माझ्याकडे एक CDMA रिलाअन्सचे सिम कार्ड सात आठ वर्षे आहे .त्यावेळी घेतलेला एक एलजीचा मोबाईल हैंडसेट आता जुनाट झाला आणि बदलायच्या विचारात होतो .परंतु आता MTS आणि रिलाअन्स शिवाय CDMA चा प्रसार नसल्यामुळे आणि टाटा डोकोमो नेही यातून हात झटकल्यामुळे हैंडसेटचे चांगले नमुनेच बंद झाले .मग मी विचार केला की याचा जिएसेम नंबर करून घेऊ म्हणजे बरीच मॉडेल्स वापरता येतील .
आता महागडा स्माटफोन नको होता आणि चांगला कैमरावाला तसेच नेट साठीचा नोकिआ X2-00 आहेच .एफ एम रेडिओ रेकॉर्डिँगवाला असेल तर उपयोग होईल या विचाराने त्याचा शोध सुरू केला .
सैमसंगचे E2232 आणि नोकिआचे X2 -02 कोणाकडे पाहिले होते त्यात ही FM रेकॉर्डिँगची सोय आहे . परंतु दोन चार दुकानात गेल्यावर कळले की ही मॉडेल्स बंद झाली .नवीन नोकिआ आशा २०६ मध्ये मिळेल .सैमसंग स्टारमध्येही आहे ।विचार केला या सोडून दुसरी कंपनी पाहू .
एकाने कार्बनचा K20+ शिल्लक होता तो दाखवला .१७००रुपये .घेतला .घरी येऊन रेकॉर्डिँग करून पाहिले .WAV फॉर्मैट मध्ये सेव झाले (MP3 नाही) .आवाजही छान .फोटोही काढले 1.3 MP कैमरा तीन इंचावरही फोकस करत होता JPG फाइल . व्हिडिओ काढले .
प्रतिक्रिया
28 May 2014 - 3:46 am | कंजूस
एक मिनिटाची क्लिप तेरा चौदा एमबिची !! AVI फाइल आली .झूमपण झाले .प्लेबैकही सुरेख येतोय शिवाय स्क्रिन २.४ इंची ३२०X२४०ची चमकदार आहे .बैटरी १८००एमेएच !! ड्यूल सिम (मोठी) आहेच .फक्त नेट आणि फोन मेमरी नाही .गाणी वाजवायला स्पिकर अगदी ठणाणा वाजतोय ,हेडफोनचा आवाजही छान परंतु पिन ३.५ नाही .चार्जीँग आणि हेडफोनचे एकच सॉकेट आहे .ब्लूटुथ चांगलाच फास्ट आहे .फोनच्या किपैडची बटणे छान आहेत आणि कठीण अजिबात नाही .आताच याचे उदघाटन राजमाचीला केले त्यात काही फोटो याने काढलेले आहेत .नोकिआने लांबचे चांगले येतात पण वीस इंचांपेक्षा जवळ फोकस होत नाही .ते काम याने होते .सामान्य माणसास आणखी काय पाहिजे ?
28 May 2014 - 1:12 pm | पैसा
मी पण अॅण्ड्रॉईड फोन्स सारखे चार्ज करावे लागतात म्हणून वैतागले आहे. मध्ये पेंटा भारत PF300 नावाचा एक फोन http://www.pantel.in/Bharat_Phone_PF300 घेतला. त्याची बॅटरी भरपूर चालते. ८ दिवसपर्यंत. शिवाय मोठ्ठा स्क्रीन आहे. कामचलाऊ कॅमेरा तसंच जावा, इंटरनेट, एम पी३ वगैरे आहेच. बाहेरगावी जाताना असलेच फोन बेस्ट!
28 May 2014 - 4:51 pm | धर्मराजमुटके
काही प्रश्न !
१. हा फोन खास बीसएनएलसाठी तयार केलेला दिसतोय. इतर कंपन्यांची जीएसएम कार्ड चालतात काय ?
२. दृष्यानुभव ( लुक आणि फिल) चांगला आहे की चायना मोबाईल सारखा वाटतोय ?
28 May 2014 - 5:31 pm | पैसा
सगळी सिमकार्ड्स चालतात. इंटरनेट पण चालते. मी सध्या डोकोमो आणि आयडियाची कार्ड्स वापरत आहे आणि इंटरनेट वापरून पाहिले. दोन्हीचे चालते आहे.
चायना मोबाईलसारखा वाटत नाही. म्हणजे बराच डिसेंट दिसतो आणि रिंगटोन्स पण डिसेंट आहेत. फॉण्ट वगैरे चांगला आहे.
28 May 2014 - 8:07 pm | कंजूस
बिएसएनएल च्या फोनचे नाव बहुतेक चैंपिअन आहे .
28 May 2014 - 3:24 pm | मुक्त विहारि
+ १
28 May 2014 - 9:26 pm | कंजूस
K20+चे काही फोटो इथे आहेत
http://s1278.photobucket.com/user/kanjusk/library/k1
नोटेचा वॉटरमार्क ,आतल्या पट्टीचा RBI ,फोटोचा फोटो (गाडी) फोकस होते .
टॉर्चलाईट पण आहे
29 May 2014 - 2:22 pm | कवितानागेश
हल्ली iball चे फोन्स पण चांगले आहेत.
पण CDMA चा आहे तोच खूप जपून वापरतेय.. दुसरा चान्गला पर्याय अजून तरी दिसला नाही.
मायक्रोमॅक्ष बकवास आहे.
29 May 2014 - 4:26 pm | कंजूस
नोकिआ २०६ मध्ये रेकॉर्डीँग लिहिले आहे पण विडिओ फारच मामूली आहे ,बैटरी मात्र दणदणीत १२००एमएएच आहे ,कैमरा ६ इंचावर फोकस करतो .
2 Jun 2014 - 6:40 pm | कंजूस
आणखी काही नवीन गोष्टी या K20+ फोनमध्ये आहेत .
१)साउंड रेकॉर्डिँग
यात दोन पर्याय आहेत .LOW ठेवल्यास AMR फाइल फॉर्मेट येते आणि HIGH ठेवल्यास WAVE फॉर्मेट येते .ही वेव फाइल टिव्हीची गाणी फोन समोर धरून रेकॉर्डिँगसाठी उपयुक्त आहे .दुसऱ्या मोबाइलला ब्लुटुथने पाठवून त्यात म्युझिक फाइल म्हणून प्लेलिस्टमध्ये घेता येते .वेवमधले रेकॉर्डिँग भन्नाट आहे .
२)कॉल रेकॉर्डिँग
हे चालु अथवा बंद ठेवल्यावर प्रत्येकवेळी कॉल करण्या अथवा घेण्याआधी कोणतेही वेगळे बटण दाबावे लागत नाही .प्रत्येक कॉन्टेक्टचे कॉल रेकॉर्डिँग वेव फॉर्मेटमध्ये वेगवेगळे आणि सुस्पष्ट साठवले जाते .ही फाइल पाठवताही येते .आता ही सोय इतर फोनमध्ये फक्त कॉन्फरन्स कॉल्ससाठी सापडते .
तसा हा फोन रेकॉर्डिँग मास्टर आहे .
2 Jun 2014 - 7:22 pm | पैसा
मस्तच! आणखी कोणाकडे जी एस एम + सी डी एम ए असा फोन असेल तर सांगा. टाटा इंडिकॉमसाठी सध्या फोन हॅण्डसेट शोधत आहे.
2 Jun 2014 - 8:54 pm | कवितानागेश
मायक्रोमॅक्स घेउ नकोस. माझ्याकडे आहे. त्यात सी डी एम ए वर एसएमएस येतच नाहीत. मी पुन्हा जुनाच शामसिंग जपून जपून वापरतेय.
एकदा ZTE चे बघ.
2 Jun 2014 - 9:32 pm | पैसा
ZTE android MTS locked आहेत. नाहीतर एकदम साधे. माझ्याकडच्या शामसिंग एक्सप्लोअररने ६ वर्षे चालून राम म्हटल्यामुळे दुसरा फोन शोधते आहे. शक्यतो GSM+CDMA हवा आहे. फक्त CDMA नको. मात्र बरेचसे MTS किंवा Reliance साठीच आहेत. शेवट एखादा चिनी मोबाईल शोधावा लागणार बहुधा. Micromax triple sim चा प्रयोग करून झाला. Battery खलास निघाली.
3 Jun 2014 - 7:15 am | कंजूस
शामशुंगची या प्रकारातली W259 ,W279 आणि म्युजिक ही तीन मॉडेल्स गाजली होती परंतु चार हजारांवरचा फीचर फोन घेणे आताच्या काळात संयुक्तीक नाही .रिलायन्सवाले आता हेएर ची अडीच हजारापर्यँतची विकतात पण त्यात दम नाही .केविलवाणा प्रकार आहे .CDMA ला डच्चू देण्याशिवाय गत्यंतर नाही .
3 Jun 2014 - 9:30 am | अत्रुप्त आत्मा
मी गेले १ वर्ष(tata indicom) CDMA साठी sch-f219 samsung हा साधा हँडसेट वापरतो आहे.
फक्त कामासाठीचा फोन. इंटरनेट साठी दुसरा!