(बाह्य दिल्लीत राहणारे काही बाबू जाणा-येण्याचा वेळ ही ८ तासात सामावून घायचे. आता कार्यालयात १० तास काम करावे लागतो आणि शिवाय जायला यायला दीड-दोन तास लागतातच. १५ मिनिटे उशीर झाला कि अर्धी सुट्टी कट. असे हे बाबूंचे अच्छे दिन सुरु झाले आहेत)
दोनतास जायला
दोन तास यायला
वर दहा तास काम
बाबूंचे असे
अच्छे दिन आले.
न घेताच सुट्ट्या
कश्या काय संपल्या
मिनिटाच्या उशिराने
पाण्यात त्या बुडाल्या.
बाबूंच्या सुट्ट्यांचे असे
अच्छे दिन आले.
कचर्याचे ढिगारे
आता स्वच्छ झाले.
पान-तंबाकू थुंकणे
आता बंद झाले.
कारीडोर भिंतींचे असे
अच्छे दिन आले
कागजी घोडे पुन्हा
दौडू लागले.
फाईलींना नवे
जीवन मिळाले.
सरकारी कामांचे असे
अच्छे दिन आले.
प्रतिक्रिया
18 Aug 2014 - 1:48 pm | वेल्लाभट
ते ठीक आहे, पण असं झालंय का? खरोखर?
18 Aug 2014 - 5:12 pm | विवेकपटाईत
बाबूंची नकेल तर कसल्या गेली आहे. पण 'कागदी घोडे खरोखरंच रस्त्यावर धावतील का, ते सध्या सांगतायेण कठीण आहे.
18 Aug 2014 - 5:37 pm | पैसा
बाबूलोक ऑफिसात बसतात हेही नसे थोडके!
18 Aug 2014 - 6:27 pm | कैलासवासी सोन्याबापु
आयला!!, आधी पण बसायचे राव हापिसात!!!! नाही नाही म्हणता म्हणता काही काही मोठे बदल आपल्या जिवनात चंचुप्रवेश करुन गेलेत!!!, ते काय असेच आले!! हां एफिशियंसी वाढवण्या साठी उचललेली ही पावले झकासच आहेत!
18 Aug 2014 - 6:35 pm | स्पंदना
आहे बाबा बाबू ग्रुपचा प्रतिनिधी कुणी.
18 Aug 2014 - 6:38 pm | कैलासवासी सोन्याबापु
प्राऊड बाबू!!! *LOL*
मी आधी सॉफ्टवेर जवळुन पाहिले आहे आता बाबुगिरी पण पाहतोय ! सो मला एक त्रयस्थ पर्स्पेक्टीव्ह ने बघता येण्याचे गॉड गिफ्ट आहे असे समजा!! समतोल असणे महत्वाचे!!
20 Aug 2014 - 1:14 pm | चिगो
मस्तच कविता.. नॉर्थ ब्लॉक आणि साऊथ ब्लॉकचे कोपरे आणि भिंती आता रंगीत नाहीत, हे नक्कीच सांगु शकतो.. तसेच ल्युटेयन्स दिल्लीतले गोल्फ कोर्सेस आता बर्यापैकी ओस पडलेले असतात, असे ऐकीवात आहे.. ;-)
20 Aug 2014 - 3:46 pm | llपुण्याचे पेशवेll
चिगोंची प्रतिक्रिया फार छान आणि बोलकी आहे.
21 Aug 2014 - 10:09 pm | रमेश आठवले
ही आतल्या गोटातील माहिती कवितेच्या रुपात वाचून बरे वाटले. आता हा जरुरी बदल येती पाच वर्षे तरी टिकेल असे वाटते. त्यानंतर किंवा आणखी काही महिन्यांनी सुद्धा -येरे माझ्या मागल्या- सुरु होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मोदींना सुद्धा कर्मचारी वेळेवर कामावर येतात ही बातमी मुख्य मथळ्याचे स्थान वृत्तपत्रात आणि वाहिनीन वर घेते याचे आश्चर्य वाटले होते आणि त्यांनी तसे लाल किल्यावर पंधरा ऑगस्ट ला केलेल्या भाषणात व्यक्त केले होते.