नाते अग्निशी

शब्दानुज's picture
शब्दानुज in जे न देखे रवी...
9 May 2014 - 9:46 am

शरीरावर माझ्या ज्वालांचे नर्तन चालले
ईथेच मी अग्निशी नाते प्रस्थापिले

माझ्याच देवाकडून मी देव्हाह्र्यात जाळले गेले
देवरूपातील दानव मी कैकवार पाहिले

शरीराचे अस्तित्व केवळ राखेतुन उरले
राखेतील धगधगते अंगारे प्रतिशोधास आतुरले

जनलोकांच्या आत्म्यामध्ये बंडाच्या अग्निरुपात प्रगट्ले
अखेरीस तुमच्यामधुन मी त्यास फासावर लट्कवले

शेवटक्षणी मात्र मी 'देवासाठी' गहिवरले
मज प्रियकरास मी चितेवर मिठित घेतले

संस्कृती

प्रतिक्रिया

शब्दानुज's picture

9 May 2014 - 9:48 am | शब्दानुज

वाट तुमच्या प्रतिसादाची!!!!!!!!!

शब्दानुज's picture

9 May 2014 - 10:15 am | शब्दानुज

मागील वेळेस वयासाठी गजहब झाला होता --काहींनी म्हशींसाठी स्वप्ने बघितली!!! म्हणुन सांगतो १९

संजय क्षीरसागर's picture

10 May 2014 - 1:23 am | संजय क्षीरसागर

च्यायला, ९१ ला सुद्धा अशी कविता सुचणं कर्मकठीण!

यावरनं एक ज्योक आठवला.

एक नवकवी अशाच धगधगत्या कविता कविसंमेलनात सादर करतो पण प्रतिसाद मिळत नाही. मग तो विचारतो `माझ्या कवितेतली आग तुम्हाला जाणवत नाही का?'
श्रोते कोरसमधे उत्तरतात ` अजिबात नाही'
यावर नाऊमेद होऊन तो विचारतो `माझ्या कवितेत आग येण्यासाठी मी काय करु?'
मागनं एकजण म्हणतो `आगीत घाला'

शब्दु काका छाने कविता पण कुनाचे नाते अग्निशी ते शेवटपर्य्न्त नै कळले ...

शब्दानुज's picture

10 May 2014 - 7:51 pm | शब्दानुज

ही हुंड्यात बळी पड्लेल्या एका स्त्रीची कथा आहे

तिचे अग्निशी असलेले नाते कसे बदलत गेले हे सांगितले आहे

पहिल्यांना अग्निशी असलेले नाते संहारक होते.. ती ज्याला परमेश्वर मानले त्याच पतिने तिला जाळ्ले

नंतर हे नाते अंगारात बदलले.. शेवटी सामांन्यांनी उठाव केला आणि त्यास फासावर लावले त्यावेळी तिने बंडाच्या रुपाचे अग्नीरुप घेतले

शेवटी जेव्हा पतिला चीतेवर पाहिले तेव्हा तिचे मन गहिरवले आणि चितेवरच्या अग्निचे रुप घेउन पतिस आपल्यात सामावुन घेतले

आता पुन्हा कविता वाचुन बघा.....

प्रतिसादासाठी धन्यावाद........

संजय क्षीरसागर's picture

10 May 2014 - 1:08 am | संजय क्षीरसागर

शरीरावर माझ्या बालांचे नर्तन चालले
बारात मी बालांशी नाते प्रस्थापिले

माझ्याच बेवडेगिरीने लिव्हर जाळले गेले
रुपारूपातील यौवन मी कैकवार पाहिले

शरीराचे अस्तित्व केवळ झिंगेतुन उरले
पोटातील धगधगते अंगारे तरी पिण्यास आतुरले

जनलोकांच्या बॉटलमध्ये बंदी मी, स्वर्णरुपात प्रगटले
अखेरीस तुमच्यामधुन मी, उरलेल्या पेगांवर भागवले

शेवटक्षणी मात्र मी 'सोडण्यासाठी' गहिवरले
मज प्रियकरास मी रस्त्यावर मिठित घेतले

शब्दानुज's picture

10 May 2014 - 7:52 pm | शब्दानुज

ही हुंड्यात बळी पड्लेल्या एका स्त्रीची कथा आहे

तिचे अग्निशी असलेले नाते कसे बदलत गेले हे सांगितले आहे

पहिल्यांना अग्निशी असलेले नाते संहारक होते.. ती ज्याला परमेश्वर मानले त्याच पतिने तिला जाळ्ले

नंतर हे नाते अंगारात बदलले.. शेवटी सामांन्यांनी उठाव केला आणि त्यास फासावर लावले त्यावेळी तिने बंडाच्या रुपाचे अग्नीरुप घेतले

शेवटी जेव्हा पतिला चीतेवर पाहिले तेव्हा तिचे मन गहिरवले आणि चितेवरच्या अग्निचे रुप घेउन पतिस आपल्यात सामावुन घेतले

आता पुन्हा कविता वाचुन बघा.....

प्रतिसादासाठी धन्यावाद........

१९ व्या वर्षी सामान्य व्यक्ती प्रेम वगैरे करते आणि अत्यंत अवखळ असते. काव्यविषय काल्पनिक असला तरी दारुण आहे. पतीनं दहन केलेली पत्नी, तो फासावर गेल्यावर, त्याच्या सरणावर अग्नीरुप घेऊन त्याला मिठी कशाला (झक मारायला) घालेल? आधीच इतका लफडा झाल्यावर त्याला आपल्यात कशाला सामावून घेईल?

विधायक विचार करा, चांगले साहित्य वाचा, सकाळी उठून व्यायम करा, समोर ध्येय ठेवून आभ्यास नीट करा म्हणजे विचारात अशी निगेटिवीटी येणार नाही.

प्यारे१'s picture

10 May 2014 - 9:07 pm | प्यारे१

>>>विचारात अशी निगेटिवीटी येणार नाही.

जौ द्या ना सर! कशाला ?????????

आत्मशून्य's picture

10 May 2014 - 11:15 pm | आत्मशून्य

इतकी निगेटीवीटी बरी न्हवे.

पाषाणभेद's picture

11 May 2014 - 9:46 am | पाषाणभेद

खरंय, मागल्या कवितेत पाणी, मडके आता डायरेक जाळ. काय खरं नाय बाबा. हिरवळ नाय का रे तिकडे?

शब्दानुज's picture

10 May 2014 - 11:55 pm | शब्दानुज

एखाद्या कडव्यावरुन कोणाचे विचार कसे आहेत हे कळले शक्य नाही
वरच्याच विडंबनेतुन मग मी कोणता अर्थ घ्यावा??????
एखाद्या गोष्टीत ईतरांची मते वेगळी असु शकतात

शेवट्चा मुद्दा एकवेळ चुकीचा असेलही!! अजुन लहान आहे, नवीन आहे मी!! एवढ्यात रागवु नका तुमच्या मार्गदर्शनाची गरज आहे

आनन्दिता's picture

11 May 2014 - 8:02 am | आनन्दिता

कवितेची पार्श्वभुमी आधी लिहिली असती अथवा शिर्षकात काही हिंट दिली असती तर बरं झालं असतं.

पार्श्वभुमी वाचल्यानंतर मात्र अर्थ लागतायत. आवडली कविता..:)

लिहीत रहा.!

जेपी's picture

10 May 2014 - 6:58 pm | जेपी

=))

आयला मोह आवरला नाय . सकाळी उठल्यावर कुटला व्यायम करावा.

अत्रुप्त आत्मा's picture

11 May 2014 - 5:59 am | अत्रुप्त आत्मा

@ सकाळी उठल्यावर कुटला व्यायम करावा.>>> रोज कोणालातरी कुटत जा! =))

आत्मशून्य's picture

11 May 2014 - 7:13 am | आत्मशून्य

पाषाणभेद's picture

11 May 2014 - 9:48 am | पाषाणभेद

>>> सकाळी उठल्यावर कुटला व्यायम करावा.>>>
आत्मुस, सुर्यनमस्कार विसरलास काय रे?