कां कोण जाणे पण परत
उंबरठा बांधायची हिंमतच
होत नाहीये
----
न जाणो ती अंगणातली
फुलदाणी घरात परत
आलीचं नाही तर?!
----
मग वाटतं बरं झालं
उंबरठा वाहून गेला
कच्चाच होता नाहीतरी
----
तुझी डायरी तेवढी
बाहेर काढून वाचायची
अनिवार इच्छा होतेय
किमान ती अलमारी तरी
शांत होईल... एकदाची !
----
देवघरासमोरच्या समईत
तेल घातले
वाटले
ज्योतीची घालमेल थांबेल
पण...
----
काल नाही समजले
पण
त्या उंबरठ्याबरोबर
"शुभ - लाभ" लिहीलेल्या
रांगोळीच्या ओळीही
वाहून गेल्या
हे आज लक्षात आले
----
पावसाची वाट बघतोय
काल रात्रीपासून
पडलाचं नाहीये
----
तुझी डायरी वाचतांना
कां कोण जाणे
सारखं धुक दाटतयं
डोळ्यांसमोर
----
बरं झालं
उंबरठा वाहून गेला
कच्चाच होता नाहीतरी
|- मिसळलेला काव्यप्रेमी -|
(०७/०७/२०१४)
प्रतिक्रिया
7 Jul 2014 - 1:17 pm | एस
हा भाग पहिल्या कवितेपेक्षा जास्त छान आहे.
7 Jul 2014 - 4:52 pm | प्रीत-मोहर
अगदी हेच आणि असच.
7 Jul 2014 - 1:21 pm | स्पा
जब्र्यादस्त
7 Jul 2014 - 1:29 pm | प्यारे१
तू लई बेक्कार हायेस मिक्या. :(
7 Jul 2014 - 1:57 pm | धन्या
निशब्द !!!
7 Jul 2014 - 2:35 pm | अत्रुप्त आत्मा
.... :(
7 Jul 2014 - 4:13 pm | प्रचेतस
पुन्हा एकदा अतिशय सुरेख.
7 Jul 2014 - 4:36 pm | ज्ञानोबाचे पैजार
कशाला रे असल काहीतरी जीव घेणं लिहीतोस मिका.
आता उगाच दिवसभर हुरहुर लागुन रहाणार
पैजारबुवा,
7 Jul 2014 - 4:47 pm | डॉ सुहास म्हात्रे
सुंदर !
9 Jul 2014 - 2:40 pm | सूड
हुरहुर लावणारं....तरीही मनाच्या एका कोपर्याशी मिळतं जुळतं काहीतरी वाचल्यासारखं वाटलं. *good*
9 Jul 2014 - 11:48 pm | कवितानागेश
चरचरतेय ही कविता.....
10 Jul 2014 - 7:31 am | चाणक्य
काळजाला हात घालणारं लिहीतोस लेका
10 Jul 2014 - 7:32 am | चाणक्य
काळजाला हात घालणारं लिहीतोस लेका
15 Jul 2014 - 9:51 am | अनिदेश
पहिल्या कवितेपेक्षा जास्त छान...!