सप्तरंगी पोपट !!
तो दिवसच नशिबात आला
अन सांजवेळ ती अशुभाची
आभाळ फाटुनी घात जाहला
करूण व्यथा त्या पिलाची ….!
असे बंधिस्त तो पिंजरा
सोन्याचा कि लोहाचा,
अतिरम्य पंख किती फडकले
पिल्लू गोजिरे ते पार अडकले …!
गेला भरधाव तो रथही
घेउनि केविलवाण्या पिंजऱ्यास ,
आक्रोश विरला अन अश्रूही
इवलेसे डोळेच फक्त सांत्वनास …!
काळोख दाटला सभोवती
भीती चिमुकल्या मनात ,
काजव्यांना साद घाले परंतू
तो तर दिव्यांचा झगमगाट ….!
इथे न कुणी मायबाप
प्रेमाला अन मायेला ,
जीवाहूनही किंमत न्यारी
इथे फेकील्या पैशाला ….!
सापडला जीव कोंडीत
प्राक्तन ते नशिबाचे ,
साजरे केले तरी सोहळे
सजवले दार पिंजऱ्याचे ….!
शिकलाच शेवटी तोही
मानवी जगाचा चाळा ,
पैसे पडल्याविना न करी
सुरुवात तो नव्या खेळाला ….!
आठव कधी येता घराची
पिंजऱ्यातूनच पाही झाडाला,
'चिमणी कर पुढल्या जन्मी '
सप्तरंगी पोपट म्हणे देवाला ….!!!
......फिझा
प्रतिक्रिया
1 Aug 2014 - 5:05 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
छानच... आवडली.
1 Aug 2014 - 5:53 pm | अत्रुप्त आत्मा
चिमणी कर पुढल्या जन्मी '
सप्तरंगी पोपट म्हणे देवाला ….!!! *good*
3 Aug 2014 - 10:00 am | विवेकपटाईत
चिमण्या सुद्धा नाहीश्या झाल्या आहेत. दिल्लीत चिमण्यांना ही पिंजर्यात डांबून विकणारे हजारो दुकानदार आहेत. घरात पक्षी ठेवणे हा दिल्लीकरांचा नवीन फैशन आहे.
3 Aug 2014 - 10:07 am | मदनबाण
काळोख दाटला सभोवती
भीती चिमुकल्या मनात ,
काजव्यांना साद घाले परंतू
तो तर दिव्यांचा झगमगाट ….!
केवल अप्रतिम... :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Gulabi... ;) { शुद्ध देसी Romance }