सर्व मिपाकरांस जाहीर कळवण्यात येते की आमचे येथे श्रीकृपेकरून दिनांक ८ नोव्हेंबर २००८ रोजी दक्षिण कॅलिफोर्नियाचा मिपा कट्टा करण्याचे योजिले आहे....
कट्टा श्री. डांबिसकाका यांचे घरी करण्याचे घाटत आहे....
डांबिसकाकांतर्फे या कट्ट्यासाठी मिसळपाव (अर्थातच!!) पुरवला जाईल....
प्राण्यांची प्रेते खाणार्यांसाठी काहीतरी कोंबडं/ बकरं मारलं जाईल....
उपलब्धतेनुसार मासळीही आणायची योजना आहे....
येणार्यांपैकी कुणी फक्त गवत खाणारे असल्यास (आणि त्याची आगावू सूचना दिल्यास!!) त्यांचीही उत्त्तम सोय केली जाईल! (काकूने जंगी बेत करायचं मनावर घेतल्यावर मी कोण पामर नाही म्हणणार?:))
घास घशाखाली उतरावेत यासाठी घशाला वंगण म्हणून वाईन, बियर तसेच अल्कोहोल नसलेली शीतपेयेही डांबिसकाकांतर्फे पुरवली जातील...
जर तुम्ही काकांशी गोड वागलात तर न जाणो, कदाचित शिवास रीगलच्या बाटल्याही उघडल्या जातील...
:)
या समारंभाला आमचे स्नेही श्री. नंदन यांनी आपल्या उपस्थितीने शोभा आणण्याचे कबूल केले आहे ही आमच्यासाठी अतिशय भाग्याची गोष्ट आहे! (प्रभूजी, तुम नंदन, हम पानी!!!:))
भाग्यश्री, घाटावरले भट या जवळपास रहाणार्या लोकांनाही यायला जमेल अशी आशा आहे....
आणखी कोणी मिपाकर, जर आपण येऊ शकत असाल तर जरूर कळवा, सर्वांचे त्यांच्या कुटुंबियांसकट स्वागतच होईल...
कार्य सिद्धीस नेण्यास श्री मिसळदेवी समर्थ आहेच.
तरी आपल्या उपस्थितीने आम्हाला उपकॄत करावे ही विनंती.....
आपले,
श्री. पिवळा डांबिस.
सौ. पिवळा डांबिस
कु. सवाई डांबिस
प्रतिक्रिया
17 Oct 2008 - 11:34 pm | बिपिन कार्यकर्ते
काका, कट्ट्याला पूर्ण शुभेच्छा. मस्त मजा करा. या वेळी व्यवस्थित व्हिडिओ रेकॉर्डिंग पण करा. फोटो-गिटो काढा.
बिपिन.
17 Oct 2008 - 11:34 pm | यशोधरा
वा, वा! मज्जा आहे की!!
17 Oct 2008 - 11:38 pm | भाग्यश्री
वा.. निमंत्रण पत्रिका जोरदार आहे !! खाण्याचा बेत तर त्याहुन!! =P~
सद्ध्यातरी जमू शकेल असं वाटत आहे.. नक्कीच येऊ आम्ही दोघं.. :)
17 Oct 2008 - 11:55 pm | संजय अभ्यंकर
आगामी मिपा कट्ट्या साठी शुभेच्छा!]
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/
17 Oct 2008 - 11:54 pm | बेसनलाडू
जमल्यास फोन वरून किंवा निरोपकावरून हजेरी लावेन. जोरदार होऊन देत!
(दूरस्थ)बेसनलाडू
18 Oct 2008 - 8:48 am | पिवळा डांबिस
यायला जमतंय का बघा!
येतांना त्या मिलिंदालाही घेऊन या....
आदल्या रातीच शुक्रवारी या, तुमच्या रहाण्याची सोय करूयात की....
तुम्ही आलांत तर खुप आनंद होईल बघा.....
18 Oct 2008 - 11:40 am | नंदन
म्हणतो. बेला, सर्किटकाका :), एक, नाटक्या असे बे एरियातले मिपाकरही आले तर अजून मजा येईल
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
17 Oct 2008 - 11:56 pm | प्राजु
शुभेच्छा या कट्ट्यासाठी..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
18 Oct 2008 - 5:16 am | टारझन
असेच म्हणतो
- (सर्वचापी) टार्जू
http://prashantnimbalkar.blogspot.com
17 Oct 2008 - 11:57 pm | रेवती
जंगी कट्टा होणार तर!!:)
बघ प्राजु आपली कट्ट्याची तारिख म्हणून पुढे ढकलत होतीस तर...
आता एकाच दिवशी पूर्व व पश्चिम किनारा कट्टे होणार असं दिसतयं.
आम्ही मेन्यू आत्ताच सांगणार नाही. ;) (आमचा तरी कुठं ठरलाय नक्की, सारखा सरखा बदलतोय.)
रेवती
18 Oct 2008 - 3:30 am | घाटावरचे भट
सध्या तरी जमेल असं वाटतंय. सबब मी एण्याचे नक्की करत आहे.
(कट्टेकरी) भटोबा
18 Oct 2008 - 8:50 am | पिवळा डांबिस
तुला राईडची सोय आहे का?
नसेल तर नंदनला कॉटॅक्ट कर.....
तू त्याच्या वाटेवरच आहेस, तो तुला राईड देईल बघ....
18 Oct 2008 - 10:16 am | घाटावरचे भट
येस सर!!! नंदनसायबाला विनंती करण्यात येईल....
--आपलेच (आणि घाटावरचे) भट...
उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद
18 Oct 2008 - 11:41 am | नंदन
विनंती वगैरे काय हो, भटसाहेब. एकत्रच जाऊ.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
18 Oct 2008 - 3:43 am | शितल
काका,
निमंत्रण पत्रिका वाचुन कट्टा अगदी मिसळी सारखा होणार दिसतो. :)
रेवती म्हणते त्या प्रमाणे आम्ही ही त्या दिवशी कट्टा करायचे ठरविले आहे.
पण आमचा कट्टा ऐन दिवाळीचा मुहुर्तावर ही होऊ शकतो. :)
(अवातंर - भाग्यश्री, पिडाकाकुच्या हातचे पदार्थ नुसती खाऊ नको कसे केले सगळी माहिती घेऊन ये. )
18 Oct 2008 - 3:58 am | विसोबा खेचर
डांबिसा,
घाटत असलेल्या मिपा कट्ट्याबद्दल वाचून खूप आनंद वाटला रे! माझ्याही अनेकानेक शुभेच्छा..!
कट्ट्याचा प्रस्ताव कुणालाही मोह पडावा असाच लिहिला आहेस! :)
घास घशाखाली उतरावेत यासाठी घशाला वंगण म्हणून वाईन, बियर तसेच अल्कोहोल नसलेली शीतपेयेही डांबिसकाकांतर्फे पुरवली जातील...
जर तुम्ही काकांशी गोड वागलात तर न जाणो, कदाचित शिवास रीगलच्या बाटल्याही उघडल्या जातील...
अरे काय रे हे? सार्या दुनियेला दारू वाटत सुटला आहेस! तात्याची साधी आठवणदेखील आली नाही का? :(
हरकत नाही! आता रागावल्यामुळे मालकी हक्क दाखवून मी देखील एक हुकूम काढतो..
"सदर कट्ट्याला मिपा कट्टा असे नाव द्यायचे असेल, तसेच त्याचे निमंत्रण व वृत्तांत जर या संकेतस्थळावर द्यायचा असेल तर सदर संकेतस्थळाच्या मालका घरी एक शिवास रिगलची बाटली हप्ता म्हणून पोहोचती करावी..!" :)
तात्या.
18 Oct 2008 - 5:26 am | baba
"सदर कट्ट्याला मिपा कट्टा असे नाव द्यायचे असेल, तसेच त्याचे निमंत्रण व वृत्तांत जर या संकेतस्थळावर द्यायचा असेल तर सदर संकेतस्थळाच्या मालका घरी एक शिवास रिगलची बाटली हप्ता म्हणून पोहोचती करावी..!"
;)
माझ्या शुभेच्छा या कट्ट्यासाठी..
...बाबा
18 Oct 2008 - 9:40 am | पिवळा डांबिस
सार्या दुनियेला दारू वाटत सुटला आहेस!
अरे नाही, तसं नाही!! आम्ही कुठे बाहेर हाटेलात भेटलो असतो तर ठीक होतं......
पण आता त्यांना माझ्या घरीच बोलावलंय तर काय तुम्ही आपापली मदिरेची बाटली घेऊन या म्हणून सांगू? ही पोरं आपल्याला आदराने काका म्हणतात! आता त्यांना त्यांची मदिरा तुम्हीच घेऊन या म्हणून सांगितलं असतं तर आपल्या काकापणाची काय इज्जत राहिली असती, सांग पाहू.....
:)
तात्याची साधी आठवणदेखील आली नाही का?
बस्स काय? हीच किंमत केलीस काय आपल्या स्नेहाची? अरे पण तुला आणि भारतातल्या इतर मित्रांना बोलावलं असतं तर तो केवळ मानभावीपणा ठरला नसता काय?
साल्यो, तुमच्या मैत्रीपायी तर मिसळपाववर आहे.......
आणि तात्या, तू दिल छोटा कशाला करतोस? आपण मुंबैत येऊ तेंव्हा आपण जंगी पार्टी करूयात की!!!
शिवास रीगल काय, मुम्बैतही कशी पैदा करायची हे आपल्याला ठाऊक आहे....
:)
कट्ट्याचा प्रस्ताव कुणालाही मोह पडावा असाच लिहिला आहेस!
बाबारे, तो कायस्थी आग्रह बरे! मला काकूनं निक्षून सांगितलं," तुझा तो टिपिकल बामणपणा करू नकोस! मला लोकांना घरी बोलवायचं आणि त्यानाच एक्-एक पदार्थ करायला सांगायचा (इथे पॉटलक म्हणतात त्याला!!!) हे पसंत नाहिये!!! माझ्या घरी पाहुणे येणार तर काय करायचे ते पदार्थ मी करेन,माझे हात काही मोडले नाहियेत!!!!"
बाबारे, कायस्थांचा जावई व्हायचं म्हणजे काही-काही मूलभूत बदल करावे लागतात!!!!:)
सदर संकेतस्थळाच्या मालका घरी एक शिवास रिगलची बाटली हप्ता म्हणून पोहोचती करावी..!"
हुजुरांचे चरणी बाटली पोहोचती केली जाईल, चिंता नसावी...
:)
18 Oct 2008 - 11:12 am | रामदास
तूळ राशीच्या माणसाच्या वागण्यात एक समतोल असतोच.
उदा: पोरांना पाजल्याशिवाय आपण प्यायची नाही.
18 Oct 2008 - 2:21 pm | ऋषिकेश
=)) =))
पिडाकाका,
कट्ट्याला माझ्याही अनेक शुभेच्छा!.. फोटु आणि सविस्तर वृत्तांताबरोबर विडियोही येऊ देत.
-('मिसळ'लेला) ऋषिकेश
19 Oct 2008 - 1:22 am | विसोबा खेचर
हुजुरांचे चरणी बाटली पोहोचती केली जाईल, चिंता नसावी...
धन्यवाद शेठ! तुम्ही मनापासून एवढं बोललात, बास! आमचा काकबळी आम्हाला मिळाला! :)
अरे डांबिसा, आमच्या सिंगलमाल्ट परिवारातलीही एखादी बाटली उघडा रे! लेको, पहिल्या सिपमध्येच तात्याला दुवा द्याल..:)
माझ्याकडे एक ग्लेनमोरांजी पेटीपॅक पडली आहे. धाडून देऊ का बोल?! :)
असो, कट्टा बाकी जोरदार होऊ द्या.. आमच्याही मनापासून शुभकामना.. :)
आपला,
(सिंगलमाल्ट परिवारातला) तात्या.
--
आज आमचा शनिवार! नुकताच एका आवडत्या स्त्रीसोबत पीटर्स स्कॉटचे दोन पेग मारून जीवनात यशस्वी होऊन आलो आहे! हां, आता आमच्या या यशामागे पीटर्स स्कॉट आहे, की ती बया आहे, हे मात्र माहीत नाही! :)
20 Oct 2008 - 6:55 pm | ऍडीजोशी (not verified)
बाटली आली की कळवा :)
21 Oct 2008 - 12:10 am | विसोबा खेचर
हो, नक्की..! :)
आपला,
(बाई-बाटलीतला) तात्या.
20 Oct 2008 - 6:55 pm | ऍडीजोशी (not verified)
बाटली आली की कळवा :)
18 Oct 2008 - 7:31 am | झकासराव
काकानु,
कट्ट्याला शुभेच्छा!
होउन जाउ दे जोरदार. :)
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao
18 Oct 2008 - 10:09 am | मदनबाण
पिडा काका कट्ट्यासाठी शुभेच्छा !!!
मदनबाण.....
"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda
18 Oct 2008 - 11:43 am | घासू
मिपा कट्ट्यासाठी हर्दिक शुभेच्छा!!
कट्टा जोरदार होणार यात श॑काच नाही.
आम्ही इमाराती (यु.ए.ई) वाले मिपाकर मनाने कट्ट्यावरच असू आणी प्राण्यांची प्रेते खाणार्या॑पैकी आम्ही आहोत तरी कोंबडया॑ची त॑गडी आमच्या नावाने बाजुला टाकावी ही नम्र विन॑ती.
लोभ असावा
घासू
18 Oct 2008 - 6:11 pm | विजुभाऊ
डाम्बीस काका
विजुभौ ;धमु( दुकटा) अन्द्या , टारु ,१_६ यमी ; दाढे डॉ ( हे गाणी गातात व फावल्या वेळेत लोकांचे दात कोरतात) ; भडकमकर मास्तर ( हे ही तसेच. फाक्त नाटके करतात) इनोबा ;डॉन्या हे सगळे हजर रहाणार आहोत. सदेह.
मुम्बैहुन चार्टर फ्लाईट बघुन ठेवली आहे. (व्हीसा आयोजीत करावा . येण्याचे कारण फॉर डुइंग कट्टा असे लिहु शकता)
दाढे डॉक्टर , धमाल , विजुभौ हे विमानात करमणूकीचे कार्यक्रम सादर करुन प्रवास खर्च गोळा करु शकतील अशी काहितरी शक्कल लढवा
18 Oct 2008 - 8:11 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
मुम्बैहुन चार्टर फ्लाईट बघुन ठेवली आहे. (व्हीसा आयोजीत करावा . येण्याचे कारण फॉर डुइंग कट्टा असे लिहु शकता)
दाढे डॉक्टर , धमाल , विजुभौ हे विमानात करमणूकीचे कार्यक्रम सादर करुन प्रवास खर्च गोळा करु शकतील अशी काहितरी शक्कल लढवा
माझं (जुनं) नाव घातलंत, भरून पावले!
पण ... चार्टर फ्लाईटात करमणूकीचे कार्यक्रम केले तर प्रवासखर्च सुटेल असं का वाटलं तुम्हाला? काही गोंधळ होत आहे तुमचा.
अवांतरः विप्रकाका, मेघना आणि माझा बिटर हाफ, अभिर, यांची नावं न घातल्याबद्दल तुमचा जाज्ज्वल्य निशेद आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा!
18 Oct 2008 - 8:14 pm | सखाराम_गटणे™
आम्ही पण येउ
18 Oct 2008 - 7:14 pm | विनायक प्रभू
http://vipravani.wordpress.com/
विजुभाई ने चार्टर मध्ये माझे नाव घातले नाही. म्हणून माझ्या नावाने ४ थेंब शिवास चे प्रोक्षण सोडा. आमचा आत्मा शांत होईल.
अवांतरः सवाई डांबिसाचे वय काय. क्रिकेट मध्ये घालतात तसे पॅड घेउन ठेवा. छोटी कंपनी मिडल स्टंप उडवण्यात आनंद मानतात.स्वानुभवावरुन सांगतोय. काकुंचे कुंकु बळ्कट म्हणुन जिवंत आहे.
18 Oct 2008 - 10:55 pm | चतुरंग
निमंत्रण पत्रिका छानच आहे कट्ट्याची! अतिशय अगत्याने तुम्ही बोलावले आहे त्याबद्दल धन्यवाद!!
प्राण्यांची प्रेतं आणि मादक पेयांपासून आम्ही दूर रहात असलो तरीही आम्ही आपल्यापासून सहज ड्रायविंगच्या अंतरात असतो (५ ते ६ तास) तर कट्टा चुकवला नसता हे नक्की! ;)
सर्व कट्टेकरींना शुभेच्छा. जोरदार कट्टा होऊदे, गाणी-गिणी रेकॉर्डिंग करा, भरपूर फोटू-गिटू काढा.
मस्तपैकी सचित्र रिपोर्ट येऊदेत! वाट पहातो आहोत.
(खुद के साथ बाता : रंग्या, हे पिडाकाका प्रकरण तसं हौशी दिसतंय बरं का! कधीतरी भेटायला हवं खरं, त्यांनी आमंत्रणही दिलं आहे आता योग कधी येतोय ते बघायचे.)
चतुरंग
19 Oct 2008 - 12:09 am | टुकुल
निमंत्रण पत्रिका खुपच छान आहे, काका आणी काकुंनी जबरा उत्साह दाखवला आहे.
जवळपास असतो तर नक्कि आलो असतो (आम्ही पडलो इकडे टेक्सस मधे, ना धड इस्ट कोस्ट ना वेस्ट कोस्ट). सर्व कट्टेकरींना शुभेच्छा..
(खुद के साथ बाता : रंग्या, हे पिडाकाका प्रकरण तसं हौशी दिसतंय बरं का! कधीतरी भेटायला हवं खरं, त्यांनी आमंत्रणही दिलं आहे आता योग कधी येतोय ते बघायचे.)
सहमत. बघुया आमच्या नशिबात कधी योग येतो :W
कांकांचा पुतणा,
टुकुल.
19 Oct 2008 - 3:49 am | नदीकिनारा
कुठे आहे हा कट्टा? आमची अगदी अताच नजर पडली ह्या मिसळ पाव वर..आम्ही असतो नदीकिनारी..म्हणजे दक्षिण कॅलिफोर्निया मध्येच..
19 Oct 2008 - 12:55 pm | दत्ता काळे
मिपा कट्ट्यासाठी हर्दिक शुभेच्छा!!
22 Oct 2008 - 9:32 am | एकलव्य
ऐष करा लेको!
22 Oct 2008 - 10:54 am | मनस्वी
* दक्षिण कॅलिफोर्निया मिसळपाव कट्ट्याला शुभेच्छा *
००००मनस्वी ०००
22 Oct 2008 - 9:21 pm | प्रभाकर पेठकर
दक्षिण कॅलिफोर्निया मिसळपाव कट्ट्यास मनःपूर्वक हार्दीक शुभेच्छा. मजा करा.
कधी काळी जमल्यास मारू एखादी चक्कर कॅलिफोर्नियात तेंव्हा 'स्पेशल' कट्टा करू.
जांभया टाळण्याचा जालीम उपाय.....झोपा