माझे साईपदयात्रेचे अनुभव - १ - http://misalpav.com/node/28447
माझे साईपदयात्रेचे अनुभव - २ - http://misalpav.com/node/28457
माझे साईपदयात्रेचे अनुभव - ३ - http://misalpav.com/node/28464
माझे साईपदयात्रेचे अनुभव - ४ - http://misalpav.com/node/28482
माझे साईपदयात्रेचे अनुभव - ५
आजचा ७ वा दिवस , १ एप्रिल २००९ . सकाळी १.०० च्या दरम्यान मंडळाचे सभासदांनी सर्वांना हाका मारुन उठवले.
नेहमीप्रमाणे सर्व आटपुन तयार झालो. आज पुर्ण अंग व पाय खुप दुखत होते. साधारण रात्री २.१५ ला चालायला सुरुवात केली आणी अचानक लक्षात आले की डाव्या पायाच्या अँकलची शीर खुप दुखत आहे. ५ व्या आणी ६ व्या दिवशीचे जास्त अंतर चालल्याने शीर खुप ठणकत होती. घाट उतरताना झटके बसुन बसुन कमरेची शीरही दुखत होती. पायाची मुरगळल्यासारखी अवस्था झाल्याने लंगडत लंगडत चालु लागले. जोडीदारांनी अँकल सपोर्ट बेल्ट लावला पण त्याचा काही उपयोग होत नव्हता. मी थांबुन बेल्ट काढायला लावला. मला पुन्हा गाडीत बसायचंय का असं विचारण्यात आलं , मी नकारच दिला, उद्या तर शिर्डी पोहोचु, इतका पल्ला गाठला आता नाही बसणार. ह्ळु हळु चालायला लागले पण पाय टेकवेना, शेवटी एका बाजुने राउतचा भाउ अमोल व दुसर्या बाजुने राउतचे मामा ह्यांचे नाव श्रीकांत मामा ह्यानी असे दोघांनी मिळुन २ गमछाने मला सपोर्ट दिला. चालणे असह्य झाले होते. मरणप्राय वेदना सुरु झाल्या. बराच वेळ चाललो तरी खुप कमी अंतर कापले जात होते. काय करावे सुचत नव्हते. अजुन २२ ते २५ की,मी. अंतर पार करायचे होते. पदयात्रा सुरु करण्यापुर्वी एक महीना अगोदर घरच्यांबरोबर गाडीने शिर्डीला आले होते. परत येताना पदयात्री दिसत होते. एका पदयात्रीला दोघांनी सपोर्ट दिला होता आणि त्याची अवस्था अतिशय वाईट होती हे पाहुन माझे भाउजी म्हणाले होते कि आपल्या कविताला असेच आणावे लागेल असे वाटते आणि तसेच झाले. माझी अवस्था ही दयनीयच झाली होती.
खुप वेळ चालुन चालुन पाय आणखी ठणकु लागला. ईतके दिवस पुरेशी झोप नसल्याने डोळे ही जड झाले होते. खुप मागे पडलो. चालता चालता सारखे कीती वाजले असे विचारत होते , बरेच अंतर झाल्यावर ४ वाजल्याचे समजले , जोडीदार म्हणत होते आज काही सकाळचा आराम मिळणार नाही, आरामाचा थांबा बराच लांब होता , ते मला म्हणत होते कि पटापट पाउले उचल आरामाच्या थांब्यापर्यंत म्हणजे आराम करता येईल. मी शक्यतो प्रयत्न करत होते पण काही केल्या लवकर चालवेना. ते मला म्हणत होते देवाचे नाव घे, मी साईबाबांना हाका मारत होते. आजुबाजुला का़ळाकुट्ट अंधार होता. काय करावे समजत नव्हते कारण अंधारात कुठेही आरामासाठी थांबणे रीस्की होते. कसेबसे ४.४५ ला आरामाच्या थांब्यावर पोहोचलो. मी लगेचच जागा पाहुन पडले. १५ मिनिटात सर्व उठुन निघाले, आम्हीही उठलो. आता अजुन पाय दुखत होता. २ सपोर्टवर कशी बशी चालु लागले. ५ ची आरती सुरु झाली. मी साईबाबांचे नाव घेउ लागले. आता मात्र अवसान गळु लागले होते. हुंदके द्यायला सुरुवात झाली. आजचा दिवस परीक्षेचा होता. साईबाबांची आरती मनातल्या मनात बोलायला सुरुवात केली पण कुठले कडवे आपण आता म्हंटले आहे हेही विसरुन जात होते. थोडया वेळाने मी साईबाबांना मनातच सांगितले "बस आता यातुन सुटका करा, आता मरण आले तरी चालेल". अक्षरशः आज काही ह्यातुन वाचत नाही असेच वाटत होते आणी मरणाची वाट पाहत होते कारण मेले तर ह्या वेदनापासुन सुटका होईल त्यामुळे साईबाबांपुढे "देवा आता सुटका करा" असा धावा करु लागले पण काहीच फरक नाही. आता मात्र जोरजोरात हुंदके येउ लागले, जोडीदार बिचारे माझ्याकडे हळुच पाहत चालत होते त्यांनाही माझी ही अवस्था पाहुन खुप दया येत होती. थोडयावेळाने मी बाबांना मनातल्या मनात म्हणु लागले की आता तुम्हीच या आणि माझा हात पकडुन मला घेउन चला , आता काही सहन होत नाही. बराच वेळ असं बोलत होते. आम्ही खुप मागे पडलो होतो.
७ वाजताच्या दरम्यान एके ठीकाणी आलो येथे शिर्डी संस्थानने पदयात्रीच्या आरामासाठी मंडपाची सोय केली आहे. आमचे पदयात्रीही इथे थांबले होते पण आम्ही पोहोचेपर्यंत त्यांची निघण्याची वेळ झाली होती. माझ्या जोडीदारांनी मंडळाच्या अध्यक्षांना सांगितले की हि खुप थकलीये आणी हिला नीट झोप सुद्धा मिळाली नाहीये हिला आरामाची खुप गरज आहे तर तुम्ही निघा आम्ही हिला घेउन येतो. तिथे मिळालेली छोटी वेफर्सची पाकीटे हातात देउन मंडळी पुढे निघाली. माझ्याबरोबर आता राउतचा भाउ अमोल, श्रीकांत मामा, निलेश आणि दिपक भाउ थांबले होते. दिपक भाउ पालघर्ला कुठल्यातरी कंपनीमधे झाडाला पाणी शिंपण्याचं काम करतात, दरवर्षी इतक्या उन्हातही शॉप फ्लोअरवर काम करताना घालण्याचे जाड सेफ्टी शुज घालुन पदयात्रा करतात. पदयात्रेत पडेल ते काम करतात मंडळ त्यांना थोडे फार पैसे देतं. थोडावेळ आराम करुन वेफर्स खाउन निघालो, उजेड झाल्याने उन जाणवु लागलं होतं , झोप मिळाल्याने थोडी हुशारी आली होती पण दुखणं कमी झालं नव्हतं, गमछाचा आधार होता. येणारे जाणारे माझ्याकडे दयेने पाहत होते. थोडया थोड्या वेळाने बसत होते. बसले तरी पायातले सॉक्स आणि अँकल सपोर्ट काढायला वाकायचेही त्राण नव्हते. थांबल्यावर अमोल माझ्या पायातले सॉक्स आणि अँकल सपोर्ट काढायचा आणी निघताना घालुनही द्यायचा. खुप मागे राहील्याने आमच्या मंडळाचा नाश्ता ही आम्हाला मिळाला नाही , खुप भुक लागली होती साईबाबांना म्हंटले बाबा भुक लागलीये काही तरी करा, थोडा वेळ चाललो तिथे दुसरे पदयात्री मंडळ नाश्ता देत होते वास्तविक प्रत्येक पदयात्री मंडळ आपापल्या पदयात्रींसाठी नाश्ता पुरवतं पण कुठल्याही पदयात्रीला खाणं पीणं नाकारत नाही. ते रोडवरच टेंम्पोत बसुन त्यांच्या पदयात्रीना नाश्ता देत होते आणि वडापाव असल्याने सगळे हातात घेउन खात खात पुढे जात होते. आम्हीही गेलो आम्हालाही वडापाव मिळाला. आता पाण्याची पंचाईत होती तेव्हा आतासारखे कुणी मोटरसाईकलवर पाणी वाटप करत नव्हते. एके ठीकाणी बसलो. बाजुलाव ५-६ पदयात्री नाश्ता करत बसले होते. स्वतःच चालत निघाले होते , जोडिला २ कार्स होत्या सामान ठेवण्यासाठी. आम्ही उठलो आणी मी दिपक भाऊंना रस्ता क्रॉस करुन समोरच्या दुकानातुन मिनरल वॉटर घेउन यायला सांगितले, त्या पदयात्रींना ऐकु आले आणि त्यांनी लगेच त्यांच्या कडच्या बिसलरीच्या २ बाटल्या मला दिल्या. तेवढ्यात दिपक भाउंनी देखील बाटल्या आणल्या. पाणी पिउन चारही बाटल्या दिपक भाउंनी बॅगेत भरल्या व चालु लागलो. आता त्यामानाने थोडं बरं वाटत होतं . सपोर्टर्स थोड्या थोड्या वेळाने माझ्या पायांना आराम मिळावा म्हणुन मधे मधे मला एकटीला चालायला लावत होते कारण त्यांनी सपोर्ट दिला की मला फास्ट चालावे लागे. हळु हळु करत चालत होतो, उन्हाचा त्रास होत होता. आता मध्ये मध्ये दुसरे पदयात्री मंडळही जोडीने चालत होतं . मध्येच ३ मुले आमच्या पुढे पूढे चालायचे मध्येच पुढे निघुन जायचे किंवा मागे राहायचे. हे तीघेजण खुप हसत खेळत चालले होते. मला तिघांचा ही चेहरा एकदाही दिसला नाही पण जो मधला मुलगा होता तो मागुन जितक्या वेळा दिसला तितक्या वेळा म्हणत होता की "साईबाबा येतील पण ओळखलं पाहीजे", मला ऐकुन शंका यायला लागली की कदाचित आज मला साईबाबा दर्शन देतील. पण मधे मधे वाटु लागलं की ते माझ्यासाठी इथे येतील इतकी माझी कुवत नाही ती पाहु पुढे काय होतं.
पुढे उन्हाचा त्रास खुप होउ लागला आणि चालणंही अवघड झाले. आता दोन्ही गमछा सपोर्टवर चालत होते. थोड्या थोड्या वेळाने बसत होते. वावी साधारण १.५ ते २ की.मी. राहील असेल , सकाळचे ९.५० झाले होते. रोडलगतच एक छोटंसं बंद पडीक हॉटेल होतं तिथे आजुबाजुला कडप्पा लावलेले होते, बसायची सोय असल्याने थांबायचे ठरवले आणि वळलो. तिथे दोन माणसबसली होती, एका माणसाने पांढरी बनियान, पांढरी पँट , डोक्याला साईबाबांसारखा पांढरा रुमाल गुंडाळला होता तो चिलीम ओढत होता. साईबाबा चिलीम ओढायचे हे मला माहीत होते व त्यांच्या ओरीजीनल फोटोमधे त्यांच्या बाजुला चिलीम ठेवल्या असल्याने त्यामाणसाच्या हातात चिलिम आहे हे मी ओळखले. माझे जोडीदार त्या माणसाशी गप्पा मारु लागले. अमोलने त्याला विचारले कि हे तुम्ही काय पित आहात तर मीच उत्तर दिले हि चिलिम आहे त्यावर तो माणुस म्हणाला हो ही चिलीमच आहे आणि ही फक्तं शिर्डीतच मिळते, ह्याचा एक झुरका जरी घेतला तरीही माणुस उलट पायी प्रवास करु शकतो. मला राहुन राहुन वाटत होते की हे साईबाबाच असावेत पण मी कुणालाही काही बोलंले नाही. चिलमीचा धुर अगदी माझ्या पर्यंत पोहोचत होता. आता निघायचं म्हणुन उठ्लो आणी रोडवर एका पदयात्री मंडळाचा थ्री व्हीलर आला त्यात साईबाबांचा ओरीजीनल फोटो आला आणी मी दोन्ही सपोर्ट सोडुन त्या थ्री व्हींलर मागे फास्ट चालु लागले. डोळयातुन अश्रुंच्या धारा वाहत होत्या. साई ढोल ताशा हे गाणं थ्री व्हीलर मधे लावलेलं "पायी हळुहळु चाला मुखाने साईनाथ बोला..." आणि मी अतिशय ईमोशनल झाले होते. त्या भावना मी व्यक्तच करु शकत नाही. माझ्यासाठी अविस्मरणीय क्षण होता, साईबाबा माझ्यासाठी आले होते, अगदी साईबाबा मला स्वत़ हाताने धरुन नेत आहेत असे वाटत होते, आणी मी बराच वेळ ईतकी फास्ट चालत होते, ढसा ढसा रडत होते , मागे वळुन पाहीले तर माझे जोडीदार माझ्याहुन अर्धा ते पाउण की. मी. मागे होते , रस्ता सरळ असल्याने आम्ही एकमेकांना पाहु शकत होतो, ते मला पुढे जा असं खुणावत होते मी पुन्हा वळले आणी साईबाबांच्या समोर हात जोडुन चालु लागले, डोळ्यातुन अश्रुधारा चालुच होत्या. मन शांत होत होते , आजही केव्हाही हा क्षण आठवला की खुप रडते, आताही हा प्रसंग लिहिताना डोळ्यात पाणी येतंय . जे त्या पडीक हॉटेलजवळ भेटले होते ते साईबाबाच होते याची खात्री पटली. जव़ळ जवळ १.५० ते २.०० कीमी अशीच चालत गेले. वावीला शिर्डी संस्थानचा पदयात्रींच्या आरामासाठी २ रा मंडप आहे तिथे जाउन हे थ्री व्हीलर थांबलं , रडतच साईबाबांसमोर डोकं टेकवलं आणि मंडपात प्रवेश केला. इथे बरेच पदयात्री मंडळ प्रवास करतात, इथे संस्थान ने मोफत चहा - नाश्ता आणि डॉक्टर्स ची सुविधा ठेवली आहे . मी नाश्ता घेतला तोपर्यंत जोडीदार आले. मला निलेश म्हणाला की तु जात असताना आम्हाला साईबाबांचा फोटो जिवंत असल्याचाच भास होत होता, त्या फोटोत एक वगळंच तेज जाणवत होतं आता काहीही झाले तरी या पुढे शेवट पर्यंत मी तुझ्याबरोबरच चालणार. आणी आज ही त्याने माझी साथ सोडलेली नाही दर वारीला तो माझ्या बरोबरच असतो मी कीतीही मागे पडले आणि कीतीही त्रास झाला तरीही तो मला केव्हाच एकटं सोडत नाही. नंतर कळले की तो माझा लांबचा नातेवाईकच आहे. नाश्ता करुन आम्ही जमलेल्या पदयात्री मंडळाच्या पालख्या पाहु लागलो. काही मंडळांनी पालखी बरोबर छान आरास केली होती, एक पालखि तर चांदीची बनवलेली होती जवळपास सर्व पालख्या मुंबई, कल्याण , डोंबीवली, नवी मुंबई ह्या भागातल्या होत्या. बाजुलाच अॅक्युपंक्चर , अॅक्युप्रेशर पद्धतीने मसाज करणे चालु होते. मला माझ्या जोडीदारांनी आधीच आधीच सांगितले होते की मसाज करुन घेउन नकोस अजुन अंग दुखेल म्हणुन मसाज कसा करतात हे पाहायला गेलो, तिथे एक माणुस ज्याला मसाज करुन घ्यायचा होता तो उताणा झोपला होता आणी जो मसाज करणार होता त्याने डायरेक्ट त्या माणसांच्या पोटर्यंवर उडीच मारली , मी घाबरुन जोरात ओरडले 'अय्या..." आणी सगळे मला पाहुन हसायला लागले तशी मी ही हसायला लागले, खुप मज्जा आली.
पुन्हा निघालो. बरंचसं बरं वाटत होतं पण पाय मात्र दुखत होते. उन खुपच चढलं होतं , ह्या रस्त्यावर आराम करायला सावलीचं एक झाड सुद्धा नाही सगळीकडे बाभळीची झाडे, आता मात्र चालायला त्रास होत होता. उन्हातच थांबुन थाबुन चालत होते. आणी मंडळी मला सांगत होती की आता १० मिनीटांवर आलंय आणी मी त्यांना सांगत होते की तुम्ही खोटं फसवता नेहमी असंच म्हणता , ते म्हणाले अगं असं सांगितलं नाही तर जो नवीन पदयात्री येतो त्याचं कसं होईल अजुन खुप चालायचंय असं सांगितलं तर त्याचा धीरच सुटेल. अजुन ७-८ की,मी. अंतर पार करायचं होतं. कसंतरी १.३० - २.०० च्या दरम्यान दुपारच्या जेवणाच्या थांब्याला पोहोचलो. मला अतिशय त्रास होत होता, तापासारखं जाणवत होतं. सर्वजण जेवुन आंघोळ करुन आराम करत होते. आज सर्वांच्या घरुन बरीच मंडळी एस.टी. ने या थांब्यावर पोहोचली होती कारण उद्या शिर्डीला पोहोचणार होतो. एक घर होते त्यात बायका बसल्या होत्या, मी जेवुन त्या घरात गेले, मी जवळच बसलेल्या एका मुलीच्या हातात आयोडेक्सची बाटली दिली आणी तिला सांगितलं की प्लीज माझ्या पायाला आयोडेक्स चोळुन दे मला खुप त्रास होतोय मी झोपले. ती मुलगी माझ्या पायाला आयोडेक्स चोळु लागली आणी तिला जाणवले की मला भरपुर ताप भरलाय तीने लगेचच तिच्या भावाला जयचंद्रला बोलावले जो मंडळाचा उपाध्यक्ष होता. बरीच मंडळी आत आली. जयचंद्रने लगेचच बर्फ आणला आणी माझा पाय वाकडा करुन माझ्या तळपायावर त्याने बर्फाचा तुकडा ठेवला पण मी रीस्पॉन्स देत नव्हते , मला जाणवत होते की माझ्या बाजुला बायका आणी सभासद जमलेत , उपाय करतायत पण मी डोळे सुद्दा उघडु शकत नव्हते. जयचंद्र म्हणत होता की ताप भरपुर भरलाय म्हणुन बर्फाचा तुकडा ईतका वेळ तळपायवर ठेवुन सुद्धा हिला काहीच जाणवत नाहीये. त्यांनी बायकांना माझ्याकडे लक्ष ठेवायला सांगितले आणी थोडा वेळ वाट पाहु नाहीतर हिला डॉक्टरकडे नेउ असे ठरवले.
दोनेक तासांनी माझा ताप उतरला आणि मी उठुन बसले, सगळे येउन माझ्या तब्येतीची चौकशी करु लागले. बर्फाचा शेक दिल्याने पाय दुखायचे थांबले होते. बाजुच्या घरात जाउन आंघोळ केली , आता खुपंच बरे वाटु लागले. माझ्या घरुन कुणीच आले नव्हते. संध्याकाळी फक्त पाचच की.मी. चालायचे असल्याने अध्यक्षांनी सांगितले आराम करा. ५ वाजता निघायचे आहे. ५ वाजता चालायला सुरुवात केली. जास्त अंतर चालायचे नसल्याने आरामात हळुहळु विदाउट सपोर्ट चालत होते. आता शिर्डी अवघ्या २० की,मी अंतरावर होती. ७ वाजेपर्यंत रात्रीच्या थांब्यावर पोहोचलो. जेवणं झाली, झोपलो.
प्रतिक्रिया
6 Aug 2014 - 11:04 am | वेल्लाभट
सॉलिड!
7 Aug 2014 - 7:32 pm | टवाळ कार्टा
बाकी इछ्छाशक्ती बरीच वाघ वाढली आहे
पण तुमच्या सारखे लोक असेपर्यंत या देशात बुवा, बापु, अम्मा यांना मरण नाही (या यादीत साईबाबांना पकडु नये)
7 Aug 2014 - 8:14 pm | कविता१९७८
मी बुवा ,बाबा अम्माचे कधी समर्थन केले नाही; मी फक्त साई बाबांची भक्त आहे आणि त्यांचा आदर करते जे पुर्णतः विरक्त जीवन जगतात
8 Aug 2014 - 1:56 am | प्रभाकर पेठकर
समर्थन शब्दात करण्याची आवश्यकता नाही. कृती आणि विचारांतून ते होते आहेच.
8 Aug 2014 - 3:49 am | रामपुरी
+१११११११११११
8 Aug 2014 - 9:56 am | कविता१९७८
सर्व अनुभव हे माझे स्वतःचे आहेत व त्यापासुन बनलेली मते ही सुद्धा माझी स्वतःचीच आहेत, ज्याप्रमाणे मी माझी मते दुसर्यांच्या सांगण्यावरुन न बदलता स्वानुभवानेच बदलते त्यामुळे बाकीच्यांची मते ही माझ्यामतानुसार बदलावी असा माझा हट्ट नाहीये. मी माझे इथे अनुभव मांडलेत ते जे पदयात्रा करण्यासाठी इच्छुक किंवा ज्यांचा त्यावर विश्वास आहे त्यांना पदयात्रा कशी होते हे समजण्यासाठी. पदयात्रा कशी योग्य आहे , पदयात्रेचे काय फायदे आहेत किंवा पदयात्रा करायलाच हवी असे मी कुठहीम्हंटलेले नाही किंवा माझे अनुभव कुणी मानायलाच हवेत असेही म्हंटले नाही.
11 Aug 2014 - 12:34 pm | प्रभाकर पेठकर
वरील प्रतिसादाशी अंशतः सहमत असलो तरी इतकी टोकाची आणि टोकदार मते असतील तर असे विचार स्वतःच्या खाजगी ब्लॉगवर मांडावेत. कुठल्याही दुसर्या संस्थळावर मांडल्यास त्यावर चर्चा ही होणारच. आणि चर्चा म्हंटल्यावर धाग्यात प्रकाशित मुद्द्यांच्या समर्थनार्थ आणि विरोधात वाचकांची मते प्रदर्शित होणारच. अशा सकारात्मक चर्चेतूनच लेखकाचे/लेखिकेचे आणि वाचकांचे मतपरिवर्तन व्हावे अशी अपेक्षा आणि संस्थळांचा उद्देश असतो. तो नाकारून कसे चालेल?
प्रत्येकाला आपापली मते जोपासायचा अधिकार असतोच. पण समाज परिवर्तन व्हायचे असेल तर जसे, सती प्रथा, स्त्री शिक्षण, बालमजुरी, बालशोषण, स्त्री मुक्ती ह्यावर सर्वसामान्यात चर्चा आणि समाजधुरीणांकडून कायदा आणि आंदोलनाद्वारे कृती झाली तशीच ती अंधश्रद्धा ह्या विषयावर होण्याचीही आत्यंतिक गरज आहे.
तुम्ही तुमचे विचार मांडलेत. ज्यांना ते पटले त्यांनी त्याचे कौतुक केले आहेच तसेच, ज्यांना ते पटले नाहीत ते आपली विरोधी मते मांडणारच. त्यावर तुम्ही विचार करावा एवढीच माफक इच्छा आहे. तुमच्या विचारांमध्ये आमुलाग्र बदल व्हावा असा आग्रहही कोणी केलेला नाही. असो.
11 Aug 2014 - 2:51 pm | संजय क्षीरसागर
>अशा सकारात्मक चर्चेतूनच लेखकाचे/लेखिकेचे आणि वाचकांचे मतपरिवर्तन व्हावे अशी अपेक्षा आणि संस्थळांचा उद्देश असतो. तो नाकारून कसे चालेल?
= आंतरजालाचा हा सर्वात महत्त्वाचा फायदा आहे. पण `व्यक्तीगत' या सदराखाली विरोधी विचारांची फुल दडपशाही किंवा आवांतर करणे या मानसिकतेचा प्रादुर्भाव जवाबदार मंडळीतही जाणवतो. मालिकेतला पहिला लेख पाहा, फुगा फुटला वगैरे कायकाय अवांतर (आणि त्यावरच्या उत्तराचे प्रतिसाद मात्र गुल!)
______________________________
या निमित्तानं, मूळ हेतू कसा दडवला जातो ते पाहाण्यासरखं आहे :
प्रश्न : शाब्बास! म्हणजे हा शारीरिक छळ ऑफिसमधल्या मानसिक त्रासापेक्षा सुखद आहे? की ऑफिसमधल्या टेंशनपुढे याला छळ म्हणण्यापेक्षा आनंद म्हणणं योग्य वाटतं. यापेक्षा, ऑफिसमधे कामातच मजा आली, तर या व्यापाची आवश्यकताच संपेल असं नाही का?
उत्तर : मी इथे माझे पदयात्रेचे अनुभव मांडलेत , पदयात्रा करावी का करु नये या चर्चेसाठी नाही, ज्यांना वाचायला आवडत आहे त्यांनी वाचावेत नाही तर सोडुन द्यावेत. पदयात्रा करणे ने करणे हे प्रत्येकाचे वैयक्तीक मत आहे.
प्रश्न : जर अनुभव व्यक्तीगत ठेवायचे असतील तर डायरी हा उत्तम पर्याय आहे. तुम्ही `ऑफीशीयल टेन्शन्स मधुन थोडं चेंज' हे पदयात्रेचं कारण लिहीलं आहे. आणि ऑफिसमधल्या कामात आनंद वाटणं हा त्यावर सोपा पर्याय नाही काय? अशी विचारणा आहे. पदयात्रा करावी किंवा नाही हा व्यक्तीगत निर्णय असला तरी उपस्थित केलेल्या मुद्दा सर्वस्वी वेगळा आहे.
उत्तर : ओ.के. , सॉरी. ऑफीसमधल्या कामात आनंदच वाटतो पण प्रत्येकजण नेहमी कुठे ना कुठेतरी फिरायला जातोच की नाही? कामाच्या व्यापातुन थोडं चेंज मिळवं म्हणुन तसंच काहीतरी.
प्रश्न : हा तुमचा व्यक्तीगत पर्याय आहे. कबूल. पण आम्ही `चेंज म्हणून' स्वतःचा असा शारिरिक छ्ळ करुन घेत नाही, इतकंच!
उत्तर : ओ. के. पण पहील्या वेळेस त्रास तर होणारच ना; नेहमी आणि सर्वांनाच ईतका त्रास होतो असे नाही.
प्रश्न : जाऊं द्या हो. माझ्याशी वाद घालाल तर तुम्ही पदयात्रा सोडून द्याल!
उत्तर : संजयजी, मी वाद घालतच नाहीये, फक्त माझं मत व्यक्त केलं.
आणि नेमका अंतस्थ हेतू हा आहे :
"मला ऐकुन शंका यायला लागली की कदाचित आज मला साईबाबा दर्शन देतील. पण मधे मधे वाटु लागलं की ते माझ्यासाठी इथे येतील इतकी माझी कुवत नाही ती पाहु पुढे काय होतं."
_________________________________
तर, बाई तुमचं चालू द्या. इथे भजनीमंडळाच्या सदस्यांची कमी नाही. तुमचे लेख, अनुभव, इच्छाशक्ती वगैरे सगळंच दिव्य आहे असे प्रतिसाद हळूहळू येतील.
11 Aug 2014 - 7:07 pm | कवितानागेश
साईबाबांचे दर्शन हा अंतस्थ हेतू जरी 'अॅब्स्ट्रॅक्ट' असला तरी नक्कीच "सात्विक" आहे. त्यातून त्यांची स्वतःची उन्नतीच होतेय.
शिवाय काही लोकांच्या "बकरे गाठण्याच्या" अंतस्थ हेतूपुढे तर तो फारच ग्रेट ठरतोय.
11 Aug 2014 - 7:23 pm | संजय क्षीरसागर
स्थूल देहानं सूक्ष्मात संचार करण्याचा भंपकपणा करुन, इतरांना मृगजळात पोहायला लावण्यात अर्थ नाही.
7 Aug 2014 - 8:16 pm | स्पंदना
वाचते आहे ...
8 Aug 2014 - 1:27 am | मुक्त विहारि
लेख आवडला...
10 Aug 2014 - 10:38 pm | संजय क्षीरसागर
तसंच समजलंय ते सांगणं, माझी पॅशन आहे. हा प्रतिसाद तुम्हाला नाही कारण या जन्मी तरी तुम्ही पदयात्रा सोडू शकत नाही. तुम्ही प्रतिवाद करावा अशी अपेक्षा सुद्धा नाही.
मला (इतरांना) इतकंच दाखवून द्यायचंय की नामस्मरण, पदयात्रा आदी साधना, व्यक्तीला फक्त भ्रमात नेतात.
हे पाहा : "मला राहुन राहुन वाटत होते की हे साईबाबाच असावेत पण मी कुणालाही काही बोलंले नाही"
अशाप्रकारे सगळ्या भक्तांना वाटत राहतं, `तो' भेटेल! (मग तो `राम' असेल, कृष्ण असेल, दुखहरता गजानन, (साक्षात) दत्तात्रेय की आणखी कुणीही) आणि आपलं जीवन सार्थक होईल... एकतर मुळात जो भेटेल असं वाटतं तो अस्तित्वातच नाही आणि भेटला असं वाटेल तेंव्हा तर परिस्थिती फारच गंभीर झालेली असेल. `One has met one's own illusion! म्हणजे मूळ प्रश्न सुटत नाहीच, पण ही नवी विपदा निर्माण होते. आता अशा लोकांना बाकीचे समविचारी प्रोत्साहन देतात... मग आरत्या काय, नामघोष काय, कसलेकसले (भंपक) मिस्टीकल अनुभव काय, .... जो काय कल्ला होतो, त्याला तोड नाही.
या विषयावर बरीच चर्चा झालेली आहे त्यामुळे पुन्हा नव्यानं कोणताही वाद घालण्यात मला रस नाही. कुणी काय करावं हे व्यक्तीगत स्वातंत्र्य आहेच. पण किमान माझ्याशी सहमत असणार्यांना या निमित्तानं उघड पुरावा दिसेल म्हणून हा प्रतिसाद.
10 Aug 2014 - 10:57 pm | कविता१९७८
धन्यवाद संजयजी
10 Aug 2014 - 11:10 pm | प्यारे१
+७८६
धन्यवाद संजयजी
11 Aug 2014 - 11:38 am | योगी९००
12 Aug 2014 - 8:26 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>>मला (इतरांना) इतकंच दाखवून द्यायचंय की नामस्मरण, पदयात्रा आदी साधना, व्यक्तीला फक्त भ्रमात नेतात.
ब्वारं !!! आता पुढील धागे आम्ही शांततेत वाचावयाचे आहेत, असे समजावे का ?
-दिलीप बिरुटे
12 Aug 2014 - 9:27 am | संजय क्षीरसागर
असे धागे मुळातच वाचनमात्र करायचे आणि व्य.नि.तून प्रतिसाद मागवायचे.... एकदम फुल्ल शांतता!
12 Aug 2014 - 10:51 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
चर्चा व्हायला हवी पण कोणाचे लेखन थांबुन जाईल इतके आग्रही मत कशाला हवे, आपल्याला काय वाटतं तेवढेच ते सांगावं आणि मोकलं व्हावं. आपल्याला एखादा विचार पटत नाही म्हणून तो विचार नेस्तनाबुत केलाच पाहिजे असं थोडं असतं. विचार असा सहज यावा की कोणताही विचार पटावा, आणि तटस्थपणे विचार करायला लागलो की आपण जे करतो ते चुक किंवा बरोबर आहे याची जाणीव व्हावी. मारून मूटकुन विचार थोडं बदलणार ?
12 Aug 2014 - 12:57 pm | धन्या
क्या बात हैं सर. मी हे अनुभवले आहे. ते ही इथेच, मिपावर.
विविध धाग्यांवर माझी मते आग्रहाने मांडत असताना श्री. मुकवाचक यांनी मला उद्देशून एक प्रतिसाद दिला. त्यांच्या प्रतिसादामध्ये मझ्या मताच्या विरोधी मते असूनही विचारांमध्ये इतकी सहजता होती की मला क्षणभर थांबून विचार माझ्याच विचारांचा नव्याने विचार करावासा वाटला.
अर्थात त्याने माझी भुमिका बदलली नाही. मात्र त्यातील टोकदारपणा कमी होऊन इतरांच्या मतांबाबत सहीष्णू झालो.
12 Aug 2014 - 2:29 pm | हाडक्या
+१ .. बिरुटे सर अगदी सहमत.. ही सहीष्णुता सर्वच प्रकारच्या चर्चांमध्ये अभिप्रेत आहे (जी अभावानेच दिसते).
12 Aug 2014 - 2:47 pm | कवितानागेश
हे अशक्य आहे! :)
14 Aug 2014 - 1:38 am | संजय क्षीरसागर
लेखिकेनं पदयात्रेला विरंगुळा म्हटल्यावर मी देखिल सोडून दिलं होतं (दुसरा लेख).
मला गाणी वाजवण्यात इंटरेस्ट असेल, तुम्हाला पदयात्रेत. तीनं प्रशंसा केली म्हणून मी सोडून दिलं असं नव्हतं, ती वैयक्तिक स्वातंत्र्याला मान्यता होती. विषय संपला होता.
पण सदस्यांनी लगेच कुरापती सुरु केल्या! मग माझी उत्तरं देखिल तशीच येतात (अर्थात, ती उडवणं तुमच्याच हातात आहे!).
या लेखावर देखिल मी सारांशानं, पदयात्रेची परिणिती कशात होते इतकंच दाखवून दिलं आणि थांबलो होतो.
कुरापती काढणार्या सदस्यांनी एक लक्षात घ्यायला हवं की सांप्रत विषयात मला निरुत्तर करणं अशक्य आहे. याचं कारण काही फार मोठं नाही, जे लिहीतोयं ती वस्तुस्थिती आहे. उदा. "साईबाबा माझ्यासाठी आले होते, अगदी साईबाबा मला स्वत़ हाताने धरुन नेत आहेत असे वाटत होते, आणी मी बराच वेळ ईतकी फास्ट चालत होते, ढसा ढसा रडत होते ..." यावर गहजब होऊ शकतो पण मी काहीही लिहीलेलं नाही.
आणि लेखिकेचा निश्चय ठाम आहे. त्या विचारात आता बदल अवघड दिसतो. तस्मात, ज्यांना समजू शकेल अशांसाठी प्रतिसाद दिला आहे.
बाय द वे, डॉ. दाभोलकरां सारख्यांनी ज्या कारणासाठी आयुष्य पणाला लावलं, ती ज्योत इतकी सहज मालवून जावी हे मान्य नाही.
15 Aug 2014 - 12:02 pm | डॉ सुहास म्हात्रे
...चर्चा व्हायला हवी पण कोणाचे लेखन थांबुन जाईल इतके आग्रही मत कशाला हवे, आपल्याला काय वाटतं तेवढेच ते सांगावं आणि मोकलं व्हावं...
+ १००
हे जेव्हा सर्व मानवजातीला समजेल तेव्हाच या जगातील अतिरेकीपणा नाहिसा होईल... पण मानवस्वभाव पाहता हे शेवटपर्यंत स्वप्नच राहण्याचीच जास्त शक्यता आहे :( :)
15 Aug 2014 - 12:13 pm | कवितानागेश
होय. दहशतवादी कारवाया थांबवणं हाच सध्या जगातला सगळ्यात मोठा प्रश्न आहे. :)
15 Aug 2014 - 3:56 pm | विलासराव
मला (इतरांना) इतकंच दाखवून द्यायचंय की नामस्मरण, पदयात्रा आदी साधना, व्यक्तीला फक्त भ्रमात नेतात.
संक्षीच्या या मताशी मी निर्विवादपणे सहमत.
देव देव्हार्यात नाही, देव नाही देवालयी
देव चोरुन नेईल, अशी कोणाची पुण्याई
देव अंतरात नांदे, देव दाही दिशी कोंदे
देव आभाळी सागरी, देव आहे चराचरी
देव शोधूनिया पाही, देव सर्वाभूतां ठायी
देव मूर्तीत ना मावे, तीथर्क्षेत्रात ना गावे
देव आपणात आहे, शीर झुकवोनिया पाहे
तुझ्या माझ्या जड देही देव भरुनिया राही
'झाला महार पंढरीनाथ' चित्रपटासाठी लिहिलेल्या ह्या गीतातील बावनकशी सोन्याच्या शब्दांना कोणी आचरणात आणू इच्छित नाही ही सुशिक्षित समाजाची दारूण हार आहे.
विठ्ठलवारी असो नाहीतर साईपदयात्रा असो. ही कर्मकांडं आहेत. खर्या भक्तीसाठी ह्याची गरज नसते. सिद्धीविनायकाला रस्त्याने लोळत जाण्याचीही गरज नसते. मनाचे सामर्थ्य वाढविण्याचेही योग, प्राणायाम, ध्यानधारणा असे अनेक साधे, सोपे आणि वैयक्तिक मार्ग आहेत. अजून राजकारण्यांचे इथे लक्ष गेलेले नाही नाहीतर विठ्ठलवारी, साईपदयात्रेचाही इव्हेंट होऊन लाखो-करोडो जनसमुदायाच्या सहभागाने ८ दिवस महामार्ग वगैरे वाहतुकीसाठी बंद ठेवून पदयात्रा काढल्या तर आश्चर्य वाटायला नको. असो.
हे सर्व विवेचन लेखिकेला उद्देशून नसून समाजातील उथळ आणि अंधश्रद्ध भक्तांना आणि अशा भक्तांचा गैरफायदा घेऊन स्वतःचे उखळ पांढरे करून घेणार्या सर्वांनाच उद्देशून आहे.
पेठकर काकांचे अत्यंत मार्मीक विचार आवडले. ते गीत फक्त गीत नसुन गीतासार आहे असे माझे मत आहे. त्या आपल्या अंतरातल्या देवाला शोधायचा मार्ग म्हण्जे ध्यानधारणा याबद्द्ल मला जराही संदेह नाही.मी स्वतः चालत नर्मदा परिक्रमा केलेली आहे.
तीचे फायदे असे:
मी रोज २०-३० कीमी चालु शकतो हे मला पहिल्यांदाच कळले.
शारीरीक त्रास होत असतानाही मन दृढ करुन आपण चालु शकतो हा प्रत्यक्ष अनुभव घेतला.
माझे वजन १७ कीलोने घट्ले हा माझ्यासाठी फायदा आहे( इतरांसाठी नसु शकेल).
अगदी कमीतकमी गरजांमधे जगता येउ शकते याचे ज्ञान झाले.
निर्मळ मनाने घरात मारामार असतानाही येणार्याजाणार्या परिक्रमावासींना अन्नदान( कुठल्याही कारनाने) करनारे सामान्यजन
पाहुन मन स्थीमीत झाले.
मी हे फक्त मनाची दृढता वाढवण्यासाठी आनी साधुंचे जीवनाबद्दल मला असलेले आकर्षण या उद्देशाने केले. मनाची दृढता ध्यानध्यारणेसाठी अत्यावश्यक आनी लाभदायक ठरते हा प्रत्यक्ष अनुभव आहे. बाकीच्या गोष्टी माझ्यासाठी गौन आहेत.
साईबाबा काय किंवा नर्मदामाई काय यांनी प्रत्यक्ष दर्शन दिले/ न दिले मला काहीच देणेघेणे नाही. मी साधना करतो ते मनातले षढरीपुंना आवर घालण्यासाठी. जर साई मला भेट्ले आनी माझ्या विकारात काहीच फरक नाही पडला तर माझ्या काय कामाला आले ते दर्शन. प्रत्यक्ष भेटुन जर काहीच माझ्यात फरक पडत नसेल तर मी धन्या किंवा गवींना भेटुन जास्त आनंद मीळवु शकतो. पुन्हा यांना भेटण्यासाठी मला पायपीट न करता जाता येईल. आनी फोन करुन गेलो तर भेटण्याची १००% खात्री. कवीता मला तुम्हाला हिणवायचे नाहीय . मीही चाल्लोय पाय तुटेपर्यंत.
नर्मदा परिक्रमेचे तोटे
अनेक साधु अर्ध्या अर्ध्या तासाला गांजा पीत असतात. इतके कर्मकांड करुन , बरेचसे लोक नर्मदामाईने दर्शन देउनही जर फक्त गांजा पिणे सुटत नसेल तर मला तरी ते दर्शन न झालेलेच बरे.अक्षरशा हजारो कर्मकांड तिथे चालतात. अनेक तांत्रीक मांत्रीक योगी/ हठयोगी तिथे आहेत सर्वच वाईट नाहीत, पण ते तुमच्यावर प्रयोग कर्ण्याचा धोका सतो अर्थातच तुम्ही मनाने कमकुवत असाल तर. अनेक सज्जन लोकही आहेत नाही असं नाही. बाकी ज्याचा त्याचा अनुभव मला त्याबद्दल काहीच म्हणायचं नाही. म्रुत्यंजय/ धन्या आनी अनेक लोकांनी खुपच व्यवहारी प्रतीसाद दिलेत याची नोंद घेतलेली आहे.
15 Aug 2014 - 9:59 pm | संजय क्षीरसागर
आध्यात्मिक साधनांचे विविध प्रकार स्वतः करुन पाहिलेल्या तुमच्यासारख्या व्यक्तीनं, ओपनींगलाच निर्विवाद सहमती दर्शवावी यातून अनेकांना लाभ होईल.
तुमच्या उर्वरित प्रतिसादाशी सहर्ष सहमती दर्शवून, फक्त एकच गोष्टी नमूद करतो.
निश्चय मनाचा होत नाही, आपला होतो. आपला एकदा निश्चय झाला की मनाचं काही चालत नाही. हा अत्यंत बेसिक उलगडा जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत मन पुढे आणि आपण मागे अशीच स्थिती राहाते, मग व्यक्ती कोणतीही आणि कितीही क्लेषकारक साधना करो.
तस्मात, जितकी दीर्घ साधना तितके वैविध्यपूर्ण अनुभव (उदा. पदयात्रा किंवा परिक्रमा) आणि जितका अनुभवाचा सोस तितका स्वतःपासून दुरावा.
थोडक्यात, प्रत्येक अनुभव, नव्या अनुभवाची ओढ लावतो त्यामुळे सर्व अनुभव सांसारिकच आहेत.
अनुभवाची ओढ संपणं म्हणजे आध्यात्मिक होणं. आध्यात्म हा अनुभवणार्याप्रत येण्याचा सोहळा आहे. आध्यात्म म्हणजे `अनुभवणारा एक आहे' याचा उलगडा होणं आहे.
त्यामुळे साधना नेहमी साधी आणि सोपी हवी.
(संपादित)
15 Aug 2014 - 11:03 pm | संजय क्षीरसागर
काही हरकत नाही (आणि हरकत घेता ही येत नाही).
खरं तर ते वाक्यच `संसाराकडून आध्यात्माकडे' असा टर्नींग पॉइंट आहे! अर्थात ही गोष्ट केवळ आध्यात्मिक आभ्यासानंच कळू शकेल. पण प्रतिसादाचा नेमका आषय राखला गेलायं, त्याबद्दल आभार.
11 Aug 2014 - 9:12 am | स्पा
कविताजी तुम्ही उत्तम कसोटी प्लेअर आहात . :-D
11 Aug 2014 - 9:32 am | कविता१९७८
धन्यवाद
11 Aug 2014 - 3:02 pm | अन्या दातार
एका जुन्या यात्री कसोटी प्लेयरची आठवण आली. त्यांचे धागे याहूनही लहान असत, प्रतिसाद (आलेच तर) ओएसओएस असत. :)
11 Aug 2014 - 3:28 pm | सूड
खुद्द अन्या दातार यांचा प्रतिसाद? हे स्वप्न तर नव्हे!!
कविताजी, बाकी तुमच्या श्रद्धांचा आदर आहेच. चांगले वाईट प्रतिसाद ही त्या त्या सदस्याची मते आहेत हे समजून त्याचाही आदर करत चला. बरं असतं ते. लोक त्यांना काय वाटतं ते लिहितात, तुम्ही त्यातून व्यापक, उदात्त अर्थ घेऊन स्वतः मध्ये बदल घडवावा अशी अपेक्षा अजिबात नसते (निदान माझ्या प्रतिसादात तरी). सो,शुभेच्छा!! :)
11 Aug 2014 - 3:58 pm | अन्या दातार
>>खुद्द अन्या दातार यांचा प्रतिसाद? हे स्वप्न तर नव्हे!
अरे कवितातैंच्या साईभक्तिचे फळ किंवा ओंकारेश्वराचा प्रसाद समज रे मेल्या! ;)
11 Aug 2014 - 8:33 pm | धन्या
भ्रामक समजूती आहेत या सगळ्या. ;)
12 Aug 2014 - 11:27 am | अन्या दातार
अरे त्या 'समज' या शब्दातून तेच सांगायचेय मला ;)
12 Aug 2014 - 1:01 pm | धन्या
मी "अंधश्रद्धा" हा शब्द न वापरता "भ्रामक समजूती" हा "नेमका" शब्द वापरला त्याकडे कुणाचे लक्षच नाही. श्शी बाबा.
14 Aug 2014 - 10:02 am | पैसा
समजूत हाच एक भ्रम आहे. त्यामुळे श्री श्री अन्या दातार यांनी तुमच्या काडीकडे दुर्लक्ष केले असावे. त्याव्यतिरिक्त श्री श्री अन्या दातार हेही स्वतः काडी बहाद्दर असल्याने ते तुमची काडी उचलून हिरीरीने वाद घालायला येतील आणि तुम्हाला टैमपास करायला मदत करतील अशी शक्यता वाटत नाही.
बादवे, अंधश्रद्धा हा शब्द वापरला असतात तर कवितातैंच्या धाग्याला किमान २०० प्रतिसाद आले असते, त्यामुळे तुम्ही हा शब्द न वापरून धाग्याचे नुकसानच केले आहे.
14 Aug 2014 - 2:50 pm | सूड
>> श्शी बाबा.>>
आमच्या वेळचं मिपा राह्यलं नाही.
14 Aug 2014 - 4:51 pm | यशोधरा
वेळ सुद्धा तीच रहात नाही, तर त्या वेळचं मिपा कसं राहील? :P
14 Aug 2014 - 4:53 pm | सूड
श्शी बाबा, अशी कमेंटमधली हवा काढून टाकायची नाही !! ;)
14 Aug 2014 - 4:57 pm | यशोधरा
बर्मग, आता मी गप्प बसते. भरपूर कमेंटा सुचत आहेत, पण जौचदे! तुम्ही फारच्च रडता बुवा :P
11 Aug 2014 - 3:54 pm | कविता१९७८
फक्त तुमच्या माहीतीसाठी ही पुढील लिंक देत आहे, https://www.shrisaibabasansthan.org/new%20_marathitemplate_shirdi/miscel... . साईसत्चरीत्रामधे (ग्रंथ) साईबाबांच्या चिलीम पिण्यावर वर एक अध्यायात माहीती दिली आहे. शिर्डी के साईबाबा मध्ये जेव्हा साईबाबा चांदपाटील ह्याला पहिल्यांदा भेटले तेव्हा त्यांनी चिलिमीची थापी भिजवण्यासाठी चांदपाटलाकडे पाणी मागितले आणि ते चांदपाटलाकडे नसल्याने साईबाबांनी त्यांचा सटका जमिनीवर हाणला आणी जमिनितुन पाणी आले हा सीन देखील चित्रित केला आहे तसेच त्याचा उल्लेख साईसत्चरीत्रात देखिल आहे. साईबाबांच्या वापरातील वस्तु शिर्डीच्या म्युझियम मधे जतन करुन ठेवल्या आहेत.
11 Aug 2014 - 8:35 pm | सूड
मान्य!! आपल्याला आलेले सात्विक, दैवी अनुभव 'आपले' असतात. बाकी सुज्ञांस सांगणे न लगे. :)
11 Aug 2014 - 8:42 pm | धन्या
मुंबईकरांनी बाकी सार्या देवांना दुय्यम स्थानावर ठेवून साईबाबांच्या भजनी लागण्याचे मुळ बहूधा अशा चमत्कार कथांमध्येच असावे.
श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणारा, "सबका मालिक एक" म्हणणारा फकीर ही बाबांची ओळख केव्हाच पुसली गेली आहे. नव्हे, बाबांच्या भक्तांनी ती पुसली आहे. फकीराचे आयुष्य जगलेल्या महात्म्याच्या संगमरवरी मूर्तीला सोन्याचा मुकुट परिधान करणारे भक्त महान आहेत.
11 Aug 2014 - 8:56 pm | प्यारे१
शिर्डी (आणि शनि शिंगणापूर) यात्रा करण्यामागचं थोडं मानसशास्त्र (हे सरसकटीकरण नाही):
१. मुंबई पुण्याहून एका दिवसात होते.
२. कुठल्याही प्रकारची बंधनं नाहीत.
३. रात्री जाताजाता दारु प्या, पोचल्यावर अंघोळ करुन दर्शन घ्या. (काहीजण)
४. साईबाबा आपल्या पाठीशी आहेत त्यामुळं कितीही मोठा लफडा केला तरी निस्तरला जातो असा 'गैरसमज'.
४ अ. जेवढी मोठी गिल्ट तेवढी मोठी गिफ्ट हा व्यवहारी धंदा साईबाबांकडं चालतो हा लोकांनी समजवलेला 'गैरसमज'.
४ ब. सुशिक्षित आणि शक्यतो महाराष्ट्राबाहेरची व्यक्ती साईबाबांना मानते.
साईबाबांबद्दल मी वैयक्तिक 'न्युट्रल' आहे. 'श्रद्धा आणि सबुरी' हे त्यांचं बोधवाक्य पटतं.
पण त्यांच्या सो कॉल्ड भक्तमंडळी आणि ट्रस्टचे विश्वस्त ह्यांच्या बाबत उगाच चीड वाटते.
का कुणास ठाऊक पण साईबाबांना मानणारा मोठा वर्ग नक्कीच कुठल्याशा वाममार्गामध्ये असलेला सापडतो. (सट्टा, मटका, दारु दुकानदार, डान्सबार, नवीन नगरसेवक/कार्यकर्ते, मध्यम (धड लहान नाहीत धड मोठे नाहीत असे);) भाईलोक....इ.इ.
विदाकारांना आधीच विनंती की असा कुठलाही विदा माझ्याकडं नाही.
11 Aug 2014 - 9:12 pm | कविता१९७८
सहमत
11 Aug 2014 - 4:02 pm | प्यारे१
साई बाबांचं तत्त्वज्ञान काय होतं ?
त्यांचा उपदेश काय होता?
तो आमच्या सरांच्या उपदेशानुसार आहे का?
तो तसा नसला तर कुणाच्या उपदेशासारखा आहे?
भंडारे करा,पायी चाला असं ते म्हणाले का?
असे काही प्रश्न आहेत.
11 Aug 2014 - 4:14 pm | कविता१९७८
https://www.shrisaibabasansthan.org/new _marathitemplate_shirdi ही साईट पाहु शकता. ह्यावर साईसत्चरीत्र सुद्धा वाचायला मिळेल, बाकी साईबाबांचं तत्वज्ञान , उपदेश वगैरे कसे काय होते हे आपापल्या मतांवर अवलंबुन आहे, भंडारे करा , पायी चाला असे ते केव्हा ही म्हणाले नाहीत फक्त त्यांनी अन्नदानाचे महत्च सांगितले आहे .
शिर्डी संस्थान कडुन १९२६ पासुन साईलीला पत्रिक प्रकाशित होते, ही लिंक - https://www.shrisaibabasansthan.org/new%20_marathitemplate_shirdi/shri%2... -
11 Aug 2014 - 8:14 pm | टवाळ कार्टा
साईबाबांचं तत्वज्ञान , उपदेश वगैरे कसे काय होते हे आपापल्या मतांवर अवलंबुन आहे, भंडारे करा , पायी चाला असे ते केव्हा ही म्हणाले नाहीत फक्त त्यांनी अन्नदानाचे महत्च सांगितले आहे .
माझ्या आपल्या उगाच २ शंका
५ पदयात्रांमध्ये तुम्ही काही अन्नदान केले का??
किंवा...५ ऐवजी १ पदयात्रा करुन बाकी ४ वेळा त्याच पैशांत गरीबांना खाउ घालता आले असते
11 Aug 2014 - 8:24 pm | प्यारे१
दारु, बिडी, शिग्रीट, पान, तंबाखू, सुपारी, पुस्तक, हाटेलिंग, शिनुमामा, उगा भटकनं, मोट्टे नळकांडीचे क्यामेरे घिऊन फोटो काडनं आनि काही 'पेश्शल' 'गरज' नसनार्या गोष्टी करनारी मानसं देवा धरमाच्या नावानं कायपन आलं की कपाळाची शीर हलून तिडीक उटल्यावानी धावू धावू येतेत तेवा आच्चर्य वाटटं.
गरीबाला जरा पन बुड हालवायला नको च्यामारी. आमी रोज बगतोय गरीबं. तेन्ला खायला घाला म्हनं. काय हुईना हातनं, अपंग हाय असं काय आस्लं तर चालंन येक डाव. बाकीच्याला उगा डोस्क्यावं घ्याची गरज नाय.
15 Aug 2014 - 11:14 pm | कवितानागेश
फार दिवसांनी प्रशांत आवले यांचा 'बरोब्बर' प्रतिसाद वाचतेय. :P
बहुतेक त्यामुळेच मागे पडला! ;)
इथे कविताताईंना "शहाणपणा" शिकवणारे लोक, खरंतर स्वतः काय 'सामाजिक कार्य' करतात ते लिहिणंही अपेक्षित आहे.
पण कुणीही तो प्रामाणिकपणा दाखवत नाही.
कुणाला खरोखरच अंधश्रद्धेविरुद्ध काही करायचं असेल तर कृपया पशुबळी थांबवा...
पण ते होत नाही. त्यापेक्षा अशी साधी, सात्विक 'सॉफ्ट टार्गेट्स' धरुन झोडपणं सोपे असते!
11 Aug 2014 - 8:48 pm | कविता१९७८
मी दर महीना कामवालिच्या मुलाच्या शिक्षणासाठी खर्च करते; एका गरिब म्हातारे नातेवाईक जोडपे ज्यांना मुलबाळ नाही त्यांना दर महिन्याला किराणा सामान भरुन देते. अजुन बर्याच ठिकाणी कर्तव्ये पार पाडते.
11 Aug 2014 - 9:12 pm | शैलेन्द्र
अभिनंदन..
12 Aug 2014 - 7:51 am | टवाळ कार्टा
_/|\_ अतिशय स्तुत्य...
11 Aug 2014 - 8:53 pm | कविता१९७८
मी दर महीना कामवालिच्या मुलाच्या शिक्षणासाठी खर्च करते; एका गरिब म्हातारे नातेवाईक जोडपे ज्यांना मुलबाळ नाही त्यांना दर महिन्याला किराणा सामान भरुन देते. अजुन बर्याच ठिकाणी कर्तव्ये पार पाडते.उत्तर द्या
11 Aug 2014 - 8:58 pm | संजय क्षीरसागर
खरंच स्तुत्य आहे. अभिनंदन!
11 Aug 2014 - 9:25 pm | धन्या
कौतुकास्पद बाब आहे ही !!!
11 Aug 2014 - 9:25 pm | धन्या
कौतुकास्पद बाब आहे ही !!!
12 Aug 2014 - 7:14 am | यशोधरा
स्तुत्य आहे कविता. कोणी आपण काय समाजकार्य करत आहोत हे सांगितले नाही म्हणजे ते काही करत नाहीत वा धार्मिक यात्रा इ करतात, त्यांच्या सामाजिक जाणिवा शून्य असतील असे समजायचे काय कारण असते बरे?
प्रत्येकालाच मोठ्या प्रमाणावर सामाजिक कार्य करणे शक्य नसते, आपापला खारीचा वाटा उचलला तरी खूप :)
कविता ह्यांना सामाजिक जाणीवा करुन देणारे स्वतःही काही समाजाला हातभार लावत असतीलच. त्याबद्दल वाचायलाही खूप आवडेल. :)
11 Aug 2014 - 4:27 pm | vikramaditya
जे स्वःताच्या मनाला पटेल आणि रुचेल ते करा. लिहित रहा. शुभेछा.
11 Aug 2014 - 4:40 pm | समीरसूर
तुमचं धाडस, चिकाटी, ध्येयासक्ती, कष्टाची तयारी या गुणांना सलाम! अशा अगदी वेगळ्या उपक्रमातून खूप सकारात्मक ऊर्जा मिळत असणार यात शंकाच नाही.
11 Aug 2014 - 10:29 pm | मृत्युन्जय
पाचही भाग वाचले. प्रतिक्रिया सुद्धा. मागील एका भागात राघा गुर्जी म्हणाले तसे एकुण लेखनात तक्रारीचा सूर आणि रडरडच जास्त दिसते आहे, या यात्रेतुन तुम्हाला काय गवसले हे अजुन समजत नाही. कदाचित पुढच्या भागात येइल.
पण एकुणात अश्या यात्रांच्या नावाने चेष्टा करणार्या लोकांकडे दुर्लक्ष केलेलेच बरे. मला विचाराल तर अश्या यात्रांमधुन माणसाच्या सहनशक्तीची पातळी स्वतःला जोखता येते. स्वतःचे लिमिट्स कळतात आणि ते किती ताणता येतील तेही कळते. स्वतःच्याच क्षमतांचे नीटसे आकलन होते. प्राप्त परिस्थितीत निभावुन नेण्याचे बळ मिळते. संकटप्रसंगी मार्ग शोधण्याची क्लृप्ती गवसते. मर्यादित साधनसामग्रीत आयुष्य जगता येते हे कळते. शारीरिक आणि मानसिक बळ मिळते. हे सर्व मिळण्यापुर्वी अर्थात शारिरिक आणी मानसिक क्लेशही होतात.
तुमच्या लेखनात फक्त क्लेश आले. यात्रेची फलश्रुती कुठे दिसत नाही. ते आले असते तर लेखन नक्कीच वाचनीय झाले असते
12 Aug 2014 - 10:53 am | अनुप ढेरे
हा धागा आठवला.
http://www.misalpav.com/node/22632
14 Aug 2014 - 12:19 pm | गवि
जसे मनात आले तसे तुम्ही लिहिलेत. त्यामुळे ते फार उत्स्फूर्त झालं आहे आणि छान वाटतंय.
कोणत्याही कारणाने का होईना, पण इतके अंतर चालणे हे सामान्य माणसाच्या रोजच्या जिंदगीतून हद्दपार झालं आहे.
दरवर्षी लोक एकदासुद्धा इतके चालले तर त्यांचे हृदय आणि एकूण सिस्टीम्स ठणठणीत राहतील.
एक किलोमीटर चालण्याच्या विचाराने अंगावर काटा येणार्या स्थूल वर्गाचा प्रतिनिधी म्हणून मी तुमच्या या शारिरीक क्षमतेचं अभिनंदन करतो.
साईबाबा वगैरे भाग माझ्या कक्षेबाहेरचा असला तरी निव्वळ "चालणे" या गोष्टीसाठी जी उदाहरणं समोर ठेवायची त्यात तुमचंही असेल.
ध्येय असलं तर आणि तरच शरीर आपली क्षमता पूर्ण वापरात आणतं इतकं यातून सिद्ध होतंच आहे.
कोणाचं ध्येय साईबाबा असेल किंवा कोणाचं आणखी काही. त्याविषयी बोलण्यात काही अर्थ नाही.
14 Aug 2014 - 2:37 pm | बाळ सप्रे
ध्येय असले तरच शरीर आपली क्षमता पूर्णपणे वापरतं हे खरचं..
पण शारिरीक क्षमतेपलीकडे ताणून अट्टाहासाने एखादी गोष्ट सरावाअभावी करण्यापेक्षा शिस्तबद्ध सरावाने शारिरीक क्षमता हळूहळू वाढवून करणे कधीही चांगले..
नशिबाने यात काही गंभीर दुखापत झाली नाही हे कविताताईंचे सुदैव.. पण असा थेट २५० किमी चा प्रवास करण्याऐवजी थोडे २०-३० किमी ट्रेकपासून सुरुवात करुन साधारण ४-६ महिन्यात थोडे थोडे अंतर वाढवत नेले असता २५० किमी अंतरात जितका त्रास झाला त्यापेक्षा खूप कमी झाला असता एवढे निश्चित..
14 Aug 2014 - 2:45 pm | कविता१९७८
पण त्यावेळी सुचले नाही , असो त्यावेळी त्रास झाला पण आत्ता खुपच कमी त्रास होतो. ह्यावेळी सुद्धा सराव केला नव्हता पण वजन खुप कमी केल्याने खुप कमी त्रास झाला आणि अंतर तेच पण ह्यावेळेस सर्व थांबे खुप लवकर आल्या सारखे वाटले कदाचित आता सवय झाली आहे म्हणुन असेल.
14 Aug 2014 - 5:14 pm | गवि
पण शारिरीक क्षमतेपलीकडे ताणून अट्टाहासाने एखादी गोष्ट सरावाअभावी करण्यापेक्षा शिस्तबद्ध सरावाने शारिरीक क्षमता हळूहळू वाढवून करणे कधीही चांगले..
तेही आहेच बरोबर.
14 Aug 2014 - 5:19 pm | सखी
दरवर्षी लोक एकदासुद्धा इतके चालले तर त्यांचे हृदय आणि एकूण सिस्टीम्स ठणठणीत राहतील.
- प्रथमच तीव्र असहमत असं सांगावसं वाटतं, कारण मित्रमैत्रिणींमध्ये २-३ जीवघेणी उदाहरणं बघण्यात आलीत. इथे ब-याच वेळा पूर्ण मॅरेथॉन ४२ किमी, अर्धे किंवा चौघे मिळुन करु शकतात, किंवा ब्रेस्ट कॅन्सर वॉकसाठी ४० मैल (६४ किमी) २ दिवसात चालुन जातात. त्यासाठी लोकं आधी ५-६ महीने ट्रेनिंगही चालु करतात, अतंर पाय-यापाय-याने वाढत नेऊन आपला स्टॅमिनाही वाढवला जातो. इतकं असुनही सकाळी चालायची प्रॅक्टीस करुन आल्यावर एकजण दुपारी थोडावेळ विश्रांतीसाठी झोपायला गेली नंतर १-२ तासाने नव-याला काहीतरी धपकन पडल्याचा आवाज आल्यावर तो बघायला गेला तर ती बेडवरुन खाली पडली होती, झोपेतच हार्ट अॅटक आला, त्यादिवशीच ती गेली, वय जेमतेम ४०-४१, घरात अजुन दोन लहान मुली. दुसरे उदा. हिला खुप चालल्याने कमरेच्या इथल्या शिरेला काहीतरी झाले, आणि हीपण एकदा चालुन आल्यावर घरी तोल जाउन पडली त्यामुळे अजुन दुखापत - पुढची २-३ वर्षे डॉक्टर, हॉस्पीटलच्या वा-या आणि प्रॉब्लेम अजुन पूर्ण गेलेला नाही.
खरतर लोक कम्पुटर, टिव्हीपुढे बसण्यापेक्षा (यात मीही आले) असे बाहेर पडलेले आणि व्यायाम हालचाल करत असलेले कधीही चांगलेच पण सप्रे म्हणाले तसे "शारिरीक क्षमता हळूहळू वाढवून करणे कधीही चांगले.." -- उगीच सगळेजण करतात म्हणुन आपणही करणे चुकच, कुठलाही अतिरेक वाईटच. आपल्या शरीराला काय आणि किती झेपेल याचा अंदाज घेऊन पाऊल उचलणे चांगले.
14 Aug 2014 - 5:27 pm | गवि
अत्यंत सहमत.
मूळ विधान बरेच स्थूलमानाने केलेले अघळपघळ विधान आहे हे मान्य करतो. तुम्ही उपस्थित केलेल्या मुद्द्यांखेरीज रहदारीच्या हायवेवरुन चालत जाण्यामधे (कितीही व्यवस्थापन केले तरी) अपघातांचा धोका राहतोच. इत्यादिही मुद्दे रास्तपणे म्हणता येतील.
असे दूरवर चालण्याच्या निमित्ताने का होईना पण लोकांनी सुरुवातीला वैद्यकीय तज्ञाचा सल्ला आणि प्राथमिक तपासणीनंतर, टप्प्याटप्प्याने, हळूहळू वाढवत, अधिकाधिक चालण्याचा सराव केला तर लठ्ठपणा, डायबेटिस आणि अनेक बैठ्या विकारांना जागा उरणार नाही असे तपशिलात जाऊन म्हणणे योग्य ठरेल.
14 Aug 2014 - 5:34 pm | सखी
धन्यवाद :)
टप्प्याटप्प्याने, हळूहळू वाढवत, अधिकाधिक चालण्याचा सराव केला तर लठ्ठपणा, डायबेटिस आणि अनेक बैठ्या विकारांना जागा उरणार नाही असे तपशिलात जाऊन म्हणणे योग्य ठरेल. - खरयं.
14 Aug 2014 - 5:39 pm | सूड
या सर्वांपेक्षा शिस्तीत जिम जॉईन करुन ट्रेनरच्या देखरेखीखाली वर्कआऊट सुरु करावा. त्यात दोरीच्या उड्या* पण अंतर्भूत कराव्यात. रोज वर्कआऊट +दोरीच्या उड्या असं वेळापत्रक ठेवल्यास लठ्ठपणा वैगरे किस झाड की पत्ती होईल.
*येथे भाग मिल्खा भाग मध्ये फरहान अख्तर मारत असलेल्या पद्धतीच्या दोरीच्या उड्या अभिप्रेत आहेत आणि हो प्रमाण वाढवत वाढवत दोनशे उड्यांचे तीन सेट करावेत. ;)
14 Aug 2014 - 5:50 pm | स्पा
सूड सर म्हणतात म्हणजे तसचं असणार
तीव्र सहमती
14 Aug 2014 - 5:54 pm | सखी
तीव्र सहमती :))
14 Aug 2014 - 8:22 pm | यशोधरा
तीव्र सहमती कोणाला? स्पावड्याला की सूडक्याला? :D
14 Aug 2014 - 8:27 pm | कवितानागेश
माझी सहमती स्पावड्याला... नेहमीप्रमाणेच. ;)
14 Aug 2014 - 8:31 pm | सखी
अगो असं काय करते स्पाजी सुड सरांशी सहमत ना मग असे चालेल ना?
सूड - तीव्र सहमती
स्पा - तीव्र, तीव्र सहमती (ते नाही का श्री.श्री. हल्ली असते तसेच :) )
असो आता आवरते घेते कविताजींच्या धाग्याचे काश्मिर नको.
14 Aug 2014 - 8:39 pm | धन्या
आमच्या अल्प ज्ञानानुसार स्पा आणि सुड यांच्यापैकी कुणा एकाशीही सहमत झाल्यास आपोआप दुसर्याशी सहमत होते.
14 Aug 2014 - 8:41 pm | धन्या
>>कविताजींच्या
"जी" संस्कृती हळूहळू मराठीत मुळ धरु लागली आहे.
14 Aug 2014 - 8:50 pm | सखी
हो खरयं हो...मी कविता यांच्या असं म्हणायला हवं होतं.
बाकी पराचा ह्या धागाचा खालचा परिच्छेद देण्याचा मोह आवरला नाही - फक्त नावं वाचा. (लिंक द्यायचे, हाईलाईट करायचे ऑप्शन कुठे गेले?)
खास दरबारामध्ये फक्त खास खास लोकांच्या स्वार्या विराजमान झाल्या होत्या. शेतीतज्ञ, क्रिकेट शिरोमणी, संरक्षण पंडित श्री. शरदजी चंद्रजी पवारजी, त्यांचे आज्ञाधारक जलतंत्रज्ञ पुतणे श्री. अजीतजी पवारजी, कोकण भुषण, तडफ़दार, भ्रष्टाचारावर सतत 'प्रहार' करणारे नारायणजी राणेजी, गुणग्राहक, शेती माहितीगार, सांस्क्रुतीक आघाडी सांभाळणारे गोपीनाथजी मुंढेजी, विदर्भाचे वाघ नितीनजी गडकरीजी, दलित समाजाचा भक्कम आधार, दलित मार्गदर्शक रामदासजी आठवलेजी, हिंदु ह्रुदय राजकुमार (सम्राटांचे चिरंजीव) उध्दवजी ठाकरेजी, मराठी ह्रुदय सम्राट राजजी ठाकरेजी, मागासवर्गीयांचे आशास्थान छगनजी भुजबळजी, यवन ह्रुदय सम्राट (स्वयंघोषीत) अबुजी आझमीजी दरबाराची शोभा वाढवत होते.
http://www.misalpav.com/node/4748
15 Aug 2014 - 1:35 pm | नाव आडनाव
बदललेल्या वेळेप्रमाणे आता यात आदित्यजी ठाकरेजी पण लिहा. या बाकीच्या सगळ्या "मोठ्या" नेत्यांच्या इतकेच किंवा थोडे जास्त मोठेच आहेत ते. युवा सेना प्रमुख आहेत ते. औरंगाबाद चे खासदार चंद्रकांतजी खैरेजी, जे त्यांच्या आजोबांच्या वयाचे आहेत, त्यांच्या पाया पडतात. आदित्यजिंचं लग्न होऊ द्या. त्यांच्या चिरंजीवांसाठी जन्मा आधीच बाळ सेनेची घोषणा होईल आणि मग ते सुद्धा बाळ सेना प्रमुख होतील - नाही सारे शिव सैनिकच तसं व्हावं अशी मागणी करतील. घराणेशाही अजिबात चालत नाही, you know :)
15 Aug 2014 - 1:44 pm | नाव आडनाव
बाळ सेना प्रमुख जी असं वाचा.
14 Aug 2014 - 8:54 pm | प्यारे१
>>> आमच्या अल्प ज्ञानानुसार स्पा आणि सुड यांच्यापैकी कुणा एकाशीही सहमत झाल्यास आपोआप दुसर्याशी सहमत होते.
मग सूड स्पा ला 'तू गप रांव रे, वशाड मेलो!!' का म्हणतोय बरें?
जनरली स्पा सरांशी विचाराबाबत सहमती तर सूड सरांशी भाषेच्या दुरुस्तीनंतर सहमती असावी असा दंडक आहे. ;)
14 Aug 2014 - 6:13 pm | सूड
तू गप रांव रे, वशाड मेलो!!
14 Aug 2014 - 6:38 pm | धन्या
धाग्याच्या विषयाशी अवांतर आहे तरीही लिहितो. दोनेक वर्षांपूर्वी मुंबई बंगळुरु महामार्गावर (पुणेकर याला सातारा हायवे म्हणतात) पुण्याच्या वारजे उडडानपुलापासून एक किमी पुढे सकाळी सातच्या सुमारास अपघात झालात ज्यात दोन व्यक्ती जागीच गेल्या. या दोन्ही व्यक्ती मॉर्निंग वॉकसाठी महामार्गावर चालत होत्या.
14 Aug 2014 - 7:17 pm | प्रसाद१९७१
सातारा हायवे म्हणतात) >>>>>>>> सातार रोड म्हणतात
14 Aug 2014 - 8:01 pm | प्यारे१
सातार रोड वायला आनि सातारा हाय्वे वायला हाय जी!
14 Aug 2014 - 8:06 pm | धन्या
"सातारा हायवे" नदीच्या पलिकडून जातो. त्यामुळे कदाचित त्यांना तो माहिती नसावा.
15 Aug 2014 - 12:20 pm | डॉ सुहास म्हात्रे
सहमत.
कोणताही मोठा शारिरिक व्यायाम सुरू करण्यापूर्वी कमीत कमी दोन गोष्टी करणे आवश्यक आहे:
१. शारिरीक तपासणी; ४० वर्षे वयापुढे तर हे अत्यावश्यक आहे. सर्वसाधारण हालचालीत गुप्त राहणारे विकारांचे निदान होऊन या तपासणीने जीवन / मरण इतका मोठा फरक पडू शकतो.
२. "व्यायामाची करण्याची योग्य पद्धती, व्यायामाने शरीरावर पडणार्या ताणाची लक्षणे आणि कोणती लक्षणे दिसल्यावर ती अंगावर न काढता ताबडतोप वैद्यकीय मदत घ्यावी" याची (शक्यतो वैद्यकीय) जाणकाराकडून माहिती.
14 Aug 2014 - 3:49 pm | विटेकर
श्रद्धेने पर्वत हलतात .. अशी माझी श्रद्धा आहे.
या जगात जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला सुख मिळविण्याचा हक्क आहे आणि तशीच प्रत्येकाची ओढ असते. तुम्ही तुमच्या परिने सुख मिळवलेत.. अभिनंदन !
बाकी अंधश्रद्धा वगैरे... असल्या बडबडीकडे फार लक्ष देऊ नका.. त्यांना त्यात सुख आहे , आणि ते मिळविण्याचा निश्चित अधिकार आहे .. सर्वेपि सुखिन संन्तु ...
माझा एक अनाहूत सल्ला : आपले अध्यात्मिक अनुभव शक्यतो कोणाला सांगू नयेत.
14 Aug 2014 - 3:54 pm | टवाळ कार्टा
आपले अध्यात्मिक अनुभव शक्यतो कोणाला सांगू नयेत.
कारण त्यासाठी पुरावे देता येत नाहीत...बाकी या वाक्यामुळे १००+ होउ शकतात :)