मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मनसेचं आणखी एक आंदोलन..!!

mina · · काथ्याकूट
मनसेनं पुन्हा परप्रांतीयांवर आपली चढाई केली. मुंबई-कल्याण येथे आज रेल्वेची परिक्षा देण्यासाठी काही परप्रांतीय तरुण आले होते.महाराष्ट्रात होऊ घातलेल्या या परिक्षेला मराठी तरुण अत्यल्प होते.पहीले महाराष्ट्रातल्या तरुणांना नोकरी द्या.या मागणीवरुन सदर आंदोलन करण्यात आले.त्यांनी चक्क त्या परप्रांतीय तरुणांना पळवून लावले आणि परिक्षेच्या ठिकाणी सवयीप्रमाणे तोड्फोड करुन मराठीला न्याय मिळावा अशी घोषणाबाजी केली. मनसेचं हे धोरण मराठी माणसाला कितपत न्याय देऊ शकेल हे माहीत नाही,पण त्यांच्या या धोरणामुळे परप्रांतात नोकरीवर असणार्‍या महाराष्ट्रातल्या माणसाचा जीव नक्कीच खालीवर करत असेल्.मराठीबद्द्ल त्यांचे प्रेम मला मान्य आहे.पण ते प्रेम व्यक्त करण्यासाठी त्यांनी चालवलेली तोड्फोड न पटणारी आहे.स्वतः बद्दलचा धाक जनतेच्या मनात निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे असे मला वाटते.राज ठाकरे खरोखर हुशार आणि परखड बोलणारा वक्ता आहे.मात्र त्याची सत्ता जनचेच्या मनात काय स्थान मिळवेल याबाबत मला साशंकता आहे.

वाचन 18870 प्रतिक्रिया 0