मिठीत तुझ्या असताना...
ओठातल्या ओठात हसताना..
पापण्यांची होते फडफड
श्वास श्वासांवर झेलताना...
धुंद मी..बेधुंद तु असताना..
रती मी..मदन तु होताना...
शहारतो श्वास माझा...
ओठांशी ओठ बिलगताना...
मोकळ्या केसातुन फिरताना...
बटा गालावरच्या आवरताना...
हळुच चोरली नजर मी
चोळीची गाठ सुट्ताना....
ती नजर झेलताना..
तो श्वास पेलताना..
रोमांच उभे पाठीवर
बोटांनी नाव कोरताना
मज मी विसरुन जाते...
क्षण भरभरुन जगते...
सावली तुझी पांघरुन
डोळ्यातली लाज लपवते...
हा ऋतु रोज यावा..
हा स्पर्श रोज व्हावा..
सहवास मला तुझा
असा रोज रोज घडावा...
रोज रोज घडावा.....!!!
प्रतिक्रिया
5 May 2014 - 11:41 pm | यसवायजी
मी पैला. :))
6 May 2014 - 7:47 am | स्पंदना
*stop*
विचारु? विचारु? *diablo*
काय केलं पयला येउन??? *ROFL* *dash1*
6 May 2014 - 1:16 pm | यसवायजी
गरम पाण्याच्या कुंडात आंघोळ केली. ;)
6 May 2014 - 2:18 pm | बॅटमॅन
तरी नशीब, कोडाईकनाल, भूछत्र, इ. नव्हते ;)
6 May 2014 - 1:26 am | विजुभाऊ
काव्यरस : = गरम पाण्याचे कुंड
लेखनविषयः = धर्म.
प्रतिक्रीया रस := ०<= ( ठार मेलेला)
7 May 2014 - 10:26 am | बाळ सप्रे
काव्यरस : = गरम पाण्याचे कुंड
याचा अर्थ
स्थळ - hot water bath-tub असाही घेता येइल!! :-)
6 May 2014 - 1:35 am | विजुभाऊ
मैने पुछा. क्या अनजान हो उन मुलाकातों से?
जवाबमे सवाल आया कही से ,
ख्वाबो का भी कोई हिसाब होता है?
6 May 2014 - 7:48 am | स्पंदना
*give_rose*
6 May 2014 - 8:39 am | प्रचेतस
उत्तेजक कविता.
6 May 2014 - 8:53 am | स्पंदना
तसा विचार मी ही केला पहिल्यांदा.
पण मग तशी फार घसरली सुद्धा नाही आहे म्हणुन गप्प बसावं म्हंटल.
तरीही जेनी तिन टिंबे यांना तुम्ही लिहीता छान, फक्त रोमान्स अन अश्लिल मधली धुसर रेषा लक्षात घ्या अशी विनंती.
तश्या या जेनी ३टिंबे आजवर मिपाच्या इतिहासात बरच छान लिहुन गेल्या आहेत हे नम्रपणे नमुद नरते.
6 May 2014 - 9:22 am | पैसा
तांबड्या रंगाच्या छटा मिसळलेली गुलाबी कविता. वृत्त वापरायचं असेल तर "येक पे रैना! या गोड्डा बोलो या चतुर"
6 May 2014 - 4:12 pm | सस्नेह
अक्षरेसुद्धा गुलाबी झालीयेत लाजून !
6 May 2014 - 9:50 am | जेम्स बॉन्ड ००७
मोकळ्या केसातुन फिरताना...
बटा गालावरच्या आवरताना...
हळुच चोरली नजर मी
चोळीची गाठ सुट्ताना....
खल्लास आपण.. आजपासुन आपण तुमचा पंखा जेनीबै..
(स्वगतः च्यायला, हि लग्नाळलेली मंडळी आमच्यासारख्या सिंगलांना जळवणं कधी थांबवणार आहेत काय माहीत?
6 May 2014 - 12:28 pm | बॅटमॅन
ठ्ठो =))
जेनीबै अन जेम्सभौ दोघांचाही आपण फ्यान झालो पुनरेकवार.
8 May 2014 - 6:45 pm | धर्मराजमुटके
बाय द वे ह्या गाठीवाल्या चोळ्या बाजारात अवेलेबल आहेत काय ? नाही फारच जुनी फ्याशन आहे म्हणून विचारले.
8 May 2014 - 6:58 pm | प्यारे१
जुन्या फ्याशनीच फिर फिरुन बाजारात येतात.
८०-९० सेंमी मध्ये किती बदल होऊ शकतात असेही, नै का?
6 May 2014 - 1:15 pm | कवितानागेश
गरम पाण्याचे कुंड!! :)
6 May 2014 - 6:31 pm | अत्रुप्त आत्मा
वृत्त नाही..टेस्ट नाही
रोम्यांटिझम मेला हो
वेणी नव्हे..बॉब-कटाचा
सैल होऊन सुटला 'बो!'
6 May 2014 - 6:53 pm | प्यारे१
ग्रामीण भागातल्या एका प्रणयोत्सुक स्त्रीचे शहरी साहित्यिक मनोगत... जमलंय हो तीन टिंबं!
(का कुणास ठाऊक अजंठा मधल्या काळंसावळं 'केलेल्या' सो कु(ज्यु) ची आठौण आली.)
7 May 2014 - 6:28 am | आनन्दिता
मधुचंद्र पार्ट -२ इन पद्य का?? :)
7 May 2014 - 9:20 am | जेम्स बॉन्ड ००७
*ROFL*
असं असेल तर पुढचेही भाग लवकर येउ द्या ओ जेनीबै.. *wink*
7 May 2014 - 10:42 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अजून येऊ दे...!
-दिलीप बिरुटे
7 May 2014 - 5:54 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
फारच..... असो.
7 May 2014 - 8:39 pm | विजुभाऊ
ठार मेलो ही स्मायली कशी टाकायची कोणी सांगेल का?
7 May 2014 - 10:45 pm | पैसा
कपाळ आपटनारी चालेल का? *dash1*
8 May 2014 - 3:30 am | पिवळा डांबिस
सासुबैंचं फुल्ल्टू शॉर्ट सर्किट!!!! *lol*
8 May 2014 - 7:44 pm | जेनी...
पिढा काका सासुबैन्ना नै आवडली कविता :-/
8 May 2014 - 8:44 pm | केदार-मिसळपाव
तु मनापासुन लिहिलीस ना मग झाले.
8 May 2014 - 3:40 am | पिवळा डांबिस
खरं तर स्मायली द्यायचीच झाली तर मी अश्या कवितेला अशी स्मायली देईन...
*kiss3*
[नीलकांताने पुरवलेली ही स्मायली नायतर आणखी कुठल्या धाग्यावर वापरणार? :) ]
8 May 2014 - 4:46 am | चिन्मय खंडागळे
रांगेत उभा असताना...
पोटात प्रेशर असताना..
आतड्याची होते गुडगुड
कंबर आवळून धरताना...
बाहेर मी..आत तु असताना..
अवघडला मी..मोकळा तु होताना...
गुदमरतो श्वास माझा...
वाट तुझी बघताना...
बंद दार उघडताच...
चपळाईने घुसताना...
हळुच चोरली नजर मी
लाईन 'कट' करताना...
त्या नजरा झेलताना..
त्या शिव्या पेलताना..
गुद्दे पडले पाठीवर
घाईत दार लोटताना
मज मी विसरुन जातो...
क्षण भरभरुन जगतो...
कडी दरवाजाची लावून
पब्लिकच्या शिव्या खातो...
हा मोका रोज यावा..
हा मुहूर्त रोज मिळावा..
नंबर माझा टायमात
असा रोज रोज लागावा...
रोज रोज लागावा.....!!!
8 May 2014 - 6:13 am | स्पंदना
हान तेच्या मारी!! *clapping*
चिन्मय ही कविता वेगळी टाकुया का?
स्वयंभू विडंबन आहे हे.
म्हणजे मी ते चोरताना कस विडंबनात बसेल असा विचार करत होते बघा तोवर तुम्ही बरोबर नजर चोरलीत.
खरच सांगा नविन धाग्यात टाकु या का?
8 May 2014 - 8:00 am | यसवायजी
:))
8 May 2014 - 8:10 am | जेनी...
*biggrin*
8 May 2014 - 9:41 am | अत्रुप्त आत्मा
@रांगेत उभा असताना...
पोटात प्रेशर असताना..
आतड्याची होते गुडगुड
कंबर आवळून धरताना...>>>
@बाहेर मी..आत तु असताना..
अवघडला मी..मोकळा तु होताना>>>
8 May 2014 - 12:21 pm | पैसा
वृत्तातल्या गडबडगुंड्यासकट, टिंबांसहित घायकुतीला आलेले विडंबन!
बुवांनी हल्ली काही टोळभैरवांना घाबरून मिपावर अशा करूण कविता लिहिणे बंद केले आहे. पण हा एकलव्य शिष्य बघून बुवा खूश होतील नक्की!
8 May 2014 - 12:32 pm | प्रचेतस
कोण हो ते टोळभैरव?
8 May 2014 - 12:36 pm | पैसा
बुवाच यावर जास्त प्रकाश पाडतील!
8 May 2014 - 1:22 pm | प्रचेतस
*biggrin*
8 May 2014 - 7:20 pm | अत्रुप्त आत्मा
@जास्त प्रकाश पाडतील! >>> :-/ दु...दु...दु... :-/
पै तै ..
@हत्ती
अगोबा! :-/
थांबा.... मी आता परत दुकान चालू करतो!

8 May 2014 - 10:36 pm | बॅटमॅन
ही ह्हा ह्हा हाहा!!!
ही ह्ही ही ह्ही ही ह्ही, हि & हि =))
स्मायली का लपविता =))
8 May 2014 - 12:22 pm | बॅटमॅन
"फॉक्कन" आलेल्या या विडंबनामुळे मनःशांती, इ.इ.इ. सगळेच मिळाले.
-बॅटू आगरी.
8 May 2014 - 6:03 pm | चिन्मय खंडागळे
काय सांगू! ओरिजिनल कविता वाचली तेव्हापासूनच हात शिवशिवत होते. पण विडंबन 'होतच' नव्हतं.
शेवटी प्रतिभा काय आणि प्रेशर काय, यायची तेव्हाच येते. तोवर येरझार्या घालत राहण्याशिवाय पर्याय नसतो.
8 May 2014 - 6:11 pm | बॅटमॅन
अगदी अगदी बघा.
अन हे खास तुमच्यासाठी.
http://www.misalpav.com/node/8554
8 May 2014 - 6:42 pm | चिन्मय खंडागळे
ब्रिटिश भाऊ दा जवाब नही!
कुठे गेले हे सगळे थोर लोक...
8 May 2014 - 1:58 pm | शिद
मुळ कवितेपेक्षा विडंबन उत्तम जमले आहे... *lol*
8 May 2014 - 8:58 am | खटपट्या
अत्यंत गरम कविता !!!
8 May 2014 - 10:07 am | आत्मशून्य
मिठीत तुझ्या असताना...
धिकताना तिकताना धिकताना...
है धिकताना तिकताना तिकताना ...!
8 May 2014 - 10:29 am | स्मिता चौगुले
*dash1*
8 May 2014 - 10:54 am | दिपक.कुवेत
कविता आणि काव्यरस वाचुनच गरम पडलो (गार पडलोच्या धर्तिवर)......नावाला साजेशी कविता.
8 May 2014 - 10:56 am | दिपक.कुवेत
बेडरुम मधे (आपापल्याच) प्रिंट करुन लावावी अशी कविता. जेनी आज्जी अजुन येउदैत टिंबे...आय मीन आपल्या कविता
8 May 2014 - 11:40 am | मदनबाण
मोकळ्या केसातुन फिरताना...
बटा गालावरच्या आवरताना...
हळुच चोरली नजर मी
चोळीची गाठ सुट्ताना....
मरी गयो ! *man_in_love*
काव्यरस:
गरम पाण्याचे कुंड
णाही णाही... काय हे जेणी ! आधीच इथे गरमी...सॉरी सॉरी उकाडा वाढला आहे,त्यात गरम पाण्याच्या कुंडात कोण उडी मारणार ? *help*
बाकी कविता फारच स्फोटक आहे हो... *bomb*
8 May 2014 - 6:37 pm | चिन्मय खंडागळे
अजूनेक!... अजूनेक!!...
डोक्यात तुझ्या फिरताना...
अन् कडकडून चावताना..
टकलावर होते तडफड
मी तुरूतुरू पळताना...
'ऊ' मी..'उकिरडा' तू..
शिकारी मी..सावज तू...
शहारतो श्वास माझा...
रक्ताचे घोट पिताना...
मोकळ्या केसातुन फिरताना...
जटा पालथ्या घालताना...
हळुच चोरले अंग मी
तू डोके खाजवताना....
तो कंगवा चुकवताना..
त्या नखांमध्ये लपताना..
रोमांच उभे पाठीवर
बोटांतून तुझ्या सुटताना
मज मी विसरुन जाते...
भरभरुन अंडी घालते...
सावलीत तुझ्या केसांच्या
माझ्या लिखा लपवते...
हा ऋतु रोज यावा..
हा स्पर्श रोज व्हावा..
शाम्पूचा स्पर्श तुझ्या
केसांना कधी न घडावा...
कधी न घडावा........!!!
कधी न घडावा........!!!
(आता जेनीताई माझा मर्डर करायला धावणार बहुतेक!)
8 May 2014 - 7:00 pm | स्पंदना
8 May 2014 - 7:31 pm | अत्रुप्त आत्मा
@aparna akshay =))
9 May 2014 - 9:48 am | बाळ सप्रे
डोक्याला डोकं भिडतं जिथे
उवांना नवं घर मिळतं तिथे
उवाsss लिखांना मारी लायसिलsss!! *scratch_one-s_head*
8 May 2014 - 7:25 pm | जेनी...
चिमन्या काका ... लय भारी *biggrin*
अजुन युद्या *pleasantry*
8 May 2014 - 9:12 pm | चिन्मय खंडागळे
काका मत कहो ना!!... *stop*
8 May 2014 - 10:35 pm | बॅटमॅन
नवीन विडंबक अलर्ट =))
सह्हीच!!!!!
8 May 2014 - 6:43 pm | जेपी
मु ळ क वि ता रो मा चं क आ णी गो ड बो
ले व खं डा ग ळे यां चे विं ड ब न ए क द म खं ग्री .
8 May 2014 - 7:43 pm | सूड
गुलाबी रंगातली अंमळ पिवळी कविता !!
8 May 2014 - 8:49 pm | शिद
+१११... दुसरी कविता पण त्याच धाटणीची आहे. बहुतेक सगळा स्टॉक तसलाच आहे, पिवळसर गुलाबी. ;) *biggrin*
8 May 2014 - 9:18 pm | जेनी...
ओ शिद्दु काका तुम्ही नका वाचु तुमच्यासाठी नायिये ती *i-m_so_happy*
8 May 2014 - 9:36 pm | शिद
ओ जनाबाई आज्जी, धन्यवाद खुलासा केल्याबद्दल. मला माहीती नव्हते की या असल्या कविता तुम्ही तुमच्या सारख्या म्हातार्या लोकांसाठी लिहीत आहात म्हणुन... चालु द्या.
नाहीतरी म्हातारपणात आता करायला काही नसेलच म्हणुन पुर्वीच्या/भुतकाळातील गुलाबी आठवणी येताहेत जणू... ;)
8 May 2014 - 9:40 pm | जेनी...
आत्ता कसं बोल्लात ;)
मंग आता नै यायचं हं काका या धाग्यावर ! *mosking*
8 May 2014 - 9:44 pm | शिद
आता जनाबाई आज्जींचा आदेश डावलुन कसं चालेल? रजा घेतो ह्या धाग्यावरुन. *bye*
8 May 2014 - 9:47 pm | जेनी...
बघा आलात परत *biggrin*
म्हणजे तुम्हालाच करमत नैय्ये ...
आता मलाच म्हणावं लागतय " चालु द्या .. चालु द्या " *lol*
8 May 2014 - 9:16 pm | यसवायजी
गुलाबी रंगातली अंमळ पिवळी कविता !!
नॉय नॉय..
गुलाबी ढंगातली अंमळ जुलाबी कविता??
8 May 2014 - 9:21 pm | जेनी...
हिहीहि
सुड काका डोन्ट माइंड हं .. पण लग्न झालेल्या लोकांचे गुलाबी आयुष्य पिवळे होण्याची स्वप्न बघत बसणार्यान्ना काय कळणार म्हणा *biggrin*
9 May 2014 - 12:06 am | सूड
छे!! मी कशाला माईंड करु. अभि, आपको अर्धे हळकुंड में पिवळा होनाईच हय तो वयसा सही. ;)
9 May 2014 - 3:12 pm | ज्ञानोबाचे पैजार
चिन्मयचे धाडस बघुन मला पण चेव आला, माझ्याही मुठी वळु लागल्या आणि ठरवले की लग्न करुन गांजलेल्या माणसाची कैफियत मांडायचीच. जेनीतै सारख्या कव्यत्री रम्य चित्र तरुणांच्या डोळ्या समोर उभे करतात आणि मग ते बिचारे (माझ्या सारखे) बरोबर लग्नाच्या जाळ्यात अडकतात. त्यांच्या नशिबी काय वाढुन ठेवलेले आसते ते सांगण्याचा एक प्रयत्न (अर्थात हेची परवानगी न घेता... कोणी घरी सांगु नका रे)
मुठीत तुझ्या असताना...
छद्मी तू हसताना...
हृदयाची होते धडधड...
शब्द तुझे झेलताना...
त्रस्त मी...बेधुंत तू असताना...
पती मी... अनाहिता तू होताना...
अताशा लागतो उर्ध्व माझा...
जीने चार ही चढताना
हात टकलावरुन फिरवताना...
शर्टात पोट आवरताना...
हळुच चोरली नजर मी...
(पँटचे) बक्कल तटकन तुटताना
ती नजर झेलताना...
तो फुत्कात पेलताना...
रट्टा बसे पाठीवर...
बोटाने नाक कोरतना...
मग...
मी मजला विसरुनी जातो...
पार्टीला जास्तच घेतो...
सावली तुझी पडता पाठी...
मी तोंड लपवुनी पितो...
तु माहेराला जावे...
फोनही तुझा न यावा...
एकांत मला असा हा...
केव्हातरी (तरी) मिळावा...
केव्हाततरी(तरी) मिळावा...!!!
(सगळी कडे तीन टिंबे द्यायचा प्रयत्न केला आहे कुठे राहिली असतील तर दुर्लक्ष करावे)
9 May 2014 - 3:14 pm | पैसा
कैफियत छान आहे. संध्याकाळी घरी फोन करू का? ;)
10 May 2014 - 11:52 am | ज्ञानोबाचे पैजार
हॅ हॅ हॅ
(इथे एक निर्बल आणि लाचार माणसाचे केविलवाणे, लाळाघोटे,लोचट, निर्लज्य, ओशट हास्य कल्पावे.)
9 May 2014 - 3:37 pm | मदनबाण
तु माहेराला जावे...
फोनही तुझा न यावा...
एकांत मला असा हा...
केव्हातरी (तरी) मिळावा...
केव्हाततरी(तरी) मिळावा...!!!
तोडलस मित्रा ! *yahoo*
9 May 2014 - 3:41 pm | अत्रुप्त आत्मा
@पैजारबुवा>>> अवडलं बुवा!
आणि...सावध केल्याबद्दल धन्यवाद!
10 May 2014 - 11:54 am | ज्ञानोबाचे पैजार
गुरुजी तरी सुध्दा फुलांच्या पायघड्या घालायला आणि त्याच्या पुढच्या सजावटी साठी ही आम्हाला बोलवायला विसरु नका.
9 May 2014 - 3:55 pm | सूड
मस्तच !! अगदी सगळ्या टिंबं, टांबे, टेंब्यांसकट!!
9 May 2014 - 3:56 pm | सूड
आणि हो, बर्याच दिवसांनी चांगलं विडंबन वाचायला मिळालं. ;)
9 May 2014 - 4:05 pm | प्यारे१
स्वघोषित समीक्षकांचा धि.. आपलं ते हे.. इजय असो! ;)
9 May 2014 - 4:57 pm | सूड
हे चीटिंग आहे राव!! प्यारेकाका, तुम्ही स्वघोषित आध्यात्मिक कीर्तनकार* असलात तरी आम्ही तुमचा जयजयकार केलाय का कधी ?? चीटिंग नाय हा करायचं !! =))))
*भगव्या रंगात आपल्या सोयीने पाणी घालून डायल्यूट वैगरे करुन घेणे.
10 May 2014 - 1:10 pm | प्यारे१
अगं सुडके हळू जरा.... पाणी पि हो थोडं. ;)
9 May 2014 - 4:26 pm | केदार-मिसळपाव
जमलय...
9 May 2014 - 5:20 pm | स्पंदना
पैजार बुवा!! सुसाट!!
9 May 2014 - 7:16 pm | arunjoshi123
सुंदर कविता.
10 May 2014 - 2:20 am | तुमचा अभिषेक
कसली भारी विडबने आहेत एकेक, कविताचा धागा बघून हि आपली आवड नाही म्हणत घुसलो नव्हतो इथे.. सही.. लगे रहो..
10 May 2014 - 11:52 am | arunjoshi123
तो शेवटच्या श्वासाचा उल्लेख अतिरिक्त झाला असे वाटले.