गुजरात विकासाचे मृगजळ..

बंडा मामा's picture
बंडा मामा in काथ्याकूट
6 Mar 2014 - 12:15 am
गाभा: 

अरविंद केजरीवाल ह्यांना आज पोलिसांनी ताब्यात घेतले आणि सगळीकडे त्याची बातमी दिसू लागली. गुजरातच्या विकासाचा आढावा घेण्यासाठी हा दौरा आहे असे स्पष्ट केले असुनही, राजकीय रॅलीला परवानगी घेतली नाही असे लंगडे कारण दाखवुन पोलिसांनी ही कारवाई केली. अर्थातच कुठेतरी पाणी मुरते आहे हे स्पष्ट आहे.

संघपरीवाराचा जोर असणारा राम मंदिराचा मुद्दा आता मते मि़ळवुन देत नाही म्हणून 'विकास पुरुष' ही प्रतिमा निर्माण करुन त्यावर जोर देण्याची निती अवलंबली आहे. आणि त्यासाठी गुजुरातच्या विकासाचा उदो उदो सिस्ट्मॅटीकली भाजपा कडुन केला जातो आहे.

प्रत्यक्ष गुजरात मधे मात्र वेगळीच परिस्थिती आहे. आणि हे बर्‍याच लोकांना चांगलेच ठाऊक आहे. एखादे आयसोलेटेड उदाहरण सोडल्यास, इन जनरल गुजरात अनेक कसोट्यांवर इतर अनेक राज्यांच्या बराच मागे आहे. सध्या केजरीवालने ह्याच मुळावर घाव घातल्याने अर्थातच भाजप कडून प्रचंड विरोध होणार हे स्पष्ट होते.

त्यानिमित्ताने मला साधारण एक वर्षापुर्वीचा फ्रंट्लाईन मधे आलेला हा लेख आठवला. संपूर्ण गुजरातचा आढावा ह्यात एका बर्ड्स आय व्ह्यु प्रमाणे घेतला आहे. भरपूर आकडेवारीही दिलेली आहे. केजरीवाललाही हे चांगलेच माहित आहे, आणि म्हणूनच त्याने मुळावरच घाव केला आहे.

लेख इथे वाचा: http://www.frontline.in/the-nation/mirage-of-development/article4430889.ece

तातील काही तक्ते:

chart

chart

chart

आता ह्यातुन पुढे काय होणार हे मात्र रोचक असणार आहे.

प्रतिक्रिया

डँबिस००७'s picture

28 Mar 2014 - 2:10 pm | डँबिस००७

:biggrin:

नानासाहेब नेफळे's picture

3 Apr 2014 - 10:43 pm | नानासाहेब नेफळे

मुंबैस उकडणारच ,मुंबैस थंड हवा असती तर शिमला नसते म्हण्टले!

आयुर्हित's picture

3 Apr 2014 - 10:55 pm | आयुर्हित

The airport charges an ADF of Rs 200 on every domestic passenger and Rs 1,300 on every international passenger, to recover the increased cost.

प्लांट एक नजर में...
- 170 करोड़ रुपए का प्रोजेक्ट
- 27,639 वर्गमीटर में विस्तार
- 2500 कर्मचारी
- मशरूम-योगर्ट-मिल्कचीज और पोटेटो चिप्स सहित फ्रेंच फ्राइज जैसे खाद्य पदाथोर्ं का रूपांतरण
- 2000 टन फ्रोजन उत्पादकों की स्टोरेज व्यवस्था
- अमेरिका, सिंगापुर, दुबई, मलेशिया जैसे देशों में निर्यात
- कंपनी की ओर से मशरूम की खेती को प्रोत्साहित करने के लिए 10,000 किसानों को इस खेत-उद्योग के जरिए सहभागी बनाया गया है।
संयंत्र और उत्पाद क्षमता: (प्रतिवर्ष)
Mushrooms 15000 Tons
Appetizers 24000 Tons
Dairy 15000 Tons
Ethnic Sweets 3000 Tons
Canned Foods 30000 Tons
मोदी के गांव में है देश का सबसे बड़ा फूड प्रोसेसिंग प्लांट

जेव्हा कासव (कच्छ) धावू लागते!
अनय जोगळेकर
Thursday March 07, 2013

राज ठाकरे आपल्या प्रत्येक सभेमध्ये आघाडी सरकारला शिव्या घालून झाल्या की १० मिनिटं गुजरातची स्तुती करतात. ठाकरे यांचा गुजरात दौरा होऊनही आता बरेच महिने झाले आहेत. दरम्यान नर्मदेमधून बरेच पाणी वाहून गेलंय. काही दिवसांपूर्वी असेच कच्छला भेट देण्याचा योग आला. त्याबद्दल...

सुरत-बडोदा-अहमदाबाद-राजकोट या गुजरातच्या नागरी आणि औद्योगिक पट्ट्यात आपल्यापैकी ब-याच जणांचं बरेचदा जाणं येणं होतं. त्यामुळे राज ठाकरे यांच्या गुजरात स्तुतीपुराणाचं अप्रूप वाटायचं. पण आजवर गुजरातच्या सर्वात मागास जिल्ह्यांपैकी एक असलेल्या कच्छचा वेगाने होणारा विकास पाहिल्यानंतर या विकासाबद्दल लिहिल्याशिवाय राहता येत नाही.

संस्कृतमध्ये कच्छ म्हणजे कासव. कासवाप्रमाणे कच्छ जिल्ह्याचा एक मोठा भाग वर्षाचे अनेक महिने पाण्याखाली बुडालेला असतो. त्यामुळेच आकारमानाने भारतातील सर्वात मोठा जिल्हा असूनही कच्छची लोकसंख्या आहे उणीपुरी २० लाख. बहुतांशी जमीन रेताड किंवा दलदलीची; पावसाचे प्रमाण अत्यल्प; मोठ्या नद्यांचा अभाव. सिंधू नदी पूर्वी कच्छमध्ये समुद्राला मिळायची पणे तिनेही १८१९ साली झालेल्या भूकंपात आपले पात्र बदलले आणि आजच्या पाकिस्तानातून वाहू लागली.

पोटापाण्यासाठी कच्छच्या अनेक लोकांनी मुंबई, पूर्व अफ्रिका, गल्फ, इग्लंड, अमेरिका अशी अनेक ठिकाणं गाठली. आमिर खानच्या “लगान” चित्रपटात बिहारमधील चंपारण्य म्हणून जो भाग दाखवला आहे तो प्रत्यक्षात भुजच्या आसपास आहे. कदाचित हे कमी होते म्हणून २६ जानेवारी २००१ रोजी आलेल्या भूकंपात सुमारे २०००० लोकांचा बळी गेला. लाखो लोकं बेघर झाले आणि भुजमधल्या बहुतांशी इमारतींची एकतर पडझड झाली नाहीतर तडे गेले. असा हा कच्छ जिल्हा भूकंपानंतर झालेल्या पडझडीतून ना केवळ उभा राहिला तर विकासाच्या बाबतीत गुजरातच्या अन्य भागांशी स्पर्धा करू लागला.

भूकंपानंतर कच्छमधील औद्योगिक गुंतवणूकीवर ५ वर्षांची करमाफी जाहीर करण्यात आली. त्याच सुमारास सत्तेवर आलेल्या नरेंद्र मोदी सरकारने उत्तम दर्जाच्या पायाभूत सुविधा पुरवल्याने उद्योजकांना या करमाफीचा फायदा घेता आला. कच्छ जिल्हा वाळवंटी असला तरी त्यात कोळसा, जिप्सम, बॉक्साईट, मीठ, ब्रोमेन अशी अनेक खनिजं मोठ्या प्रमाणावर आहेत. कांडला आणि गेल्या काही वर्षात विकसित होत असलेले मुंद्रा यासारखी बंदरे अत्यंत महत्त्वाच्या जागी आहेत. युरोप, आखाती देश यांना उत्तर आणि मध्य भारताशी जोडण्यासाठी ही बंदरं सर्वात सोयीची आहेत. मोदी सरकारने कच्छ जिल्ह्यात उत्कृष्टं दर्जाच्या रस्त्यांचं जाळं उभारल्यामुळे बंदरं आणि खाणी उद्योगांशी जोडल्या गेल्या. कच्छमधील ग्रामीण भागात फिरतानाही गाडीचा वेग ताशी ८० किमीपेक्षा कमी करायची गरज भासत नाही.

रस्त्यांइतकंच महत्त्वाचं आहे पाणी. पावसाची कमतरता असल्यामुळे सरकारने रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून सर्वत्र कृत्रिम तलावांचे जाळे उभे केले. गतवर्षी महाराष्ट्रातील मराठवाडा आणि अन्य विभागांप्रमाणे कच्छमध्येही खूप कमी पाऊस पडला असला तरी फिरताना कृत्रिम तलावांमध्ये बऱ्यापैकी पाणी दिसून आले. आमच्या ड्रायव्हरने सांगितले की, सरासरीएवढा पाऊस पडला तर आम्ही दोन वर्षं पुरेल एवढं पाणी साठवून ठेवतो. त्याला जोड मिळाली ती नर्मदेच्या पाण्याची.

गुजरातने नर्मदेचे पाणी ४०० हून अधिक किलोमीटर लांबीच्या कालवे आणि पाईपलाईनद्वारे कच्छमध्ये आणले असल्यामुळे शेतकऱ्यांचा, पर्यटन व्यवसायाचा आणि उद्योगांचा मोठा फायदा झाला. गुजरातमध्ये लोडशेडिंग नाही याचा प्रत्यय कच्छची राजधानी भुज ते अगदी पाकिस्तानच्या सीमेवर असलेल्या लखपत आणि मोठे रण (मीठाचे वाळवंट) असा सर्वत्र आला.

क्षारयुक्त रेताड जमीन आणि मचुळ (खारं) पाणी यामुळे कच्छ जिल्ह्यात कशीबशी १२% जमीन लागवडीखाली आहे. पण गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर ठिबक सिंचन योजना, टिश्यू कल्चर आणि पीक पॅटर्न बदलामुळे तेथील शेतीत क्रांती घडून आली आहे. आज कच्छमध्ये भारतात सर्वात जास्त खजूर पिकतो. याशिवाय हवामानाला साजेशी कडधान्यं, वांगी, कापूस, भुईमूग आणि बाजरीसारख्या पिकांच्या उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. जिल्ह्यातील “बन्नी” या गवताळ पट्ट्यातल्या म्हशी २५-३० लिटर उच्च दर्जाचे दूध देण्याबद्दल प्रसिद्ध आहेत. या म्हशींवर संशोधन करून त्यांच्या संकरित जांतींद्वारे कच्छ भागात “आणंदप्रमाणे” धवल क्रांती घडवून आणण्याचे प्रयत्न चालू आहेत. अभय उर्फ गंगाधर मुटेजी वाचताय ना?

रस्ते, वीज, पाणी आणि बंदरं इ. उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधा आणि गतिमान प्रशासन यामुळे गेल्या १० वर्षांत कच्छमध्ये खाणकाम, सिमेंट, पोलाद, जहाज बांधणी अशा अनेक उद्योगांचं जाळं उभं राहिलं आहे. भारतातील सर्वात मोठा सिमेंट आणि स्पॉंज आयर्न प्लॅंट कच्छमधे आहे. सॉ पाईपच्या उत्पादनात कच्छ जगात पहिल्या क्रमांकावर आहे. सांघी, अडाणी, व्हिडिओकॉन, वेलस्पन, सुझलॉन आणि एस्सआर सारख्या कंपन्यांनी या भागात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे.

भारत आणि जपान सरकारच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात येत असलेल्या मुंबई-दिल्ली औद्योगिक पट्टा या महत्त्वाकांक्षी योजनेचे महत्त्व ओळखण्यात महाराष्ट्र सरकार कमी पडलं. गुजरातने संधी साधून या पट्ट्यातील उद्योगांना न्हावा-शेवाच्या आधी कच्छमधील बंदरांशी जोडल्यामुळे भविष्यात महाराष्ट्राला मोठा फटका बसू शकेल.
कच्छसारख्या उजाड भागात पर्यटनाचा विकास ही कल्पना प्रथमदर्शनी हास्यास्पद वाटते. तिथे नाही राजस्थानसारखं वाळवंट; ना उंच पर्वत; ना हिरवी वनराई. त्यामुळे पर्यटन हे काही धार्मिक स्थळांपुरते मर्यादित होते.

नाही म्हणायला कच्छच्या दक्षिणेकडे निळाशार-शांत समुद्र, उत्तरेकडे मीठाचे वाळवंट आणि ढोलावीरासारखी (मोहेंजोदडो-हडप्पाप्रमाणे) उत्खननात प्राचीन अवशेष मिळालेली काही ठिकाणं. अशा ठिकाणांचं मार्केटिंग करायला मोदींनी थेट अमिताभ बच्चन यांना आणले. जिल्ह्यात ज्या ठिकाणी रेफ्युजी, हम दिल दे चुके सनम आणि लगानसारख्या चित्रपटांचे शुटिंग झाले होते अशी ठिकाणं पर्यटनाच्या दृष्टीनं विकसित करण्यात आली. कच्छचं रणं हे जगातील सर्वात मोठं मीठाचं वाळवंट असल्यामुळे या ठिकाणी गेल्या ३ वर्षांपासून धुमधडाक्यात “रण उत्सव” साजरा करण्यास सुरूवात झाली.

१५ डिसेंबर ते ३१ जानेवारी या कालावधीत मीठाच्या वाळवंटासभोवती वातानुकुलित तंबू आणि मातीची घरं (भुंगा) यांचे गाव उभे केले जाते. हस्तकला आणि कुटिरोद्योगांसाठी कच्छ जगभरात प्रसिद्ध असल्यामुळे अशा कलाकारांना पर्यटक-खेड्यात जागा दिली जाते. मीठाच्या वाळवंटातील सूर्योदय आणि सूर्यास्त हे या उत्सवाचे प्रमुख आकर्षण आहे. १० वर्षांपूर्वी या वाळवंटाला भेट द्यायला क्वचितच कोणी पर्यटक येई. नुकत्याच पार पडलेल्या “रण उत्सवाला” ५०,०००हून अधिक लोकांनी भेट दिली. पर्य़टक खेड्याशिवाय या भागात राहणाऱ्या गुराख्यांना तसेच बंजाऱ्यांना संघटित करून ग्रामीण पर्यटनाचा प्रयोग यशस्वीपणे राबवण्यात येत आहे.

माघी पौर्णिमेला म्हणजेच २५ फेब्रुवारीला मी (स्वखर्चाने) मीठाच्या वाळवंटाला भेट दिली. नजर जाईल तोपर्यंत चहुबाजूला जमिनीवर पसरलेली पांढऱ्या-शुभ्र मीठाची दुलई; निरभ्र आकाशात पश्चिम क्षितिजात बुडणारा सूर्याचा “तेजोनिधी लोहगोल”; मीठावरून परावर्तित होऊन चारी दिशा उजळवून टाकणारी त्याची किरणं आणि त्याच सुमारास पूर्व क्षितिजावर उगवणारा पौर्णिमेचा चंद्र. हळूहळू वाढत जाणारा अंधार आणि मग चंद्रप्रकाशात पुन्हा एकदा लख्ख उजळणारे वाळवंट हा अविस्मरणीय अनुभव प्रत्येकाने घेण्यासारखा आहे.

टिपूर चांदण्या रात्रीत मातीच्या गोल घरात राहून स्थानिक लोकांनी लाकडाच्या चुलीवर शिजवलेल्या अन्नाची चव काही वेगळीच लागते. पण अशी परिस्थिती हिवाळ्याचे काही महिनेच टिकते. पावसाळ्यात मीठाचे वाळवंट समुद्राच्या पाण्यात बुडते तर

उन्हाळ्याच्या महिन्यांत ४५ ते ५० अंशांपर्यंत तापते. यावेळी तिथे कोणी पर्यटक येत नाहीत. रहातात ते स्थानिक मेहनती लोकं आणि डोळ्यांत तेल घालून पाकिस्तानच्या घुसखोरीचे प्रयत्न हाणून पाडण्यास सज्ज आपल्या सीमा सुरक्षा दलाचे जवान.नकळतच त्या जवानांना सलाम करण्यासाठी उजवा हात डोक्याकडे जातो.

कच्छहून परतताना राहून राहून मनात विचार येतो की पुढच्या १० वर्षांत आपल्या महाराष्ट्रातील विदर्भ किंवा मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत असं काहीसं होताना बघण्याची आणि त्याबद्दल लिहिण्याची संधी मला मिळेल का? ती मिळावी अशी मी प्रार्थना करतो.
जेव्हा कासव (कच्छ) धावू लागते! Blog by अनय जोगळेकर

इरसाल's picture

12 Apr 2014 - 9:26 am | इरसाल

ह्या आयुर्हिताला नाय काय काम ;)

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

12 Apr 2014 - 11:14 am | माईसाहेब कुरसूंदीकर

अरे तो चांगले तेच लिहितोय.कॉन्ग्रेसला मत देणार्‍यांच्या पोटात कदाचित दुखेल हे वाचून पण पर्यटनाचा विचार केला तर आपल्याकडे काय आहे?घारापुरी,गेट वे ऑफ इंडिया,अजंटा एलोरा? गंमत अशी की ह्या गोष्टी ५० वर्षापूर्वी ही होत्या.
आपण फक्त शिवाजीचे उमाळे काढायचे आणि एका सुरात म्हणायचे- बहु असोत संपन्न की महा आ आ आ , प्रिय अमुचा.... काय?
(मोदी पंतप्रधान व्हावेत असे वाटणारी)माई

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

12 Apr 2014 - 11:21 am | माईसाहेब कुरसूंदीकर

आणि तू आता स्वाक्षरी बदल रे.
नोकरी करून नाना व्यवसाय करून जो अनुभव, पैसा मिळेल तो समाजासाठी वापरुन हे दाखवून देईन कि "मी मराठी"च आहे.

आयुर्हित's picture

23 Apr 2014 - 7:07 pm | आयुर्हित

गुजरात में अभूतपुर्व विकास हुआ है जिसकी सराहना सोनिया के नेतृत्व वाली राजीव गांधी फाउंडेशन नामक संस्था और अमेरिकी संसदीय कमेटी ने भी की है।

Bharatiya Janata Party (BJP) prime ministerial candidate Narendra Modi on Sunday countered Congress Vice President Rahul Gandhi's jibe at his Gujarat model saying that the state was declared as the most developing state in the country by Rajiv Gandhi foundation, of which Sonia Gandhi is also a member.

Gujarat model was praised by Rajiv Gandhi foundation
Sunday, 30 March 2014 - 1:14pm IST | Place: Akola

राजीव गांधी फाउंडेशन के द्वारा नरेंद्र मोदी की सरकार को बेहतरीन सरकार का अवॉर्ड दिया गया
-मजलिसे ओलमा-ए-हिंद मौलाना कल्बे जव्वाद के घर पर आयोजित इस बैठक में यह भी कहा गया कि राजीव गांधी फाउंडेशन के द्वारा नरेंद्र मोदी की सरकार को बेहतरीन सरकार का अवॉर्ड दिया गया। इस फाउंडेशन की सदस्या श्रीमती सोनिया गांधी भी हैं।
मुस्लिम धर्मगुरु ने लगाए कांग्रेस पर आरोप


मोदी के दावे पर केन्द्र की मुहर: गुजरात की भूमि-अधिग्रहण नीति सबसे अच्छी

नई दिल्ली: कई क्षेत्रों में देश को लीड कर रहे गुजरात राज्य के लिए एक और उपलब्घि सामने आई है। केंद्र के वाणिज्य और उद्योग मंत्रालय की एक रिपोर्ट में गुजरात के भू-अधिग्रहण मॉडल को देश का सबसे बेहतर मॉडल माना गया है।

गौरतलब है कि कांग्रेस के आनंद शर्मा केंद्र के वाणिज्य व उद्योग मंत्रालय के मुखिया हैं। शर्मा हमेशा गुजरात के विकास मॉडल पर उंगलियां उठाते रहे हैं, लेकिन उनका ही मंत्रालय अब रिपोर्ट मे गुजरात मॉडल की तारीफ कर रहा है। यहां तक कि कांग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी भी चुनाव प्रचार के दौरान गुजरात के जमीन अधिग्रहण पर सवाल उठाते रहे हैं। गुजरात के मुख्यमंत्री और भाजपा के प्रधानमंत्री पद के उम्मीदवार नरेन्द्र मोदी ने ट्वीट किया है कि, “अच्छा होता कि गुजरात को गाली देने वाले मेरे कांग्रेसी मित्रों ने अपनी ही सरकार की वह रपट पढ़ी हाती जिसमें गुजरात के विकास की तारीफ की गई है।”

क्या है रिपोर्ट में
वाणिज्य और उद्योग मंत्रालय के लिए यह रिपोर्ट तैयार की है कंसल्टेंसी फर्म एक्सेंचर ने। औद्योगिक नीति और संवर्घन विकास के लिए तैयार की गई इस रिपोर्ट में गुजरात भू-अधिग्रहण मॉडल को बेस्ट बताते हुए अन्य राज्यों को कुछ परिवर्तनों के साथ इस मॉडल को अपनाने को कहा गया है। साथ ही पर्यावरण मंजूरी देने और इसके लिए ई-गवर्नेस का इस्तेमाल करने के लिए भी गुजरात की तारीफ की गई है।

रिपोर्ट में बताया गया है कि गुजरात में जमीन अधिग्रहण से प्रभावित हर परिवार के एक सदस्य को नौकरी दी जाती है। इसकी के चलते 285 हेक्टेयर जमीन 2008-09 में की गई जबकि 2009-10 में 1564 हेक्टेयर और 2010-11 में 907 हेक्टेयर भूमि औद्योगिक विकास के लिए दी गई।हालांकि कर्नाटक और महाराष्ट्र के श्रम प्रबंधन और व्यापार एवं निवेश सुविधा प्रणाली की भी रिपोर्ट में प्रशंसा की गई है।

प्यारे१'s picture

8 May 2014 - 10:34 pm | प्यारे१

अन्ना,

८ दिस दम काडा, दम्ला असाल नै पचार करु करु.
आनि त्यापन मोट्टं म्हन्जे कॉपी पेस्टायचं र्‍हाऊंद्या की साईटला जरा.
सोत्ताचं कैतरी यिऊ द्या. कट्टाळा यतो त्ये वाचायचा आता.

थॉर माणूस's picture

9 May 2014 - 9:01 am | थॉर माणूस

*lol*
झालं हो... ७-८ दिवस अजून सहन करा. मग संपले या सगळ्या प्रचारकर्मींचे लेखनश्रम.
सरकारचं माहिती नाही पण १६ मे नंतर प्रचारकी लिखाणाने वैतागलेल्यांसाठी नक्कीच अच्छे दिन आने वाले है... ;)