सुचना
प्रिय मिसळपाव सदस्य,
आपल्या मिसळपाववरील योगदानाची आम्ही नोंद घेतली आहे. मात्र, अलीकडील काही पोस्ट्स/प्रतिक्रियांमध्ये व्यक्तिगत टीका, शिवीगाळ, विशिष्ट राजकीय अजेंडा, घसरलेला भाषेचा स्तर, असे सातत्याने दिसून येत आहे. मिसळपाव हे मुक्त अभिव्यक्तीसाठीचे व्यासपीठ असले तरी, येथे काही मूलभूत नियम व सभ्यतेची अपेक्षा राखली जाते.
आपल्या लक्षात आणून देतो की:
1. कोणत्याही व्यक्तीवर (मिसळपाववरील सदस्य, राजकीय नेते इत्यादी) व्यक्तिगत स्वरूपाची टीका सहन केली जाणार नाही.
2. राजकीय अजेंडा रेटणे, पक्षनिष्ठा पसरवणे किंवा इतर सदस्यांना चिथावणी देणारी विधानं करणे हे संस्थळाच्या धोरणात बसत नाही.
आपल्याला विनंती आहे की आपण आपल्या प्रतिसादांची शैली पुन्हा एकदा तपासून पाहावी व संस्थळाच्या मर्यादेत राहून सहभाग घ्यावा. भविष्यात याच प्रकारची कृती आढळल्यास, आपले सदस्यत्व तात्पुरते वा कायमचे निलंबित केले जाऊ शकते.
आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे.
– मिसळपाव व्यवस्थापन टीम
प्रतिक्रिया
15 Oct 2008 - 11:52 am | सखाराम_गटणे™
काय बोलु मी आता,
तुम्ही माझ्याच भावना टाकल्यात.
-----
15 Oct 2008 - 11:53 am | अनिरुध्द
विजुभाऊ, कवीता बाकी छानच केल्ये तुम्ही. आपल्याला आवडली बॉ. :-)
15 Oct 2008 - 11:55 am | बेसनलाडू
की वेढाच पडे चे पेढा वडे असे वाचले, वाटले कोजागिरीचा मेन्यू बेदलला; म्हणून मग परत वाचली कविता. सुरुवात जास्त भावली, पण तिच्या तुलनेत शेवट सामान्य वाटतो आहे. कविता आणखी खुलवता आली असती, असे वाटले. चू भू द्या घ्या
(सूचक)बेसनलाडू
15 Oct 2008 - 2:20 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तू अशी माझ्या भवती
वेढाच पडे आठवणींचा
जीव माझा कंठी येतो
पोहताना समुद्र तो
आणि
तुझ्यासवे पुन्हा नवा जन्म घेतो..
मस्तच !!! तिच्या आठवणींचे स्वरुप उलगडून दाखवण्यासाठी खूप चांगली शब्दरचना.
टीका : 'समुद्र' हा शब्द दाताखाली खडा लागल्यासारखा वाटतो, लेकीन कोयी बात नही. भावना महत्वाच्या !!!
-दिलीप बिरुटे
15 Oct 2008 - 2:45 pm | ऋचा
का पाहु मी चन्द्र आता
चेहेराच तुझा दिसतो तेथे
विसरावयाचे ठरवुन ही
तुलाच पहातो जेथे तेथे....
मस्तच!!!
"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
15 Oct 2008 - 3:00 pm | रामदास
च्या चंद्राचा प्रभाव आहे का हा?
छान कविता.
15 Oct 2008 - 3:57 pm | विनायक प्रभू
http://vipravani.wordpress.com/
३ च दिवस झाले ना परतुन.
15 Oct 2008 - 3:59 pm | लिखाळ
कविता छान आहे.
तू अशी माझ्या भवती
वेढाच पडे आठवणींचा
मी सुद्धा वेढ्याचा पेढा केला वाचताना :)
--लिखाळ.
15 Oct 2008 - 7:12 pm | Bhakti Parab
:H
खुपच मस्त
15 Oct 2008 - 11:21 pm | पिवळा डांबिस
पोहताना समुद्र तो.
मी प्रयत्न सोडुन बुडून जातो
नको हो! असे बुडून जाऊ नका!!
मग आम्हाला विजुभाऊ कुठले?....
तुझ्यासवे पुन्हा नवा जन्म घेतो...
ते ठीक, पण नव्या जन्मातल्याला अशी फर्मास स्वप्नं खुलवून सांगता येतीलच याची काय ग्यारंटी? आम्हाला आपले या जन्मातले विजुभाऊच हवेत....
:)
-यलोनॉटी
15 Oct 2008 - 11:46 pm | प्राजु
पण शेवटच्या कडव्यात नक्की अर्थ क्लिअर होत नाहिये.
आठवणींचा समुद्र हे आवडले.
मी प्रयत्न सोडुन बुडून जातो
तुझ्यासवे पुन्हा नवा जन्म घेतो...
तिच्यासवे पुन्हा जन्म घ्यायचा आहे तर तो समुद्र जीव कंठी येईपर्यंत पोहोण्याचा प्रयत्न तरी कशासाठी??
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
18 Oct 2008 - 8:24 am | मदनबाण
विसरावयाचे ठरवुन ही
तुलाच पहातो जेथे तेथे....
जबराट !!..
मदनबाण.....
"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda