता येईल =))

अवांतर-बॅट्या खफ वर तुझ्या नावाने वाँरट निघालय.
अतिअवांतर -ट्रॉय चा पुढचा भाग जुन मध्ये टाकणार होतास,अजुन आला नाय.

अवांतर- आयला मी नाय काय केलं मी नाय नाय नाय...

अतिअवांतरः अडचणी....वेळ मिळाला की टाकेन.

डॉ सुहास म्हात्रे's picture

2 Sep 2014 - 6:07 pm | डॉ सुहास म्हात्रे

सिंधू + ब्राह्मी + इजिप्शियन असा त्रैभाषिक लेखाचा प्रयोग करून पहावा असा आहे ;)

"रामसेस म्हणजे इजिप्शियन लोकांनी केलेला राम शब्दाचा अपभ्रंश आहे" हे त्या शिलालेखात सिद्ध करता येईल. "सद्याच्या थायलंडच्या राजाला नववा राम (रामा द नाईंथ) म्हणतात नाही का ? तसेच ते होते" हा सज्जड आत्ता आस्तित्वात असलेला पुरावा ठासून सांगता येईल. भाविकांना इतरांना आलेल्या (पक्षी, पसरवलेल्या) जाज्वल्य अनुभवांच्या कथांच्या पार्श्वभूमीवर पूर्व-पश्चिम, रामसेस-राम असे क्षुल्लक फरक महत्वाचे वाटत नाहीत असा अनुभव आहे. :)

बॅटमॅन's picture

2 Sep 2014 - 6:10 pm | बॅटमॅन

हाहाहा, अगदी अगदी ;)

विशेषतः प वि वर्तक आणि पु ना ओक यांची विचारमौक्तिके लावली तर अजून फेमस होण्याची ग्यारंटीच!!!

प्रचेतस's picture

2 Sep 2014 - 6:38 pm | प्रचेतस

सिधम | रञो सातवाहननं सिरिसालाहणो
सव ८ हेम २ दिव १
प्रथमस भविसस महामंडलिकस्स गंडरादितस जनपदे मिरिञ्जनिहारे
गोमिकस वाल्गुदस गामे गोथमं वथवेन गहपतिकेन वेनकुले ब्रुसस्स
मंदिरस तळकं खानितं

गोमिकस वाल्गुदस गामे गोथमं वथवेन गहपतिकेन वेनकुले ब्रुसस्स

वा वा वा.देवाला वाल्गुदेश्वर म्हणायचे का?

प्रचेतस's picture

2 Sep 2014 - 8:05 pm | प्रचेतस

खी खी खी.

गोमिकस म्हणजे म्होरक्या.

पूर्ण अर्थ.

सिद्धी असो.

सातवाहन कुळातील राजा सालाहणाच्या कारकिर्दीतीच्या ८ व्या संवत्सराच्या हेमंत ऋतूच्या दुसऱ्या पक्षाच्या प्रथम दिवशी भविष्यात होणार्या गंडरादित्याच्या मिरज प्रांताचा म्होरक्या असणार्या वाघळाच्या गोथम गावात वेन कुलातील ब्रूस याने मंदिराच्या पुढ्यातिल तलाव खोदवला आहे.

बॅटमॅन's picture

3 Sep 2014 - 11:00 am | बॅटमॅन

ॐ स्वस्ति |

सालाहणकुलोत्पन्नो राजते अश्मके नृपः |
विदर्भकुन्तलौ चापि राज्ये स्तः खलु तस्य च ||

पुणकविषये वल्लिर्नाम लोको पुरातनः |
शिल्पज्ञानी चलप्रेमी सहाय्ये तत्परो सदा ||

सातवाहनकोशो सः इति सर्वत्र ख्यातितम् |
मन्दिरं चापि मूर्तिं च खलु सूचितवान् अहो ||

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 Sep 2014 - 12:24 pm | डॉ सुहास म्हात्रे

आणि वर ज्याची संस्कृत, सातवाहनी आणि मराठी भाषांतरे आहेत तो केवळ माझ्याकडेच्च्च असलेला मूळ खर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्रा शिलालेख...

बॅटमॅन's picture

3 Sep 2014 - 12:29 pm | बॅटमॅन

पाय लागू सरजी... _/\_

हडप्पा संस्कृतीच्या तिसर्‍या, चौथ्या अगर नवव्या शतकातला असावा असे अनुमान तूर्त वर्तवण्यात येत आहे. ;)

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 Sep 2014 - 12:48 pm | डॉ सुहास म्हात्रे

छे, छे ! हा शिललेख १०,००० वर्षांपूवी आकाशमार्गे आलेल्या देवदूतांने हराप्पाच्या मुख्य मंदिराच्या दर्शनी भिंतीवर बसवला होता असे असे परवाच त्या देवदूताने मला स्वप्नात येऊन सांगीतले आणि वर तुमच्या घराच्या लाद्या बदला असेही सांगून गेला. लाद्या तश्या जुन्या झाल्या होत्याच, म्हणालो बदलूया, वो भी क्या याद करेगा. जुन्या लाद्या उचकल्या आणि काय राजे... हा शिलालेखाच समोर आला की हो एकदम (_/\_/\__/\_, ह्याबरोबर कपाळासमोरून हात वरखाली करणारी स्मायलीचीही कल्पना करा *).

आता आठवतंय, तो देवदूत त्या कुठल्याश्या मालिकेतल्या नारदमुनीसारखा दिसत होता... तेव्हा नाही लक्षात आलं, पण आता स्पष्ट दिसतोय त्याच्या चेहरा, अंतःचक्षूंना (_/\_/\__/\_, ह्याबरोबर कपाळासमोरून हात वरखाली करणारी स्मायलीचीही कल्पना करा *).

(* आपन्तर ह्या एक्शनच्या प्रॅमात पड्लोय बाsssबा !)

बॅटमॅन's picture

3 Sep 2014 - 12:55 pm | बॅटमॅन

पुरातन वैदिक संस्कृतीचा अजूनेक पुरावा हाती आला की ओ!! पु ना ओकांच्या आत्म्यास शांती मिळाली असेल आता =)) =)) =)) =)) =))

बाकी इंद्रकालीन शिलालेख म्हणून 'पत्थर बाबा' नावाने नक्कीच फेमस करू शकतो. शिवाञ 'आमच्या ब्रँचेस जगभर आहेत' हेही दाखवू शकतो. कृष्णनीती, वेदवटी, इ.इ. ;)

एस's picture

4 Sep 2014 - 7:52 pm | एस

वर एक्कासाहेबांनी जो मूळ खर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रा शिलालेख दिलाय तो खर्रर्रर्रर्रर्ररंतर मीच आमच्या गुहेत प्रागैतिहासिक काळात रंगवून ठेवलेल्या भित्तीचित्राचे वर्णन आहे.

हे बघा!

Pre-Historic Cave Paintings

पहा, ते डावीकडे गुहेतील घाटदार शिल्पे पाहून 'युरेका! युरेका!' करणारे वल्लीशेठ आणि उजवीकडे तो ब्रूस वेन आणि त्याचा तेव्हा उलिसाच असणारा अंगरखापण दिसतोय...

म्हणूनच आजपर्यंत ह्या हरप्पावाल्यांची लिपी वाचता आलेली नाही. भयंकर म्हणजे भयंकर अशुद्ध लिहायचे हो तेव्हापण. आणि अक्षरपण काय ती गिचमिड. स्वतः दिवसातून चारचारदा अंघोळ करीत बसायचे सार्वजनिक ठिकाणी. पण अक्षर काही सुधारणार नाहीत शिंचे. ;-)

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Sep 2014 - 8:06 pm | डॉ सुहास म्हात्रे

तरीच ! मी हेच म्हणत होतो की अजून शास्त्रज्ञांनी (की मिपासंमंने) प्राचीन गुहांत सापडलेल्या जीवाश्मांतल्या डीएनए पासून अजून एखादी आयडी बनवण्याची आयडिया कशी नाय केली ? =))

टवाळ कार्टा's picture

4 Sep 2014 - 8:10 pm | टवाळ कार्टा

वरच्या रांगेतले २रा आणि शेवटचा जरा जास्तच "उत्तेजीत" आहेत =))

ते शेपूट आहे. उत्क्रांती होत असतानाही काहीकाही जणांची शेपटं तशीच राहिली होती, याचे पुरावे. मग त्यांनी त्यांचे स्वतंत्र कंपू - आपलं टोळ्या बनवल्या आणि सुखेनैव बागडू लागले. :-))

टवाळ कार्टा's picture

4 Sep 2014 - 8:28 pm | टवाळ कार्टा

_/|\_

प्रचेतस's picture

4 Sep 2014 - 9:08 pm | प्रचेतस

अगागागागा =))

पार अश्मयुगात पोचलात की रे.

पैसा's picture

4 Sep 2014 - 9:20 pm | पैसा

इतका गंभीर धागा आणि त्यावर हे असे अवांतर पाहून एक मिपाकर म्हणून आज शरम वगैरे वाटली.

एस's picture

4 Sep 2014 - 11:26 pm | एस

बाकी शरम वगैरें वाटण्यासाठी आधीं मिंपाकर वैग्रें व्हायला लागतें असें पितळ्यांच्या दुकानात रांगेत हुभे असतानां कानांवर पडलें काल! आमच्या अश्मयुगात असें काहीं नव्हतें हों. कलयुग आहें कलयुग तुम्हांला सांगतों बघा.

पैसा's picture

4 Sep 2014 - 11:35 pm | पैसा

बरोबरे तं मं. वाटलंच अश्मयुगाच्या गोष्टी करताय म्हणजे पुण्यपत्तनातले पेठीय दिसताँय. तेव्हाचे नमुने अजून आहेत तिथे.

एस's picture

4 Sep 2014 - 11:45 pm | एस

तेव्हासुद्धा शाखा कुठेच नसायच्या आणि तांब्यापितळेची भांडीसुद्धा रांगेत उभी राहूनच घ्यायला लागायची माहितीये का! ;-)

प्यारे१'s picture

4 Sep 2014 - 8:56 pm | प्यारे१

मला वाटलं ते आईस बकेट च्यालेन्ज वगैरे काही सुरु आहे की काय!

बादली डोक्यावर घेण्याची अ‍ॅक्शन आहे की नै!

एस's picture

4 Sep 2014 - 11:29 pm | एस

फक्त तेव्हा अंगावर बाल्दी ओतून हाः हूः हॅः हहहोः असे हुडहुडून झाल्यावर लगेच "कोण होता रे तो च्यालेंज करणारा मला?" अशी डरकाळी फोडून हातात धनुष्यबाण घेऊन च्यालेंजरच्या मागे लागत असत. ते पहा, ते खाली दिसतंय बघा.

म्हणजे बाय डिफॉल्ट मंदिर सातवाहन काळात जाणार

म्हणजे वल्लीच्या काळात ना ?

बॅटमॅन's picture

2 Sep 2014 - 5:55 pm | बॅटमॅन

ऊप्स... वल्लीच्याच काळात म्हणायचे होते पण ते असं होतं बगा.

प्यारे१'s picture

2 Sep 2014 - 6:11 pm | प्यारे१

वल्ली एवढा जुना आहे?????? ;)

छ्या! मनाबिनाचा विचार नै करायचा! तो केला की निम्मी कामं रखडतात.
मी भोळ्या भक्तिणीचा रोल करायला तयार आहे. ज्यांना भक्ताचा रोल करायचाय व भोळा भाव चेहर्‍यावर आणता येत नाही त्यांना अपर्णाकडून मेकपून घ्यायचं.
सानिकेकडून प्रसादाची रेशिपी मिळेल. मृणालिनीला प्रसादाचं कॉन्ट्रॅक्ट द्यायचं. उदा. प्रसादाची उकड इन कुकी कप विथ अ डॉलप ऑफ बटर. माझ्याकडील आजोसासूबाईंची पितळ्याची मोठी समई जमिनीत पुरण्यापासून ते पुन्हा जमिनीतून काढेपर्यंत मी देईन. त्याची काळजी करू नका. काही मिपाकरणी मस्त कपडे शिवतात. त्यांना देवळाबाहेर बसणार्‍या साधूंचे भगवे कपडे शिवण्यास सांगावे. बघता बघता मंदीर मोठे होईल.

मीपावर मला संपादक मनुशान घेत नाय.किमान मिपामंदिरात विश्वस्त मनुन घ्या.

रेवती's picture

2 Sep 2014 - 6:46 pm | रेवती

नक्कीच! विश्वस्तांना व्हॉलंटीअर वर्क म्हणून रुद्राक्ष माळा (एका मिपाकारांच्या प्ल्याष्टीकच्या कारखान्यात तयार केलेल्या) घालून अठवड्याला किमान ३ तास भजन करायला लागेल. वर्क अवर्स फ्लेक्सीबल आहेत.
भजनाच्या चाली य शिनेमाच्या गाण्यावरून तयार केलेल्या असतील. काही मिपाकवींना भजने पाडण्यासाठी बशीवले आहे. नुकतेच तयार होऊन आलेल्या भजनाच्या दोन ओळी ऐकवते.
चाल: टू स्टेटस शिनेमातील इसकी उसकी गाणे. गणपतीचे भजन.
शिवजी का पुत्तर, है नाम लंबोदर,
दुष्टांना देतो, मार लै लै,

हे गाताना हसू आल्यास कामाच्या वेळात १५ मिनिटांनी वाढ केली जाईल. हसू न येण्यासाठी वर्कशॉप्स वेळोवेळी घेतली जातात त्यांना हजेरी लावणे बंधनकारक नसले तरी कामाच्या दृष्टीने उपकारक आहे.

आदूबाळ's picture

2 Sep 2014 - 6:56 pm | आदूबाळ

अजून एकः

चढ गया उपर रे
प्रसादमें उकडीका मोदक रे

आनन्दिता's picture

3 Sep 2014 - 8:03 pm | आनन्दिता

=)) देवा !!

बघा हं, इथल्या प्रसाद आणि मोदकांना राग यायचा तुमचा. ;-)

स्वप्नांची राणी's picture

2 Sep 2014 - 6:57 pm | स्वप्नांची राणी

रेवती, मी काय करु..? अंगात आणवून सांगु का की देवी म्हणतेय मला वर काढा...हां, आता डोईवरचे केस थोडे वाढवावे लागतिल.

प्यारे१'s picture

2 Sep 2014 - 7:07 pm | प्यारे१

हे बघा, अभ्यास वाढवा.

अंगात येणारी स्थानं असतील तर तुम्हाला हायक्लास, आयटी आणि श्रीमंत परप्रांतीय ह्यांना मुकावं लागेल.
दे डोण्ट अटेण्ड सच प्लेसेस यु सी. दॅट्स सो ग्रोस.

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 Sep 2014 - 9:49 pm | डॉ सुहास म्हात्रे

मग आपण मा-देवीला कडेवर घेणे वगैरेसारखे यकदम मॉर्डण प्रकार आरेंज क्रू ना ! ;)

आता मला अभ्यास वाढवायची गरज आहे. ;)

स्वप्नांची राणी's picture

5 Sep 2014 - 2:51 am | स्वप्नांची राणी

ग्रेट..!! मला तो 'तोते, तोते..' चा डान्स पण येतो... *DANCE*

एकतर तुम्हाला नाव बदलावे लागेल स्वराताई!
नाव, जे अम्मा, माता, देवी याला जोडल्याल भक्तीरसात बुडवून वाळवायला घातल्यासारखे वाटेल ते चालेल. किटीपार्टीजमध्ये आपल्याला हल्ली दृष्टांत होतो, अध्यात्मिक विचार वगैरे बोलून दाखवावे. त्याने वातावरण निर्मीती होते. आपल्या घरच्या किटीपार्टीत फक्त फळांचे तुकडे, वेगळाली ज्युसेस हाच आहार ठेवावा. इथपर्यंत पोहोचलात की आपण कतारमधील एका हाटेलात पुढील चर्चेला भेटू.

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 Sep 2014 - 9:48 pm | डॉ सुहास म्हात्रे

हायला ! रेवती तैंची ऑलरेडी सीईओ म्हणून नेमणू़क झालेली दिसतेय ! ;)

होय तर! या प्रॉजेक्टात पदे पटकन भरली जातात. एक खुर्ची पकडून ठेवणे व आपली सोय करणे गरजेचे असते. ;)

इरसाल's picture

4 Sep 2014 - 11:17 am | इरसाल

एक खुर्ची पकडून ठेवणे व आपली सोय करणे गरजेचे असते.

आणी त्याबरोबरच आपल्या साथीदाराला असलेल्या पगाराच्या तिप्पट पगारावर आणतापण येते नी मग जबर्दस्त लॉबी पण बनवता येते ;)

प्यारे१'s picture

2 Sep 2014 - 5:54 pm | प्यारे१

सगळेच ज्येष्ठ सुटलेत की ! ;)

डॉ सुहास म्हात्रे's picture

2 Sep 2014 - 6:11 pm | डॉ सुहास म्हात्रे

आण्भव, आण्भव, हेला आण्भव म्हंतात... हात कुटं... उगाच नाय डोस्क्याचे केस पाढरे झाले / गेले =))

आजपत्तुर 'मट्रेलाईज' का न्हाय क्येला म्हन्तो मी?

हे असं एकदम होत नसतं. एनर्जी, पैसा इन्व्हेस्ट करणारे लोक्स एकाचवेळी भेटायला नकोत का? आत्ताही सगळे एकत्र आलेत ही देवाचीच कृपा!

डॉ सुहास म्हात्रे's picture

2 Sep 2014 - 6:27 pm | डॉ सुहास म्हात्रे

हांग आश्शी, हे म्हंजे आण्भवाचे बोल ! गोष्टिची येळकाळ याय्ला लाग्ती, मंग ती व्हती, तवर न्हाय. हात कुटं प्यारेजी ?!

प्यारे१'s picture

2 Sep 2014 - 6:34 pm | प्यारे१

मर्दानु पन मेण मुद्दा र्‍हायला की. जागा कुनाची ढापाची?
शेरात तर काय आता जागा मिळाची न्हाय. एकांदा 'माळ' गाटावा लागंन.
दोन चार एकर तरी जागा लागनार. कुटनं आनायची गा?

प्यारे काका ,हामची दानपत्तर करुन देवतो.
पण प्राब्लेम हाय.
लातुरात याव लागेल+ मला मन्दिराच्या हुत्पनात 10 टक्का पायजे+मला विश्वस्त मनुन घ्या पायजे.

विजुभाऊ's picture

2 Sep 2014 - 6:19 pm | विजुभाऊ

मी मंदीरातला श्टोर्‍या साम्गणारा बुवा होतो.
पेठकर काकाना शिन्यर बुवा बनवु या.

टवाळ कार्टा's picture

2 Sep 2014 - 6:52 pm | टवाळ कार्टा

लय झ्याक पिल्यान ह्हाय

अविनाशकुलकर्णी's picture

2 Sep 2014 - 8:10 pm | अविनाशकुलकर्णी

मंदीरा भोवति मिपा सदस्यांचे पुतळे उभारावेत अशी णम्र सुचना आहे...

Mandir

अवांतरः बलसाड येथे एका मंदीराबाहेर ह्या पुतळ्यांचे दर्शन झालं होतं.

आतिवास's picture

2 Sep 2014 - 9:54 pm | आतिवास

कल्पना(विलास) मस्त आहे.
फक्त मंदिरासाठी 'मध्यवर्ती' जागा कोणती यावर मिपाकरांचं एकमत होईल याची कुणीतरी हमी घ्या, म्हणजे झालं ;-)

लोकं पार दिवे आगारापासून ते बद्रीनाथापर्यंत जातात..

दादा कोंडके's picture

2 Sep 2014 - 10:08 pm | दादा कोंडके

मजा आली. गणपतीची सुद्धा चलत्ती आहे. त्याला कुठलासा राजा बनवून टाकायचा. लालबागच्या राज्याएव्हडं पद्धतशीर मार्केटींग कुठं बघितलं नाही. सामना आणि लोकसत्ता वाल्यांचा फेवरेट देव. आतातर लोकसत्ता उघडला की कोपर्‍यात राज्याच्या लाइव्ह आरतीचा विडिओ सुरू होतो. दोन-चार केबीच्या बातम्यावाचण्यासाठी पेपर उघडला तर मेग्याबायटी विडिओ लाउन फुकट ब्यांडविद्थ जाळतात. :(

लालबागच्या राज्याएव्हडं पद्धतशीर मार्केटींग कुठं बघितलं नाही.

अगदी!

आमच्या ल्हानपणी सगळ्यात फेमस होता तो गणेश गल्लीचा गणपती. लालबागच्या गणपतीला फार कुणी जात नसे. नंतर त्यांनी काय मार्केटिंग केले ठाऊक नाय, पण गेल्या १०-१२ वर्षांत लालबागचा गणपती लै म्हंजे लैच फेमस झाला!

समीरसूर's picture

3 Sep 2014 - 10:17 am | समीरसूर

तीच तर्‍हा पुण्यातल्या दगडूशेठ गणपतीची. ९० च्या दशकात मी दगडूशेठ गणपतीला त्या भागात कधी गेलो तर जात असे. अगदी मूर्तीजवळ जाऊन दर्शन घेता येत असे. लोकं तिकडे गेलो तर दर्शन घ्यावे अशा पद्धतीने दर्शन घेत असत. मोठे हार, किलो किलो पेढे, नारळांची माळ, महागड्या मिठाया वगैरे घेऊन खास दर्शनासाठी कुणी तेथे जात असल्याचे स्मरत नाही. पुण्याबाहेरही हा गणपती अगदीच मोजक्या लोकांना माहित होता. आमच्या गावाकडे तर कुणालाच माहित नव्हता. पण साधारण २००० पासून या गणपतीचे मार्केटिंग इतके जबरदस्त केले गेले की आज तिथे दर्शन घेण्यासाठी जायचे म्हणजे अंगावर काटा येतो. चतुर्थीच्या दिवशी किमान दोन तास वाट बघावी लागते. भक्त मिठायांचे पुडे, मोठे मोठे पाच-पाचशे रुपयांचे हार वगैरे घेऊन लांब रांगेत तिष्ठत उभे राहतात. कारण काय तर अचानक गेल्या १२-१५ वर्षात दगडूशेठ गणपती हा 'नवसाला पावणारा' हुकुमी देव बनलेला आहे. 'नवसाला पावणारा' ही पदवी मिळाली की मग भक्त गर्दी करणारच. कसा काय झाला हा बदल? 'लालबागचा राजा' मी लहानपणी ऐकला नव्हता. एवढंच काय अगदी १९९५-१९९९ पर्यंत पुण्यात राहून मला 'लालबागचा राजा' माहित नव्हता. नंतर काय चमत्कार घडला आणि तो एकदम स्टार गणपती झाला. आता शेकडो कोटींची मालमत्ता आहे या गणपतीची. तीच तर्‍हा मुंबईच्या सिद्धिविनायकाची. गेल्या १५-२० वर्षात सिद्धिविनायकाचे नशीब पालटले. कुठे जातात हे शेकडो कोटी रुपये आणि शेकडो किलो सोनं-चांदी? कुठल्या चांगल्या लोकोपयोगी कामात सढळ हाताने हा पैसा वापरला जातो? एक-दोन फुटकळ कामे वगळता (ती ही समाजाच्या आणि सरकारच्या दबावाखाली येऊन) ही संस्थाने असं काय भरीव सामाजिक काम करतात? समाजाचा ही संस्थाने इतकी मोठी श्रीमंत झाल्याने काय फायदा होतो?

आणि हे फक्त हिंदू मंदिरांच्या बाबतीत घडतेय असं अजिबात नाही. दर्गे आणि मस्जिदींच्या बाबतीत देखील असेच घडते आहे. किंबहुना या ठिकाणी काय शिकवले जाते याबद्दल शंका यावी अशा पद्धतीने दर्गे, मस्जिदी, मदरसे यांच्या संख्येत आणि संपत्तीमध्ये वाढ होते आहे. पुण्यात लकडी पुलाजवळ एक छोटेखानी दर्गा होता. आजच्या घडीला तिथे टोलेजंग मस्जिद उभी आहे. एकेका गावात जिथे पूर्वी १-२ मस्जिदी असत तिथे आता भव्य अशा स्वरुपाच्या ४-५ मस्जिदी आणि मदरसे आहेत. अजमेरचा दर्गा एक असेच उदाहरण. चित्रपटातले तारे तिथे जायला लागल्यापासून हा दर्गा तिरुपती बालाजी, शिर्डी यांच्या रांगेत जाऊन बसलाय. सामान्यांचे छोटे छोटे प्रश्न सुटत नाहीत आणि बड्या सिनेस्टार्सचे नवस कसे काय खात्रीने पूर्ण होतात?

अजूनही आपण मंदिरे-मस्जिदींच्या संख्येवरून आपली भक्ती जोखू लागलो तर मग यातून काय साध्य होणार आहे हा फार मोठा प्रश्न आहे. असो.

प्रभाकर पेठकर's picture

3 Sep 2014 - 3:51 pm | प्रभाकर पेठकर

ही संस्थाने असं काय भरीव सामाजिक काम करतात? समाजाचा ही संस्थाने इतकी मोठी श्रीमंत झाल्याने काय फायदा होतो?

त्यांच्या ह्या तथाकथित समाजकार्याची समाजाला खरोखर गरज आहे का? सरकार आपले कर्तव्य का नाही बजावत? गरीबांसाठी शिक्षण, वैद्यकिय सेवा, पिण्याच्या पाण्याची आणि सार्वजनिक शौचालयांची सोय सरकारने करायची आहे. देवस्थानांना ही नसती उठाठेव कोणी सांगितली आहे? ज्या मंदिर व्यवस्थापनाचा गैरव्यवहार, आर्थिक किंवा भक्तांना मिळणारी वागणूक, सिद्ध होतो ती ती देवस्थाने बरखास्त करून टाकावीत. देणग्या, वस्तू आणि पैसा, नियंत्रित कराव्यात. भ्रष्टाचार निपटून काढावा.

दादा कोंडके's picture

3 Sep 2014 - 9:29 pm | दादा कोंडके

देवस्थानांना ही नसती उठाठेव कोणी सांगितली आहे?

पण अशी मदत करून उपकाराच्या ओझ्याखाली लोकांना ठेवलं की यांच्या विरोधात कुठं काही खुट्ट झाली ही लोकं तयार होतात. अगदी जीव द्यायला तयात होतात. लोकशाहीत ही प्रचंड ताकद असते. एक समांतर उदाहरण म्हणून सत्यसाई हॉस्पिटल. त्यांची अब्जावधीची बेकायदा संपत्ती आहे. पण त्यातले काही लाख कोटी खर्च करून त्या इस्पितळात गरीब लोकांचे मोफत इलाज होतात. आणि कुठल्याही पेशंटला ऑपरेशन टेबलावर घेण्याआधी त्या ऑपरेशनची सक्सेस प्रोबॅबिलिटी ९५% पेक्षा जास्त असेल ही खात्री करतात जेणेकरून पेशंट दगाउन नसती आफत येउ नये. उद्या सरकारने काही कारवाई करायची ठरवलीच तर ही लोकं हजारो लोकं जीव द्यायला तयार होतील.

मंदार दिलीप जोशी's picture

4 Sep 2014 - 10:40 am | मंदार दिलीप जोशी

पुरावा काय

विवेकपटाईत's picture

4 Sep 2014 - 10:53 am | विवेकपटाईत

दिल्लीत ही विकासपुरी येथे लालबागचा देखावा उभा केला आहे. गल्लीते दिल्ली पर्यंत कीर्ती पोहोचली.

कवितानागेश's picture

3 Sep 2014 - 12:01 am | कवितानागेश

ही तर देवाचीच कृपा झाली म्हणायची...
जरा कुठे मी म्हणाले, पैशाची फार गरज आहे, तर इतक्या आयड्या!! =))

स्पंदना's picture

3 Sep 2014 - 6:33 am | स्पंदना

मला आलरेडी सपान पडलंय....धम्याला पुरावा मागा. तेंव्हा आद्य माता म्हणुन मी स्वतःला घोषित करत आहे.

राजेश घासकडवी's picture

3 Sep 2014 - 7:28 am | राजेश घासकडवी

गणपतीचा उत्सव चालू असतानाच नेमकं दैवतांच्या आणि मंदिरांच्या चेष्टेला ऊत का येतो हे समजत नाही. महान भग्वद्गीतेत सांगितलेल्या भक्तीयोगासारख्या पवित्र हिंदू परंपरांची टिंगल केल्याशिवाय या सुडोसेक्युलर विचारजंतींना आपलं पुरोगामित्व सिद्धच करता येत नाही. आपल्या हिंदूसंस्कृतीतल्या उगवत्या देवालयांबद्दल असले गलिच्छ विचार मांडलेले पाहून एक मिपाकर म्हणून मला शरम वाटली.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

3 Sep 2014 - 9:08 am | माईसाहेब कुरसूंदीकर

ह्याला म्हणतात सुसंस्कृत प्रतिसाद.
दैवतांची वा मंदिरांची कुणी पाकिस्तानी लोकांनी वा युरोपियनांनी टिंगल केली तर मात्र आपण वस्कन अंगावर जायचे."कोण कुठला तू?", "तुझे सामाजिक कामगिरी काय?" "जोड्याने हाणला पहिजे" "तिथल्या तेथे ठेचला पाहिजे" असे प्रतिसाद द्यायचे.
समीरसूरच्या जागी कुणी सलमानसूर असता तर असे प्रतिसाद नक्कीच आले असते.

समीरसूर's picture

3 Sep 2014 - 9:40 am | समीरसूर

घासकडवीसाहेब,

जाऊ द्या, एवढं टेंशन नका घेऊ. सगळीकडे एग्झॅक्टली असंच चालू आहे. थोडी अतिशयोक्ती असेल कदाचित पण लालबागचा राजा, प्रभादेवीचा सिद्धिविनायक, शिर्डी अशा ठिकाणी नेमकं हेच चालू आहे. जे वास्तवात आहे तेच थोडे अतिरंजित करून लिहिले आहे इतकेच. लिखाणात उपहास आहे हे आपल्या लक्षात आले असेलच. देवांची, देवळांची टिंगल करण्याचा हेतू अजिबात नाही. असेल तर फक्त देवालयांच्या नावाखाली जो गलिच्छ बाजार मांडला गेलाय त्यावर प्रकाश टाकण्याचा क्षीण प्रयत्न आहे. देवांची टिंगल हा मुख्य विचार असता तर 'देऊळ' (आणि 'ओह माय गॉड' देखील)चित्रपट एवढा गाजला नसता आणि राष्ट्रीय पातळीवरची पारितोषिके त्यास मिळाली नसती. आपल्या देवाच्या आणि भक्तीच्या संकल्पना थोड्या तपासून बघायला पाहिजेत. आणि हे मस्जिद, चर्च इत्यादींच्या बाबतीतही तंतोतंत लागू पडतं. नुसती मंदिरे, मस्जिदी, चर्चेस उभारून देव कळला असता तर जगात देव-धर्मावरून इतकी अमाप हिंसा घडलीच नसती.

बाळ सप्रे's picture

3 Sep 2014 - 10:18 am | बाळ सप्रे

लिखाणात उपहास आहे हे आपल्या लक्षात आले असेलच

अहो घासकडवींचासुद्धा गुगली होता तो !!

समीरसूर's picture

3 Sep 2014 - 10:22 am | समीरसूर

लक्षातच आले नाही बघा. बुद्धीचा देव आम्हाला विसरलाच त्याला काय करणार? :-)

मंदार दिलीप जोशी's picture

4 Sep 2014 - 10:42 am | मंदार दिलीप जोशी

तरी ते बरोबरच होते

मंदार दिलीप जोशी's picture

4 Sep 2014 - 10:41 am | मंदार दिलीप जोशी

देऊळ' (आणि 'ओह माय गॉड' देखील)चित्रपट एवढा गाजला नसता
>>

गाजला,चालला नाही ;)

समीरसूर's picture

4 Sep 2014 - 11:39 am | समीरसूर

'ओह माय गॉड' ५० कोटीपेक्षा जास्त व्यवसाय करून गेला आणि ते ही परेश रावल सारखा चरित्र अभिनेता मुख्य भूमिकेत असतांना. रणबीर कपूरचा 'बर्फी' त्याच दरम्यान 'ओएमजी' पेक्षा किंचित जास्त व्यवसाय करून गेला होता. 'ओएमजी' बजेटच्या मानाने चिक्कार चालला आणि लोकांना त्यात दाखवलेले पटले देखील. आपल्याकडे फक्त अंमलात आणतांना लोकांची अडचण होते. देवाची भीती ही एकच भावना त्यांना निरर्थक प्रथांमध्ये अडकवून ठेवते. भक्तीपेक्षा भीती जास्त पॉवरफुल आहे आपल्याकडे. म्हणून तथाकथित बाबा-बुवांचं फावतं. सत्य साईबाबांचे ढोंग तर सगळ्या जगाला माहित होते. आणि एका संताला का हवी एवढी संपत्ती? का हवं फाइव्ह स्टार आयुष्य? त्यांचे ते चमत्कार जत्रेतला साधा जादुगार देखील करू शकेल असे होते. त्यांच्यापेक्षा तो कष्ट करून पोट भरणारा साधा जादुगार जास्त पूजनीय आहे. आसाराम गेलाच ना तुरुंगात? नित्यानंदची लागलीच ना वाट? मागे इस्कॉनचा कुणी तरी पॉवरफुल साधू जर्मनीमध्ये बलात्काराच्या घटनेत सापडला होता. आपल्या इथल्या मूर्ख जनतेच्या मूर्खपणाचा फायदा घेऊन हे लबाड लांडगे मुजोर होतात आणि स्वतःला देव समजतात. निर्मल बाबा, राधे माँ वगैरे भोंदू त्याच लायनीतले. अनिरुद्ध बापू स्वतःला देव समजतो. असे शक्य आहे का? कुणी माणूस कसा काय देव असू शकेल? मग देव असेल तर सगळ्यांची दु:खे चुटकीसरशी दूर का नाही करू शकत? दहशतवाद नष्ट का नाही करू शकत? फक्त जे भक्त त्यांचेच भले करणार असा विचार करतो का खरा देव? भक्त मग तो किती का भ्रष्टाचारी, व्याभिचारी, क्रूर असे ना, त्याचं हा बाबा भलंच करणार असं काही आहे का या लबाडांचं तत्व? हा निव्वळ ढोंगीपणा आहे. आणि त्याला कारणीभूत आपल्या इथले मूर्ख लोकं आहेत. :-)

सुनील's picture

3 Sep 2014 - 9:56 am | सुनील

;)

प्यारे१'s picture

3 Sep 2014 - 12:14 pm | प्यारे१

ओ आमचा प्रतिसाद आहे तो ;)

मंदार दिलीप जोशी's picture

4 Sep 2014 - 10:41 am | मंदार दिलीप जोशी

अनुमोदन

चौकटराजा's picture

3 Sep 2014 - 8:37 am | चौकटराजा

मिपाकरांचे मंदिर आले तर
बाहेर रोशनीचा पुतळा बसावावा लागेल.
मंदिरात बल्लावाचार्याची मूर्त स्थापावी लागेल.
अध्यात्मवाद्यांची (सं)कीर्तन जुगलबंदी ठेवावी लागेल मंडपात.
जय मिपा जय मिपा मस्तंय रे मिपा
वर्गणी नाही म्हणूनी फुकटच्या गप्पा.... जय मिपा..... अशी आरती.

आणि आरती म्हणून मोकलाया आणि भांडे या दोन्ही कविता त्यांबरोबरच्या प्रतिसादांसकट छापून वाटाव्यात.

कपिलमुनी's picture

3 Sep 2014 - 2:16 pm | कपिलमुनी

लिंक द्या हो !
मिसली ती कविता :(

बॅटमॅन's picture

3 Sep 2014 - 3:06 pm | बॅटमॅन
प्यारे१'s picture

3 Sep 2014 - 2:17 pm | प्यारे१

आय ऑब्जेक्ट.

आपल्याला देऊळ काढायचंय हा मोटो फिक्स आहे. हास्यक्लब नाही. =))

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

3 Sep 2014 - 2:45 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

मुख्य मूर्ती रोशनीची. उजव्याबाजूला मधुबालाची एक मूर्ती,डाव्या बाजुला किशोर कुमारची मूर्ती हवी कमरेवर हात ठेवून. काकड आरतीऐवजी आर.डी.ची गाणी.

चुकलात तुम्ही. आमच्या देवळात हास्य थेरपी करून मिळेल हे अ‍ॅडिषनल क्रेडिट मिळेल ते का घालवायचं?

प्यारे१'s picture

3 Sep 2014 - 3:14 pm | प्यारे१

आयला, खरंच्च की. अ‍ॅडीशनल मेम्बरं. अ‍ॅडीशनल डोनेशन.

डालरा डालरा....

मंदीर गावाबाहेर वगैरे केल्यास भव्यदिव्य वगैरे करावे लागते.. खूप इंव्हेस्ट्मेंट करावी लागेल.. मध्यवस्तीत एखादा कोपरा बळकावून छोट्याश्या घुमटीपासून सुरुवात करावी.. मग मांडव वगैरे घालून हळूहळू हातपाय पसरावेत..

समीरसूर's picture

3 Sep 2014 - 12:22 pm | समीरसूर

पुण्यात अजूनही रेडीमेड देवळे आहेत ज्यांचे उत्तम मार्केटिंग करता येऊ शकेल. थोडी फार ब्रँड व्हॅल्यू या देवळांना ऑलरेडी आहेच. उदा. जिलब्या मारुती, सोन्या मारुती, त्रिशुंडी गणपती, नवश्या मारुती, पत्र्या मारुती. एक कुठलेतरी मंदिर घ्यायचे आणि आपला मार्केटिंग प्लॅन तयार करून अंमलात आणायचा. जागेचा मोठा प्रश्न उभा राहिल हे मात्र खरे. या मंदिरांतले देव स्वतःच त्या त्या ठिकाणच्या गर्दीला कंटाळलेले आहेत. :-) श्वास गुदमरतो त्या गर्दीत. तोडा अड्जेस कर्ना पडेगा...

नवश्या मारूतीचं पद्धतशीर मार्केटिंग पलिकडच्या मंगल कार्यालयवाल्यांकडून चालू आहे. कल्जि क्रु नये.

'शनि शत्रु नही, मित्र है' हे फेसबुक पेज शनि - शिंगणापूरचं मार्केटिंग करतं; तसंच दिसतंय नवश्या मारुतीचं. चांगलं आहे. उसके घर देर है, अंधेर नही. :-)

समीरसूर's picture

3 Sep 2014 - 2:15 pm | समीरसूर

'शनि शत्रु नही, मित्र है' हे फेसबुक पेज शनि - शिंगणापूरचं मार्केटिंग करतं; तसंच दिसतंय नवश्या मारुतीचं. चांगलं आहे. उसके घर देर है, अंधेर नही. :-)

बॅटमॅन's picture

3 Sep 2014 - 2:15 pm | बॅटमॅन

तोडा अड्जेस कर्ना पडेगा...

अहो, एकदा का मार्केटिंग यशस्वी झालं तर तोडाच काय, पाटल्या-बिल्वर-चेन-अंगठ्या, झालंच तर बिस्किटे सग्गळं सग्गळं अ‍ॅडजेस करू, हाकानाका.

कपिलमुनी's picture

3 Sep 2014 - 12:45 pm | कपिलमुनी

१. भिकार्‍यांच्या टोळीला कॉण्ट्रक्ट द्यावा लागेल
२. माजोरडे पुजारी
३. दर्शनाला लागणारी रांग (त्यासाठी देवाला दुपारी झोपवा, सकाळ संध्याकाळ कपडे बदला.)
४. चेंगरा-चेंगरी
५. सोशल मीडिया चा वापर

याने "मिपाद्वार देवस्थान" चांगलेच फेमस होइल

४.लहान मुलांसाठी चा स्पेशल देवाची सध्या वानवा आहे , सटवाई , जिवती ई. त्यांची मंदीरे नहियेत फारशी..

त्यांना स्कोप द्यावा..
आणि देवी असल्याकारणाने साड्या, दागिने यांची मिळकत वाढते

आदूबाळ's picture

3 Sep 2014 - 2:09 pm | आदूबाळ

लहान मुलांसाठी चा स्पेशल देवाची सध्या वानवा आहे

हां ये बात! असं सुपरस्पेशलायझेशन पायजे. पेडोआर्थोडेंटिस्ट (लहान मुलांच्या हिरड्यांचा डागदर) असतो तसं खास लहान मुलांसाठी पेशल देव हवाच.

योगी९००'s picture

3 Sep 2014 - 3:26 pm | योगी९००

भिकार्‍यांच्या टोळीला कॉण्ट्रक्ट द्यावा लागेल
हेच लिहायला आलो होतो...भिकारी पण आपलेच ठेवावेत...!!

बाकी किर्तनकार म्हणून जीभौ ना विचारावे काय?