पुत्र व्हावा ऐसा गुंडा...

पिलीयन रायडर's picture
पिलीयन रायडर in काथ्याकूट
28 Aug 2013 - 3:43 pm
गाभा: 

पुत्र व्हावा ऐसा गुंडा...
ह्याचा कवीला जो काही अर्थ अपेक्षित असेल तो असेल.. पण आमच्या लेकरानी शब्दशः घ्यायचा ठरवला आहे. आणि तो बहुदा "गुंडा" सिनेमाच्या हिरो सारखा "गुंडा" हा असावा.. असो..
तर..आमचे सुपुत्र झोपेतुन उठतात तेच मुळी बटन दाबुन मशिन चालु केल्या सारखे.. एकदम धो धो एनर्जी कोसळायला सुरवात होते. तिथुन पुढे दिवसभर ती तशीच कोसळणार असते. दम दिल्या सारखा हाका मारत सुटतो..चावतो..उड्या मारतो..बोचकारतो..लाथा मारतो आणि वर "हा हा" करुन हसतो.. जोवर त्याला बाहेर नेत नाही तोवर हे सगळं चालु असतं..बर गप गुमान नेईल तिकडं जावं तर तसं नाही..पायानी आम्च्या पोटाला लाथा मारुन (घोड्याला कसं पायानी वळवतात्..तस्सचं..), हातानी दिशा दाखवत... "इक्कं..तिक्कं..ऊंम्म... नाईईई.." असं बोंबलत हवं तिकडे नेतो.. खाली सोडलाच तर तरा तरा रांगत जाऊन भांडी खाली पाड.. टिव्ही ओढ्..कचरा खा.. झाडु चोख..खिडक्याशी गाडी गाडी करुन बोटं अडकवुन घे..असले उपद्व्याप चालु होतात.
त्याच्या सोबत नक्की खेळावं काय हेच आम्हाला कित्येकदा समजत नाही.त्याच्या खेळण्यां सोबत आम्हीच अर्थहीन खेळ सुरु करतो म्हणजे तो समोर बसुन शांत पणे काही तरी करेल.. पण तो ढुंकुनही पहात नाही.
दिवसभर आम्ही सोबत नसतो. आजी एकटी कंटाळुन जाते.म्हणुन मग टीव्ही.. तर आता त्याला सगळ्या मालिकांचे टायटल साँग्स आवडयला लागलेत. होम मिनिस्टर तर ऊड्या मारुन पहातो (कारण त्यात बर्‍याचदा टाळ्या वाजवतात, बॉल चे खेळ असतात..) पण ह्या वेळ घालवण्याला काही अर्थ नाही. तो अजुन चालत (आणि मुद्द्याचं) बोलत नसल्याने इतक्यात त्याला पाळणाघर / प्ले ग्रुप मध्ये टाकु नये असं मत आहे.
पोरगं रोज नवीन काही तरी शिकतय.. अक्कल "एक्स्पोनेन्शीयली" वाढत चालली आहे. तेवढ्याच स्पीडनी आमची बुद्धी तोकडी पडत चालली आहे. त्याला खेळायला द्यावं तरी काय? त्याच्या सोबत "काऊ काऊ ये.." च्या शिवाय अजुन काय खेळावं? "केस कुठयत केस? कान कुठय कान" च्या पुढे काय शिकवावं? त्याच्या learning मध्ये भर पडेल असं काय करावं?

प्रतिक्रिया

दादा कोंडके's picture

28 Aug 2013 - 3:54 pm | दादा कोंडके

दिवसभर आम्ही सोबत नसतो.

कुछ पाने के लिये (बहोत) कुछ खोना पडता है.

चालत आणि बोलत नाही म्हणजे एक वर्षाहून लहान, बहुधा ६ महिने वय असणार. या काळात आपण त्याच्या learning मधे भर पाडण्यासारखं काही करण्यापेक्षा तेच आपल्या learning मधे तासातासाला भर टाकत असतात.

दोनतीन वर्षांचे होईपर्यंत आपणच शिकायचं, अंदाज घ्यायचा.

आणि ही पोरं म्हणजे छळवाद असतात हो.. पण फटका तरी कसा द्यायचा? बिचार्‍यांची विधात्याने फटका देण्यासाठीच बनवलेली जागाही इतकी चिमुकली असते की किमान दोनतीन वर्षे वाट पाहणं आलं.

:)

सल्ला विचारताच आहात तर एकदोन पॉईंटः

पोरांनी कितीही जागरण, थकवा किंवा वैताग आणला तरी आपल्या मागच्या पिढीकडे (एकत्र राहात असल्यास वा फोनवरुन) त्याविषयी तक्रार करु नये. कणभरही सहानुभूति न मिळता "बघा.. आता कळलं ना? सोप्पं नाहीये मूल वाढवणं.." असं उत्तेजित उत्तर मिळेल..

पोरं नंतर मोठी झाल्यावर कुशीत येत नाहीत. आत्ता जेवढं घ्यायचं ते घेऊन टाका.

पोर चालायफिरायला लागल्यावर तुम्ही व्यक्त केलेल्या पीडा त्रिगुणित होतील. त्या त्रिमितीय बनतील. अशा वेळी घरात फुटण्याचे पोटेन्शियल असलेल्या सर्व वस्तू भंगारात काढा.

पळता यायला लागलं की पोरांचे पापे घेणं अवघड होतं. पळत्या पोराची गालावर पापी मिळणं आणखी अवघड. त्यामुळे अशा वेळी गालासाठी अडून न राहता जो काही हातात सापडेल त्या भागाची पप्पी घेऊन टाकावी.

बिचार्‍यांची विधात्याने फटका देण्यासाठीच बनवलेली जागाही इतकी चिमुकली असते की किमान दोनतीन वर्षे वाट पाहणं आलं.

आणि

पोरांनी कितीही जागरण, थकवा किंवा वैताग आणला तरी आपल्या मागच्या पिढीकडे (एकत्र राहात असल्यास वा फोनवरुन) त्याविषयी तक्रार करु नये. कणभरही सहानुभूति न मिळता "बघा.. आता कळलं ना? सोप्पं नाहीये मूल वाढवणं.." असं उत्तेजित उत्तर मिळेल..

हे अतिशय जबरी =)) =))

पिलीयन रायडर's picture

28 Aug 2013 - 4:06 pm | पिलीयन रायडर

गवि..
मुलगा १ वर्ष २ महिन्याचा आहे.
बोलता येत नाही म्हणजे टाईमपास बरच बोलतो, पण जर कुणी त्रास दिला तर सांगु शकेल, तक्रार करु शकेल असं वाटत नाही. पाळ्णाघरात जाण्यापुर्वी ते करता यावा असं वाटतं. आणि चालत नाही अजुन.. रांगतो.. त्याची अनेक कारणं आहेत. लहानपणी एका मोठा आजारपणातुन गेल्यामुळे असेल असं माझं मत आहे. पण तडतड करतो, रांगतो जोरत, धरुन उठुन उभा रहातो..कशालतरी धरुन चालतो..त्यामुळे तंगड्या मजबुत असाव्यात.

गवि's picture

28 Aug 2013 - 4:23 pm | गवि

चालणं बोलणं वगैरे हे प्रत्येकाचं वेगवेगळ्या वेळीच होत असतं. त्याविषयी फार विचार करण्याची गरज नाही. आणि ते प्रयत्नांनी लवकर करता येण्यासारखं नसल्याने इतरांशी तुलना करण्यातही अर्थ नाही.

१. व्हॉट टू एक्स्पेक्ट द फर्स्ट ईअर
२. व्हॉट टू एक्स्पेक्ट टॉडलर ईअर्स (Arlene Eisenberg, Heidi Murkoff आणि Sandee Hathaway लिखित)

ही दोन अक्षरशः मॅन्युअल्स म्हणावीत अशी जबरदस्त उपयोगी पुस्तकं तुमच्याकडे असतीलच. नसतील तर तातडीने घ्या आणि हाताशी ठेवा. अगदी वाढत्या पोराच्या महिन्यामहिन्यातले लँडमार्क्स, एक्स्पेक्टेशन्स, काय होईल, कसं होईल, पोराच्या वयाच्या सध्याच्या महिन्यात पोराला कोणत्या प्रकारे मदत लागेल (वय वर्षं चार पर्यंत)..त्याची स्किल्स सहज डेव्हलप होण्यासाठी अनुकूल कसं काय करावं.

याउपर कोणतीही आजाराची लक्षणं, छोटेमोठे घरगुती अपघात अशा प्रसंगांसाठी अत्यंत शांतपणे सहज शोधता येणार्‍या इंडेक्स सहित..

आईबाबांना या पुस्तकाची २४ तास मानसिक सोबत होते.

पिलीयन रायडर's picture

28 Aug 2013 - 4:28 pm | पिलीयन रायडर

ह्या पुस्तकां साठी अत्यंत धन्यवाद!!!!

मैत्र's picture

28 Aug 2013 - 5:21 pm | मैत्र

या पुस्तकांनी म्हणजे याच्या पहिल्या भागापासून - What to expect when you are expecting?
आमची विलक्षण साथ आणि मदत केली आहे.
खूप चांगल्या कल्पना, माहिती, अनेक छोट्या मोठ्या सवयी, आजार, शिकवण्याच्या गोष्टी ..
मुख्यतः जो एक ताण असतो की हे माझंच कार्ट असं का करतंय त्यातून सुटका होते - कारण जवळजवळ प्रत्येक वागण्याचे प्रकार, मुलाला किंवा पालकांना होणारे त्रास याची माहिती आणि उपाय - (बरेचदा काही उपाय करू नका असाही उपाय) यात दिलेले आहेत.
आणि त्याबरोबर काही एक्स्पेक्टेशन्स मुळे तसं प्लॅन करता येतं. पुस्तक फ्लिपकार्ट / इंडियाप्लाझा वर स्वस्त आणि घरपोच मिळेल.
तरीही एक सत्य प्रत्येक बालरोगतज्ञ सांगतात की प्रत्येक मूल वेगळं असतं त्यामुळे उभे राहणे, चालणे, दात येणे, अर्थपूर्ण बोलणे हे प्रत्येक मुलाच्या बाबतीत वेगळे असते आणि त्यात बरोबर चूक असं काही नाही.

गविंचे काही काही सल्ले तर अतिशय जबरदस्त पर्फेक्ट आहेत --
"पोरं नंतर मोठी झाल्यावर कुशीत येत नाहीत. आत्ता जेवढं घ्यायचं ते घेऊन टाका.
पोर चालायफिरायला लागल्यावर तुम्ही व्यक्त केलेल्या पीडा त्रिगुणित होतील. त्या त्रिमितीय बनतील. अशा वेळी घरात फुटण्याचे पोटेन्शियल असलेल्या सर्व वस्तू भंगारात काढा."

गवि's picture

28 Aug 2013 - 5:41 pm | गवि

Expecting वाल्या पहिल्या पार्टचा उल्लेख इथे "नॉट अ‍ॅप्लिकेबल" म्हणून केला नव्हता, पण तेही पुस्तक तितकंच मदतीला येणारं आहे.

खूप चांगल्या कल्पना, माहिती, अनेक छोट्या मोठ्या सवयी, आजार, शिकवण्याच्या गोष्टी ..
मुख्यतः जो एक ताण असतो की हे माझंच कार्ट असं का करतंय त्यातून सुटका होते - कारण जवळजवळ प्रत्येक वागण्याचे प्रकार, मुलाला किंवा पालकांना होणारे त्रास याची माहिती आणि उपाय - (बरेचदा काही उपाय करू नका असाही उपाय) यात दिलेले आहेत.

तंतोतंत.. आणि ९९% जे काही घडू शकतं ते सर्वच्यासर्व त्यात कव्हर झालेलं असतं.

प्यारे१'s picture

28 Aug 2013 - 9:08 pm | प्यारे१

धन्यवाद गवि.
आमचे चिरंजीव पण दहा महिन्याचे होतील. अतिशय उपयुक्त प्रतिसाद आहेत.
घरभर रांगणे, दिवसभर 'त्या त्या त्या त्या नि अशाच अर्थाचे शब्द उच्चारण ;) ' करणे, दिसेल ती गोष्ट तोंडात घालणे (काल मांसाहारी झालंय पोर्टं. मेलेलं झुरळ तोंडात घालून. पटकन काढलं म्हणा ) नि सगळ्यांच्या झोपा अनावर होईस्तोवर न झोपणे असे कार्यक्रम सुरु आहेत.
एन्जॉयिंग!
-२० दिवसाच्या सुटीवर येऊन ५० दिवस राहिलेला ;) प्यारे

चौकटराजा's picture

30 Aug 2013 - 9:42 am | चौकटराजा

"पोरं नंतर मोठी झाल्यावर कुशीत येत नाहीत. आत्ता जेवढं घ्यायचं ते घेऊन टाका.
काही अपवाद म्हणजे चौ रा.. वयात आल्यावरही पोरी कुशीत येतात. ( हे फारच पर्सनल अनुभव पण रहावले नाही ! ) गळ्यात हात टाकतात. दोस्त आहेत माझ्या !

पिलीयन रायडर's picture

30 Aug 2013 - 9:53 am | पिलीयन रायडर

एकदम मान्य..
आम्ही अजुनही बाबांच्या मांडीवर डोकं ठेवुन गाढ झोपतो, आईच्या कुशीत झोपण्यासाठी भांडतो.. आणि अजुनही आई (रात्री माहेरी असेन तर)झोपताना गालावर पप्पी घेऊन जाते.. आईच्या आवाजासारखा तिच्या वास आणि स्पर्श रेकॉर्ड करता आला तर मी जगातली सर्वात श्रीमंत व्यक्ती असेन..

"घरोघरी ज्ञानेश्वर जन्मती" हे पुस्तक घ्या लेखक लक्षात नाही.
" तोत्तोचान " अनुवादक: चेतना गोसावी सरदेसाई.
" चीपर बाय डझन" मंगला निगुडकर
ही पुस्तके घ्या मुलांबद्दल बरेच काही कळून येईल

त्रिवेणी's picture

1 Sep 2013 - 3:30 pm | त्रिवेणी

चालत नाही अजुन.. रांगतो...>>>>>>>>>>> मी 1 वर्ष 6 महिन्याची असताना चालायला लागले होते सो टेंशन नको घेवु.
पण तुझ्या प्रॉब्लेम वर आत्ता काहीच मत नाही देवू शकत ग.

ब़जरबट्टू's picture

28 Aug 2013 - 5:12 pm | ब़जरबट्टू

पळत्या पोराची गालावर पापी मिळणं आणखी अवघड. त्यामुळे अशा वेळी गालासाठी अडून न राहता जो काही हातात सापडेल त्या भागाची पप्पी घेऊन टाकावी. :)
:) जबरा.. पण हल्ली त्यासाठी पण पोरांना आणाभाका घाल्याव्या लागतात हो, वेळच नसतो कार्ट्याना लाड करुन घ्यायला पण : (

पळत्या पोराची गालावर पापी मिळणं आणखी अवघड. त्यामुळे अशा वेळी गालासाठी अडून न राहता जो काही हातात सापडेल त्या भागाची पप्पी घेऊन टाकावी.
अगदी ! अगदी ! :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 Aug 2013 - 5:20 pm | डॉ सुहास म्हात्रे

भारी आणि खुसखुशीत प्रतिसाद !

मी_ओंकार's picture

1 Sep 2013 - 4:31 pm | मी_ओंकार

मस्तच गवि. पुन्हा एकदा "जिन्यामध्ये उभा बाबा" आठवला.

पळता यायला लागलं की पोरांचे पापे घेणं अवघड होतं. पळत्या पोराची गालावर पापी मिळणं आणखी अवघड. त्यामुळे अशा वेळी गालासाठी अडून न राहता जो काही हातात सापडेल त्या भागाची पप्पी घेऊन टाकावी.

हे तर चेरी ऑन केक.

- ओंकार.

बाबा पाटील's picture

28 Aug 2013 - 4:16 pm | बाबा पाटील

पोर वाढावण्यासारखी दुसरी मजा नाही,तुमचा पुत्र गुंडा आहे माझ मोठ कन्यारत्न एक नंबरच मवाली आहे, कराटेच्या क्लासची सगळी प्रात्यक्षिके ही बापाची पाठ आणी हातपाय यावरच होतात्,आणी दुसर दोनच महिन्यांची आहे पण साला पेडीयाट्रीकचे बायबुक माइलस्टोन कार्टी जरा जास्तच वेगाने पुर्ण करतीय्, डॉक्टर असुन हे अस कस घडतय याचाच प्रश्न मला बर्‍याचदा पडतोय.
बाकी जाउ द्या पोरांबरोबर धमाल मस्ती करा,आयुष्य लय म्हणजे लयच सोप्प होत राव.....

पिलीयन रायडर's picture

28 Aug 2013 - 4:23 pm | पिलीयन रायडर

अहो.. धमाल मस्ती म्हणजे काय? तेच आमच्या दुप्पट नाचतय..
प्रश्न हा आहे की दिवसभर टि.व्ही पाहण्या पेक्षा बरं काय करता येईल? खेळ कोणते शिकवता येतील?

बिपिन कार्यकर्ते's picture

28 Aug 2013 - 4:43 pm | बिपिन कार्यकर्ते

अशा प्रचंड एनर्जीवाल्या पोरांसोबत चिक्कार मस्ती करावी. या बाबत अधिक माहिती श्री. धमाल मुलगा देतील. ते अशा मुलांबरोबर बॉक्सिंग खेळण्यात उस्ताद आहेत.

राही's picture

28 Aug 2013 - 5:02 pm | राही

ही आजकालची पोरं जन्मल्या दिवसापासूनच आईबापांना अक्कल पाजीत असतात. चांदीचे बोंडले घेऊनच जन्माला येतात जणू!
गंभीरपणे बोलायचं तर या वयातल्या मुलांना वेगवेगळ्या वस्तू हाताळायला द्याव्यात. फळांमध्ये पेरूचा खरखरीत स्पर्श, डाळिंबाचा गुळगुळीतपणा, सिताफळाचा खडबडीतपणा, वाटीचा गोलाकार, लाटण्याचा लंबगोल, भरलेल्या आणि रिकाम्या डब्याच्या आवाजातला फरक, टाल्कम पावडरचा डबा, छत्री या सर्वांना हात लावून बघण्यातून ती शिकत असतात. रंग,रूप, स्पर्श, गंध या स्मरणसंवेदना मेंदूमध्ये ठसवत असतात. जर घरातली माणसे टीवी पहात पहात सोफ्यावर बसून जेवत असतील तर नुकतेच चालायला शिकलेले मूल प्रत्येकाच्या ताटातल्या पदार्थांना हात लावून बघते. आपण जेवताना आपल्याकडे कुतुहलाने बघत बसते. आपण चमचा कसा पकडतो, आपली बोटे कशी वळतात, हात कसा उचललला जातो, तोंड कसे उघडते, जीभ कशी पुढेमागे होते, सगळ्या-सगळ्यात त्याला कुतूहल असते. अशावेळी ताटात हात घालतंय म्हणून अडवू नये. एकदीड वर्षापर्यंत मुलावर रागवू नये, ओरडू नये. खरे तर कधीच रागवून आणि मोठ्याने बोलू नये, पण ही आयडिअल सिटुएशन झाली. एकाच वस्तूपाशी मूल फार वेळ रेंगाळत नाही कारण त्याचे कुतूहल शमलेले असते. मग घट्ट झाकणाच्या जिरे-मोहरीच्या, धान्याच्या, चहा-साखरेच्या डबे-बरण्या हाताळण्यास द्याव्या. बरणी हलवून वेगवेगळ्या धान्यांचे आवाज ऐकवावे. आपली पर्स्, पाउच उघडले तरी किंवा आपल्या चप्पलबुटात पाय घालून बघितले तरी त्याला तसे करू द्यावे. मात्र आपण लक्ष ठेवावे आणि वस्तू तोंडात घालणार नाही इतकेच बघावे. बर्‍याच गोष्टी आहेत पण फारच उपदेश होईल म्हणून आता पुरे.
ता.क. मुलांची वाढ होत असताना बघणं आणि ती वाढ होतेय, बुद्धी, आकलनशक्ती वाढतेय हे आपल्या लक्षात येणं ही मोठी आनंदाची गोष्ट असते.

योगी९००'s picture

28 Aug 2013 - 5:09 pm | योगी९००

माझेही थोडे अनुभव..

आमच्या घरचे साहेब आता २.५ वर्षाचे आहेत. (गवींबरोबर याची दाराज कट्ट्यावर भेट झाली आहे). यांचा गुंडपणा आता exponentionally वाढला आहे.

साहेब बोलत नाहीत पण बोलण्याचा प्रयत्न चालू आहे. त्यामुळे घरात एक वेगळेच वातावरण आहे. काही दिवसांपुर्वी साहेब १० मिनीटे "काssकी गोवा- काssकीगोवा " असे काहीतरी कोठल्यातरी ओळखीच्या गाण्याच्या चालीवर हातात कुत्र्याला(soft-toy) नाचवत म्हणत होते. खुप डोके तासले पण काहीच कळले नाही. शेवटी यांच्या play-group च्या शिक्षीकेने सांगितले की आम्ही त्याला "लकडी की काठी, काठी पे घोडा" हे शिकवत होतो. ( काssकीगोवा == काठी पे घोडा..).

पण काही म्हणा, रात्री दमून घरी आल्यावर पोराबरोबर खेळले की थकवा कुठल्या कोठे निघून जातो.

रात्री झोपायला मात्र साहेब फार त्रास देतात. (अशा गुंड पोरांना लवकर कशाने झोप येईल..? मिपाकरांकडून सल्ला अपेक्षित आहे.)

पिलीयन रायडर's picture

28 Aug 2013 - 5:18 pm | पिलीयन रायडर

माझाही पोरगा नुंगी..नुंगी म्हणुन नाचत होता.. म्हणलं काय चाल्लय काय ह्याचं?? तर ते लुंगी डान्स होतं..
बोलायचा प्रय्त्न जोरात आहे.. "आह्स्म्न ह्ह्य्य..ज्य्यत्यु.. तिक्कं..दकं.. " असं काही तरी...
झोपवण्यासाठी मला सांगितलेला उपायः- रात्री लवकर झोपायला न्यावे, दिवे बंद करावेत, गाणी / गोष्टी ऐकवाव्यात. पायाला तेल चोळावे. म्हणजे सवय लागुन ते झोपतात. बहुदा हळुहळु त्यांची एनर्जी डाऊन करत करत झोपवायचे असा प्लान असावा.

हॅ हॅ.. आमचं पोरगं कोकी कोकी आणि नोनी नोनी असं दिवसभर म्हणत रहायचं. काय असेल यावर डोक्याचा भुगा करुनही काही सापडेना तेव्हा ती त्याच्या गतजन्मातल्या आफ्रिकन देशातल्या गर्लफ्रेंड्सची नावं असावीत अशी समजूत घालून घेतली.

नंतर चार शब्द सलग असे पहिल्यांदाच बोलला ते "पप्पू कान्त दान्च चाला". मग दिवसरात्र तेच.

नंतर ज्या गोष्टीचा राग येईल त्याला पप्पूच्या जागी बसवलं जायचं. रडत ओरडत रागाने "पापा कान्त दान्च चाला", वगैरे (अन्य अर्थानेही ते खरंच आहे म्हणा.. ;) )

देशपांडे विनायक's picture

28 Aug 2013 - 6:40 pm | देशपांडे विनायक

सल्ला नाही पण सत्य सांगतो . सत्याला सामोरे जाणे ---- तेही सतत --जड जाते BUT YOU ASKED FOR IT !!!
सत्य हे आहे की तुम्ही घरी robot आणलेला नाही जो तुमच्या सूचने प्रमाणे वागणार आहे
त्याच्या लीला enjoy करण्यास काळ वेळ नसणे याचे दुः ख्ख नातवंडे च कमी करू शकतात
आणि हो -- तुम्ही काही करा अथवा न करा मुले मोठी होतात --पण करताना मजा वाटली नाही तरी ते आठवते तेव्हा आनंदच आनंद वाटतो .
आठवणींचे एक बरे असते . त्या केंव्हाही कुठेही काढता येतात !!!

बाकी काsssही करायला नको.. Be with Him.. all the time! त्याच्याबरोबरचा प्रत्येक क्षण (आनंद/ चिडचिड) उपभोगा.. स्वतःच्या अनुभवातून सांगतो, त्याने काय करायला हवं/ काय नको असा सारखा विचार नकळत त्याला रॅट रेस मध्ये ढकलण्याची पूर्वतयारी होऊ शकतो (तसं असेलच असं म्हणायचं नाही).
गविंशी तंतोतंत.. आणि मस्त त्याला शिवाजीच्या गोष्टी सांगा, गाणी ऐकवा त्याच्याशी लढाई करा, नाचा त्याच्याबरोबर.. बाहेर नेऊन त्याला पळवा बघा त्याच्यातल्या उर्जेचा कसा चांगला फायदा होतो ते.. (जर जेवायला २ तास घेत असेल तर अर्ध्या तासात जेवेल) आणि झोपेलही पटकन :)
पुस्तकाचं जमत नसेल तर तुम्ही www.babycenter.com वर रजिस्टर करु शकता (चकटफु), दर आठवड्याला तुम्हाला बाळाविषयी माहिती इतर पालकांचे अनुभव अशी बरीच माहिती येईल तेही मूल चार्-पाच वर्षांचे होईपर्यंत.
मुलास अनेक उत्तम आशीर्वाद आणि तुम्हाला शुभेच्छा.. एंजॉय माडी!

पिलीयन रायडर's picture

28 Aug 2013 - 7:03 pm | पिलीयन रायडर

उपाय छान आहेत. पण थोडासा प्रोब्लेम आहे..
आम्ही दोघेही नोकरी करतो..(सोडता येणार नाही अशी परिस्थिती आहे..त्यामुळे खरी गोची आहे).त्यामुळे वेळ खुप कमी मिळतो. दिवसभर तो आजी सोबत अस्तो..दोघेही आपाप्ल्या स्टाइल मध्ये कंटाळतात. दिवसभर त्या नुसत्या टिव्ही, भांडे, कचरा, झाडु वाचवत पळत असतात. त्याला घरात आता काहीच नवीन मिळत नाहीये खेळायला. म्हणुन तो चिडचिड करतो. म्हणुन विचारलं की कुणा कडे काही आयडिआ आहे का?

उपास's picture

28 Aug 2013 - 7:52 pm | उपास

म्हणजे तुम्हाला असे उपाय हवेत जे
१. मुलाचे आजी-आजोबा (त्यांचा विरंगुळा सांभाळत (उदा. टीव्ही ) करु शकतील.
२. मुलाचे त्यातून प्रबोधनही होईल
३. मुलाची उर्जा वापरली जाईल.
सॉरी, पण उतारवयातील आजी-आजोबांकडून अपेक्षा ठेवणे आणि तेही दीड वर्षांच्या मुलाला अस्सच सांभाळायला हवं वगैरे ह्यातच मुळात गल्लत वाटतेय. लहान मुलांना सांभाळणे सोप्पी गोष्ट नाही, त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवायला लागतं हे नक्कीच. नोकरी सोडता येणार नाही हे समजू शकतो पण 'तडजोड' करावी लागणारच हे लक्षात घ्यायला हवं.
आजी आजोबांना त्याला गाणी पुस्तक वाचून दाखवता येतील, तुम्ही जे डे केअर मध्ये पाहिलेत तसे खेळ (भेंडी, वांग्याने ठसे/ चित्र/ मातीत खेळ) तसे करुन घेता येईलच पण त्यांच्या वयाचा आणि तयारीचा विचार व्हायला हवा इतकच!
थोडसं अवांतर - परवाच पेपरात लहान मुलाच्या घशात राजगिर्‍याचा लाडू अडकल्याची दुर्दैवी बातमी वाचली, दोष कुणाचाच नसेल पण सांगायचा मुद्दा हा की लक्ष ठेवावच लागतं. जुन्या काळात मूल वाढवण आणि अत्ता ह्यात फरक आहे कारण मुलं दोन पावलं पुढे आहेत, असणारच.

सौंदाळा's picture

29 Aug 2013 - 11:45 am | सौंदाळा

एक आयडीया आहे.
आमच्या लहानपणी कॉलनीतले एक काका संध्याकाळी ५-७.३०/८ पर्यंत खेळ घ्यायचे.
बरीच मुले यायची. खेळपण सोसायटीतच खेळता येतील असे टीपीकल असायचे. उदा. रुमालपाणी, लांबउडी, लोखंड्पाणी, सुई-दोरा, विषाम्रुत आणि बरेच..
आणि त्यात २-५ वर्षापर्यंतची मुले पण असायची. नुसतीच पळापळी करयची बाकी मुलांबरोबर पण सॉलिड एन्जॉय करयची. ६-७ वर्षाची झाली की ती मुले पण मुख्य खेळात सामील व्हायची. काकांचे लक्ष असल्यामुळे खेळ पडापडी, चिडाचीडी, मारामारीशिवाय व्हायचे. नंतर (१५ वर्षानंतर) काका दुसरीकडे रहायला गेले आणि खेळ बंद झाले.
तुम्हीसुद्धा असेच एखादे निव्रुत्त/गरजु काका / काकु शोधाच. मुलांकडुन थोडी फी घेतली तरी हरकत नसावी.
बर्‍याच पालकांचा असा प्रोब्लेम असल्यामुळे मुलेदेखील पटकन जमतील. आणि वर कोणीतरी म्हट्ल्याप्रमाणे मुले खेळुन आल्यावर दणकुन आणि पटापट जेवतात आणि झोपतात. बाहेर खेळल्याचा शरीराला फायदा होतो तो वेगळाच.

पिलीयन रायडर's picture

29 Aug 2013 - 11:54 am | पिलीयन रायडर

हो.. असं माझ्याही लहानपणी होतं. २ तास जायचो तिथे. छान खेळ, गाणी वगैरे असायचं..
शोधायला हवं असं काहीसं!!

धन्यवाद!!!

प्रभाकर पेठकर's picture

29 Aug 2013 - 12:29 pm | प्रभाकर पेठकर

बाहेर खेळल्याचा शरीराला फायदा होतो तो वेगळाच.

अतिरिक्त उर्जेस विधायक वाट मिळाल्याने विघातक कृत्ये, चिडचिड नाहीशी होईल.

जेनी...'s picture

28 Aug 2013 - 7:27 pm | जेनी...

Be with him .......+++11111

आनन्दिता's picture

28 Aug 2013 - 7:20 pm | आनन्दिता

बापरे सगळे डॅडी च हिरीरीने सल्ले देतायत ..... मॉमीज कुठे गेल्या?.?:)

उपास's picture

28 Aug 2013 - 7:44 pm | उपास

मॉमीज पोराकडे बघत असाव्यात ;) Thats full time engagement including weekends :)

दादा कोंडके's picture

28 Aug 2013 - 7:44 pm | दादा कोंडके

मॉमीज कुठे गेल्या?.?:)

नोकरी करायला ;)

मग काय मॉमीझनी नोकरी करु नये काय काँडु काका ??? :-/
आणि डॉळा का मारलात ?
नोकरी करायला जानार्‍या मॉमीजकडे बघुन डॉळा मारणं शोभतं का कॉण्डु काका तुमाला ??? :-/

करु दे त्याला जे करायचय ते नंतर पूर्ण आयुष्य पडलय शिकन्यासाठी आणि शिकवण्यासाठी
हेच लाइफ असतं हवं ते करण्याचं . पूस्तकं वाचत बसलीस तर मात्र कठीण आहे .
आपण मग पूस्तकाशीच बाळाची तुलना करत बसतो त्यापेक्षा अजुन वर्षभर थांबावस
असं माझ मत आहे .....( गिरिजाकाका सोर्री बर्का )

कै च्या कै सल्ला वाटेल पण तुमचे पुत्ररत्न दंगा करतो आहे ते सर्व रेकॉर्ड करून ठेव.

नंतर ते क्षण परत मिळत नाहीत!

+१११११११११११११११११११११११.

हा इतिहास जतन करणे अवश्यमेव आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

29 Aug 2013 - 4:00 pm | डॉ सुहास म्हात्रे

+१११

--- तसेच केलेला (आणि नुकतेच्या त्या व्हिएचेस टेप्सच्या डिव्हीड्या पाडलेला) एक बाप :)

तुम्हाला दोघांना नोकरी करणे अपरिहार्य आहे असे तुम्ही सांगितले आहे. तुमच्या दोघांच्या सुट्ट्या शनिवार्/रविवार अशाच पडत असल्या तर काही महिने सुट्ट्या मागेपुढे करुन घेता येतात का ते बघा. म्हणजे एक सुट्टी दोघांची ओवरलॅपिंग आणि एक वेगवेगळी म्हणजे आठवड्यातले ३ दिवस आई/बाबांपैकी कोणीतरी किंवा दोघे मुलाला मिळत राहतात. शिवाय रोजचं ऑफिसला जायचं यायचं वेळापत्रक मागेपुढे करु शकलात तर ते उत्तमच. म्हणजे एकाने जरा लवकर निघून लवकर परत यायचे आणि दुसर्‍याने उशिरा निघून उशिरा परतायचे. मुलाला तेवढे तास आईबाबा जास्त मिळतात. हल्ली बर्‍याच आयटी प्रोफेशनल्सना आठवड्यातून एखादा दिवस वर्क फ्रॉम होम सवलत मिळू शकते त्याचा लाभ तुमच्या बाबतीत मिळू शकेल का नाही हे माहीत नाही परंतु शक्य असल्यास अजून एक दिवस पदरात पडला!
एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे आई आणि बाबा दोघांचाही ह्यातला सहभाग १००% हवा, दोघांनाही हा प्रश्न सोडवण्याची तेवढीच तळमळ हवी तरच हे शक्य आहे. हापिसातली कामे काय कायमची आहेतच. पोरांचे लहानपण मात्र एकदाच. ती मुठीतून निसटणारी वाळूच! जो जो क्षण टिपता येईल तो टिपा. ह्या आयुष्यभराच्या आठवणी असतात.
आता एनर्जी खर्च करण्याबाबत. मुलाबरोबर रांगा, जिना चढायला शिकवा, रंगीत लाकडी ठोकळे मिळतात ते आणा, खडूने कागदावर गिरगटायला शिकवा, चित्रांची पुस्तके आणा - खराब करुदेत रागवू नका, खिडकीला ग्रिल असेल तर तिथे उभे करुन कावळे, चिमण्या पक्षी दाखवा, सतत बोलत राहा. मुले ऐकून ऐकून बोलायला शिकतात. स्वयंपाकघरात असाल तर कांदे बटाटे, भांडी, चमचे वाट्या खेळायला द्या, इतरत्र असाल तर जुनी वर्तमानपत्रे फाडायला द्या (फक्त कागदाचे छोटे कपटे करत नाही ना तिकडे लक्ष ठेवावे लागते कारण घशात अडकून इजा होऊ शकते).

बाकी आमचे चिरंजीव म्हणजे झोपायच्या नावाने कहरच होता. तो रात्री २-२ वाजेपर्यंत गाड्यांचे डेपो करत आणि ट्रेन खेळत बसायचा. दिवे मालवून बेडवर टाकणे, थोपटणे, गाणे म्हणणे (माझ्या आवाजातले(?) लिंबोणीच्या झाडामागे त्याला फार आवडायचे!) सगळे प्रकार करुन झाले की थोड्यावेळाने म्हणायचा तुम्ही आता झोपा मी खेळत बसतो आणि आम्हाला बेडरुममधे सोडून स्वारी हॉलमधे अंधारात खेळत बसायची! मग कसली झोप येतेय, मी खेळायला बाहेर. दोन दोन वाजता खुळ्यासारखा गाड्या आणि ट्रेन आणि कायकाय खेळत मी बसलेला असे. चिरंजीव मग कधीतरी झोपायचे आणि मी व सौ सकाळी सहाला उठून हापिसच्या तयारीला. असे अनेक महिने केले. आमच्या आणी सौंच्या दोघांच्याही झोपा बोंबललेल्या होत्या. परंतु त्याला वाढवतानाचा जो आनंद मिळालायना राव त्याला तोड नाही. नथिंग कॅन काँपेन्सेट इट!
बाकी गविंचे अफलातून (ही द्विरुक्ती म्हणायची का?) सल्ले अनुभवातून आलेले आहेत याची १००% खात्री! :)

(रात्री २ वाजता झुंई करुन गाड्या खेळलेला)चतुरंग

रेवती's picture

11 Sep 2013 - 10:41 pm | रेवती

असे अनेक महिने
म्हणजे साठ महिने बरं का डॅडी! ;)

प्रभाकर पेठकर's picture

29 Aug 2013 - 2:30 am | प्रभाकर पेठकर

मुलं मस्ती करतात ती त्यांच्या शरीरातल्या अतिरिक्त उर्जेमुळे. घरात फक्त आजी आजोबा असतात आणि अर्थातच त्यांना नातवाच्या शारीरीक उर्जेशी जुळवून घेता येत नाही, अशक्यच असतं ते.
पण ह्याचा एक फायदा असा असतो की ही मुले मोठी झाल्यावर ती जी कांही कामे करतील जसे नोकरी, व्यवसाय दिवसभराची धावपळ ह्या साठी लागणारी शारीरीक क्षमता (स्टॅमिना), त्यांच्या जवळ, इतरांपेक्षा अधिक असते. भविष्यातील यशस्वीतेसाठी तो एक आवश्यक घटक असतो. ही मुलं थकत नाहीत. ती चांगली खेळाडू होऊ शकतात. अथक प्रयत्न करून यशस्वी होतात. त्यांचा कल पाहून त्यांना आवडणार्‍या कुठल्याही क्षेत्रात त्यांना टाकल्यास ती हमखास प्रगती करतात.

माझ्यासाठी फायदेशीर धागा ! :)

पिलीयन रायडर's picture

29 Aug 2013 - 11:52 am | पिलीयन रायडर

@ उपास
तुमचे मुद्दे पटले. तडजोडी तर करत आहोतच. पण त्यात मुलाचे कमीत कमी नुकसान व्हावी अशी इच्छा आहे. तुम्ही म्हणता तसं घरीच पुस्तकं आणुन पहाते. अजुन त्याला तेवढं कळत नाही. पण रंग/ चित्रं तरी समजतील.
@ चतुरंग
खुप छान प्रतिसाद. धन्यवाद!
ऑफिस मधुन शक्य तेवढी सवलत घेत आहोतच. त्याच्या बाबांनाही ही तळमळ आहेच. तुम्ही सांगितलेले उपायही करण्या सारखे आहेत. नक्की करुन पाहीन.
@ मोदक
रेकॉर्डींग चालुच असते!
@ पुजा
तुलना नाही करायची हे बरोबरच आहे. पण तरी काही पुस्तकांचा खुप फायदा होतो अगं..

@ आनन्दिता
मलाही हाच प्रश्न पडाला आहे. अनाहिता मध्ये डोकावुन यावं लागेल..!!

सर्व प्रतिसादकांचे ही आभार!!

मैत्र's picture

29 Aug 2013 - 12:30 pm | मैत्र

नवनीतची बोर्डबुक्स असतात - त्याची पानं ही जाड पुठठ्याची असल्याने फाटत नाहीत आणि उलटायला सोपी असतात.
मराठी / इंग्रजी सोय आणि आवडीनुसार आणा. लक्ष्मी रोड वा तत्सम ठिकाणी रस्त्यावरच्या विक्रेत्यापासून ते सर्व पुस्तकांच्या दुकानात सहज मिळतात.
चांगले रंग, नावे, मुलांना हाताळता येईल इतकाच आकार आणि योग्य प्रकारे केलेले वर्गीकरण -
फळे, फुले, अन्नपदार्थ, वाहने, रंग, प्राणी, पक्षी, आकार वगैरे..
रबरसदृश पण लवचिक नसलेले असे प्राणी मिळतात - सुमारे १२-१५ प्राण्यांचा संच. मुले आवडीने खेळतात आणि त्यातून माहिती वाढते. खेळण्याच्या काही तरी स्वतःच्या तर्‍हा तयार होतात.
ऑक्सफर्ड प्रेसची उत्तम गोष्टींची पुस्तके आहेत. पण बाहेरून कोणी येणार असेल तर सोयीचे पडेल.
अर्थात याने खूप एनर्जी वापरली जात नाही. पण नवीन शिकले जाते आपोआप. हळूहळू कळायला लागते. लगेच शिकत नाहीत पण अतिशय अनपेक्षित पणे समजून घेत अचानक एक दिवस बोलण्याचा किंवा समजलेले सांगण्याचा प्रयत्न करतात. संयम महत्त्वाचा. थोडी थोडी उजळणी करत राहा. कारण संपर्कात नसेल तर गोष्टी विसरतात. जर पुन्हा पाहिलंच नाही चार महिने हा विसरण्यासाठी पुरेसा काळ असू शकतो.
शक्य तितके बोलत राहा जसे काही तो मोठा आहे सुमारे ३-४ वर्षांचा आणि सर्व समजते अशा पद्धतीने. बरेचदा मुलांना बोलता येत नाही पण समजते आणि अनेक वेळा तर शब्दही समजलेला नसतो पण संदर्भावरून अर्थ समजतो!

रोज ठराविक वेळा खाण्याच्या, फिरण्याच्या / मोकळ्या जागी खेळण्याच्या केल्या तर रात्री वेळेत झोप येऊ शकते. पण काही मुलांमध्ये मुळात एनर्जी जास्त असते त्यामुळे शाळा सुरु होऊन त्याला वाव मिळेपर्यंत हा त्रास थोड्या फार प्रमाणात राहतो.
वेगवेगळे आकार / रंग हाताळायला द्या. आधी नाही जमले तरी पाहून पाहून ४-५ महिन्यात आकार समजू लागतात.

वेळ द्या या गोष्टिला मात्र कुठलाच पर्याय नाही. बहुतेक पालक दोघे नोकरी करणारे आहेत आजकाल. त्याला आणि आर्थिक गरजांना काही वेळा पर्याय नसतो. मग बरोबर खेळण्याच्या वेळा, शक्य असल्यास बाहेर घेऊन जाण्याच्या वेळा ठरवून ठेवा. मुलांना मग सवय होते आणि किमान तेवढा वेळ नक्की दिला जातो.

अर्थात इथे सर्वांनी दिलेले हे सर्व पर्याय आहेत किंवा सल्ले. त्यातून तुमच्या सोयीप्रमाणे, मुलाच्या आवडीप्रमाणे जे रूचेल पटेल ते घ्या. शुभेच्छा!

चाणक्य's picture

29 Aug 2013 - 2:59 pm | चाणक्य

मी माझ्या मुलाशी खेळतो ते काही खेळ सांगतो. नियम एकच. त्याच्या वयाचं होऊन खेळायचं. म्हणजे काय हे पहायचं असेल तर कोणतीही दोन लहान मुलं खेळताना पहा. तुमचं तुम्हीच समजून जाल.

१. मुलाबरोबर भरपूर बोलणे, त्याला समजेल असं पण बोबडं नाही. वर कुणीतरी म्हणल्याप्रमाणे मुलं ऐकून ऐकून खूप शिकतात.

२. त्याला चित्र काढून देऊन ती रंगवून दाखवणं. त्यालाच विचारायच कि कुठला रंग देऊ आणि तो सांगेल ते ऐकायचं. ऊगाच 'झाड कधी काळं असतं का' वगैरे शहाणपणा नाही करायचा. त्याने चित्र काढलं की त्याला प्रोत्साहन द्यायचं. मग त्याने नुसती रेघ ओढून हा वाघोबा आहे म्हणलं तरीही...कारण त्याला खरच वाघ दिसत असतो त्यात.

३. रात्री झोपताना ऊश्यांची मारामारी (हे मला पण लय आवडतं)

४. वेगवेगळ्या आकाराचे डबे मांडायचे आणि चमच्याने त्यावर आवाज काढून दाखवायचे

५. प्लॅस्टिकच्या रिकाम्या बाटल्या मांडायच्या. स्माईलीचा बॉल घेऊन त्याला सांगायचं कि लांबून बॉल फेकून बाटल्या पाड. माझ्या मुलाला मनूका खायला आवडायच्या. मग मी मनूका घेऊन बसायचो आणि त्याला सांगायचो की जितक्या बाटल्या पाडशील तितक्या मनूका मी तुला देणार.

६. साबणाचे फुगे करणे. पोरांना फार आवडतात.

७. जवळपास बांधकाम वगैरे चालू असेल तर वाळूच्या ढिगा-यात खेळू द्या त्याला मनसोक्त. आल्यावर स्वच्छ हातपाय धुवून द्या म्हणजे झालं

८. कागदाची होडी वगैरे करून टब मधे पाण्यात सोडणे, विमान बनवून दाखवणे. अजून उत्साह असेल तर ओरीगामी चं एखादं सोप्प बेसिक पुस्तक आणा. त्यात सोप्या सोप्या गोष्टी , उदा. बस, पक्षी, बेडूक, फूल ई, कसे बनवायचं ते दिलं असतं. खूप सोप्प असतं

९. पुटठ्याचा वगैरे बोगदा करून पुश बॅक गाड्या बोगद्यातून सोडणे. पोरांना बोगदा लय म्हणजे लय आवडतो.

१०. गाणी वगैरे हावभाव करून म्हणून दाखवणे. सोप्प्यासोप्प्या स्टेपस त्यांच्या समोर करणे. मुलं आपोआप नाचायला लागतात आपलं बघून. आणि मग दमून झोपतात. (कधी कधी वेळी अवेळी आपल्याला नाचायला पण लावतात. माझ्या मुलाने मला माझ्या सासूसमोर फर्शीवर साप होऊन दाखव म्हणून भोकाड काढलं होतं. त्याला आवडणारा खेळ त्याच्या आजी ला दाखवायचा होता )

११. रात्री झोपताना रामरक्षा / अथर्वशीर्ष / अजून कुठलही स्तोत्र म्हणणे. तुम्ही आस्तिक असा किंवा नास्तिक, या म्हणण्यामुळे मुलं ५ मिनिटे शांत बसून ऐकायला शिकतात. हळूहळू तडतड कमी करतात. (एखाद्या दिवशी त्याला कंटाळा आला तर नका म्हणू)

१२. शक्य असेल तर रोज बागेत घेऊन जा. त्याच्या वयाच्या मुलांमधे त्याला मिसळू द्या. पण त्याला बागेत खेळायला सोडून स्वतः मोबाईल वर असे प्लीज करू नका. त्याला तुमचा क्वालिटी टाईम द्या.

हे काही सोपे खेळ / मुलांचं मन रमवायचे उपाय मी स्वतः केले आहेत आणि त्याचा फायदाही झाला आहे. काही दिवसांनी मूल मोठं होईल तेव्हा त्या वयाचे खेळ सांगीन :-)

वर पुजा ने म्हणलं आहे 'पुस्तक वाचत बसशील तर अवघड आहे' पण पुस्तक वाचून आपल्यालही बरच कळतं. माझच उदाहरण देतो. माझ्या मुलाने हातातली कुठलीतरी गोष्ट पाडली म्हणून मी त्याच्यावर खेकसलो. दोन-तीन वेळा असं झालं. मग एकदा पुस्तक वाचताना समजलं की त्या वयात त्यांच्या 'ग्रॉस मोटर स्कील्स' डेव्ह्लप होत असतात. आपल्याला जे 'एखादी वस्तू हातात न पाडता धरणं' सहज आणि सोप्प वाटतं तितक ते त्यांच्यासाठी स्वभाविक नसतं. त्यांची चिमुकली बोटं ईतकी सराईत झालेली नसतात. मला फार वाईट वाटलं त्याला ओरडल्याबद्द्ल तेव्हा. त्यामुळे पुस्तकं जरूर वाचा. भारंभार नको पण एक्-दोन तरी वाचाच वाचा. स्पेशीअली कुठल्या वयात मेंदूचा कुठला भाग डेव्हलप होत असतो आणि त्या वाढीसाठी पूरक कुठले खेळ त्याला द्यावेत, यावरची पुस्तक तर जरूर वाचा.

पिलीयन रायडर's picture

29 Aug 2013 - 3:50 pm | पिलीयन रायडर

तुमचा पोरगा तुमच्या वर भलताच खुष असेल हो!! फार मस्त खेळ!!
माझ्याही मुलाला मनुका फार म्हणजे फार आवडतात.. पण त्याचा प्रलोभन म्हणुन वापर करण्या एवढा तो मोठा झाला नाहीये.. तो स्वत:ला "राजामाणुस" समजत असल्याने आम्ही सेवका सारखे त्याच्या इशार्‍यावर त्याला मनुका देतो.

'ग्रॉस मोटर स्कील्स' बद्दल मी कंपनीच्या पाळणाघरात वाचलं.. प्रत्येक महिन्याचा अभ्यासक्रम (?) मिळतो, त्यात ते 'ग्रॉस मोटर स्कील्स' कसे डेव्हलप करणार हे लिहीलेलं असतं. "सेन्सेस" हा ही एक मुद्दा असतो शिकवायचा.

मी सध्या मुलाला
१. वेगवेगळे वास देणे (क्रिम, साबण असे..)
२. रोज सकाळचा नाश्ता रेंगबेरंगी बनवणे (पिवळ्या धिरड्यावर हिरवी कोथिंबीर पांढरा नारळ खवुन..)
३. छोटी लाकडी बॅट आणली आहे आई-बाबांनी काश्मिर च्या फॅक्टरी मधुन. मुलगा आश्चर्यकारकरित्या उत्तम वापरतो. बॉलला मारतो (आणि मग सेंचुरी केल्या सार्खा बॅट वर उंचावुन ओरडतो). बॉल उचलुन फेकतो. टि.व्ही वर पण मॅच लागली की अतोनात खुष होतो आणि "नॅच नॅच" म्हणुन नाचतो. मी हे रोज खेळते, त्याच्या साठी बॅट धरून बॉल ला निट मारणे मोठी गोष्ट आहे.
४. रात्री झोपताना गोष्टी सांगायला सुरु केलयं. त्यात त्याला माहित असणारे शब्द वापरतो (हम्मा आली, भु भु ला घेउन.. मिंगा (मेघना (त्याची मावशी)) कडे जाऊया. त्यात खुप आवाज होतील असं पाहतो.. जसं की "धप्प.." .."भुर्र्र्र.."
५. झोपवताना तो जन्मल्या पसुन गाणी ऐकतो. त्याला चांगल्या ट्युन्स आवडतात हे माझं निरीक्षण आहे. म्हणुन मुद्दम वेगवेगळी गाणी म्हणतो.
६. भांड्यात भांडे (एकात एक टाईप काहीही) त्याने स्वतःच शोधलं. भांड्याच्या रॅक पाशी खेळण्यास त्याला फुल्ल परमिशन आहे. धुवुन आलेल्या भांड्यांच्या ट्ब मध्ये पाणी असते. त्यात तो तास्तास रमतो.
७. मोबाईल - ह्यावर गाणी लावणे आणि सिरी सोबत बोलणे हे त्याचं तो शिकला. गाणी लावुन नाचतो. सिरी साठी मधलं बटन दाबतो, बीप झाली की फोन तोंडाशी नेऊन "आsss" ओरडतो. ती परत बोलली काही की खुश होतो. ह्यात आम्ही काही करायची गरज नाही. तोच काही दिवसांनी मला शिकवेल.
८. त्याच्या आजीनी - "जय बाप्पा" शिकवलय.. देवाला हात लावायचा नाही हे त्यानं स्वत: समजुन घेतलय.. दिव्याला/ उदबत्तीला हात लावला की पोळतं हे तो अनुभवतुन शिकलाय..तोच आता "हाsss" म्हणुन आम्हाला सांगतो.
९. पण पोरगा फार हिंसक आहे. भयंकर चावतो, बोचकारतो... हा काय प्रकार असेल?? त्याला आधी "नाही.." असं म्हणुन दटावुन पाहिलं.. मग ओरडुन पाहिलं.. अगदी फटका पण दिला चिडुन (केसं ओढुन हसायचा.. आणि सोडायचाच नाही..).. तरीही तो बोचकारणं सोडत नाही. काय करावं????
चावण्याच्या बाबतीत इतकचं सुख आहे की तो घरातल्यांनाच चावतो, बाहेरच्याना चावत नाही. फक्त बोचकारतो.. (या एकदा आमच्या घरी!!)
१०. कान, नाक, केस कुठय.. हे शिकवुन झालय.. आता काल पासुन मला "बायको" म्हणायला लागलाय. आज विचारलं मी कुणाची बायको आहे? तर त्याच्या बाबांकडे बोट दाखवलं (भले तुक्का असेल..) पण मला अगदी भरुन पावलं..!! आपणहुन पोरं जेव्हा काही करुन दाखवतात तेव्हा जग जिंकल्या सारखं वाटतं!!

=))
आई म्हण्ते मी पण लानपणी खुप हिंसक होती ... चावणं , ओचकारणं ... बोचकारणं ...
केस ओढणं ... कहि दील नै कि जोरजोरात किंचाळुन रडणं ... जो मिळेल त्याला जे मिळेल
त्यानं धोपटुन काढणं :D

पण आता मी ह्यातलं काहिहि करत नै .... :-/

म्हणजे समजलं का ??? .....

वय वाढेल तसा कळतापणा येतो ... सो जास्त टेन्शन घेवु नको ... एन्जोय युअर बेबिझ मस्ती ;) :P

वैदेही बेलवलकर's picture

29 Aug 2013 - 5:12 pm | वैदेही बेलवलकर

माझी लेक सव्वा वर्षांची आहे. दिवसभर आजी-आजोबा, आत्यासोबत मज्जा करत असते. पण मी घरात शिरले कि मात्र तिला मम्माच हवी असते. सध्या बोलायचे प्रयत्न चालू आहेत. "तिकोलो… तकालो …. इदू …. बुबु " असं चालू आहे. बलून आणि बॉल दोन्हीला "बू" म्हणते. घरातले तसे इतर शेजारी सगळ्यांना "मां" बोलते.
जमिनीवर पडलेली प्रत्येक वस्तू, कागदाचे कपटे तोंडात घालायला आवडतं. जेवण तसेच इतर खाऊ भरवताना कंटाळा येतो पण तेच भाताची जमिनीवर पडलेली शीत उचलून खायला आवडतं. ६ महिन्याची असल्यापासून 'अग्गोबाई ढग्गोबाई ' आणि ' हनी बनी ' ऐकायला खूप आवडतं. मी तुनळीवरून काही इंग्लिश आणि मराठी बालगीतांचे VIDEO डाउनलोड करून ठेवलेत माझ्या मोबाईलमध्ये. त्यातलं " चब्बी चीक्स", "असावा सुंदर चॉकलेटचा बंगला", " सांग सांग भोलानाथ" "ससा रे ससा" हि गाणी बघायला तिला खूप आवडतं.
कोणाचाही मोबाईल वाजला कि लगेच "मां" बोलून मोबाईल कानाला लावून बोलल्याचा आविर्भाव करते. आम्ही काहीही न शिकवता आता ती आम्ही चब्बी चीक्स म्हटलं कि दोन्ही बोटांनी दोन गाल दाखवते. नाचायला तर तिला प्रचंड आवडतं. कुठेही गाणी ऐकू आली कि ती सरळ एक हात वर करून नाचायला सुरुवात करते. आजी भांड्याच्या रॅकवर भांडी लावत असते तेव्हा स्वताही छोट्या डिश आणि वाट्या काढून बरोबर त्या सेक्शन मध्ये ठेवते.
बाहेर फिरायला जायच म्हटलं कि लगेच SHOE RACK जवळ जाऊन स्वताचे शूज तसेच आमच्या चपला खाली काढून ठेवते.
कुकडी कु म्हटलं कि लगेच भिंतीजवळ जाऊन दोन्ही हातानी डोळे झाकून तिच्या भाषेत 1-10 मोजते आणि मग सगळ्यांना शोधायला सुरुवात करते. तिला एक बेसिक ABCD चं पुस्तक आणलंय. त्यातली सगळी चित्र बघायला खूप मजा येते तिला आणि हम्मा, डॉगी बघितल्यावर लगेच तोंडाचा मोठा आ वासून त्याच्यावर हात ठेवते आणि " मम्मा … हॉ " असं करून आश्चर्य व्यक्त करते. वर्तमानपत्र फाडायला खूप आनंद होतो. कावळा - चिऊताई बघितल्यावर दोन हातानी उडण्याच नाटक करते.
फ्रीज उघडायला, फिश ट्यांक मधल्या माशांना फिश फूड घालायला, बाथरूम मध्ये जाऊन (आम्ही कोणीतरी असतोच जवळ) बादलीतल्या पाण्यावर हातानी आवाज करायला, आजी पूजा करताना घंटा वाजवायला, कोणीही हैप्पी बर्थडे म्हटल कि टाळ्या वाजवायला तिला खूप आवडतं आणि तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून (वरती चार आणि खाली दोन दात आले आहेत त्यामुळे ती हसली कि खूप CUTE वाटतं) आम्ही सुखावतो.
अशा छोट्या मोठ्या अनुभवातून आम्ही रोज काहीतरी नवीन शिकतोय आणि आम्हांला शिकवता शिकवता ती मोठी होतेय.

ऋषिकेश's picture

30 Aug 2013 - 9:27 am | ऋषिकेश

स्वानुभव सांगतो मुलाला चांगल्या भरपूर मुले असलेल्या पाळणाघरात ठेवा.
आजीलाही दुपारची झोप मिळेल आणि मुलाला समवयस्कांमध्ये रमता येईल.

माझे आई-वडील सोबर राहत असूनही ४-६ तास मुलीला पाळणाघरात सोडतो (अगदी ७ महिन्यांची होती तेव्हा तास दोन तास सोडायचो आता दीड वर्षाची आहे तेव्हा ५-७ तास सोडतो). तीही तिथे जायला तीही उत्सूक असते. अनेक नव्या सहज गोष्टी शिकते. वेगवेळ्या भाषा कानावर पडतात, ठराविक वेळी ठराविक गोष्टींची आपोआप सवय लागते रुटीन सेट होते, फुकटचे हट्ट, रडरड (जी बर्‍याचदा कंटाळ्यामुळे होते) कमी होतात आणि मुख्य म्हणजे तिचे आजी आजोबा आणि आम्ही दोघेही फ्रेश असतो.

(तुम्हाला म्हणून सांगतो ;) महिना-दोन महिन्यातून एखाद्या कामकाजाच्या दिवशी दोघांनी सुट्टी काढून, मुलीला पाळणाघरात सोडून स्वतः पिक्चर बघणे, दुपारी शांत झोप काढणे यातही फार गंमत येते. करून बघा :P)

पिलीयन रायडर's picture

30 Aug 2013 - 9:47 am | पिलीयन रायडर

काय ओझं उतरलं हो माझ्या मनावरचं...
कसं होतं..की आपण दिवसभर घरात नसतो..खरं तर ही सगळी मरमर लेकरासाठीच असते. पण तरीही मनात एक अपराधीपणाची भावना असते. पाळाणघरात ठेवायचं म्हणलं (आणि तुम्ही सांगताय त्याच कारणांसाठी.. अजुन एक नवं वातावरण मिळावं म्हणुन..) की १० मधले ९ जण "अजिबात नको" असंच म्हणतात.. जो १ जण "बिनधास्त पाठवा" म्हणतो तो पाळणाघरात जाणर्‍या हसर्‍या पोराचा पालक असतो. अशी हसरी पोरं पाहिली की वाटतं राहील ना आपलंही पोरगं मस्त.. पण बॅकग्राउंड म्युझिक सारखे बाकी पण सल्ले मनात घोळत असतात. जसं की इन्फेक्शन होईल, खुप मुलांमध्ये नीट लक्ष दिलं जाणार नाही.. आणि ते बरोबरही असतात...
ह्या गोंधळामध्ये..अपराधीभाव घेऊन घरात शिरलं की डोकं धरुन बसलेले आजी आजोबा दिसतात.. त्यांच्या उरावर नाचणारं पोरगं दिसतं.. टीव्ही वरच्या कुठल्या तरी फालतु मालिकेच्या म्युझिक वर नाचत तो "लादा लादा (राधा) " किंचाळत असतो.. जरा कुठे आपलं मत पक्कं व्ह्यायला लाग्तं की ह्या पे़क्षा पाळाणाघरच बरं की जेवणाची वेळ येते..
आपलं लेकरु म्हणल्यावर आपण त्याच्या मागे पळुन पळुन त्याला २ घास जास्त भरवायचा प्रयत्न करतो. झोपेला आला की त्याची अजुन नाटकं सुरु होतात. तेव्हा अर्धातास मांडी हलवत, गाणी म्हणत आपण कुर्कुर न करता बसुन रहातो. मग ते अचानक ते कार्टं पिल्लु वाटायला लागतं.. वाटतं कोण ह्याचं असं निगुतीनी करणारे पाळणाघरात? आयुष्यात कोण कुणाचं करत?? ह्याच्या वाटणीचे २-३ च वर्ष.. मग शाळेचा धाक, मुलांमधली भांडणं , अभ्यास आणि अजुन ना ना प्रकार येणारचेत... असे गोंडस विचार मनात घोळवत आपण झोपतो.. आणि रात्री २ वाजता पुन्हा टाहो फोडुन "कार्टं" रडायला लागलेलं असतं.. त्याला भु बु, हम्मा दिसतं असते झोपेत..आपल्याला सकाळी उठुन ऑफिसला जायचय हे दिसतं असतं..
आई बापाला सगळंच समजत असतं की काहीच समजत नसतं..? पोराची काळजी असते, आजी-आजोबांची दगदग दिसते..नवरा बायकोनी गेल्या १-२ वर्षात साधा पिक्चर पाहिला नाहीये हे ही माहिती असतं.. फक्त ह्यावर नक्की "सर्वांना पटेल" असा उपाय काय... हे माहीत नसतं...

ऋषिकेश's picture

30 Aug 2013 - 5:21 pm | ऋषिकेश

खरं तर ही सगळी मरमर लेकरासाठीच असते. पण तरीही मनात एक अपराधीपणाची भावना असते. पाळाणघरात ठेवायचं म्हणलं (आणि तुम्ही सांगताय त्याच कारणांसाठी.. अजुन एक नवं वातावरण मिळावं म्हणुन..) की १० मधले ९ जण "अजिबात नको" असंच म्हणतात..

अगदी खरंय. त्यांची कारणंही बरोबर असतात. अनेकांना पाळणाघरांत विचित्र अनुभव येतातही.
म्हणूनच म्हटलं की "चांगलं व बरीच मुलं (व त्या प्रमाणात त्यांना सांभाळायला मावश्या) असलेलं" (शक्य व जवळ असल्यास एखादं प्रोफेशनल) पाळणाघर शोधा आणि मुलाला सोडायच्या वेळेत हळूहळू वाढ करा. त्याला जशी तेथील सवय नसते तशीच तेथील कर्मचार्‍यांना, मावशींना आपल्या मुलाची सवय नसते. दोघांना एकमेकांची सवय झाली की तुम्ही मोकळे! ;)

याचा अजून एक फायदा म्हणजे आजी-आजोबांना कधी चार दिवस कुठे जाऊन यायचं असेल किंवा काही कामं असतील तर आपल्या मुलांत अडकून रहावंही लागत नाही मात्र नातवाचा बर्‍यापैकी सहवास मिळाल्याने ते आनंदीही राहतात.

माझी मुलगी दिवसभर खेळून इतकी दमते की संध्याकाळी ७:३० ८ वाजता जी झोपते ते -मधे पाणी-दूधासाठी (डोळे मिटून - झोपेतच) रडणं सोडलं- तर सकाळी५:३०-६लाच उठते. रुटीन, झोपेच्या वेळा, जेवायच्या वेळा एकदम सेट. मुलीमुळे गेल्या वर्षात हार्डली ५-७ वे़ळा जागरण करावं लागलं असेल. :)

आजारी पडणं चालुच असतं हे खरंय पण ते त्या वयात सगळ्याच मुलांच चालु असतं. अ‍ॅन्टीबायोटिक्स किंवा इतरही उपायांचा भडीमार कटाक्षाने टाळल्याने आता तीची अंगभूत रोगप्रतिकारशक्ती वाढलेली कळत आहे.

दादा कोंडके's picture

4 Sep 2013 - 5:01 pm | दादा कोंडके

काय ओझं उतरलं हो माझ्या मनावरचं...

हम्म. मुळात आपण आपल्या मुलासाठी वेळ देउ शकत नाही ही टोचणी बर्‍याच जणांना असते. हे सगळं त्याच्याचसाठी तर चाल्लयं अशी स्वतःची समजूत करून घेणं हा शुद्ध दुटप्पीपणा असतो. मुलासाठी आपला क्वालीटी वेळ द्यायचा की तेव्हड्याच वेळात नोकरी करून चार दिडक्या फेकून त्याला पाळणाघरात ठेवायचं हा प्रत्येकाचा निर्णय असतो. त्या बदल्यात घराबाहेर पडण्याचं, आर्थिक स्वातंत्र्य मिळतं, अनुभवविश्व की काय, तर तेही विस्तारतं म्हणतात. काही पालक मात्र याची स्वतःला अजिबात रुख रुख लावून घेता, न लाजता :) पोरांना पाळणाघरात टाकतात. पण केवळ अशीही लोकं असतात हे कळल्यावर पहिल्या प्रकारातल्या लोकांनी 'हुश्श्य' का करावं हे कळलं नाही.

पिलीयन रायडर's picture

4 Sep 2013 - 6:06 pm | पिलीयन रायडर

बाहेर जाऊन कमावण्याचा "दिडक्या फेकुन पोरांना पाळणाघरात ठेवता येणे" हा एकच उपयोग नसतो. समजा माझं उत्पन्न नसतं तर आज नक्की काय काय माझ्या पोराने गमावलं असतं
१. मोठं घर - आम्ही ५-६ जण आहोत म्हणजे ४ खोल्या हव्यात. आता एक पगार येत नसेल तर, फक्त एकाच्या पगारावर घर घ्यावं लागेल, त्यातच बाकीचं सगळं भागवावं लागेल (किराणा, दुध, भाज्या, औषधं आणि अजुन खूप काही)
२. अर्थातच ह्या सगळ्यात काटकसर करावी लागणार. म्हणजे ती पण एक तडजोड आहे.
३. लक्झुरी म्हणता येतील अशा गोष्टी - पुस्तकं, सिडिज, खेळणी, पर्यटन इ. ज्यात काटकसर होईल.
४. सर्वात मह्त्वाचं - माझ्या मुलगा जन्मला तेव्हा त्याला एक त्रास होता ज्यातुन तो कदाचित जगलाच नसता. जवळपास आहे ते विकावं लागतय की काय अशी परिस्थिती होती. माझ्या कंपनीच्या इन्शुरन्स ने ८०% भार उचलला. तरी लाखभर रुपये आमचेही इतरत्र खर्च झाले. अजुनही होत असतात. ह्या सगळ्याचा भार एकट्याच्या पगारावर उचलता आला असता का? असेच घरात बाकी पण मेंबर आहेत ज्यांना दुखणी आहेत. त्यांच्या आयुष्याचा विचार करु की क्वलिटी टाईमचा?

तशी तर रस्त्याच्या कडेला, खरकट्यावर भिकार्‍याची पोरं पण जगतात. प्रश्न हा आहे की तुम्हाला तुमच्या मुलाला नक्की कसं वाढवायचय? तुम्ही म्हणाल करा काटकसर आणि जगा.. पण मुलांना वेळ द्या. हे लिहीताना तुमचे गुहितक असे आहे की दोघांचे पगार हे "जरुरी पेक्षा जास्त" आहेत. कशावरुन? ज्यांना घरातुन रुपयाही मिळाला नाही, आणि ज्यांना ० तुन सगळं एका शहरात उभं करायचं आहे त्यांच्यासाठी अशा महागाईमध्ये (मोठ्या कुटुंबाला पोसण्यासाठी) एकाचाच पगार पुरेल का?

केवळ आर्थिक स्वातंत्र्य मिळावं म्हणुन लोक बाहेर जात असतील की आर्थिक गरजा पुर्ण व्हाव्या म्हणुन? मला कुणी घरबसल्या महिन्याच्या पगारा एवढे पैसे देणार असेल तर मी का पडेन घरा बाहेर?

आणि हुश्श का केलं हे तुम्हाला समजेल असं वाटत नाही त्या मुळे

स्वतःला अजिबात रुख रुख लावून घेता, न लाजता पोरांना पाळणाघरात टाकतात. पण केवळ अशीही लोकं असतात हे कळल्यावर पहिल्या प्रकारातल्या लोकांनी 'हुश्श्य' का करावं हे कळलं नाही.

ह्या विनाकरण वैयक्तिक वाक्याला फाट्यावर मारत आहे.

दादा कोंडके's picture

4 Sep 2013 - 7:16 pm | दादा कोंडके

१. मोठं घर - आम्ही ५-६ जण आहोत म्हणजे ४ खोल्या हव्यात. आता एक पगार येत नसेल तर, फक्त एकाच्या पगारावर घर घ्यावं लागेल, त्यातच बाकीचं सगळं भागवावं लागेल (किराणा, दुध, भाज्या, औषधं आणि अजुन खूप काही)

बरोबर

२. अर्थातच ह्या सगळ्यात काटकसर करावी लागणार. म्हणजे ती पण एक तडजोड आहे.

सहमत

३. लक्झुरी म्हणता येतील अशा गोष्टी - पुस्तकं, सिडिज, खेळणी, पर्यटन इ. ज्यात काटकसर होईल.

हम्म.

४. सर्वात मह्त्वाचं - माझ्या मुलगा जन्मला तेव्हा त्याला एक त्रास होता ज्यातुन तो कदाचित जगलाच नसता. जवळपास आहे ते विकावं लागतय की काय अशी परिस्थिती होती. माझ्या कंपनीच्या इन्शुरन्स ने ८०% भार उचलला. तरी लाखभर रुपये आमचेही इतरत्र खर्च झाले. अजुनही होत असतात. ह्या सगळ्याचा भार एकट्याच्या पगारावर उचलता आला असता का? असेच घरात बाकी पण मेंबर आहेत ज्यांना दुखणी आहेत. त्यांच्या आयुष्याचा विचार करु की क्वलिटी टाईमचा?

खरं आहे तुमचं म्हणणं.

तशी तर रस्त्याच्या कडेला, खरकट्यावर भिकार्‍याची पोरं पण जगतात. प्रश्न हा आहे की तुम्हाला तुमच्या मुलाला नक्की कसं वाढवायचय? तुम्ही म्हणाल करा काटकसर आणि जगा.. पण मुलांना वेळ द्या. हे लिहीताना तुमचे गुहितक असे आहे की दोघांचे पगार हे "जरुरी पेक्षा जास्त" आहेत. कशावरुन? ज्यांना घरातुन रुपयाही मिळाला नाही, आणि ज्यांना ० तुन सगळं एका शहरात उभं करायचं आहे त्यांच्यासाठी अशा महागाईमध्ये (मोठ्या कुटुंबाला पोसण्यासाठी) एकाचाच पगार पुरेल का?

रास्तच आहे तुमचं म्हणणं.

पण हे वरील विचार प्र्याक्टीकल विचार करणार्‍या बायकोचे आहेत. एक आई म्हणून मुलाला वेळ देता न येणं याची कायम तुम्हाला चुटपूट लागलीच पाहिजे. जेंव्हा ही अपराधीपणाची जाणीव पैश्यापेक्षा वरचढ होइल तेंव्हा तुम्ही नोकरी सोडून मुलाला वेळ द्याल. आई (आणि वडीलांची) बरोबरी दुसरं कुणिही करू शकत नाही. आता स्वतःच्या समजुतीसाठी मुलं पाळणाघरात राहून सोशल होतात म्हणा हवं तर. पण ते काही खरं नव्हे हो.

पिलीयन रायडर's picture

4 Sep 2013 - 7:28 pm | पिलीयन रायडर

मला चुटपुट लागते.. पण तशी सगळ्यांनाच "लागलीच पाहिजे" असं मला वाटत नाही. तो प्रत्येकाचा वैयक्तीक प्रश्न आहे. समजा कुणाचे मुल फार सोशल नसेल तर पाळणाघरात जाणं त्याच्या फायद्याच आहे. शिवाय मुल ३-४ वर्षाच होईस्तोवरच हा प्रश्न आहे. नंतर मुलं शाळेत जातात, त्यांच स्वतःच रुटीन सुरु होतं. मग तेवढ्या ३-४ वर्षांसाठी अनेक वर्षांपसुन असलेली, कष्टाने मिळवलेली आणि सोडली तर परत (३-४ वर्षाच्या गॅप नंतर) मिळण्यास कर्मकठीण नोकरी का सोडायची? त्या ऐवजी थोडी तडजोड करणे आप्ल्या आणि मुलांच्या संपुर्ण आयुष्यासाठी उपयोगी नाही का? आता त्या मुळे पर्यायाने जे इतर प्रश्न उभे रहतात ते सोडवायलाच हा धागा काढलाय ना?
तसंही आई घरी असण्याचेही तोटे असतात.. कुठलीच परिस्थिती १००% योग्य कधीच नसते.

एक आई म्हणून मुलाला वेळ देता न येणं याची कायम तुम्हाला चुटपूट लागलीच पाहिजे. जेंव्हा ही अपराधीपणाची जाणीव पैश्यापेक्षा वरचढ होइल तेंव्हा तुम्ही नोकरी सोडून मुलाला वेळ द्याल

एक कळलं नाही हे तुम्ही आईलाच उद्देशून म्हणताय का दोन्ही पालकांना? कारण अशी चुटपट वडिलांनाही असलीच पाहिजे.

मग दोघांनी आपापल्या आतले आई-बाबा जागवून किंवा एक आई-बाबा म्हणून चुटपुट लागवून घ्यावी आणि अप्राधीपणा पैशापेक्षा वरचढ झाला की दोघांनीही नोकरी सोडून देत मुलांना वेळ द्यावा असे आपले म्हणणे आहे का?

का अशी चुटपुट लाऊन घेणे हे फक्त आईचेच कर्तव्य आहे (आणि बाप हे फक्त पैसेच कमवायचं मशीन आहे) असं आपलं म्हणणं आहे?

पिलीयन रायडर's picture

5 Sep 2013 - 3:58 pm | पिलीयन रायडर

बरोबर.. हा प्रश्न विचारायचा होता मलाही..
आईच का? वडील का नाही?
स्पष्ट विचाराय्च झालं तर "आईने नोकरी करु नये" असं तुम्हाला म्हणायचय का?

दादा कोंडके's picture

6 Sep 2013 - 10:39 am | दादा कोंडके

(या धाग्यावर आता) गप्प बसायचे ठरवले आहे.

- डोक्यात बत्ते

ब़जरबट्टू's picture

6 Sep 2013 - 11:13 am | ब़जरबट्टू

"आईने नोकरी करु नये" असं तुम्हाला म्हणायचय होते म्हणून तुम्ही गप्प बसलेत का ? मुद्दे येऊ द्या हो, गप्प बसतो म्हणून "मन्नूला" कुणी चांगले समजत का ? :)

दादा साहेबांच्या आशयाशी काही अंशी सहमत.
अर्थात चुट्पुट आई-वडील दोघांना पण असली पाहीजे नव्हे ती असतेच. पण मुलांचे भवितव्य घडवण्यासाठी / सुरक्षित करण्यासाठी आणि स्वतःचे निव्रुत्तीनंतरचे जीवन मुलांवर (आर्थिक बाबतीत) अवलंबुन न राहण्यासाठी पैसा मिळवणे चुकीचे नाही.
पण माझ्या बघण्यात, जवळच्या नात्यात (काकी, आत्या, वहीनीची आई वगैरे..) अश्या बर्‍याच स्त्रिया आहेत ज्यांनी मुले सातवी-आठवीत असताना नोकरी सोडुन पुर्णवेळ ग्रुहीणी राहुन मुलांकडे लक्ष द्यायचा निर्णय घेतला.
याची कारणे अशी असु शकतील की या वयापर्यंत नोकरी (साधारण १५-१७ वर्षांची नोकरी)करुन पुरेशी शिल्ल्क जमा झालेली असते (पुरेशी कशाला म्हणावे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे)आणि मुलांची महत्वाची शैक्षणिक वर्षे जवळ आलेली असतात, हे मुलांचे वयात येण्याचे वय असते आणि त्यांना वाईट संगतसुद्धा याच वयात लागु शकते.
आता आइनेच नोकरी का सोडवी वडीलांनी का सोडु नये यावर तर मी बोलणार देणार नाही (हा काथ्या अनेकदा कुटुन झाला आहे) तरीपण जर वडील घरातील कामे करायला तयार असतील तर त्यांनी सोडवी नोकरी. त्यांना आणि आईला चालत असेल तर. (दोघांचे आर्थिक उत्पन्न सारखे धरले आहे)

वैदेही बेलवलकर's picture

30 Aug 2013 - 11:10 am | वैदेही बेलवलकर

आई बापाला सगळंच समजत असतं की काहीच समजत नसतं..? पोराची काळजी असते, आजी-आजोबांची दगदग दिसते..नवरा बायकोनी गेल्या १-२ वर्षात साधा पिक्चर पाहिला नाहीये हे ही माहिती असतं.. फक्त ह्यावर नक्की "सर्वांना पटेल" असा उपाय काय... हे माहीत नसतं... ++++++++++ १
कधी कधी तर मनात खूप अपराधीपणाची भावना येते कि आपण जन्म तर दिला पण तिच्यासाठी वेळच नाहीये आपल्याकडे.

अनन्न्या's picture

30 Aug 2013 - 4:20 pm | अनन्न्या

मी स्वत: लेकाच्या या वयात घरातच होते. म्हणून तुझ्या समस्येवर काय उपाय ते पटापट सांगण्यासारखे सुचले नाही. म्हणून वाचनमात्र राहिले. काहीच प्रतिक्रीया नाही दिली. खरंतर इथल्या बाबा लोकांनी इतके मस्त उपाय सुचवलेत की या साध्या साध्या गोष्टी इतक्या व्यवस्थितपणे नसत्या सांगता आल्या मला!

विजुभाऊ's picture

31 Aug 2013 - 11:44 pm | विजुभाऊ

मीझी मुलगी अशीच भरपूर अ‍ॅक्टीव्ह होती. प्ले गृप ला जायला लागल्यावर तिला मित्रमैत्रीणी मिळाले. त्यामुळे तिचा वेळ बरा जाऊ लागला. तसेच तिच्या अंगातली एनर्जी जिरायला मदत झाली. प्लेगृप मधे मुले बरीच खेळत असतात. त्यात त्यांचा वेळ जातो. इतक्या लहान वयात संगीत वगैरे शिकवणॅ शक्य नाही. मात्र शक्य असेल तर मुलाना बालगीते सतत कानावर पडत राहीली तर त्यांचे स्वरज्ञान तयार होते. अडीच वर्षानंतर त्याना गाणे शिकवू शकतो.
मुलाना चेंडु / फुगे अशा गोल वस्तु फार आवडतात. त्यातही ते रम्गीत असेल तर मजा येते.

दशानन's picture

31 Aug 2013 - 11:51 pm | दशानन

आमच्या घरात एक रत्न ८ महिन्यापुर्वी आले आहे, आराध्या!!!

देवा रे.. माझा सारखा हॉरेबल अंकल कोणाला असू नये ;) तिचा मुड मला एवढा पटकन कळतो की मी तिच्या मुड नुसार वागतो व ती बया फक्त माझ्यासोबत असली तरच बोलते.. तीचे आई-बाबा काय वाटेल ते करु देत.. आज्जी काय वाटेल ते करु दे.. पण ही एक शब्द बोलेले तर शपथ. दंगा करेल, हसेल पण बोलणार नाही.
पण माझ्याशी मस्त गप्पा मारते... तीला बाईक राईड आवडते.. का नाही आवडणार आसपासच्या सगळ्या बाईक्स मध्ये माझी बाईक मोठी आहे, व रेड कलर आहे ;)

पुस्तके वाचा, सगळे लिहलेले असते.. मुलांना/बाळांना कश्याचे आकर्षण असते.. :)

पैसा's picture

4 Sep 2013 - 4:44 pm | पैसा

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक मूल वेगळे असते. त्याच्या आवडीनिवडी, तसेच बौद्धिक, मानसिक आणि शारीरिक विकासाचा वेग संपूर्ण वेगळा असतो. त्याच्याशी आपण जुळवून घ्यावे लागते. माझ्या एका चुलतबहिणीच्या मुलीला १ वर्षाची झाली तरी दात आले नव्हते. ती एकदा म्हातार्‍या फॅमिली डोक्टरकडे गेली तेव्हा सहजच म्हणाली की मुलीला अजून दात आले नाहीत. डॉक्टर म्हणाले, "तुम्ही लोकं काळजीच फार करता. मी माझ्या आयुष्यात अजूनपर्यंत दात न आलेला मनुष्य पाहिला नाही!" तेव्हा जस्ट रिलॅक्स!! टेन्शन घेऊ नको.

माझ्या २ मुलांत जमीन अस्मानाचा फरक होता. मुलगी ११ व्या महिन्यात चालणे आणि बोलणे व्यवस्थित शिकली. वर्षाची असताना ती व्यवस्थित गाणी म्हणत असे! मात्र खूप नाजूक आणि अशक्तच होती. खाण्यापिण्याचीही कटकट असायची. मात्र मुलगा असाच चळवळ्या, सतत काहीबाही करत असायचा. पण २ वर्षाचा होईपर्यंत बोलत नव्हता. आपण हाक मारली तर लक्षही देत नसे. शेजारी रहाणार्‍या एका डॉक्टरला तर शंका आली की हा ऑटिस्टिक आहे की काय! त्यामुळे आम्हीही घाबरलो. आणि त्याच्या सायकिट्रॅस्टकडेही फेर्‍या झाल्या. त्यांनी आणि त्याच्या पेडिआट्रिस्टने मात्र ठामपणे सांगितलं की याची शारीरिक स्किल्स इतर मुलांपेक्षा जास्त डेव्हलप झालीत, मात्र त्याचा आयक्यु नॉर्मलपेक्षा थोडा जास्त आहे. अशी मुलं खूपदा भाषेच्या स्किल्सकडे सुरुवातीला दुर्लक्ष करतात.

नंतर तो हळूहळू बोलायला लागला. ते मात्र अगदी नॉर्मल संभाषण! मात्र सुरुवातीपासून त्याच्या हालचाली एवढ्या ऑर्गनाईज्ड असायच्या की रांगत असतानाही कूकरला हळूच एक बोट लावून बघायचा गरम आहे की काय म्हणून! आज दोघंही व्यवस्थित शिकत आहेत. आणि त्यांच्या वयाला ज्याला नॉर्मल म्हणता येईल असेच वागतात.

आम्ही एक पथ्य नेहमी पाळलं, ते म्हणजे कधीही त्यांच्याशी बोबडं बोललो नाही. मोठ्या माणसासारखं बोललो. त्यामुळे बोबडं बोलणे हा प्रकार दोन्ही मुलांनी फारसा केला नाही. खेळाच्या बाबतीत म्हणशील तर वाढणार्‍या मुलांसाठी प्रत्येक गोष्ट ही खेळाची संधी असते. तशीच शिकायचीही संधी असते. त्याचं फार टेन्शन घेऊ नको. दुसरा काही ऑप्शन मिळाला की टीव्ही पाहणे कमी होईल. आम्ही दोघाही मुलांना गाड्या, भातुकली, बाहुल्या, सायकली वगैरे खेळणी जेव्हा जशी हवी असतील तशी दिली.

सगळी मुलं वेगळी असतात तसे आजी आजोबाही वेगळे असतात. त्यामुळे एखादी आजी मुलांसोबत मजेत राहील तर दुसरी एखादी आजी कंटाळून जाईल हेही आपण समजून घेतले पाहिजे. एकदा माझ्या सासूबाई मारे माझ्या मुलाला गाणं म्हणून झोपवत होत्या, तर हा ३ वर्षांचा औरंगझेब म्हणे, "आजी तू मला गाणं झोपवण्यासाठी म्हणतेस की जागं ठेवण्यासाठी?" त्यांचे आपसातले संबंध जसे असतील तसे राहू देत. त्यात मधे पडू नये.

मुलांना पाळणाघरात ठेवण्याचा एक फायदा म्हणजे मुले सोशल होतात. पण त्याचवेळी तिथे कोणी संसर्गजन्य रोगाने आजारी मूल येत नाही ना यावर लक्ष ठेवावे लागते. शेअरिंगची सवय लागेत असं म्हणतात, पण त्याबद्दल मी जरा साशंक आहे. कारण धाकटे भावंड आल्यानंतर जेलसी ची बाधा होते ती खरं म्हणजे कधीच जात नाही.

मुले वाढवणे यावर दुसर्‍याला सल्ले देणे फार सोपे आहे. पण असे काही प्रॉब्लेम्स आणि काळज्या आठवल्या की आपण कशातून गेलोय याची आठवण आता नको वाटते. काही वर्षांनी नातवंडे सांभाळायला मी बहुतेक तयार होणार नाही!

सुबोध खरे's picture

7 Sep 2013 - 9:42 am | सुबोध खरे

मुळात मुलाच्या आणी मुलीच्या वाढीचे गणित वेगळे आहे. मुली मुलांपेक्षा लवकर बोलायला आणी चालायला लागतात. त्यामुळे त्यांच्यात तुलना करणे चुकीचे आहे.
तसेच दोन मुलांमध्ये (किंवा दोन मुलींमध्ये) तुलना करणे सुद्धा चुकीचे आहे. आपल्याच दोन्ही हाताच्या अंगठ्यांचे ठसे जुळत नाहीत तर दोन मुले सारखी कशी असणार?
माझ्या कडे येणाऱ्या स्त्री रुग्णांची हि तक्रार मी इतक्या सुरात आणी तालात ऐकली आहे कि आता मी शेवटी त्या स्त्रियांना शांत पणे विचारतो कि जर तुम्ही आपल्या मुलाची शेजारच्या मुलाशी तुलना करता तर तुमच्या यजमानांनी तुमची तुमच्या शेजारणीशी तुलना केली तर चालेल काय? हे वाक्य शंभर हिस्श्यानि लागू पडते.
मुळात मुल कसे वाढवायचे हा विषय बायकोशी(किंवा नवर्याशी) कसे वागायचे यासारखे गहन (आणी अजून कोणालाही नक्की न सापडलेले) आहे. आणी कोणताही एक मंत्र किंवा सूत्र याला लागू पडत नाही असे आमचे मत आहे.

मी माझ्या आयुष्यात अजूनपर्यंत दात न आलेला मनुष्य पाहिला नाही!

किती विनोदी असावा हा डॉक्टर!!

arunjoshi123's picture

6 Sep 2013 - 5:57 pm | arunjoshi123

१. लहान मुलांवर कसलेच प्रयोग करू नयेत.
२. स्वतःला त्याच्यापेक्षा शहाणे समजून वागू नये.
३. मुलांना थोडेसे आळशी बनू द्यावे.
४. आपले विचार लादू नयेत.
५. दोन मुले भांडू लागली तर भांडू द्यावी, मधे पडून कलकलाट करू नये.
६. जबरदस्तीने खाऊ घालू नये, आवडत नाही ते खाऊ घालू नये.
७. दहा पेक्षा जास्त तास गाढ झोपी घालावे, १० वर्ष वय होईपर्यंत
८. हजार गोष्टी शिकवू नयेत.
९. रागावू नये.
१०. फालतूचे संस्कार करू नयेत.
११. आपण, आपले स्वत्व महत्त्वाचे कि मूल महत्त्वाचे ते नीट ठरवावे. उलटसुलट वागू नये.
१२. त्यांच्यासमोर भांडू नये.
१३. त्यांना न आवडणार्‍या गोष्टी करायला लावू नये.
१४. अभ्यासाची सक्ती करू नये.
१५. घाण झाल्यानंतर नॅपी लगेच बदलावी. घरी पोहचायची वाट पाहू नये.
१६. ९ वर्षापर्यंत इंजेक्शने द्यावीत
१७. मुलाने बोलणे चालू केले तर मोठ्यांनी आपले बोलणे बंद करावे आणि त्याचे ऐकावे.
१८. तो कसा आहे त्याची जास्त वर्णने करू नयेत.
१९. त्याने एखादा अपशब्द बोलला तर तो लगेच त्याच्या मेमरीतून वाईप करू नये.
२०. खेळणे देण्यास मना करू नये.
२१. नवनविन कपडे घेऊन द्यावेत.
२२. 'आपली आपल्या आयुष्यातील अपूर्ण स्वप्ने...' इ त्याच्यावर लादू नयेत.
२३. प्रत्येन प्रश्नाला 'अर्थपूर्ण' असे उत्तर द्यावे.
२४. मुलांच्या झोपेत व्यत्यय येईल असे काही करू नये.
२५. खाणे, कपडे घालणे, ब्रश करणे, इ इ लवकर शिकावे म्हणून अट्टाहास करू नये.
२६. मुलाचे काम तू करायचे कि मी या वादात लांबवू नये.
२७. मूलावर खर्च झालेल्या पैशाच्या हिशोब ठेऊ नये.
२८. मूलासाठी आपण त्याग करत आहोत अशी भावना मनात आणू नये.
२९. मूलाची इतर मूलांशी कोणतीच तुलना करू नये.
३०. मूलाला दूध पाजवावे.

संजय क्षीरसागर's picture

7 Sep 2013 - 3:20 pm | संजय क्षीरसागर

सगळे मुद्दे बिनचूक आहेत.

प्यारे१'s picture

7 Sep 2013 - 5:05 pm | प्यारे१

प्रिंट आऊट काढतो.

पिलीयन रायडर's picture

8 Sep 2013 - 6:32 pm | पिलीयन रायडर

___/\___

जमिनीवर पालथं पडुन साष्टांग दंडवत!! प्रिंट आउट काढली आहे.. !!!
उगं टेन्शन घ्यायची मुळात गरजच नाहीये.. पोरगं बरोब्बर नीट वाढणार आहे.. आपल्याच फुकाचं डोकं लावायची दिव्य हौस आहे ती कंट्रोल मध्ये ठेवावी लागणारे!!!

पद्मश्री चित्रे's picture

8 Sep 2013 - 7:22 pm | पद्मश्री चित्रे

खरं आहे गं.
माझे पण दोन मुलगे आहेत, पण ते अगदी लहान असताना पण मी नोकरी केली, प्रमोशन्स घेतली . घरी आजी-आजोबा होते आणि ते त्यांच्या परीने बघत पण होते. ही टेंपररि फेज आहे हे लक्षात घे. शक्य नसेल तर नोकरी सोडु नकोस. रुखरुख वाटते , पण इलाज नाही . घरी आई असणं, आजी-आजी-आजोबा नी बघणं , पाळणाघरात ठेवणं सगळ्याचे फायदे-तोटे आहेत. नोकरी सोडली नाहीस तर पुढे शाळेत पण जाणवत रहातं की घरी असलेल्या आया मुला.चे प्रोजेक्ट्स , डान्स यात जास्त पुढे असतात, आपण तितका वेळ नाही देवू शकत, त्याची तयारी ठेव मनाची . अर्थात, त्याने काही फार फरक पडत नाही, मुलं आपोआप शिकत जातात थोडं मोठं झाल्यावर. काही गोष्टी मात्र मी आवर्जून करत असे-

१. घरी आल्यावर फ्रेश होवून किमान एक तास तरी मुलां सोबत फक्त बोलायचं. आजी-आजोबांच्या (क्षु ल्ल क असल्या तरी) तक्रारी ऐकायच्या.
२. सुट्टी असेल तेव्हा दोघांनी मुलांना घेवून बाहेर जायचं-बाग,झू ,तलावपाळी.
३. वेळ ची भरपाई भारं-भार खेळणी आणुन करायची नाही, त्याचा काही उपयोग नसतो, उलट मुलं लवकर हा दोष ओळखतात आणि त्याचा बरोब्बर फायदा घेतात थोडं मोठं झाल्यावर.
४. स्वत:ची एनर्जी लेव्हल थोडी वाढवायची जेणे करून ऑफिस, प्रवास याचा आपला ताण मुलांना जाणवणार नाही .

शक्य असल्यास एखादी मुलगी ठेव दिवसभर घरी , म्हण्जे मूल घरात पण राहील, आजी-आजोबा पण कमी दमतील कारण ती मुलगी त्याच्या बरोबरीने खेळू शकेल.

arunjoshi123's picture

11 Sep 2013 - 1:52 pm | arunjoshi123

३१. स्वप्ने - आजकालची मुले टीव्ही फार पाहतात. त्यात खूप दुष्ट लोक खूप दुष्टपणे वागतात. छोटा भीम, इ मालिकांतला खलनायक आपल्याला तकलादू वाटला तरी मुलांना तो 'भिकारी' वैगेरे विषयांवर लिहिणारा कोण तो कादंबरीकार, त्याच्या पुस्तकातल्या विकृत लोकांइतकाच खल वाटतो. म्हणून मुलांना खूप जास्त संख्येने आणि खूप घाबरवणारी स्वप्ने पडतात. म्हणून ती सामान्य माणसापेक्षा झोपेतून जास्तवेळ , जास्तदा उठतात, सूसू करतात. पण सकाळी स्वप्न विसरतात आणि आपल्याला सांगू शकत नाहीत.
सबब मुलांना आई बाबांनी त्या खलनायकाला कसे ठोकले आहे, त्याला पालक मुलाला कसे स्पर्शही करू देत नाहीत, स्वप्नात त्याचा पाठलाग कसे करू देत नाहीत, त्याला कसे टाइट बांधून टाकतात असे सांगत राहावे. असा व्हिलेन आला आणि बाळाने नुसते 'आई' म्हणून बोलावले तर ती कशी व्हिलेनला एका फटकार्‍यात ढिशूं करून लोळवते याच्या साग्रसंगीत कहाण्या सांगाव्यात. शेवटी मुलाला त्या पटून तो बिनधास्त झोपू लागतो.

३२. श्रद्धास्थान - मुलांचा नेहमी कोणी ना कोणी एक हिरो असतो. त्याने ते फार भारी प्रभावित झालेले असतात. उदा. छोटा भीम, मोगली, बेंटेन, नोबिता, हल्क, इ इ. पालकांनी स्वतः हिरो बनण्याचा प्रयत्न करू नये, ज्या लोकांच्या चूकांचा टेप २४ तास मूलासमोर चालू असतो ते लोक हिरो बनू शकत नाहीत. सध्याला माझ्या ६ वर्षाच्या मुलाचा हिरो 'द ग्रीन हल्क' आहे. त्या हल्कच्या नावावर, आणि त्याच्या मायबापांच्या आमच्या झालेल्या माहितीच्या तथाकथित आदानप्रदानाच्या नावावर मी मुलाला सगळी एरवी त्याची नावडती हिरवी फळे, हिरव्या भाज्या, मसल येण्यासाठी पुशअप्स खपवले आहेत.

सबब मुलाचे असे एखादे श्रद्धास्थान बनवावे आणि त्याच्या कल्याणाच्या चार गोष्टी त्याच्या गळ्यात मारायच्या असतील तर त्याला नेहमी नेहमी असा 'निष्पक्ष' संदर्भ द्यावा. या धाग्यावर कव्हर झालेली मुले थोडी लहान आहेत, पण ती लवकरच मोठी होणार आहेत आणि त्यांना १-२ वर्षापासून हे सूत्र लागू पडते.

३३. सुप्तप्रेम - ऑफिसमधे दिवसभर मुलाची चिंता केल्याने मुलाला काही मिळत नाही. मुलांना असे 'अंतःकरणातले प्रेम' कळत नाही आणि नको असते. त्यापेक्षा त्यांना डायरेक्ट प्रेम आवडते. म्हणजे बाबा त्याला सोडून रोज ऑफिसात 'त्याच्या भविष्यासाठी गेले' तर ते त्याच्यामते काही कामाचे नसते. म्हणून सहसा आतड्याला पिळ पाडून प्रेम करणे टाळावे. याउलट ऑफिसातून एखादा फोन टाकून साहेब काय करत आहेत ते जाणावे. उदा. ते नॅशनल जिओवर डायनासोर पाहात आहेत. मग इंटरनेटवरून डायनोसोरचा एक मस्त कलर प्रिंट काढावा व घरी गेल्यानंतर हा 'हे दुर्मिळ चित्र दिवसभर झटून तुझ्यासाठी आणले आहे' असे सांगावे. मग बाबांच्या विरहाचे दु:ख कमी होते आणि आपण त्यांना कामाला जुंपले आहे अशी एक आत्मसन्मानात्मक भावना उभी राहते.
सबब सुप्तप्रेमाला महत्त्व देऊ नये आणि ते मुलाला कळावे अशी अपेक्षा तर मुळीच ठेउ नये. अगदी ठळक, ठसठशीत दिसणारे, कृत्यात्मक प्रेम करावे.

३४. लॉजिक - मुले विचित्र विधाने करतात आणि वैचित्र्यपूर्ण प्रश्न विचारतात. त्यांच्या विचारतलं लॉजिक बर्‍याचदा भयंकरच गंडलेलं असतं. उदा. 'हाथी सबसे बडा अ‍ॅनिमल क्यूं होता है?', 'मुझे चिप्स कि भूख क्यूं लगती हैं?'. हा प्रश्न निरर्थक आहे असे सांगू नये. प्रश्न निरर्थक नसतो, तो समजावून घेण्याची समोरच्याची पात्रता सिमित असते. 'प्रत्येक प्राण्याचा आकार वेगळा, त्यांना एका लाईनने मांडले तेव्हा हत्ती सर्वात मोठा निघाला.', 'त्याला खायला प्यायला खूप मिळते म्हणून...', 'तो लहानपणी लहान होता, आता नीट वाढला म्हणून ..' 'व्हेल त्याच्यापेक्षा मोठा असतो', 'जिराफ उंचीने मोठा असतो, हत्ती वजनाने...', 'देवाने प्रत्येकाला एक काम नि त्यानुरुप शरीर दिले आहे' असे कोणतेही उत्तर द्यावे. अगदी वि़ज्ञानाची त्यांच्यामानाने किचकट तत्त्वे सांगीतली मुले गुपचूप ऐकतात (आपणही तसेच करतो म्हणा!). एक दोन तीन चार या क्रमाचे किंवा हजार, लक्ष, कोटी या क्रमाचे भय आणि आदर आणि सहजता त्यांचे ठायी समान असते.
सबब मुलांना कळणार नाही म्हणून प्रश्न मोडीत काढू नये, सारवासारवीचे उत्तर देऊ नये. शिवाय मुले खतरनाक असतात. प्रश्न विचारतात आणि उत्तर ऐकतच नाहीत. 'प्रश्न पडणे'च काही मुलांना उत्तरासमान वाटते. तेव्हा उत्तर देताना 'हो ना रे सोन्या?', 'खरे ना बाळा?' असे प्रत्येक वाक्यागणिक विचारावे.

पिलीयन रायडर's picture

11 Sep 2013 - 4:16 pm | पिलीयन रायडर

सुप्तप्रेमाला महत्त्व देऊ नये आणि ते मुलाला कळावे अशी अपेक्षा तर मुळीच ठेउ नये. अगदी ठळक, ठसठशीत दिसणारे, कृत्यात्मक प्रेम करावे.

लहान मुलच काय, मोठ्यांच्या बाबतीतपण हे लागु पडेल.. सतत "समजुन घ्या माझ्या भावना" ह्या मोड वर रहाण्यापेक्षा क्रुतीतुन व्यक्त कराव्या भावना..

बाकी प्रतिसादा साठी- पुन्हा दंडवत..

arunjoshi123's picture

11 Sep 2013 - 5:02 pm | arunjoshi123

माझ्या एक सामान्य पिता म्हणून केलेल्या निरीक्षणांतही बर्‍याच चूका आहेत. जे अस्सल (म्हणजे विदाऊट कंफ्यूजन), नैसर्गिक (पणे वागणारे) आणि फूलटाइम पालक आहेत त्यांची ताण न येऊ देता (कितीतरी) मुले मोठी करायची हातोटी जगावेगळी आहे. सबब अशा दंडवतांस मी पात्र नाही.

वरील प्रतिसाद वाचले नाहीत. ते नंतर वाचीन. एकदम माझ्या मुलाचे बालपण आठवल्याने मनात विचारांची गर्दी झालीये. आमचंही पोरगं अस्स्स्स्स्सच असल्याने लाकडी ब्लॉक्स, लाकडी इतर खेळणी आणाली होती. त्याचा उपयोग खेळण्यापेक्षा फेकण्यासाठी आधी जास्त झाला. घरातल्या सगळ्या फर्निचरवर अगदी दारे खिडक्या, पॉटी असे सगळीकडे स्टिकर्स लावण्यात बराच वेळ खर्ची पडू शकतो. "हां, आज आपण लिव्हिंगरूममध्ये स्टिकर्स लावू" म्हणून सोडून द्यायचे. ते काम होईपर्यंत आपली भाजी चिरून फोडणीला पडते. मग कणकेचा गोळा व एक्ट्रा लाटणे देऊन "हां आता पोळी लाटा" ती पोळी काळी असली तरी भाजून दाखवायची व टाकून द्यायची. ;) माझ्या सासूबाईंनी एका संपूर्ण भिंतभर पांढरा कागद (त्यावेळच्या त्याच्या उंचीप्रमाणे)लावून दिला होता. तिथे क्रेयॉन्स घेऊन चित्रकला (?)चालायची. मग सगळ्या हॉटव्हिल्सच्या कार्स (जवळजवळ १०० होत्या) त्या एका खुर्ची खाली एका ओळीत लावा. तोपर्यंत कुकर लावणे, कोशिंबिरीची तयारी होते. मोठाली फनेल्स आणाली होती. ज्या डब्यात धान्य भरायचे असेल त्यात फनेल ठेवून छोट्या वाटीने पुड्यातून सोडवून दुसर्‍या पातेल्यात ठेवलेले धान्य भरायला सांगायचे (२ वर्षाच्या आसपास असताना). ते घरभर भिरकावले जाणार. आपण वेळेवर उचलून ठेवणे आलेच. कढी खिचडी केल्यास "मलाही तुमच्यासारखीच हाताने खायची आहे." मग सगळीकडे सारवणार. (मुले असे करतातच असे वाचल्याने तो राडा नंतर आवरायचा). डिशवॉशर मधून काचेचे बाऊल्स काढून एकदा फेकून दिले. मी तिथे जाईपर्यंत तीनेक फोडून झाले होते. दणकट पॅकिंगमध्ये मिळणारे सामान आणून तसेच ठेवावे. ते उलटे पाल्टे करून बघण्यात अर्धा तास जातो व आपली कामे पुढे सरकतात.
आपल्या मुलाची गार्‍हाणी आईवडीलांना सांगू नयेत. कौतुक म्हणून सांगितल्यास चालतील पण "मग आम्ही कसे पार पाडले असेल?" असा कुत्सित प्रतिसाद मिळण्याची शक्यता जास्त! "तुम्हाला एका मुलाचे करायला जमत नाही आणि आम्ही तीन मुले, सासूसासरे, दिर असे सगळे करायचो. तुम्हाला ना काही जमत नाही. सारखे रडायला सांगा" वगैरे ऐकून तुम्ही अपुरी झोप, हापिसमधील काम, उशिराने चालू केले शिक्षण यात मेलेले असाल. मग "मी विचारतीये काय अन तू सांगतीयेस का?" असा रागाने सवाल गेला तर फोनवर पलिकडे डोळ्यांना पदर लावलेला असतो. आमच्याशी बोलायची ही पद्धत नव्हे वगैरे ऐकून घ्यावे लागते. मागल्या अठवड्यातही मी ग्रोसरी दुकानात असताना तिथे फोन करून "काय आहे का वेळ?" असे प्रेमाने विचारले. "मी ग्रोसरी करतीये, नंतर घरे गेल्यावर फोन करते" झाऽऽऽले! "जन्मदात्यांशी बोलालयला तुम्हाला वेळ नाही का?" यावर आहे ना आहे ना, बोला. असे सगळे आपण शिकत जातो. ;) मुलांचे "हे काय आहे? ते काय आहे?" अश्या प्रश्नांना उत्तरे न देऊन सुटका नाही. आमचे मूल मोठे झाल्याने परवाच "रेप म्हणाजे काय?" हा प्रश्न आला व बर्‍या भाषेत खरे उत्तर द्यावे लागले. त्यापेक्षा काऊ चिऊ बरे असतात.

डॉ सुहास म्हात्रे's picture

11 Sep 2013 - 10:49 pm | डॉ सुहास म्हात्रे

जीवनसार, वाचून गार ! :)

रेवती's picture

11 Sep 2013 - 11:06 pm | रेवती

का हो? काही चुकले का?

डॉ सुहास म्हात्रे's picture

11 Sep 2013 - 11:13 pm | डॉ सुहास म्हात्रे

छे हो, उलट स्तुतीच केली आहे. चपखल गोष्टी सोदाहरण सांगितल्या म्हणून. गैरसमज नसावा.

(स्वगतः आम्हाला काव्यात गती नाही हेच खरे :( )

पिलीयन रायडर's picture

13 Sep 2013 - 10:49 am | पिलीयन रायडर

वा रेवतीताई.. काय प्रतिसाद आहे!!!
मी पण सध्या भांड्यांच्या रॅक समोर बसुन "काय वाट्टेल ते करु देणे" हे सुत्र अवलंबिले आहे.. त्यात त्याचा जो वेळ जातो तेवढ्यात चार कामं होऊन जातात..
मागच्या पिढीच्या रिअअ‍ॅक्शन बद्दल सहमत. अपण वैतागलेले असतो..त्यात ह्यांना ५० प्रश्न आनि १६७२९२९ उपदेश करायचे असतात.. कधी आपला आवाज चढला की लगेच पलीकडले आवाज उतरतात.. आणि अगदी पडेल आवाजात "बरय्..ठिके..हम्म्म..." एवढ्यावर बोलणे येते..म्हणुन मी आजकाल "एक्स्ट्रॉ केअर" घेउन जस्तीत जास्त मधाळ आवाजात बोलते.. म्हणजे पुन्हा मानापमान नको..
पाळणाघरात ठेवायचा विचार पक्का होत आहे. लवकरच जाईल तो. आणि त्याला ते आवडेल अशी मला खात्री वाटतेय.

रेवती's picture

11 Sep 2013 - 10:53 pm | रेवती

आता प्रतिसाद वाचत आहे. पाळाणाघरात सोडण्याबाबत ऋषिकेशशी फारच सहमत आहे.मुलगा २ वर्षांचा झाल्यावर अठवड्यातून दोन अर्धे दिवस अशी सुरुवात केली. त्याला ते भयंकरच आवडले. मग पुढील वर्षी पाच दिवस रोजचे ४ तास जाऊ लागला (पाच वर्षांनंतर आवडेनासे झाल्यावर पुन्हा २ दिव्सच जात असे पण तोपर्यंत किंडरगार्टनही सुरु झालेले असते). साधारण २ वर्षांचे वय झाल्यावर त्यांना इतर मुलांमध्ये मिसळण्यास आवडू लागते. पाळाणाघरात सोडण्याबाबत काहीही वाटून घेऊ नकोस. फक्त ते त्याला आवडते ना बघ.

विंदा यांच्या काही कविता तुम्हाला या पुस्तकातून मिळतील , त्या मुलांबरोबर share करा.
वाचा, वाहून दाखवा, वाचायला द्या , (वेळ,वय या प्रमाणे )
राणीची बाग
एकदा काय झाले, सशाचे कान
एटू लोकांचा देश, परी ग परी
अजबखाना, सर्कसवाला
पिशीमावशी आणि तिची भुतावळ

अडम् तडम्
टॉप
सात एके सात
बागुलबोवा इत्यादी इत्यादी

कवितानागेश's picture

15 Sep 2013 - 12:11 am | कवितानागेश

बरेच दिवस फक्त प्रतिसाद वाचतेय...
मी एक बघितलय की प्रत्येक मुलाची एनर्जी लेव्हल वेगळी असते आणि आवड/मागणीसुद्धा. त्यामुळे खरं तर प्रत्येक मूल नवीन आव्हान घेउन उभे राहिलय असं वाटतं..
माझी भाची अशीच 'गुंड' होती. तिला गोष्ट सान्गायला लागलं तरी एका जागी बसून ऐकायची नाही , भोवती नाचायची आणि मला मध्ये खांबासारखं उभं करुन गोल गोल फिरायची. मोकळे सोडले तर माकडासारखी झोपाळ्याच्या कड्यांना लटकून छतापर्यंत पोचायची. एकदा मला तिला कडेवर घेउन, उभे राहून लागोपाठ २९ वेळा राष्ट्रगीत म्हणावं लागलं होतं... तिला झोपवायला! ती भिन्तीवर अडकवलेल्या देवघराच्या बाजूला असलेल्या खुर्चीवरुन देवघराला लटकून 'गंपती कूक्क' करत कितीही वेळ खेळायची.. शेवटी देवघराची जागा बदलली आणि गणपतीबाप्पाचा मस्त टाईमपास घालवला. :) एक तास प्ले ग्रुपमध्ये पाठवलं तर मजेत गेली आणि पहिल्याच दिवशी तिथल्या बाईंसकट सगळ्यांच्या नकला घरी येउन करुन दाखवल्या. आणि हे सगळे दीड वर्षाची असताना.....
तेन्व्हा लक्षात आले कि हिला एकाच वेळेस हाताला, पायाला आणि डोक्याला बिझी ठेवणारे खेळणं द्यायला हवय..
मग एक दिवस पेटी- हार्मोनियम काढून दिली. त्या वेळे तिला भाता मारायलादेखिल कुणाची लुड्बुड नको होती. एरवी घरभर वादळासारखी धावणारी मुलगी एका जागी एक तास स्वस्थ बसून हवे तसे स्वर वाजवत बसली होती. :)
मग तिला आगगाडीचा भोन्गा, कूकरची शिट्टी, चिव-चिव, डिन्ग डॉन्ग बेल.. अश्या आवाजान्च्या जवळ जाणारे आवाज पेटीवर वाजवून दाखवले. मग स्वारी खुश!

पिलीयन रायडर's picture

15 Sep 2013 - 3:29 pm | पिलीयन रायडर

पेटी...अप्रतिम आयडिया..पुढे मागे वापरुन पहाता येईल..
एखादं वाद्य शिकवणे किंवा किमान नुसतं वाजवायला देणे हे खुप छान आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 Sep 2013 - 3:45 pm | डॉ सुहास म्हात्रे

व्हॉट अ‍ॅन आयडिया मदाम !

+१ वाद्य खेळायला देणे अतिशय चांगली कल्पना आहे.
मुलीला मी खेळण्यातला डमरू, झांजा, छोटा ड्रम, जत्रेत मिळणारी बासरी आणि कचकड्याचा सेलवर चालणारा कॅसियो वगैरे आणून दिला आहे. (पैकी ड्रम फोडून झाला आहे)

सध्या गेले चार दिवस कचकड्याच्या कॅसिओतील सेल संपल्याने तो वाजत नाहिये तर त्याची आठवण झाल्यावर त्याला फटके देऊन "बोल बोल!" असे त्याला 'वा! करणे' चालु असते. आणि वाजला नाही की "ऐकत नाही" असे म्हणते आणि दुसर्‍या खेळाकडे वळते :P

पिलीयन रायडर's picture

20 Sep 2013 - 9:50 am | पिलीयन रायडर

गुंडापुत्र ह्यांना नुकतेच पाळणाघरात पाठवणे सुरु झाले आहे.. आज दिवस दुसरा..
हे माझ्या कंपनीचेच पाळणाघर आहे. त्यामुळे आवारातच आहे. कधीही मुलगा रडला जास्त तर ते बोलवुन घेतात.
पहिला दिवस म्हणुन १ तास त्याला तिथे ठेवणे ..आणि त्यापैकी ५ मिन तरी किमान त्याला सोडुन बाहेर जाऊन लपणे असा प्लान होता. पण झालं असं की पोरगं ५ व्या मिनिटाला इतर पोरांमध्ये जाऊन बसलं आणि मायबापाला विसरलं.. मग आम्ही निघुन गेलो.. जवळपास १ तासानी मी जाऊन डोकावुन आले तर निवांत पणे एक बॉल घेउन तो खेळत बसला होता..
तेव्हा माझ्या लक्षात आलं की मुलं चटकन कुठेही रुळतात.. रुळत नाहीत ते पालक.. इथे माझ्या ममतेच्या गंगा जमुना डोळ्यातुन वहात होत्या.. आणि तिकडे माझा मुलगा मस्त पणे जिंगल्स ऐकत बसला होता..
पुढे मग झोप आली की आई आठवली मग रडापडी सुरू झाली..तेवढं तरी होणारच होत.. पण १ तासासाठी गेलेला ४ तास तिथे राहुन आला...

आजही मोजुन १.५ मिनिटाला तो पोरांमध्ये घुसला..मी गेले हे त्याला समजलं पण नाही..

तसा माझा मुलगा मस्तीखोर आहे. घरात तो खुप दंगा करतो. पण पाळणाघरात आल्यापासुन तो शांतपणे बघत बसला होता. कुणी त्याचं खेळणं घेतलं तरी तो फक्त बघत राहीला. एरवी पण दुसर्‍या मुलाने त्याला त्रास दिला तर तो उलट काहीच प्रतिकार करत नव्हता. आम्ही समोर असु तरच हे पोरगं शेर आहे.. नाही तर गप बसतं.. आता हा स्वभाव कसा बदलतो हे पाहण्या सारखे असेल.. मला वाटतं की तो थोडा तरी अ‍ॅग्रसिव्ह होईल..

असं सगळ्यांचच म्हणणं आहे की तो अजुन जास्त सोशल होईल.. एरवी तो त्याचे लाड करणार्‍या मोठ्यांकडे लग्गेच जायचा. पण त्याच्या वयाच्या मुलांसमोर बुजरा व्हायचा. बघु आता काय होतय ते..

तसाही तो तिथे ४ तासच असणारे.. तेवढीच त्याच्या आजीला विश्रांती...

ऋषिकेश's picture

20 Sep 2013 - 2:31 pm | ऋषिकेश

अरे वा! अभिनंदन! :)
आता आराम मिळाल्यावर त्याच्याच त्याच (तथाकथित) गुंडगिरीमुळे त्रास होत नसल्याने (उलट निरागतेची मजाच वाटत असल्याने) त्याच्या कारनाम्यांचे कोण कौतुक महिनाभरात सांगु लागाल बघा ;)

उदय के'सागर's picture

20 Sep 2013 - 10:24 am | उदय के'सागर

व्वा मस्त वाटलं ऐकून :) ... आणि तुम्ही जे म्हणालात "मुलं चटकन कुठेही रुळतात.. रुळत नाहीत ते पालक" ह्याला +१
माझाही मुलगा १.३ वर्षाचा आहे, तो ११ महिन्याचा होता तेव्हाच त्याला पाळणाघरात टाकणार होतो. का उगीच आज्जी आजोबांना त्रास द्यायचा ह्या एकमेव भावनेतून हा निर्णय घेतला होता. पण मुलाच्या आज्जीच्याच डोळ्यातून गंगा-जमूना वाहू लागल्या आमचा हा निर्णय ऐकल्यावर... आता त्यांची हौस म्हणून १.५-२ वर्षाचा होईपर्यंत घरीच ठेवणार आहोत मग पाळणाघर नक्की...पण त्यापूर्वी इथे पाळणाघराबद्दलचे 'अलमोस्ट' सगळ्यांचेच चांगले मतं वाचून छान वाटले :) माझ्या आईला पण देईन हे वाचायला आणि हो अर्थात तिला पाळणाघर पण दाखवायला नेणार आहे.. तेवढंच समाधान (तिच्या डोक्यात पाळणाघर म्हणजे अश्शी मोठ्ठी खोली त्यात पन्नास एक पाळणे, मुलं रडतायेत, पाळण्यातच शी-शू चालू आहे कोणाचं लक्ष नाही, तिथल्या आया मुलांना शांत बसवण्यासाठी मारताहेत ... हे असलं काहीतरी आहे ..अर्थात त्यांच्या काळी हे असले आधुनिक आणि महागडे पाळणाघरे कुठे होते म्हणा .. तिचा असा गैरसमज साहाजिकच आहे)

पिलीयन रायडर's picture

20 Sep 2013 - 11:30 am | पिलीयन रायडर

अहो तुमची आईच कशाला..मी १० वेळा ह्या पाळाणाघरात जाऊन सुद्धा अजुन माझं मन तयार होत नव्हतं. मी सुद्धा लहनपणी पाळणाघरात राहीले आहे. पाळणाघर नुसतं म्हणायला.. खालच्या काकुंकडेच आई सोडुन जायची, ते ही फक्त ४-५ तासांसाठी. पण ती माणसंच विचित्र होती. त्यांनी कायम आम्हाला आश्रिता सारखं वागवलं जेव्हा की त्यांना आम्हाला सांभाळण्याबद्दल पैसे मिळायचे. त्याचा माझ्या मनावर खुप परिणाम झाला. पाळणाघर म्हणजे जिथे खुप खुप उदास, परकं वाटतं अशी जागा असं माझं मत होतं..
पण..खुप विचार करुन माझं मत बदललं..
१. मी ज्या पाळणाघरात गेले ते लोक प्रोफेशनल तर नव्हतेच पण चांगली माणसं पण नव्हती. मी १ लीत अस्ल्याने मला आप्लं-परकं ह्या गोष्टी कळत होत्या. माझी ३ वर्षाची बहीणही माझ्या सोबत राहिली. पण तिच्या मनावर असे कोणतेच परिणाम झाले नाहीत. कारण मुळात तिला फारसं काही कळतच नव्हतं. लहान वयात पाळाणाघरात जाण्याचा हा फायदा असतो. पटकन अडजस्ट होतात मुलं.
२. जिथे माझा मुलगा जातोय ते कंपनीचे पाळणाघर आहे. तिथे सकाळच्या दुध नाश्ट्या पासुन सगळे दिले जाते. त्यात मुलांचा विचार करुन मेनु आखलेला असतो. आणि तो वेळेवर दिला जातो. घरी सुद्धा जेवण छानचे असते पण आपण रोजचं रोज ठरवुन , विचार करुन बनवत नाही. इथे मुलं नीट जेवतात असा माझा अनुभव आहे. मी मुलाला सारखी जाऊन काचे आडुन बघुन येऊ शकते हा अजुन एक फायदा. दुपारी मी चक्कर मारली तर मुलांचे खेळ चालु होते. बेडुक उड्या, कागद फाडणे, पाणी उडवणे असले ही प्रकार करुन घेतात. बागेत नेतात. गाणी शिकवतात. हे सगळं घरी करुन घेण्या एवढे त्राण आपल्यात नसतात. तिथे २-३ शिक्षिका आहीत खास लहान मुलांचे. आई-बापात पण नसेल इतका अफाट पेशन्स त्या पोरींमध्ये आहे. अत्यंत प्रेमानी चालु असतं सगळं..

नोकरी करणार्‍या आई-बाबांना पाळणाघराशिवाय पर्याय नसतो. किती वर्ष आपण आपल्या आइ-वडिलांना बांधुन ठेवणार मुलांसाठी? त्यांनाही बाहेर जावं वाटतं, समवयस्क लोकांमध्ये गप्पा हाणाव्या वाटतात.. पण मुलांमुळे ते अडकतात.
माझ्या ही सासुबाईनी डोळ्यातुन पाणी काढलं.. मी सुद्धा काल त्याला पाळणाघरात झोपवत होते तेव्हा मुसळधार रडुन घेतलं.. हतबलता वगैरे आली होती थोडा वेळ.. पण आज माझा मुलगा मस्त खेळतोय तिथे आणि आपण पालक त्यांची चिंता करत इथे चर्चा करतोय!!

शेवटी घर ते घर.. त्याला पर्याय नसतो. पण मुलांनही कधीतरी हे कळतच की सगळं काही मिळत नाही आयुष्यात. घर कधीतरी सोडावं लागतच. माझ्या मुलाला ती जाणिव सव्वा वर्षाचा असताना झाली.. मला पहिलीत असताना झाली.. माझ्या नवर्‍याला १२वी नंतर घर सोडल्यावर झाली... प्रत्येकाची वेळ वेगळी असते.. पण ती येतेच.. आणि ती वेळ येते तेव्हा पिल्लु ओंजळीतुन आकाशात उडायला सोडल्या सारखी साजरी करावी.. त्याचं धडपडणं हे पक्षानी पहिल्यांना पंख फडफडवुन आकाशात भरारी मारण्याचा प्रयत्न आहे असं समजावं.. उगाच अशा प्रसंगान आपण करुणेची झालर लावतो.. आपल्या पिल्लाकडे "बिचारं बिचारं" म्हणुन पाहिलं की आपण,पिल्लु.. परिस्थिती सगळंच बिचारं बिचारं होतं..

पिलीयन रायडर's picture

31 Dec 2013 - 2:54 pm | पिलीयन रायडर

आता मुलगा पाळणाघरात रुळला आहे.. काही निरीक्षणे
१. १५-२० दिवस त्रास झाला. पण शेवटी मग घट्ट करुन त्याला ५-६ तास ठेवायला सुरवात केली. ह्या मध्ये दिवाळीत बाहेर फिरायला गेलो होतो, तेव्हा तो माझ्या भावाच्या मुला सोबात खुप खेळला. कदाचित तेव्हा त्याला इतर लहान मुलांशी खेळायची मजा कळाली. त्या नंतर जेव्हा परत पाळणाघरात ठेवले तेव्हा तो फार चटकन रुळला.
२. १ आठवडा तो नुसता झोपुन रहायचा. नाही तर रडत रहायचा.. पण १ महिन्या मध्ये तो आता इतर मुलांसोबत खेळायला लागलाय. बोलणं लक्षणीयरित्या वाढलय. आता वाक्य बोलतो. "पुली दे" "मला मोबाईल दे" वगैरे..
३. जाताना रोज रडतो, पण एकदा का पाळणाघरात गेला की खेळतो.. मग त्रास देत नाही.
४. कसं ते कळालं नाही पण त्याची चिडचिड पण कमी झाली आहे. आता तो चावत / मारत नाही. मी इथल्या चर्चे नंतर थोदं ओरडुन / धपाटे घालुन पाहिलं.. आता मी त्याला मारत नाही. तो तसा मला अजिबात घाबरत नाही, पण त्याच्या वडिलांना घाबरतो. त्यांनी आवाज चढवला की ऐकतो, त्यामुळे मारायची वेळ येत नाही. त्याला १-२ दा मारल्यावर मला असं वाटलं की ह्याला अजुनही मुद्दा कळत नाहीये. मग मी खुप पेशन्सनी त्याला समजावुन सांगायला लागले. आता पण आधी त्याच्याशी बोलतो. असं करु नये वगरे सांगतो..
५. त्याला रात्रि झोपेतुन रडत उठाय्ची सवय होती. ती कमी झाली असली तरी अजुनही मध्येच रडु शकतो. त्याचं काही लॉजिक नाहीये. कदाचित जेव्हा तो खुप पळापळी करतो तेव्हा पाय दुखत असतील.. किंवा मध्ये सर्दी झाली होती तेव्हा श्वास घेताना त्रास होत असेल.. आजकाल तरी रात्री शांतता असते..
६. खेळ - मोबाईल त्याला आवडतो, थोडा वेळ खेळायला दिला तर तो २ गोष्टी प्रामुख्याने पहातो. १. स्वतःचे जुने व्हीडिओ. ते त्याला खुप आवडतात. त्यात तो माणसं ओळखत बसतो. २. एक अ‍ॅप आहे, त्यात वेग्वेगळे प्राणी , त्यांचे आवाज (बॅकग्राउंडला फार मस्त म्युझिक आहे) वगैरे आहे. त्यात तो प्राणी पाहुन तसे आवाज काढतो. प्राणी ओळखतो. शिवाय स्लाईड केल्यावर पुढचा प्राणी दिसतो हे ही कळालय. प्राण्याच्या तोंडाला टच केलं की तो प्राणी तोंड उघडुन जोरात ओरडतो हे ही कळालय..
त्याला रोज झाडांना पाणी घालायला नेतो. तेव्हा बाहेर जे काही निवडक पक्षी दिसतात ते तो पहातो..
क्रिकेट त्याला खुप आवडतं, म्हणुन त्याचे बाबा-काका-आजोबा त्याला काही ना काही शिकवतात.. आजी शुभं करोती शिकवते.. मी १-२ ओळींच्या गाण्यावर हातवारे शिकवतेय.. भाज्या ओळखायला शिकवतोय. पाळणाघर हे प्ले स्कुल टाईप असल्याने तिथे चित्र वगैरे काढायला शिकवत आहेत.
त्याला बाहेर फारसं नेणं होत नाही. पण वेळ काढुन ते ही करायचे आहे (जसे की मंदिर, बाजार वगैरे)

एकंदरित बाहेर पडल्यानी जरा धीट झाला आहे. आता तो पटकन कुणाकडेही जातो. घाबरत नाही. आधी बेल वाजली तरी रडायचा. आता मस्त पैकी काका - मावशी असं नातं जोडुन कडेवर जातो.

ह्यात एक मुद्दा महत्वाचा असा की त्याच्या कार्डिओलॉजिस्ट च्या मते (त्याची १५ व्या दिवशी ओपन हार्ट सर्जरी झाली आहे. पण आता तो उत्तम आहे.) त्याच्यात आयर्न आणि व्हिट. डी कमी पडल्याने तो चिडचिडा झाला होता आणि पटकन सर्दी वगैरे होत होती. (आता तो तेव्हा पहिल्यांदाच अंघोळ केल्यावर लगेच गाडीवर पाळणाघरात जायला लागला होता, त्यानेही वारं लागुन सर्दी होऊ शकते असं मला वाटायचं. मुळात सिझनल सर्दी कोणती आणि त्या पेक्षा सिरीयस सर्दि कोनती हे मला अजुनही नीट कळत नाही.)
उपाय म्हणुन गोळ्या / सप्लिमेंट देणं त्या बाईला मान्य नाही. तिच्या मते खाणं चांगलं हवं. म्हणुन रोज अंड + शक्य तेव्हा पाया सुप + रोज उन्हात १५-२० मिनिटे नेणे + रोज २ भाज्या + १ फळ + दुध बंद (त्याने लोह शोषायला प्रॉब्लेम होतो असं तिचं मत - मी दुध कमी केलं पण बंद नाही) हे आवश्यक आहे.

मी पाया सुप दिलं नाही (मी नॉनव्हेज बाबतीत साशंक आहे.. आम्ही खात नाही. त्यानी खावं पण त्याच्या साठि करुन द्यायची माझी हिंमत होत नाहीये..) पण मी अंड + उन्हात नेणे आणि बा़कीच्या गोष्टी नीट पाळल्या. खज्र + ड्राय फ्रुट्स नेमाने सुरु केले.

त्याच्या रक्त तपासणी मध्येही विट. डी वाढल्याचे दिसले. आणि खरच चिडचिड कमी झाली आहे.
एक आता ते पाया सुप च जमवायचं बघतेय.. अगदीच कुणी नाही मिळालं तर मग किळस बाजुला ठेवुन स्वतः करीन.

पण एकंदरीत खाण्यातुन मुलां वर फार फरक पडतो असे माझेही मत झाले आहे.

समांतर :- ऐसी वरील ही चर्चा - http://aisiakshare.com/node/2368
आणि विशेष करुन ऋषिकेश चा प्रतिसाद वाचनीय आहेत..

ऋषिकेश's picture

31 Dec 2013 - 2:58 pm | ऋषिकेश

अभिनंदन! :)
इथे नुसतीच चर्चा न करता, त्यातून काही उपाय निवडून केलेल्या उपायांचा परिणामही आवर्जून दिलात याचेही कौतूक वाटले.

प्यारे१'s picture

31 Dec 2013 - 4:14 pm | प्यारे१

+११११

arunjoshi123's picture

31 Dec 2013 - 3:09 pm | arunjoshi123

पाया सुप? म्हणजे काय?

पिलीयन रायडर's picture

31 Dec 2013 - 3:19 pm | पिलीयन रायडर

मटण - म्हणजे माझ्या मते - बकर्‍याच्या पायाचे सुप.. जे की मुख्यतः हाड असते म्हणे..

पिलीयन रायडर's picture

20 Jun 2014 - 1:52 pm | पिलीयन रायडर

परवा मिपावरच कुठेतरी ही लिंक सापडली. आज जरा निवांत चाळुन पाहिली तर खजिनाच हाती लागलाय. बहुदा ह्या विषयी मिपावर चर्चा झाली असावी.

अरविंद गुप्तांची खेळणी

इथे काय नाहीये…!!
पुस्तकांचा अक्षरश: खजिना आहे.
वेगवेगळी खेळणी कशी बनवावी ह्याची प्रात्यक्षिके आहेत.
तब्बल वीस भाषांमध्ये फिल्म्स आहेत.

ह्यातल्या बऱ्याच गोष्टी अजून माझ्या २ वर्षाच्या मुलाला इतक्यात झेपणार नाहीत… पण पुढे जाऊन ही साईट अत्यंत उपयोगी ठरणार हे नक्की. सध्या ह्या साईट वरची पुस्तकं डाउनलोड करून वाचून दाखवता येतील.

नक्की हा माणूस कोण आहे म्हणून गुगलल्यावर ही माहिती सापडली :- अरविंद गुप्ता

या शिवाय मायबोली वरही हा एक धागा आजच वाचनात आला.

पुनश्च उद्योग ....

उन्हाळ्याच्या सुट्टीत १० वर्षाचे मुल इतकं काही करू शकतं हे पाहून धक्का बसलाय!!!!

आमची प्रगती :-
सध्या आम्ही पुस्तकं आणुन चित्रे ओळखणे, गोष्टी तोडक्या मोडक्या शब्दात सांगणे इतपत प्रगती केली आहे. बिल्डिंग ब्लोक्स पासून घर बनवणे (म्हणजे २-४ ब्लोक्स जोडणे) वगैरेही जमायला लागलय. पण कुठलीही गोष्ट आधी तोंडात घालायची सवय (अजुनही) न सुटल्याने चिकणमाती वगैरे देता येत नाही खेळायला. मुख्यत: सगळ्या खेळण्यांनी मारामारी किंवा क्रिकेट खेळणे चालू आहे.

तुमच्या कडे काय नवीन?

तुमच्याकडील प्रगती आवडली. चिकणमाती देता येत नसेल तर प्ले डो मिळतो तो दिल्यास काय होईल? एक सुचवणी.

आमच्याकडे शाळेला उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू होतायत. नेहमीचेच क्लासेस चालू ठेवायचा विचार आहे. टेनिस बरे जमतेय असे प्रशिक्षिकेने सांगितले व आता चांगल्यातली रॅकेट आणायला सुचवल्याने ती आणली. परवा तबल्याचे सादरीकरण आहे. प्रेक्षकवर्ग मोजून पंधरा वीस असणारे. क्लासची मुले व आईवडील एवढेच! ;) तरी रोज कुरकुर सुरु आहे कारण लोकांसमोर वाजवायचे नाहीये. नवीन वेबसाईट समजलीये व शिक्षिकेने त्यावरील गणिताची तयारी सर्वांना करण्यास सुचवले आहे. पुढील यत्तेचा अभ्यासक्रम जाहीर झालाय व सुट्टीत त्याची ओळख करून घेण्यास सुचवले आहे. सुट्टी सुरु झाल्यावर आमची मायलेकरू मराठी शिकवणी सुरु होते. गेली ४ वर्षे हे सुरु आहे पण ५ ओळी सलग वाचणे यापेक्षा आमची प्रगती होत नाही कारण मनात एकच गोष्ट आहे की 'मला या भाषेची गरज नाही'. सम्जावून सांगितले पण आता वाद घालण्यात मला स्वारस्य नाही. तसेच शिकवत राहणार. येत्या भारतवारीत दुकानांच्या पाट्या वाचता आल्या की बरे वाटेल अशी आशा! सध्यातरी त्याच्या डोळ्यासमोर भरपूर झोपेची स्वप्ने आहेत व संध्याकाळाचे मैदानावरील खेळणे! सध्या एवढेच मलाही जमेल. ;)

कवितानागेश's picture

21 Jun 2014 - 1:14 am | कवितानागेश

पिरा, तुझ्या मुलाला अजून कणीक सापडलेली दिसत नाही.
आपली आई रोज कणकेत खेळतेय, हे बघून मुलं पण येतातच. :)

पिलीयन रायडर's picture

23 Jun 2014 - 12:39 pm | पिलीयन रायडर

नाही सापडु दिली मी अजुन.. आधीच राडा कमी आहे का घरातला..!! पण देइन थोडा मोठा झाला की..

बॅटमॅन's picture

20 Jun 2014 - 1:59 pm | बॅटमॅन

तूर्तास १०० झाले.

पिलीयन रायडर's picture

20 Jun 2014 - 2:01 pm | पिलीयन रायडर

छान… जमतंय हो… !

बॅटमॅन's picture

20 Jun 2014 - 2:04 pm | बॅटमॅन

धन्यवाद! तुमचा आशीर्वाद असल्यावर काय अवघडे म्हणा.

(साला तो पैल्या पर्तिसादात ह.घ्या. राहून गेला वाट्टे)

कवितानागेश's picture

20 Jun 2014 - 2:35 pm | कवितानागेश

बॅट्या, जागा हो बाळा. हा लहान मुलांबद्दलचा धागा आहे!
"१०० झाले" वगरै काय म्हणतोयस तू? :P

आज्जी तुम्ही जाग्या व्हा बघू आधी. प्रतिसादसंख्येची सेञ्च्युरी मी केली. बाकी धाग्यात भर घालायला तुम्ही आहातच की.

पिलीयन रायडर's picture

11 Sep 2014 - 12:52 pm | पिलीयन रायडर

वाचता वाचता एक सुंदर ब्लॉग सापडलाय... जरुर वाचा...

http://mommygolightly.wordpress.com/

त्यातला काही भाग इथे पेस्ट करतेय..

Notes from a teacher to a child

The hardest thing about parenting is deciding at what age a child stops being a child. Perhaps children too are always under pressure to “grow up” or “act their age”. Yes, there are reams written about milestones and what a child should know by the time he/she is three, five, ten and twelve. I still get emails on baby milestones from websites years after I stopped reading them. But for lack of a better term, here is a list of what I think every child or student should know:
1. If something doesn’t feel right, it usually isn’t right. Your instincts are more valuable than you think. Grown-ups may look like they have thought things through, but they are mostly relying on instinct.
2. Coloring within the lines is overrated. It is usually the beginning of boundaries. It is usually a trap for other things. Looking like everyone else, talking like everyone else, also thinking like everyone else. Soon they will say, “You can’t do this” or “you can’t do that”. Soon they will say, “you are this” or “you are that”.
3. They may tell you that the sky is the limit, but they may still frown if you paint it purple. The fact is, the sky is whatever color you want it to be. There is enough of blue in our lives anyway. Go paint it orange!
4. Adults can control how you speak or what you wear or what you eat or read, but they cannot control who you are.
5. Books are not fiction, non-fiction, thrillers, fantasies or mysteries. They are things that let you inhabit a world and stay there as long as you want. Don’t label books, let them mark you.
6. There is something about you that is uniquely different from anyone else in this world. Keep it. Cherish it. Learn to love it. And don’t let go of it easily.
7. Happy is not a default state to be. Feeling sad, angry, lonely, jealous is as natural as feeling happy, elated, generous or chirpy. Although people will seldom ask you why you are happy, they will always ask you why you are sad.
8. It’s okay not to have an opinion when everyone else seems to have one. It just means you are still making up your mind on it. Take your time.
9. The teacher is as intrigued by the quiet ones as by the talkative ones. So may be it’s a good idea to conserve your energy sometimes.
10. Adults are people who have been in the universe longer than you. It doesn’t necessarily mean they know more. They are still fumbling around with many things, but they won’t tell you.
11. It is important to laugh, or act silly sometimes.
12. It is totally okay to not love numbers.
13. Or poetry.
14. If you were read to as a child, you probably are luckier than most people in this world.
15. Every time you ask a question an adult laughs at, they probably haven’t had the guts to ask it themselves. Or perhaps they have been caught off guard and never really thought of it and don’t know the answer. Or it perhaps takes them to places they don’t want to go to.
16. The world is a magical, amazing place and there are a lot of secrets you will uncover. Some will make you happy, others will make you sad or angry, but you will always be happier when you find this out on your own.
17. Very often, the things you think you love will not be the things you love when you are 18. That’s what growing up is all about. Finding new things to love.
18. More often, the things your parents think are good for you may not be the things you like. But you don’t have to dislike them just because they came up with the idea.
19. It’s seldom an either/or. Sometimes there is more than one answer to a question. That is how it’s going to be in life.
20. Zero has gravitas. Wear your zeroes proudly. But help them take you someplace you like to belong.
21. You are more powerful than you know.
22. You are going to create more long term memories in people than you possibly imagine.
23. There will always be someone who doesn’t understand your point of view. There will always be someone who does.
24. There will be times when your questions will remain unanswered. That doesn’t mean you stop asking questions.
25. Sometimes, you may touch someone’s life, but they may forget to tell you. But it still happened.

सुहास पाटील's picture

11 Sep 2014 - 3:46 pm | सुहास पाटील

माझा गुंडा ३ वर्षा चा आहे. एकदा मी त्याला म्हंटले कि त्रास देणाऱ्या मुलांना शिंगे उगतात बघ आता तुला शिंगे उगायला लागली आहेत. पण तो यावर म्हणतो कसा उगू द्या शिंगे. त्या शिंगांनी मी मला त्रास देणाऱ्या मुलांना त्रास देईल

सुहास पाटील's picture

11 Sep 2014 - 3:50 pm | सुहास पाटील

त्याच लकडी कि काठी version
लकडी कि काठी काठी पे घोडा घोडे के दुम पे जो मारा ततोडा

पिलीयन रायडर's picture

27 Mar 2015 - 11:45 am | पिलीयन रायडर

रात्री झोपताना चित्र दाखवुन वाचुन दाखवता येतील अशी गोष्टींची पुस्तकं कुणी सांगु शकेल का? वय वर्ष ३ साठी हवी आहेत. आणि शक्यतो मराठी असतील तर उत्तम.. इंग्रजी सुचवुन ठेवल्यास हरकत नाही..

क्रेझी's picture

27 Mar 2015 - 2:39 pm | क्रेझी

jyotsnaprakashan.com ह्या संकेतस्थळावर माधुरी पुरंदरे ह्यांची बालसाहित्यातली सगळी पुस्तकं खूप छान आहेत. लेखिकेने स्वतः चित्रे काढून अगदी सोप्या भाषेमधे वेगवेगळ्या गोष्टी लिहीलेल्या आहेत.
माझ्या भाच्यासाठी मी सर्व पुस्तकं मागवली होती. संकेतस्थळावरून तुम्ही हवी ती पुस्तक ऑनलाईन पेमेंटने घरपोच मागवू शकता. फक्त हवी ती पुस्तकं सध्या उपलब्ध आहेत की नाही त्याची चौकशी एकदा त्यांच्या कार्यालयात करून घ्या आणि त्यानुसार ऑर्डर करा.

पिलीयन रायडर's picture

27 Mar 2015 - 3:05 pm | पिलीयन रायडर

फारच छान लिंक..! धन्यवाद! लगेच होलसेल मध्ये पुस्तकं मागवत आहे!!

ज्ञानोबाचे पैजार's picture

27 Mar 2015 - 4:47 pm | ज्ञानोबाचे पैजार

मजेदार गोष्टी - शशिकांत कदम

एकदम २०-२५ पुस्तके मागवण्या पेक्षा एखाद दुसरेच पुस्तक मागवावे. वरच्या मजेदार गोष्टी या पुस्तकावर आम्ही बरेच दिवस बॅटींग केली होती. जवळजवळ चार पाच महिने. या वयात मुलांना एकच गोष्ट (जी त्यांना माहीत आहे तीच) सारखी सारखी सांगीतली तर ती प्रत्येकवेळा जास्त आवडीने ऐकतात. त्यांना त्याचा अजिबात कंटाळा येत नाही. (हा अर्थात माझा अनुभव आहे, तुमचा अनुभव कदाचित वेगळा शकतो.)

परवा अप्पाबळवंत चौकातल्या प्रगती बुक स्टोअर मधे गेलो होतो. (जोगेश्वरीच्या समोरचा) त्या दुकानात तर लहान मुलांच्या पुस्तकांचा जवळजवळ एक मजलाच आहे. लहानमुलांसाठी एवढी पुस्तक बघुन मी पण आचंबीत झालो होतो.

सध्या वयोगटा प्रमाणे अ‍ॅक्टीव्हीटी बुक्स पण मिळतात. ती पण दोनचार घेउन बघा.

पैजारबुवा,

पिलीयन रायडर's picture

27 Mar 2015 - 5:04 pm | पिलीयन रायडर

खरंय.. मी रोज तीच गोष्ट सांगते.. किंवा बनवते.. अत्यंत भक्तिभावानी ऐकतो मुलगा.. पण आता मी कंटाळले!

आणि मी सुद्धा ह्या दुकानत जाउन बघेन.. मुलालाच नेते..

रेवती's picture

27 Mar 2015 - 5:43 pm | रेवती

मी माझ्या मुलाला सध्या शिवाजीमहाराजांबद्दल सांगण्याचा प्रयत्न करतीये. त्याला त्यातील लढाईचा भाग सोडता काहीच आवडत नाही. त्यातही फायटर विमाने असती तर बरे झाले असते वगैरे ऐकून मी गप्प बसते.

त्यातही फायटर विमाने असती तर बरे झाले असते वगैरे ऐकून मी गप्प बसते.

टाईम मशीनने मागे जाऊन मराठ्यांना मुघलांविरुद्ध रणगाडे, विमाने, मिसाईल्स, बंदुका, इ. सप्लाय करायला पाहिजेत असे आम्हांलाही लहानपणी प्रामाणिकपणे वाटत असे. तेव्हा यात फार वेगळे असे काहीच नाही.

साधारण १९२०-३० च्या सुमारास लहान असलेल्या एका गृहस्थांच्या आत्मचरित्रातही अशा धर्तीची आठवण आहे. लहान असताना ते आणि त्यांचे एक लंगोटीमित्र विचार करतात की इंग्लंडवर हल्ला कसा करावा? मारुतीच्या पाठीवर बसून तिथे जावे अन मारुतीला ते बेट उलटे करून बुडवण्यास सांगावे इ.इ. फक्त त्यातली संपत्ती परत घ्यावी की न घ्यावी याबद्दल डिबेट होता असे त्यात दिलेले आहे.

या वयात दुसरे काही आवडणारही नाही. पण अशा गोष्टींनीच आत्मीयता वाढते हे विसरू नका. अन मुळात आत्मीयताच नसेल तर कोण शिवाजी अन कुठला महाराष्ट्र? तेव्हा शक्य तितक्या लढायांच्या गोष्टी सांगायला विसरू नका. फक्त मोटिव्ह आणि शौर्य यांवर भर दिल्यास उत्तम.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

27 Mar 2015 - 5:59 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

टाईम मशीनने मागे जाऊन मराठ्यांना मुघलांविरुद्ध रणगाडे, विमाने, मिसाईल्स, बंदुका, इ. सप्लाय करायला पाहिजेत असे आम्हांलाही लहानपणी प्रामाणिकपणे वाटत असे. तेव्हा यात फार वेगळे असे काहीच नाही.

सहमत.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

27 Mar 2015 - 6:05 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

माझ्या भाच्यानी (वय तेव्हा ७) तर पेशव्यांकडुन मस्तानीला उचलुन आणता येईल असं अत्यंत महत्त्वाचं लॉगिक मांडलेलं. अर्थात त्याच्या डोक्यात मस्तानीचा ग्लास होता ही गोष्ट अलाहिदा.

बॅटमॅन's picture

27 Mar 2015 - 6:10 pm | बॅटमॅन

ठ्ठो =)) =)) =))

नशीब दुसर्‍या बाजिरावाबद्दल काही सांगितलं नाही ते. =))

असाच प्रश्न मला आला. फक्त आमच्याकडे वय वर्षे दुप्पट आहे म्हणून बाकी सगळी माहिती आहे. आधी मी महाभारत सुरु केले तर गाडी द्रौपदी वस्त्रहरणाला अडली. मग ते सोडले, शिवाय १०० मुलग्यांचे लॉजीक काय सांगावे हा प्रश्न आला. पांडव जर ५ असू शकतात तर दुसर्‍या पार्टीला कुटुंब नियोजन का जमले नाही? शिवाय आमच्यापेक्षा जास्त माहिती मुलांना!
मग रामायण सुरु केले. त्यात सीतेला कांचनमृगाचे कातडे, त्याचे कपडे, हे पटवता येईना. मग शिवाजीमहाराजांना शरण गेले शेवटी.

शिवाय १०० मुलग्यांचे लॉजीक काय सांगावे हा प्रश्न आला.

मग मूळ कथाच सांगायची. १०० पैकी १४ जणच फक्त धृतराष्ट्र-गांधारी यांचे पुत्र होते, बाकी एकतर धृतराष्ट्र + अन्य स्त्रिया यांचे तरी किंवा अ‍ॅडाप्टेड तरी. कुटुंब नियोजन जमले नाही (रादर त्याची मदत घेतली नाही) कारण भला उसके बेटे मेरे बेटोंसे ज्यादा कैसे इ.इ.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

27 Mar 2015 - 6:45 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

धृतराष्ट्रानी प्रश्ण ऐकला असता तर डोळे पांढरे झाले असते की त्याचे लिटरली =))

बाकी ते तुपाच्या भांड्यात बुडवुन ठेवलेले अंगुलीएवढे १०१ जीव वगैरे ऐकुन टेस्ट ट्युब बेबीज होते की काय अशी शंका घ्यायला वाव आहे.

रेवती's picture

27 Mar 2015 - 6:17 pm | रेवती

होय, तेही आहेच!

पिलीयन रायडर's picture

27 Mar 2015 - 6:24 pm | पिलीयन रायडर

करेक्ट..
माझ्या मुलाला शिवाजी महाराजांपेक्षा छोटा भीम जास्त शुर वाटतो.. आणि अफझलखानाला सरळ उचलुन गरगर फिरवुन फेकुन दिलं तर जास्त बरं झालं असतं.. कुठं ती वाघनखं वापरायची (त्याला ते कळतच नाही ना..).. सध्या जीवा महाला सय्यद बंडाला फक्त "ढिशुम" करतोय..
पण गोष्ट सांगत रहायची..

शिवाजी महाराजांनी आरमार (आधी आर्मर आणि आरमारात गोंधळ, मग वाद, मग नेव्ही वगैरे) बनवताना जहाजे तयार करण्याचे वर्कशॉप कुठे होते? याचे उत्तर द्यायचे म्हणजे अवघड आहे.

वर्कशॉप कल्याणजवळ होते म्हणून सांगा. ते खरेच आहे.

रेवती's picture

27 Mar 2015 - 6:33 pm | रेवती

ओक्के. तसेच सांगते.

बॅटमॅन's picture

27 Mar 2015 - 6:34 pm | बॅटमॅन

शिवाय आरमार या शब्दाची व्युत्पत्तीही सांगा. पोर्तुगीज़ भाषेतील आर्मेर या शब्दावरून तो आलेला आहे. याच्याशी संबंधित इंग्लिश शब्द म्हणजे armada होय. तेवढेच युरोपियन कनेक्शनही डोक्यात बसेल.

रेवती's picture

27 Mar 2015 - 6:36 pm | रेवती

ओक्के, समजले. सांगते.

आधी कल्याणच्या दुर्गाडीत होतं हे माहीत आहे पण नंतर विजयदुर्गच्या वाघोटन खाडीजवळच्या गोदीत सुरु केलं ना?

नंतर शिफ्ट झाले इतकेच माहिती होते. नंतरचे ठिकाण माहिती नव्हते.

प्रचेतस's picture

27 Mar 2015 - 6:38 pm | प्रचेतस

हो.
विजयदुर्ग खूपच सुरक्षित होता. त्यामानाने कल्याण इंग्रज आणि मुघलांनी घेरलेले होते

बॅटमॅन's picture

27 Mar 2015 - 6:40 pm | बॅटमॅन

इंडीड.

आमचे तीर्थरूप तानाजीच्या जेवणाचे भीमाच्या जेवणासारखे वर्णन करायचे ते आठवलं.

लहान पोरांना समजेल अन आवडेल अशी ऐतिहासिक पुस्तके लिहिण्याचे मार्केट तसे मोठे आहे असे वाटते. तशी चांगली पुस्तके मराठीत कोणती आहेत?

पिलीयन रायडर's picture

27 Mar 2015 - 6:44 pm | पिलीयन रायडर

खरंच..
माझ्या लहानपणी कॅसेट्स होत्या.. त्यात खुप मस्त सांगितलं होतं.. हिरकणीची गोष्ट अगदी नीट आठवते मला.
शिवाय एक कॅसेट होती त्यात दिलीप प्रभावळवर, निशिगंधा वाड ह्यांच्या आवाजात गोष्टी होत्या.. आहेत का अशा CD / कॅसेट्स?
बघते लगेच ऑनलाईन..

प्रचेतस's picture

27 Mar 2015 - 6:48 pm | प्रचेतस

इथे बरीचशी पुस्तके मिळतील.
http://www.bookganga.com/eBooks/Books/Index?CID=4612258520099131515

खूपच सुंदर धागा आणि उपयुक्त प्रतिसाद!!!
चिमुकल्यांच्या गोड गोड विश्वात हरवून जायला झालंय.
पूर्ण वाचायला आत्ता वेळ मिळणार नाही. संध्याकाळी सावकाश वाचेन.

सदस्यनाम's picture

15 Jul 2015 - 10:54 am | सदस्यनाम

ओळखले ओळखले. आपणास ओळखले.
इसराइलचा मित्र तो. औषध;-)...

जडभरत's picture

15 Jul 2015 - 11:45 am | जडभरत

म्हणजे काय भाऊ?
इसराईल्चा भाऊ कोण आता?

ब़जरबट्टू's picture

20 Jul 2015 - 9:19 am | ब़जरबट्टू

उत्तम प्रतिसाद आलेत. वाचू साठवलेली आहे..

:)

चार-पाच वर्षंपुर्वी हा लेख जेव्हा हाती आला तेव्हा नुकतेच लग्न झाले होते आणि ही वाचनखुण तेव्हाच साठवुन ठेवली होती. ५ नोव्हेम्बेर २०१८ ला पुत्र रत्न (धनत्रयोदशीला आला म्हणुन रत्न ;)) आले, त्यपेक्षा आता प्रकटले म्हणालो तरी चालेल. तेव्हा पासुन हा धागा वाचायचा हा संकल्प डोक्यात होता, शेवटी आज मुहुर्त सापडला. धागा कर्त्याला आणि प्रतिसाद देणार्‍यांना खुप खुप आभार.

टीप. गेल्या चार वर्षांत काहीच प्रतिक्रिया आलेल्या नाहीत ह्या निमित्ताने आल्या तर आनंदच आहे.

भुमन्यु

अतिशय सुंदर आणि उपयुक्त धागा आहे. बादवे, मुलांना सूर्योदय आणि सूर्यास्त आवर्जून दाखवावेत. आमच्याकडून दोन पैसे.