जेट एअरवेजने परवाच्या दिवशी घेतलेला ८०० कामगार कपातीचा निर्णय काल रात्री मागे घेतला. जेट व्यवस्थापनाने परवा तडकाफडकी ८०० कामगारांना काढण्याचा निर्णय घेतला. बहुतेक कामगार प्रोबेशन पिरियड वर होते, त्या सर्व कामगारांनी श्री. राज ठाकरेंन कडे धाव घेतली. मुंबईत श्री. छगन भुजबळ यांच्या वाढदिवसा निमीत्त बडे - बडे नेते उपस्थित होते, तरीहि जेट कामगारांनि श्री. राज ठाकरेंची भेट घेतली. राज यांनी जेट व्यवस्थापनाला जाहीर ईशारा दीला. म.न.से. चे शिष्टमंडळ काल जेट व्यवस्थापनाला भेटले त्यावर त्यानी २ दिंवसांची मुदत मागितली. त्या नंतर काल रात्री जेट एम. डी. श्री. गोयल यांनी सर्व कामगार म्हणजे माझा परीवार आहे, त्यांना कामावरुन काढल्यापासून आपल्याला मानसीक त्रास झाला व हा निर्णय आपल्या गैरहजेरीत घेतला गेला असे सांगुन सारवासारव केली व सर्व कामगारांना परत सेवेत सामावुन घेतले.
ह्या बातमीच्या अनुषंगाने काही नवी समीकरणे / प्रश्न निर्माण झाले त्यावर चर्चा - संवाद - विचार अपेक्षीत आहे.
१) राज ठाकरे यांच्या ईशा-या नंतर जेट एअरवेज ची तिकीटे रद्द व्हायला सुरुवात झाली त्यामुळे श्री. गोयल राज बरोबर सतत संपर्कात होते. त्याचेच पर्यवसन म्हणजे कामगार कपातीचा निर्णय मागे घेतला. एकुण काय मनसे स्टाईल दणका दील्याशीवाय कोणीही सुधारत नाही मग तो बच्चन परीवार असो वा ईंग्रजी पाट्या लावणारा दुकानदार असो. मग मनसे करते ते बरोबर आहे का ? आज अचानक राज ठाकरें भोवतालचे वलय वाढलेय. जेट कामगारांचे सरासरी वय २०-२५ आहे त्यानी मुंबईत शरद पवार, नागरी उड्डान मंत्री प्रफुल पटेल उपस्थीत असताना देखिल त्याना न भेटता, युवा नेते राज यांची भेट घ्यावी. का त्याना असे वाटले ? ८०० पैकी ४०-५० फक्त मराठी आहेत मग ह्या अमराठी लोकांना आज राज ठाकरेंचा का आधार लागला? आणी हाच चिंतेचा विषय आहे शिवसेनेचा. जेट युनीयन शिवसेनेची पण कुरघोडी मनसे ची.? शिवसेनेच्या सुरवातीच्या काळात श्री आदरणीय बाळासाहेबांनी गिरणी कामगारांच्या मुद्दयाला हात घालुन शिवसेना बळकट केली होती. त्यावेळेपासुन आत्ता -काल परवा पर्यंत युवा पिढीचे आशास्थान - स्फुर्थीस्थान शिवसेना होती, मग आता असे काय झाले की युवा पिढीला मनसे जवळ वाटायला लागली? युवा पिढीला आक्रमक पणा खुप भावतो, एक घाव दोन तुकडे, आर या पार ची भाषा त्याना खुप आवडते. पण आता सळसळणा-या रक्ताला वाट मनसे कडेच मिळते असे का?
२) सध्या मंदीचा काळ आहे, कंपन्याना तगुन राहण्यासाठी कॉस्ट कटिंग करावी लागतेय. महाराष्ट्रात विजटंचाई, पाणीटंचाई व दंगल सद्रुश परीस्थीती आहे. नवीन गुंतवणुकदार महाराष्ट्रात येण्यास ऊत्सुक नाहीत अशा परीस्थीत प्रस्थापित कंपन्यांवर जेट शह-काटशह चे राजकारणा चे काय परीणाम होतील.
३) सर्वात महत्त्वाचे हिंदी मीडीया जेट बाबतीत राज ठाकरेंचे यश खुल्या मनाने स्विकारतील की परत एकदा आपल्या बातम्या एडीट करुन दाखवतील ?
प्रतिक्रिया
17 Oct 2008 - 12:34 pm | llपुण्याचे पेशवेll
जेट मधले कमी करण्यात आलेले कामगार कुठल्या दर्जाचे(डेसिग्नेशन) होते. जर ते बॅगा उचलणारे, ट्रॉल्या ढकलणारे, विमाने स्वच्छ करणारे असतील तर उत्तम. अन्यथा फ्लाइंग स्टाफ मधले जे लोक आधीच महिन्याला लाखानी पगार घेत होते त्याना काढले तर मनसेला पुळका यायचे कारण काय? असा प्रश्न मला पडला आहे. :)
पुण्याचे पेशवे
17 Oct 2008 - 12:58 pm | मनिष
का??? फक्त कमी पगारवाल्यांचा नोकरीवर हक्क असतो का? जे लाखोंनी कमावतात त्यांनी त्यासाठी मेहनत घेतली असते आणि पात्रता सिद्ध केली असते. बाकी राजकीय पक्षांना पुळका येण्याचे कारण एका शब्दात सांगायचे झाले तर - शक्तिप्रदर्शन!!!
मला वाटते अशा निर्णयांमधे राजकीय पक्षांचा हस्तक्षेप नसावा!
17 Oct 2008 - 12:49 pm | गणा मास्तर
काढले होते काही चुकी नव्हती केली. सगळे हंगामी काम्गार होते. त्याच्याबरोबर्च्या कंत्राटात 'कामावरुन कधीही कमी केले जाउ शकते ' असे कलम असेलच,
आता सगळीच कंपनीच बंद झाली नाही म्हणजे मिळवली
- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)
17 Oct 2008 - 1:19 pm | अनामिका
श्री तुम्हांला जे प्रश्न पडलेत तेच मलाही पडलेत.
राज जर युवकासाठी नविन प्रेरणास्त्रोत ठरणार असतिल अतिशय आनंदाची बाब आहे.
काल चक्क मराठी अस्मितेच्या विषयावर आंदोलन करणार्या राजला गुंड ,प्रांतवादी ,प्रसंगी दहशतवादी देखिल ठरवुन मोकळ्या झालेल्या हिंदी वृत्तवाहिन्यांनी राजच्या या सडेतोड भुमिकेचे स्वागत केले असेच् म्हणावे लागेल्.परप्रांतिय व मराठी अस्मितेचा मुद्दा उपस्थित केला म्हणुन खलनायक ठरवुन बहिष्कृत केला गेलेला राज आज एकदम नायक कसा झाला?.पण हा करिष्मा आहे राजच्या सडेतोड बाण्याचा आणि एक घाव दोन तुकडे करण्याची धमक स्वतमधे बाळगुन असल्याचा.शेवटि म्हणतात ना "लातों के भुत बातों से नही मानते" त्याच प्रमाणे ज्याला ज्या पद्धतीची भाषा कळते त्याला त्याच भाषेमधे समज देणे यात गैर ते काय?
सगळ्यात महत्वाचे राजने "बोले तैसा चाले "या उक्तिप्रमाणे स्वतचे वागणे कायम ठेवले.हिंदी व इंग्रजी वृत्तवाहिन्यांना मुलाखत देताना त्याने कसलीही भिड न बाळगता मायमराठीतुन मुलाखत दिली त्याची ही कृती बरच काही सांगुन जाते.राज कडुन महाराष्ट्रातल्या तथाकथित स्वतला थोर म्हणवुन घेणार्या नेत्यांनी बरेच काही शिकण्यासारखे आहे.पवार ,राणे ,गुलछबू विलासराव ,आबा यांसारख्या स्वतला मराठा म्हणवुन घेण्यात धन्यता मानणार्या नेत्यांनी राज कडुन मराठा आणि मराठी अस्मिता म्हणजे काय ?याचे धडे घ्यावेत.काल या पिवळी पत्रकारीता करणार्या हिंदी व तत्सम इतर सर्व वृत्तवाहिन्यांनी उद्धव यांची देखिल मुलाखत घेतली होती.पण उद्धव यांनी "एनडिटीव्ही इंडिया" ला मुलाखत देताना हिंदी भाषेचा प्रयोग केला हे मनाला खटकले पण त्याच वेळी मनस्वी राजला मराठीतुन मुलाखत देताना बघुन अतिशय आनंद झाला.मराठी बाणा म्हणजे काय हे काल राजने स्वतच्या कृतीतुन लोकांच्या निदर्शनास आणुन दिले.
जेट्च्या कर्मचार्यांसाठी आंदोलन करताना त्याने त्या कर्मचार्यांमधे मराठी माणसांची संख्या किती ?हे न बघता सगळ्यांसाठीच आवाज उठवला.आणि म्हणुनच काल दिल्लीत देखिल "मनसे आणि राज झिंदाबाद "च्या घोषणा घुमल्या.अल्पावधित राजला मिळालेले हे यश खरच वाखाणण्यासारखे आहे.जेट कर्मचार्यांना न्याय मिळवुन देण्याचे श्रेय भले कोणालाही मिळो ?पण आपला मराठी बाणा जपणारा राज मात्र आज युवकांच्या मनात घर करुन गेलाय हे मात्र नक्की.
जय हिंद !
जय महाराष्ट्र!
राज व उद्धव यांचे मनोमिलन व्हावे या प्रतिक्षेत असलेली"
"अनामिका"
17 Oct 2008 - 2:01 pm | llपुण्याचे पेशवेll
राज व उद्धव यांचे मनोमिलन व्हावे या प्रतिक्षेत असलेली
मलाही असेच वाटते.
पुण्याचे पेशवे
17 Oct 2008 - 6:01 pm | श्री
+१००
दिल्ली चे ही तख्त राखीतो महाराष्ट्र माझा
18 Oct 2008 - 4:28 pm | kundan dhamane
marathi mansasathi raj thakre aani oudhav thakre yani ektra yave.(nana patekar yanni sudha ase mhatle aahe.) karan shevthi marathi manusach marathi mansacha kami yeto.
18 Oct 2008 - 10:23 pm | अन्वय
इथे लिहिलेल्या प्रतिक्रिया आणि वृत्तपत्रातल्या प्रतिक्रिया वाचून नेहमी वाटते की राज आणि उद्धव यांनी एकत्र यावे, अशी लोकांची इच्छा का आहे? दोघेही मराठी माणसाच्या मुद्द्यावर लढत आहेत. ठीक; पण संघटना चालविताना -विशेषत: एकचालकानुवर्ती संघटना- कोणाची क्षमता काय, याची दखल पक्षाच्या सर्वोच्च नेत्याने घ्यायला हवी. राज यांचे व्यक्तीमत्व आक्रमक, तर उद्धव यांचे मवाळ आहे. ही संघटना प्रबोधनकार, बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या त्या वेळच्या सहकाऱ्यांनी स्थापन केली आहे. या दोघांचीही प्रकृती आक्रमकच होती. प्रबोधनकार तर बाळासाहेबांपेक्षा जहाल बोलायचे, लिहायचे. त्यांनी एकदा एका प्रकरणावरून शाहू महाराजांवर परखड टीका केली होती. मग अशा संघटनेची धुरा कुणाच्या हातात जायला पाहिजे?
शिवसेना जर आक्रमक आहे, तर तिला त्याचा पद्धतीने चालविली पाहिजे. आणि असे करायचे नसेल, तर शिवसेनेची कॉंग्रेस झालेली पाहायला निश्चितच कोणालाही आवडणार नाही. हा विचार संघटनात्मक पातळीवर कधीच झाला नाही. "मला नेहमी डावलले गेले, माझ्या कार्यकर्त्यांवर अन्याय करण्यात आला,' असे राज यांनी जाहीरपणे सांगितले आहे. त्याच वैतागातून त्यांनी शिवसेना सोडली. हा त्यांच्यावरचा अन्याय नाही का? आता त्यांची ताकद दिसल्यानंतर राज+उद्धव असं समीकरण व्हायला पाहिजे, अशी इच्छा व्यक्त केली जातेय. त्याला काहीच अर्थ नाही. मला वाटते, दोघांनाही दोघांच्या वाटेने जाऊ द्यावे.
17 Oct 2008 - 1:32 pm | मराठी_माणूस
ह्या प्रकाराला मीडिआने अनावश्यक प्रसिध्दी दीली . आणि ह्या जॉबला आपल्या कडे बरेच ग्लॅमर आहे.
उत्पादन करणार्या कं. किंवा अन्य ठीकाणी असे झाले असते तर अशा प्रकारची दखल घेतली गेली असती का. काढलेले सर्व तरूण होते त्याना इतरत्र काम मिळण्याची शक्यता नीश्चीत आहे , काही वर्षा पुर्वी रीसेशन च्या काळात बर्याच कंपन्यामधुन ४५/५० च्या दरम्यानचे लोक काढले होते , त्यांचे प्रचंड हाले झाले, मुलांची अर्धवट शिक्षणं, घराचे न फिटलेले कर्ज आणि दुसरि नोकरी मिळण्याची अजीबात शक्यता नाही.
17 Oct 2008 - 1:32 pm | मराठी_माणूस
ह्या प्रकाराला मीडिआने अनावश्यक प्रसिध्दी दीली . आणि ह्या जॉबला आपल्या कडे बरेच ग्लॅमर आहे.
उत्पादन करणार्या कं. किंवा अन्य ठीकाणी असे झाले असते तर अशा प्रकारची दखल घेतली गेली असती का. काढलेले सर्व तरूण होते त्याना इतरत्र काम मिळण्याची शक्यता नीश्चीत आहे , काही वर्षा पुर्वी रीसेशन च्या काळात बर्याच कंपन्यामधुन ४५/५० च्या दरम्यानचे लोक काढले होते , त्यांचे प्रचंड हाले झाले, मुलांची अर्धवट शिक्षणं, घराचे न फिटलेले कर्ज आणि दुसरि नोकरी मिळण्याची अजीबात शक्यता नाही.
17 Oct 2008 - 2:27 pm | भोचक
याच विषयावर इथेही एक लेख वाचला.
http://marathi.webdunia.com/newsworld/currentaffairs/manthan/0810/17/108...
(भोचक)
आमचा भोचकपणा इथेही सुरू असतो...
http://bhochak.mywebdunia.com/
17 Oct 2008 - 3:13 pm | महेश हतोळकर
ही बातमी पण वाचा
17 Oct 2008 - 3:38 pm | धमाल मुलगा
वरच्या बर्याचशा मुद्द्यांशी सहमत आहे.
पण मला एक प्रश्न पडतो,
ह्या कर्मचार्यांमध्ये असे किती मराठी लोक होते? नगण्य! मग 'राज ठाकरे' हे नाव घेताना तोंडात मिठाचा खडा पडल्यासारखं करणारे परप्रांतिय लोक आता का बुवा राज ठाकरेंकडे आले? इतरत्र असलेल्या त्यांच्या 'त्या' नेत्यांकडे का नाही गेले? किंवा त्या नेत्यांना तरी का नाही आला ह्या कर्मचार्यांच्या प्रेमाचा उमाळा?
राजसाहेबांनी ह्या कर्मचार्यांना मदत केली ती कोणत्या दृष्टीकोनातुन हा मुद्दा एकवेळ चर्चेचा असु शकेल. पण महाराष्ट्राच्या कुंपणावर बसुन फुकाच्या गमजा करणार्या सरड्यांना नाही अशी मदत करावीशी वाटली?
कोणी काही म्हणोत, हाती सत्ता नसतानाही मराठी पाट्यांचा पाठपुरावा करणं, जेट एअरवेजच्या प्रश्नात मराठी-अमराठी असा भेद न करता मदत करणं (कोणी म्हणु शकेल की हा भेद न करता मदतीचा प्रकार सो-कॉल्ड संकुचितपणाच्या आरोपांना उत्तर म्हणु असेल.) हे बाकीच्या कोणीही केलेलं नाही! त्यांना जमलेलं नाही.
:)
राज ठाकरेंच्याच भाषेत सांगायचं झालं तर, "निवेदनं देऊन काय फरक पडलाय आजपर्यंत? आम्हीही निवेदनं दिली, काय उपयोग झाला? ज्याला ज्या भाषेत कळतं त्याला त्याच भाषेत समजावून सांगावं लागतं... "
आक्रमकपणा नाही केला तर आजकाल कोण कुत्रं तरी विचारतं का? तुमच्या मागण्या/निवेदनं/अर्ज/विनंत्या कितीही योग्य असल्या तरी हल्ली दिवसच असे आले आहेत की ते भांडूनच घ्यावं लागतंय.
मिडिया हे मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाणारं उदमांजर आहे. त्यात हिंदी मिडीया तर पुर्ण बायस्ड आहे! आज राज ठाकरेंबद्द्ल जे काही चांगलं बोललं जातंय त्यामागे मनाचा मोकळेपणा असेल असं मलातरी व्यक्त्तिश: नाही वाटत.
पुन्हा एकदा हिंदीभाषिकांविरुध्द मराठीचा मुद्दा उभा राहुदे मग पहा...
"क्या यह वही राज ठाकरे है जिन्होनें कुछही महिनों पहले मराठी और गैर-मराठी ऐसा भेदभाव ना करते हुए जेट एअरवेजके कर्मचारीयोंकी कटौती का डट कर विरोध कर जेट को अपना फैसला बदलने पर मजबूर किया? आज वही राज ठाकरे फिरसे अपने पुराने अंदाज में आकर यु.पी और बिहार के रहनेवाले हिंदीभाषकोंपर बुरी तरह कहर बरसा रहें है| क्या इसे उनकी राजनीतीकी एक चाल माना जायें? राज ठाकरे के इस फतवेकी वजहसे महाराष्ट्रामें रहने वाले कई 'मासूम' हिंदी भाषकोंको मुसिबतोंका सामना करना पड रहा है| ब्ला....ब्ला....ब्ला........ "
हे असलं गरळ ओकायला सुरुवात करतात की नाही ते पहाच!
17 Oct 2008 - 5:57 pm | श्री
ध्.मु. तुझे बरोबर आहे
पण ह्या जागतीकिरण्याच्या रेट्यात आपला महाराष्ट्र मागे पडत चाललाय त्याचे च दु:ख वाट्तेय. मनसे स्टाईल मला पण आवडते पण त्याच बरोबर समुध्द महाराष्ट्राची प्रतिमा डागाळु नये असे सुध्दा वाट्ते. माझा प्र.२ सुध्दा त्या अनुषंगाने आहे.
17 Oct 2008 - 6:07 pm | इनोबा म्हणे
धमालरावांशी संपूर्ण सहमत
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
17 Oct 2008 - 3:53 pm | मराठी_माणूस
ही मंडळी मनसे ला भेटायचे कारण फक्त त्यांचा स्वार्थ . पेपर मधे असे वाचले की कार्यकर्त्यांशी बोलताना त्यांच्यातली एक मुलगी मुंबई चा उच्चार बॉम्बे असा करत होती , तीला एका कार्यकर्त्याने वारंवार ही गोष्ट लक्षात आणून दिल्यावर मग तीने नीट उच्चार केला.
17 Oct 2008 - 4:29 pm | धमाल मुलगा
दादा,
ह्या माझ्या ओळींमधून तेच तर ध्वनित करण्याचा यत्न करतोय मी!
बरोबर, चेन्नईची होती ती! कदाचित मुलगी असल्यानं वाचली, मुलगा असता तर बहुतेक ३-४ दा सांगुनही कळात नाही म्हणल्यावर कानफाटावला असता त्याला...मग नीट जमलं असतं 'मुं ब ई' असं म्हणायला!
17 Oct 2008 - 3:54 pm | अनामिका
याला म्हणतात "आयत्या बिळावर नागोबा"
आयुष्यात कसलीही नैतिकता आणि तत्व नसलेल्या माणसांकडुन इतर कसली अपेक्षा नाही .मुळ कॉग्रेसची संस्कृती पुढे चालवणार्या पण स्वतचे नाव बदलुन तथाकथित राष्ट्रवादी म्हणवणार्यांकडुन असे करण्याव्यतिरिक्त इतर कुठल्या गोष्टि होवु शकत नाहीत.सत्तेत येणे म्हणजे केवळ नी केवळ स्वतची खळगी भरणे आणि जितक जमेल तितक ओरबाडुन घेणे हिच यांची संस्कृती.
महाराष्ट्रातल्या जनतेने डोळ्याला झापड नाही लावुन घेतली अजुन्..तेंव्हा शहाण्यास अधिक सांगणे न लागे.
असो जित्याची खोड ****** जायची नाही
"अनामिका"
17 Oct 2008 - 4:52 pm | विकास
चर्चेवर नंतर उत्तर देईन, पण राज ने म्हणल्याप्रमाणे "ही सर्व मंडळी २० ते २४ वयोगटातील आहेत. एअरलाइन्समध्ये नोकरी करण्यासाठी या तरुणांनी विशेष प्रशिक्षण घेतले. त्यासाठी दोन-चार लाख रुपये खर्च केले. त्यांनी मध्येच नोकरी सोडू नये, म्हणून कंपनीने ५५ हजार रु. डिपॉझिटही घेतले."
जर असे असेल आणि त्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष ह्या कामाची (म्हणजे "जेट एअर्वेज" मधील) जर गरज म्हणून केले असेल तर नक्कीच विमान कंपनीने चोरगिरी केली आहे असे म्हणावे लागेल. बरं काढून टाकताना काही काँपेनसेशन दिले आहे का? आपला कायदा तसे करण्याची मागणी करतो का? वगैरे अनेक प्रश्न निर्माण होतात. तोटा होण्याला कारण जसे तेलाचे वाढते भाव आहेत तसेच काही व्यवस्थापकीय निर्णय आहेत - ते किती बदलले आणि त्याला जबाबदार कोण होते? ......
17 Oct 2008 - 5:07 pm | श्री
या तरुणांनी विशेष प्रशिक्षण घेतले. त्यासाठी दोन-चार लाख रुपये खर्च केले. त्यांनी मध्येच नोकरी सोडू नये, म्हणून कंपनीने ५५ हजार रु. डिपॉझिटही घेतले."
हो हे खरे आहे.
बरं काढून टाकताना काही काँपेनसेशन दिले आहे का? आपला कायदा तसे करण्याची मागणी करतो का? वगैरे अनेक प्रश्न निर्माण होतात.
आपला कामगार कायदा ह्या बाबतीत फार जुना आहे. काँपेनसेशन म्हणजे १ महीन्याचा पगार दीला की झाले काम, मग तुम्ही दाद मागायला कामगार न्यायलयाचे ६-७ वर्षे खेटे मारा, त्यानंतर हाय कोर्ट, सुप्रीम कोर्ट आहेच की बाकी. सध्या contract worker चा जमाना आहे आणी हायर अन्ड फायर हे तत्त्व आहे.
17 Oct 2008 - 7:32 pm | संदीप चित्रे
फायदे उपभोगले त्यापाठोपाठ तोटेही भोगावे लागणारच !
एका प्रतिसादात वाचले --
>> फक्त कमी पगारवाल्यांचा नोकरीवर हक्क असतो का?
मुळात प्रश्न असा आहे की नोकरी ही हक्काची असते का ? जर त्यांच्या काँट्रॅक्टमधे असेल की नोकरी कधीही जाऊ शकते तर काँट्रॅक्ट साईन करतानाच तयारी करायला हवी.
जेटने ज्या पद्धतीने ले-ऑफ केले (उदा. एस्.एम्.एस करून कळवणे इ.) ते योग्य नाहीच पण 'राज ठाकरे' हे तात्पुरते उत्तर आहे ! (कुणाचाही गैरसमज होण्याआधी सांगतो मला राजबद्दल कसलाही आकस वगैरे नाहीये किंवा जेटचा प्रवक्ताही नाहीये !)
अमेरिकेत एकेका दिवशी हजारो लोकांच ले ऑफ होतात पण कुणी 'राज'कारणी मधे पडत नाही कारण तो कंपनीचा अंतर्गत मामला असतो.
दुसरा मुद्दा असा की अमेरिकेत जर तुमची नोकरी, तुमच्या इच्छेविरूद्ध, गेली तर तुम्हाला 'बेकारी भत्ता' मिळतो. (त्यासाठी तुमच्याकडे अमेरिकन नागरिकत्व किंवा ग्रीन कार्ड असावे लागते.) दुर्दैवाने आपल्या देशात अशी कुठलीही व्यवस्था नाही :(
17 Oct 2008 - 9:46 pm | कोलबेर
सहमत आहे!
17 Oct 2008 - 7:34 pm | श्री
मुद्दा जेट ने केले ते चुक की बरोबर नसून त्या घटनेचे महाराष्ट्राच्या राजकारण व गुंतवणुकीवर होणारे दुरगामी परिणाम हा आहे.
17 Oct 2008 - 8:22 pm | सुचेल तसं
ह्यात कामगारांचं चातुर्य वाखाणण्याजोगं आहे. त्यांनी बरोब्बर ओळखलं की अशा बिकट प्रसंगी कोणाकडे धाव घेतली पाहिजे ते. ह्या जेट एअरवेज एपिसोड मधे कामगारांचा जरी एकच फायदा झाला असला तरी राज ठाकरेंचे आणि पर्यायाने मनसेचे अनेक फायदे झाले. ते असे-
१. मुंबईत इतर मातब्बर पक्ष आणि त्यांचे नेते असतानाही कामगारांनी राजच्या नवख्या पक्षाची मदत घेतल्याने राज परत एकदा प्रकाशझोतात आले आणि ते ही कुठलंही वादग्रस्त स्टेटमेंट न देता, हे महत्वाचं.
२. बहुतांश कामगार हे बिगर मराठी असूनही राजने त्यांची मदत केल्याने देशभरातील मिडीयासमोर त्यांची स्तुती करण्यावाचून काहीही पर्याय उरला नाही.
३. जेट एअरवेज सारख्या मोठ्या कंपनीला झुकायला लावल्यामुळे राजची आजमितीला किती हवा आहे हे सिद्ध झालं...
४. ह्या प्रसंगात राजने नुसता पाठिंबाच दिला नाही तर केवळ दोन दिवसांत त्यांना न्याय मिळवून दिला. लोकांना लार्जर दॅन लाईफ हिरो/नेता आवडतो आणि विश्वास बसो अथवा न बसो पण हळूहळू जनसामान्यांमधे राजची तशी इमेज बनत चालली आहे.
५. कामगारांच्या पाठीशी उभं राहायचं, त्यासाठी प्रसंगी राडा करायचा ही शिवसेनेची मक्तेदारी त्यांच्या हातातून अलगद निसटून मनसेच्या हातात जातात आहे...(मराठीचा मुद्दा तर अगोदरच मनसेकडं गेला आहे)
Finally I will be so matured that I will react to nothing.
अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com
17 Oct 2008 - 8:26 pm | छोटा डॉन
मुळात घटना आहे "विमानवाहतुक " सारख्या हायप्रोफाईल्ड व ग्लॅमरस क्षेत्रातली, त्यात सध्या जेटचे नाव ही बर्यापैकी प्रचंड तोटा व किंगफिशर बरोबर करार ह्यामुले गाजते आहे त्यामुळे स्वाभावीकच ह्या घटनेचे मिडीयाकडे लक्ष वेधले जाणे व यशानंतर त्याचे "श्रेय" घेण्यासाठी आकांडतांडव स्वाभावीक आहे ...
आता हीच घटना इतर उद्योग म्हणजे गिरण्या, कारखाने, मॉल्स, सरकारी संस्था, कॉल सेंटर्स च्या बाबतीत घडली असती तर असेच वातावरण तापले असते का ?
ह्याचे उत्तर "नाही " असे आहे ?
विवीध पैलुंनी ही घटना पाहुयात ....
"जेट एअरवेजचे" धोरण स्पष्ट होते, त्यांना सध्या आर्थीक मंदीमुळे व चाललेल्या जीवघेण्या स्पर्धेमुळे प्रचंड तोटा होत आहे. हे जर असेच चालु राहिले तर कंपनीचे दिवाळे फुकायला लागेल हे निश्चित.
आता तोटा कमी करण्याचे काही मार्ग :
- उत्पन्न वाढवा, पर्यायी जास्त गिर्हाईक खेचा. पण सध्याच्या परिस्थीतीत ही गोष्ट जराशी अवघड आहे व ही गोष्ट अगदी त्वरित परिणाम देऊन कंपनी सावरेल असेही नाही.
कंपनी काही ऑफर्स जाहीर करुन ग्राहकांना आकर्षीत करु शकते आणि शकत आहे पण त्यातुन येणार्या उत्पन्नाचे व पर्यायाने नफ्याचे प्रमाण "सफीशियंट" म्हनाता येणार नाही.
शिवाय हा प्रकार वेळखाऊ आहे व प्रचंड "मोठ्ठी आर्थीक रिस्क" ह्यात आहे.
फासे उलटे पडले तर कंपनी बुडायला ह्याचा हातभारच लागेल ...
- खर्च कमी करा : हेच करत आहेत ते, त्यातील काही बाबी म्हणजे अनावश्यक खर्चांवर नियंत्रण, डायरेक्ट वेजेस मध्ये कपात, हंगामी कर्मचार्यांच्या संख्येत कपात, नवी भरती बंद,
ऐच्छिक सेवानिवॄत्ती योजना, बफर फंडचा वापर ... आणि अजुन इतर काही ....
कंपनीने बरेच मार्ग वापरायला सुरवात केली आणि त्यातला एक "हम्गामी कर्मचार्यांची कपात", ह्यात आश्चर्य असे काहीच नव्हते. पण हे क्षेत्रच व त्याच्याशी संबंधीत लोक जरासे
ग्लॅमरस असल्याने मुद्दा ठळठळीतपणे वर आला. तशी कंपनीने कायदेशीर सर्व बाबी पुर्ण केल्या होत्या असे म्हणतात जसे त्यांचे " डिपॉझीट परत करणे " वगैरे.
थोडक्यात जे झाले ते अमानवी व न भुतो न भविष्यती असे काही नव्हते ... इट्स फेअर इनफ !
पण हा मुद्दा गाजला जाऊन ह्यात "राजकीय पक्ष" सुद्धा प्रकाशात आले व मुद्दा कंपनीसाठी गंभीर बनला, राज ठाकरेंनी "तडकाफडकी आपल्या ८५० कर्मचा-यांना कामावरून काढून टाकणा-या जेट एअरवेजचं एकही विमान उडू देणार नाही " असा इशारा दिला व "भारतीय कामगार सेनेचे" पदाधिकारीही ह्यात गुंतले. आता सरळ पहायचे तर कम्पनी असा धोका पत्करु शकत नाही जरी त्यात त्यांचा फायदा असला तरी. ह्या सर्व राजकारण्यांना टाणुन ना तर त्यांची सेवा सुरळीत चालेल, ना त्यांचे ग्राहक सुरक्षीत राहतील, ना सध्या कामावर असलेले कर्मचारी बिनाधोका काम करतील. ह्या सर्व गोष्टींचा शेवट पुन्हा एक्दा तोट्यातच होतो व शिवाय कंपनीची "इमेज" हा मुद्दा आलाच ...
म्हणुन "दोन दिवसांत या कर्मचा-यांना जे काही सोसावं लागलं, त्याबद्दल मी माफी मागतो आणि सगळ्यांना पुन्हा कामावर येण्याचं आवाहन करतो" असे सांगुन गोयल यां;नी कर्मचार्यांना पुन्हा एकदा रुजु करुन घेतले ...
कर्मचार्यांच्या दॄष्तीतुन जर पाहिले तर त्यांची पहिली कॄती म्हणजे "राज ठाकर्यांकडे" धाव घेणे हे मी स्वाभावीक व तर्कसंगत मानतो ...
कारण "राज ठाकरेंचा करिष्मा", कर्माचार्यांना वाटले की जर कोनी काही करु शकेल तर तो "राज्"च कारण बाकी अर्ज , विनंत्या, निवेदने ह्याने काहीही होनार नव्हते. कंपनीच्या व्यवस्थापनाने ह्याला केराची टोपली दाखवली असती. तसेच हे सर्व लोक "हंगामी कर्मचारी" असल्याने कायद्याच्या भाषेत ह्यांची बाजु लंगडी ठते ....
राज ठाकरेंची शैली पाहता ते काही करु शकतील हा विश्वास त्यांना त्यांच्याकडे घेऊन गेला व त्यांनी त्यास तडा जाऊ दिला नाही. शेवटी याचे फळ म्हणुन कर्माचार्यांना पुन्हा सन्मानाने बोलावले गेले.
आता पाहिले तर कर्मचार्याची बाजु लंगडी ठरते पण कोणालाही कसल्याही परिस्थीतीत "एक महिन्याचा पगार आणि डिपॉझिट म्हणून दिलेले ५५ हजार रुपये इतक्यावर त्यांना नोकरीची 'पिंक-स्लिप'"" ह्या स्वरुपाची गंच्छंती भावनीक ठरु शकते, ती राजना भावनीक वाटली व त्याचा कर्माचार्यांना फायदा झाला ....
"राज ठाकरेंच्या बाजुने" पाहिले तर अधिकॄत शिवसेनेची कामगार संघटना असताना व त्या दिवशी ढीगाने राजकारणी मुंबईत उपलब्ध अस्ताना ही जनता राजदरबारी आली येथेच "राज" ने निम्मी लढाई जिंकली. लोकांना हा माणुस काम करु शकतो हा विश्वास वाटणे हाच राज ठाकर्यांचा विजय व सर्वात महत्वाचे ऑटपुट म्हनुन शकतो ह्या आंदोलनाचे.
बाकीच्या बाबी राज साठी जास्त कठिण नव्हत्या, आधी शांततेच्या मार्गाने निवेदन देणे व त्यातच न ऐकल्यास होणार्या संभाव्य परिणामांची भिती दाखवणे, हे न जमल्यास रस्त्यावर उतरणे, कायदा हातात घेणे, प्रशासनाला वेठीला धरणे वगैरे. पण "मनसेची किर्ती व काम करण्याची पद्धत तसेच लोकांचा पाठिंबा" लक्ष्क्षात घेतला तर कंपनीने फक्त " निवेदनात" योग्य तो धडा घेऊन पुढील निर्णय घेतला. ह्यात "राज ठाकरे" ह्यांची स्पष्ट सरशी झाली, एक तर सर्व शाम्ततेत पार पडले व सर्वात महत्वाचे म्हणजे "मराठी राजकारण" न होता आपण फक्त "न्यायाच्या बाजुने उभे राहतो" हे अवघ्या देशाला दाखवण्यात ते यशस्वी झाले. दिल्लीत सुद्धा "राज ठाकरे झिंदाबाद" ह्या घोषणा घुमल्या ह्यावरुन काय ते समजते ...
आता राजची जबाबदारी वाढेल, पुढे सर्व अशा घटनात लोक त्याच्या राजदरबारी धाऊन येतील हे नक्की ....
व ही खात्री तयार करायला तो यशस्वी ठरला हे त्याचे "निर्भेळ यश" !!!!
बाकी "शिवसेना, नागरी उड्यनमंत्री प्रफुल्ल पटेल, इतर राजकारणी, कामगार संधटना" ह्यांची भुमीका नगण्य होती ....
हो, मिडीयाचा चांगला उपयोग झाला, त्यांनी प्रकरण व्यवस्थीत तापवल्याने कंपनीला त्वरित पाऊल उचलावे लागेल.
पण हे तर त्यांचे कर्तव्य त्यामुळे यशाचे श्रेय अथवा काही फायदा या गोष्टी येतच नाहीत मात्र भुमीका " मनाला सुखावणारी होती " हे नक्की ...
थोडक्यात सांगायचे तर " कर्माचार्यांनी राज ठाकरे यांचा करिष्मा व ताकद वापरुन स्वतःची पोळी भाजुन घेतली पण हात पोळले ते मात्र कंपनीचे. राजने मात्र भाजलेली पोळी घेऊन तिचा वापर दुसरीकडे करायची तयारी सुरु केली. "
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
17 Oct 2008 - 10:43 pm | भाग्यश्री
सुंदर प्रतिसाद...!
माझं मत.. जनरली कंपनीच्या अंतर्गत व्यवहारांमधे राजकारण,किंवा अशा नेत्यांना आणायची गरज नाही. संदीप म्हटला तसं अमेरीकेत हे होत नाही, पण भारतात हे चालतंच.. तसं बघायला गेलं तर ही वशिलेबाजी आहे. सरळसरळ केलेली.. राजचं नाव वापरून त्या कर्मचार्यांनी परत नोकरी मिळवली..
पण जेटने का घ्यावं त्यांना? त्यांच्या कंपनीचा हा अंतर्गत मामला आहे. त्यांना झेपत नाहि,म्हणून त्यांनी कमी केले कर्मचारी. उगीच कोणी मोठा राजकारणी माणूस सांगतोय म्हणून तोटा का सहन करावा? पटलं नाही. सद्ध्याच्या काळात हायर आणि फायर या गोष्टी चालायच्याच. मार्केट इतकं कोसळतंय,इतकी मंदी पसरली आहे सगळीकडे , त्याचा काहीच परिणाम होणार नाही का? नक्कीच होणार. हे लोकांनी समजून घेतलेच पाहीजे..
वर कुणीतरी म्हटले, तसे ते सर्व कामगार २५शीचे होते.. अशा लोकांना नव्याने नोकरी मिळाली नसती का? नक्कीच मिळाली असती.. त्यांना काही वयाची मर्यादा नव्हती की काही नाही.. ४०-५० च्या माणसाने अशी धाव घेणे जरा तरी पटते.. त्याला इतरत्र कुठेही नोकरी मिळायची शक्यता नसते (वयामुळे) ..
असो.. मला राजकारणातले फार कळत नाही. पण एखाद्या कंपनीच्या अंतर्गत मामल्यामधे राजकीय लोकांनी मधे पडणं फारसं बरोबर नाही वाटलं.. (राज ठाकरेचा त्यातला स्वार्थ वगैरे कळला.. त्याचा फायदाच झाला.. पण कंपनीच्या दृष्टीने मला चुकीचं वाटलं खूप!)
18 Oct 2008 - 3:54 pm | मराठी_माणूस
अमेरीकेत हे होत नाही
कारण तिथे नोकरी गमावल्याला पर्याय असतात म्हणून कोणी दखल देत नसतील कदचीत . योग्य न्याय मिळत असेल. इथे अशा माणसाला नोकरी जाणे म्हणजे जगणेच नाकरल्या सारखे होते. अजच्याच म्.टा. मधील वॄत्त http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3610628.cms
एखादीच घटना वेगळी काढुन अमेरिकेशी तुलना करुन चालणार नाही पुर्ण सिस्टीम ची तुलना करावी लागेल. आणि अमेरिकेशीच का , ती काय मॉडेल सिस्टीम आहे का (आता तर पहातच आहोत तिथे काय आर्थीक दुर्दशा झाली आहे ती).
आपणच आपली फूटपट्टी (बेंचमार्क) निर्माण करु नये काय
18 Oct 2008 - 4:07 pm | भाग्यश्री
अमेरिका रोल मॉडेल आहे वगैरे मी बोललेली नाहीये अजिबात.. एक मत नोंदवलं आहे. ते पटले नसेल तर सोडून द्या.
मी केवळ अमेरीकेबद्दल्च बोललेली नाहीए.
बाकीचाही प्रतिसाद वाचलात तर बरं..
18 Oct 2008 - 5:45 pm | रविशामु
marathi chitrapate ajun hindi sinemachya mage ladkhadat rahanar ahe ki telagu ani tamil sarakhe tyana sugiche diwas yetil ?
are babano ata tari kahi navin kara
junya kalatle marathi chitrapat pahile ki man bharun yete.
ahok saraf, nilu phule yanni swatachya balawar marathi chitrapatana jeev dila
ata tar vinod navacha prakar pahayla milane viralach ahe.
prekshkani hasaychya adhi kalakar hasun gheto
aani swatache hase karun gheto.
ajun lok tyanchi mimikri karta ahet.
mala tar watatay marathi chitrapatana aaj ekhadya khambir kalakarachi garaj ahe jo swatachya balawar prekshak odhun anu shakel?
19 Oct 2008 - 2:12 am | भाग्यश्री
याचा या धाग्यात काय संबंध?
http://misalpav.com/node/1312 इथे जाऊन टंकलेखन सहाय्याची मदत घेतली तर मराठी मधे लिहीणे अवघड नाहीए.कृपया त्या लिंकचा वापर करावा..
26 Oct 2008 - 12:28 pm | विकि
एका रात्रीत निर्णय कसा फिरला याचे आश्चर्य वाटले. राज्य किंवा केंद्र सरकारने जरुर हस्तक्षेप केलेला असणार.
इथे गिरणी संपानंतर अजुनही कामगारांना न्याय मिळालेला नसताना सुटाबुटात वावरणार्या या हायफाय कर्मचार्यांना न्याय मिळालाच कसा(अर्थात त्यांना त्यांच्या नोकर्या परत मिळाल्या याचा आनंद आहे पण...)? काय कारण असेल याचे .
आपला
कॉ.विकि