माझे साईपदयात्रेचे अनुभव - १ - http://www.misalpav.com/node/28447
पहिल्या भागाची सुरुवात मी एका सोशल वेबसाईटवर मागितलेल्या मदती वरुन केली ती मदत मला कशी मिळाली आणि मी पदयात्रेच्या अनुभवाचे लेखन कसे केले ते पुढील लिंक वरुन कळेल , प्रतिसादात पुढे मिळालेल्या मदतीचे फोटो देखील आहेत.
http://www.maayboli.com/node/49148
माझे साईपदयात्रेचे अनुभव - २
सकाळी ३.३० च्या दरम्यान मंडळाचे सभासद सर्वांना हाका मारुन उठवु लागले. बायका ग्रुपने ओढ्याच्या काठी जाउन प्रातःविधी उरकु लागल्या. रस्त्याच्या एका बाजुला बायका तर विरुद्ध दिशेला पुरुषांनी जायचे अशा मंडळाच्या सुचना होत्या. हातात छोटी बॅटरी घेउन अंधारात ३-४ बायका मिळून गेलो. सर्वच जणी ग्रुपमधुन यायला लागल्या. परत येउन ब्रश केला आणी तोंड धुतले. चादरींची घडी करुन मोठी बॅग पॅक केली, ही बॅग आता रात्रीच्या थांब्याच्या वेळीच मिळणार होती. आंघोळीचे कपडे बॅकपॅक मध्ये काढुनच ठेवले होते जी दुपारच्या जेवणाच्या थांब्याला आंघोळ करण्याच्या वेळी मिळणार होती. मंडळाच्या दोन सभासदांनी चहा बनवला होता. त्यातला एक माझ्याबरोबर काल शेवटी मला घेउन येत होते त्या लो़कंबरोबर थांबला होता. त्याचे नाव निलेश होते. रांग लावुन चहा घेतला, जवळ बिस्कीटे आणी टोस्ट (रस्क) ठेवली होती त्यातली काही घेतली. सर्वांचं आटोपता आटोपता ४.३० झाले. सभासदांनी सतरंज्या गाडीत टाकल्या. सर्वांनी आपापले सामान गाडीजवळ नेउन ठेवले. मी एक पाउच घेतला होता जो कमरेला बांधला. एक बॅटरी हातात घेतली. घरुनच पांढरी क्रिकेटची टोपी घेतली होती, थंडी वाजु नये म्हणुन कॉटनची ओढणी कानाला बांधली, हळुह्ळु सर्व पदयात्री रोडवर जमायला लागले. रोडवर काळाकुट्ट अंधार होता. रात्री मी ज्या बाईंजवळ झोपले होते त्या नेमक्या मंडळाच्या अध्यक्षाच्या बायकोच निघाल्या. त्या म्हणाल्या ताई घाबरु नका. निशाणी बरोबर चाला आपोआप पुढे चालाल. पालखी आधी निशाणी काढतात त्यामागे पदयात्री चालतात. निशाणी बरोबर चालल्याने माणुस फास्ट चालतो अशी या लोकांची समजुत. वास्तविक ही माणसे स्पर्धा करुन चालतात जो मागे पडतो त्याला बाकीची माणसे हसतात कारण सगळी एकाच गावातले आणि एकमेकांचे नातेवाईक. त्यामुळे मनातुन एकमेकांवर धुसफुसणे हा प्रकार, काही करुन एकमेकांना पुढे जाउ द्यायचे नाही हे ठरवुन स्वतःला कीतीही त्रास झाला तरीही फास्ट चालायचं हे या लोकांचं ठरलेलं. बायका तर त्याहुन पुढे. एका बाईच्या तर पायाच्या बोटातुन रक्त येत होतं तरीही ती सर्वात आधी चालत होती. मला बायका सांगत होत्या की लवकर चालायचं मग आराम करायचा. पण मी प्रत्येक वेळी मागे मागे पडत चालले होते.
रोडवर अंधार होता. जंगलात रोडवर स्ट्रीट लाईट्स नसतात. त्यावेळी आतासारख्या मोटरसायकल बरोबर न्व्हत्या एक सामानाचा ट्रक आणी एक पिकअप होती. त्यामुळे सभासदांनी पेट्रोमेक्स लावुन ती एका काठित अडकवली आणी ती काठी दोघा सभासदांनी दोन्ही बाजुने पकडली त्यामुळे रस्त्यावर चालण्याची सोय झाली. आजकाल ३-४ मोटर सायकल असतात ज्या दिवसभर पदयात्रींठी पाणी घेउन फीरतात. २ पिकअप असतात, एक सामानाचा ट्रक असतो. व एक पाण्याचा टँकर असतो. जे सकाळ पर्यंत पदयात्रींसाठी रस्त्यावर लाईटस ऑन करुन जागोजागी थोडया थोडया वेळाने थांबत असतात. बाकीच्यांनी मला निशाणीवालाच्या बाजुला उभं केलं आणी चालायला सुरुवात झाली. थोडासाच वेळ मी फास्ट चालले असेन नंतर पाय दुखायला लागले आणी वेग कमी झाला, त्या अध्यक्षांच्या बायकोने मला मागुन खेचुन पुढे ढकलायला सुरुवात केली ह्या प्रकाराने तर मी खुपच दमुन गेले. एक तर डोंगराळ रस्ता असल्याने चढण होती. मला पुढे चालवेना अगदी श्वास घेणेही जमेना मी त्यांना सोडुन दिले. मागेच राउतचा भाउ अमोल होता व आत्येभाउ वगैरे मंडळी होती ते म्हणाले ताई हळु चाला. लोकं अजुन मागे होती म्हणुन त्यांनी एका दहवीतल्या मुलाला माझ्याबरोबर चालायला सांगितले. त्याचे नाव मिथिलेश. हे पुर्ण गावकरी एकमेकांचे नातेवाईक. मिथिलेशने मला सांगितले की ताई मी तुम्हाला हाताला धरुन चालतो म्हणजे तुम्हाला फास्ट चालता येईल. खुप छान मुलगा. अंगाने अतिशय बारीक पण चांगल्या स्पीडने नेउ लागला आणी मला दमायला सुद्धा झालं नाही.सारखी बडबड करत होता. ह्याच्याशी आजपर्यंत ओळख कायम आहे. दोन भाउ एक बहीण, वडील अतिशय दारुडे, आईने मासे विकुन लहानाचे मोठे केले, स्वतः कामाला लागुन ह्याने लहान भावाला आय.टी.आय मधे अॅडमिशन घेण्यासाठी पैसे जमा केले पण लहान भाउ वाईट संगतीत पडलेला खुप समजावुन समजावुन कसंबसं आय. टी. आय. पुर्ण केलं तर नोकरीला जायला तयार नाही. मिथिलेशने आताच स्वतःचं आय. टी. आय. पुर्ण केलं. जवळजवळ सगळ्यांची हीच कहाणी. टी.ए.पी.एस. आणी बी.ए.आर.सी मुळे गावातल्यांच्या जमीनी गेल्या. त्यामोबदल्यात काही लोकांना नोकर्या मिळाल्या. आताची पिढी शिक्षणाच्या बाबतीत अतीशय उदासीन. शिकत नाहीत मग टी.ए.पी.एस. आणी बी.ए.आर.सी मध्ये काँट्रॅक्ट मधे कामाला जातात. फक्त सही करुन येणार , कामाच्या जागी दादागिरी करणार. त्यामुळे बोईसर मध्ये खुप मोठी एम. आय. डी. सी. असुनही ही लोकं प्रायव्हेट कंपन्यांमध्ये काम करु शकत नाही. कारण एक तर बाहेर वर्कर्स ची १२ तास ड्युटी असते व आराम करायला जराही वेळ देत नाहीत.
थोडया वेळाने राउतचे नातेवाईक सभासद जे शेवटी राहुन सगळयांना घेउन येतात ते आम्हाला मिळाले. आम्ही सगळ्यात शेवटी चालत होतो. सकाळी साधारण ६.३० वाजता चहासाठी हॉल्ट घेतला. महालक्ष्मी गडावर जाणार्या रस्त्याच्या स्टॉपवर सर्वजण थांबलो. चहा झाला डस्टबीनची काही सोय नव्हती सगळीकडे जंगल आणी शेतं विरळ वस्ती, सर्वांनी प्लॅस्टीकचे कप्स बाहेरच टाकले. आजकाल निदान पुठ्ठयाची खोकी डस्टबीन म्हणुन ठेवतात. थोड्यावेळाने नाश्ता आला , प्रत्येकी २ वडापाव मिळाले. नंतर पुन्हा चालायला सुरुवात झाली. मी पुन्हा मागे पडले. दोन्ही पायाला २ छोटे छोट फोड आले होते. अंग दुखत होतं. कसेबसे सकाळी ९.३० ला कासाला दुपारच्या जेवणाच्या थांब्या पर्यंत पोहोचलो. लोकं ८ वाजताच पोहोचली होती. तिथे मंदीरात पालखीच्या थांब्याची सोय झाली होती. सर्व पदयात्री मावतील ईतके मोठे सभाग्रूह होते. बायका आंघोळीसाठी गेल्या होत्या. मला एक बाई तिथे घेउन गेली. एक नदी होती बायका एका दिशेने तर पुरुष खुप कुठे लांब आंघोळीला गेले होते. मनाची समजुत घातली की आता आपल्यासाठी ईथे बाथरुम कुठे असणार ८ दिवस आपल्याला अशीच आंघोळ करायची आहे आणी बाकीच्या १५० बायकांनीही केलीच ना मग आपल्यालाही करायला काय हरकत आहे. बाकीच्या बायकांची आंघोळ होउन त्या कपडे धुवत होत्या. मी कपडे धुण्याचा त्रासाला कंटाळून ८ दिवसांसाठी ८ ड्रेसेस नेले होते. आंघोळ केली. १-२ कपडे धुवुन मंदीरात येउन बसले. आरती सुरु झाली. घिवलीतल्या येथे माहेर असलेल्या एक बाई कासाच्या ह्या मंदीराजवळ राहतात त्यांनी ५ वर्ष पदयात्रींना जेवण द्यायचे ठरवले होते. त्यांनी जेवणाची व्यवस्था केली. जेवल्या वर नर्सबाईंकडुन फोडातुन पाणी काढुन घेतले. ह्या नर्स फक्त २ वर्षे होत्या ४ वर्षापासुन आमच्या मंडळाकडुन औषधांची काहीच व्यवस्था नसते. पदयात्री स्वतःच कॉम्बिफ्लेम, क्रोसीन , डायक्लोजेम बरोबर घेउन चालतात. मी २ वर्षांपासुन आमच्या फॅमिली आयुर्वेदीक डॉक्टरांकडुन आयुर्वेदीक गोळ्या घेउन जाते. खुपच उन असल्याने ३ वाजता निघण्याचे मंडळाने ठरवले.
अतिशय कडक उन्हात प्रवासाची सुरुवात झाली. नेहमीप्रमाणे मी मागे पडले, चालुन चालुन दमले. पदयात्रेत एक ७५ वर्षाच्या आजी माझ्या पुढे चालत होत्या मी त्यांना पाहुन मनातच बोलत होते कि इतके वय असुन त्या माझ्या पुढे चालत आहेत आणी माझी अवस्था बिकट झालीये. बरोबरच्या लोकांनी मला चहाचा थांबा जवळ आलाय असं सांगत सांगत कसंबसं चहाच्या थांब्यापर्यंत पोहोचवलं. चहा झाल्यावर निघालो. आता मात्र चालवेना पण बरोबरच्या लोकांनी पुन्हा गमती जमती सांगत कसंबसं रात्रीच्या थांब्यावर ७-३० च्या दरम्यान पोहोचवलं. तो एक आदिवासी पाडा होता. एका आदीवासी घराच्या अंगणात सोय केली होती. त्या घरातल्या बायकांना १० रु. एक घमेलं या दराप्रमाणे गरम पाणी घेउन बर्याच बायकांनी पाय शेकुन घेतले. पाय शेकल्यावर बरं वाटु लागलं. आरती, जेवण करुन सर्वजण झोपुन गेलो. जंगल असल्याने तिथे ही खुप थंडी होती. २ र्या वारीच्या वेळी ह्या ठीकाणी पोहोचायला आम्हाला खुपच उशिर झाला होता. आम्ही ५ जणं होतो आणी रात्रीचे ८ वाजुन गेले होते. जंगलाच्या आतमध्ये होतो, स्ट्रीट लाईटस नसल्याने पुर्ण अंधार होता समोरचे दिसत नव्ह्ते. कुठपर्यंत पोहोचलो तेही कळत नव्ह्ते. मोबालची रेंज नसल्याने मंडळाशी काँटॅक्ट होत नव्हता. मंडळाचे सभासदही चिंतेत होते शेवटी आरती संपवुन सभासदांनी वर जाउन उडणारा फटाका फोडला तेव्हा कळले कि पडाव १० मिनीटावर आहे.
कचर्या बद्द्ल म्हणायचे तर आम्ही जातो त्यावेळी आम्ही निघतो त्याच वेळी मुंबईहुन बर्याच पालख्या निघतात जवळपास २०० पालख्या एकाचवेळी वेगवेगळ्या ठीकाणातुन चालत असतात. कुणाच्या पालखीत १०० पदयात्री असतात तर कुणाच्या पालखीत १५,०००. मुंबई वाले शेवटपर्यंत हायवेवर चालत असतात. कमीतकमी ५ लाख पदयात्री एकत्र चालत असतात. पदयात्रींठी पाण्याची , चहाची , सरबताची सोय असते. ह्यासाठी प्लॅस्टीकचे कपच सोईस्कर असतात. हायवेवर चालताना शक्यतो पदयात्री हातात कप घेउन चालत चालत जातात आणि नंतर कप्स फेकतात सगळ्यांना एका ठीकाणी जमायला जागाही नसते आणी वेळही नसतो. बरं हि सोय फक्त त्या एकाच पदयात्री मंडळापुरती मर्यादीत नसते दुसरा कुठलयाही मंडळाचा पदयात्री असो तो हक्काने कुठलाही मंडळात जाउन खाउ पिउ शकतो. माझा निरिक्षणानुसार पदयात्री मंडळ पाण्यासाठी व सरबतासाठी जवळपास प्लॅस्टीकचे जाड किंवा स्टीलचे प्याले वापरतात जे पुन्हा पुन्हा वापरता येतात आणी बहुतकरुन कुणीही ग्लास उष्टावत नाही. सर्वच पदयात्रा मंडळाचे पाणी वाढपी हे मोटरसायकल वरुन फीरुन फीरुन पाणी विचारत असतात कारण रोडवर पदयात्री पुढेमागे असतात. ह्यावेळी थोडे फोटो काढले आहेत.
तसेच जेवणासाठीही शक्यतो स्टीलची ताटेच असतात जी प्रत्येक पदयात्रींनी आपली आपण धुवायची असतात. नाश्त्यासाठी आणी जेवणासाठी प्रत्येक मंडळाची जागा ठरलेली असते जीथे त्या त्या मंडळाचे पदयात्री एकत्र जमुन आरामात नाश्ता जेवण करतात. त्या त्या ठीकाणी डस्टबीन ची सोय मंडळ करते. पण जे बाहेरचे सेवा करणारे असतात जे पदयात्रींसाठी सरबत , नाश्ता, पाणी ठेवतात ते बहुतकरुन डीस्पोजेबल डीशेस , ग्लासेस वापरतात आणी पदयात्रींची संख्या ईतकी जास्त असते की डस्टबीन ओवरफ्लो होतात. मी स्वतः पाहते सिन्नर ला बरेचजण सेवा करतात तेव्हा प्लॅस्टीकच्या ग्लासांचा खच पडलेला असतो ह्यावेळी तर एकदम रोडवरच इतका खच पडला होता की त्यावरुनच जावे लागले. मी असे नाही म्हणत की पदयात्री असं करतच नाही पण रोडवर ईतके पदयात्री एकत्र चालत असताना मंडळाला काही शक्य नसते कारण बर्याच मंडळातील सभासद स्वतःही चालत असतात, पुन्हा पदयात्रींसाठी वेळेवर नाश्ता आणी जेवण, झोपेची व्यवथा हे सर्व असतं. आपापल्या पदयात्रींची सेफ्टीची जबाबदारीही असते. थकल्याने कुणी खुप मागे राहतं , उन्हामुळे कुणाला चक्कर, लुज मोशन्स होतात कुणाला पायाला जखमा होतात. माझ्या ५ व्या वारीच्या वेळेस एका माणसाला जव्हारला पोहोचता पोहोचता हार्ट अटॅक आला होता. आमच्या मंडळाकडे अॅम्बुलन्स नसते म्हणून दुसर्या मंडळाकडुन अॅम्ब्युलन्स मागवुन त्याला घरी पाठवुन दीले.
प्रतिक्रिया
2 Aug 2014 - 12:01 pm | मराठी_माणूस
माफी मागून काही प्रश्न मनात आले ते मांडतो
१)ह्याचा रहदारीला त्रास होतो की नाही ?
२)हाय वे हे वाहनासाठी बांधले आहेत का पायी चालणाऱ्या साठी ?
३)पायी पायी देवदर्शनाला गेले तर जास्त पुण्य मिळते का ?
४)इतकी शक्ती एखाद्या विधायक कार्या साठी वापरली तर जास्त चांगले नाही का?
2 Aug 2014 - 12:10 pm | प्रचेतस
हो ना.
पंढरीच्या वारीचा त्रास तर कितीतरी अधिक.
बंद करायला पाहिजेत ह्या वार्या.
2 Aug 2014 - 12:20 pm | कविता१९७८
१] रहदारीला त्रास होतो पण शक्यतो पदयात्री रस्त्याच्या कडेला चालतात, फक्त सिन्नरला रस्ता लहान असल्याने थोडा त्रास होतो.
२] हायवे वर पायी चालल्याने काही नुकसान होत नाही असे माझे वैयक्तिक मत आहे.
३] देव दर्शनाला पायी जाण्याने पुण्य मिळते ही कल्पनाच चुकीची आहे असे माझे वैयक्तिक मत आहे, मुळात देव दर्शनाने पुण्य मिळतं हे मला मान्य नाही , पाप आणि पुण्य हे आपल्या कर्मावर अवलंबुन असतात, म्हणुन पुण्य मिळेल ह्या कारणासाठी तर मी निश्चीतच जात नाही.
४] नेहमी चांगलेच ; पण जसे लोकं वर्षातुन २-३ वेळा बाहेर फिरायला जातात तसंच मी वर्षातुन एकदा या वारीत जाते ; ऑफीशीयल टेन्शन्स मधुन थोडं चेंज , बाकी ज्याची त्याची वैयक्तीक मते आहेत. ज्याला जायचं असतं तो जातो.
2 Aug 2014 - 1:47 pm | संजय क्षीरसागर
जास्त चांगले नाही का?
शाब्बास! म्हणजे हा शारीरिक छळ ऑफिसमधल्या मानसिक त्रासापेक्षा सुखद आहे? की ऑफिसमधल्या टेंशनपुढे याला छळ म्हणण्यापेक्षा आनंद म्हणणं योग्य वाटतं.
यापेक्षा, ऑफिसमधे कामातच मजा आली, तर या व्यापाची आवश्यकताच संपेल असं नाही का?
2 Aug 2014 - 2:14 pm | कविता१९७८
मी इथे माझे पदयात्रेचे अनुभव मांडलेत , पदयात्रा करावी का करु नये या चर्चेसाठी नाही, ज्यांना वाचायला आवडत आहे त्यांनी वाचावेत नाही तर सोडुन द्यावेत. पदयात्रा करणे ने करणे हे प्रत्येकाचे वैयक्तीक मत आहे.
2 Aug 2014 - 2:38 pm | संजय क्षीरसागर
जर अनुभव व्यक्तीगत ठेवायचे असतील तर डायरी हा उत्तम पर्याय आहे.
तुम्ही `ऑफीशीयल टेन्शन्स मधुन थोडं चेंज' हे पदयात्रेचं कारण लिहीलं आहे. आणि ऑफिसमधल्या कामात आनंद वाटणं हा त्यावर सोपा पर्याय नाही काय? अशी विचारणा आहे.
पदयात्रा करावी किंवा नाही हा व्यक्तीगत निर्णय असला तरी उपस्थित केलेल्या मुद्दा सर्वस्वी वेगळा आहे.
2 Aug 2014 - 2:39 pm | कविता१९७८
ओ.के. , सॉरी
2 Aug 2014 - 2:41 pm | कविता१९७८
ऑफीसमधल्या कामात आनंदच वाटतो पण प्रत्येकजण नेहमी कुठे ना कुठेतरी फिरायला जातोच की नाही? कामाच्या व्यापातुन थोडं चेंज मिळवं म्हणुन तसंच काहीतरी
2 Aug 2014 - 2:58 pm | संजय क्षीरसागर
हा तुमचा व्यक्तीगत पर्याय आहे. कबूल.
पण आम्ही `चेंज म्हणून' स्वतःचा असा शारिरिक छ्ळ करुन घेत नाही, इतकंच!
2 Aug 2014 - 3:03 pm | कविता१९७८
ओ. के. पण पहील्या वेळेस त्रास तर होणारच ना; नेहमी आणि सर्वांनाच ईतका त्रास होतो असे नाही
2 Aug 2014 - 4:39 pm | संजय क्षीरसागर
माझ्याशी वाद घालाल तर तुम्ही पदयात्रा सोडून द्याल.
निश्चयाचं बळंच मिळवायचं असेल तर रोज तासभर केलेल्या योगानं आणि प्राणायामानं ते सहज मिळतं. आणि मजेचे तर हजार पर्याय उपलब्ध आहेत.
गाणं शिकायचं म्हटलं तर आयुष्य कमी पडेल, तरीही शिकता शिकता जे गाऊ, त्यानं हरघडी आनंद मिळेल आणि त्यासाठी सायास करावे लागणार नाहीत.
साहित्याचा व्यासंग साधी लायब्ररी लावली तरी साधतो आणि जगण्याची नवी परिमाणं गवसतात.
एक खेळ आत्मसात केला आणि सकाळी खेळायला गेलो तर सारा दिवस रंगून जातो.
नवनवीन पाककृती शिकल्या तर रोजच्या भोजनाचा आनंद वृद्धिंगत होतो.
रोजच्या कामात रस घेतला तर तेच काम नव्या पद्धतीनं करण्याची दिशा मिळते. नवनविन कौशल्य आत्मसात कराविशी वाटतात आणि मग निवृत्तीचे भगवे रंग आयुष्याला शिवूच शकत नाहीत.
हिंदी-मराठीतल्या गाण्यांचा व्यासंग केला तर प्रत्येक आनंदाच्या क्षणी गाण्याचे बोल अनायास उमटून जातात आणि एखादं जरी गाणं, कधीही सलग म्हटलं, तरी जीव आनंदून जातो.
नव्यानं केलेल्या मैत्रीतनं जीवनाकडे पाहण्याचा वेगळा दृष्टीकोन लाभू शकतो.
आणि कुणाशी अनुबंध साधता आला तर आयुष्यभरासाठी एक संगत लाभते आणि सारं आयुष्य बहरुन जातं *smile*
2 Aug 2014 - 4:56 pm | कविता१९७८
संजयजी,
मी वाद घालतच नाहीये, फक्त माझं मत व्यक्त केलं , बाकी तुम्ही खुप छान लिहिता , तुमचे विचार मला आवडले.
2 Aug 2014 - 8:11 pm | संजय क्षीरसागर
*i-m_so_happy*
2 Aug 2014 - 8:16 pm | यशोधरा
फुग्यातली हवाच काढलीत हो ताई सहज रीत्या! भारी! *biggrin* *good*
2 Aug 2014 - 8:23 pm | संजय क्षीरसागर
स्वतः प्रामाणिक असायला लागतं, असा अनुभव आहे.
2 Aug 2014 - 8:28 pm | यशोधरा
चांगली गोष्ट आहे. मग आहात का तुम्ही प्रामाणिक?
2 Aug 2014 - 9:12 pm | संजय क्षीरसागर
यापरता अप्रामाणिकपणाच दुसरं लक्षण नाही.
3 Aug 2014 - 6:39 am | यशोधरा
आणि मुद्दा कळून आणि पटूनही आपलाच हेका दामटणं हे कशाचं लक्षण म्हणे? :)
3 Aug 2014 - 9:11 am | कवितानागेश
स्थैर्याचं!! =))
3 Aug 2014 - 10:02 am | यशोधरा
बोल्ली का?!! च्च! जर्रा म्हणून पेशन्स नै तुला मौ! *biggrin*
3 Aug 2014 - 10:38 am | स्पा
दोन संपादकांना असे अवांतर करताना पाहुन एक मिपाकर म्हणुन शरम वेग्रे वाटली
3 Aug 2014 - 10:41 am | यशोधरा
चांगली गोष्ट आहे की. तुम्हांला पण शरम वाटते हे वाचून मज्जा वाटली! *lol*
3 Aug 2014 - 10:50 am | स्पा
अरेरे
5 Aug 2014 - 12:28 am | सूड
>>अरेरे
परममित्राप्रमाणेच म्हणतो!!
बाकी कविताजींनी जी काही फुग्यातली हवा काढून टाकली त्याला तोड नाही!! *ROFL* मेल्या जुन्याजाणत्या मिपाकरांना जमत नाही ते तुम्ही पदार्पणाच्या दुसर्याच धाग्यात करुन दाखवलंत !! *yes3*
11 Aug 2014 - 10:20 pm | मृत्युन्जय
यशो कधीपासुन संपादक झाली?
2 Aug 2014 - 9:12 pm | प्यारे१
फुगा कुठंय?
4 Aug 2014 - 8:44 pm | रामपुरी
फुगवता फुगवता फुटला
5 Aug 2014 - 5:01 am | भृशुंडी
तुम्ही ट्रोल आहात का?
प्रामाणिकपणे उत्तर द्या.
6 Aug 2014 - 8:55 am | स्पंदना
या प्रतिसादाला खरच १००/१००.
मस्त विचार!!
2 Aug 2014 - 1:46 pm | शैलेन्द्र
प्रचंड होतो. घोटी ते शिर्डी हा रस्ता अरुंद आहे. पदयात्री बर्याचदा रस्त्याच्या डाव्या बाजुने स्वतःच्या तंद्रीत चालतात. तसेच अती थकव्यामुळे कधीकधी भेलकंडत चालतात. याचा खुप त्रास रस्त्याने चारचाकी वाहन चालवणार्याला होतो. कारण पदयात्रींना वाचवण्यासाठी दुचाकी वाहणे रस्त्याच्या मधुन चालतात आणी मग त्यांच्या मागे ट्र्क व इतर गाड्यांच्या रांगा लागतात. पदयात्रींना पाणी वाटप करणार्या गाड्या मन मानेल तसे थांबतात, अगदी उजवीकडुन चालणारे पदयात्रीही वाहतुकीचा वेग मंदावतात. रात्रीच्या आणि पहाटच्या वेळी हा त्रास अजुन वाढतो. खरतर या मंडळांनी हाय-वे ला समांतर जाणारी पाउलवाट शोधली पाहिजे पण मग त्यांना पुरवठा करणार्या वाहनांची पंचाईत होते. (जसा वावी ते रहाता हा वेगळा पालखी मार्ग आहे) रस्ते हे वेगवान व सुरक्षीत वाहतुकीसाठी बांधलेले आहेत.
दुसरी गोष्ट म्हणजे डांबरावर चालल्याने प्रचंड त्रास होतो. तापलेल्या डांबराची उष्णता डोळ्यांसह शरीराच्या अनेक अवयवांना इजा पोहचवते. अनेक पदयात्री अनवानी किंवा फालतु स्लीपर वगैरे घालुन चालतात, रस्त्यावरचे उन, धुळ, प्रदुषन हे असतेच. त्यामुळे एखाद्या ट्रेकरला मिळणारा आनंद अशा चालण्यात कधिही मिळत नाही. देवभक्तीचे समाधान व सगळ्यांनी मिळून काहीतरी केल्याची भावना वगळता यातुन काही हाती लागत नाही.
2 Aug 2014 - 2:18 pm | कविता१९७८
आमचा नाशिकपर्यंतचा रस्ता जंगलाचा आहे जिकडे जास्त रहदारी नसते, नाशिक पण आम्ही रात्री पार पाडतो, नाशिक पार पाडल्या नंतर आम्हाला हायवे लागतो, नाशिक ते सिन्नर रस्ता अरुंद असल्याने थोडी अडचण होते. पण सिन्नर नंतर रस्ता रुंद आहे,
2 Aug 2014 - 2:53 pm | शैलेन्द्र
मान्य,
सदरचा प्रतिसाद तुम्हांला वैयक्तीक नक्कीच नाही. पदयात्रा करावी की नाही हा संपुर्ण खाजगी निर्णय आहे. पण मुंबैच्या सगळ्या पालख्या ज्या मार्गाचा वापर करतात त्याचे उदाहरण मी घेतलेय.
नाशिक ते सिन्नर या रस्त्यावर, खास्करुन शिंदे-पळसे गावाच्या पुढुन ते सिन्नरचा घाट संपेपर्यंत प्रचंड रहदारी व कोंडी असते.
2 Aug 2014 - 2:56 pm | कविता१९७८
सहमत
2 Aug 2014 - 12:09 pm | खटपट्या
हाही भाग आवडला
पु. भा. प्र.
2 Aug 2014 - 1:49 pm | शैलेन्द्र
लिखाण आवडले. लिहीत रहा..
2 Aug 2014 - 2:22 pm | प्रभाकर पेठकर
खुप अनावश्यक तपशिल, चांगले मराठी शब्द उपलब्ध असताना इंग्रजी शब्दांचा वापर, सामाजिक स्वच्छतेबाबत उदासिनता (ती जबाबदारी आयोजकांची असा सुर) अशा, मनांत प्रश्न उभे करणार्या, अनेक मुद्द्यांनी भरलेले लेखन, लेखिकेचा उद्देश चांगला असूनही, मनाला भावत नाही.
2 Aug 2014 - 11:05 pm | कविता१९७८
काय झाले ना जेव्हा मी दुसर्या आंतरजालावर अनुभव लिहायला पहिल्यांदा सुरुवात केली तेव्हा पहिला भाग झाल्यानंतर मला खुप सार्या शंका विचारण्यात आल्या जसे आंघोळी कुठे झाल्या, कचर्याची कशी विल्हेवाट लागते, मंडळाची व्यवस्था कशी असते. ह्या सर्वांचे उत्तर दुसर्या भागात मी दिले आहे. तेच लेखन इथे पेस्ट केले आहे कारण ह्या शंका सर्वांच्याच मनात येउ शकतात
2 Aug 2014 - 2:31 pm | पिलीयन रायडर
लेखन चांगले.. छान लिहीत आहात. जणु काही तुम्हीच "पदयात्रा" सुरु केल्यात अशा थाटात तुम्हाला जाब विचारणारे प्रतिसाद आले तरी तुम्ही मनावर घेतले नाहीत हे आवडले.
कचर्याच्या बाबतीत पेठकर काकांच्या प्रतिसादाशी सहमत..
पदयात्रा करावी की न करावी.. हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण आपण काहीही करतो तेव्हा प्रत्येकाने त्याचा इतरांना त्रास होत नाही ना एवढे पहावे.. जेव्हा ह्या पदयात्रा होतात तेव्हा कचरा होतो, ट्रॅफीकला अडथळा होतो हे खरेच.. आणि त्यासाठी पर्याय शोधणे हे ही पदयात्रींचेच काम आहे. मंडळाच्या आवाक्याबाहेर कचरा होत असला तरी त्याचा त्रास इतरांनी का सहन करावा?
हे तुम्हाला उद्देशुन नाही.. जनरल मत आहे..
2 Aug 2014 - 4:42 pm | स्पा
सहमत.
4 Aug 2014 - 4:31 pm | बॅटमॅन
ठ्ठो!!!!
सहमत.
5 Aug 2014 - 7:46 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
छान लिहीत आहात. जणु काही तुम्हीच "पदयात्रा" सुरु केल्यात अशा थाटात तुम्हाला जाब विचारणारे प्रतिसाद आले तरी तुम्ही मनावर घेतले नाहीत हे आवडले.
अगदी अगदी, हेच म्हणतो...!
(च्यायला, पिराशी इतक्या लवकर सहमतीची वेळ येईल असं वाटलं नव्हतं ) :(
-दिलीप बिरुटे
2 Aug 2014 - 2:43 pm | मुक्त विहारि
वाचत आहे.
2 Aug 2014 - 4:41 pm | स्पा
प्रांजळ लेखन. मी याला कुठलीही धारमिक पदयात्रा न समजता तुमचे प्रवास वर्णन समजेन.
पदयात्रा करावी की न करावी, त्याचे फायदे , तोटे, असा वेगळा चर्चा विषय होउ शकेल, सो सदर प्रतिसांदाना आपण ज्या साधेपणाने उत्तरे दिलीत तेही आवडले.
2 Aug 2014 - 4:42 pm | कवितानागेश
तुमच्यात आणि तुमच्यासारख्या पदयात्रा करणार्या लोकांमध्ये खरोखरच गट्स आहेत कविताताई. जे कधीही स्वतःचा कम्फर्ट झोन सोडू शकत नाहीत, त्यांना हे कळूच शकणर नाहीये.
पदयात्रा पूर्ण केल्यानंतर किती आनंद मिळत असेल, आत्मविश्वास किती वाढत असेल याची कल्पना घरबसल्या कुणालाही येणं शक्य नाही.
तुम्हाला तुअमचे पोटेन्शियल असंच वाढवत रहाण्यासाठी शुभेच्छा!
काहींचा कचर्याचा मुद्दा मलापण पटतोय. पण तसेही महापालिका तरी कचरा उचलयला कुठे सक्षम आहे, की मंडळांच्या कार्भारावर बोट ठेवावं?
4 Aug 2014 - 11:38 am | बाळ सप्रे
ही विचारसरणी अतिशय घातक आहे.. पालिकेचे कचराव्यवस्थापन हे रोजच्या जगण्यातून निर्माण होणार्या कचर्याची विल्हेवाट लावण्यासाठी आहे.. त्याची क्षमता मर्यादीत असते.. जेव्हा हजारो लाखो लोकांचा समुदाय एकत्र येतो, त्यातून निर्माण होणारा कचरा ही त्याच संघटकांची जवाबदारी आहे..
हे म्हणजे रोजच्या काम करणार्या मोलकरणीकडून लग्न समारंभाची धुणीभांडी करण्याची अपेक्षा ठेवण्याची आहे..
4 Aug 2014 - 11:48 am | संजय क्षीरसागर
पण ही कमेंट, भारीये!
किंवा असं ही म्हणता येईल :
हे म्हणजे कामवाल्याबाईनं ऑफिसचं काम करुन, पगार तुमच्या हातात द्यावा अशी अपेक्षा करणं आहे!
2 Aug 2014 - 5:48 pm | प्यारे१
बाकीच्यांना 'टेम्पोत बसवून' केलेली मिपावरची पदयात्रा आवडते आहे. :)
पेठकरकाकांशी अंशतः सहमत. लीमाऊशी तर सहमती असतेच.
2 Aug 2014 - 9:48 pm | पैसा
वेगळे काही करणार्यांबद्दल नेहमीच प्रचंड कौतुक वाटते. तुम्ही दिलेल्या दुव्यांवरून मायबोलीवर मिळालेल्या मदतीबद्दल आणि प्रोत्साहनाबद्दल वाचून छान वाटलं.
तुमचे अनुभव अतिशय प्रमाणिक आहेत, आणि त्यांचं लिखाणही. चर्चेतील तुमचा एकूण वावरही फार आवडला. पुढील लेखनासाठी आणि पदयात्रांसाठी मनापासून शुभेच्छा!
3 Aug 2014 - 12:02 am | स्रुजा
+१११
3 Aug 2014 - 8:38 am | vikramaditya
लिहिले. लिहित रहा. आणि ज्या गोष्टींमधुन स्वतःला आनंद मिळतो त्या जरुर करा.
4 Aug 2014 - 4:34 pm | वेल्लाभट
लेख, प्रतिसाद सगळं वाचलं. छान अनुभव कथन.
लेखन चांगलं वाईट यावर आलेले प्रतिसाद अनावश्यक वाटले.
वैयक्तिक मलाही पदयात्रा, मोठ्या देवळांमधे लोटांगण घालत, रांगत, लोळत जाणं या गोष्टी पटत नाहीत, आवडत नाहीत. पण असो. माझे मुद्दे वरील प्रतिसादांमधे उपस्थित झालेले आहेत त्यामुळे पुन्हा लिहावेसे वाटत नाहीत.
4 Aug 2014 - 8:59 pm | अर्धवटराव
कोणाला पदयात्रेची हौस, कोणाला त्याचे अनुभव शेअर करायची हौस, आणि रामा लोकांना दिसलं मांजर तर ठोकायची हौस. मिपा हौशी लोकांनी फारच व्यापलय :)