मनसेनं पुन्हा परप्रांतीयांवर आपली चढाई केली. मुंबई-कल्याण येथे आज रेल्वेची परिक्षा देण्यासाठी काही परप्रांतीय तरुण आले होते.महाराष्ट्रात होऊ घातलेल्या या परिक्षेला मराठी तरुण अत्यल्प होते.पहीले महाराष्ट्रातल्या तरुणांना नोकरी द्या.या मागणीवरुन सदर आंदोलन करण्यात आले.त्यांनी चक्क त्या परप्रांतीय तरुणांना पळवून लावले आणि परिक्षेच्या ठिकाणी सवयीप्रमाणे तोड्फोड करुन मराठीला न्याय मिळावा अशी घोषणाबाजी केली. मनसेचं हे धोरण मराठी माणसाला कितपत न्याय देऊ शकेल हे माहीत नाही,पण त्यांच्या या धोरणामुळे परप्रांतात नोकरीवर असणार्या महाराष्ट्रातल्या माणसाचा जीव नक्कीच खालीवर करत असेल्.मराठीबद्द्ल त्यांचे प्रेम मला मान्य आहे.पण ते प्रेम व्यक्त करण्यासाठी त्यांनी चालवलेली तोड्फोड न पटणारी आहे.स्वतः बद्दलचा धाक जनतेच्या मनात निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे असे मला वाटते.राज ठाकरे खरोखर हुशार आणि परखड बोलणारा वक्ता आहे.मात्र त्याची सत्ता जनचेच्या मनात काय स्थान मिळवेल याबाबत मला साशंकता आहे.
प्रतिक्रिया
19 Oct 2008 - 2:35 pm | मनिष
हे अगदी, अगदी पटले!
19 Oct 2008 - 2:59 pm | मदनबाण
महाराष्ट्रातल्या जागा भरतीच्या जाहिराती उत्तर प्रदेशातील वर्तमानपत्रात कशा छापल्या जातात??
या भय्यांना त्यांच्या राज्यात नोकरी भरती का मिळत नाही?
कर्जत पासुन छत्रपती शिवाजी स्थानका पर्यंत सर्व खानपान सेवा ठेले हे यादव तिवारी यांच्या नावावरच का ?
तोड-फोड केल्या शिवाय ही भय्या लॉबी ऐकणार आहे का ??
मागच्या वेळे असाच प्रकार घडुन देखील परत हे भय्ये इथे भरतीसाठी का आले ?????
मराठी मुलांनी नोकरी मिळत नाही म्हणुन गळफास लावुन घेतला तर ते बरोबर आहे का ?
मराठी मुलांनी महाराषट्रात नोकरीची संधी असताना ही त्यांना त्यासाठी बोलवले जात नाही हे सत्य नव्हे काय?
मदनबाण.....
"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda
19 Oct 2008 - 3:21 pm | देवदत्त
तुमचे प्रश्न बरोबर आहेत. पण ह्याचे उत्तर फक्त त्या विद्यार्थ्यांना मारहाण करून/ पिटाळून लावून मिळणार आहे का? त्या विद्यार्थ्यांना संधी मिळाली, ते आले परीक्षा द्यायला.
सरकारी खात्यातील माणसे असले प्रकार करत असताना त्यांच्यावर कारर्वाई व्हायला हवी, त्यांच्या विरोधात काही केले पाहिजे.
विद्यार्थ्यांना मारहाण केली तर ह्यात त्या राजकारणी लोकांचे काहीच बिघडत नाही आहे. उलट उगाच राजकारणीय वादात तेल टाकले जात आहे. त्याचा त्रास आपल्यालाच होणार आहे.
खरी गरज आहे ती ह्यास कारणीभूत असलेल्या लोकांची नावे समोर आणून काय ते उपाय व्हायला पाहिजेत. जमल्यास त्या मुख्य अधिकार्याला मारहाण करा ना मग.
राज ठाकरे ह्यांचे विचार , त्यांची कळकळ समजते, पटते. पण तोडफोड/विद्यार्थ्यांना मारहाण हा मार्ग चुकीचा वाटतो.
19 Oct 2008 - 3:27 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
मिना, देवदत्त आणि मनीष यांच्याशी सहमत.
19 Oct 2008 - 3:30 pm | कुंदन
मराठी मुलांनीही अशा स्पर्धा परिक्षांमध्ये सहभागी व्हावे की....
मनसेला एव्हढीच कळ कळ आहे तर अशा स्पर्धा परिक्षां साठी मार्गदर्शन वर्ग सुरु करावेत.
19 Oct 2008 - 3:46 pm | मदनबाण
फक्त त्या विद्यार्थ्यांना मारहाण करून/ पिटाळून लावून मिळणार आहे का? त्या विद्यार्थ्यांना संधी मिळाली, ते आले परीक्षा द्यायला.
मान्य आहे पण एकदा या भय्यांना समजले की इथं सहज येता येत नाही की बरोबर मराठी मुलांना संधी मिळेल..
मारहाण ही कोणालाच आवडत नसते !! पण शेवटी माकडीण सुद्दा स्वत:च्या पिल्लाला पायाखाली घेते स्वत:चा जीव वाचवण्यासाठी!!
मारहाण झाली हे मान्य..पण ती का होते याचाही विचार व्ह्यायलाच हवा !!
बी.इ होऊन सुद्दा मराठी मुल दारोदार सेल्समन बनुन फिरतात हे मी स्वतः पाहिले आहे..
हा प्रकार दक्षिणेत का होत नाही?महाराष्ट्रीय लोकांनी काय ठेका घेतलाय का परप्रांतिय लोकांना नोकर्या देण्याचा??
हे अनेक वर्ष चालत आले आहे !! आणि असेच चालु राहिले तर मराठी माणसांच्या पुढच्या पिढीतल्या युवांना हातात कटोरा घेऊन बसाव लागेल..
मदनबाण.....
"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda
19 Oct 2008 - 8:05 pm | अभिरत भिरभि-या
बी.इ होऊन सुद्दा मराठी मुल दारोदार सेल्समन बनुन फिरतात हे मी स्वतः पाहिले आहे..
आणि अक्षरशः मोजके शिकलेले गुज्जु - माडू लाखो करोडो कमावताना ही पाहिले असेल ना? स्वतः धिरुभाई किती शिकले होते ?
स्वतःच्या कमकुवतीसाठी इतरांना किती दिवस जबाबदार धरणार ? जर भय्या लॉब्या करत असतील तर त्यांना तशाच मार्गाने उत्तर द्यावे,.
लोकसभेत ४८ खासदार पाठ्वतो आपण. हे खासदार जर बांडगुळासारखे निरुपयोगी असतील, राज्यातल्या तरुणाना नोक-या देण्यात अक्षम असतील, तर दोष पुन्हा आपलाच आहे.
साला, लॉब्या करा, दबाव आणा
हा प्रकार दक्षिणेत का होत नाही?महाराष्ट्रीय लोकांनी काय ठेका घेतलाय का परप्रांतिय लोकांना नोकर्या देण्याचा??
हो महाराष्ट्रीय लोकांनी ठेका घेतलाय. आधी येऊ द्यायचे हिन्दी राष्ट्र्भाषा म्हणुन डोक्यावर नाचवायचे आणि मग पाणी गळ्यावर आल्यावर आकांत करायचा . हा मुर्खपणा नाहीतर दुसरे काय ?
ते आपल्यासारखे मुर्ख नसल्याने हे प्रकार दक्षिणेत होत नाहीत.
---
राज ठाकरेंच्या नवशिवसेनेचे उपाय मुळात जुन्या शिवसेनेचेच आहेत. आणि ते किती निरुपयोगी आहेत हे शिवसेनेच्या उदा. वरुन सिद्ध झालेच आहे. कोणी मसिहा येईल, आमचे कल्याण करेल अशी फुकाची आशा आपण का धरुन बसतो ? एकी करून बाकीचे पुढे जातात हे आपल्याला केव्हा कळणार ???
19 Oct 2008 - 8:39 pm | mina
तुमचा रोष अगदी बरोबर आहे.मान्य आहे मला.
19 Oct 2008 - 10:54 pm | सुक्या
सरकारी खात्यातील माणसे असले प्रकार करत असताना त्यांच्यावर कारर्वाई व्हायला हवी, त्यांच्या विरोधात काही केले पाहिजे.
सरकारी खात्यातील माणसे काय करतात ते सगळ्यांना माहीत आहे. आपला फायदा असेल तर सरकारी खात्यात आपण काय करतो ते ही सगळ्यांना माहीत आहे. एक तर उपाय सुचवा किंवा जे कुनी काहीतरी करतो आहे ते ठीक म्हना. उगीचच राजीव गांधी सारखं "कुछ करना चाहीये" म्हनु नका. गटार साफ करायला घाणीत उतरावे लागते. तेच राज करतो आहे. मी काही तोड्फोडीचा समर्ठक आहे असे नाही पन हे सगळे थांबावे म्हनुन कुनीतरी काही तरी करतो त्याचे पाय तरी ओढत नाही.
सुक्या (बोंबील)
मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)
19 Oct 2008 - 3:52 pm | विसोबा खेचर
मराठीबद्द्ल त्यांचे प्रेम मला मान्य आहे.पण ते प्रेम व्यक्त करण्यासाठी त्यांनी चालवलेली तोड्फोड न पटणारी आहे.स्वतः बद्दलचा धाक जनतेच्या मनात निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे असे मला वाटते.राज ठाकरे खरोखर हुशार आणि परखड बोलणारा वक्ता आहे.मात्र त्याची सत्ता जनचेच्या मनात काय स्थान मिळवेल याबाबत मला साशंकता आहे.
तोडफोड चांगली नव्हे हे मान्य आहे परंतु गेली कित्येक वर्ष रेल्वेत बहुतांशी केवळ उत्तरभारतीयांनाच अधिकाधिक नोकर्या दिल्या जात आहेत. ही मोनॉपॉली मोडून काढण्याकरता थोडा धाकधपडशा हवाच!
तात्या.
19 Oct 2008 - 8:56 pm | mina
तात्या मोनॉपॉली मोडून काढ्ण्यासाठी धाकधपड्शा हवा हे ठीक आहे हो.पण आज तुम्ही जर मनसे ने त्या मुलांना दिलेली वागणूक न्यूजचॅनलवर पाहीली तर लक्षात येईल माझा रोष कशावर आहे.त्या मुलांजवळचे अक्षरशः सामान हिसकावून, परिक्षारुममधील तोड्फोड केलेले सामान त्याच्या अंगावर मारुन मारुन त्यांना पिटाळून लावले..याला काय म्हणायचे?परप्रांतीय आहे म्हणून त्यांना अशी वागणूक.
20 Oct 2008 - 11:39 am | llपुण्याचे पेशवेll
मुळात महाराष्ट्रातल्या रेल्वेतल्या जागा भरायला जाहिराती दिल्या जातात पटणा, अलाहाबाद अशा शहरात. विदर्भातल्या पेपरात, मराठवड्यातल्या पेपरात, इतरही अनेक महाराष्ट्रीय पेपरात का नाही दिल्या जात या जाहिराती?
जर या बातम्या स्थानिक पेपरात दिल्या असतील आणि तरीही या परिक्षेला मराठी लोक गेले नसतील तरच ही मारहाण असमर्थनीय आहे. अन्याथा जर त्यांचे नेते सुधारत नसतील तर त्याना निवडून देणार्या लोकाना धुण्यात काहीही गैर नाही.
पुण्याचे पेशवे
20 Oct 2008 - 5:59 pm | मी_बोलनार_नाही
खरे तर त्या यूपी वाल्या नेत्याना अगोदर चोप दिला पाहिजे ..... म्हनजे बाकिचे आपोआप गप्प बसातील ... साला मराठी मानूस म्हणजे कोणीही या आणी टीकली मारुन जा असे वाटत आहे त्याना ....
19 Oct 2008 - 4:35 pm | घासू
मी राज ठाकरे जे करतात त्याच्याशी सहमत आहे मात्र त्या॑नी जो मार्ग अवलंबवला आहे तो चुकीचा वाटतो. कारण यात होणार नुकसान फक्त मराठी माणसाच आहे. कोणताही सरकारी अधिकारी हे नुकसान आपल्या खिशातून भरुन देणार नाही. जर काही करायच असेल तर ते सरकारी यंत्रणेला तोडलं पाहिजे, तरच मराठी तरुण पुढे येतील. मनसेने या पुढे नोकरीसाठी आलेल्या तरुणा॑वर हल्ला न करता सरळ सरकारी अधिकार्यांनाच ताब्यात घ्यावे.
कर्जत पासुन छत्रपती शिवाजी स्थानका पर्यंत सर्व खानपान सेवा ठेले हे यादव तिवारी यांच्या नावावरच का ?
हा प्रश्न मला सुद्धा पडलाय.
मराठीप्रेमी
घासू
19 Oct 2008 - 6:57 pm | मीनल
मला वाटतं की मांजरांच्या पाठीत एकदोन वेळा चांगला रट्टा द्यावा म्हणजे चोरून दूध पिऊन जाणार नाही.
पण दुसर असं की आपण आपल दार /खिडकी अशी मोकळी ठेवाचीच का ?
मराठी माणूसच अनेकदा उदासिन दिसतो.विशेषतः बिझिनेस म्हटला की.
हं.नोकरी म्ह्टली की पहिल पाऊल!
मीनल.
19 Oct 2008 - 7:20 pm | वेताळ
मला एक कळत नाही महाराष्ट्रातील रेल्वेसाठी जागा निघतात व इथल्या लोकाना कळण्याआधी हे लोक भरती साठी इथे येतात.ह्याची बुध्दीमत्ता ज्यादा(?) कारण परिक्षेनंतर हेच त्या जागेसाठी पात्र होणार.त्याविरुध्द इथले भुमिपुत्र जागे झाले व अन्यायाला वाचा फोडली ,तरिही संबधिताना जाग आली नाही. म्हणुन आमच्यातल्या काहीनी काठी हाती घेतली म्हणुन आमच्या इथले सुशिक्षित (?)गळे काढणार. का?
रेल्वे युपी-बिहार मध्ये पण धावते. तिथे पण नोकरभरती केली जाते.वरिल जाणकार त्या संदर्भात एकादी मराठी वृतपत्रातील नोकरभरतीची जाहिरात दाखवु शकतील काय?
सतत अन्याय सहन करण्यापेक्षा एकदा त्याना दणका दिला पाहिजे ह्या मताचा मी आहे. रेल्वे चे युपी-बिहार मधले उत्पन्न महाराष्ट्रातील रेल्वेच्या उत्पन्नाच्या नगण्य आहे. मग रेल्वेत नोकरया फक्त त्यानाच का? हे लोक युपी-बिहार मध्ये रेल्वेचे कधी तिकिट काढतात का?
जर राज चा मार्ग चुकीचा आहे असे तुम्हाला वाटत असेल तर कोणता मार्ग योग्य आहे हे तुम्ही सांगा.
वेताळ
19 Oct 2008 - 8:36 pm | देवदत्त
जर राज चा मार्ग चुकीचा आहे असे तुम्हाला वाटत असेल तर कोणता मार्ग योग्य आहे हे तुम्ही सांगा.
त्या परीक्षा होऊ देणे थांबविणे. ज्या प्रकारे त्यांनी जेट ला सांगितले की आधी सर्वांना नोकरीवर परत घ्या, नाही तर जेटची विमाने उडू देणार नाही. त्याप्रमाणे इथेही म्हणू शकतात.
पण पहाटे रेल्वे स्टेशनवर जाऊन विद्यार्थ्यांना मारहाण करणे चुकीचे वाटले. ह्यातून त्या लोकांवर धाक निर्माण होईल पण उगाच प्रांतवादाला खतपाणी मिळते.
हे लोक युपी-बिहार मध्ये रेल्वेचे कधी तिकिट काढतात का?
हा त्या राज्याच्या रेल्वे प्रशासनाचा प्रश्न आहे. महाराष्ट्रात त्यांनी तिकीट नाही काढले तर काय करायचे ते करा.
19 Oct 2008 - 10:55 pm | अभिरत भिरभि-या
जर राज चा मार्ग चुकीचा आहे असे तुम्हाला वाटत असेल तर कोणता मार्ग योग्य आहे हे तुम्ही सांगा.??
मला वाटते कर्नाटकातील काही महिन्यांपुर्वीचे उदा पुरेसे बोलके आहे. बंगळुरातल्या यशवंतपुरजवळ नैऋत्य रेल्वेच्या चतुर्थ श्रेणी भरतीसाठी परिक्षा होती. उत्तरी लोंढे येथे ही दाखल झाले होते. कर्नाटक रक्ष्णा वेदिकेच्या लोकांनी परिक्षा रोखली पण
१ यात कोणत्याही भय्यावर हात उगारण्यात आला नाही.
२ रेल्वे आधिका-यांकडे "पारदर्शकते"ची "विचारणा" करण्यात आली ( असहाय्य लोकांवर हात उगारण्यात काय मर्दानगी ? पंगा घ्यायचाय तर .. !)
३ परिक्षा नोटिस किती स्थानिक वर्तमानपत्रात होती याची खातरजमा करुन ही परिक्षा पुढे ढकलवण्यात आली .
सर्वात महत्वाचे ..
यात भय्या द्वेष "हायलाईट" न करता "स्थानिकांना योग्य संधी" इतकीच भाषा होती.
इतरांना फुकट मारहाण करुन आपल्या उद्दिष्टाची हानी होणार नाही याची काळजी घेतली गेली.
खासदारांचा योग्य तो उपयोग केला गेला.
मीडिया मधे कानडी समाजाची संकुचित नव्हे तर "आपल्या हितांसाठी जागरुक" अशी प्रतिमा जाईल याची काळजी घेतली गेली.
आपल्याकडे काय होते ??
केवळ उलट .. जे करायचे ते केलेच जात नाही.
19 Oct 2008 - 11:12 pm | मनिष
@अभिरत - प्रतिसाद आवडला! :)
अवांतर - आपल्या मराठी लोकांना बंगलोर मधे वगैरे नोकर्यांच्या जागी असेच झोडपले तर चालेल का?
19 Oct 2008 - 11:33 pm | अभिज्ञ
अभिरत
आपण बेंगलोरात किंवा कर्नाटकात किती वर्षे आहात ते माहित नाहि,किंवा एकंदर नवखे दिसता.
आपण उल्लेख केलेले प्रकार फारच वरवरचे आहेत. भय्या लोकांच्या प्रश्नावर कन्नड रक्षण वैदिकेने जोरदार आंदोलन केलेले होते.
हुबळि येथील रेल्वे कार्यालयात घुसुन तोडफोड केलेली होती. जागोजागी रेल्वेरोको आंदोलन करण्यात आले होते.
खुद्द लालु यादव ज्या रेल्वेतुन आलेले होते ती सुध्दा आडवण्यात आलेली होती.
रेल्वेभरती होणार कर्नाटकात व त्याच्या जाहिराती बिहारमधे???
स्थानिक मिडियाने देखील हा मुद्दा जोरदार लावून धरला होता.
थोडे स्पष्टच लिहितो, हिंदि मिडियाच्या *** दम आहे का त्यावर चकार शब्द काढायचा?
आसाम,पंजाब मध्ये काय होतेय? तिथे तर बौंब फुटत आहेत.त्यावर का नाहि मिडिया आकांडतांडव करत?
मी गेले ५ वर्षे कर्नाटकात राहिलो आहे. भाषा व स्वतःची संस्कृती ह्यावर हि मंडळी फारच हळवी आहेत.
तामिळनाडु बरोबर वाद असु देत कि बेळगाव प्रकरणी महाराष्ट्रा बरोबर,
सर्वच राज्यकर्ते एकाच सुरात बोलताना दिसतात.
बेळगाव प्रकरणात आबा पाटील ह्यांनी बेळगावात सभा घेतलि होती. त्याच निषेध म्हणुन संपुर्ण कर्नाटकात कडकडित बंद पाळण्यात आला
होता. नुसतीच दुकाने बंद नव्हति तर केबल वरील सर्व अकन्नड चॅनेल्स बंद ठेवलेले होते.
इतकेच नव्हे तर
विधानसभे समोर रस्त्यावर आबा पाटील व विलासराव देशमुख ह्यांचे जाहिर श्राध्द घालण्यात आलेले होते.
त्याचे फोटो दुसर्या दिवशी सर्व स्थानिक वर्तमानपत्रात पहिल्या पानावर होते. हे महाराष्ट्रातील किती लोकांना माहिती आहे?
बाकिचे काय म्हणतील ,त्यांना काय वाटेल,मिडियामधे आपली इमेज कशि दिसेल ह्याचा विचार क्त मराठी माणुसच करताना दिसतो
पण एक मात्र नक्की
आज जे महाराष्ट्रात घडते आहे ते अजुन ५ वर्षांनी कर्नाटक व गुजरात मधेहि घडताना दिसेल.
20 Oct 2008 - 2:15 pm | अभिरत भिरभि-या
अभिज्ञ साहेब,
मग आबा पाटीलांचा राग काढण्यासाठी किती सामान्य मराठी माणसांना मारहाण झाली ? (महापौर मोरे व स्थ्लांतरित मराठी समाजातला फरक लक्षात घ्यावा. )
मधे होगेनक्कलचा इश्यु झाला तेव्हा सामान्य तामिळी लोकांना मारहाण न करता होगेनक्कल विवादात कर्नाटकाने आपले हितसंबध जपले यावर ही आपण प्रकाश झोत टाकावा. ( बंगळुरात तामिळी लोकांची ट्क्केवारी लक्षणिय आहे)
बाकिचे काय म्हणतील ,त्यांना काय वाटेल,मिडियामधे आपली इमेज कशि दिसेल ह्याचा विचार क्त मराठी माणुसच करताना दिसतो
मीडीयाचा आपल्यावर होणारा अन्याय पोचवण्यासाठी नीट उपयोग करावा असे सांगितले तर चुकले काय? इथल्या स्थानिक संघटनाही हेच करतात. मीडियाची ताकद ओळखुन त्याला आपल्या फेवर मधे वापरण्यात इथल्या स्थानिक नेतृत्वाची हुशारी नक्कीच आहे. हिन्दी मिडिया पक्ष्पाती आहे पण राजच्या मागील प्रकरणात पूर्ण मराठी समाजाविरुद्ध जी गरळ ओकण्यात आली त्याचा प्रतिवाद करण्यात आपण कमी पडलो ही वस्तुस्थिती आहे.
पण एक मात्र नक्की
आज जे महाराष्ट्रात घडते आहे ते अजुन ५ वर्षांनी कर्नाटक व गुजरात मधेहि घडताना दिसेल.
या गृहितकामधे कर्नाटकी वा गुजराती आपल्यासारखे पाणी डोक्यावरुन जातील तोवर वाट पा।हणारे असे समजलेले दिसते. वस्तुस्थिती तशी नाही.
4 Nov 2008 - 5:01 pm | विकि
भय्या लोकांच्या प्रश्नावर कन्नड रक्षण वैदिकेने जोरदार आंदोलन केलेले होते. याच कन्नड रक्षण वैदीकेने मराठी मुद्यावरून लढणार्या बेळगावच्या महापौराला मारहाण केली होती. ही संघटना भय्यांच्याच नाही तर मराठींच्या ही विरोधात आहे.त्यामुळे तुम्ही त्यांचे उदाहरण येथे द्यायला नको पाहीजे होते.
20 Oct 2008 - 6:11 pm | मी_बोलनार_नाही
बरोबर आहे ...
पन इथे प्रसार माध्यमे पन जबाबदार आहेत ... तुम्ही दिलेले उदाहरण कर्नाटकातील इकडे न्यूज वाल्यानी दाखवले पन नाहि ... जे दाखवतात ते राजकीय हेतूने प्रेरित असाते ...राज बाबतीत तर वाटच बघत असतात ..
19 Oct 2008 - 7:21 pm | स्वामि
त्या अबु आझमि चे थोबाड बन्द करुन दाखवा,ज्याला जि भाशा समजते,त्याला त्याच भाशेत उत्तर दिले पाहिजे.कान्ग्रेस ने लावलेल्या जातियवादि भाण्डणाचा फायदा ह्या भय्या लोकानि घेतला.
19 Oct 2008 - 11:13 pm | विवा
जरा जास्त होतेय. राज ने आव्रर्ते घावे.
19 Oct 2008 - 11:23 pm | विद्य।धर बिवरे
विद्यार्थ्यांनी परिक्षा दीली म्हणजे नोकरी मिळाली असे नाही. मराठी मुलाना पण बाहेर परि़क्षे साठी जावेच लागते हे लक्षात घ्या.
20 Oct 2008 - 12:09 am | सुक्या
आपल्या मराठी लोकांना बंगलोर मधे वगैरे नोकर्यांच्या जागी असेच झोडपले तर चालेल का?
बंगलोर मधे किती मराठी रेल्वे च्या परीक्षा द्यायला जातात? तुला माहीती तंत्रज्ञान कंपन्यांमधे काम करनार्या लोकांविषयी म्हनायचे आहे का? हा मुद्दा खाजगी नाही तर सरकारी नोकर्यांसाठी चालु आहे. खाजगी नोकर्या मुळातच गुनवत्तेच्या आधारावर मिळतात, सरकारी नोकर्या गुनवत्तेवर मिळतात हे फक्त सांगण्यासाठी असते. वर हे लोक इथे येतात ते आपली संस्क्रुती घेवुन. मग हे लोक साम , दाम , दंड , भेद वगेरे वापरुन इथली शांतता भंग करतात. अगदी मागच्या अठवड्यातील उदाहरण घ्या. पुण्यात झेब्रा क्रासींग वरुन मोटारसायकल मागे घे असे सांगनार्या पोलीसाला मारहान झाली. ज्याने मारहान केली तो एक सुशिक्षीत अन नामवंत कंपनीत काम करनारा तरुण आहे. मला सांग ही मग्रुरी कुठुन आली? ही त्यांची संस्क्रुती आहे. हे लोक ज्या घरात खातात त्याच घरात चोरी करतात. ज्याने उपकार केले त्याच्यावरच गुरकावतात. त्यामुळे मला तरी यात काहीही वावगं वाटत नाही.
हे लोक युपी-बिहार मध्ये रेल्वेचे कधी तिकिट काढतात का?
हा त्या राज्याच्या रेल्वे प्रशासनाचा प्रश्न आहे. महाराष्ट्रात त्यांनी तिकीट नाही काढले तर काय करायचे ते करा.
शेजारच्या घरात जर चोरी होत असेल तर 'हा त्या घरमालकाचा प्रश्न आहे' असे म्हननार का? माझ्या घरात जर चोर आला तरच मी पोलिसाला फोन करेन असेच ना?
सुक्या (बोंबील)
मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)
20 Oct 2008 - 9:47 am | मराठी_माणूस
एक उदाहरण घेउ या
एका शाळेमधे वर्ग चालु असताना , एक मुलगा शेजारच्या मुलाला चिमटे कढुन सरखा त्रास देत असतो . दुसरा त्याला तसे न करण्या बद्दल वरंवार सांगतो. पहिला तिकडे लक्ष न देता त्रास देणे चालुच ठेवतो. शेवटी कंटाळुन आणि चीडुन दुसरा उभा रहातो आणि त्या त्रास देणार्याच्या कानाखाली वाजवतो आणि हे सर्व जण पहातात , मास्तरा सगट. मास्तर दुसर्याला मारल्या बद्दल जाब विचारतात, तो सर्व सांगतो. पहिला मी असे काहिच केले नाहि असे सांगतो , ह्या मास्ताराना ते पटते कारण पहिल्याचे चीमटे काढणे कोणालाच दिसलेले नसते. पण दुसर्याच्या वागण्याने मात्र मास्तरांच्या शिकवण्यात खंड पडलेला असतो.
दुसर्याच्या कृतीने झालेला अडथळा सगळ्याना दिसतो , सगळे जण त्यावर बोलतात , तो कस चुकला हे सांगतात पण पहिल्याच्या आगळीकेवर कोणीच बोलत नाहि, कारण त्याचा त्रास फक्त दुसर्याला झाला आहे.
पहील्या उनाड विद्यार्थ्याचा अजुन पर्यंत काहीना त्रास झाला नाही म्हणुन दुसर्याला समजुतीने घे असे सांगण्याचा अधिकार त्याना पोहचत नाही.
त्या उनाड विद्यार्थ्या बद्दल बाकिच्याना माहीत आहे पण ते एकत्र येउन मास्तराकडे दुसर्याची बाजु पटवण्याचा प्रयत्न करत नाहीत .
20 Oct 2008 - 9:56 am | वेताळ
राव जरा ईचार करा की.बेगलरु मध्ये तुम्ही काय सरकारी नोकरी करता जाता काय? खाजगी नोकरयातल्या जागा बद्दल आपण भांडत नाही आहे ,आपण सरकारी नोकरयाबद्दल वाद करित आहात. ज्या त्या राज्यातल्या सरकारी नोकरीत सर्व प्रथम तेथील स्थानिक बेरोजगारांचा हक्क असतो.तसेच युपी-बिहार मध्ये सरकारी नोकरीसाठी कोणी मराठी माणुस जात असेल्(युपीएससी पोस्ट सोडुन) असे मला वाटत नाही.राहिले आपली इमेज टिकवण्याचा प्रश्न .राव आपणच जर ह्यात टिकलो नाही तर आपली इमेज काय जाळायची आहे काय?
काल राजीव शुक्ला नावाचा कॉग्रेस खासदार मुंबई मध्ये म्हणाला छ्टाकपुजा इथे जोरदार पणे करा,सर्व युपी-बिहारीनो मुंबई मध्ये एकत्र या. पुढचा मुख्यमंत्री आपणाला कृपाशंकरशिंह ला करायचं आहे के लक्षात ठेवा.छोट्या मराठी माणसंकडे लक्ष देउ नका.ह्याबद्दल तुम्हाला काय वाटते हे लोक फक्त महाराष्ट्रात पोटापाण्यासाठी येत आहेत?
मराठी माणुस आज पर्यंत हे सगळे सहन करत आला कारण आजपर्यंत त्याला साथ देणारा.मार्गदर्शन करणारा कोणी नव्हता.
शिवाजी महाराजनी महाराष्ट्रासाठी सुरत लुटली ,तेव्हा त्याना लुटारु म्हणणारे महाभाग पण महाराष्ट्रातले वाझोंटे विचारवंतच होते.
( असहाय्य लोकांवर हात उगारण्यात काय मर्दानगी ? पंगा घ्यायचाय तर .. !)
.........
हसु येते हे वाचुन , मराठ्याना मर्दानगी म्हनजे काय ? हे तुमच्या कडुन शिकावे लागणार.एक काम करा ह्याच असहाय्य लोकांबरोबर लॉगरुट्च्या रेल्वे मधुन जनरल च्या डब्यातुन प्रवास करा.मग तिथे मर्दानगी दाखवा तुमची.
वेताळ
20 Oct 2008 - 3:03 pm | अभिरत भिरभि-या
मराठी माणुस आज पर्यंत हे सगळे सहन करत आला कारण आजपर्यंत त्याला साथ देणारा.मार्गदर्शन करणारा कोणी नव्हता.
मित्रा वेताळा;
बाकीच्या प्रत्येक राज्यात परमेश्वराने "मार्गदर्शन क्लासेस " उघडले आणि आपल्या राज्यात काढाय्ला विसरला असे म्हणायचे आहे का?
त्या लोकांनी साथ देणारा/ मार्गदर्शन करणारा वगरे मसिहाची वाट न पाहता एकजुटीतुन वाट सुधारली. आपण तसे का करु नये?
हसु येते हे वाचुन , मराठ्याना मर्दानगी म्हनजे काय ? हे तुमच्या कडुन शिकावे लागणार.एक काम करा ह्याच असहाय्य लोकांबरोबर लॉगरुट्च्या रेल्वे मधुन जनरल च्या डब्यातुन प्रवास करा.मग तिथे मर्दानगी दाखवा तुमची.
गड्या, मर्दानगीच्या नावाखाली तर छत्रपतींनी अफझल्याविरुद्ध मोकळ्या मैदानात लढायला हवे होते. पण छत्रपती वीर होतेच पण त्याशिवाय ते चतुर, मुत्सुद्दी ही होते. म्हणुन तर अफझल्या ठार झाला.
आपण काय शिकलो ? शुन्य !
आज या "दुष्ट"भय्यांना आपंण "जालिम" चोप देऊ. याने तुझ्या रागाचे शमन होईल. पण मुळावर उपाय होणार आहे का ? आज पंजाबच्या लोकसंख्येत भय्या आपल्यापेक्षाही मोठ्या प्रमाणात आहेत. मग तिथे का हे डोके वर काढत नाहीत. कारण पंजाबच्या आर्थिक नाड्या त्यांनी स्वतःच्या हातात ठेवल्यात. पण त्याही पेक्षा पंजाबियत ची अस्मिता आत जागी ठेवलिये.
आपले राज्य गेली ४० वर्षे भारतातील अव्वल राज्य होते. पण आपण ही समृद्धी कमी भोगली.
जर इतरांना मारणे हाच उपाय असता मग १९६० साली पहिल्या शिवसेनेसोबत सारे प्रश्न सुटले असते. किंबहुना १९६० -२००८ आपली परिस्थिती खराबच का होत गेली ?
तात्कालिक कारणांने कोणास मारणे समर्थनीय असेलही पण मुळावर उपाय करण्यासाठी आपल्यात काय बदल करायला हवेत; स्वतःला कसे घडवायला हवे याचा विचार नको ?
20 Oct 2008 - 3:10 pm | मनिष
@ अभिरत - ह्या सगळ्या गदारोळात, आक्रमतेकला तू ज्या चिकाटीने, सेन्सिबल उत्तरे देतो आहेस त्याबद्द्ल कौतुक वाटते. पण वैचारीक विश्लेशण आणि समंजस, समतोल आवाहनापेक्षा भावना भडकवणे सोपे असते, आणि तेच राज किंवा बाळ ठाकरे करतात आनि दुर्दैवाने तरून त्यात वहात्/वहावत जातो. तुझ्या ह्या प्रयन्तांबद्द्ल -
तुम नाहक तुकडे चुनचुनकर दामन मे सजायें बैठे हो,
शीशों का मसिहा कोई नही, क्यों आस लगायें बैठे हो?
20 Oct 2008 - 6:28 pm | वेताळ
पंजाब मध्ये भय्याच्या विरुध्द काहीच चालु नाही हे म्हणणे चुकीचे आहे. आज भैय्या लोकांच्या विरुध्द महाराष्ट्रा,कर्नाटक,तामिलनाडु.आसाम तसेच पंजाब ,हरियाना राज्यात पण असंतोष आहे. तिथे पण त्याना मनसे स्टाईल ने चोप दिला जातो.
राहिला प्रश्न
जर इतरांना मारणे हाच उपाय असता मग १९६० साली पहिल्या शिवसेनेसोबत सारे प्रश्न सुटले असते. किंबहुना १९६० -२००८ आपली परिस्थिती खराबच का होत गेली ?
हो शिवसेना जशी मराठी माणसाच्या हिताचे रक्षण करण्याकरिता स्थापनझाली तसे तिचे कार्य पण चालु होते. मुंबई मध्ये व इतर शहरात तिचे कार्य जोमाने सुरु होते पण ज्यावेळी शिवसेनेने भाजपचे हिंदुत्व पोर दत्त्तक घेतले तशी पहिल्या पोराची आबाळ झाली.मराठीला कोणी वालीच उरला नाही. पण राज ठाकरेनी हाच मुद्दा उचलुन धरला व मनसे ची स्थापना केली. आता शिवसेनेला तिची चुक उमगली आहे पण त्याला उशीर झाला आहे.म्हणुन पुर्वीच जो प्रश्न सुटला असता त्यासाठी नव्या नेतृत्वाची ,नव्या संघटनेची आपल्याला वाट बघावी लागली.
आणखी एक प्रश्न जर का प्रांतवादाचे प्रश्न सांमजसाने सुटले असते तर १०६ जणाना महाराष्ट्रासाठी हुतात्मा व्हावे लागले नसते.
वेताळ
21 Oct 2008 - 9:57 am | अभिरत भिरभि-या
जर इतरांना मारणे हाच उपाय असता मग १९६० साली पहिल्या शिवसेनेसोबत सारे प्रश्न सुटले असते. किंबहुना १९६० -२००८ आपली परिस्थिती खराबच का होत गेली ?
शिवसेनेचा संक्षिप्त इतिहास सांगितल्याबद्दल आभार. पण माझ्या प्रश्नाचा रोख आपल्याला समजलेला दिसत नाही.
मराठी माणसाच्या वेदना आहेत; जुनी जखम/ समस्या आहे पण इतरांना मारणे ही त्यावरील मलमपट्टी आहे.
तुम्ही या मलमामुळे दुखणी काही काळ विसराल पण आर्थिक आघाडीवर असले उपाय दिर्घकाळासाठी निरुपयोगी असतात.
" शिवसेनेचा आवाज"(दहशत) घुमत असताना "मराठी माणसाचा आवाज" (आर्थिक व एकूण प्र्भुत्व) क्षीण होत गेले ही वस्तु स्थिती आहे.
कोणी शिवसेना / मनसे आम्हा पामरांची मुक्तता करेल अशी आशा आपण का धरता? मुळात इतर लोकांनी जर त्यांच्या शिवसेना / मनसे शिवाय मुंबई जिंकली असेल तर तुम्ही का नाही करु शकत?
नेमके सांगतो - "सामाजिक पातळिवरच्या शत्रुचा मुकाबला सामाजिक पातळीवर करावा
आज आपल्याला स्वतःला बदलुन नव्या आर्थिक वस्तु स्थिती शी ओळख करुन ग्यावी; आपली लॉबी बनवावी.
आर्थिक सत्ता ताब्यात घ्यावी. जास्तीत जास्त महत्वाची पदे मिळवावीत. एका रात्रीत होणारे काम नाही. एकजुटीतुन होईल. आपल्याला अशिच चळवळ उभारावि लागेल "
-----------
पंजाब मध्ये भय्याच्या विरुध्द काहीच चालु नाही हे म्हणणे चुकीचे आहे. आज भैय्या लोकांच्या विरुध्द महाराष्ट्रा,कर्नाटक,तामिलनाडु.आसाम तसेच पंजाब ,हरियाना राज्यात पण असंतोष आहे.
भय्याच्या वाढत्या प्रमाणामुळे काही जण अस्वथ असले तरी आज पंजाब ची अर्थ्व्यवस्था आज भय्याच्या मजुरीवर अवलंबुन आहे.
पंजाब्यांनी आर्थिक सत्ता आपल्या ताब्यात ठेवली आहे व बिहारी तिथे केवळ मजुर म्हणुन राहु शकतो. आमच्या राज्यात आम्हीच राजे हा त्यांचा आत्मविश्वास कोठुन आला ?
त्यांनी स्व्तःच्या राज्यात (थोड्याफार प्रमाणावर) आपली लॉबी बनवली . आर्थिक सत्ता ताब्यात घेतली . जास्तीत जास्त महत्वाची पदे मिळवली. हे आपण का विसरतो?
एकदोन बिहार्यांना चोप मिळतो हे मान्य. बिहारी म्हणुन सरसकट चोप मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे.
तुम्ही पंजाब्यांना सांगा की तुम्ही लॉब्या बनवु नका; महत्वाची पदेसोडा फक्त आम्हा मराठांप्रमाणे फक्त सेना स्टाईल चोप देत राहा. आपल्या मराठ्यांच्या एकुण बुद्धीमत्तेवर सरदारजी ही हसतील.
तुम्ही ऊल्लेख्लेल्या राज्यांपैकी आसाम वगळता कोण्त्याही राज्यातील राजकीय नेतृत्व इतक्या उघडपणे "शिवसेना-गिरि" करणार नाहि. जर खरेच इतक्या राज्यात असंतोष असता तर राज्-प्रकरणाला हिन्दी वि अहिन्दी असे स्वरुप आले असते.
भारतीय एकात्मतेचा नारा लावत स्वतःच्या पोळ्या गपचुप भाजण्यात सर्व जण हुषार आहेत. आपण केव्हा शिकणार हा प्रश्न आहे.
बिहार्यांचा त्रास इतरांना झाला नाही अशा थापा ही टाकु नका. कलकत्ता शहर बिहार/झारखंड पासुन अवघ्या काहि तासांच्या अंतरावर आहे. पण "बंगाली ओभिमान" बिहार्यांना कसा पुरुन उरतो ते शिका!
हे आमचे शहर, इथे आम्ही आमच्या भाषेत बोल्णार, आम्च्या लोकांना प्राधान्य मिळणार, एकमेकांना मदत करणार हा त्यांच दृष्टिकोन .. आता मला सांगा ह्या मनसे करायच्या गोष्टी आहेत का समस्त मराठी समाजाने. हे च मी कळ्कळीने सांगु इच्छितोय
आता कलकत्त्यात कोणा बिहारीला चोप मिळत नाही असे मी म्हणणार नाहि. पण तुम्हि याचा जाब जर तिथल्या राजकीय नेतृत्वाल विचारला तर " आमी एई जघन्य कृत्येर निंदा कोरि. कोलकाता सारा भारतबोर्षेर शहर. " असे उत्तर मिळेल. हे राज्कीय नेतृत्व आपल्यापेक्षाही प्रादेशिक आहे पण "खायचे दात व दाखवायचे दात" इतके शहाणपण इथे आहे.
शिवाय स्वतःची एक्जुट ही इतरांना चोप देण्यापेक्षा जास्त फायदेशीर आहे हे तिथल्या सामन्य माणसाला ही समजते पण ह्या साध्या गोष्टि इकडच्या विद्वांनाही समजत नाहित हे दु:ख आहे
21 Oct 2008 - 10:19 am | अभिरत भिरभि-या
आणखी एक प्रश्न जर का प्रांतवादाचे प्रश्न सांमजसाने सुटले असते तर १०६ जणाना महाराष्ट्रासाठी हुतात्मा व्हावे लागले नसते
१०६ जणांनी प्राण वेचले त्या हौतात्म्याचा उपमर्द न करता काही गोष्टींचा सारासार विचार करु.
तामिळ्नाडू / आंध्र तुलनेने कमी श्रमात राज्य बनले. पण आपल्याला इतकी मेहनत का घ्यावी लागली ?
आपली सॉफ्ट पॉवर किंवा उपद्रव क्षमता कमी होती म्हणुन.
आज जर कोर्पोरेट क्षेत्रात वरवरची पदे/ जास्तीत जास्त प्रशासकीय पदे/ जास्त आर्थिक प्रभुत्व यामुळे निर्माण होणारा स्वाभिमान वाढवत गेलो तर साहजिक आपली सॉफ्ट पॉवर वाढेल; जितकी जास्त सॉफ्ट पॉवर पॉवर तितकी कमी मेहनत.
१९६० च्या आंदोलनाचे आपण असे विष्लेषण करावे हे माझे मत आहे.
ताजे उदा:
श्रीलंकेतील तमिळीवर होणार्या अत्याचाराविरुद्ध ता. नाडुने आपली सॉफ्ट पॉवर कशी वापरली हे उत्तम उदाहरण आहे.
--
अवांतर :
आपल्या राज्याचा सुवर्णमहोत्सव जवळ येतोय; गुजरात मधे जोरदार तयार्या सुरु झाल्यात आपण काय करतोय ? न्युनगंडाचे राजकारण !!
20 Oct 2008 - 9:58 am | विजुभाऊ
राज ठाकरेंची भूमीका योग्यच आहे.
नोकरीच्या जहिराती आलेल्या इथल्या लोकाना दिसतच नाहितच्.केवळ परीक्षेला आलेलेल विद्यार्थी दिसतात.
या सगळ्या भय्याना तिकडे नोकरी मिळत नाही.
त्यांचे पुढारी छट पूजा इथे येऊन करतात.
कधीकधी महाराष्ट्राने असली गुलामगिरी सहन करण्यापेक्षा सरळ सरळ वेगळे व्हावे
20 Oct 2008 - 11:44 am | llपुण्याचे पेशवेll
खरे आहे विजुभाऊंचे. शेवटी चिड येऊन असे म्हणणे भाग आहे.
पुण्याचे पेशवे
20 Oct 2008 - 11:44 am | llपुण्याचे पेशवेll
खरे आहे विजुभाऊंचे. शेवटी चिड येऊन असे म्हणणे भाग आहे.
पुण्याचे पेशवे
21 Oct 2008 - 10:34 am | अभिरत भिरभि-या
चिड येऊन असे म्हणणे भाग आहे हे एक वेळ मान्य केले तरी भारत नावाच्या राष्ट्रसमुहात राहणे आपल्याला एकुण आर्थिक/ सामरिक / आंतर-राष्ट्रिय जास्त फायदेशीर आहे.
शिवाय उद्या आपला वेगळा देश झाला तरी भांडणे संपणार आहेत का ?
भय्या वि. मराठी ची जागा "मराठा वि मराठेतर" किंवा "प. महा वि इतर" घेणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे.
मराठीच खेकड्यासारखे पाय ओढतात म्हणुन दु:खी ही होऊ नका. सगळिकडे तीच बोंब आहे.
कर्नाटकात "लिंगायत वि. वक्कलिग" किंवा "मुंबई कर्नाटक वि जुने म्हैसुर संस्थान" असे झगडे सुरु होणार. राजस्थानात "राजपुत्-बनिया" वि मीणा/दलित वा मारवाड वि मेवाड अशी मारामारी सुरु होईल.
सध्याचे दुखणे बरे होण्याजोगे आहे. फक्त हताश/ निराश न होता रामदास-स्वामींचा मंत्र आचरावा -
"केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे"
20 Oct 2008 - 10:09 am | वेताळ
रेल्वेची परिक्षा देणारे ,घेणारे व त्यात पास होणारे (त्याना पास करणारे) सगळे युपी-बिहारवालेच आहेत. आपली मुले जरी परिक्षेला बसली तरी ती पात्र होत नाहीत,त्याच्या कडे गुणवत्ता असुन देखिल.म्हणुन इथे होणारया परिक्षेत फक्त मराठी व स्थानिक रहिवाश्याना बसता यावे ह्यासाठी हा सगळा खटाटोप चालु आहे.
वेताळ
20 Oct 2008 - 10:26 am | sanjubaba
विजु भो........शी १०१% सहमत.........
मराठी च्या हितासाठी.......अस्तित्वकारिता......!
20 Oct 2008 - 10:33 am | वेताळ
बी.इ होऊन सुद्दा मराठी मुल दारोदार सेल्समन बनुन फिरतात हे मी स्वतः पाहिले आहे..
निदान पोटासाठी काम तरी ते करतात.
आणि अक्षरशः मोजके शिकलेले गुज्जु - माडू लाखो करोडो कमावताना ही पाहिले असेल ना? स्वतः धिरुभाई किती शिकले होते ?
मित्रा मग गुजरात,राजस्थान मध्ये सगळे लोक कोट्याधिश,निदान लक्षाधिश असले पाहिजेत.मग हे गुज्जु/मारवाडी महाराष्ट्रात किडुकमुडुक धंदे का करत बसतात? आईस्क्रिमचे गाडे घेउन का फिरत असतात?धिरुभाईने पैसा मिळवला त्याच गुजरात मध्ये पोरीना पोटासाठी विकणारे महाभाग आहेत की.
महाराष्ट्रात धीरुभाई सारखे कोणी मराठी उद्योगपती नाही आहेत का? ज्याला त्याला त्याच्या कुवती प्रमाणे काम व पैसा मिळत असतो.
इथे कोण मसिहाची वाट बघत बसले नाहीत. तेवढी मराठी माणसात अक्कल आहे.
वेताळ
20 Oct 2008 - 11:03 am | टुकुल
ज्यांना हे बरोबर वाटले नाही त्यांना मला विचारायचे आहे कि तुम्हि मराठी लोकांसाठी आतापर्यंत काही केले आहे का? लोकांसाठी सोडा हो, एका माणसा साठी तरी काही केले आहे का? असेल तर तुम्हाला चुक का बरोबर बोलायचा हक्क आहे. जे काही झाले ते पण करायला हिम्मत लागते , स्वताच्या घरात आरामात बसुन हे चुकिच हे बोलायला काही नाही लागत. तुम्हाला हे बरोबर वाटत नसेल तर तुम्ही शांत बसा कारण बोट दाखवण्याव्यतिरिक्त तुम्ही काही करु शकत नाही.
जे घडत आहे त्याला पाठींबा द्यायचा नसेल तर निदान त्याच्या विरोधात तरी पाठींबा उभा करु नका. आपल्यामधली एकजुटतेची कमतरता ही अजुन वाढवु नका. अहो त्या परप्रांतीय तरुणांचा विचार करण्याच्या आधी आपल्या तरुणांचा करा कि विचार. आपण सर्वानी जरा विचार केला आणी एक एका माणसाला जरी मदत केली तरी खुप बदल होइल. (मदत नेहमी पैशाचीच लागते असे नाही). मि स्व:ता सुरुवात केली ती, इथल्या रिक्त जागेसाठी ५-६ उत्तर-दक्षिण भारतीयांना डावलुन मराठी मुलाची निवड करुन आणी ज्याची निवड केली त्याला मि सांगनार आहे कि ह्याची परत फेड अश्याच प्रकारे कर. (ज्यांना माझ हे वागण चुकिच वाटत आहे त्यानी जरा सभोवताली बघाव, तरीही मि चुक दिसल्यास शांत बसावे मला उगाच विरोध करु नये)
>>>पण त्यांच्या या धोरणामुळे परप्रांतात नोकरीवर असणार्या महाराष्ट्रातल्या माणसाचा जीव नक्कीच खालीवर करत असेल्
अश्या लोंकाच प्रमाण अस बर किति आहे, आणी तिकडे आपल्या लोकांच काही झाल्यास त्यांच्या लोकांच इथ काय बर होईल (ते प्रमाण किती आहे बघा कि जरा).
(Something is always better than nothing)
टुकुल.
20 Oct 2008 - 1:46 pm | mina
टुकुल्..जी,
ज्यांना हे बरोबर वाटले नाही त्यांना मला विचारायचे आहे कि तुम्हि मराठी लोकांसाठी आतापर्यंत काही केले आहे का? लोकांसाठी सोडा हो, एका माणसा साठी तरी काही केले आहे का? असेल तर तुम्हाला चुक का बरोबर बोलायचा हक्क आहे. जे काही झाले ते पण करायला हिम्मत लागते , स्वताच्या घरात आरामात बसुन हे चुकिच हे बोलायला काही नाही लागत. तुम्हाला हे बरोबर वाटत नसेल तर तुम्ही शांत बसा कारण बोट दाखवण्याव्यतिरिक्त तुम्ही काही करु शकत नाही.
या आपल्या वक्तव्यावर माझा आक्षेप आहे.आपण मराठी माणसांसाठी काही केले तरच आपल्याला काही बोलायचा अधिकार आहे हे कोणत्या कायद्यात लिहले आहे. तुम्ही ५-६ मराठी माणसांना नोकरीवर घेतले याबद्दल आपलं अभिनंदन पण त्यांना नोकरी दिली म्हणून तुम्ही दुसर्यांना वाट्टेल तसे बोलावे हे एका मराठी माणसाच्या तत्वात बसत नाही.माफ करा तुम्हाला माझा राग येईल पण,महाराष्ट्र म्हणजे जिथे माणुसकी नांदते ते राज्य..असा नावलैकीक आहे महाराष्ट्राचा. आदरतिथ्य ही संस्कती केवळ आपल्या मराठीमातीतच बघायला मिळेल.माणसं जोडण्याचं काम मराठी माणूसच करू शकतो.छत्रपती शिवाजीमहाराजांचे कार्य आठ्वा जरा..! राज ठा़करे सोबत माझं काही वैयक्तिक वैर नाही.तो मराठी माणसासाठी जे करतोय त्याला खरोखर हिंमतच लागते.म्हणून मनसेच्या लोकांनी माणूसकी सोडून त्या परप्रांतियांना जनावरासारखे मारुन पिटाळून लावणे हे योग्य आहे का?त्यांना दमदाटी करुनही वापस पाठविता आले असते.या सर्वांचा परिणाम काय झाला ,अखेर महाराष्ट्रत माणूसकी उरली नाही असेच ताशेरे ओढ्ल्या जात आहे ना!
लोकशाही आहे भारतात्..प्रत्येकाला आपले विचार मांडण्याचा अधिकार आहे येथे ! आम्हीही मराठीचं आहोत. घरात बसलो असलो तरी समाजाचा जागरुक नागरिक म्हणून जे चूक आहे त्याला चूकच म्हणणार.येथे कुणावर बोट दाखविण्याचा प्रश्नचं उरत नाही.
20 Oct 2008 - 3:16 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
मीना आणि अभिरतशी सहमत.
असेल तर तुम्हाला चुक का बरोबर बोलायचा हक्क आहे. जे काही झाले ते पण करायला हिम्मत लागते , स्वताच्या घरात आरामात बसुन हे चुकिच हे बोलायला काही नाही लागत.
याचा अर्थ असाही घ्यायचा का की जे लोक मिपावर किंवा कुठेही लिहू शकत नाहीत त्यांनी इतरांच्या लिखाणावर (चांगल्याही अर्थाने, विधायक) टीका करु नये? आणि अमुक एक गोष्ट पटली नाही असं बोलण्याचा अधिकार प्रत्येक माणसाला आपल्या देशात आहे; तुम्ही काही करत नाही तर बोलू नका हा दृष्टीकोन फारच संकुचित आहे; दहावी-बारावीतल्या मुलाला आई अभ्यास कर म्हणून बोलते, तिला मुलानी "तू स्वतः अभ्यास कर मग बोल", असं ऐकवायचं का?
आणि अभिरत म्हणत आहे त्याच्याशी संपूर्ण सहमती: मराठी माणसाला कष्ट करायला कोणी थांबवलं आहे का? एक अविनाश धर्माधिकारी आय.ए.एस. ची तयारी करुन घेतात. असे आणखी किती मराठी लोक महाराष्ट्रात इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षांसाठी मराठी मुलांसाठी तयारी करवून घेतात?
जाहिराती फक्त उत्तर भारतीय वृत्तपत्रात छापून येत असतील तर हा प्रश्न वेगळाच आहे, पण जर एंप्लॉयमेंट न्यूज पेपरात या जाहिराती येत असतील आणि तरीही मराठी मुलं या परीक्षांसाठी येत नसेल तर या असल्या आंदोलनांना काही अर्थ नाही.
20 Oct 2008 - 3:25 pm | मनिष
आणि जर करायचेच असेल आंदोलन तर रीतसर ऍडमिट कार्ड असलेल्या मुलांना मारण्याऐवजी जाहिरात देणार्या अधिकार्यांच्या समोर निदर्शने करावीत (मारझोड नाही). ती मुले इथे कायदेशीर परीक्षा द्यायला आली होती.
अवांतर - साधारणपणे शहरी महाराष्ट्रीयन मुलांना अशा सरकारी नोकर्यात फारसा रस नसतो, त्यपेक्षा काम तसा दाम, मेरीटवर प्रवेश आणि कार्यक्षमता असणार्या खाजगी उद्योगांमधे जास्त रस असतो. सरकारी नोकर्यांचे ग्लॅमर उत्तरेत जास्त आहे.
20 Oct 2008 - 11:57 am | सुक्या
टुकुल, तुझ्या विचारांशी मी सहमत आहे.
सुक्या (बोंबील)
मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)
20 Oct 2008 - 2:24 pm | वेताळ
मराठी माणसावर.वर जो धीरुबाय चा किस्सा लिहिला आहे त्याने गुजरात मध्ये नाही तर महाराष्ट्रात पैसे कमावले आहेत्.दुसरा अमिताभ बचपन इथे महाराष्ट्रात राहुन पैसे कमावले. आता त्याला युपी मध्ये दम आहे असे स्वप्न पड्ते. युपी मध्ये असता तर म्हशीवरुन फिरला असता.
लालु यादव ...जनावराच्या चारयात पैसे खाल्ले. म्हणजे ह्याना जनावर माणुस ह्यात फरक नाही. जनावराना दमदाटी करुन चालत नाही.त्याना काठीचा एक तडाखा द्यावाच लागतो.
लोकशाही आहे भारतात्..प्रत्येकाला आपले विचार मांडण्याचा अधिकार आहे येथे ! आम्हीही मराठीचं आहोत. घरात बसलो असलो तरी समाजाचा जागरुक नागरिक म्हणून जे चूक आहे त्याला चूकच म्हणणार
हे तरी तुम्हाला पटते. पण हेच त्या तुमच्या युपी-बिहारयाना कळत नाही.राज ठाकरेने त्याचे मत मांडले तर त्याच्या केस केली.राज ठाकरे वर भाषन बंदी घातली. मग त्यावेळी आपल्यातला जागरुक नागरिक काय करत होता? आपला निषेध कुठे दिसला नाही.
वेताळ.
20 Oct 2008 - 4:13 pm | अभिरत भिरभि-या
मराठी माणसावर.वर जो धीरुबाय चा किस्सा लिहिला आहे त्याने गुजरात मध्ये नाही तर महाराष्ट्रात पैसे कमावले आहेत्.दुसरा अमिताभ बचपन इथे महाराष्ट्रात राहुन पैसे कमावले. आता त्याला युपी मध्ये दम आहे असे स्वप्न पड्ते. युपी मध्ये असता तर म्हशीवरुन फिरला असता.
हो. माझ्या महाराष्ट्रातच असे वातावरण होते. मराठी लोकांच्या सामाजिक सुधारणेत तोड नाही. आजही गुंतवणुकदारांच्या पसंतीत हेच राज्य क्रमांक एक वर आहे.
पण मग घरासमोर लक्ष्मी - रिद्धि - सिद्धि असे दोन्ही हस्तांनी असे पाणी भरत असताना आपण मराठी असे करंटे का राहिलो ? का नाही उचलला संधीचा फायदा ? जर ही लोक बाहेरुन येऊन करु शकत असतील तर मग तुम्ही तुम्हच्याच घरात का करु शकत नाही ?
आत्म्परिक्षण करा. स्वतःला बदला. एकजुटिने राहा.
--
वेताळ शेठ, आमचा धिरुभाईवाला किस्सा बराच झोंबलेला दिसतोय. दहा ठिकाणी उल्लेख केलात. काय करता राव; शेवटी फ्याक्ट इज फ्याट. डोळे मिटुन कुठे लपणार आहे ते.
20 Oct 2008 - 2:46 pm | विसोबा खेचर
या रेल्वे भरतीबद्दल महाराष्ट्रातील एकाही वर्तमानपत्रात जाहिरात आली नव्हती असे कळते. म्हणजे मराठी मुलांना या नोकर्यांबद्दल समजूही नये असा हलकटपणा रेल्वे बोर्डावरच्या यूपी-बिहारी भैय्यांनी केला.
सोनिया गांधींच्या पदराला धरून महाराष्ट्रात वावरत असलेले विलास देशमूख, नारायण राणे यांसारखे अभिमानशून्य नेते, तसेच आम्हा बारवाल्यांना मारे कायदा आणि न्याय शिकवणार्या आबा पाटलांना रेल्वे बोर्डाचा हा हलकटपणा, अन्याय दिसला नाही! या पार्श्वभूमीवर मनसेने जे केले ते अत्यंत योग्यच होते...!
या साल्या महाराष्ट्राद्वेष्ट्यांना असेच फोडून काढायला पाहिजे.
आमचा मनसेला पूर्ण पाठिंबा आहे....
तात्या.
20 Oct 2008 - 2:49 pm | मदनबाण
आमचा मनसेला पूर्ण पाठिंबा आहे....
आमचाही....
मदनबाण.....
"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda
4 Nov 2008 - 7:29 pm | गचपनढवळ्या
माझ्या मते...जर राज ठाकरे साहेबानी...एवढा ओरड करण्या पेक्शा जर Ek AathavDa aadhi Marathi Jananche prabodhan kele aste tar aaj Nationwide Marathi maaNasaacha VegaLa Chitra Disla Asta...
Maharashtra has lost Assertive intellectuals ase vaaTu Laagale Aahe...
aapaN Sahakar ChaLavaLiche So called Janak Aahot...Aaplya Marathi Kalakaranni PathanaTya Vaigare Karun hya Raj-KaraNaa palikaDchya Prashnanna Saad Ghaatli tar Lokanna raj che MhanaNe patel
Chanakyane mhatale aahe
Saam
Daam
DanD
Bhed
DanDavar Direct Jaau Naye...Purta Vichka Hoto Kaaryaacha
Jai Maharashtra !!!
20 Oct 2008 - 2:48 pm | घाशीराम कोतवाल १.२
तुम्हाला या बिहारी युपि वाल्यांचा त्रास झाला का?
नाहि ना मग कशाला राज साहेबां बद्दल बोलताय आहो
जरा मुंबई च्या रस्त्यावरुन फिरा मग कळेल तुम्हाला किति मनस्ताप देतात हे लोक
मी आता तसा कोतवाल नाही बरं?
20 Oct 2008 - 3:07 pm | उदय जाधव
माझा मनसेला पूर्ण पाठिंबा आहे. आता खुप झाले आता रस्त्यावर उतरा मराठी माणसासाठी लढा.
कारण ,जनावराना दमदाटी करुन चालत नाही.त्याना काठीचा एक तडाखा द्यावाच लागतो.
राज साहेब आम्हि तुमच्याबरोबर आहे
जय महाराष्ट्र
20 Oct 2008 - 3:10 pm | भोचक
थोडं हेही वाचा.
http://marathi.webdunia.com/newsworld/currentaffairs/manthan/0810/20/108...
(भोचक)
आमचा भोचकपणा इथेही सुरू असतो...
http://bhochak.mywebdunia.com/
20 Oct 2008 - 3:30 pm | mina
मराठीबद्द्ल त्यांचे प्रेम मला मान्य आहे.पण ते प्रेम व्यक्त करण्यासाठी त्यांनी चालवलेली तोड्फोड न पटणारी आहे.
माझ्या या वाक्यातुन मी मनसे च्या विरोधात आहे असे वाटत असेल तर चुक करत आहात आपण्.राज ठाकरे यांना मी प्रत्यक्षात एकले आहे.त्यांचे विचार मला पटतात.म्हणूनच मी म्हटलं आहे राज ठाकरे खरोखर हुशार आणि परखड बोलणारा वक्ता आहे. मी राज ठाकरे वा त्याच्या लढाईच्या विरोधात नाही.त्याच्यासारखा तरुण राजकारणात असणे आज गरजेचे आहे. आण्णा हजारे ही हेच म्हणतात की,समाजात राहतांना, आपल्या माणसासाठी लढतांना आपण नेमक्या कोणत्या मार्गाने जायचे हे समजुन घेण्याची राज ठाकरे यांना गरज आहे. जे जे समाजसुधारक आहेत त्यांना राज ठाकरेंविषयी निश्चितच आपुलकी आहे. त्यांचे प्रत्येकजण कैतुकच करतात्.फक्त त्यांच्या तोडफोडीवर नाराजी व्यक्त करतात्.काहीतरी कारण असेलच या मागे..!!कोणतं कारण असेल बरं ?मला तुम्हीच सांगा.
20 Oct 2008 - 3:34 pm | मनिष
आणि समजा जर तुला नसतील पटत, तू जर त्यांच्या विरोधात असशील तरीही तुझी मते स्पष्टपणे मांडण्याचा तुला पुर्ण हक्क आहे.
20 Oct 2008 - 3:33 pm | मराठी_माणूस
ज्यांना आपण आपल्या तर्फे बोलण्याचे अधिकार दिले आहेत आणि जे दिल्ली व मुंबईत (खुर्च्या उबवत) बसले आहेत ते का मुग गिळून गप्प आहेत , का एक ही जण लालुला ह्या बाबतीक जाब विचारत. कारण त्यांची मुले बाळे सुखात आहेत म्हणून ?
अशा वेळेस ज्याना त्याची झळ पोहचते त्याना मात्र सबुरीने घेण्याचा उपदेश. व्वा रे व्वा!!!
20 Oct 2008 - 3:37 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
ज्यांना आपण आपल्या तर्फे बोलण्याचे अधिकार दिले आहेत आणि जे दिल्ली व मुंबईत (खुर्च्या उबवत) बसले आहेत ते का मुग गिळून गप्प आहेत , का एक ही जण लालुला ह्या बाबतीक जाब विचारत. कारण त्यांची मुले बाळे सुखात आहेत म्हणून ?
मग त्यांना बोला ना! ना कोणी नेत्यांना जाब विचारत, ना कोणी मराठी मुलांसाठी विधायक गोष्टी करत ....
अशा वेळेस ज्याना त्याची झळ पोहचते त्याना मात्र सबुरीने घेण्याचा उपदेश. व्वा रे व्वा!!!
... मग साप सोडून भुई धोपटू नका एवढं सांगितलं तर का एवढा सात्त्विक संताप येतोय?
20 Oct 2008 - 3:50 pm | मराठी_माणूस
त्या गेंड्यांच्या कातडीच्या राज्यकर्त्याना 'नाक दाबले की तोंड उघडायचीच' भाषा समजते त्याला काय करणार. ह्या मधे त्या 'नाकाला' त्रास होत आहे त्याला नाईलाज आहे.
आपण परीक्षा द्यायला महाराष्ट्रात जात आहोत , तिथे फक्त आपल्याकडीलच लोक आहेत, स्थानीक कोणीच नाहीत हे समजण्या इतके ते भय्ये काही ईनोसंट नाहीत.
20 Oct 2008 - 3:55 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
आपण परीक्षा द्यायला महाराष्ट्रात जात आहोत , तिथे फक्त आपल्याकडीलच लोक आहेत, स्थानीक कोणीच नाहीत हे समजण्या इतके ते भय्ये काही ईनोसंट नाहीत.
घटनेने त्यांना इथे नोकरी करण्याचा अधिकार कमी दिलेला नाही त्यामुळे चूक त्यांची नाहीच आहे. आणि ज्यांची चूक नाही त्यांना मारणंही योग्य आहे असंच तुम्हाला वाटत असेल तर मी माझ्याकडून विषय संपवत आहे.
चालू द्या तुमचं!
21 Oct 2008 - 8:01 am | मराठी_माणूस
घटनेने त्यांना इथे नोकरी करण्याचा अधिकार कमी दिलेला नाही
घटनेने लालू ना मात्र पुर्ण मुभा दीलेली आहे , ती म्हणजे, रेल्वेत महाराष्ट्रात पदे भरायची आहेत तर जाहीरात महाराष्ट्रातील लोकाना ताकस तूर लागु न देता फक्त बिहार, युपी, मधल्या पेपर मधे द्यायची
20 Oct 2008 - 4:00 pm | दीपक गुप्त
लोकाना नाही सरकारला दनका द्यावा
दीपक गुप्त
20 Oct 2008 - 10:18 pm | कशिद
मी मनसे च कर्यकर्ता आहे..आनि म न वी से चा पद आधिकरि आहे .....
मला खुप बरवत्ल कि तु महि राज साहेबा बदल सकरत्मक बोल्त आहत...
धन्यवाद!!!!
(मनसे प्रेमी) कशिद
21 Oct 2008 - 1:59 am | राम दादा
मी कामावर निघालो होतो..गाडी होती ९.४३ ची ठाणे - वाशि ..१० नंबर प्लॅटफॉर्मवर आलो..सरळ चालत चालत प्लॅटफॉर्मच्या शेवटच्या टोकापर्यंत गेलो..तिथे जवळ जवळ ३० पेक्षा जास्त मुले मला झोपलेली दिसली मी सहज विचारले " अरे काय मित्रांनो विशेष काय आहे का..एवढेजन ईथे का झोपला आहात्..आणि कोठुन आला आहात..."
पण कोनीच उत्तर दिले नाही ..मला वाटले मराठी समजत नसेल ..मी हिंदित विचारले..."कहा जा रहे हो भाई" त्यापैकी एकजन हसत होता..माझी उडवण्याचा प्रयत्न करत होता..मला राग आला..पण मी पुन्हा विचारले..कहा से आए हो.? मी त्यांना प्रामाणिकपणे विचारत होतो...आणि ते साले माझी थट्टा करत होते..त्यात एकजन म्हणाला परिक्षा के लिये आए हैं मी विचारले कैसी परिक्षा..तो म्हणाला रेल्वे भरती है..च्यायला म्हणलं..आम्हाला कसे काय माहित नाही भरत्तीबद्द्ल ..आणि हे लोक युपी मधुन ईथे भरतीसाठी आले.???तोप्रर्यंत मला आंदाज आला होता कि सगळे भैया लोक आहेत्...मला असा राग आला होता तुम्हाला सांगतो..वाटले आपल्या मनसे च्या मित्रांना बोलवुन ह्यांचा चोप काढुया...त्यांनी माझा आपमान केला होता..पण तेव्हढ्यात गाडी आली..आणी राग मनातच ठेवुन मी निघुन गेलो..आणि दुसर्या दिवशी समजले.. शेवटी साल्यानी मार खाल्लाच्..मला वाटते हेच कारण असावे..माझ्यासारखे कोणीतरी दुसर्याने विचारले असणार्..आणि ह्या फंटर लोंकानी त्याचा पण आपमान केला असावा..फरक एवढाच कि मी कामावर निघालो होतो...आणि दुसरा घरी निघाला असणार्...त्याने हे सगळे मित्रांना सांगितले असणार्..आणि मग दिला चोप मार्!!! हे त्यांच्या वागणुकीमुळे त्यांना मिळालेले फळ म्हणता येईल...
जय महाराष्ट्र..
राम दादा.
21 Oct 2008 - 10:09 am | विसोबा खेचर
सहमत आहे!
या यूपी बिहारच्या मुजोर चूतमारिच्यांना झोडूनच काढले पाहिजे!
तात्या.
21 Oct 2008 - 11:10 am | मदनबाण
ठाणे तर दुसरे युपी झाले आहे !! जिकडे बघाव तिकडे भय्येच भय्ये,साला पुर्वी हे भय्ये बायका पोरे गावी ठेवत आणि वर्षातुन एकदा दोनदा स्वतःच्या मुलुख ला जात्,आता सर्व कुटुंब पोर बाळ इथच घेऊन येतात !!!
ठाण्याला आता या टोळधाडीतुन वाचवले पाहिजे.!!!!
मदनबाण.....
"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda
21 Oct 2008 - 4:10 am | भास्कर केन्डे
ही घ्या... या भैय्यांनी घटनेतच मेख मारलेली आहे...
http://saamana.com/2008/Oct/21/Link/Main7.htm
ता.क. सामना वरील लेखांना युनिकोडात कसे करावे याबद्दल कोणी माहिती देऊ शकेल का?
आपला,
(मर्हाटी) भास्कर
21 Oct 2008 - 7:16 am | सुहास
अखेर राज याना अटक (म. टा.)
21 Oct 2008, 0312 hrs IST,
हिंमत असेल तर अटक करून दाखवा... असे आव्हान देणा-या राज ठाकरे यांना मंगळवारी पहाटे रत्नागिरीच्या सरकारी विश्रामगृहात अटक झाली. रत्नागिरी ग्रामीण आणि मुंबई पोलिसांच्या पथकाने संयुक्तपणे ही कारवाई केली.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3621841.cms
--- सुहास