एक बीचारे आण्णा

लीलाधर's picture
लीलाधर in जे न देखे रवी...
28 Nov 2011 - 8:23 am

एक बीचारे आण्णा, पोटात घेत नव्हते अन्नाचा दाणा,
भ्रष्टाचार मुक्त करिन म्हणाले देश माझा शाहाणा.

आण्णांच्या सभेला माणसं यायची खूप,
भ्रष्टाचारी मात्र प्यायचे एसी मध्ये बसुन हॉट सूप,

पीउन झाल्यावर सूप बोलायचे खूप,
फोन आहे, वीज आहे, दूध आणि पाणी आहे,
ह्या सार्र्या कारभाराचं मंत्रालयातच मंत्र्यांच मंडळ आहे,
म्हणून आण्णा आमची इथे चंगळ आहे, आमच्या द्रूष्टीनं मात्र तुमचं बोलणं वंगाळ आहे.

भर सभेतून उठला एक शाहाणा, अहो आण्णा देश होईल शाहाणा,
पण कोण वीकत घेईल मी बनवलेल्या चांदीच्या वाहाणा?
कोण जाईल शिर्डीला, कोण जाईल तिरुपतीला,
मी मात्र जाईन लवकरचं, वैकुंठाला.

आण्णा तुम्ही करताय सारं काही नीट, पण मला नाही वाटत,
ढासळून पडेल भ्रष्टाचाराची एखादी तरी वीट, एखादी तरी वीट.

करुणकविता

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

28 Nov 2011 - 8:42 am | प्रचेतस

भ्रष्टाचारी मात्र प्यायचे एसी मध्ये बसुन हॉट सूप,

इथे 'भ्रष्टाचारी मात्र प्यायचे एसी मध्ये बसुन होडन सावर सूप' हे लै भारी वाटलं असतं.

किसन शिंदे's picture

30 Nov 2011 - 11:15 am | किसन शिंदे

मी सुध्दा हेच म्हणणात होतो

छान आहे कविता.. आम्हालाही अगदी असंच वाटतं बघा... म्हणुनच देश सुधारावा असं वाटत असूनही आम्ही उपोषणाला वगैरे बसत नाही. ;)

मदनबाण's picture

28 Nov 2011 - 9:21 am | मदनबाण

छान कविता... :)

अविनाशकुलकर्णी's picture

28 Nov 2011 - 6:22 pm | अविनाशकुलकर्णी

२७ तारखेस अण्णा उपोश्णास बसणार..जर मना सारखे जन लोकपाल विधेयक मंजुर केले नाहि तर..

कॉंग्रेस ची टर्टर फाडतिल अंण्णा..

या वर्षातिल जगातले सर्वात लोकप्रिय व्यक्तिमत्व म्हणुन टाईम्स मा्सिकाने अण्णांची निवड केली असुन त्यांचे फोटो व लेख सा-या जगात गाजणार..

अंण्णा भ्र्ष्ट आहेत..हुकुम शहा आहेत...घटना विरोधि आहेत ...म्हणणा-यांची तोंडे काळी ठिक्कर पडणार..

मै भी अंण्णा..तु भी अंण्णा अब तो सारा देष है अंण्णा..नारा भारत भर गुंजणार...

अंण्णाची चापट भ्रष्ट खाणार..
एकहि मारा मगर सोलिड मारा.....असे म्हणत भ्रष्ट गाल चोळत बसणार...

सूड's picture

30 Nov 2011 - 10:12 am | सूड

छान लिखा हय चचा !!

मीनाक्षी देवरुखकर's picture

30 Nov 2011 - 10:41 am | मीनाक्षी देवरुखकर

अशि काय कविता?

अत्रुप्त आत्मा's picture

5 Dec 2012 - 1:59 pm | अत्रुप्त आत्मा

अरे...........च.चा....तुझी हीच खमंग जिलबी वाचायची राहिलि होती रे इथे,,, ;-) काय कडी पाडलीयेस ना पण... ;-) व्वा...व्वा....व्वा.....! http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing002.gif

आमच्या आडनावभगिनी अंमळ रुष्ट दिसतायेत चचाकृत जिल्बीवर. ;)

लिलाधर यांची ही वास्तवदर्शी कविता. परवा निखळानंद यांची कविता वाचली आणि त्या काव्यशैलीवरुन चाणक्याच्या चतूराईने लिहीलेल्या या कवितेची आठवण झाली.

अत्रुप्त आत्मा's picture

30 Jun 2014 - 12:50 pm | अत्रुप्त आत्मा

सध्या..च.चा.काव्यमोहोत्सव सुरु आहे काय? :D :p

दिनेश सायगल's picture

30 Jun 2014 - 1:39 pm | दिनेश सायगल

हे प्रतिभावंत कवी हल्ली मीपावरून अचानक अदृश्य का झाले आहेत?

निखळानंद's picture

30 Jun 2014 - 4:06 pm | निखळानंद

आत्ता कळले माझ्या 'नवा भिडू' वरील प्रतिक्रीये मधील 'लिल्या sssssss' अश्या आरोळी मागचे कारण.
एखादी कविता वाचून त्यावरुन ३ वर्षा पूर्वी दुसर्या एखाद्याने लिहिलेल्या कवितेची आठवण यावी म्हणजे धन्यच आहात तुम्ही धन्याजीराव..

अजून 'च.चा.' ही भानगड मात्र कळली नाही अतृप्त आत्म्यानुं.
स्नेहांकिता ताईंनी सुधा उल्लेख केला होता याचा.
माझे शंका समाधान कराल काय ?

लिलाधर म्हंजेच चचा ऊर्फ चतुर चाणक्य.

निखळानंद's picture

30 Jun 2014 - 4:17 pm | निखळानंद

हळू हळू रुळेनच इथल्या गोष्टी कळायला..

निखळानंद's picture

30 Jun 2014 - 4:10 pm | निखळानंद

दुसर्या हा शब्द 'दुसर्‍या' असा व्यवस्थीतपणे लिहिण्याची सोय का नाही आपल्या मिपा वर ?
असेल तर कोणी त्या बाबतीत मार्गदर्शन करेल काय ?

निखळानंद's picture

30 Jun 2014 - 4:13 pm | निखळानंद

मी अन्य site वर 'दुसर्या' type करून इथे कॉपी केला होता पण प्रकाशीत केल्यावर तोही भलताच झाला वर..

ओ तात्या, क्रोमवर बघा बरं!! क्रोमवर तुम्हाला कदाचित ते 'दुस-या' असं दिसेल. (हा 'दुस-या' मी हायफन वापरुन लिहीलाय).

निखळानंद's picture

30 Jun 2014 - 4:44 pm | निखळानंद

हायफन ची कल्पना भारीच !!

भिकापाटील's picture

30 Jun 2014 - 10:13 pm | भिकापाटील

=))
कवीवर्यांनी बरीच निर्मिती करुन ठेवलेली दिस्ते.

स्पा's picture

11 Aug 2014 - 12:50 pm | स्पा

अप्रटीम रचना