राजा चार्ल्स -४..ओल्ड टाउन स्क्वेअर मधील भव्य पुतळा: कम्युनिझम असतानाही ह्या पुतळ्याचे पावित्र्य राखले गेले हे विशेषच म्हणायला हवे.
घड्याळ असलेल्या चर्चचे मागील प्रवेशद्वार.
अतिप्राचीन सुप्रसिध्द ऍस्ट्रोनॉमिकल घड्याळ.
घड्याळ- चित्र २. नंतर बसविलेली खालची डायल आणि पुतळे
ओल्ड टाऊन स्क्वेअरच्या चारही बाजूला अशा सुंदर आणि भव्य इमारती आहेत.
चर्चसमोरील भव्य प्रासाद.
स्वाती, शाल्मली व लिखाळ जुन्या राजप्रासादासमोर.ह्या प्रासादात स्टालिनचे वास्तव्य होते.
व्लटावा नदीकिनार्यावरील ओपेरा हाऊस - नाट्यगृह
व्लटावा नदीकिनार्यावरील कॅसलच्या पायथ्याशी असलेली प्राचीन घरे
चार्ल्स पूलावरुन दिसणारा प्रागकॅसल
शिशिराच्या रंगात रंगलेला केसु
कॅमेरा- सोनी डी एस एल आर अल्फा ३५०
प्रतिक्रिया
13 Oct 2008 - 6:38 am | सहज
सर्व फोटो क्लास!!
प्रागबद्दल [झेक रिपब्लीक] अतिशय उत्सुकता निर्माण झाली आहे.
13 Oct 2008 - 4:34 pm | टारझन
सर्व फोटू क्लास ...
पण स्वाती तै , शाल्मली तै आणि लिखाळ भौ यांच्या बरोबरच केशवसुमार याचे फोटू रियल क्लास आहेत...
आपल्या मते हे फोटू आपल्याला जालावर कुढं बी मिळत्याल .. पण त्या फूटूमधी आपण हाय गा ? नाय ? गेले उडत मंग ..
अल्मोस्ट प्रत्येक फोटूत नको तिथं शायनिंग हाणनारा
टारनॉल्ड शिवाजीनगर
आजकाल ... डोकं नापीक झालं आहे ...
13 Oct 2008 - 7:15 am | झकासराव
मस्त आहेत फोटो. :)
प्राग नगरी सुन्दर आहे.
अवांतर : लिखाळ राव तरुणच आहेत की. मला उगाचच ते ४०-४५ वयोगटातील वाटले.
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao
13 Oct 2008 - 4:09 pm | लिखाळ
वा ! सर्व फोटो छान !
पुन्हा एकदा प्रागची सफर घडली :)
केसुंचा फोटो मस्त !
>अवांतर : लिखाळ राव तरुणच आहेत की. मला उगाचच ते ४०-४५ वयोगटातील वाटले. <
:)
--लिखाळ.
13 Oct 2008 - 9:10 am | यशोधरा
मस्त फोटो!
13 Oct 2008 - 10:26 am | वैशाली हसमनीस
चित्रसफर फारच सुंदर झाली आहे.तूंही लिहीण्याचा प्रयत्न कां करीत नाहीस ?तुला नक्कीच जमेल ते !
13 Oct 2008 - 12:47 pm | मिंटी
मस्तच आहेत सगळे फोटो...
सुरेख... :)
13 Oct 2008 - 1:48 pm | मनस्वी
सगळे फोटो छान!
मनस्वी
13 Oct 2008 - 3:23 pm | शाल्मली
डी.डी.,
सगळे फोटो छान आले आहेत.
स्वाती ताईच्या लेखाबरोबर हे फोटो मस्त वाटत आहेत.
शिशिराच्या रंगात रंगलेल्या केसुंचा फोटो तर फारच छान ! :)
--शाल्मली.
13 Oct 2008 - 4:39 pm | धमाल मुलगा
एकदम झनाटामॅटीक फोटु :)
लै लै खास!
बाकीचे फोटु भारी आहेतच, पण आपल्याला आवडला तो शेवटाचा फोटु!
केसुशेठ एकदम त्या पानांच्या रंगाचा शर्ट घालुन कसे काय आले बॉ?
का पानांवरचा रंग हळुच सांडला त्यांच्या शर्टावर? :)
(स्वगतः शिशीराच्या वार्याने वाळल्या पानांबरोबर शर्टही गळुन उडुन गेला तर???? )
काय च्यामारी शहर आहे! बघायला कसं एकदम प्रसन्न वाटताहेत हे फोटो.
14 Oct 2008 - 12:09 am | भडकमकर मास्तर
काय च्यामारी शहर आहे! बघायला कसं एकदम प्रसन्न वाटताहेत हे फोटो.
मस्त फोटो...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
13 Oct 2008 - 4:58 pm | प्रमोद देव
दिनेशच्या नजरेला आणि हस्तकौशल्याला सलाम!
13 Oct 2008 - 5:00 pm | रेवती
स्वातीताईच्या लेखाइतकेच हे फोटोही छान आलेत. फॉल कलर्स मस्त दिसतायत.
रेवती
13 Oct 2008 - 5:18 pm | शितल
सगळे फोटो मस्त आहेत .
प्राग खुपच सुंदर आहे असे फोटो पाहुन वाटत आहे. :)
13 Oct 2008 - 9:21 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
दिनेशराव, फोटो झकास आले आहेत.
14 Oct 2008 - 12:29 am | चतुरंग
दिनेशराव आपले कॅमेरा कौशल्य लाजवाब!
खगोलशास्त्रीय घड्याळ अफलातूनच आहे. सर्वसाधारणपणे २४ तासाच्या घड्याळात २४ आकडा डायलवर मध्यभागी सर्वात वर (जिथे १२ तासाच्या घड्याळाचे १२ असतात तिथे) असतो. ह्या वरच्या घड्याळात तो साध्या घड्याळातल्या ३ च्या जागी आहे. हे जरा चमत्कारिक वाटले.
सगळे प्रासाद आणि कॅसल मस्तच आलेत!
केसूशेठतर एकदम 'रंगुनी रंगात सार्या रंग माझा वेगळा!' म्हणताहेत असे वाटते आहे. झक्कास फोटू!
अप्रतिम फॉल कलर्स! O:)
(खुद के साथ बातां : रंग्या, ४० च्या पुढे वय गेलं की माणसाला 'तरुण वयोगटातले' नाहीत असे का बरे म्हणतात? :B )
चतुरंग
14 Oct 2008 - 2:33 am | धनंजय
चित्रे छानच आहेत!
- - - -
आश्चर्यकारक खरे, पण १-२४ आकडे लिहिलेले आहेत, ते नेहमीची वेळ दाखवण्यासाठी नाही. आत रोमन १-१२, १-१२ आकडे तुम्ही सांगितल्याप्रमाणेच लिहिलेले आहेत. ही नेमहीची गणना मध्यरात्रीपासून/मध्याह्नापासून सुरू होते. बाहेरील १-२४ आकडे "जुनी चेक तास-गणना" होती. तास सूर्यास्तापासून मोजणे सुरू होते, आणि पुढचा सूर्यास्त होईपर्यंत (म्हणजे २४ तासांपेक्षा थोडा कमी, किंवा थोडा अधिक वेळ) तास मोजत राहायचे. मग पुन्हा सूर्यास्त झाला की नवीन दिवस.
(ज्यू आणि मुसलमान लोकांच्या धार्मिक विधींसाठी तासांची गणना अशीच होते. हिंदूच्या धार्मिक विधींसाठी तिथी चांद्र असते - तिथी बदलायची वेळ बदलत असते... या सर्व गमतीजमती.)
सध्याच्या प्रमाण वेळेप्रमाणे सूर्यास्त वेगवेगळ्या वेळी होतो (हिवाळ्यात मध्याह्नानंतर थोड्याच वेळाने, तर उन्हाळ्यात मध्याह्नानंतर बर्याच उशीरा. तसे ते बाहेरच्या आकड्यांचे चक्र फिरवायचे...
माझे फारसे लक्ष गेले नव्हते. मोठी चतुर दृष्टी होय चतुरंगांची. मग काय - त्यांच्या विचारणेनंतर गूगलाचार्यांकडून माहिती मिळवली.
14 Oct 2008 - 8:20 am | झकासराव
मी अजुन ४० च्या आत आहे ना :D
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao
14 Oct 2008 - 1:36 am | बेसनलाडू
आवडली.
(आस्वादक)बेसनलाडू
14 Oct 2008 - 5:36 am | प्राजु
सगळेच फोटो मस्त.
या प्राग ची चित्रे पाहून मला कॅनडामधील क्वेबेक या शराची आठवण झाली अशीच जुन्या पद्धतिची घरं आणि एकूणच सगळा महोल आहे..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
14 Oct 2008 - 8:22 am | विसोबा खेचर
सर्व फोटू लै भारी... :)
16 Oct 2008 - 9:05 am | सर्वसाक्षी
घरबसल्या प्राग सफर घडवुन आणल्याबद्दल धन्यवाद. पिवळ्या पानांखालचे हिरवे पानही आवडले:)