क्लिंटन सर यांच्या पडघम मालिकेचे पुर्नवाचन करत असताना माझ्या एका प्रतिसादावर http://misalpav.com/node/27769 काही सदस्यांनी ज्या प्रतिक्रिया दिल्या, त्या वाचुन खरच कीव आली. या प्रतिसादावरुन आणि अशाच तत्सम अनुभवांवरुन एकदंरीत विचारांची पातळी, द्वेष, एकांगी विचार, दुसर्याना कमी लेखण्याची आम्हीच श्रेष्ठ वृत्ती पाहुन दु:ख वाटते. विशेषत छत्रपती शिवराय याचां अनादर आणि वरील प्रतिसादात असलेले अंधत्व,दत्तक,बिरूदावली सारखे टोमणे.
असो, ज्या गोष्टी आपण वैयक्तिक बदलवु शकत नाही त्यावर काय करणार. त्या सर्व प्रतिसादावर, प्रत्येक मुद्दयावर माझ्याकडे संतुलित उत्तरे आहेत पण त्याच त्या विषयावर वाद घालण्याची अजिबात इच्छा नाहीये. इंटरनेट सिग्रेडी आणि RCC वाल्यांची एक पद्धत नेहमीची आहे they brings you down at their level and try to beat you by experience. तुमचे विचार तुम्हाला मुबारक. आम्हाला सिग्रेडी होऊन अशा २० % लोकामुंळे ८० % वर (एकुण ३%) गरळ ओकण्यापेछा काही दुसरे चांगली कामे करणे पसंत करू.
योगायोगाने आजच लोकसभा निकाल लागले. छत्रपती शिवरायांचे तेरावे वंशज
श्रीमंत छत्रपत्री उदयनराजे भोसले
सातारा लोकसभा मतदारसंघात
उदयनराजे भोसले हे तब्बल विक्रमी 5 लाख 22
हजार 531 मतांनी निवडून आले आहेत. ज्या भागात NDA ची एक जागा येत नव्हती तिथे आज राष्ट्रवादी हिंदुत्ववादी विचारसरणीचे shri. नरेंद्र मोदी यांच्या लाटेत पुणे, सांगली, सोलापुर वाहुन गेले (माढ्यात सदाभाऊ खोत थोडक्यात) त्याच पश्चिम महाराष्ट्रात उदयनराजे विक्रमी आघाडीने येतात हेच पुरेशे वाटते. उदयनराजे राष्टवादी नामक पार्टीच्या उमेदवारीमुळे निवडुन आले ही वस्तुस्थिति नाही. उदयनराजे पार्टी राजकारणा पलीकडचे व्यक्तित्व आहे. http://www.ibnlokmat.tv/archives/123983 तसा माझा आणि साताराृ्याचा विशेष संबंध नाही पण गेल्या वर्षभरात दुर्गभ्रमंती च्या निमित्ताने शिवकालिन प्रांत सातारा, कराड (सध्याचा ढोबळमानाने सातारा जिल्हा) पाहण्याचे भाग्य लाभले. महिमानगड, भुपालगड कोळदुर्ग, मच्छिंद्रगड ते वर प्रतापगड, केंजळ पर्यंत मुलुख फिरलो, उदयनराजें बद्दल आदर अधिकअधिक वाढत गेला. आधी फक्त दुर्गदुर्गेश्वर रायगड वर त्यांचे भाषण ऐकलेले, यंदाही राज्याभिषेक सोहळ्याला (०६ जुन २०१४) उदयनराजे येतीलच.
जनतेचे ॠण फेडणार अशी प्रतिक्रिया उदयनराजे यांनी दिल्याची
http://livesatara.com/जनतेचे-ॠण-फेडणार-खा-उदयनर/
संकेतस्थळावर वाचायला मिळाली. उदयन महाराजानां ऩविन टर्म साठी शुभेच्छा. ग्रामीण भागास वाढीव निधि मिळावा ही त्यांची लोकसभेतील मागणी पुर्ण होवो, तसेच दुर्गसवंर्धन सारखी विधायक कामे होवोत हीच आई भवानी चरणी प्रार्थना.
जय शिवराय....। जय सह्याद्री....।
-- रौद्रांश
Intoxicated With Wine Of Holy and
Pride....
प्रतिक्रिया
19 May 2014 - 4:11 pm | प्रसाद गोडबोले
उदयनमहाराज स्वतःच म्हणालेत की मला महाराज / राजे असे काही म्हणायची गरज नाही .
19 May 2014 - 4:14 pm | पिलीयन रायडर
मग ते स्वतःच नाव काय लावतात कागदोपत्री? कार्यकर्ते ऐकत नाहीत वाटतं त्यांच..
आणि तुम्ही त्यांना सिरीयसली उदयन"महाराज" म्हणत आहात का?
19 May 2014 - 5:17 pm | प्रसाद गोडबोले
कार्यकर्ते खरम्च ऐकत नाहीत ह्या बाबतीत ! आणि हो मी सीरीयसलीच त्यांना "महाराज" म्हणतोय :)
( माझे वैयक्तिक कारण विचाराल तर लहानपणी कोठेतरी ऐकलं होतं कवी भुषण ह्यांचे एक कडवं
"काशी की कला जाति | मथुरा मे मस्जिद बसती | अगर शिवाजी न होते | तो सुन्नत सबकी होती || "
... महाराज होते म्हणुन आज 'गोडबोले' आहे नाहीतर खान मुल्ला मौलवी वगैरे काहीतरी असतो ... थोरल्या महाराजांचे इतके उपकार आहेत की १३ च काय १००० पिढ्यांनी आदर दाखवला तरी ते उपकार फिटायचे नाहीत .
)
19 May 2014 - 5:34 pm | प्रसाद१९७१
... महाराज होते म्हणुन आज 'गोडबोले' आहे नाहीतर खान मुल्ला मौलवी वगैरे काहीतरी असतो ... >>>>>>>> समजा तुम्ही गोडबोलें ऐवजी खान झाला असतात तर काय धरणीकंप झाला असता. त्यात काय वाइट आहे?
आणि आता गोडबोले असुन काय मोठे कर्तुत्व गाजवत आहात?
19 May 2014 - 5:48 pm | प्रसाद गोडबोले
तुम्हाला म्हणायचय की महाराजांचे सगळेच कार्य इन व्हेन अर्थात निरुपयोगी निरथक आहे तर ? !
19 May 2014 - 7:00 pm | आजानुकर्ण
हा हा हा... *lol*
19 May 2014 - 8:26 pm | टवाळ कार्टा
बर्याच गोष्टींमधे हिंदु असल्याने "पिअर प्रेशर" कमी असते
उदा...धार्मिक कर्मकांडे ...शिक्षणाचे महत्व....
20 May 2014 - 2:00 pm | प्रसाद१९७१
जिथे मोगलांचे ३०० वर्ष राज्य होते त्या दिल्लीत नाही सगळे खान झाले.
ज्यांना होयचे होते ते अंतुले झाले, ज्यांना नव्हते होयचे ते गोडबोले राहिले.
19 May 2014 - 6:03 pm | बॅटमॅन
थोरले महाराज कितीही महान असले तरी त्यांच्या पुढच्या पिढीला फक्त थोरल्या महाराजांमुळे आदर दाखवणे म्ह. कैच्याकै आहे. संभाजीराजे महान झाले ते फक्त शिवाजीपुत्र म्हणून नव्हे. शिवाजीपुत्र म्हणून जन्माला येणे यात त्यांचे कर्तृत्व नव्हते, तर मिळालेले रिसोर्सेस योग्यरीतीने वापरणे, शत्रूंना जरब बसवणे, इ. गुणांमुळे त्यांचे माहात्म्य आहे.
19 May 2014 - 6:08 pm | पिलीयन रायडर
असंय का? मग चालु द्या..
आमची महाराजांबद्दलचा आदर दाखवण्याची पद्धत जरा डोळस आहे..बाकी काही नाही..
20 May 2014 - 4:58 pm | डॉ सुहास म्हात्रे
आमची महाराजांबद्दलचा आदर दाखवण्याची पद्धत जरा डोळस आहे..बाकी काही नाही..
हे लई ब्येस ! आवडलं !!
19 May 2014 - 4:16 pm | बॅटमॅन
इन द्याट केस, सगळीकडे बिरुदांची माळका लावतात त्याला कधी विरोध केलेला दिसला नै तो? एखादवेळेस कुठे सांगायला ठीके, पण बाकी तसे कधी दिसते का?
19 May 2014 - 7:28 pm | आनन्दिता
हम्म्म ..असं ते म्हणालेयत तर खरं .. फक्त त्यांना कोणी महाराज न म्हणता काय उदयनराव म्ह्न्लं तर चापटवतात.. *biggrin*
19 May 2014 - 4:30 pm | मालोजीराव
राजेंच्या जनता दरबारात एकदा हजेरी लावली असल्याने त्यांचा कामाची पद्धत माहित आहे, उरलेल्या सगळ्या उमेदवारांचे डीपोजीट जप्त झाले यातच सर्व आले.तरीही दुष्काळ आणि गारपीट झाली त्या काळात राजेंचे दुर्लक्ष झाले म्हणून नाराजी होती हे खरे आहे.
आपल्या राजकीय अधिकारांच्या आणि क्षमतेच्या पलीकडे जाउन व्यक्तीशः लोकांचे प्रश्न सोडवतात हे दरबारात पाहिले आहे त्यामुळे पावणेचार लाख लीड सुद्धा कमी आहे असे वाटले.
छत्रपतींचे वारस म्हणून त्यांना कोणीही निवडून देत नाही,तसे असते तर मागच्या वेळीच्या लोकसभा निवडणुकीत कोल्हापूरचे छत्रपति संभाजीराजे पराभूत झाले नसते.
19 May 2014 - 5:02 pm | बॅटमॅन
वैयक्तिक प्रश्न सोडवणार्याला मते जावीत यात तर आश्चर्य नाहीच. असे असेल तर उलट त्यांच्याकडून अजून जास्ती अपेक्षा आहेत.
19 May 2014 - 6:05 pm | सिफ़र
श्रीमंत छत्रपत्री उदयनराजे भोसले यांचे डोळेच इतके बोलके आहेत तर आता आपण काय बोलावं नाही का? ;)
19 May 2014 - 6:23 pm | दुश्यन्त
चर्चेचा एकंदर रोख पाहता उदयनराजे सातार्यामधून खूप वर्षे निवडून येत आहेत असे वाटते. माझ्या माहितीनुसार स्वतः उदयनराजे, राजमाता कल्पनाराजे या आधी कधी न कधी निवडणुका (विधानसभा) हरलेले आहेत. २००९ पासून उदयनराजे खासदार आहेत त्यापूर्वी एकदा त्यांना भाजपने विधानपरिषदेवर पाठवून महसूल राज्यमंत्री केले होते. उदयनराजे निवडून यायला गेल्या ४-५ वर्षातल तिथलं राजकारण पण कारणीभूत आहेत. या निवडणुकीत त्यांना तिकीट देवू नये असच पक्षाला वाटत होत कारण ते निवडून येईपर्यंत गप्प असतात नंतर पक्ष बिक्ष गेला चुलीत, कोण पवार वगैरे गोष्टी जाहीरपणे बोलत असतात.अजित पवारांचे आणि राजेंचे सख्य सर्वाना माहित आहे. राष्ट्रवादीच्या अनेकांचा राजेना आतून विरोध आहे पण बोलू ते शकत नाही. राजेना तिकीट नसत दिला तर ते अपक्ष राहून महायुतीच्या साह्याने किंवा सरळ महायुतीकडून निवडून आले असते हे शरद पवारांना माहित आहे. यंदा आपल्या पक्षाची धूळधाण उडणार याचा थोडाफार अंदाज पवारांना आधीच आला होता त्यात सातार्यासारखा पक्षाचा बालेकिल्ला विरोधकांकडे जावू नये म्हणून त्यांनी उदयन राजेना तिकीट दिले आहे.या निवडणुकीत तर एनसीपीपेक्षा कॉंग्रेसचे लोक त्यांचा हिरीरीने प्रचार करत होते.शिवसेनेने आपली हि जागा रिपाइला देवून उदयनराजेना बाय दिला होता हे वर लिहिलेच आहे. शिवसेनेने सातारा लोकसभा सीट १९९६ साली जिंकली आहे त्यांची तिथे बर्यापैकी ताकद आहे.सेनेचा उमेदवार असता तर अगदी राजे पडले नसते मात्र त्यांना जोरात फाईट मिळाली असती (आणि नमो लाट पाहता आणखी जोरातच लढत झाली असती.सेनेने ते टाळले कारण उदयनराजे हे राष्ट्रवादीचे तसे तांत्रिक खासदार आहेत. त्यांचा सर्व पक्षांशी चांगला घरोबा आहे. संभाजी भिडे गुरुजींना ते मानतात त्यामुळे तिथले हिंदुत्ववादीपण राजेना मत देतात. पुढे येणाऱ्या विधानसभा, नगरपालिका आदी निवडणुकांत ते राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवारापेक्षा स्वताच्या उमेदवारांना (कॉंग्रेस/सेना/अपक्ष)पाठींबा देतात.केंद्रात आता एनडीए सरकार आले आहे. मागचा अनुभव पाहता उदयनराजे भविष्यात भाजपशी जवळीक करतील असेच वाटते.
19 May 2014 - 9:02 pm | श्रीगुरुजी
स्वतःचा उल्लेख राजे, श्रीमंत, राजर्षी, छत्रपती, महाराज अशा बिरूदांनी करणार्यांची कीव येते. राजे, महाराजे, संस्थानिक इ. १९४७ मध्येच संपले. आता यांना पत्त्याच्या कॅटमधल्या राजाएवढी सुद्धा किंमत नाही. तरीसुद्धा यांचा उल्लेख राजे, महाराज, युवराज, छत्रपती ... शी! उबग येते अशी बिरूदे वाचून.
खर्या राजेमहाराजांनी आपल्यावर आरोप येताच छाती दुखण्याची नाटके करून व डॉक्टर, पोलिसांसकट सगळ्यांना मॅनेज करून पंचतारांकित इस्पितळात मुक्काम ठोकला नसता. आपल्यावरील आरोपांना ते निधड्या छातीने सामोरे गेले असते.
19 May 2014 - 9:07 pm | दिनेश सायगल
तुम्ही सुद्धा गोळवलकर गुरुजींची 'श्रीगुरुजी' ही उपाधी आपल्या आयडीला घेऊन एकप्रकारे तेच केलंय असं नाही वाटत का तुम्हाला?
20 May 2014 - 1:03 pm | श्रीगुरुजी
प.पू.श्री गोळवलकर गुरूजींच्या उपाधीचा आणि माझ्या आयडीचा अजिबात संबंध नाही. मी शिक्षण क्षेत्रात असल्याने "गुरूजी" हा आयडी घेणार होतो. पण तो आयडी आधीच कोणीतरी घेतला होता. त्यामुळे श्रीगुरूजी हा आयडी घेतला.
20 May 2014 - 5:35 pm | बाळ सप्रे
रच्याकने.. शिवरायांना "श्रीमंत" उपाधी लावल्याचे ऐकिवात नाही !!
इथे तर श्रीमंत, छत्रपती, राजे, महाराज सगळं एकदम!!
21 May 2014 - 3:14 pm | आशु जोग
सातार्यात महाराजांना हरवणे अशक्य आहे
अशक्य
ही साफ खोटी गोष्ट आहे... पूर्वी गोपीनाथ आत्ता पवारसाहेब यांचा पाठिंबा आहे... नसतात तर मागची केस परत उपटली असती
सहेबांचा पाठिंबा नव्हता तेव्हा विधानसभेला हरले होते
उगा या गाबड्याला साहेबांपेक्षा मोठे करू नका
21 May 2014 - 3:15 pm | आशु जोग
सातार्यात महाराजांना हरवणे अशक्य आहे
अशक्य
ही साफ खोटी गोष्ट आहे... पूर्वी गोपीनाथ आत्ता पवारसाहेब यांचा पाठिंबा आहे... नसतात तर मागची केस परत उपटली असती
सहेबांचा पाठिंबा नव्हता तेव्हा विधानसभेला हरले होते
उगा या गाबड्याला साहेबांपेक्षा मोठे करू नका
21 May 2014 - 6:22 pm | मालोजीराव
पवारसाहेब काय घंटा पाठींबा देणार, पोरीची बारामतीची सीट वाचवता वाचवता नाकी नऊ आले त्यांच्या :))
21 May 2014 - 6:33 pm | नानासाहेब नेफळे
धनगर जातीचे महादेव जानकर असल्याने तिथल्या मराठ्यांनी जात बघून पवारला मत दिले ,जर विकासाच्या मुद्द्यावर मत दिले असते तर जानकर प्रचंड मताने निवडून आले असते.
21 May 2014 - 6:37 pm | नानासाहेब नेफळे
ज्या गावाला टग्याने धमकावले असे म्हणतात ते गाव धनगर लोकवस्तीचे आहे.या राकाँचा जातीयवाद बघा किती खोलपर्यंत रुजलाय.
यांना ब्राह्मण नकोत, धनगर नकोत, दलित नकोत ,मुस्लमान इफ्तारपार्टिपुरते पाहीजेत, अश्या एकाजातीचे मुजोर राजकारण करणार्यांना येणार्या विधानसभेत घरी बसवायला पाहीजे.
21 May 2014 - 3:48 pm | अन्या दातार
पूर्वाश्रमीची सरकार आणि जमीनदार्/वतनदार घराणी बरीच आहेत. आज त्यांच्या वारसांकडे काहीही नसले तरी स्थानिक पातळीवर बर्यापैकी मान असतो.
काही ठिकाणी "काय सरकार, येताय का भांगलायला?" अशी विचारणा केली जाते. सबब आजच्या काळातही श्रीमंत, सरकार, सरदार इ.इ. बिरुदे लावली जातात; भले प्रॉपर्टी असो वा नसो. :)
21 May 2014 - 5:03 pm | निलेश देसाई
मी स्वत: त्या मतदार संघातील मतदार असल्याने काही गोष्टी सांगाव्या वाटतात.
फक्त वारस म्हणुन जन्माला आल्याने काही होत नाही, तो वारसा पुढे चालवावा पन लागतो.
सकाळी उठल्यापासुन बाटली घेउन बसणारा ला आम्ही छत्रपतींचा वारसदार का मानायच???
उदयन राजे हे अतिशय अकार्यक्षम खासदार आहेत. २००९ आणि २०१४ या दोन्ही वेळी सीट
गमावण्याच्या भितीपोटी शरद पवार यांनी उदयन राजेंना तिकिट दिले आणि दोन्ही वेळा ते
राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील नेते आणि कार्यकर्त्यांच्या कष्टामुळे निवडुन आले आहेत, ज्यांना राजेंनी निवडुन आल्यावर
कधी विचारलही नाही त्यामुळेच पक्षातुनच त्यांच्या उमेदवारी ला विरोध झाला. त्यांचा सो कॉल्ड फॅक्टर हा फक्त सातारा शहर आणि तालुक्याचा काही भाग एवढाच मर्यादित आहे पन या मतदार संघात सातार्या शिवाय कराड, पाटण, जावली, महाबळेश्वर्,वाई,खंडाळा,खटाव इ.भाग येतो. तिथे
राजेंची काहीच ताकत नाही तसेच काम ही नाही. येथील थोडेजन स्वतःला राजे समर्थक म्हणतात
पण मुळात ते राजेंचे टोल्,वाळु,खाणी या व्यवसायातले भागिदार आहेत. कराड सारख्या मोठ्या
तालुक्यात जिथे २-२ विधानसभा मतदारसंघ आहेत तिथे मागील ५ वर्षात ते फक्त ३-४ वेळा
गेले आहेत म्हनजे ग्रामीण भागची तर गोष्टच सोडा. खासदार निधी अत्यल्प आणि ठराविक
भागतच वापरला आहे.गारपीटी कडे लक्ष दिले नाहीच पण त्या आधीच्या भीषण दुष्काळाशी
सामना करण्यात ही ते लोकांसोबत नव्हते. २००९ च्या निवड्णुकी आधी ज्या वीजेच्या मुद्द्यावरुन
आंदोलन करुन त्यांनी पवारांवर दबाव आणला आणि तिकिट मिळवले त्याविषयी त्यांनी मागील
५ वर्षात एक अक्षर ही काढले नाही. इतरांप्रमाणे आम्हीही (जिल्ह्यातील लोकांनी) मोदी लाटेत यांना घरी बसवले असते पण महायुतिने बाय दिल्याप्रमाणे ही जागा रिपाई ला सोडली, सशक्त उमेदवार दिला
नाही, लोकांना मतदानासाठी सशक्त पर्याय मिळाला नाही त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यासारखे
मतदान झाले नाही( ५८% फक्त, तर सांगली,कोल्हापुर्,बारामती ६८% पेक्षा जास्त) आणि पुन्हा एकदा
21 May 2014 - 5:33 pm | बाळ सप्रे
एक खासदार म्हणून उदयन भोसले यांना त्यांच्या कार्याप्रमाणे गौरवण्यात काहीच आक्षेप नाही. पण कितीही चांगले काम केले असले तरीही स्वतंत्र भारतात राजे/महाराज्/श्रीमंत्/छत्रपती या संबोधनांना काहीही स्थान नाही.
मला महाराज म्हणू नका, किंवा कार्यकर्ते म्हणतात ही पळवाट झाली. भोंदु बाबाबुवा स्वतःचे महत्व वाढवण्यास असा पवित्रा घेतात.
सर्वात महत्वाचे प्रसारमाध्यमांनी त्यांना राजे/छत्रपती म्हणणे थांबवावयास हवे. त्यांचे भाट लोक म्हणत राहतीलच, त्यांना थांबवता येणार नाही.