नरेंद्र मोदींवर 2002 च्या दंग्यांचे सावट असताना गुजरातमधील लोकांनी बारा वर्ष सत्ता सोपवली. याचे काय गणित असावे याचा थोडा विचार करुया. दंग्यांच्या घटनेविषयी मोदींना कधीच पश्चाताप झाल्याचे दिसून आले नाही. हे एकप्रकारे झाल्याप्रकाराचे छुपे समर्थनच आहे.
आज एक मोठा जनप्रवाह मोदींना देशाचा कारभार सोपवण्यास आतूर झालेला दिसतो आहे.
विकासाचा मुद्दा वरुनवरुन महत्वाचा दिसत असला तरी
तो फक्त दाखवण्याचा दात आहे. किँवा हिमनगाचा दृश्य भाग आहे, ज्याचा उरलेला भाग मुस्लीम विद्वेषातून उद्भवलेल्या दंग्यांशी संबंधित जास्त आहे.
देशातल्या नागरीकांना विकासाच्या मुद्द्यापेक्षा घडलेल्या दंग्याँच्या कारणामुळे मोदी अधिक जवळचे वाटत आहेत का, या मुद्द्याचा विचार व्हायला हवा. असे असेल तर ही फार गंभीर बाब आहे.
कारण केवळ विशिष्ट समुदायाचा द्वेष म्हणून खूप मोठा समुदाय एका व्यक्तीच्या पाठीशी उभा राहत असेल तर उद्या देशात सर्वत्र विद्वेषपूर्णच वातावरण राहणार, यात शंका नाही. विचार संसर्गजन्य असतात. एकदा लागण झाली की ती रोखणे अशक्य होवून बसते. तशी परिस्थिती उद्भवल्यास खुद्द मोदीसुद्धा ती रोखू शकणार नाहीत.
प्रतिक्रिया
27 Apr 2014 - 12:50 pm | जेपी
मी
प
य
ला
.
27 Apr 2014 - 1:09 pm | डावखुरा
तुमचे बरोबरही असेल पण मुस्लीम समाजाचाही पाठींबा आहेच..की..
त्यांनी सद्भावना रॅलीत टोपीचा स्वीकार न करुनच दाखवुन दिले...आणि तरीही कोणी फार ठ्ळक आरोप करु शकले नाही...
पण बहुसंख्याक परंतु युपीए राजवटीत दुर्लक्षित असलेल्यांची मने जिंकली...
27 Apr 2014 - 1:43 pm | drsunilahirrao
सद्भावना रॅलीपर्यँत मुस्लीमांचा पाठीँबा असेलही. पण टोपीच्या प्रसंगामुळे नंतर मुस्लीम समुदाय मोदींपासून दुरावला आणि हिंदू समाज अधिक जवळ आला असे म्हणता येईल.
27 Apr 2014 - 2:17 pm | तुमचा अभिषेक
सहमत आहे.
बरेच जणांना विकासाच्या मुद्द्यापेक्षा हिंदूहृदयसम्राट म्हणून मोदी हे भारताच्या पंतप्रधानपदी हवे आहेत.
अवांतर - मला वाटते यावेळी अल्पसंख्यांक ज्यांना मोदी नको आहेत, वा जे मोदी येण्याची भिती बाळगून आहेत असे देखील मोठ्या संख्येने मतदानासाठी उतरले असतील. अर्थात त्यांनी आपला कैवारी समजून मते कोणाला दिली असतील हे ज्याचे त्यालाच ठाऊक.
27 Apr 2014 - 2:19 pm | आयुर्हित
हवेत बंगला बांधणे म्हणजे काय असते, हे आज कळले!
27 Apr 2014 - 2:31 pm | प्यारे१
४८ साली संघ का वाढला,
७७-७८ साली आणखी का वाढला,
९५ ला शिवसेना भाजप महाराष्ट्रात का सत्तेवर आलं,
८४ ला ४ असणारे ८९ ला ९० का झाले...
घरातल्या सर्वार्थानं 'बर्या' मुलाला सातत्यानं त्याच्याच बेजबाबदार नि वांड भावासाठी (महात्म्याचे शब्द ना?) तडजोड करावी लागत असेल तर बर्या मुलाला कधीतरी काड्या कराव्या असं वाटल्यास काय चूक????
- पॉपकॉर्न विकायला कोणी आहे का याची वाट बघत बसलेला!
27 Apr 2014 - 7:07 pm | llपुण्याचे पेशवेll
हां बर मग?
27 Apr 2014 - 11:39 pm | आत्मशून्य
नाही. दंगली हिदुंचे शिरकाण झाल्यामुळे घडल्या, त्यानुशंगाने उलट हिंदुसमाज मोदींवर जास्त नाराज नको काय ? पण वस्तुस्थिती तशी नाही कारण विकास. खरे तर बेसिक गोश्टीच पुरवल्या पण त्याही पुरवायला काँग्रेसने दाखवलेली इछ्चाशक्तीची दिवाळ्खोरी हे एकमेव कारण आहे की आज काँग्रेसविरोध म्हणून मोदींची लाट कार्यक्षमता विषेश उठुन दिसते आहे. हा काँग्रेसने स्वतःच्या पायावर मारुन घेतलेला धोंडा आहे. केजरीवाल तो अभी नया हय.
28 Apr 2014 - 11:41 am | चिरोटा
गेल्या १२ वर्षात गुजरातमध्ये तसे काही घडले असते ती ही शंका घ्यायला वाव होता.पण उलट घडते आहे.'तणावपूर्ण परिस्थिती,दुकाने बंद्/जाळपोळ,संशयितांना अटक' असल्या बातम्या कुठून् जास्त येतात? 'सेक्युलर' महाराष्ट्र,आंध्र... की गुजरात?
29 Apr 2014 - 12:04 am | बाळकराम
जे हिटलरच्या वा मुस्सोलिनीच्या लोकप्रियतेचे होते तेच!
29 Apr 2014 - 6:56 am | आत्मशून्य
मिळालाच नाही हे भारताचे दुर्दैव आहे काय ?
29 Apr 2014 - 7:27 am | चौकटराजा
भारतात सर्वाधिक आवश्यकता कशाची असेल तर सुप्रशासनाची. पण मोदी याबाबतीत बदल घडवून आणतील असे मला वाटत नाही. न्यायालये, गुप्तचर यंत्रणा, पोलीस, लाचलुचपत प्रतिबंध यात कमालीच्या सुधारणा आणणे गरजेचे आहे. जो आमदार घरबांधणीचा कायदा करतो तोच बेकायदेशीर बांधकामे नियमित करा म्हणून उपोषण करतो. अशा आमदाराला मोदी तुरूंगाचा रस्ता दाखवतील काय?
मग आता मोदी लोकप्रिय आहेत याचे कारण काय? खरे तर ते भारतभर लोकप्रिय नाहीतच. बाजपेयीही नव्हते. भारतभर लोकप्रियता फक्त नेहरू, इंदिरा,लालबहादूर शास्त्रीजी व राजीव गांधी या चारच जणाना मिळाली. मनमोहन सिंग यांच्या तुलनेत मात्र नरेंद्र मोदी ये लोकप्रिय आहेत यात शंका नाही. तरूणाना भाषणातून स्फूर्ति मिळते. त्यात सोनिया ,मनमोहन कुचकामी आहेत.मोदी यात आघाडी घेऊन आहेत.केजरीवाल देखील भाषणात तेच ते मुद्दे उपस्थित करतात. त्या मानाने मोदी बरेच " तयारीचे" नेते आहेत. हे त्यांच्या कट्टर शत्रूला देखील मान्य करावे लागेल.
29 Apr 2014 - 12:22 pm | मंदार कात्रे
क्रुपया हे पहा-
http://economictimes.indiatimes.com/opinion/interviews/narendra-modi-int...
29 Apr 2014 - 6:22 pm | मंदार दिलीप जोशी
भाजपसाठी प्रचार केल्याने झारखंडमधे मुस्लिम महिलेवर सामूहिक बलात्कार
PATNA: A Muslim woman in Jharkhand has alleged she was gang-raped by more than a dozen men because of her working for BJP in ongoing Lok Sabha elections, police said on Tuesday.
29 Apr 2014 - 8:21 pm | राही
केंद्रात भाजप सत्तेवर आल्यामुळे महाराष्ट्रात काही फरक पडेल असे वाटत नाही. गेली पंचवीसतीस वर्षे मुंबई महानगरपालिका शिवसेना भाजपकडे आहे. मुंबईत शासनव्यवस्थेचे किती अवमूल्यन झाले आहे हे वेगळे सांगायला नको.
29 Apr 2014 - 8:46 pm | आत्मशून्य
अबकी बार मोदी सरकार
30 Apr 2014 - 10:35 pm | संचित
गेल्या ५ वर्षात दररोज नवीन घोटाळे देणाऱ्या कॉंग्रेस मुळे कंटाळलेल्या जनतेला सध्या तरी एकाच पर्याय दिसत आहे. यावेळी देऊन पाहू मत, मोदी करतो तरी काय.
1 May 2014 - 11:50 am | मैत्र
बहुतेक लोकांना दंगली / हिंदू मुस्लिम वादाबद्दल फारसा इंटरेस्ट नाही..
पाच वर्षांपूर्वी विश्वासाने सत्ता दिल्यावर काँग्रेस आणि युपीए ने जे घोटाळे केले
आणि त्यानंतर ज्या बेमुर्वतखोर पद्धतीने वर्तन केले त्याला लोक चिडले आहेत.
त्यात महागाई, इन्फ्लेशन, सुरक्षितता आणि सर्वत्र उघड असलेला संधिसाधू पणा.
जर २००९ ते २०१३ मध्ये २००४-०९ सारखे चांगले वातावरण राहिले असते तर आज मोदींची इतकी हवा झाली नसती.
मोदींनी या anti incumbency चा नीट आणि आक्रमक प्लॅन करून फायदा करून घेतला आहे..
केजरीवाल हा एकच त्यांना समर्थ विरोधक ठरू शकला असता.. पण दिल्लीच्या गोंधळामुळे त्याचा लोकाश्रय कमी झाला. आणि राहुल गांधी हे समर्थ प्रतिस्पर्धी होऊ शकलेच नाहीत.
मोदींच्या लोकप्रियतेचे कारण - काँग्रेसविरोधी वातावरण, उत्तम प्लॅनिंग, आक्रमक प्रचार, चांगले मुद्दे..
1 May 2014 - 3:09 pm | विजुभाऊ
मोदींच्या लोकप्रीयतेचे कारण :
ते लोकप्रीय आहेत हे सदोदीत "गोबेल्स " टाइप प्रचाराने लोकांवर बिंबवत रहाणे.
काही ना काही कारण काढत चर्चेत रहाणे ( प्रचारात मुद्दे यापेक्षा गुद्दे आणणे , जाणून बुजून वादग्रस्त वर्तन करणे उदा: मतदानासाठी जाताना मुद्दाम पक्षाचे चिन्ह जाणीवपूर्वक प्रदर्शीत करणे )
प्रसंगी मिडीया मॅनेज मरून चर्चेत रहाणे.
त्या अर्थाने त्यांची तुलना राखी सावंतां बरोबर करता येईल.
1 May 2014 - 8:09 pm | संचित
मोदींच वर्तन थोड जास्त आक्रमक असत. पण हल्ली ते जुन्या आणि विवादित मुद्द्याबद्दल बोलताना ते शक्य तेवढा वाद टाळताना दिसतात. जुने मुद्दे परत परत उकरून काढले जात असताना सध्या मोदी आधीच्या तुलनेत असे मुद्दे बरेच शांतपणे हाताळताना दिसत आहे. हे सुद्धा एक कारण आहे, कि अधिक जनता आता त्यांना स्वीकारताना दिसते आहे.
आणि मला तरी वाटते प्रणव मुखर्जी आणि चिदंबरम यांना कॉंग्रेस ने बाजूला करून आपल्या पायावर धोंडा मारून घेतला. राहुल गांधी यांचा साधेपणाच फुगा फुटला आणि लोकांना त्यांचे आकर्षण जवळ पास संपले. आता प्रियांका वड्रा हीच काय ती कॉंग्रेस जवळ अशा दिसते आहे.
1 May 2014 - 8:56 pm | श्रीगुरुजी
>>> मोदींच्या लोकप्रियतेचे कारण
काही कारणे ...
- निर्णयक्षमता असलेला स्वतःचे नेतृत्वगूण सिद्ध केलेला एक अत्यंत खंबीर नेता
- अत्यंत स्वच्छ व भ्रष्टाचारमुक्त राजकीय व वैयक्तिक कारकीर्द
- अहंकारी स्वभाव असला तरी तो अहंकार कर्तृत्वातून आलेला आहे
- प्रभावी वक्तृत्व
- समोरच्याला न घाबरता शिंगावर घेऊन थेट आव्हान देण्याचा सडेतोड स्वभाव
- १२ वर्षांहून अधिक काळ पक्षांतर्गत व पक्षाबाहेरील विरोधक, तपास संस्था, प्रसारमाध्यमे, तथाकथित उच्चभ्रू व्यक्तिमत्वे इ. शी खंबीरपणे झुंझणारा नेता
अजूनही अनेक कारणे असतील.
2 May 2014 - 1:15 pm | मंदार दिलीप जोशी
अनुमोदन
2 May 2014 - 1:26 pm | संजय क्षीरसागर
हे लफडं त्यांना महागात पडणार आहे. जर गुन्हा सिद्ध झाला आणि शिक्षा झाली (दोन वर्षांची) तर सिएमशीपही जाईल आणि उमेदवारीही रद्द होईल... मग पुन्हा चहाचं दुकान टाकायला लागेल.
2 May 2014 - 3:06 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
हे आयोगवाले उगाचच काहीतरी काढत बसताहेत झाल. पूर्वी इंदिराही मतदान केल्यावर आपला उजवा हात उंच करून दाखवे.
(मोदी पंतप्रधान अशी अपेक्षा करणारी) माई
2 May 2014 - 8:26 pm | श्रीगुरुजी
>>> हे लफडं त्यांना महागात पडणार आहे.
:yahoo:
>>> जर गुन्हा सिद्ध झाला आणि शिक्षा झाली (दोन वर्षांची) तर सिएमशीपही जाईल
:dance:
>>> आणि उमेदवारीही रद्द होईल...
:clapping:
>>> मग पुन्हा चहाचं दुकान टाकायला लागेल.
*HI*
2 May 2014 - 9:20 pm | सचिन
येडे आहेत का ते इतका मूर्खासारखा गुन्हा करायला ? हे काँग्रेसवाले त्यांना अटक करा म्हणतात, पण आझमखानाबद्दल मूग गिळून गप्प का? मुलायम म्हणतो " लडकोंसे गलती होती है" .. त्यावर काही बोलत नाहीत.
3 May 2014 - 12:12 am | संजय क्षीरसागर
निवडणूक आयोगानंच FIR दाखल करण्याचे आदेश दिलेत आणि दोन FIR दाखल झालेत. आपण मतदान केलं असं दर्शवणं वेगळं आणि मतदान केल्याची खूण असलेल्या तर्जनीसमोर निवडणूक चिन्ह धरुन फोटो काढणं वेगळं; हे समजण्या इतके शहाणे तर ते नक्कीच असावेत. पण सत्तालोभापायी आलेला उतावीळपणा नडतोयं.
3 May 2014 - 1:02 am | संजय क्षीरसागर
3 May 2014 - 9:51 am | संजय क्षीरसागर
3 May 2014 - 2:44 pm | श्रीगुरुजी
>>> "A spontaneous byte to the media does not normally stretch into a 20-minute speech.
"A spontaneous byte to the media" किती वेळ चालला पाहिजे (म्हणजे जास्तीत जास्त किती सेकंद किंवा किती मिनिटे) याची काही व्याख्या आहे का निवडणुक आयोगाकडे? यावर काही कायदेशीर वेळमर्यादा आहे का? असा काही कायदा किंवा नियम आहे का ज्यानुसार "A spontaneous byte to the media" ठराविक सेकंदांपेक्षा किंवा मिनिटांपेक्षा लांबला तर तो गुन्हा आहे व त्यापेक्षा कमी असला तर चालेल?
>>> Even if we were to believe the presser was not planned, then how does one explain the table and chairs set up there? Can all this be arrangspontaneously?" asked a senior EC official, who did not wish to be identified.
टेबल-खुर्च्या भाजपने किंवा मोदींनीच पूर्वयोजनेनुसार आणल्या होत्या असा काही पुरावा आहे का? पत्रकार परिषद करायची असेल तर तसे अधिकृत निमंत्रण वृत्तसंस्थांना व माध्यमांना पत्रकार परिषदेच्या आधी काळ पाठवावे लागते. असे अधिकृत निमंत्रण मोदींनी किंवा भाजपने पाठविले होते का?
>>> "Yes, we are aware that politicians can't help it when the media insists for a byte. If Modi had a brief chat with the media like his contemporaries in his own party or even his rivals, we wouldn't have given this order. The long interaction and also the deliberate display of his party symbol is a blatant violation of section 126(1)(a) and 126 (1) (b)," the officer added.
brief किंवा long interaction ची व्याख्या किंवा नियमावली आहे का निवडणुक आयोगाकडे? किती सेकंद किंवा मिनिटे म्हणजे long interaction किंवा किती सेकंद किंवा मिनिटे म्हणजे brief याची व्याख्या किंवा नियमावली आहे का? एखाद्या व्यक्तीच्या दृष्टीने १ सेकंदापेक्षा कमी म्हणजे brief असेल तर दुसर्याला वाटेल की २ तासांपेक्षा कमी म्हणजे brief. प्रत्येक व्यक्तीचा भिन्न दृष्टीकोन असू शकतो. त्यामुळे brief म्हणजे नक्की किती काळ किंवा long interaction म्हणजे नक्की किती काळ याची सुस्पष्ट व निसंदिग्ध मार्गदर्शक तत्वे किंवा नियम असल्याशिवाय असल्या आरोपांना अर्थ नाही.
आता राहिला पक्षचिन्हाचा मुद्दा. मतदानकेंद्रापासून १०० (की २०० ?) मीटर अंतराच्या आत पक्षचिन्ह लावता येत नाही. पण त्या परीघाबाहेर उमेदवारांचे बूथ, भित्तिपत्रके असतातच. जर मोदींनी ही अंतराची मर्यादा पाळली असेल तर पक्षचिन्ह दाखविल्याने कोणताच गुन्हा होत नाही.
पूर्वी यापेक्षाही गंभीर गुन्हे नेत्यांनी केलेले आहेत. पण आयोगाने आजवर त्यांच्यावर कधीही कारवाई केलेली नाही. २००४ (किंवा २००६ मध्ये) च्या लोकसभा निवडणुकीत केरळच्या एका कम्युनिस्ट मंत्र्याने स्वतःच्या मतपत्रिकेवर स्वतःच्या उमेदवाराच्या पुढे शिक्का मारून ती मतपत्रिका माध्यमांना संपूर्ण दाखवून नंतर घडी करून मतपेटीत टाकली होती. गुप्त मतदान कायद्याचा हा उघडउघड भंग होता. त्यांच्यावर आयोगाने आजतगायत कारवाई केलेली नाही.
मोदींवर एफआयआर दाखल करण्यामागे काँग्रेसचा दबाव आहे. काहीतरी करून मोदींना निवडणुकीतून बाद करण्यासाठी काँग्रेस उरलेल्या १०-११ दिवसात जीवाचे रान करीत आहे. त्यातूनच हे फुसके प्रकरण विनाकारण तापविले जात आहे. आयोगाने दबावाखाली झुकून कारवाई केली तरी न्यायालयात ती टिकणार नाही. भाजप लगेच न्यायालयात जाऊन त्यावर स्थगिती आणेल व त्यामुळे निवडणुक आयोगाचे व पर्यायाने काँग्रेसचे पुन्हा एकदा हसे होईल.
3 May 2014 - 7:55 pm | संजय क्षीरसागर
प्रचाराचा हेतू सिद्ध झाल्यामुळे गुन्हा दाखल झाला. इतरांनी चूक केली म्हणून मोदींना सवलत देता येत नाही.
>आयोगाने दबावाखाली झुकून कारवाई केली तरी न्यायालयात ती टिकणार नाही.
= हा निव्वळ आशावाद आहे.
3 May 2014 - 8:48 pm | श्रीगुरुजी
>>> प्रचाराचा हेतू सिद्ध झाल्यामुळे गुन्हा दाखल झाला.
कधी सिद्ध झाला?
>>> इतरांनी चूक केली म्हणून मोदींना सवलत देता येत नाही.
सवलतीचा प्रश्नच नाही. चूक केलीच नाही तर सवलत कशाला?
>आयोगाने दबावाखाली झुकून कारवाई केली तरी न्यायालयात ती टिकणार नाही.
= हा निव्वळ आशावाद आहे.
तुम्ही माझा प्रतिसाद नीट वाचलेला नाही. वाचला असल्यास तुम्हाला तो समजलेला नाही. न्याय हा ठोस निष्कर्षांवर दिला जातो. भाषण प्रदीर्घ होते की संक्षिप्त याचा निर्णय प्रदीर्घ व संक्षिप्त या दोन्हींची सुस्पष्ट व निसंदिग्ध व्याख्या असल्याशिवाय होऊ शकत नाही. २० मिनिटांचा पत्रकारांशी संवाद हा संक्षिप्त होता की प्रदीर्घ हे याच कारणामुळे न्यायालय ठरवू शकणार नाही. आणि जर पत्रकारांशी संवाद कायदेशीर परीघाच्या बाहेर असेल तर परीघाच्या बाहेर पक्षचिन्ह दाखविणे किंवा पत्रकारांशी संवाद करणे हा गुन्हा होऊच शकत नाही.
वकील असीम सरोदेंच्या माहितीनुसार, जर समजा मोदींनी कायद्याचे उल्लंघन केले असे सिद्ध झाले तरी त्यासाठी जास्तीत जास्त रू. २५० दंड होऊ शकतो. फक्त एकच अपवाद. जर निवडणुक आयोग पुरावे देऊन हे सिद्ध करू शकले की मोदींच्या कृतीमुळे मतदारांवर परीणाम झाला आहे तर न्यायालय वेगळा निर्णय देऊ शकते. सद्यपरिस्थितीत निवडणुक आयोग असे काहीही सिद्ध करू शकणार नाही.
3 May 2014 - 9:30 pm | विवेकपटाईत
अर्जुन युद्धास अपात्र ?
http://vivekpatait.blogspot.in/2014/05/blog-post_3.html
3 May 2014 - 10:04 pm | संजय क्षीरसागर
तो किती वेळ केला यावर गुन्हा अवलंबून नाही. निवडणूक चिन्ह हद्दीबाहेर दाखवलं (किंवा पत्रकारांसमोर भाषण बूथपासून लांब अंतरावर केलं ) अशी मखलाशी केली तरी `टेलिकास्ट' हा नव्या प्रकारचा गुन्हा आहे; त्याला अंतराचं बंधन नाही. मोदी दोषी आहेत किंवा कसं ते यावरनं ठरेल : "election matter" means any matter intended or calculated to influence or affect the result of an election.
6[126. Prohibition of public meetings during period of forty—eight hours ending with hour fixed for conclusion of poll.—
(1) No person shall—
(a)convene, hold or attend, join or address any public meeting or procession in connection with an election; or
(b) display to the public any election matter by means of cinematograph, television or other similar apparatus; or
(c) propagate any election matter to the public by holding, or by arranging the holding of, any musical concert or any theatrical performance or any other entertainment or amusement with a view to attracting the members of the public thereto, in any polling area during the period of forty-eight hours ending with the fixed for the conclusion of the poll for any election in the polling area.
(2) Any person who contravenes the provisions of sub-section (1) shall be punishable with imprisonment for a term which may extend to two years, or with fine, or with both.
(3) In this section, the expression "election matter" means any matter intended or calculated to influence or affect the result of an election.].
5 May 2014 - 1:08 pm | श्रीगुरुजी
मोदींचे कृत्य वरीलपैकी (१) अ, ब किंवा क, या तीनपैकी एकाही क्लॉजमध्ये येत नाही.
5 May 2014 - 7:41 pm | संजय क्षीरसागर
हे त्या दिव्य असीम सरोदेंचं (२५० रुपये दंडवाल्या) मत आहे का तुमचं? खरं तर निवडणूक आयोगनं FIR दाखल करण्यापूर्वी तुमचा (किंवा सरोदेंचा) सल्ला घ्यायला हवा होता!
5 May 2014 - 10:33 pm | श्रीगुरुजी
दुर्दैवाने तुम्हाला कायद्याची भाषा व त्याचा अर्थ समजत नाही. त्यामुळे तुम्हाला सगळं स्वतःचंच खरं वाटतं. वरील ३ पैकी कोणतेही क्लॉज वाचले तरी कोणाच्याही सहज लक्षात येईल की मोदींनी कोणत्याही क्लॉजचे उल्लंघन केलेले नाही. तुमच्या लक्षात आले नसेल तर एखाद्या अॅ किंवा बॅ ला विचारा. तो/ती नीट समजावून सांगेल.
मागच्याही प्रतिसादात तुम्ही "मोदींवर गुन्हा सिद्ध झाल्यामुळे" निवडणुक आयोगाने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे असे अत्यंत हास्यास्पद वाक्य लिहिले होते. मी "गुन्हा कधी सिद्ध झाला?" असे विचारल्यावर तुम्ही केजरीवालांच्या गंगाघाटावरील व राजघाटावरील मौनाप्रमाणे मौनात गेलात. आता तरी उत्तर द्या.
6 May 2014 - 10:33 am | मंदार दिलीप जोशी
गुरु़जी जाऊद्या. त्यांना नै समजणार. त्यासाठी प्रगल्भ राजकीय बुद्ध्यांक असावा लागतो.
5 May 2014 - 10:35 pm | श्रीगुरुजी
>>> >>> प्रचाराचा हेतू सिद्ध झाल्यामुळे गुन्हा दाखल झाला.
>>> कधी सिद्ध झाला?
या उत्तराची वाट पहात आहे.
6 May 2014 - 9:55 am | संजय क्षीरसागर
सेक्शन १२६ प्रमाणे मतदान संपण्यापूर्वी ४८ तास प्रचाराला बंदी आहे. गुन्हा झाल्यशिवाय (म्हणजे प्रचाराचा हेतू सिद्ध झाल्याशिवाय) निवडणूक आयोग FIR दाखल करायला सांगू शकत नाही इतकं तरी समजायला हवं. सकृत दर्शनी गुन्हा झाल्याशिवाय FIR दाखल करणं आयोगाच्या आंगलट येऊ शकलं असतं.
कलम १२६ (अ) आणि (ब) ला बूथपासून अंतराची मर्यादा लागू होत नाही, ती १२६ (क) ला आहे. कुणी तरी कुडबुड्या वकील २५० रुपये दंड होईल म्हणून सांगतो आणि ते आपण इथे प्रकाशित करतो.
हे तुम्हीच म्हटलंय आणि (नशीबानं) बरोबर आहे, त्यावर आयोगानं म्हटलंय :
पण मोदी इतके उद्दाम आहेत की ते आणखी दुसरा FIR दाखल करा म्हणतायंत. त्यांना बहुदा तुम्ही खाली म्हणतायं तसा भ्रम झालायं :
पण त्यांची सेल्फी, टीवी प्रक्षेपण आणि मतदान संपण्यापूर्वी घेतलेली पत्रकार परिषद हे सर्व पुरावे त्यांच्या विरोधात आहेत.
6 May 2014 - 12:19 pm | श्रीगुरुजी
>>> सेक्शन १२६ प्रमाणे मतदान संपण्यापूर्वी ४८ तास प्रचाराला बंदी आहे.
बरोबर आहे.
>>> गुन्हा झाल्यशिवाय (म्हणजे प्रचाराचा हेतू सिद्ध झाल्याशिवाय) निवडणूक आयोग FIR दाखल करायला सांगू शकत नाही इतकं तरी समजायला हवं.
असं काही नाही. निवडणुक आयोगाने यापूर्वी अनेकांवर अनेक वेळा एफआयआर दाखल केलेला होता व नंतर न्यायालयाने तो एफआयआर रद्द केल्याची अनेक उदाहरणे आहेत. (उदा. २००९ मध्ये वरूण गांधींच्या विरूद्ध दाखल केलेला एफआयआर). निवडणुक आयोगाच्या आजवरच्या इतिहासात अनेकवेळा अनेक जणांवर एफआयआर दाखल करून सुद्धा काहीही कारवाई ने केल्याची तसेच काहीही कारवाई न करता आल्याची असंख्य उदाहरणे आहेत. निवडणुक आयोगाने दाखल केलेले एफआयआर अनेक वेळा राजकीय दडपणामुळे दाखल केलेले असतात. त्यात काहीही दम नसतो. मोदींच्या बाबतीत असाच दबावाखाली एफआयआर दाखल करण्यात आलेला आहे व काही दिवसातच तो केराच्या टोपलीत जाणार आहे.
निव्वळ एफआयआर दाखल केला म्हणून तुमच्या सारख्या अज्ञानांना आनंदाचे भरते आले आहे. काही दिवसातच तुमचा हिरमोड होणार आहे.
>>> सकृत दर्शनी गुन्हा झाल्याशिवाय FIR दाखल करणं आयोगाच्या आंगलट येऊ शकलं असतं.
निवडणुक आयोगाने दाखल केलेले अनेक एफआयआर न्यायालयाने पूर्वी रद्द केले आहेत. परंतु ते कधीही आयोगाच्या अंगलट आलेलं नाही.
>>> कलम १२६ (अ) आणि (ब) ला बूथपासून अंतराची मर्यादा लागू होत नाही, ती १२६ (क) ला आहे. कुणी तरी कुडबुड्या वकील २५० रुपये दंड होईल म्हणून सांगतो आणि ते आपण इथे प्रकाशित करतो.
अॅडव्होकेट असीम सरोदे नामांकित वकील आहेत. दुर्दैवाने ते तुमच्या आकलनापलिकडचं आहे. त्यात तुमचा दोष नाही.
>>> The Election Commission had said on Wednesday that "it is evident from Modi's tone and tenor that he made a political speech. He intended, calculated to influence voting."
एखाद्या व्यक्तीच्या बोलण्याचा tone and tenor कसा आहे हे सब्जेक्टिव्ह मत आहे. प्रत्येक व्यक्तीनुसार टोन चे विश्लेषण बदलते. (उदा. केजरीवालांचा टोन त्यांच्या आंधळ्या भक्तांना प्रामाणिकपणाचा वाटतो. पण तटस्थ नागरिकांना तोच टोन ढोंगीपणाचा वाटतो.) त्यामुळे आयोगाच्या या मताला काडीमात्र किंमत नाही. त्यांनी राजकीय भाषण केले होते हे निखालस असत्य आहे. कारण पत्रकारांनी स्वत:हून विचारलेल्या प्रश्नांना ते उत्तर देत होते. भाषण करणे व न बोलविता स्वतःहून आलेल्या पत्रकारांना उत्तरे देणे यात जमीनअस्मानाचा फरक आहे. त्यांनी मतदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न केला या आयोगाच्या आरोपाला टँजिबल पुरावे असल्याशिवाय काडीमात्र महत्त्व नाही.
>>> पण मोदी इतके उद्दाम आहेत की ते आणखी दुसरा FIR दाखल करा म्हणतायंत. त्यांना बहुदा तुम्ही खाली म्हणतायं तसा भ्रम झालायं :
सद्यपरिस्थितीत निवडणुक आयोग असे काहीही सिद्ध करू शकणार नाही.
निवडणुक आयोग हा दात, नख्या, सुळे इ. नसलेला वाघ आहे हे सर्व जगाला माहित आहे तसेच मोदींनाही माहित आहे. सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली निवडणुक आयोग काम करतो हे देखील सर्वांना माहित आहे. त्यामुळेच मोदींनी आव्हान दिले आहे.
>>> पण त्यांची सेल्फी, टीवी प्रक्षेपण आणि मतदान संपण्यापूर्वी घेतलेली पत्रकार परिषद हे सर्व पुरावे त्यांच्या विरोधात आहेत.
स्वतःची सेल्फी काढणे हा जगातल्या कोणत्याही न्यायालयात गुन्हा समजला जात नाही. त्यांचा सेल्फी काढतानाचा फोटो माध्यमांनी घेऊन माध्यमांनी प्रदर्शित केला होता. मोदींनी स्वतःचा फोटो प्रदर्शित केलेला नाही. त्यामुळे मोदी यात दोषी नाहीत.
टीव्ही प्रक्षेपण मोदींनी केलेले नाही. ते माध्यमांनी केलेले आहे. त्यामुळे मोदी यात दोषी नाहीत.
मोदी फक्त पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देत होते. ती पत्रकार परीषद नव्हती. मोदींनी पत्रकार परिषद बोलाविलेली किंवा घेतलीच नव्हती. पत्रकार स्वत:हून त्यांच्याकडे गेले व त्यांना प्रश्न विचारून त्याचे प्रक्षेपण दाखविले गेले. जर यात कोणाचा दोष असेल तर तो माध्यमांचा व निवडणुक केंद्राजवळ माध्यमांना उपस्थित रहायला परवानगी देणार्या निवडणुक आयोगाचा आहे. मोदींचा यात दोष नाही.
दुर्दैवाने तुम्हाला यातले बारकावे व खाचाखोचा समजत नाहीत. तुम्हाला हे समजत नाही यात तुमचा दोष नाही.
असो. मोदींवर कारवाई होऊन शिक्षा होईल या अज्ञानाच्या आनंदात अजून काही काळ रहा.
6 May 2014 - 6:34 pm | गब्रिएल
दुर्दैवाने तुम्हाला यातले बारकावे व खाचाखोचा समजत नाहीत. तुम्हाला हे समजत नाही यात तुमचा दोष नाही.
आत्ता !!! काय गुरुजी तुमीबी. यवढं म्हाय्त हाय आनी कोनितरी म्हनलयं ना की "भूतकालात्ली कुर्तीवरुन, म्होर्ल्या कालातलि कुर्ती वळकता येती". आता येखांद्या मान्साला 'मि चुक्लो' म्हनाय्ला लईच शरम वाटती. अस्तो येकायेकाचा सोबाव. दग्डाच्या भिंतीला वलसा घालून जावं. त्येच्यावं डोस्कं आपटून काय फाय्दा? आ?
3 May 2014 - 9:26 pm | विवेकपटाईत
मोदी मूर्ख नाहीत १०० गजा पेक्षा दूर होते. बाकी निवडणूक आयोगाच्या पर्यवेक्षकांची रिपोर्ट पाहोल्या विना अत्यंत दबाव खालील FIR दर्ज करण्याच्या आदेश बहुतेक दिला गेला असावा. असाच दबाव प्रसार भारती वर पडला होता त्यांच्या अधिकार्याने कबूल नामा ही दिला. इच्छा नसताना ही आता मोदींचा ती मुलाकात आता कित्येक वाहिनीन वर कितीदा तरी पहावी लागेल. करायला गेलो आणि झाले एक अशीच परिस्थिती सूचना मंत्रींच्या उतावळे पण मुळे झाली.
6 May 2014 - 10:29 am | मंदार दिलीप जोशी
पोलीसांनी निर्वाळा दिला आहे की मतदान केंद्रापासून २०० मीटर पलिकडच्या भागात हा प्रकार घडल्याने तो गुन्हा ठरत नाही. बसा बोंबलत :D
6 May 2014 - 10:44 am | संजय क्षीरसागर
कलम १२६ (अ) आणि (ब) ला अंतराची मर्यादा नाही. प्रचार झाला की नाही हा मुद्दा आहे. आधी नीट वाचता यायला हवं तर पुढे अर्थ कळण्याची शक्यता असते.
7 May 2014 - 3:42 pm | प्रसाद१९७१
दिलगीरी व्यक्त केली की निवडणुक आयोग मोठ्या मनानी सर्वांना माफ करतो.
ह्या पेक्षा दोनदा मतदान करा हा सल्ला कितीतरी घातक होता. पण काही कारवाई झाली नाही.
2 May 2014 - 2:19 pm | रमेश आठवले
असा मुलभूत प्रश्न मला सुनील अहिरराव यांना विचारावासा वाटतो.
भारताचे निवडणूक पंच मन्डळ निपक्ष असल्याचे सिद्ध झालेले आहे . त्यांच्या देखरेखेखाली झालेल्या सर्व लोकसभेच्या व विधानसभेच्या निवडणुकीत गुजरातमध्ये मोदींनी विजय मिळवला आहे. ज्यांचा लोकशाहीवर विश्वास आहे अशा लोकांनी या जनमत कौलाचा आदर करावयास हवा. हिटलर अथवा मुसोलिनी असे मोदींना म्हणणार्या लोकांनी हे दोघे डिक्टेटर वारंवार निवडणुकीच्या अग्निदिव्यातून गेले नाहीत हे लक्षात घ्यावे.
गेली दहा वर्षे केंद्र सरकार मोदींच्या मागे हात धुवून लागले आहे. एका मुख्यमंत्र्याची, खास संशोधक पथकाच्या (SIT ) अधिकार्यांनी, ११ तास उलट तपासणी केल्याचे दुसरे कुठले उदाहरण नाही. या तपासा नंतर सर्वोच्च न्यायालाने त्याना निर्दोष ठरवले. इतका तावून सुलाखुन निघालेला नेता दुसरा नाही.
हा माणूस स्व्च्छ राजवट करणारा आणि निर्लिप्त आहे. असा कर्तृत्ववान माणूस या देशाला पन्तप्रधान म्हणून मिळाला तर देशाचे कल्याणच होईल. काही पूर्वग्रह दुषित किंवा आदर्शवादी मंडळी त्यांच्यावर टीका करत राहतील. पण हा ही एका निकोप लोकशाहीचाच भाग आहे.
2 May 2014 - 2:34 pm | विनोद१८
जाऊद्या हो, नाही समजायचे त्या 'तथाकथीत काही बधीरबुद्धी, पूर्वग्रह दुषित किंवा आदर्शवादी मंडळीना तत्सम विचारजंताना'. त्यांच्या बुद्धिपलीकडले आहे ते. राज्यकरत्यानी फेकलेल्या उष्टया-खरकट्या तुकड्यांवर जगणार्यांकडुन यापेक्षा वेगळी अपेक्शा कशी करता येइल.
2 May 2014 - 2:20 pm | विनोद१८
दिवास्वप्ने फार पाहु नयेत माणसाने...कारण ती कधीही प्रत्यक्षात उतरत नाहीत. हा, जर केवळ स्वताचे आत्मसमाधानच करायचे असेल तर ती जरुर पहावीत.
3 May 2014 - 10:12 am | इरसाल
व्हाला भाइ अने बेन,
पोतानु आ विचार थये शे के मोदी उप्पर, कोरटमा पोलीस केस नाखवी जोईये. आ भाइ "चायवाला चायवाला" कहिने म्हारी अने बीजी म्हारे दस-अग्यार साथिदारोंनी चायनी लॉरी बंद करवी नाखी.
3 May 2014 - 12:06 pm | मदनबाण
मोदींची लोकप्रियता... ;)
9 May 2014 - 4:44 am | बाळकराम
याचा विचार करतोय बराच वेळ! कुणा आफ्रिकन लोकांच्या तोंडी अब की बार मोदी सरकार असे शब्द घुसवून मोदींचा प्रचार करायची केविलवाणी वेळ यांच्यावर का बरे आली असेल? नाही म्हणजे, भारतात लोक नाही का सापडले ह्यांना? असो, आपण आपले मनोरंजन करुन घ्यायचे मात्र! मदणबाण, व्हिडो भारी बरंका? अजून असे काही श्वेतवर्णीय वा कृष्णवर्णीय सुंदरींना घेऊन केलेले प्रचारी व्हिडो असतील तर जरूर टाका. तेवढाच नेत्रसंतोष ;)
12 May 2014 - 12:35 pm | मदनबाण
कुणा आफ्रिकन लोकांच्या तोंडी अब की बार मोदी सरकार असे शब्द घुसवून मोदींचा प्रचार करायची केविलवाणी वेळ यांच्यावर का बरे आली असेल? नाही म्हणजे, भारतात लोक नाही का सापडले ह्यांना?
हॅहॅहॅ... काय आहे ना बाळ्या १० वर्ष राज्य करुन सुद्धा कॉग्रेसला देशाचा विकास साधता आला नाही ! इतके वर्ष राज्य करुन सुद्धा गरिबीच्या नावावर मते मागतात तर कधी गरिबीची रेखा शोधुन काढतात्. शिवाय यांच्या आणि यांच्या मित्र पक्षांच्या मंडळींनी भ्रष्टाराचे सर्व विक्रम मोडीत काढण्याचा चंग बांधला आहे.आपल्या देशाच्या प्रंतप्रधानपदी इतकी दुबळी व्यक्ती इतके वर्ष आहे की त्यांची सार्या जगानेच टिंगल केली. आता मोदी शिवाय इतर सशक्त पर्यात दिसत नसल्याने निदान आफ्रिकन लोकांच्या मुखातुन आलेला संदेश तरी आपल्या देशातील लोकांच्या डोक्यात शिरेल असा कोणा हिंदूस्थानी माणसाच्या डोक्यात विचार आला असेल... तसेही साउथ आफ्रिका आणि आपल्या देशाचे गांधींजींमुळे विशेष नाते आहेच ना ?
अजून असे काही श्वेतवर्णीय वा कृष्णवर्णीय सुंदरींना घेऊन केलेले प्रचारी व्हिडो असतील तर जरूर टाका. तेवढाच नेत्रसंतोष
बाळ्या तुमची आवड कळली बरं का... *LOL*
जाता जाता :- मोदींची खरी अग्निपरिक्षा तर आत्ता कुठे सुरु झाली आहे, अबकी बार मोदी सरकारचा प्रचार जरीही मोठ्या प्रमाणात झाला असला तरी सुद्धा मोंदींसाठी हा रस्ता सोपा नाही.
12 May 2014 - 1:52 pm | प्यारे१
>>> मोदींची खरी अग्निपरिक्षा तर आत्ता कुठे सुरु झाली आहे
तुमच्याकडं 'निकाल' आधीच लागले काय? ;)
12 May 2014 - 1:56 pm | मदनबाण
हा.हा.हा... तसे नाही आपल्या देशात पोटशूळ हा विकार जरा जास्तच पसरलेला आढळतो ना... म्हणुन. ;)
16 May 2014 - 2:10 am | बाळकराम
"बाळ्या" का? वा वा चान, चान! शनिवारवाड्यासमोरच्या पुलावर कानकोरणी घेऊन बसतोस वाटतं तू, मदनबाण? नाही, म्हणजे संस्कार, अदब इ. चा वारापण तुला लागलेला दिसत नाही, म्हणून म्हटलं.
3 May 2014 - 8:07 pm | विजुभाऊ
या असल्या व्हीडिओ क्लिप्स ने काय सिद्ध होते.
अबकी बार भाजपा सरकार असे कधीच का म्हणत नाहीत हे भाजप वाले. त्यान्ना इतकी खात्री आहे की पक्षाचे नाव वापरले तर ते कधीच निवडून येणार नाहीत याची?
6 May 2014 - 12:38 am | विकास
"इंदीराजी की अंतिम इच्छा बुंद बुंद से देश की रक्षा" हे आठवले... ठाण्याला तर कांती कोळी काँग्रेसचे खासदार म्हणून निवडून आल्यावर नंतर पेपरात दुसर्या दिवशी या अर्थाचे वाचल्याचे आठवले: वरती स्वर्गीय इंदीराजींचे पोस्टर आणि ही घोषणा होती आणि खाली अक्षरशः देशी दारूचा पिंप होता ज्यातून बुंद बुंद गळत होते... *drinks*
7 May 2014 - 11:39 am | मदनबाण
या असल्या व्हीडिओ क्लिप्स ने काय सिद्ध होते.
अबकी बार भाजपा सरकार असे कधीच का म्हणत नाहीत हे भाजप वाले. त्यान्ना इतकी खात्री आहे की पक्षाचे नाव वापरले तर ते कधीच निवडून येणार नाहीत याची?
काय इजुभाउ ? एक सशक्त विरोधी पक्ष म्हणुन गेल्या १० वर्षात भाजपा दिसला ? नाही ना ? मग नमो नमो माळ ओढण्या पलिकडे त्यांच्या हातात काय उरले ? अजुन समजवुन घ्यायचे असेल किंवा वेगळ्या भाषेत उत्तर हवे असेल तर अरनब गोस्वामीनी जी राज ठाकरेंची मुलाखत घेतली आहे ती पहा... राज ठाकरेंनी या प्रश्नावर "व्यवस्थित" उत्तर दिलय बघा.
बाकी मी कोणत्याच पक्षाचा समर्थक नाही, जो देशाची आणि देशातल्या लोकांच्या उन्नतीचा प्रयत्न करेल त्याला माझे समर्थन नेहमीच असेल, मग तो कोणत्याही पक्षाचा असो.
तसही प्रतंप्रधानपदी बुजगावण असण्यापे़क्षा मोदी बरे असा इचार वरच्या क्लीप बनवणार्याच्या डोक्यात तर नसावा ना ?
3 May 2014 - 9:19 pm | विवेकपटाईत
वाईट मानू, कुठल्या ही विषयावर लिहिताना लेखकाने वास्तविकता काय होती ते जाणले पाहिजे. केवळ खोट्या प्रचाराला बळी पडून लेख लिहिला नाही पाहिजे.
१. गुजरात दंगा ISI आणि स्थानीय त्यांच्या स्थानीय हितचिंतकांनी घडवून आणला होता. प्रतिक्रिया स्वरूप जवळपास ८५० मुस्लीम आणि २५० हिंदू ही मारल्या गेले होते.
२. मोदी भारताचे एकमेव मुख्यमंत्री होते ज्यांनी दंगेखोरांवर सक्तीने कार्यवाही केली. ११६ च्या वर दंगेखोर मारल्या गेले त्यात ९०% हिंदू होते. निश्चित हे दंगेखोर भा ज प वाले नसतील अन्यथा मोदी पुढची निवडणूक जिंकले नसते.
३. मोदींच्या सक्ती मुळे गुजरात मध्ये शांतता पसरली आणि त्या मुळे विकास ही झाला.
खर म्हणाल तर सेकुलर म्हणविणारे पक्ष अल्प्संख्कांचे खरे शत्रू आहेत म्हंटले तर
४. दिल्लीत ३५०० वर शीख मारल्या गेले पण एक ही दंगेखोर पोलिसांनी मारला नाही.
५. आत्ताच झालेल्या मुझफ्फरनगर भागातल्या दंगलीत ही पोलिसांनी एक ही दंगेखोराला मारले नाही.
६.महाराष्ट्रात ही १९९०-२००० काळात दंगे भडकले होते. पोलिसांनी किती दंगेखोरांना कंठस्नान घातले. (माहित काढा, सत्य कळेलच)
७. अल्पसंख्यकांच्या मनात भीती उत्पन्न करून त्यांचे वोट घेणे म्हणजे सेकुलर वाद. त्या साठी त्यांना मागास ठेवणे ही रणनीती.
6 May 2014 - 3:28 pm | संजय क्षीरसागर
हे गुजराथ नाही. थोडक्यात, तुमच्या या वक्तव्याला (तुम्ही कितीही प्रदीर्घ प्रतिसाद दिला असला तरी) कोणताही आधार नाही. बाकीची निरर्थक वाचाळता केवळ मोदीप्रेमा पोटी आहे. कुणी काय केलं होतं आणि त्याचं तेंव्हा काय झालं याचा `मोदींनी प्रचार केला (किंवा नाही)' याचाशी काहीही संबंध नाही.
असो, आपल्या विद्वत्तापूर्ण अनुभवानं जर :
तर मग लोकशाहीला अर्थच नाही आणि निवडणूकांचा फार्स तरी कशापायी? मोदींसारख्या निब्बर माणसाला डायरेक्ट `तहहयात पंतप्रधान' घोषित करा की झालं! मोदींनी देखिल दुसरा FIR दाखल करा म्हणून फुशारकी मारलेली आहेच त्यावरनं त्यांची दंडेली दिसतेच. मग उगीच बचाव कशाला करता? एकदा दणका बसला की कळेलच.
6 May 2014 - 6:55 pm | विकास
हे गुजराथ नाही.
अगदी अगदी! ये तो दिल्ली है! निवडणू़क आयोगाचे मुख्य आयुक्त म्हणजे काही साधे प्रकरण नाही! ते २००९ पर्यंत (म्हणजे कोल गेट च्या सुमारास) उर्जा मंत्रालयाचे प्रमुख सचीव होते. नंतर ते निवडणूक आयुक्त आणि मग मुख्य आयुक्त झाले. जेंव्हा कोल गेट प्रकरण बाहेर आले तेंव्हा सि बी आय ने त्यांची चौकशी करण्याची मागणी पंतप्रधान कार्यालयाला केली. पण आता ते मुख्यायुक्त असल्याने घटनासिद्ध पदी आहेत म्हणून त्यांची चौकशी करण्याची परवानगी नाकारण्यात आली.
दुवा: "Coalgate: Centre won't let CBI quiz PM's adviser, ECs"
6 May 2014 - 7:23 pm | प्यारे१
>>> सि बी आय ने त्यांची चौकशी करण्याची मागणी पंतप्रधान कार्यालयाला केली.
'इंटर्नल' ऑडिट काय? ;)
6 May 2014 - 8:32 pm | श्रीगुरुजी
>>> गुजराथ नाही. थोडक्यात, तुमच्या या वक्तव्याला (तुम्ही कितीही प्रदीर्घ प्रतिसाद दिला असला तरी) कोणताही आधार नाही. बाकीची निरर्थक वाचाळता केवळ मोदीप्रेमा पोटी आहे. कुणी काय केलं होतं आणि त्याचं तेंव्हा काय झालं याचा `मोदींनी प्रचार केला (किंवा नाही)' याचाशी काहीही संबंध नाही.
तुमची निराधार वाचाळता निव्वळ मोदीद्वेषापोटी आहे. न्याय हा व्यक्तिसापेक्ष किंवा एखाद्या व्यक्तीच्या पर्सेप्शन वर दिला जात नसून वस्तुनिष्ठ पुराव्यांवर दिला जातो. मोदींनी दंगल भडकावली असे कितीही जणांचे पर्सेप्शन असले तरी प्रत्यक्षात न्यायालयात या आरोपाच्या समर्थनार्थ आजतगायत तसूभरही पुरावा मिळालेला नाही. युपीए सरकार, अनेक स्वयंघोषित एनजीओ व नामवंत निधर्मांध गेली १२ वर्षे मोदींविरूध्द बेंबीच्या देठापासून ओरडत आहेत. पण न्यायालयात त्यांचे आरोप केव्हाच खोटे ठरले आहेत. निवडणुक प्रचारामध्ये मोदींवर केलेल्या आरोपांचे अगदी तसेच होणार आहे. दुर्दैवाने तुम्हाला त्यातल्या खाचाखोचा समजत नाहीत. असो.
>>> असो, आपल्या विद्वत्तापूर्ण अनुभवानं जर :
`निवडणुक आयोग हा दात, नख्या, सुळे इ. नसलेला वाघ आहे हे सर्व जगाला माहित आहे तसेच मोदींनाही माहित आहे' तर मग लोकशाहीला अर्थच नाही आणि निवडणूकांचा फार्स तरी कशापायी? मोदींसारख्या निब्बर माणसाला डायरेक्ट `तहहयात पंतप्रधान' घोषित करा की झालं! मोदींनी देखिल दुसरा FIR दाखल करा म्हणून फुशारकी मारलेली आहेच त्यावरनं त्यांची दंडेली दिसतेच. मग उगीच बचाव कशाला करता? एकदा दणका बसला की कळेलच.
अज्ञानात सुखी रहा.
6 May 2014 - 10:06 pm | संजय क्षीरसागर
तुम्ही म्हणता ते खरंय :
करण थापरच्या इंटरव्यूत मोदींना बोलायला शब्द सापडत नाहीत, त्यांचा कंठ अवरुद्ध होतो, ते पाणी मागतात आणि मग सरळ स्टुडिओतून उठून जातात याचा अर्थ ते स्वतःला अपराधी समजतात, त्यांचा विवेक त्यांना शर्मिंदा करतो. खाचाखोचा न समजणारा माणूस असा उघड अर्थ काढतो. खाचाखोचावाल्यांना कोर्टाची शहानिशा लागते.
इथे मोदी सरळ प्रचार करतायंत पण खाचाखोचावाले म्हणतायंत `प्रेसवाले आपणहून आलेत'. म्हणजे बलात्कार करुन वर `तीनंच मला भरीला घातलं' म्हणायच. (हो, आणि वर, फार झालं तर २५० रुपये दंड करा! )
फैजाबादमधे सरळ राममंदिराचा प्लॅन आणि रामाची छवि असलेल्या भव्य बॅकड्रॉपसमोर उभं राहून मोदी खुल्ला जातीवाद करतायंत पण खाचाखोचावाले म्हणणार, ते समुदायाकडे पाहतायंत. मागचा बॅकड्रॉप कार्यकर्त्यांनी तयार केला आहे. मोदी काही खिळे मारायला गेले नव्हते.
धन्य तो युक्तिवाद आणि धन्य ती वैचारिकता.
आता मोदींचा एकछत्री अंमल चालू झाला की निवडणूक आयोगाची वाट लागेलच, मग मशिन्स फक्त घरी आणायची आणि दिवसभर कमळाचं बटण दाबून संध्याकाळी परत करायची! म्हणजे पुन्हा प्रचार केला की नाही हा वादच नको.
6 May 2014 - 11:12 pm | विकास
आता मोदींचा एकछत्री अंमल चालू झाला की निवडणूक आयोगाची वाट लागेलच
शिल्लक आहे?
7 May 2014 - 11:41 am | श्रीगुरुजी
>>> करण थापरच्या इंटरव्यूत मोदींना बोलायला शब्द सापडत नाहीत, त्यांचा कंठ अवरुद्ध होतो, ते पाणी मागतात आणि मग सरळ स्टुडिओतून उठून जातात
दुर्दैवाने तुमच्यासारख्या अल्पमती असलेल्यांना त्याचा अर्थ समजतच नाही. ज्याप्रमाणे पवारांच्या प्रत्येक वाक्यात सूचक व गूढ अर्थ भरलेला असतो, त्याप्रमाणे मोदींची प्रत्येक कृती विचारपूर्वक केलेली असते. मोदी मुद्दाम ठरवून त्या मुलाखतीतून का निघून गेले याचे विश्लेषण अनेकांनी केले आहे. जरा गुगलून बघा.
>>> याचा अर्थ ते स्वतःला अपराधी समजतात, त्यांचा विवेक त्यांना शर्मिंदा करतो. खाचाखोचा न समजणारा माणूस असा उघड अर्थ काढतो. खाचाखोचावाल्यांना कोर्टाची शहानिशा लागते.
तुम्हाला काहीच समजत नाही हे पुन्हा एकदा सिद्ध केलंत. मोदींनी आजतगायत स्वतःला कधीही अपराधी मानलेलं नाही, कारण ते दोषी नव्हतेच. अलिकडच्या काळात त्यांनी अनेक मुलाखती दिल्या. प्रत्येक मुलाखतीत त्यांनी हेच सांगितलं की मी माफी वगैरे मागण्याचे नाटक करणार नाही. माझी चौकशी करा व मी दोषी असल्यास फाशी द्या. "याचा अर्थ ते स्वतःला अपराधी समजतात, त्यांचा विवेक त्यांना शर्मिंदा करतो." ही वाक्ये वाचूनच हसायला आलं आणि तुमच्या अज्ञानाची पुन्हा एकदा कीव आली.
>>> इथे मोदी सरळ प्रचार करतायंत पण खाचाखोचावाले म्हणतायंत `प्रेसवाले आपणहून आलेत'.
मग प्रेसवाल्यांना काय मोदींनी आमंत्रण दिलं होतं का? तुम्हाला काहीच कसं समजत नाही हो?
>>> म्हणजे बलात्कार करुन वर `तीनंच मला भरीला घातलं' म्हणायच. (हो, आणि वर, फार झालं तर २५० रुपये दंड करा! )
प्रेसवाल्यांनी विचारलेल्या प्रश्नांना दिलेल्या उत्तराची बलात्काराशी तुलना करणे म्हणजे जरा अतिच होत नाही का? म्हणजे "मी गरीब आहे. माझ्याकडे प्रचाराला पैसे नाहीत. माझ्या खिशात फक्त ५०० रूपये आहेत." असं मानभावीपणे सांगून दुसर्याच दिवशी अर्ज भरताना २.५ कोटींची मालमत्ता जाहीर केल्यासारखं आहे.
>>>> फैजाबादमधे सरळ राममंदिराचा प्लॅन आणि रामाची छवि असलेल्या भव्य बॅकड्रॉपसमोर उभं राहून मोदी खुल्ला जातीवाद करतायंत पण खाचाखोचावाले म्हणणार, ते समुदायाकडे पाहतायंत.
भारतात प्रभू श्रीरामांचे चित्र लावणे हा कधीपासून गुन्हा झाला? आणि मशिदीत जाऊन जातीय दंगलीत सहभाग असलेल्या मुल्लामौलवींचे पाय धरणे, प्रचार करताना दर्ग्यावर चादर चढविणे, टोपीवर उर्दूवर काहीतरी लिहिणे, नमाजाची बांग ऐकू आल्यावर राष्ट्रगीतासारखी मानवंदना देणे हा काय सेक्युलर प्रचार आहे का?
>>> मागचा बॅकड्रॉप कार्यकर्त्यांनी तयार केला आहे. मोदी काही खिळे मारायला गेले नव्हते.
काय चुकीचं आहे यात? मोदी काय स्वतःच्या सभेचं स्टेज स्वतः खपून तयार करतात का?
>>> धन्य तो युक्तिवाद आणि धन्य ती वैचारिकता.
धन्य ते तुमचे अज्ञान!
>>> आता मोदींचा एकछत्री अंमल चालू झाला की निवडणूक आयोगाची वाट लागेलच, मग मशिन्स फक्त घरी आणायची आणि दिवसभर कमळाचं बटण दाबून संध्याकाळी परत करायची! म्हणजे पुन्हा प्रचार केला की नाही हा वादच नको.
काँग्रेसने जेव्हा आपले पित्ते आयोगात घुसडले, तेव्हाच निवडणुक आयोगाची वाट लागली आहे. आता मोदी नवीन वाट काय लावणार?
(जमल्यास) लवकर बरे व्हा आणि (जमल्यास) मोठे पण व्हा!
7 May 2014 - 12:46 pm | संजय क्षीरसागर
इतक्या अंधभक्तीला आता उत्तरच नाही. ज्याला प्रत्येक गोष्टीला विश्लेषक लागतो त्यानं स्वतःची बुद्धी वापरायची नाही हे ठरवलेलंच असतं.
फासावर लटकवा ही भाषा फक्त व्यासपीठावरुन बोलायची तर्हा आहे हे अज्ञानी जनतेला कळेल तो सुदीन!
त्यात पुन्हा, प्रेसवाले आम्ही बोलावले नव्हते, आम्ही फक्त भाषण ठोकलं, तस्मात प्रचार कसला? हा तर थोर युक्तीवाद आहे.
रामाचा फोटो लावणं हा गुन्हा होतो की जातीनिर्देशकता हे देखिल समजण्याची क्षमता नसेल तर काय बोलणार? मोदी स्टेज तयार करत नाहीत पण किमान ज्या स्टेजवरुन आपण बोलतोयं त्याच्या मागे बॅकड्रॉप काय आहे हे कळत नसेल (नियोजित राममंदिराची छवि!) तर पुरता अंधार आहे.
शिवाय भाषणात पदोपदी रामनाम घेऊन लांगुलचालन केलेलं ऐकू आलं नसेल तर पारच बधिरता आली आहे.
असो, काँग्रेस आणि बिजेपी एकाच माळेचे मणी आहेत हे विचारसरणीवरुन स्वच्छ दिसतंय. प्रत्येकाला बुद्धी असते पण वापरायची नाही असं ठरवणं ही वैयक्तिक आवड असू शकते.
7 May 2014 - 2:42 pm | संजय क्षीरसागर
शाब्बास! पवार हे आपले आदर्श आहेत म्हटल्यावर मोदी असणारच यात नवल नाही. ज्याप्रमाणे पवारांनी सारी हयात निव्वळ हवा बघून पाठ फिरवण्यात आणि काहीही करुन खुर्ची जपण्यात घालवली तसेच मोदी ऐनवेळी कुणालाही धोबीपछाड मारतात आणि सत्तेसाठी काहीही करु शकतात हे साम्य दाखवून दिल्याबद्दल अभिनंदन!
7 May 2014 - 8:37 pm | श्रीगुरुजी
>>>> शाब्बास! पवार हे आपले आदर्श आहेत म्हटल्यावर मोदी असणारच यात नवल नाही.
धन्य आहे तुमच्या अज्ञानाची!
>>> ज्याप्रमाणे पवारांनी सारी हयात निव्वळ हवा बघून पाठ फिरवण्यात आणि काहीही करुन खुर्ची जपण्यात घालवली तसेच मोदी ऐनवेळी कुणालाही धोबीपछाड मारतात आणि सत्तेसाठी काहीही करु शकतात हे साम्य दाखवून दिल्याबद्दल अभिनंदन!
मोदी आणि पवार हे दोन परस्परविरोधी ध्रुव आहेत. त्यांची एकमेकांशी तुलना होऊच शकत नाही. दुर्दैवाने तुम्हाला हे समजतच नाही. यात तुमचा दोष नाही. (जमल्यास) लवकर मोठे व्हा आणि (जमल्यास) लवकर बरे व्हा.
7 May 2014 - 3:07 pm | अनुप ढेरे
रामाचा आणि जातीचा काय संबंध? की रामाचे भक्ती एकाच जातीतले लोक करतात?
7 May 2014 - 8:29 pm | श्रीगुरुजी
>>> इतक्या अंधभक्तीला आता उत्तरच नाही.
उत्तर नाही म्हणताना मोठा पण निरर्थक प्रतिसाद लिहून गेलात.
>>> ज्याला प्रत्येक गोष्टीला विश्लेषक लागतो त्यानं स्वतःची बुद्धी वापरायची नाही हे ठरवलेलंच असतं.
कोणाला विश्लेषक लागतो? मोदींना? काहीतरीच काय? उलट मोदींच्या प्रत्येक कृतीचे विश्लेषण विचारवंत (!) भिंग लावून करत असतात. मराठी किंवा हिंदी बातम्यांच्या वाहिन्या बघा म्हणजे समजेल.
>>> फासावर लटकवा ही भाषा फक्त व्यासपीठावरुन बोलायची तर्हा आहे हे अज्ञानी जनतेला कळेल तो सुदीन!
जो माणूस संपूर्ण निर्दोष असतो तोच हे आव्हान देऊ शकतो. ज्या व्यक्तीविरूद्ध सर्व यंत्रणा व माध्यमे १२ वर्षॅ वापरून सुद्धा कणभरही दोष सापडला नाही तीच व्यक्ती असे आव्हान देऊ शकते.
>>> त्यात पुन्हा, प्रेसवाले आम्ही बोलावले नव्हते, आम्ही फक्त भाषण ठोकलं, तस्मात प्रचार कसला? हा तर थोर युक्तीवाद आहे.
अहो, खरंच आहे ते. प्रेसवाले तिथे मोदींच्या मागोमाग स्वतःहून गेले होते. केजरीवाल नदीवर टॉवेल गुंडाळून अंघोळीला जाताना, सर्वांच्या देखत आपल्या थोबाडीत मारायला सांगितलेल्या स्वतःच्याच पक्षाच्या व्यक्तीला भेटायला जाताना प्रेसवाले बरोबर घेऊन जातात. मोदींना असली नौटंकी करण्याची कधीही गरज भासलेली नाही.
>>> रामाचा फोटो लावणं हा गुन्हा होतो की जातीनिर्देशकता हे देखिल समजण्याची क्षमता नसेल तर काय बोलणार?
रामाचा फोटो लावणे ही जातीनिर्देशकता? धन्य आहे तुमची!
>>> मोदी स्टेज तयार करत नाहीत पण किमान ज्या स्टेजवरुन आपण बोलतोयं त्याच्या मागे बॅकड्रॉप काय आहे हे कळत नसेल (नियोजित राममंदिराची छवि!) तर पुरता अंधार आहे.
छबि स्टेजवर लावणे हे घटनेच्या कोणत्या कलमानुसार गुन्हा ठरतो?
>>> शिवाय भाषणात पदोपदी रामनाम घेऊन लांगुलचालन केलेलं ऐकू आलं नसेल तर पारच बधिरता आली आहे.
रामनाम घेणे हे घटनेच्या कोणत्या कलमानुसार गुन्हा ठरतो?
>>> असो, काँग्रेस आणि बिजेपी एकाच माळेचे मणी आहेत हे विचारसरणीवरुन स्वच्छ दिसतंय.
नाही. आप व काँग्रेस एकाचे माळेचे मणी आहेत. म्हणून तर त्यांचं साटंलोटं आहे. भाजप पूर्ण वेगळा आहे.
>>> प्रत्येकाला बुद्धी असते पण वापरायची नाही असं ठरवणं ही वैयक्तिक आवड असू शकते.
तुम्हाला बुद्धीच नसल्याने वापरायचा किंवा न वापरायचा प्रश्नच उद्भवत नाही.
7 May 2014 - 8:55 pm | संजय क्षीरसागर
तस्मात, थांबतो.
7 May 2014 - 9:00 pm | श्रीगुरुजी
पडलो तरी नाक वर!
7 May 2014 - 9:09 pm | संजय क्षीरसागर
केवळ तुम्हीच उतरु शकता. त्या लेवलला जाऊन वाद घालण्यात अर्थ नाही. खरं तर अशा माणसाशी चर्चा करणं कालापव्यय असतो. तेव्हा रहा भ्रमात.
8 May 2014 - 5:09 pm | पिलीयन रायडर
आँ?????????
रुणुझुणूची सिरीज गदागदा हलवली तर पन्नास एक प्रतिसाद सहज मिळतील तुमचे.. लोकांची कुवत.. अक्कल..वगैरे वगैरे काढणारे..
उदाहरणादाखलः-
http://www.misalpav.com/comment/502272#comment-502272
ह्यात तर तुम्ही फार त्या माणसाच्या कामाला "निम्न्स्तरावरील काम" वगैरे म्हणुन मो़कळे झालात..!!
8 May 2014 - 5:57 pm | बॅटमॅन
तेवढी अक्कल, कुवत अन एकूणच ग्रे म्याटर असतं तर मिपावर जिलब्या पाडणं सोडून अन्य कामंही करता आली असती, पण काये ना, वेळ अन पैसा भ्रम आहे म्हटलं तरी ३१ जुलैच्या कामांचा दट्ट्या लागायचा तो लागलाच. सबब काय ते समजा ;)
8 May 2014 - 6:02 pm | पिलीयन रायडर
=))
8 May 2014 - 6:42 pm | प्यारे१
जाऊ दे गं....
त्या प्रतिसादांसाठी कशाला परत रुणुझुणू ? ;)
8 May 2014 - 8:22 pm | श्रीगुरुजी
>>> रुणुझुणूची सिरीज गदागदा हलवली तर पन्नास एक प्रतिसाद सहज मिळतील तुमचे.. लोकांची कुवत.. अक्कल..वगैरे वगैरे काढणारे..
यांचं म्हणजे "मी नाही बाई त्यातली, ..." असं असतं.
8 May 2014 - 8:20 pm | श्रीगुरुजी
>>> केवळ तुम्हीच उतरु शकता.
तुमचा नम्र स्वभाव आवडला.
>>> त्या लेवलला जाऊन वाद घालण्यात अर्थ नाही. खरं तर अशा माणसाशी चर्चा करणं कालापव्यय असतो.
मग कशाला इतका वेळ कालापव्यय केलात?
>>> तेव्हा रहा भ्रमात.
भ्रमात तुम्ही आहात. मी नव्हे. वेगवेगळ्या धाग्यांवर तुमच्या भ्रमाचा भोपळा अनेकांनी फोडलेला आहे. तुमच्यासारखी मंडळी कायमच भ्रमात असतात.
बादवे, याच्या आधीच्या प्रतिसादात "तस्मात थांबतो" असे लिहिले होते. पण न थांबता पुन्हा एकदा लिहिण्याची सुरसुरी आलेली दिसत आहे.
9 May 2014 - 4:30 am | बाळकराम
- पवारांच्या प्रत्येक वाक्यात सूचक व गूढ अर्थ भरलेला असतो-
पवारांच्या वाक्यांत ज्या लोकांना सूचक आणि गूढ अर्थ सापडतो, अशा लोकांच्या बुद्धिमत्तेबद्दल मला पहिल्यापासूनच अपार आदर वाटत आला आहे!
11 May 2014 - 9:01 pm | श्रीगुरुजी
>>> >>> आता मोदींचा एकछत्री अंमल चालू झाला की निवडणूक आयोगाची वाट लागेलच, मग मशिन्स फक्त घरी आणायची आणि दिवसभर कमळाचं बटण दाबून संध्याकाळी परत करायची! म्हणजे पुन्हा प्रचार केला की नाही हा वादच नको.
>>> ग्रेसने जेव्हा आपले पित्ते आयोगात घुसडले, तेव्हाच निवडणुक आयोगाची वाट लागली आहे. आता मोदी नवीन वाट काय लावणार?
निवडणुक आयोग हा तटस्थ असतो असे म्हटले जाते. निवडणुक आयोग हा कदाचित तटस्थ असू शकेल, पण निवडणुक आयुक्त मात्र तटस्थ असतीलच असे नाही. विशेषतः जेव्हा सत्ताधारी पक्ष आपल्या सोयीने व सोयीच्या व्यक्ती त्या पदावर बसवितो, तेव्हा तटस्थपणाची अपेक्षाच करता येत नाही.
गेल्या काही दिवसातील घटनांनी हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. मोदींनी बडोद्यातील मतदानानंतर स्वतःची सेल्फी काढताना माध्यमांनी त्यांचा फोटो टिपला व नंतर स्वतःहून आलेल्या माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिल्यावर आयोगाने अक्षरशः काही तासातच त्यांच्याविरूद्ध थेट एफआयआर दाखल केला.
पण पप्पू अमेठीत मतदानाच्या दिवशी एक मतदार मतदान करत असताना थेट मतदान यंत्राशेजारी उभा असल्याचे ३ वेगवेगळे फोटो माध्यमांनी टिपलेले असताना पप्पूला मात्र हाच आयोग क्लीन चिट देउन मोकळा झाला.
३ दिवसांपूर्वी मोदींनी वाराणशीतील बेनियाबाग भागात सभेला व रोड शो करायला आयोगाने बंदी घातली. पण त्याच भागात दुसर्याच दिवशी पप्पू आणि अखिलेश यादवला रोड शो ला परवानगी दिली.
आज निवडणुक आयोगाने भाजपच्या वाराणशीतील कार्यालयावर विनाकारण धाड घालून प्रचाराचे बिल्ले, टोप्या इ. जप्त केले. भाजप म्हणे या गोष्टी मतदारांना वाटणार होता. कालच प्रचार संपल्याने हे उरलेले साहित्य आहे असे भाजपने सांगून सुद्धा आयोगाने आपला हट्ट सोडला नाही. धाड टाकून साहित्य जप्त केल्यावर काही तासातच आयोगाने सर्व साहित्य परत दिले व भाजप प्रचारासाठी हे साहित्य वापरणार नसल्याची कबुली दिली. काँग्रेस, आप, सप, बसप इ. कोणत्याही पक्षाच्या कार्यालयावर धाड टाकली असती तरी त्यात त्या पक्षाच्या प्रचाराचे उरलेले साहित्य मिळालेच असते. मग इतर पक्ष सोडून फक्त भाजपच्याच कार्यालयावर का धाड टाकली? मुद्दाम भाजपला बदनाम करणे व भीति दाखविणे हे दोनच उद्देश यामागे दिसतात.
मी आधीच लिहिल्याप्रमाणे निवडणुक आयोग कदाचित तटस्थ असेल, पण निवडणुक आयुक्त तसे असतील अशी खात्री नाही.
11 May 2014 - 11:23 pm | नानासाहेब नेफळे
या बाबतीत सहमत .
EC हा काँग्रेसधार्जिणा असावा, महाराष्ट्रात मतदार संघ पुर्नरचनेत जाणत्या राजाची मतं घेऊन काम झाल्याची चर्चा होती.
7 May 2014 - 12:49 am | विकास
Gujarat Land Acquisition Model is the Best: Commerce Ministry Report
काँग्रेसच्या आनंद शर्मा या मंत्र्यांच्या अख्त्यारीतील क्रेंद्रीय व्यापार मंत्रालयाने आज गुजरात मधील भूसंपादन पद्धतीला आदर्श पद्धत म्हणल्याचे आले आहे.
7 May 2014 - 1:16 am | अर्धवटराव
हे आले मोदि भक्त :D ...अहो, बेस्ट म्हणजे 'सर्वात चांगली'...'आदर्श' नव्हे. मोदिभक्तांना&%$#&*%&$# जातीयवाद%&$&-%$# आकलन &$&##मानसीकता*&#@&$& (आपापल्या वकुबाप्रमाणे ब्लाब्लाब्ला चा अर्थ लावावा हि विनंती :P )
7 May 2014 - 1:34 am | विकास
डिसक्लेमरः आम्ही मोदी भक्त नसून अ आणि ब काँग्रेस भक्तांचे विचार मोदीत सॉरी मोडीत निघालेत हे सिद्ध करणारे विचारकृमीकिटक आहोत. :)
बेस्ट म्हणजे 'सर्वात चांगली'...'आदर्श' नव्हे.
ते ही खरेच म्हणा. आदर्श मधे चव्हाण साहेब आहेत. मोदी थोडेच! ;) :D
9 May 2014 - 7:09 am | यशोधरा
विचारकृमीकिटक - भारी शब्द! लईच आवाडला!
7 May 2014 - 8:42 pm | श्रीगुरुजी
http://www.loksatta.com/desh-videsh-news/ishrat-jahan-encounter-no-prose...
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचा उजवा हात म्हणून ओळखले जाणारे पक्षाचे सरचिटणीस आणि गुजरातमधील माजी मंत्री अमित शाह यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने बुधवारी इशरत जहॉं चकमकप्रकरणी क्लिन चीट दिली. याप्रकरणी अमित शाह यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल करता येईल, असे कोणतेही पुरावे आपल्याकडे नसल्याचे सीबीआयने सांगितले. शाह यांच्याबरोबरच गुजरातचे माजी पोलीस महासंचालक के. आर. कौशिक यांनाही सीबीआयने क्लिनचीट दिली आहे.
सीबीआयने बुधवारी विशेष न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात या दोन्ही आरोपींविरोधात आपल्याकडे कोणतेही पुरावे नसल्याचे सांगितले. यामुळे ऐन निवडणुकीच्या मोसमात शाह यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्याचबरोबर नरेंद्र मोदी यांनाही सीबीआयच्या भूमिकाचा फायदाच होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
इशरत जहॉं चकमकीमध्ये मारला गेलेला प्रणेश ऊर्फ जावेद शेख याच्या वडिलांनी विशेष न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावरील सुनावणीवेळी सीबीआयने आपली बाजू मांडली. या चकमकीप्रकरणी सीबीआयने आतापर्यंत ११ जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. त्यामध्ये निलंबित करण्यात आलेले अतिरिक्त पोलीस महासंचालक पी. पी. पांडे, डी. जी. वंजारा, जी. एल. सिंघल यांच्यासह 'आयबी'तील चार अधिकाऱयांचा समावेश आहे.
सत्यमेव जयते!
7 May 2014 - 8:46 pm | विकास
ते तुम्ही काही म्हणा... पण अरविंद केजरीवालच एकमेकाव्दितीय... कोणिही मारो त्यांना थप्पड बेदम फिर भी इस बंदे मे ही है दम. *dash1*
8 May 2014 - 5:18 am | विकास
आज टाईम्स ऑफ इंडीया मधे आलेल्या बातमीनुसार मोदी सरकारला युपिए सरकारकडून विविध प्रकारची २८५ बक्षिसे/प्रशस्तीपत्रके मिळाली आहेत. त्यातला काही ठळक भाग खालील प्रमाणे:
आता यावरून मोदींना केवळ business friendly असे लेबल लावायचे का? यात प्रश्न परत मोदीसमर्थनाचा नाही तर आपल्याला न आवडणार्या व्यक्तीस काय वाट्टेल ते करून बदनाम करणे हे योग्य आहे का, हा आहे. सध्या आंधळ्या मोदीभक्तीपेक्षा आंधळा मोदीद्वेषच उतू जाऊ लागला आहे असे वातावरण आहे. असो.
8 May 2014 - 5:43 pm | अभिजित - १
९व्या टप्प्यातल्या फक्त ४१ जागा बाकी असताना सरकार आणि प्रशासन यांच्याविरोधात अचानक सूडाचं राजकारण करण्याचं कारण जाणण्यासाठी नरेंद्र मोदींचं अमेठीतलं भाषण यु-ट्युबवर पहायला हवं. अमेठी आणि रायबरेलीत विरोधी पक्षांनी ताकदवान उमेदवार उभा न करण्याचा, महत्त्वाच्या नेत्यांनी या मतदारसंघात प्रचार न करण्याचा आणि गांधी घराण्यातील उमेदवारांवर थेट टीका न करण्याचा एक संकेत होता जो अटल बिहारी वाजपयी आणि लाल कृष्ण आडवाणींनीही पाळला होता. पण नरेंद्र मोदींनी तो साफ धुडकावून लावला.
http://blogs.maharashtratimes.indiatimes.com/XYZ/entry/modi-and-varansi
बोस्टन विमानतळावर पप्पू ला पकडले होते. १ लाख डॉलर कॅश बाळगली होती म्हणून. तेव्हा अटलबिहारी पंतप्रधान होते. त्यांनी पप्पूला सोडवले. हे वरच्या लेवलचे नेते सगळे मैत्री बाळगून असतात आपसात. खाबुगिरी करण्यात पण. मोदी नक्कीच वेगळे आहेत.
सहिष्णू राजकारण खूप झाले. पवार साहेब नेहमी महाराष्ट्रच्य सहिष्णू राजकारणाचे गोडवे गात असतात. आता मोदी सारखा असहिष्णू नेताच पाहिजे आहे.
9 May 2014 - 2:56 am | निनाद मुक्काम प...
भ्रष्टाचार निर्मुलन हे आंदोलन होऊ शकतो पण त्यावर पक्ष चालवता येत नाहीत.
तुम्ही विधान सभेची निवडणूक दिल्लीत लढवली दिल्लीच्या वीज ,पाणी ह्या मुलभूत प्रश्नाला हात घातला
म्हणून तुम्हाला आता यश मिळाले.
आता लोक सभेसाठी सार्या देशभर निवडणुका लढवणार
तेव्हा लोकसभेच्या दृष्टीने तुमच्या पक्षाची आर्थिक , परराष्ट्र , सांस्कृतिक , सामाजिक ,धार्मिक धोरणे प्रभावी पणे जनतेच्या समोर अजून आप ने मांडली नाही.
केजू फक्त व्यक्तिगत हल्ले करत होता.
एका मुलाखतीत खाजगीकरणाला त्याचा विरोध आहे हा मुद्दा त्याने वगळायला सांगितला कारण ह्या विरोधाचे कारण तांत्रिक असून ते आता सांगण्याचा वेळ नसल्याने
उगाच मध्यमवर्गीयांचा रोष नको अशी चालबाजी करत होता.
अरे बाबा तुझे तांत्रिक मुद्दे जनतेला कधी सांगणार
का तुझ्या प्रत्येक निर्णयाचे समर्थन तू तांत्रिक मुद्दे आहेत असे करणार
तुझे विचार जनतेपुढे मांडणाताना संधार्भासाहित स्पष्टीकरण देणे द्याला गरजेचे वाटत नाही.
ह्याउलट मोदी गेल्या दीड वर्षापासून त्यांचे पर्यटन ते इतर आर्थिक , शैक्षणिक धोरणे काय आहेत हे विविध ठिकाणी भाषणातून नुसते सांगितले नाही तर गुजरात मध्ये त्या संबंधी काय केले ह्याचे उदाहरण दिले.
आज केजू सरकार बनवणार नाही बनवणार दोघेच
राहुल किंवा मोदी
आता शेवटी शेवटी ह्या दोघांची पंगा घेऊन प्रसार मध्यांना चालणार नाही त्यामुळे कधी केजू , कधी राज
असे तत्कालीन गल्ला भरायला प्रसार माध्यमांना चालतात.
मात्र दीर्घ काळासाठी बिग शॉट वर लक्ष द्यावे लागते.
आज भारताच्या एका राज्यांचा मुख्यमंत्री त्याने आपली भूमिका बदलली नाही मात्र त्याच्या कर्तुत्वाने भारून आता इयु व अमेरिका त्याच्या संबंधी आपली भूमिका बदलत नाही
मोदी मे हे दम
मोदी हे सिंघम
लोकांना हस्तक म्हणताना आपल्याला लोकांनी हस्तक ठरवले हे त्याच्या ध्यानात आले नाही.
9 May 2014 - 3:48 am | अर्धवटराव
नेम्कं काय म्हन्नं हाय ?
9 May 2014 - 4:19 am | बाळकराम
आता पुन्हा मोदीभक्तीची गटारे वाहू लागली वाटतं! असो चालू द्या
9 May 2014 - 5:09 am | विकास
9 May 2014 - 12:05 pm | बाळकराम
दिसतोय विकासराव?!! ;) पण गटारामुळे येणार्या घाणीला ईनो काय करणार? तिथे रुमाल पाहिजे जो मी नाकाला लावून बसलोय आधीच, त्यामुळे सल्ल्याबद्दल थँक्स बट नो थँक्स!
16 May 2014 - 9:18 pm | अभिजित - १
गुजरात मध्ये करून दाखवलं . आणि खरेच करून दाखवलं . शिवसेने सारखे नाही , नुसते होर्डिंग पुरते.
अटल किवा अडवाणी सारखे सर्वसमावेशकतेचे ( थोडक्यात सेटिंग बाजी ) राजकारण करणार नाहीत हि खात्री. खूप सोसले आहे देशाने. आता कोण तरी कट्टर कडवा माणूस पाहिजे सर्व स्तरावरची लढाई लढायला. मग तो लढा भ्रष्टाचार , पाकिस्तान , काश्मीर प्रश्न नाहीतर अजून काहीही असू दे. आणि झटपट निकाल लावायची क्षमता. जी नमो मध्ये आहे. हेच खरे महत्वाचे प्लस point आहेत नमोचे.
विधान सभे मध्ये चित्र नक्कीच वेगळे असणार आहे,