श त्रू

दत्ता काळे's picture
दत्ता काळे in जे न देखे रवी...
18 Oct 2008 - 8:21 pm

घाटामधल्या वाटेवरती
तो गोसावी बसतो
मारून हाक, दावून धाक
नजरेत विखारी हसतो

खोचून त्रिशूल वाटेवर पसरे
अर्धफाटकी भगवी छाटी
चावुन दात, धावून जात
निष्पाप जनांच्या पाठी

मी जाई जेव्हा घाटामधूनी
भित भित वेगात,
हटकून मारील, वाटे मजला
अन् लोळवील क्षणात

आज ही असला दिवा भितीचा
क्षण आला एकांती,
पण मी
चालत जाईन वाटेवरुनी
दगड दुधारी घेऊन हाती

हळूच पाहिले, धीर करुनी
निजलेल्या त्या राक्षसाकडे
पण,
धुळ माखला चेहरा दिसला
थिजले डोळे, तोंड वाकडे

फाटुन गेल्या छाटीवरती
त्रिशूल वाकूनी पडला होता
पोटामधूनी निघुनी पाठी
रक्ताचा ओघळ अडला होता

मी हळहळलो, नकळत माझ्या
गालावरुनी अश्रू गेला ?
घाटावरच्या वाटेवरचा
यार अनोखा अन् शत्रू गेला

कविता

प्रतिक्रिया

चन्द्रशेखर गोखले's picture

19 Oct 2008 - 9:45 am | चन्द्रशेखर गोखले

शेवटच कडव भावुक करुन जात .. छान कविता.

चन्द्रशेखर गोखले's picture

19 Oct 2008 - 9:45 am | चन्द्रशेखर गोखले

शेवटच कडव भावुक करुन जात .. छान कविता.

मदनबाण's picture

19 Oct 2008 - 11:55 am | मदनबाण

छान कविता..

मदनबाण.....

"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda

मनीषा's picture

19 Oct 2008 - 12:24 pm | मनीषा

कविता आवडली