गुजरात विकासाचे मृगजळ..

बंडा मामा's picture
बंडा मामा in काथ्याकूट
6 Mar 2014 - 12:15 am
गाभा: 

अरविंद केजरीवाल ह्यांना आज पोलिसांनी ताब्यात घेतले आणि सगळीकडे त्याची बातमी दिसू लागली. गुजरातच्या विकासाचा आढावा घेण्यासाठी हा दौरा आहे असे स्पष्ट केले असुनही, राजकीय रॅलीला परवानगी घेतली नाही असे लंगडे कारण दाखवुन पोलिसांनी ही कारवाई केली. अर्थातच कुठेतरी पाणी मुरते आहे हे स्पष्ट आहे.

संघपरीवाराचा जोर असणारा राम मंदिराचा मुद्दा आता मते मि़ळवुन देत नाही म्हणून 'विकास पुरुष' ही प्रतिमा निर्माण करुन त्यावर जोर देण्याची निती अवलंबली आहे. आणि त्यासाठी गुजुरातच्या विकासाचा उदो उदो सिस्ट्मॅटीकली भाजपा कडुन केला जातो आहे.

प्रत्यक्ष गुजरात मधे मात्र वेगळीच परिस्थिती आहे. आणि हे बर्‍याच लोकांना चांगलेच ठाऊक आहे. एखादे आयसोलेटेड उदाहरण सोडल्यास, इन जनरल गुजरात अनेक कसोट्यांवर इतर अनेक राज्यांच्या बराच मागे आहे. सध्या केजरीवालने ह्याच मुळावर घाव घातल्याने अर्थातच भाजप कडून प्रचंड विरोध होणार हे स्पष्ट होते.

त्यानिमित्ताने मला साधारण एक वर्षापुर्वीचा फ्रंट्लाईन मधे आलेला हा लेख आठवला. संपूर्ण गुजरातचा आढावा ह्यात एका बर्ड्स आय व्ह्यु प्रमाणे घेतला आहे. भरपूर आकडेवारीही दिलेली आहे. केजरीवाललाही हे चांगलेच माहित आहे, आणि म्हणूनच त्याने मुळावरच घाव केला आहे.

लेख इथे वाचा: http://www.frontline.in/the-nation/mirage-of-development/article4430889.ece

तातील काही तक्ते:

chart

chart

chart

आता ह्यातुन पुढे काय होणार हे मात्र रोचक असणार आहे.

प्रतिक्रिया

पिवळा डांबिस's picture

6 Mar 2014 - 12:32 am | पिवळा डांबिस

गुजरातच्या विकासाचा आढावा घेण्यासाठी हा दौरा आहे असे स्पष्ट केले असुनही, राजकीय रॅलीला परवानगी घेतली नाही असे लंगडे कारण दाखवुन पोलिसांनी ही कारवाई केली. अर्थातच कुठेतरी पाणी मुरते आहे हे स्पष्ट आहे.

नुसता विकासाचा आढावा जर घ्यायचा असेल तर राजकीय सभा/रॅली घ्यायची गरज काय?
आणि जर रॅली घेतली तर त्यासाठी परवानगी घेतली की नाही?
आणि जर रॅलीसाठी प्रवानगी घेतली नसेल तर पोलिसांनी कारवाई केली यात काय चुकलं?
कुठेतरी पाणी मुरतंय हे नक्की पण तुमच्या वाक्यांवरून हे केजरवालाचं पाणी मुरतंय असं दिसतंय!!

बाकी गुजरातच्या विकासावर चर्चा करायची असेल तर मोदी सत्तेवर येण्याआधी विविध प्रकारचे निर्देशांक गुजरातसाठी काय होते आणि आताच्या परिस्थीतीशी कंपॅरिझन करून आता ते काय आहेत यावरून गुजरातची मोदींच्या करकिर्दीत प्रगती झाली की नाही ते ठरवता येईल. उगाच गुजरातसारख्या मोठ्या राज्याची अंदमान, मिझोराम, गोवा यासारख्या लहान राज्यांशी त्या फ्रंटलाईनमधल्या लेखात तुलना केलेली बघून त्या लेखात कुठेतरी पाणी मुरतंय असंही वाटलं....

बंडा मामा's picture

6 Mar 2014 - 12:36 am | बंडा मामा

नुसता विकासाचा आढावा जर घ्यायचा असेल तर राजकीय सभा/रॅली घ्यायची गरज काय?

कुठे दिसली तुम्हाला रॅली किंवा सभा? किंवा किमान तशी घोषणा तरी? पोलिसांनी जे केले तो रडीचा डाव आहे.

उगाच गुजरातसारख्या मोठ्या राज्याची अंदमान, मिझोराम, गोवा यासारख्या लहान राज्यांशी त्या फ्रंटलाईनमधल्या लेखात तुलना केलेली बघून

स्वच्छ चष्म्यातुन लेख वाचा, किमान वरचे तक्ते तरी न्याहाळा. महाराष्ट्र, राजस्थान, आंध्र, पं. बंगाल अशी अनेक 'मोठी' राज्ये तुलनेसाठी घेतलेली दिसतील.

पिवळा डांबिस's picture

6 Mar 2014 - 12:46 am | पिवळा डांबिस

कुठे दिसली तुम्हाला रॅली किंवा सभा? किंवा किमान तशी घोषणा तरी? पोलिसांनी जे केले तो रडीचा डाव आहे.

रॅली सभा घेतली नसेल किवा तिची घोषणाही जर केली नसेल तर केजरीवालांना झालेली अटक (झाली असेल तर) ही बेकायदेशीर आहे. त्याविरूद्ध न्यायालयात दाद मागण्याचा त्यांना हक्क आहे की!

महाराष्ट्र, राजस्थान, आंध्र, पं. बंगाल अशी अनेक 'मोठी' राज्ये तुलनेसाठी घेतलेली दिसतील.

माझ्या मते ते चुकीचं आहे. एखाद्या व्हेरियेबलमध्ये कालानुसार होणारा बदल जर मापायचा असेल तर त्याच व्हेरियेबलचे गुजरातबद्दलचे दोन वेगवेगळे टाईम स्नॅपशॉटस घेऊन बदल मोजायला हवा आणि मग त्यावरून प्रगती झालिये की अधोगती हे ठरवायला हवं.

स्वच्छ चष्म्यातुन लेख वाचा

सेम टू यू!!!

llपुण्याचे पेशवेll's picture

6 Mar 2014 - 9:55 am | llपुण्याचे पेशवेll

केजरी यांना रोड शो साठी परवानगी न घेतल्याचे कारण देऊन निवडणूक अधिकार्‍यांच्या मार्फत कारवाई करून पोलिसांनी ताब्यात घेतले असे सांगण्यात येत आहे. हा तथाकथित निवडणूक आयोग राज्याच्या अखत्यारित असतो का? आश्चर्य वाटले.
http://online3.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5159874882849071689&Se...

चिंतामणी's picture

6 Mar 2014 - 7:36 pm | चिंतामणी

हा शब्दप्रयोग चुकला.

"रोड शो" असे म्हणायला हवे होते.

(रोड शो हा शब्द मान्य असेल अशी आशा आहे.)

बाकी साधेपणाचे ढोल बडवणार्याच्या ताफ्यात २२ गाड्या कशासाठी होत्या याचे उत्तर द्या.

आजानुकर्ण's picture

6 Mar 2014 - 1:29 am | आजानुकर्ण

अहो बंडा मामा, फ्रंटलाईन हे डाव्या विचारसरणीचे मासिक आहे. त्यांच्या माहितीवर किती विश्वास ठेवायचा? जरा ऑर्गनायझर किंवा पाञ्चजन्य मध्ये आलेले विश्वासार्ह दुवे द्या की.

प्रसाद गोडबोले's picture

24 Mar 2014 - 3:04 pm | प्रसाद गोडबोले

अहो बंडा मामा, फ्रंटलाईन हे डाव्या विचारसरणीचे मासिक आहे. त्यांच्या माहितीवर किती विश्वास ठेवायचा? जरा ऑर्गनायझर किंवा पाञ्चजन्य मध्ये आलेले विश्वासार्ह दुवे द्या की.

>>> करेक्ट ! १००% सहमत !!

विकास's picture

6 Mar 2014 - 2:27 am | विकास

केजरीवाल हे एक कांगावखोर आणि चालू व्यक्तीमत्व आहे. गुजरातमधे काहीतरी घडणार हे नक्कीच होते आणि तसेच झाले. डझनाहून अधिक गाड्यांच्या ताफ्याने केजरीवाल जात असताना पाटन जिल्हाधिकार्‍याने त्यांना थांबवले आणि विचारले की आचारसंहीता लागू झालेली असताना परवानगी न घेता असे कसे जाऊ शकतात. केजरीवाल नेहमीप्रमाणे म्हणाले की त्यांना म्हणजे केजरीवाल यांना माहीत नव्हते! तेव्हढी चौकशी झाल्यावर सोडून दिले. जिल्हाधिकार्‍यांच्या मते ते अधिकृत डिटेन्शन नव्हते तर चौकशीसाठी त्यांना थांबवले होते. मग त्यांच्या म्हणे गाडीच्या काचेवर दगडफेक झाली. त्या काच फुटलेल्या गाडीचा केजरीवालांनी मग केजरीवालांनी फोटोऑप साठी वापर केला. जसा आप च्याच राखी बिर्ला यांनी केला होता तसेच. अर्थात केजरीवालांनी या गुन्ह्याविरोधात पोलीसात तक्रार नोंदवली का नाही ते माहीत नाही. असो, हा कांगावखोरपणा १६ मे पर्यंत सहन करावा लागेल नंतर दिल्ली विधानसभेचे त्यांना राज्य मिळाले तर नीट चालवतील अशी आशा करूयात आणि बहुमतात राज्य मिळाले नाही तर धरणे धरायला रस्ता आणि शोमनशीप साठी मफलर आहेतच!

त्यानिमित्ताने मला साधारण एक वर्षापुर्वीचा फ्रंट्लाईन मधे आलेला हा लेख आठवला. संपूर्ण गुजरातचा आढावा ह्यात एका बर्ड्स आय व्ह्यु प्रमाणे घेतला आहे.

आता दंगलींवरून बोलता येणार नाही. त्यामुळे नवीन काही तरी पोटापाण्यासाठी झालं! या लेखातले पहीलेच वाक्य आहे: "Social development indicators in Gujarat are poor, proving that development in the State is lopsided." याचा अर्थ, लेखाचा भर सोशल इंडीकेटर्स वर आहे आणि म्हणणे आहे की विकास हा एकांगी आहे (विकास नाही असे नाही, फक्त लेखकाला आणि त्या विचारसरणीस हवा तसा नाही). वर अजानुकर्ण यांनी म्हणल्याप्रमाणे त्यात नवल देखील नाही कारण ते डाव्या विचारसरणीचेच नाही तर अगदी कम्युनिस्टधार्जिणे मासिक आहे. तसेच वर पिडां यांनी म्हणल्याप्रमाणे अ‍ॅपल-ऑरेंज तुलना आहे. समान पातळीवर नाही, हा एक महत्वाचा मुद्दा आहेच.

तरी देखील तुर्तास हे मान्य करूयात की आधी कुठला विकास हा तात्विक मतभेद आहे. पण मला काय म्हणायचे आहे की हे गुजराती पब्लीक एव्हढे अडाणी आहे की सलग तिनदा मोदींना निवडून दिले आहे. का तसे बहुमतात आणणार्‍यांना मोदींच्या ध्येयधोरणाचा फायदा झाला म्हणून त्यांनी मोदींच्या बाजूने मतदान केले? बरं महाराष्ट्रात इतके सगळे चांगले चाललेले असताना, बरेचसे पब्लीक भले भाजपा-सेनेच्या बाजूने नसेल पण दोन्ही काँग्रेसच्या बाजूने आहे असे म्हणायचे आहे का?

भारत एक लोकशाही राष्ट्र आहे. नॉर्थ कोरीया सारखी सरकारकडूनच माहिती मिळत नाही. नुसते इंडीया शायनिंग म्हणून मते मिळत नाहीत, हा इतिहास माहीत असेलच... एस एम एस, इमेल्स, फोन कॉल्स सगळ्या संवाद माध्यमांचे, सोशल मेडीयांचे आणि प्रसिद्धीमाध्यमांचे जाळे आहे. त्यातून जर जनतेस मोदीसरकारच्या कारकिर्दीबद्दल खरेच नापसंती असती तर ती दिसली असती. पण तसे दिसत नाही. याचा एक अर्थ जनतेचा मोदींच्या ध्येयधोरणास पाठींबा आहे असा होऊ शकतो.

पण त्याहूनही अधिक वास्तव हे आहे की: कम्युनिस्ट मॅनिफेस्टो रद्दीत विकायचे अथवा चण्याच्या पुड्या बांधायला वापरायचे सोडून, त्यातले व्यवहारात निरूपयोगी ठरलेले सिद्धांत परत परत उगाळून, मोदी/भाजपा आणि उद्योगव्यवस्थेवर बोटे मोडणारे विचारवंत आणि राजकारणी स्वतः बसलेल्या झाडाची फांदी करवतीने कापायचे काम करण्यात मग्न आहेत. अर्थात पाय जमिनीवर न ठेवता बर्ड्स आय व्ह्यू करत बसणार्‍यांकडून ह्याहून वेगळी अपेक्षा काय करणार?

थॉर माणूस's picture

6 Mar 2014 - 12:01 pm | थॉर माणूस

गमतीदार विषय आणि चर्चा. निवडणूक संपेपर्यंत करमणुकीसाठी चांगले खाद्य मिळणार आता चोहीकडे. :)

वाचनमात्रच रहाणार होतो या धाग्यावर, पण रहावले नाही म्हणून म्हटले एक पिंक टाकूयाच. ;)

पण मला काय म्हणायचे आहे की हे गुजराती पब्लीक एव्हढे अडाणी आहे की सलग तिनदा मोदींना निवडून दिले आहे. का तसे बहुमतात आणणार्‍यांना मोदींच्या ध्येयधोरणाचा फायदा झाला म्हणून त्यांनी मोदींच्या बाजूने मतदान केले?

आणि सलग तीन वेळा निवडून आलेल्या आघाडीसरकार बद्दल...

बरं महाराष्ट्रात इतके सगळे चांगले चाललेले असताना, बरेचसे पब्लीक भले भाजपा-सेनेच्या बाजूने नसेल पण दोन्ही काँग्रेसच्या बाजूने आहे असे म्हणायचे आहे का?

आता मोदींऐवजी आघाडी, गुजरातऐवजी महाराष्ट्र वरच्या वाक्यात तसेच महाराष्ट्राऐवजी गुजरात, भाजपा-सेना ऐवजी आघाडी व आघाडीच्या जागी महायुती लावून पाहूया बरं. ;)

बाकी, या सगळ्या तथाकथित नमो, रागा, केजरीवाल वगैरे ढवळाढवळीतून फक्त पाणी गढूळ होईल. फार मोठा बदल वगैरे घडण्याची अपेक्षा नाही. उलट कुणालाच नीट बहुमत नाही अशी परीस्थीती न येवो आणि राष्ट्रीय पक्षांचा घोडेबाजारीचा धंदा तेजीत न येवो इतकीच देशाचरणी प्रार्थना. चालूद्यात.

आनन्दा's picture

6 Mar 2014 - 1:16 pm | आनन्दा

बिचारा गुजरात..
५ पक्ष, अनेक अपक्ष, बहुरंगी लढत, तीव्र फोडाफोडी/ पाडापाडी वगैरे. मुतु घातलेले, फिल्मी डायलॉग मारणारे राजकारणी.

किती पिछाडीवर आहे नाही का?

चिंतामणी's picture

6 Mar 2014 - 7:38 pm | चिंतामणी

वाचनमात्रच रहाणार होतो या धाग्यावर, पण रहावले नाही म्हणून म्हटले एक पिंक टाकूयाच.

सहमत.

माझेसुध्दा असेच झाले.

विकास's picture

6 Mar 2014 - 7:51 pm | विकास

बाकी, या सगळ्या तथाकथित नमो, रागा, केजरीवाल वगैरे ढवळाढवळीतून फक्त पाणी गढूळ होईल. फार मोठा बदल वगैरे घडण्याची अपेक्षा नाही.

अंशतः सहमत. केजरीवाल यांनी बदल घडवण्याच्या ऐवजी बिघडवून दाखवला आहे. ते पंतप्रधान होण्याची शक्यता देखील कमी आहे. फक्त थयथयाट करून ते भाजपाची मते कमी करण्याचा प्रयत्न करणार इतकेच.

राहूल गांधी म्हणजे काँग्रेस, जर तेच परत आले तर मागील पानावरून पुढे चालू राहील. थोडक्यात नक्कीच बदल होणार नाही.

मोदींनी स्वतःवर इतकी चिखलफेक करणारे, द्वेष करणारे तथाकथीत विचारवंत, बायास्ड माध्यमे असून देखील कुठलाही तमाशा न करता त्यांनी स्वतःचे प्रशासन कौशल्य दाखवले आहे. त्या अर्थाने त्यांनी नक्कीच समतोल वृत्ती दाखवलेली आहे. अर्थात राज्यात जेव्हढा पटकन प्रभाव दाखवता येऊ शकतो तितका देशावर दाखवता येणार नाही हे देखील एक वास्तव आहे.

थोडक्यात मोदी आले तर सर्वप्रथम सध्याचे भ्रष्ट सरकार सत्ताभ्रष्ट होणे इतका का होईना नक्कीच बदल झालेला असेल. तो देखील काही कमी नाही. त्यापुढे जाऊन ते काय करू शकतील ते २७२ ची रेषा ते कुठल्यापद्धतीने ओलांडणार यावरच अवलंबून राहील.

त्याहीपुढे खरे म्हणाल तर भारतीय नागरीकांनी एक कर्तव्य म्हणून जे कुठले सरकार येईल त्यांच्यावर सध्याच्या सोशल मेडीया आणि प्रसार माध्यमांचा वापर करून कायम वचक ठेवला पाहीजे असे वाटते, तरच खरा बदल घडेल. पण असा बदल समाजमनात घडू शकेल का, हे देखील एक न सुटणारे कोडे आहे असे वाटते.

बंडामामा म्हणजे कोणी ओळखीची व्यक्ती असावी असं वाटतंय. :)

वेताळ's picture

6 Mar 2014 - 11:37 am | वेताळ

कधीतरी टाकुन आल्यासारखे प्रतिसाद देतो आणि चर्चा चालु झाल्यावर गायब होतो.

बंडामामाच्याच पोस्टवर कमेंट करणारे आयडी पहा म्हणजे कळेल नक्की कोण आहेत बंडामामा ते ;)

केजरीवाल कसे वाद घालत आहेत, स्वत:च मला अटक करा म्हणून ओरडत आहेत हे यात बघण्यासारखे आहे. याबद्दलची मते आणि नक्की कुणाचे पाणी मुरते आहे हे समजून घेण्यास आवडेल.

चिगो's picture

6 Mar 2014 - 4:37 pm | चिगो

विकासजी, मी तर तुम्हाला संयमित, नि:स्पृह आणि देशाबद्दल कळकळ असलेला माणूस समजत होतो. पण हे काय? आद्य क्रांतिकारी, भ्रष्टाचार निर्मुलक, राजकीय नाट्य-शिरोमणी आणि ह्या देशातील एकमेव चारीत्र्यवान, ईमानदार आणि देशभक्त असलेल्या रा.रा. श्री. अरविंदजी केजरीवालजी ह्यांचे आक्रास्तळे सत्य बाहेर आणण्याचा गुन्हा करुन तुम्ही माझा समज फोल ठरविला. तुमचा निशेढ..

llपुण्याचे पेशवेll's picture

6 Mar 2014 - 10:09 am | llपुण्याचे पेशवेll

अरे वा. पहावे ते सगळे रोचकच.
बहुतेक सगळा विदा हा २०१० पूर्वीचा आहे. म्हणजे त्यातलेही अद्ययावत नोंद ही २०१०-११ चीच आहे. म्हणजे हा वर्षभरापूर्वीचा लेख वापरून केजरी चा फुकट उदो उदो करणार का?
http://www.thehindubusinessline.com/news/maharashtra-and-gujarat-the-gro...
एक उदाहरण म्हणून तुमच्या आवडत्या लेखातले पर कॅपिट इनकम ५२००० च्या आसपासचे आहे. वरचा हिंदू बिझीनेस लाईनच दुवा चाळला तर ते ८९००० च्या घरात पोचलेले दिसते.
असो, अंधभक्ती ही राहणारच.

अर्धवटराव's picture

6 Mar 2014 - 10:28 am | अर्धवटराव

गुजरात विकासाची तथ्ये आणि केजरीवाल या दोन भिन्न बाबी उगाच कशाल कनेक्ट करण्यात येत आहेत हे एक कोडं आहेच. केजरी साहेब आपली राजकारणी गरज भागवायला तिकडे गेले आहेत. गुजरातच्या विकासाच्या मॉडेलशी त्याचा काहि संबंध नाहि.

चौकटराजा's picture

6 Mar 2014 - 10:54 am | चौकटराजा

विकासाचे एकच माप नसते.त्यासाठी अनेक गोष्टींचा विचार पाहिजे. नुसतेच एखाद्या राज्यात सचिन तेंडूलकर वा लताबाई आहेत.नुसतेच अंबानीचे २७ मजली घर आहे. नुसतेच भन्नाट वेगाने जाता येणारे रस्ते आहेत. दहा दहा दिवसांचे उत्सव आहेत.म्हजे विकास झाला असे म्हणता येणार नाही. त्या राज्यातील कनिष्ट मद्यमवर्गीयाना पूर्वीसारखा मसाला डोसा हॉटेलमधे खाता येत नाही. तर रत्यावरच्या मल्याळी माणसाच्या तव्यावरचा खावा लागतो. पाहुणा आला तर पूर्वीसारखा सरसकट चहा घेऊन जा न म्हणता येण्याएतके दूध साखर व चहा महाग झाले आहेत. आजही आमच्या सारख्या खाजगी पेन्शनराना ४०० नी पाचशे रूपये पेन्शन मिळते. कोणत्याही सरकारी ठिकाणी पैसे दिल्याखेरीज काम होताना दिसत नाही.
हे सगळे पाहिले की काही फुगले आहेत काही खंगले आहेत हे दिसते. रिओ पाहून ब्राझील समजून घेता येत नाही . आकदे खोटारडे देत असतील त मोदी खोटारडे असतीलच पण आदर्श वाल्या चव्हाणांना मचावर बसू देणारे राहुल किती खरे असतील ?

मंदार दिलीप जोशी's picture

6 Mar 2014 - 11:10 am | मंदार दिलीप जोशी

अतीशय द्वेषमूलक आणि भंकस लेख

प्रत्यक्ष गुजरात मधे मात्र वेगळीच परिस्थिती आहे. आणि हे बर्‍याच लोकांना चांगलेच ठाऊक आहे. एखादे आयसोलेटेड उदाहरण सोडल्यास, इन जनरल गुजरात अनेक कसोट्यांवर इतर अनेक राज्यांच्या बराच मागे आहे. सध्या केजरीवालने ह्याच मुळावर घाव घातल्याने अर्थातच भाजप कडून प्रचंड विरोध होणार हे स्पष्ट होते.

>>>

मी आणि माझे अनेक नातेवाईक स्वतः गुजरात मधे जाऊन आलो आहे आणि स्वतःच्या डोळ्यांनी पाहीलेल्या विकासावरुन इतके ठामपणे म्हणू शकतो की खादे आयसोलेटेड उदाहरण सोडल्यास, इन जनरल गुजरात अनेक कसोट्यांवर आघाडीवर आहे.

बाकी बकवास लेख पाडत रहा.

मृत्युन्जय's picture

6 Mar 2014 - 11:21 am | मृत्युन्जय

गंमतीशीर लेख आहे

ऋषिकेश's picture

6 Mar 2014 - 11:31 am | ऋषिकेश

केजरीवाल यांच्यासारख्या वाचाळवीराने हा विषय हाती घेतला म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष होऊ नये असे वाटते.
राजकीय धुळवडीच्या काळाअत हा दौरा निव्वळ स्टंट असेलही पण त्यानिमित्ताने गुजरातमध्ये देशातील इतर 'कंपेरेबल' राज्यांच्या तुलनेत किती व कोणत्या क्षेत्रात वेगळा व अधिक व/वा अधिक वेगाने विकास झाला आहे हे बघणे/समजून घेणे रोचक (व आयओपनिंगही) ठरावे!

मंदार दिलीप जोशी's picture

6 Mar 2014 - 11:42 am | मंदार दिलीप जोशी

आकडेवारीवरुन शिरीष कणेकरांच्या 'फटकेबाजी' मधल्या एका उदाहरणाची आठवण झाली.

एक अकराव्या क्रमांकावर खेळणारा फलंदाज (म्हणजे तो मूळ गोलंदाज) नेहमी पाच-दहा धावा खेळून नाबाद राहत असे. एका सीझनच्या शेवटी त्याची सरासरी ११० होती.

याचा अर्थ तो चांगला फलंदाज असा घ्यायचा का?

तसंच आहे या तूलनेचे....

तुम्ही जर मोदीवर जहरी टिका केली तर तुम्ही पुरोगामी,सेक्युलरवादी,समाजातील तळागाळातील लोंकाविषयी फक्त तुम्हालाच कळवळा आहे,भ्रष्टाचारविरोधी,समाजातील सर्वात प्रामाणिक तुम्हीच असे विवीध बिरुदे आपोआप तुम्हाला प्राप्त होतात.
खेचरवाल कोणत्या आधारावर गुजरातचा विकास बघायला गेला होता. ह्याने त्याच्या आयुष्यात खोकण्याशिवाय काय उजेड पाडला आहे? पळपुटा....

मंदार दिलीप जोशी's picture

6 Mar 2014 - 12:26 pm | मंदार दिलीप जोशी

अहो ज्या माणसाला दिल्लीसारखे लहान राज्य पाच वर्ष सांभाळता आले नाही, पळून गेला पार्श्वभागाला पाय लाऊन, त्याने गुजरातसारख्या राज्याच्या विकासाची तपासणी करायला जाणे यासारखा मोठा विनोद नाही.

किती भाजपा कार्यकर्त्यानी दंगा केला? किती बसेस जाळल्या,रैल्वे फोडल्या? दगडफेक केली?
मग काल पळपुट्या लोकानी कशासाठी दिल्लीत दंगा केला?

मंदार दिलीप जोशी's picture

6 Mar 2014 - 12:25 pm | मंदार दिलीप जोशी

औमोदन

मराठी भाषेला नवीन शब्दाची देणगी दिल्याबद्दल धन्यवाद

आत्मशून्य's picture

6 Mar 2014 - 1:45 pm | आत्मशून्य

हेच बघा

निषेध व्यक्त करायला जमलेल्यांवर अमानुश गुंडागर्दी... बेशुध्द होइ पर्यंत आप कार्यकर्त्याला मारहाण. अन बातमीचे दिशाभुल करणारे टायटल काय तर "हाणामारी प्रकरणी 'आप' कार्यकर्त्यांवर गुन्हे" जणू काही आपने ठरवुनच हल्ला केला होता आणी ते बेफाम हल्ला झाल्याबद्दल स्वसंरक्षणासाठीचे प्रत्युत्तर न्हवते ? तिथे आप काय काठ्या तलवारी घेउन गेली होती का ?

भाजपच्या मुख्यालयाबाहेर निदर्शनासाठी आलेल्या आपच्या कार्यकर्त्यांवर भाजप कार्यकर्त्यांनी दगड, खुर्च्या, काठ्या यांचा बेफाम वर्षाव केला. त्याला आपच्या कार्यकर्त्यांनीही प्रत्युत्तर दिले. त्यामुळे सुमारे दीड-दोन तास ही तुंबळ हाणामारी पेटली होती.

एव्हडं पुरेसे नाही काय ?

बॅटमॅन's picture

6 Mar 2014 - 2:21 pm | बॅटमॅन

सहमत.

जे काहि मिडीया फुटेज बघितलं त्यावरुन तरी असं दिसतय कि भाजप कार्यकर्ते बालेकिल्ल्यातुन (म्हणजे ऑफीसच्या गेटच्या आतुन) हाणामारी करत होते आणि आआप बाहेरुन. "अमानुष" मारहाण करायला भाजप बाहेर पडलाच नव्हता. इन फॅक्ट या संपूर्ण घटनेत "अमानुष" वगैरे काहि घडलच नाहि. दोन-चार टाळकी फुटली, पण त्याला जबाबदार आशुतोष मंडळी आहेत. आपण केजरीवाल नाहि हे आशुतोषने ध्यानात ठेवायला हवं होतं. त्याला पेललंच नाहि हे आंदोलन.

बाकि पहिला दगड भाजपने फेकला असावा याची मला १००% खात्री आहे. पण तशी सिच्युवेशन आआप ने तयार केली. केजरी साहेबांनी सरळ माफि मागुन आपल्या विरुद्धची सगळी हवाच काढुन टाकली...व्हेरी स्मार्ट मुव्ह. आआपचे सर्व विरोधक त्यांना अराजकतेचं लेबल चिकटवायला निघाले आहेत. नजीक काळात तशा पुरक घटना मुद्दाम घडवल्या जातील. पण केजरीसाहेब एकटे कुठेकुठे उत्तर देणार. असो.

फुटेज अजुनही बघितलं नाहीये. त्यामुळेच जे बातमीत लिहलेले आहे त्याच्याशी सुसंगत टायटल द्यावे आणी बातमीही सवीस्तर असावी. उदा.गुन्हे दाखल फक्त आपवरच झाले की परस्परांवरही झाले (अथवा कोणावर का झाले नाहीत) वगैरे वगैरे सविस्तरपणा नसेल तर एकतर्फी कवरेज का गणु नये ? मला व्यक्ती/पक्ष सापेक्षचर्चा अपेक्षीत नाही. मेडीयाने यासंदर्भात थोडे भान ठेउन बातमी लिहली तर उत्तम होइल इतकीच माफक अपेक्षा आहे. दोन्ही बाजु सवीस्तर समोर येउ देत. आणी टायटलही तितकेच समतोल अपेक्षीत आहे.

एकुणच ती बातमी वाचताना काहीतरी अस्पश्ट आहे असे आता जाणवु लागलय.

म्हणूनच

मेडीया तटस्थ राहणार की नाही ?

हा एकमेव प्रश्न सोडला इतर सर्व विधाने मी मागे घेतो.

अर्धवटराव's picture

6 Mar 2014 - 4:43 pm | अर्धवटराव

मिडीयाचा वापर करताहेत दोन्ही पार्ट्या. मिडीया एक हत्यार बनलय. त्यांच्या कडुन कसल्या निश्पक्षतेच्या अपेक्षा करणार :(

मंदार दिलीप जोशी's picture

6 Mar 2014 - 3:48 pm | मंदार दिलीप जोशी

फुटेज अजुनही बघितलं नाहीये. >>

:D

आत्मशून्य's picture

6 Mar 2014 - 7:04 pm | आत्मशून्य

मी फक्त दुवा दिलेली बातमी वाचली. आणि त्याचे शब्दांकन मला खटकले

आनन्दा's picture

6 Mar 2014 - 5:16 pm | आनन्दा

काय हे?

म्हणजे दुपारी आपचे सुमारे 20-25 कार्यकर्ते भाजप मुख्यालयाबाहेर जमले व त्यांनी "भारत माता की जय', "नरेंद्र मोदी हाय हाय' अशा घोषणा देण्यास सुरवात केली. ही गर्दी हळूहळू वाढत गेली तसे दिल्ली पोलिसांनी तेथे धाव घेऊन मुख्यालयाचे दरवाजे बंद केले. त्याचवेळी आतल्या बाजूस भाजप कार्यकर्ते जमले व त्यांनीही प्रतिघोषणा सुरू केल्या. आप कार्यकर्त्यांच्या, "भारत माता की जय' यासारख्या घोषणांना भाजप कार्यकर्ते "केजरीवाल चोर है' या व अन्य घोषणांनी प्रत्युत्तर देत होते.

सुरुवात कोणि केली ते आपणच ठरवा.

भाजपच्या मुख्यालयाबाहेर निदर्शनासाठी आलेल्या आपच्या कार्यकर्त्यांवर भाजप कार्यकर्त्यांनी दगड, खुर्च्या, काठ्या यांचा बेफाम वर्षाव केला. त्याला आपच्या कार्यकर्त्यांनीही प्रत्युत्तर दिले

याचा अर्थ काय ते ही आपणच ठरवा.

आत्मशून्य's picture

6 Mar 2014 - 7:00 pm | आत्मशून्य

आता गीता वाचत बसत नाही.

तुम्ही दिलेल्या टेबल मध्ये पहीलेच टेबल ईंफान्ट मॉरट्यालीटी रेटचा आहे.सर्वात कमी रेट गुजरातचा आहे
आणि ते नक्किच भुषणावह आहे.

बंडामामा तुम्ही दिलेल्या पहील्या पुराव्या वरुनच कळते कि तुम्ही डोक्यावर पडले आहेत.

नितिन थत्ते's picture

6 Mar 2014 - 2:25 pm | नितिन थत्ते

नक्की कोण डोक्यावर पडले आहेत त्याबद्दल शंका वाटते आहे.

डँबिस००७'s picture

6 Mar 2014 - 6:40 pm | डँबिस००७

थत्ते उर्फ बंडामामा,

दर १००० जन्मा मागे ४४ बाल मृत्यू हा आकडा बाकीच्या राज्या पेक्षा नक्कीच चांगला आहे अस म्हणण आहे. त्याबद्दल तुम्हाला का ही म्हणायच आहे? असेल तरच तोंड उघडा अन्यथा ,.......

संपत's picture

6 Mar 2014 - 8:50 pm | संपत

अहो डँबिस००७ साहेब,
गुजरातचा ११वा नम्बर लागतो म्हणजे १८ राज्यांत बालमृत्यू प्रमाण गुजरातपेक्षा कमी आहे.

शैलेन्द्र's picture

6 Mar 2014 - 11:53 pm | शैलेन्द्र

त्या तक्त्यावरुन मलातरी गुजरात सगळ्यात चांगला वाटतोय..

डँबिस००७'s picture

7 Mar 2014 - 9:11 am | डँबिस००७

हे घ्या !! अहो दिलेल्या लिस्ट मध्ये गुजरातचा नंबर शेवटचा आहे ना ? हा तक्ताच गुजरातची नाचक्की करण्यासाठी दिला होता पण देण्यार्याला आपण काय देतो आहोत ह्याच ज्ञान असायला पाहीजे ना? म्हणूनच म्हणा लो डोक्यावर पडलेला आहे हा माणुस.

दुसरी गोष्ट:
पोषण आणि सामाजीक विकास ईंडेक्स मध्ये ही गुजराथ भारतात तिसर्या क्रमांकावर आहे, महाराष्ट्राच्याही वर,
१.केरळ २.हरियाण ३.तामिळ नाडू ४गुजरात ५महाराष्ट्र

अहो साहेब, भारतात २९ राज्ये आहेत. मध्य प्रदेशाचा पहिला क्रमांक म्हणजे त्यांची कामगिरी सगळ्यात खराब आहे. गुजरातचा ११ क्रमांक लागतो म्हणजे १८ राज्यांची कामगिरी गुजरातपेक्षा चांगली आहे.

तुमच्या दुसया मुद्द्याबद्दल सहमत.

मी फक्त तुम्हाला बंडामामानी दिलेला तक्ता समजावयाचा प्रयत्न करत आहे.

इरसाल's picture

6 Mar 2014 - 2:28 pm | इरसाल

गुजरात बकवास राज्य आहे. मागच्या २ वर्षांपासुन इथे रहातोय. भेंडी धड पाणी नाय का लाईट नाय २५-२५ तास लोड्शेडिंग करतात लेकाचे, पाणी तं मी नंदुरबाराहुन मागवतो टँकर. च्यायला रस्ते म्हंजे एवढे खड्डे की समजा तुमची गाडी गेली खड्ड्यात तर तिकडुन येणारा ट्रक जातो डोक्यावरुन.तेला बी पत्त्या नाय की हेला बी पत्त्या नाय, हाय काय त्या गुजरातात. नवा जॉब शोधतोय...... लय वैताग.

मंदार दिलीप जोशी's picture

6 Mar 2014 - 3:49 pm | मंदार दिलीप जोशी

शप्पथ :D

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

6 Mar 2014 - 6:18 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

गुजरातमधे पण येम.ये.शी.बी. हाय काय वं???

:) :) :) :) :) :)

विकास's picture

6 Mar 2014 - 7:14 pm | विकास

एम एस इ बी (MSEB) - अर्थात "मंडे टू संडे इलेक्ट्रीसिटी बंद" असे म्हणायचे आहे का तुम्हाला? ;)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

7 Mar 2014 - 5:33 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

"मंडे टू संडे इलेक्ट्रीसिटी बंद"

हा हा हा!!!!! महाराष्ट्राच्या गावभागात ""मंडे टू संडे इलेक्ट्रीसिटी बंद" असाच कारभार आहे.

आणि आम्हाला विकास करायला परत सत्ता द्या म्हणणारे सद्ध्याचे सत्ताधारी आहेतच की. साठ पासष्ठ वर्षात नको ते दिवे लावले, जे लावणं अपेक्षित होतं तेवढे मात्र सोयीनी विसरले गेले.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

6 Mar 2014 - 5:01 pm | निनाद मुक्काम प...

केजरीवाल हे परकीय यंत्रणेचे हस्तक आहेत असे माझे स्पष्ट मत आहे.
आमदारकीची लॉटरी लागल्यावर त्यांनी दिल्लीच्या लोकांना अचानक वार्यावर सोडून आपल्या लोकांना आता लोकसभेच्या उमेदवारीसाठी उभे करत आहे.
गुजरात च्या लोकांनी मोदी ह्यांना तीनवेळा निवडून दिले म्हणजे एकहाती सत्ता दिली ,
अशी एकहाती सत्ता नेहरू व इंदिरा व सुरवातीला राजीव ह्यांना मिळाली मग सुरु झाली त्यांच्या पक्षांची अधोगती.
आजतागायत जनतेने सलग तीन वेळा एकगठ्ठा मतदान केले नाही.
मात्र राजकारणात देवाण घेवाण करण्यात ते विरोधकांच्या पेक्ष्या सरस ठरले म्हणूनच जमवाजमव करून कसेबसे सरकार बनवले , ह्या निवडणुकीत त्यांचे ९० टक्के सहकारी पक्ष जराशी संधी मिळाली तर तिसरी आघाडी स्थापन कार्रून स्वतःच्या पक्षाकडे जास्तीजास्त मलाईदार खाती पदरात पडून घेण्यात धन्यता मानतील.
दरवेळी आकडेमोड दाखवून गुजरात च्या विकासाचे वाभाडे काढून सामान्य लोकांवर काहीही परिणाम होणार नाही.
गुजरात मधील जनता ही सुजाण आहे , जे त्यांना कळले ते पुढच्या निवडणुकीत समस्त भारतात कळून येईल

थॉर माणूस's picture

6 Mar 2014 - 5:34 pm | थॉर माणूस

आजतागायत जनतेने सलग तीन वेळा एकगठ्ठा मतदान केले नाही.

??? अहो, मध्य प्रदेशात, छत्तीसगडमधे भाजपाची तिसरी टर्म चालू आहे की!
आसाम, मणीपूरमधे काँग्रेसची तिसरी टर्म चालू आहे. (जोडीनं संसार आणि सतत बदलणारे मुख्यमंत्री हे चालणार असेल तर महाराष्ट्र सुद्धा घेता येईल.)

ह्या निवडणुकीत त्यांचे ९० टक्के सहकारी पक्ष जराशी संधी मिळाली तर तिसरी आघाडी स्थापन कार्रून स्वतःच्या पक्षाकडे जास्तीजास्त मलाईदार खाती पदरात पडून घेण्यात धन्यता मानतील.

याचीच सर्वात जास्त भीती वाटतेय मला. छोटे/नवे पक्ष मते तरी खातील किंवा काही मोजक्या सीटस पटकावतील (ज्या घोडेबाजारात महत्वाच्या ठरतात). मग राष्ट्रीय पक्षांच्या उरलेल्या, एकमेकांच्या नेत्यांवर राळ उडवण्यात धन्यता मानणार्‍या उमेदवारांपैकी योग्य आकडा निवडून नाही आला तर आहेच मायनॉरीटी सरकार... आणि त्याचा इतिहास, त्याची परीणीती दोन्ही आपल्याला माहिती आहेच.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

7 Mar 2014 - 3:06 am | निनाद मुक्काम प...

अहो मणिपूर मध्ये तिसरी टर्म जर चालू आहे तर तेथील एखाद्या नेत्याला करावे की पंतप्रधानपदाचा उमेदवार
बाकी भाजपच्या इतर राज्यात सुद्धा तिसरी टर्म चालू आहे,
पण तेथे भाजपला व तेथील नेत्यांना प्रसार माध्यमांनी लक्ष्य केले नव्हते,
मोदी ह्यांची दंगली वरून प्रचंड बदनामी करून त्यांना हिटलर ची उपमा देऊन ते परत परत निवडून आले
आणि पंतप्रधान पदासाठी त्यांचे प्रभावी वक्तव्ये , पक्षासाठी निधी जमा करण्यासाठी कॉर्पोरेट जगताचा पाठिंबा , अनिवासी भारतीयांच्या मध्ये असलेली लोकप्रियता व अशी अनेक कारणे आहेत.
गुजरात कश्यात मागे आहे हे काही विचारजंत प्रवृत्तीने कितीही वेळा सांगितले तरी मूळ विरोधी पक्ष व त्यांचे पाठीराखे प्रसारमाध्यमे ह्यांनी मोदी ह्यांना फक्त दंगलीवरून लक्ष्य करून एकप्रकारे जनतेत गुजरात मधील विकासाच्या मुद्याला अप्रत्यक्ष संम्मती दिली.
खुद जे तथ्य ह्या लेखात मांडण्याचा प्रयत्न झाला ते काय केजरीवाल ह्यांना माहिती नसेल का
पण त्यांनी गुजरात मध्ये अभ्यास दौऱ्या च्या नावाखाली
एखादा टिपिकल नेता करतो तशी नौटंकी केली.
उद्या भाजप असेही म्हणेन की ह्यांना अभ्यास दौर्यात
काही विशेष आढळणार नाही असे कळल्यावर ह्यांनी उगाच बनाव रचला.

थॉर माणूस's picture

7 Mar 2014 - 11:46 am | थॉर माणूस

तर तेथील एखाद्या नेत्याला करावे की पंतप्रधानपदाचा उमेदवार

भारत आहे... अमेरीका नव्हे. भारतात संसदीय लोकशाही आहे अध्यक्षीय नव्हे. इथे पंतप्रधानपदाचा उमेदवार वगैरे जाहिर करणे काहीही गरजेचे नसते. निवडून आलेले उमेदवार त्यांचा प्रमुख ठरवतात.

एखादा टिपिकल नेता करतो तशी नौटंकी केली.

आपला तो बाब्या, दुसर्‍याचं ते कार्ट हे सगळीकडेच होतं. नमो साहेबांनी त्या बिचार्‍या सिकंदरला बिहारपर्यंत ओढत आणला होता म्हणे, जवळपास प्रत्येक सभेत काहीतरी घोळ घालतात असं ऐकलंय. राहुलबाबांचं तर काय बोलायलाच नको. थोडक्यात काय, कुण्या एकाच्या बाजूने बोलायचं म्हटलं की इतरांच्या डोळ्यातली कुसळे दिसणारच.

गुजरातची प्रगती झाली असेल, नक्कीच झाली असेल. पण फुगा प्रमाणाबाहेर फुगवल्यावर काय होतं हे मोदी समर्थकांना लक्षात येत नाहीये. सरकार फक्त भाजपाचे येणार नाही, NDA चं येणार आहे. मोदींना गुजरातमधे वाट्टेल ते करता आलं कारण तिथे भाजपा एकटे आहे. आता मोदी आलेतर हे असं मोठ्ठं अपेक्षांचं ओझं त्यांचेच समर्थक त्यांच्या पाठीवर टाकतायत. आणि त्यांच्या विरोधी पार्टीत बसणार्‍यांचं काम सोपं करतायत.

उलट काँग्रेस आघाडीवर सध्या काहीच दबाव नाही. त्यांना आधीच माहिती आहे की त्यांच्या नावेला भोक पडलंय. त्यांना परत सत्तेत यायचं असेल तर जुगाडवाली बोटच वापरावी लागणार आहे. शक्यता कमीच आहे की ते परत येतील. २०० सीट मिळाल्या तरी डोक्यावरून पाणी.

मते खाऊ पक्षांबाबत काय बोलणार? ते सत्तेत तर येणार नाहीत. पण समीकरणे बिघडवतील हे नक्की. आणि त्यात ते यशस्वी झाले तर परत अर्धवट कालावधीची सरकारे पहायची वेळ आलेली आहे.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

8 Mar 2014 - 7:33 am | निनाद मुक्काम प...

@निवडून आलेले उमेदवार त्यांचा प्रमुख ठरवतात.
नेहरू , इंदिरा ह्यांच्या निधानंतर कर्तुत्ववान व अनुभवी मंडळीना डावलून राजकारणाचा फारसा अनुभव नसलेल्या व्यक्तीस केवळ तो एका विशिष्ठ घराण्याशी संबंधीत आहे म्हणून आपला प्रमुख निवडणे एवढे त्यांना जमते
राजीव ह्यांच्या मृत्यूनंतर असेच होणार होते पण देशाच्या सुदैवाने अनुभवी नरसिंह राव ह्यांना प्रमुख केले व जे नेहरू व गांधी परिवाराने ह्यांनी आजतागायत भारतात होऊ दिले नाही ते ह्या माणसाने करून दाखवले ,
त्याची मधुर फळे भारतीय चाखत असतांना त्यांच्या मृत्युनंतर परत घात झाला.
अनुभवी व्यक्तींना डावलून परत अनुभवी व्यक्तीस प्रमुख केले
व पुढचे पाढे पंचावन
केजरीवाल हे राजकारणातील राखी सावंत आहेत.
त्यांना नेहमी एक भीती असते उद्या अण्णा परत आंदोलनात उतरले तर प्रसार माध्यमे ह्यांच्याकडे पाठ दाखवतील म्हणून ह्या ना त्या मार्गाने चर्चेत राहण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.
उद्या जर राजकीय कारकिर्दीला ग्रहण लागले तर चर्चेत राहण्यासाठी बिग बॉस व झलक दिख ला जा आहेस की

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 Mar 2014 - 10:11 am | डॉ सुहास म्हात्रे

निवडून आलेले उमेदवार त्यांचा प्रमुख ठरवतात.

हे माझे अज्ञान असेल पण भारतात हे किती वेळा झालेले आहे याबद्दलची आकडेवारी वाचायला फार आवडेल !

देव मासा's picture

6 Mar 2014 - 5:12 pm | देव मासा

वाचत आहे , सम्ब्र्हमाता ( sambrhamat ) पडलो आहे . खरे खोटे काही समजत नाही , एक शंका , विषयाला फाटे नाही पाडत पण जर आप खरच ढोंगी पक्ष आहे तर मग मेधा पाटकर ''आप'' पक्षाच्या तिकिटावर मुंबईत निवडणुक का लढवणार आहेत ?

आनन्दा's picture

6 Mar 2014 - 5:20 pm | आनन्दा

आप हा मिथ्यासमाजवादी, मिथ्याधर्मनिरपेक्षतावादी आणि मिथ्यासाम्यवादी लोकांचा प्रमुख पक्ष होणार आहे लवकरच.
आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे अनेक चांगले लोक यास बळी पडतील, आणिबाणीच्या वेळेस झाले तसे.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

6 Mar 2014 - 6:07 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

आप हा मिथ्यासमाजवादी, मिथ्याधर्मनिरपेक्षतावादी आणि मिथ्यासाम्यवादी लोकांचा प्रमुख पक्ष होणार आहे लवकरच.

+११११११११......

मेधा पाटकर ह्यादेखील परकीय यंत्रणेचे हस्तक आहेत असे नरेंद्र मोदीनी अगोदरच सांगितले आहे.

मेधा पाटकरांचे पूर्ण वाक्य :

त्यानंतर लगेच दिल्लीची निवडणूक लढविण्याचाही निर्णय घेण्यात आला. त्यात घाई झाली, तरी दुसरा पर्याय नव्हता.

रमेश आठवले's picture

6 Mar 2014 - 5:35 pm | रमेश आठवले

गुजरात मधील जनतेला आणि तेथील मतदारांना मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार हे कॉंग्रेस किंवा इतर राजकीय पक्षांपेक्षा जास्त चांगले वाटते असे त्यांनी त्रिवार सांगितले आहे. आणि हे सत्य सोयीस्कर मांडलेल्या आकडेवारी पेक्षा महत्वाचे आहे. गुजराती जनतेची अशी खात्री पटली आहे कि देशातील इतर मोठ्या राज्यांपेक्षा आपण जास्त प्रगती करत आहोत. कॉंग्रेस किंवा आप पार्टी आणि काही तथाकथित डावे बुद्धिवादी मोदी सरकार विरुद्ध सारखा प्रचार करतात हे अपेक्षित आहे पण महत्वाचे नाही.
You can fool some people for sometime but you cannot fool all the people all the time

There are lies, damn lies and then there is statistics.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

6 Mar 2014 - 6:16 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

केजरीवालांचा उदय झाला त्यावेळेला एक राजकारणामधे कोणीतरी चांगलं काम करेल अशी अपेक्षा निर्माण झाली होती पण दिल्लीमधे "आप"ल्या लोकांनी जे काही असंविधानिक चाळे केले त्यानंतर पुर्णपणे मनातुन उतरले.
स्वतःला दिल्लीमधे चांगलं काम करायची संधी असताना राजकीय खेळीचा एक भाग म्हणुन त्यांनी सत्ता सोडली. आता गुजरातमधे जाऊन विकासाचा आढावा घ्यायच्या नावाखाली काड्या सारायची काही एक गरज नव्हती.
ह्याच्यामागे कोणाचे छक्के "पंजे" आहेत ह्याचा विचार करायलाच हवा.

निश्चित आकडेवारी माझ्या हाताशी नाही पण मोदींच्या काळात नक्कीचं जास्त प्रगती झाली आहे.

अवांतर : गेल्या पन्नास वर्षात बर्याचं वेळा अभ्यासक्रम बदलला पण भुगोलाच्या पुस्तकातलं एक वाक्यं मात्र अजुन तसच आहे. "भारत एक विकसनशील देश आहे." आणि आम्ही ह्यावेळी नकी विकास करु म्हणुन कुठला पक्ष स्वातंत्र्यापासुन मतांचा जोगवा मागतोय हे ही विसरु नका. ह्यावेळी बदल हवाय. क्रॉसिंग फिंगर्स फॉर चेंज अँड बेटर सरकार.

भुगोलाच्या पुस्तकाचे ठाऊक नाही पण मोदी सत्तेवर आले तर इतिहासाचे पुस्तक बदलण्याची शक्यता बरीच वाटते. :)

विकास's picture

6 Mar 2014 - 7:10 pm | विकास

सध्याचा इतिहास केवळ डावे आणि कम्युनिस्ट धार्जिण्यांनी लिहीलेला आहे.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

6 Mar 2014 - 7:15 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

घराणेशाही वाला पक्ष विसरलात की हो. सगळीकडे त्यांचीच तर जय हो आहे.

विकास's picture

6 Mar 2014 - 7:34 pm | विकास

घराणेशाहीवाल्या पक्षाने ते डाव्या विचारवंतांना आउटसोअर्सिंग केले होते/आहे.

लोकसत्ता मध्ये दिले आहे वाचा.

मूकवाचक's picture

6 Mar 2014 - 7:52 pm | मूकवाचक

योग्य जोड्या जुळवा:

गट १: अ)गुजरातचा विकास ब)काँग्रेस आघाडीचे राज्य क)आप चे स्वच्छ आणि स्थिर प्रशासन

गट २: अ)मृगजळ ब) मरूस्थळ क) हागणदरी

कवितानागेश's picture

6 Mar 2014 - 8:55 pm | कवितानागेश

अबब!!!!!! :P

प्यारे१'s picture

6 Mar 2014 - 8:57 pm | प्यारे१

+११११

विवेकपटाईत's picture

7 Mar 2014 - 7:32 pm | विवेकपटाईत

आपने आपल्या अल्पवाधीच्या काळात भ्रष्टाचार वाढविण्याचेच कार्य केले आहे. पाण्याची चोरी लोकांना शिकविली.

पैसा's picture

7 Mar 2014 - 7:34 pm | पैसा

अगागागा!

सुहास झेले's picture

24 Mar 2014 - 3:28 pm | सुहास झेले

हा हा हा =)) =))

विवेकपटाईत's picture

6 Mar 2014 - 8:27 pm | विवेकपटाईत

हिमाचल प्रदेश मध्ये सामान्य माणसाचे 'रहन-सहन' महाराष्ट्रातल्या सामान्य माणसापेक्षा किती तरी पट चांगले. आहे. तरी ही प्रतिव्यक्ती आय महाराष्ट्रात जास्त आहे. (काही श्रीमंत लोकांमुळे- मुंबई पुणे काढून टाका महाराष्ट्र कदाचित बिहारपेक्षा ही मागे दिसेल. दुसरी कडे दिल्लीची प्रतिव्यक्ती आय दाखविल्या पेक्षा जास्त असू शकते.

ते स्वतःच गुजरात मध्ये रहात असल्याने, त्यांना नक्कीच जास्त माहीत असणार.

बंडा मामा's picture

6 Mar 2014 - 11:16 pm | बंडा मामा

एकंदरीत मोदींच्या कारभारात गुजरातचा नक्की काय विकास झाला ह्यावर मते मांडण्यात कुणालाच इंटरेस्ट दिसत नाही, आणि काही प्रतिसादातली भाषा आणि टोन बघता ह्यावर काही साधक बाधक चर्चा होऊ शकेल ह्याची सुतरामही शक्यता दिसत नाही. जय हो!

मुक्त विहारि's picture

6 Mar 2014 - 11:23 pm | मुक्त विहारि

चला मस्त पैकी भेळ खावू...

आनन्दा's picture

6 Mar 2014 - 11:43 pm | आनन्दा

काय आहे माहीत आहे का, जे पेराल ते उगवते. तुम्ही मोदींना क्रिटिसाउझ करायला लेख लिहिला. प्रतिक्रिया पण तशाच येणार नाही क?

नाहीतर ह्र वाक्य कशाला हवे होते?

केजरीवाललाही हे चांगलेच माहित आहे, आणि म्हणूनच त्याने मुळावरच घाव केला आहे.

आणि हे पण

प्रत्यक्ष गुजरात मधे मात्र वेगळीच परिस्थिती आहे. आणि हे बर्‍याच लोकांना चांगलेच ठाऊक आहे

असो.

मुक्त विहारि's picture

7 Mar 2014 - 12:00 am | मुक्त विहारि

जे गुजरात मध्ये रहात आहेत, त्यांचे काय म्हणणे आहे?

त्यचा माझ्या प्रतिसादाशी काय संबंध?

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

7 Mar 2014 - 3:11 am | निनाद मुक्काम प...

बंडा मामा तुम्हाला गुजरात , मोदी ह्यांच्या विषयी लेख काढावासा वाटला हेच तर खरे मोदी ह्यांच्या सध्याच्या तरुणाई व जनतेवर पडलेल्या मोहिनेचे कर्तब आहे,
आता नितीश कुमार ह्यांच्या बिहार मधील दाव्यांवर कोणी चर्चा करत का
नमो नमः

पिवळा डांबिस's picture

7 Mar 2014 - 10:34 am | पिवळा डांबिस

एकंदरीत मोदींच्या कारभारात गुजरातचा नक्की काय विकास झाला ह्यावर मते मांडण्यात कुणालाच इंटरेस्ट दिसत नाही,

कारण तो उद्देश्य मूळ धाग्यातच दिसत नाही. धाग्याचा सगळा रोख तर गुजरातची प्रगती कितीही झालिये असं म्हंटलं तरी ती कशी झालेली नाही हे दाखवण्यावर दिसत आहे....

काही प्रतिसादातली भाषा आणि टोन बघता ह्यावर काही साधक बाधक चर्चा होऊ शकेल ह्याची सुतरामही शक्यता दिसत नाही.

कारण सुरवात तुम्हीच केलेली आहे. जरा वेगळं मत दर्शवणारा प्रतिसाद दिसताच "स्वच्छ चश्मा वापरा" वगैरे उद्धटपणाचे प्रतिसाद तुम्हीच देऊन सुरवात केलेली आहे. आता मिपाकरांकडून लाक्षणिक मुखभंग झाल्यावर हे सगळं शहाणपण सुचतं आहे!!!!
वर म्हंटल्याप्रमाणे पेरले ते उगवते!!!
:)

अनुप ढेरे's picture

7 Mar 2014 - 11:54 am | अनुप ढेरे

+१
धाग्याचा हेतू खोडसाळ वाटतो. बरं विकासाबद्दल चर्चा करायची तर 'मोदी यायच्या आधीची स्थिती आणि आत्ताची स्थिती यांची तुलना करावी' या वरती दिलेल्या सूचनेची सुद्धा दखल घेतलेली दिसत नाही.

बंडा मामा's picture

8 Mar 2014 - 8:43 am | बंडा मामा

स्वच्छ चष्म्यातुन बघा अशा साठी लिहिलं होतं कारण तुम्ही रॅली/सभा काढल्यामुळे अटक केली असे लिहिले होते. नंतर तुम्ही प्रतिसादात ते सावरुन घेतलं होतं.

प्रतिसादातील भाषा/टोन हा मुद्दा तुमच्या प्रतिसादाला उद्देशुन नव्हता. तुम्हाला मागे आयुर्वेदाच्या चर्चेत मी टिका करणारे प्रतिसाद लिहिले होते म्हणून तुम्ही माझ्या विषयी काहीतरी पूर्वग्रह केलेला दिसतो.

lakhu risbud's picture

7 Mar 2014 - 12:27 am | lakhu risbud

केजू चं "आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून" असं काहीसं चाललं आहे.
प्रशासनाची संधी होती तेव्हा सरकार मधून पळ काढला आणि आत्ता इतर जे प्रशासनात आहेत त्यांना नावे ठेवण्याची कामं चालू आहे.

विकास's picture

7 Mar 2014 - 9:01 am | विकास

केजरीवाल यांनी आचारसंहीतेचा भंग केला असे प्रथमदर्शनी पुराव्यानुसार सिद्ध होत आहे असे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. ही बातमी सर्वच माध्यमात आली आहे पण ती वाचायला गुगलावे लागते. पहील्या पानावर गुजरात पोलीसांनी गुन्हा दाखल केल्याच्या अथवा सिसोडीयांच्या गाडीवर गुजरातमधे दगडफेक झाली असल्या बातम्या आहेत. आता ही दगडफेक तिसरी आहे. हे तक्रार न नोंदवता नुसते भाजपाने केले असे कसे म्हणू शकतात?

आणि हो केजरीवालांच्या अभ्यासदौर्‍याचे पुढे काय झाले? का २५ गाड्यांचा ताफा आचारसंहीतेमुळे घेऊन जाता येत नाही म्हणून मधेच ड्रॉप घेतला? का लक्षात आले की एक अंबानी-अडानी म्हणत बसण्याव्यतिरीक्त काही करता येणार नाही आणि जनता इतकी अडानी नाही. (सगळे थोडेच आप समर्थक आहेत? *mosking* )

रमेश आठवले's picture

7 Mar 2014 - 9:06 am | रमेश आठवले

केजरीवाल यांनी गुजरातच्या आपल्या दौर्यात मिळवलेल्या अनुभवा बद्दल लिहिले आहे आणि सांगितले आहे . त्यांच्या ह्या भेटीचा उद्देश मोदींच्या विरुद्ध प्रचार करणे आणि त्या साठी कारणे शोधणे हे आधी पासूनच ठरलेले होते. त्यांच्या reports वरून Katherine Mayo या अमेरिकन बाईने १९२७ साली लिहिलेल्या Mother इंडिया या नावाच्या पुस्तकावरील महात्मा गांधी यानी दिलेल्या अभिप्रायाची आठवण झाली. त्या अभिप्रायातील पुढील वाक्य उद्धृत करत आहे.
--- But the impression it leaves on my mind is that it is the report of a drain inspector sent out with the one purpose of opening and examining the drains of the country to be reported upon, or to give a graphic description of the stench exuded by the opened drains.-

मंदार दिलीप जोशी's picture

7 Mar 2014 - 11:03 am | मंदार दिलीप जोशी

सहीच माहिती :)

संपत's picture

7 Mar 2014 - 1:34 pm | संपत

मोदी शायनिंग :)

चिरोटा's picture

7 Mar 2014 - 2:04 pm | चिरोटा

काही गुजराती मित्रांशी(जे तेथील गावांमध्ये लहानाचे मोठे झाले) ह्यावर बोलणे झाले. गेल्या दहा/बारा वर्षात गुजरातमध्ये बर्‍यापैकी सुधारणा झाल्या आहेत असे त्यांचे म्हणणे आहे. प्रत्येक गावात २४ तास वीज आहे.प्रशासन ईतर राज्यांसारखे भ्रष्ट्,वेळकाढू असायचे. मोदी आल्यानंतर ह्यात बर्‍यापैकी बदल झाले आहेत असे त्यांचे म्हणणे. हे जाणवण्यासारखे बदल झाल्यामुळे लोकांनी तेथे भाजपाला/मोदींना निवडून दिले.
बंडामामा, आकडेवारे बाजूला ठेवा. ती पाहिजे तशी शिजवता येते.फ्रंटलाईनवाले तर त्यात पी.एच्.डी.आहेत.
गुजरातमधील लोकांशी, मध्यम वर्गाशी प्रत्यक्ष बोला. मग अनुभव सांगा.

मंदार दिलीप जोशी's picture

7 Mar 2014 - 2:21 pm | मंदार दिलीप जोशी

असेच चांगले अनुभव मी ही ऐकले आहेत

आनंदी गोपाळ's picture

7 Mar 2014 - 11:57 pm | आनंदी गोपाळ

असल्या थापा मीदेखिल भरपूर ऐकल्या आहेत.
फेकू असे काहीतरी म्हणतात म्हणे आजकाल नेटवर यांना.

माझा ही एक मोदी समर्थक मित्र गुजरात मध्ये एका शहरात जाउन आला अन तेथील विकास बघून त्याचे डोळे दिपले, तीन चार रस्त्यावर फिरून सखोल पहाणी दौरा केल्या नंतर त्यास असे आढळून आले की गुजरात मधला साधा चपराशी सुध्दा करोडपती असतो !

क्लिंटन's picture

7 Mar 2014 - 4:24 pm | क्लिंटन

चेतन भगत या लेखकाच्या लिखाणाविषयी माझे मत फारसे चांगले नाही आणि मी त्याचा फॅन वगैरे तर अजिबात नाही.तरीही त्याचे ट्विटरवरील ट्विट इथे लिहायचा मोह आवरत नाही (कोणीही लिहिले असले तरी तो मुद्दा चुकीचा कसा ठरेल? ) :

"मी अमेरिकेचे अध्यक्ष ओबामांच्या ऑफिसमध्ये आधी न वेळ न ठरविता मिडिया कॅमेरे घेऊन जाऊन थडकणार आहे.जर त्यांनी माझी भेट घेतली नाही तर ते एक तर भ्रष्ट आहेत किंवा मला घाबरत आहेत" :)

नेहमीप्रमाणे केजरीवालने आपली नाटके चालूच ठेवली आहेत.एखादे लहान मूल आपल्याकडे लक्ष वेधून घ्यायला भोकाड पसरते किंवा अन्य काही चाळे करते त्याप्रमाणे हा सगळा प्रकार चालला आहे असे स्पष्ट दिसते आहे.या असल्या माकडचाळ्यांच्या तुलनेत मोदी अनंतपटींनी उजवे आहेत.

खरे तर मी पण या धाग्यावर वाचनमात्रच राहणार होतो.तरीही इतर अनेकांप्रमाणे मलाही लिहायचा मोह आवरता आला नाही.

(केजरीवालचे नाव ऐकताच तळपायाची आग मस्तकात जाणारा) क्लिंटन

मंदार दिलीप जोशी's picture

7 Mar 2014 - 4:50 pm | मंदार दिलीप जोशी

सहमत आणि अनुमोदन

थॉर माणूस's picture

7 Mar 2014 - 5:00 pm | थॉर माणूस

सहमत. पण तरीही हे असले पक्ष येतात आणि मते तर कधी कधी जागाही घेऊन जातात. आजवरचा इतिहास पहाता यामुळे फायदा कमी आणि नुकसानच जास्त झालेले आहे.

मूकवाचक's picture

7 Mar 2014 - 6:05 pm | मूकवाचक

सहमत

या असल्या माकडचाळ्यांच्या तुलनेत मोदी अनंतपटींनी उजवे आहेत.

ते अनंतपटीने जाउंदेत किंचीत डावे असते तरी चालले असते आम्हाला! ;)

विकास's picture

7 Mar 2014 - 8:43 pm | विकास

Kejriwal प्रतिमा आणि बातमी स्त्रोत डिएनए इंडीया.
केजरीवालांचे म्हणणे आहे की माजी मुख्यमंत्री म्हणून मोदींनीच त्यांना बोलवायला हवे होते. पण आपण (म्हणजे एके) दहशतवादी नसतानाही थांबवले, त्यातून हे समजते की ते (मोदी) लोकशाहीवादी नाहीत. *aggressive*

मला वाटते आता केजरीवालना पण लॉलीपॉप देण्याची वेळ आलेली आहे.

श्रीगुरुजी's picture

7 Mar 2014 - 11:06 pm | श्रीगुरुजी

केजरीवालांचा नाटकीपणा आणि ढोंगीपणा आता डोक्यात जायला लागला आहे.

पप्पू आणि मोदींना त्यांच्या हेलिकॉप्टर वापरण्यावरून धारेवर धरणारे केजरीवाल आज 'इंडिया टुडे'च्या काँक्लेव्हला त्यांच्याच चार्टर्ड विमानाने जयपूरहून दिल्लीला गेले. ढोंगीपणाचा हा कळस आहे.

मुख्यमंत्रीपदावरून राजीनामा देऊन ३ आठवडे लोटले तरी अजून त्यांनी सरकारी निवासस्थान सोडलेले नाही. अफझल गुरूच्या फाशीला विरोध करणार्‍या व्यक्तीला त्यांनी आपचे तिकिट दिले आहे. ओरिसात नक्षलवाद्यांचे समर्थन करणार्‍याला सुद्धा आपचे तिकीट आहे.

नाटकीपणा आणि ढोंगीपणा याबाबतीत कमालीचे नाटकी व ढोंगी असलेले आव्हाड, भुजबळ, वि.प्र.सिंग इ. मंडळी केजरीवालांच्या पासंगाला सुद्धा पुरणार नाहीत.

'इंडिया टुडेच्या' कॉन्क्लेव्हमध्ये सुद्धा स्वतःबद्दल बोलताना, "अरविंदची लायकी नाही. अरविंद हा अत्यंत क्षुद्र व्यक्ती आहे." असा कांगावा आणि मेलोड्रामा करणार्‍या केजरीवालांचा आता संताप यायला लागला आहे. ढोंगीपणा करून मिळविलेले मुख्यमंत्रीपद या माणसाला २ महिने सुद्धा टिकविता आले नाही. पळपुटेपणा करून हे तिथून पळून आले आणि स्वतःकडे प्रामाणिकपणाचा मक्ता असल्याचा आव आणून निव्वळ ढोंग व ड्रामेबाजी सुरू आहे.

बंडा मामा's picture

8 Mar 2014 - 8:45 am | बंडा मामा

केजरीवालांचा नाटकीपणा आणि ढोंगीपणा आता डोक्यात जायला लागला आहे.

निवडणूक जस जशी जवळ येईल आणि निकालांची सुरुवात होईन तस तसे अजूनच तुमचे डोके दुखणार आहे. काही तरी घरगुती उपाय तयार ठेवा.

श्रीगुरुजी's picture

8 Mar 2014 - 12:31 pm | श्रीगुरुजी

सूचनेबद्दल मनापासून धन्यवाद! घरगुती उपायांसाठी केजरीवालांशी बोलणार आहे. त्यांचा खोकला अचानक बंद झालेला दिसतोय. खोकल्यावर कोणते घरगुती उपचार घेतले ते जाणून घ्यायची इच्छा आहे.

बादवे, तुमच्या आशावादाचे कौतुक वाटते!

विकास's picture

8 Mar 2014 - 7:47 pm | विकास

मध्यंतरी केजरीवालांसारखेच प्रशांत भूषणना पण खोकताना पाहीले. झालं काय तरूण मुले एनडीटीव्हीवर त्यांना अचानक भारती आणि काश्मीर वरून प्रश्न विचारायला लागली. त्याआधी भाजपा-काँग्रेस, भांडवलदारांच्या विरोधात बोलताना खोकल्याला खो दिला होता तो अचानक मग उफाळून आला.

केजरीवाल साधे रहाणार, यांव आणि त्यांव म्हणाले खरे पण अजून सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या घरातच रहात आहेत.

चैतन्य ईन्या's picture

7 Mar 2014 - 8:40 pm | चैतन्य ईन्या

केजरीवाल एक नंबरचा चालू माणूस आहे. प्रत्येकाचा मस्त उपयोग करून स्वतःचे महात्म्य वाढवून घेत आहे. सुरवातीला फारच आवडला पण आता रोजच्या नाटकाने कंटाळा आला बुवा. दिल्लीमधून पळून गेला. तिथे स्वतः मुख्यमंत्री झाल्यावर ह्याला कळले की आपण फार काही करू शकत नाही मग आता बाकीच्यांवर सतत शिंतोडे उडवून आपले चर्चेत राहणे हे एकाच काम आहे. किती दिवस चालणार हे?

मंदार दिलीप जोशी's picture

7 Mar 2014 - 8:47 pm | मंदार दिलीप जोशी

केजरीवाल एक नंबरचा चालू माणूस आहे.

वरील दोन ठळक केलेले शब्द एकाच वाक्यात म्हणजे द्वैरुक्ती आहे :D

खेडूत's picture

8 Mar 2014 - 12:31 am | खेडूत

शंभर!! :)
बंडा मामा सिंदाबाद!
नाई नाई- झिंदाबाद!

बाकी केजरी महाराज सोळा मे ला काय पवित्रा घेणार याची उत्सुकता आहे.
वीस वगैरे जागा मिळाल्या तर कुणा बरोबर जाणार? कारण सगळेच भ्रष्ट आहेत ते स्वतहा सोडून ,

चिंतामणी's picture

8 Mar 2014 - 8:34 am | चिंतामणी

शिळ्या कढीला उत आणायच्या या प्रयत्नात प्रतिक्रीयांचे शतक मारल्याबद्दल धागाकर्त्या चाचांचे, माफ करा, मामांचे

हार्दिक अभीनंदन.

वेताळ's picture

8 Mar 2014 - 10:00 am | वेताळ

राहुल गांधी विमान वापरतो म्हणुन बोंबलणारा खेचरवाल काल इंडियाबुल्सच्या खाजगी विमानाने फिरत होता. त्याबद्दल पण लिहा ना आता.

तथाकथित बुद्धिजीवी वर्गाला वाटणारं डाव्या विचारांचं आकर्षण हेरून काँग्रेसने स्वातंत्र्योत्तर काळात त्यांचा यशस्वीपणे बुद्धिभेद केला. गांधी बाबांचं नाव घेवून त्यात आणखी नव-बुद्धीजीवी वर्गाला (ह्यात ते चाचा, अमोलरत्न वगैरे आलेच) पण घुमवण्यात आले.

आता त्या भंपक डाव्या विचारांचं वैयर्थ सिद्ध होत आले (कारण रुबल्स ची किमत घसरली, सबब खिसे भरले जात असले तरी मूल्य वाढण्यापेक्षा ओझंच जास्त होतंय ). मग आता पुढील 'फोरीन-रिटर्नड' पिढीला घुमावायचे कसे? कारण त्या लोकांनी परदेशातील सुधारणा आणि प्रगती तर स्वत:च अनुभवली आहे …. मग त्याना टांग मारण्यासाठी हे केजरीवाल चे प्यादे कॉंग्रेसने पुढे आणले आहे …
एकूणात काय तर प्रत्यक्षात उद्योगक्षेत्राला चालना देवून रोजगार निर्मिती वाढवून सर्वसमावेशक विकास ( बापरे … हे काय असतं ?) साधण्यापेक्षा जनतेचा बुद्धिभेद करत राहावे आणि आपला आनी आपल्यापुढे हुजरेगिरी करणार्या चार दोन टाळ्क्यांच्या कुटुंबांचाच काय तो विकास करत राहावे …

भारतीय जनते इतकी पुन्हा पुन्हा फसवणुक करून घेण्यास उत्सुक (योग्य तो संस्कृत शब्द हवा असल्यास व्यनि करावा, येथे लिहिणे उचित वाटत नाही) जनता जगात कोठेही पाहिली नाही ....

भारतातील उद्योगधंद्यातील १)हल्दीराम ग्रुपचे मालक,२)मायक्रोमक्स मोबाईल चे मालक,३)सहाराचे मालक आता तुरुंगात अहेत. खेचरवाल अंबानी व अदानीना तुरुंगात टाकायला उत्सुक आहेत. त्यातुन कोन वाचते बघु, मग विकास करु.

जयनीत's picture

8 Mar 2014 - 4:34 pm | जयनीत

भारताला विकासाची गरज काय?

भारत हा आधीच अतिशय, अत्यंत, महाभयंकर विकसित देश आहे ह्या देशाचा डोळे दिपवणारा आणि कान किटवणारा विकास इंडीया शायनिंग च्या काळात होऊन गेलेला आहे त्याची फळे पिढ्यानपिढ्या खाऊन संपणार नाहीत मग अजून काय करायचे उरले आहे?.

चालू द्या! टेली शॉपिंग मधल्या बिफोर आफ्टर सारखे अवास्तव दावे करायला काय जातं?

लालू प्रसाद ह्यांच्या काळातल्या बिहार किंवा समाजवादी पक्षाच्या उत्तर प्रदेश सरकार पेक्षा किंवा अनेक सरकारां पेक्षा गुजरात सरकार ने नक्कीच चांगले काम केले आहे हे मात्र मान्य.

पण काही विभागात निर्देशांक चांगले आहेत म्हणून त्याचा उदो उदो करून विकास पुरुष म्हणवून घायचे अन जिथे अपयश आले ते झाकून ठेवायचे किंवा नाकारायचे खोटी आकडेवारी म्हणून ओरड करायची हे सोयीचे राजकारण.

काँग्रेसच्या महाराष्ट्र सरकार चे रोजगार हमी योजना मॉडेल देशात चालतंय.

बंगाल मधल्या डाव्या आघाडीचे मिड डे मिल ही योजना पूर्ण देशात आता सुरु आहे.

भाजपच्या छत्तीसगढ सरकारचे योगदान ही महत्वपूर्ण आहेच सरकारी योजनांची कर्यक्षम अंमल बजावणी अन लोकांपर्यंत डिलीव्हरी चे मॉडेल सगळ्या देशाने उचलले आहे.

कुठल्याही पक्षाच्या चांगल्या कामाला कुणीही नाकारू शकत नाही. पण अवास्तव अतिरंजित दावे ही मान्य होतील असे नाही.

बंडा मामा's picture

8 Mar 2014 - 11:04 pm | बंडा मामा

लालू प्रसाद ह्यांच्या काळातल्या बिहार किंवा समाजवादी पक्षाच्या उत्तर प्रदेश सरकार पेक्षा किंवा अनेक सरकारां पेक्षा गुजरात सरकार ने नक्कीच चांगले काम केले आहे हे मात्र मान्य.

अर्थातच मान्य आहे, पण तुलना लालू आणि मुलायमशी केली तर कुठलेही राज्य उठूनच दिसेल. मुद्दा आहे की मोदींनी विशेष असे काय केले आहे?

विकास पुरुष हे संपूर्ण मार्केटिंग गिमिक असून तुम्ही दिलेला टेलेमार्केटींगचा मुद्दा अगदी चपखल आहे.

शैलेंद्रसिंह's picture

9 Mar 2014 - 1:00 am | शैलेंद्रसिंह

इथे केजरीवाल आणि आप ह्यांच्यावर टिका करणाऱ्यांनी आधी मोदींचे विकासाचे दावे सत्य कसे हे सांगावे. केजरीवालांचे १६ प्रश्न जर नीट पाहीलेत तर त्यातील बहुतेक प्रश्न हे सरकारी आकडेवारीवर आधारीत आहेत. उदा. ११% ची वाढ कृषीक्षेत्रात झाली म्हणायचे पण प्रत्यक्षात ती -१.१% झालेली आहे. इतके रेटुन खोटं बोलणारे चालतात पण केजरीवालांनी कुठला राजकीय डावपेच खेळला तर मात्र जळजळ. अनार्किस्ट केजरीवाल चांगले की देश सर्वबाजुने संकटात असतांना बाबरी मशीदीचा उन्माद निर्माण करणारे चांगले हे ज्यानेत्याने आपापले ठरवायचेय. केजरीवाल ह्यांचे राजकीय डावपेच भारताला नवीन नाहीत. कॉंग्रेस-भाजपा वर्षानुवर्ष तेच करत आहेत. पण आज तत्सम डावपेचांबद्दल त्यांच्या समर्थकांनी जो त्रागा चालवलाय त्याला दुट्टपीपणा म्हणावेसे वाटते.
मिपावर आधीही मी आकडेवारीसकट एक धागा सुरु केला होता, पण वस्तुस्थितीपेक्षा श्रद्धा महत्वाच्या असतात हे तिथेही जाणवलं. आपलं राजकारणात त्यालाच अधिक महत्व असल्याने केजरीवालांच्या मुद्द्यांवर चर्चा होण्यापेक्षा केजरीवालांवर अधिक लोकांची श्रद्धा बसु नये असाच प्रयत्न भाजपा करत राहिल.

केजरीवाल यांनी निवडणूकी आधीच मोदीच पंतप्रधान होणार हे मान्य केलेले दिसतयं अर्थात म्हणूनच हार मान्य केली आहे असे वाटते. म्हणून नंतर परत पोटापाण्याकरता रस्त्यावर भागाबाई माकडचेष्टा कराव्या लागणार त्याचा सराव चालू केला की काय असे वाटते... असो.

तुम्ही दिलेल्या आयबीएन्च्या बातमीत सुरवातीसच म्हणले आहे: He also made allegations against Modi's government but offered no evidence for his claims. त्यात सर्व आले...

श्रीगुरुजी's picture

9 Mar 2014 - 12:58 pm | श्रीगुरुजी

>>> He also made allegations against Modi's government but offered no evidence for his claims. त्यात सर्व आले...

केजरीवालांनी गाजावाजा करत गेले ४ दिवस गुजरातचा दौरा केला. संपूर्ण ४ दिवस मोदींवर निराधार आरोप करणे या व्यतिरिक्त त्यांनी काहीही केले नाही. एकाही आरोपाला आधार किंवा आकडेवारी किंवा पुरावे नाहीत. आपण किंवा आपला पक्ष काय करणार आहे किंवा गुजरातची तथाकथित दुरावस्था आपण कशी सुधारू इच्छितो याविषयी अवाक्षरसुद्धा काढलेले नाही किंवा ४ दिवसातील ४ मिनिटेसुद्धा ते यावर बोलेलेले नाहीत. या माणसाला केवळ नशीबाने मुख्यमंत्रीपद मिळाले होते, पण तिथून ते शेपूट घालून पळून आले. इतरांवर फक्त टीका करण्यापेक्षा मिळालेल्या संधीचा उपयोग करून घेऊन काही बदल घडवून आणण्याची त्यांना संधी होती. पण अंगी भिनलेल्या ढोंगी व नाटकीपणामुळे काहीही करून दाखविण्याची त्यांची अपात्रता सर्वांसमोर येऊ लागताच राजीनाम्याचे नाटक करून धूम ठोकली. संपूर्ण ४ दिवस त्यांना फक्त मोदीफोबिया झालेला होता. त्यांना या कामगिरीवर कोणी पाठविले आहे हे उघडच आहे. काँग्रेसने स्वतः नामानिराळे राहून मोदींवर हा भाडोत्री माणूस सोडलेला आहे.

त्यांचे प्रश्न वाचून गंमत वाटली. एक प्रश्न मोदी प्रचारासाठी हेलिकॉप्टर वापरतात त्याबद्दल आहे. याच ४ दिवसात इंडिया टुडेचे खाजगी चार्टर्ड विमान वापरून ते दिल्लीवारी करून आले याची त्यांना ना खंत ना खेद ना काही विरोधाभास दिसला. मोदींच्या मंत्रीमंडळातील मंत्र्यांवर आरोप करताना आपण सोमनाथ भारतींना मंत्रीमंडळात घेऊन त्यांचे ठाम समर्थन करत होतो याचा सोयिस्कर विसर पडलेला आहे.

निवडणुक संपल्यावर केजरीवाल बिग बॉसच्या पुढील सत्रात असणार हे आता नक्की झाले आहे. त्यांच्याबरोबर बिग बॉस मध्ये दिग्विजय, आव्हाड, भुजबळ, लालू, सिब्बल, तिवारी इ. नौटंकी मंडळी पण असणार.

विकास's picture

9 Mar 2014 - 6:36 pm | विकास

आपण किंवा आपला पक्ष काय करणार आहे किंवा गुजरातची तथाकथित दुरावस्था आपण कशी सुधारू इच्छितो याविषयी अवाक्षरसुद्धा काढलेले नाही किंवा ४ दिवसातील ४ मिनिटेसुद्धा ते यावर बोलेलेले नाहीत.

या संदर्भात काल एक निरीक्षण वाचले. जेंव्हा केजरीवाल हे गुजरातमधे जेंव्हा तावातावाने मोदींच्या विरोधात भाषणे करत होते तेंव्हा मोदीं चाय पे चर्चा कार्यक्रमातून जनतेशी विकासासंदर्भात बोलत होते. ...

बाळकराम's picture

9 Mar 2014 - 8:28 pm | बाळकराम

धन्यवाद!

बाकी, आता मोदी येणार म्हणून मनात मांडे खाणारी ही येडचाप लोकं बघून त्यांची दया येते, हे येडे २००४ मध्ये इंडिया शायनिंग म्हणत म्ह्णत असेच थोबाडावर आपटले होते. तरीही शिकले काहीच नाहीत, च्यायला!

श्री गावसेना प्रमुख's picture

10 Mar 2014 - 8:41 am | श्री गावसेना प्रमुख

तुम्ही कॉम्रेड कि काँग्रेसी,गुरुजी जसे भाजपेयी वाटतात तसे तुम्ही कोण?आणी नरेंद्र मोदी कोण माहीत नसेल तर कुठल्याही भाजप कार्यालयात जावुन विचारा सांगतील ते.

श्रीगुरुजी's picture

10 Mar 2014 - 2:33 pm | श्रीगुरुजी

तुम्ही समजता तसा मी भाजपेयी नाही. मी भाजपेयी आहे हे अर्धसत्य आहे, पूर्णसत्य नाही. मी कट्टर काँग्रेसविरोधक आहे, पण तितक्या प्रमाणात भाजपचा समर्थक नाही.१९८९ मध्ये वि.प्र.सिंग पंतप्रधान व्हावेत असे मला वाटत होते, पण त्यांनी भ्रमनिरास केला. २०१३ मध्ये म.प्र., छत्तीसगड व राजस्थान मध्ये भाजप यावा व दिल्लीत आप ने सरकार बनवावे असे मला वाटत होते. अगदी तसेच झाले, पण केजरवालांच्या ढोंगीपणा व नाटकीपणामुळे भ्रमनिरास झाला. मी उमेदवार व पक्ष असे दोन्ही बघून मत देतो.

श्रीगुरुजी's picture

9 Mar 2014 - 8:58 pm | श्रीगुरुजी

केजरीवाल अशी व्यक्ती आहे की ते अमेरिकेला जाऊन वॉशिंग्टन डीसी शहरात कॅपिटॉल हिल, व्हाईट हाउस च्या जवळपासच्या परिसरात रस्त्यावर बसलेल्या एखाद्या भिकार्‍याचा फोटो काढतील व तो प्रसिद्ध करून "अमेरिका विकसित देश आहे हे धादांत खोटे आहे. प्रत्यक्षात त्या देशात सर्व नागरिक रस्त्यावर भीक मागतात. हा बघा पुरावा." असे सांगत फिरतील.

रमताराम's picture

10 Mar 2014 - 11:47 am | रमताराम

बाकी चर्चा बिरचा आपलं काही काम नव्हे. फक्त इथे एकदोनदा तीन वेळा जिंकून येणे वगैरे 'लै भारी' असं लिवल्यालं दिसलं. म्हटलं बंगालमधे सलग ३६ वर्षे कम्युनिस्टांचं सरकार होतं हे जाता जाता कानावर घालू या.

अरे हो आणखी एक. निवाशी भारतीयांपेक्षा अनिवाशांना मोदींची आक्रमक पाठराखण करणं अधिक आवडतं असं दिसतंय. फेसबुकवरच्याही सातत्यपूर्ण आक्रमक असणार्‍या मोदी-ब्रिगेडमधे अनिवाशांचेच बहुमत दिसते मला. म्हणतात ना ज्याचं जळणार नाही त्याला काय कळणार पुढे काय वाढून ठेवलंय ते. हे म्हणजे प्रेक्षक ग्यालरीत बसून ग्लॅडिएटरला अंगठा जमिनीकडे करून दाखवणे आहे. आमच्या केजरूबाबाचे समर्थक त्यामानाने डि-क्लास झालेले दिसताहेत. बाकी 'म्या भारी, माझा नेता लै भारी' वगैरे शड्डू ठोकणं चालू द्या.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

4 Apr 2014 - 2:35 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

माझ्या टोपणनावाला साजेल अशी -
2πr

बाकीची मज्जा इथे आहे.

-- आपली नम्र
π विक्षिप्त अनिवासी

विकास's picture

4 Apr 2014 - 5:01 am | विकास

सकाळीच तो दुवा वाचला! हहपुवा! मला देखील त्यामुळे मज्जा करायला प्रेरणा मिळाली:

अगर वादा किया 'गॅसपे कम होगा अधिभार'
तो केजरीवालभी बोलेगा...
अबकी बार मोदी सरकार!

आयुर्हित's picture

4 Apr 2014 - 2:49 pm | आयुर्हित

थोडे थांबा फक्त गॅसच काय, सर्व महागाई(वीज,डीजेल-पेट्रोल,भाजीपाला,डाळीं-साळी,मटन मच्छी,सोने-चांदी)कमी होईल.

फक्त चांगले काम करणाऱ्या पक्षाला मत द्यायला विसरू नका!
निवडणूकीचा वेळापत्रक

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

4 Apr 2014 - 6:02 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

काल संध्याकाळी ह्यांनी कट्ट्यावरून आणलेला-
वाटीत चिवडा मोदींना निवडा.
अख्ख्या भारताचा मूड आहे.
मोदी काका ड्युड आहे.

(मोदींचे कवतिक होत असूनही कोणाला मत द्यावे ह्या विचारात पडलेली)माई

हा नक्की कुणाचा डु आयडी आहे बरं????

हम्म, भौतेक कयास खरा ठरला तर ;)

(बॅटलॉक होम्स.)

विकास's picture

4 Apr 2014 - 7:01 pm | विकास

ड्यु आयडी काय? "ताई, माई, अक्का, विचार करा पक्का आणि हातावर मारा शिक्का" मधल्या त्या माईसाहेब असाव्यात. ;)

बॅटमॅन's picture

4 Apr 2014 - 7:03 pm | बॅटमॅन

हा हा हा ;)

बादवे दिग्गीराजांच्या नावावर खपवला जाणारा एक कोटः

काँग्रेसचा जो हात आहे त्यामागेही आरेसेसचाच हात आहे =))

श्रीगुरुजी's picture

5 Apr 2014 - 12:28 pm | श्रीगुरुजी

>>> हा नक्की कुणाचा डु आयडी आहे बरं????

नानासाहेबांचा स्त्रीपार्टी वाटतोय!

विकास's picture

4 Apr 2014 - 7:03 pm | विकास

अख्ख्या भारताचा मूड आहे
एके४९ सुड* आहे

* सुड म्हणजे स्युडो (नाटकी) आहे...

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

4 Apr 2014 - 6:11 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

फिजिक्समध्ये पास व्ह्यायला हवा न्युटनचा फोर्स.
भारताच्या प्रगतीसाठी लावा आता मोदींचा कोर्स.
माई

विकास's picture

4 Apr 2014 - 7:00 pm | विकास

फिजिक्समध्ये पास व्ह्यायला हवा न्युटनचा फोर्स
काँग्रेसला निवडाल तर अजून एक होईल बोफोर्स!

अनिवासी भारतियानाच खेचर्वाल चा खुप पुळका आला आहे. भारतात राहणारे खेचरवाल ला आता दिग्विजयसिंगाचा सच्चा वारस म्हणुन बघतात.

नानासाहेब नेफळे's picture

24 Mar 2014 - 10:29 am | नानासाहेब नेफळे

अनुमोदन,गुजरातमध्ये विकासाच्या दृष्टीने खूप प्रयत्न झाले आहेत, भविष्यात विमानांची संख्या प्रचंड वाढल्यास बस स्टॅँडवर विमानांसाठी 'फलाट' तयार केले आहेत. विमानतळांवर नासाच्या(न्यासाच्या नाही) सहकार्याने बडोदा ते प्लुटो थेट फ्लाईटचे नियोजन केले आहे, मध्ये गुरुच्या चंद्रावर' हरहरमोदी' एअरस्टेशनचे बांधकाम चालू आहे. गुजरातमधल्या कॅनॉलवर सोलार पॅनल बसवले आहेत ,ज्यामुळे रिफ्लेशन येऊन चांदोबा लाल पडला आहे व आता चंद्रावर कविता करता येणार नाही म्हणुन सायबेरीयातले कवी नाराजले आहेत.
गुजरातमधले रस्ते थेट बुलेट प्रुफ काचेचे आहेत व हे काम एंशी टक्के झालेले आहे ,इंटरनेट बरोबर नवीन टेलेपोर्टेशनच्या वायर टाकल्या आहेत तिथं ,नेटावर माल खरेदी करायचा डन म्हण्टले की लगिच दणादण माल टेलेपोर्ट होऊन घरात... गुजरातमधल्या बालकांचे इतके सुपोशन झाले आहे की जागतिक आरोग्य संघटनेने त्यांचे आयुष्य दिडशे वर्ष डीक्लेर करुन टाकले आहे.आहात कुठे!!!!

इरसाल's picture

24 Mar 2014 - 10:33 am | इरसाल

म्हणजेच याचाच अर्थ असा की मोदी "अमेठी" ची कॉपी करत आहेत तर..............अरेरेरेरे काय वैट्ट दिवस आलेत.

विटेकर's picture

24 Mar 2014 - 3:20 pm | विटेकर

अनुमोदन,गुजरातमध्ये विकासाच्या दृष्टीने खूप प्रयत्न झाले आहेत, भविष्यात विमानांची संख्या प्रचंड वाढल्यास बस स्टॅँडवर विमानांसाठी 'फलाट' तयार केले आहेत. विमानतळांवर नासाच्या(न्यासाच्या नाही) सहकार्याने बडोदा ते प्लुटो थेट फ्लाईटचे नियोजन केले आहे, मध्ये गुरुच्या चंद्रावर' हरहरमोदी' एअरस्टेशनचे बांधकाम चालू आहे. गुजरातमधल्या कॅनॉलवर सोलार पॅनल बसवले आहेत ,ज्यामुळे रिफ्लेशन येऊन चांदोबा लाल पडला आहे व आता चंद्रावर कविता करता येणार नाही म्हणुन सायबेरीयातले कवी नाराजले आहेत.
गुजरातमधले रस्ते थेट बुलेट प्रुफ काचेचे आहेत व हे काम एंशी टक्के झालेले आहे ,इंटरनेट बरोबर नवीन टेलेपोर्टेशनच्या वायर टाकल्या आहेत तिथं ,नेटावर माल खरेदी करायचा डन म्हण्टले की लगिच दणादण माल टेलेपोर्ट होऊन घरात... गुजरातमधल्या बालकांचे इतके सुपोशन झाले आहे की जागतिक आरोग्य संघटनेने त्यांचे आयुष्य दिडशे वर्ष डीक्लेर करुन टाकले आहे.आहात कुठे!!!!

खुर्चीवर उभे राहून टाळ्या वाजवण्यात आल्या आहेत ..!
आत्मुबाबा - एक स्मायली टाका.

श्री गावसेना प्रमुख's picture

24 Mar 2014 - 3:21 pm | श्री गावसेना प्रमुख

तुमच वय ६० पुर्ण झाल का नेफळे साहेब.

श्रीगुरुजी's picture

24 Mar 2014 - 1:25 pm | श्रीगुरुजी

>>> वडोदरा चा बस अड्डा आहे कि एअरपोर्ट?

मुंबईचा आंतरराष्ट्रीय विमानतळ बस अड्ड्यासारखा आहे. तर बडोद्याचा बस अड्डा विमानतळासारखा आहे.

मुंबईचा आंतरराष्ट्रीय विमानतळ बस अड्ड्यासारखा आहे

अहो नाही हो. टर्मिनल २ बघा. एकदम चकाचक आहे. आंतरराष्ट्रीय म्हणावा असा.

बंडा मामा's picture

27 Mar 2014 - 12:02 am | बंडा मामा

ह्या मोदी मिनिअन्सना वडोदरा बस स्टँड मुंबईच्या टर्मिनल २ पेक्षा भारी वाटतो? =)) =))

मैत्र's picture

27 Mar 2014 - 11:00 am | मैत्र

मुंबई टर्मिनल २ गेली दहा एक वर्षे अस्तित्वात आहे आणि १ तर कित्येक दशकांपासून भारतातील आणि
एशियातील सर्वोत्तम पैकी एक आहे.
१ वरच्या सोयी सुविधा तर काय वर्णाव्या - तिथली आंतरराष्ट्रीय दर्जाची स्वच्छतागृहे,
स्किफॉलला भारी पडतील असे एस्कलेटर्स, चांगी पेक्षा उत्तम प्रकाश योजना, हिथ्रोपेक्षा चांगली अंतर्ग्त माहिती आणि सोयी.
विशेषतः भारतात परत आल्यावर बॅगेज साठी सेवा भावाने मदत क्ररणारे लोक - ती क्स्टम्सची प्रकाशाने उजळलेली आणि नव्या ग्रानाईटने चमकणारी बाजू..

त्या मोदी मिनिअन्स्ना काय त्या एका पुण्यापेक्षा ल्हान शहरासाठी एक चकचकीत बस स्टँड केल्याचं कौतुक.
कधी स्वारगेटची शान पाहिली आहे का त्यांनी?

तुम्ही लक्ष नका देऊ बंडामामा.. त्यांना पुणे शिवाजीनगर सारखं वैभवशाली बस स्टँड सोडून त्या गुजरातचं
प्रेम.

मुंबईच आंतरराष्ट्रीय विमानतळ हेGVKनावाच्या कंपनीने बनवलेले आहे. महाराष्ट्र / भारत सरकारला हे काही शक्य नाहीय !!
ह्या विमान तळावर पहील्यांदा उतरण्याचा मान मिळावा म्हणून एअर इंडीयाच्या विमान उतरण्याची वाट बघावी लागली.

नेहेमी प्रमाणे ए.ईं.च विमान यायला उशीर झाला आणि एमीरेटच्या विमानाला ह्या नव्या कोर्या विमानतळावर पहील्यांदा उतरण्याचा मान मिळाला.

विमानतळ चकाचकच आहे, सर्व व्यवस्था उत्तम आहेत पण ! हा पण सर्वी कडे घात करतो.

ह्या विमान तळा वर भयंकर डास आहेत, गरम होत !! आणि इमिग्रेशन सर्वात सुस्त !! हे एक सरकारी विभाग

आपल अस्तित्व दाखवणारच.

चिरोटा's picture

28 Mar 2014 - 2:05 pm | चिरोटा

ते डास रक्तचाचणीसाठी पाळले आहेत असे म्हणतात.
मुंबै म्हंटल्यावर गरम होणारच. काय? नायतर सिमला,उटीची कनेक्टेड फ्लाईट असल तर बघा.