Positive Psychology – दोन सुंदर एक्सरसायजेस- आणि वेल बिइंग ची व्याख्या !

गुल-फिशानी's picture
गुल-फिशानी in काथ्याकूट
28 Apr 2014 - 3:30 am
गाभा: 

माझ्या वाचन प्रवासात सध्या मार्टीन सेलींगमन या ग्रेट सायकॉलॉजिस्ट ची काही पुस्तके आलीत. हा फ़ार वेगळा विचार करणारा मानसशास्त्र्ज्ञ आहे. हा अमेरीकन सायकॉलॉजिकल असोसीएशन चा प्रेसीडेंट असतांना साधारण १९९८ मध्ये याने पॉझिटीव्ह सायकॉलॉजी या अगदी नविन अशा अभ्यासशाखे ची मुहुर्तमेढ रोवली. नावाप्रमाणेच ही शाखा मानवी जीवनात जे काही पॉझिटीव्ह आहे ते शोधण्याचा प्रयत्न करते या शाखेचे ध्येय च आहे की एक्सप्लोअरींग व्हॉट मेक्स लाइफ़ वर्थ लीव्हिंग ! आणि बिल्डींग द एनेबलींग कंडीशन्स ऑफ़ अ लाइफ़ वर्थ लीव्हींग. इतना खुबसुरत मोड मार्टीन जी ने आजतक की सायकॉलॉजी की स्टडी को दे दिया. सेलींगमन म्हणतो की आजपर्यंत मानसशास्त्र केवळ निरनिराळ्या विकृतींना समोर ठेउन च अभ्यास करत असे. मानवी जीवनाच्या नकारात्मक पैलुंवर च मानसशास्त्राचा फ़ोकस होता. त्याने तो म्हणतो की जे प्रॅक्टीशनर रीसर्चर होते त्यांच्या वर याचा विपरीतच परीणाम होत असे. जो माणुस आयुष्याच्या नकारात्मकच पैलु वर फ़ोकस होउन काम करतो तो कीतीही स्वत:ला वाचवल तरी शेवटी स्वत: डीप्रेशन आदि नकारात्मकतेकडे च झुकत असे. या नविन सकारात्मक ध्येयाचा पहीला परीणाम सेलींगमन म्हणतो पॉझिटीव्ह सायकॉलॉजी च्या अभ्यासकां वरच होतो. अर्थात इतका मर्यादीत याचा हेतु कधीच नाही. तर अल्पावधीत ही शाखा झपाट्याने प्रगती करत आहे. व अनेक सुंदर एक्सरसायजेस, ईंटरव्हेंशन्स, टुल्स या शाखेच्या अभ्यासकांनी बनविलेले आहेत.
पॉझिटीव्ह साय़कॉलॉजी मानवाच्या विकनेसेस पेक्षा त्याच्या स्ट्रेंथ्स वर अर्थातच फ़ोकस करते. या अनुसार प्रत्येक व्यक्ती मध्ये त्याच्या स्वत:च्या अशा अनेक स्ट्रेंथ्स असतात आणि त्यात ही काही फ़ारच खास अशा असतात ज्यांना सिग्नेचर स्ट्रेंथ्स असे म्हटले जाते. आता तुमच्या सिग्नेचर स्ट्रेंथ्स तुम्हाला एकदा व्यवस्थित कळल्या की त्यांचा तुम्ही अगदी पुरेपुर वापर करुन तुमचे प्रश्न सोडवु शकतात. यासाठी पॉझीटीव्ह सायकॉलॉजी ने भरपुर रीसर्च करुन अगदी शास्त्रीय अशा टेस्ट्स विकसीत केलेल्या आहेत. त्यातील ही खालील एक क्वेश्चनरी आहे जी तुम्ही प्रामाणिकपणे या साइट वर सोडवुन बघा एकदा सर्व उत्तरे दिलीत( बरेच प्रश्न आहेत थोडा धीर ठेउन सोडवा) की मग ते तुमच्या पाच सिग्नेचर स्ट्रेंथ्स दाखवुन देते. वुइच विल बी व्हेरी युजफ़ुल फ़ॉर यु सो प्लीज प्रोसीड... आणि ही साइट ही एकदा नीट बघा फ़ार सुंदर साइट आहे. जवाब देते वक्त एक ही चीज बहोत जरुरी है वो है इमानदारी!
साइट लिंक
http://www.authentichappiness.sas.upenn.edu/Default.aspx
सिग्नेचर स्ट्रेंथ टेस्ट लिंक
http://www.authentichappiness.sas.upenn.edu/Entry.aspx?rurl=http://www.a...

यांचे काही एक्सरसायजेस शेअर करतो तुम्हाला कल्पना यावी म्हणुन. या शाखेने अगदी काटेकोर सायंटीफ़ीक रीसर्च करुन अनेक जणांवर केलेल्या प्रयोगातुन काही सहज सुंदर एक्सरसायजेस बनविलेले आहेत. उदा. आपण सर्वच कधी ना कधी आयुष्यात फ़ारच निराश काही ना काही कारणाने होत असतो. माणुस हा स्खलनशील आहे हे एकदा स्वीकारल की चुका करण ,कोसळण परत उसळण इ. गोष्टी आयुष्याचा भाग च आहेत. तर जेव्हा निराशा उदासी तुम्हाला घेरते व नकारात्मकता तुमच्यावर अगदी हावी होते तेव्हा आणि हो तुम्ही अगदी नॉर्मल आहात तेव्हा ही टु फ़ील मोअर बेटर मोअर पॉझिटीव्ह इ. इ. तुम्ही हे खालील दोन एक्सरसाइज करु शकतात. एक कायम लक्षात ठेवा या एक्सरसाइजेस मागे अतिशय भरभक्क्म असा विदा आहे रीसर्च आहे. यांची परीणामकारकता अनेक मेझरमेंट ने एन्स्युअर्ड केलेली आहे. हे काही सेल्फ़ हेल्प बुक च्या सारखे तकलादु उपाय निश्चीतच नाहीत.

व्हॉट वेंट वेल-
रोज रात्री झोपण्यापुर्वी एक १० ते १५ मिनीटांचा वेळ फ़क्त द्या जेव्हा झोप येईल असे वाटेल तेव्हा थोड अगोदर थोडा एकांत साधुन तुमच्या एका स्पेशल वही/डायरी/पीसी त आज दिवसभरात ज्या तुमच्या साठी पॉझिटीव्ह घटना/प्रसंग झालेले आहेत. त्या आठवुन बघा शोधुन काढा,. आता हे जरुरी नाही अजिबात की घटना कींवा तुम्ही केलेले वा झालेले काम अगदी ग्रेट च असल पाहीजे ते अगदी साधे लहान ही असु शकते. अगदी अगदे सुक्ष्म का असेना चालेल. ते तुम्ही तुमच्या वहीत नीट लिहुन ठेवा. त्याचे जमेल तितके सुंदर शब्दात वर्णन करा. त्या होण्यामागची कारणीमीमांसा लॉजिक जमेल तितक थोडक्यात मांडा. असे रोज प्रत्येक दिवशी ३ प्रसंग शोधुन काढुन लिहुन ठेवा. यात साध्या आनंदाचे प्रसंग असु शकतील, यश असेल एखादे मिळालेले, एखादा जुना प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला असेल कोणी जुना मित्र भेटलेला असेल प्रत्येक व्यक्ती प्रमाणे काहीही असु शकते. तर असे केवळ ३ सुंदर सकारात्मक आनदाचे वा समाधानाचे प्रसंग शोधण अगदी ओढुन ताणुन भलेही पण का असेना रोज एकदा लिहीण सुरु तर करा. आणि हा डेटा सांभाळुन ठेवा. हे काम रात्रीच झोपतांनाच करा हे झाल्यावर सो जाओ ! या साध्या सवयीचा कीती खोलवर आणि सुंदर परीणाम होउ शकतो याची तुम्ही कल्पना करु शकत नाही. सो जस्ट डु इट आणि मग बघा. ( हे रात्री अशासाठी सांगितलेले आहेत की झोपतांना तुमचा जो शेवटचा विचार असतो तो तुमचा सकाळी उठल्यावर चा पहीला विचार असतो. रात्रीचे शेवटचे विचार डीप सबकॉन्शस मध्ये पोहोचतात व रात्री झोपेतही काम करीत असतात असे अनेक पैलु या एक्सरसाइज मागे आहेत ज्यांच्या आधारवर हे बनविलेले आहेत.) सो कीप इट अप!

रायटींग अ ग्रॅटीट्युड लेटर

तुमच्या जीवनात एकदा थोडे आठवुन बघा तुम्हाला अनेक व्यक्ती अशा आढळतील की ज्यांनी तुमच्यासाठी काही ना काही स्वरुपात चांगले असे केले आहे. अनेक प्रकारे तुम्हाला मदत मार्गदर्शन प्रेम मिळालेले असेल. असा क्वचितच कोणी असेल की ज्याला संपुर्ण आयुष्यात अशी व्यक्ती भेटलीच नाही. तर तुम्ही आठवड्यातुन एखादा तास थोडा मोकळा वेळ काढा. एकांतात जा थोड आणि ट्राय टु रीमेंबर इन अ डीटेल की कोणी आपल्या वर लहानपणी वा कुठल्याही वयात वा सध्या असे प्रेम/ मदत/ मार्गदर्शन/सेवा केलेली आहे. वा आपल्या जीवनात कुठल्या ना कुठल्या स्वरुपात आनंद दिलेला आहे. ती व्यक्ती भले ही तुम्हाला व्यक्तीगत ओळखत नसेल पण उदा. एखादी गायिका जीच्या गाण्यांनी तुम्हाला अवर्णनीय आनंद दिलेला असेल, कोणाच्या पत्राने तुम्हाला संकटात धीर दिलेला असेल अनेक प्रसंग व्यक्ती असु शकतात. तर तुम्हाला शोधुन काढायच आहे आणि मग त्यांना तुम्हाला एक पत्र लिहायच आहे की माय डियर किशोरी.........तुझ्या गाण्यान मला.....तुमच्या प्रेमान......तुम्ही दिलेल्या मार्गदर्शनाने तुमच्या त्या संकटातील मदतीने................... तुमच्या दिलेल्या धीराने वगैरे वगैरे तर तुम्ही तुमच्या पत्रातुन अगदी डीटेल मध्ये सुंदर शब्दात त्या व्यक्तीचे आभार मानणार तिच्या त्या कृत्यासाठी कृतज्ञता अगदी मनापासुने व्यक्त करावयाची आहे ... जी अगोदर तुम्ही प्रत्यक्षात त्या व्यक्ती कडे बोलुन व्यक्त केली असो वा नसो. आता पत्रात अगदी हातच काही न राखता करावयाची आहे. अर्थात यात इमानदारी अगदी च महत्वाची आहे. तुम्हाला आतुन कृतज्ञता वाटत असेल खरीखुरी तरच ते पत्र त्या व्यक्तीला लिहा. आता हे असे पत्र प्रत्यक्षात पोस्ट करुन पोहोचविले तरी ठीक नाही पोहोचवले तुमच्या जवळच जपुन ठेवले तरी काहीच हरकत नाहे. हे पुर्णपणे तुमच्यावर सोपवितो.
आणि आनंद देणारी प्रत्येक वेळेस व्यक्ती च असावी अशी अट नाही ह, एखादी निर्जीव वस्तु ही असु शकते तुमचा जुना रेडीयो, एखाद पेंटींग तुमच घर एखाद झाड अगदी अगदी एनीथिंग वुइच गेव्ह यु जेन्युइन प्लेझर इन लाइफ़ फ़ॉर वुइच यु फ़ील ग्रेटफ़ुल फ़्रॉम द बॉटम ऑफ़ युवर हार्ट,
अशी कीमान १० लेटर्स लिहीण्याचा प्रयत्न करा तुमच्या सवडीने आणि निवांतपणे लिहा मात्र अगेन येथे ही एकच गोष्ट महत्वाची ती म्हणजे इमानदारी ! तुम्हाला अगदी आतुन वाटल तरच लिहा नाही आढळत असेल कोणी तस तर प्रामाणिक पणे वाट पहा पण खोटी कृतज्ञता नको.

तर वरील दोन एक्सरसायजेस या पॉझिटीव्ह सायकॉलॉजीच्या कामाच स्वरुप थोडक्यात स्पष्ट करतात. पण मला अतिशय रस वाटला तो मार्टीन सेलीगमन ने त्याच्या फ़्लरीश या पुस्तकात जो वेल बिइंग ची थेअरी मांडली त्यामध्ये. यात जो वेल बिइंग ( मराठी प्रतिशब्द कल्याण कसा वाटतो ? पण याला थोडा धार्मीक टच येतो व थोडा विचीत्र भासतो कृपया एखादा अचुक मराठी शब्द सुचवावा तो पर्यंत वेल बिइंग च वापरतो). तर सेलींगमन हा मानवाच वेल बिइंग म्हणजे नेमक काय असत कशात असत हे डीफ़ाइन करण्याचा एक असामान्य सुंदर व शास्त्रीय असा प्रयत्न करतो. त्यासाठी तो व्हेदर (हवामान) या शब्दाच उदाहरण वापरतो तो म्हणतो की व्हेदर हा जसा तापमान,आर्द्रता,हवेची गती इत्यादी या सर्वांच मिळुन एक कन्स्ट्रक्ट आहे. यातील प्रत्येक ईंडीव्हीज्युअल घटक हा व्यवस्थित शास्त्रीय रीतीने मोजता अभ्यासता येतो. या सर्व घटकांच मिळुन व्हेदर डीफ़ाइन करता येते.

तर याच रीतीने तो मानवाचे वेल बिइंग कशात आहे ते डीफ़ाइन करण्याचा एक शास्त्रीय प्रयत्न करतो. त्याची म्हणजेच इन जनरल पॉझीटीव्ह सायकॉलॉजीची माणसाच्या वेल बिइंग ची व्याख्या खालीलप्रमाणे केली जाते ती अशी की तो म्हणतो की वेल बिइंग इज लाइक अ व्हेदर नो सिंगल मेझर (घटक) डीफ़ाइन्स इट एक्सहॉस्टीव्हली बट सेव्हरल थिंग्ज कॉन्ट्रीब्युट टु इट. या घटकांना तो म्हणतो की हे वेल बिइंग चे एलीमेंट्स आहेत आणि सर्वात महत्वाच म्हणजे हे शास्त्रीय रीतीने मोजता येतात.आणि प्रत्येक माणुस स्वतंत्रपणे एक एक एलीमेंट्स प्राप्त करण्यासाठी धडपडत असतो. तर आता महत्वाच म्हणजे वेल बिइंग चे घटक नेमके कोणते ?

पहीला घटक- पॉझीटीव्ह इमोशन ( सकारात्मक भावना)
दुसरा घटक – एंगेजमेंट ( स्व ची सुयोग्य कामात गुंतवणुक)
तिसरा घटक- मिनिंग ( आयुष्यातील अर्थपुर्णता)
चवथा घटक- अक्म्पलिशमेंट ( यशप्राप्ती)
पाचवा घटक- पॉझीटीव्ह रीलेशनशिप्स( सकारात्मक नाती)

तर वेल बिइंग चे हे पाच महत्वाचे एलीमेंट्स आहेत, प्रत्येक माणुस स्वतंत्रतेने एक वा अधिक एलीमेंट्सच्या मागे धडपडत असतो.( उदा. यशप्राप्ती साठी धडपडणारा नात्याप्रंती उदासीन असु शकतो मात्र त्याच वेळी एंगेजमेंट साठी स्वतंत्रपणे प्रयत्न ही चालु असु शकतो) आणि पॉझीटीव्ह सायकॉलॉजी नुसार प्रत्येक घटक हा मेझरेबल आहे. एखाद्या च्या आयुष्यात वेल बिइंग चे प्रमाण कीती हे सर्वसाधारणपणे जोखता येउ शकते असा याचा अर्थ. आणि म्हणुन ही व्याख्या शास्त्रीय आहे असे.]

आता थोडा एक एक घटक घेउन समजु या
पॉझीटीव्ह इमोशन म्हणजे आयुष्यात सर्वसाधारणपणे प्रत्ययास अनुभवास येणारी प्लेजंट लाइफ़ फ़ीलींग जी आयुष्यात आनंद आणि समाधाना च्या अनुभवाने निर्माण होते.

एन्गेजमेंट म्हणजे माणसाचे दैनंदिन कार्य म्हणुया वा त्याचे रुटीन टास्क ज्यात तो स्व ला सुयोग्य रीतीने गुंतवतो त्याचा व्यवसाय वा नोकरी वा पत्करलेले काम अशा अर्थाने ज्यात तो स्व ला फ़िजीकली व मेंटली इन्व्हेस्ट करतो.

वरील दोन्ही अगदी स्वतंत्रपणे माणसाकडुन परस्यु केल्या जाउ शकतात उदा एखादा स्व ला एन्गेज करतांना अक्म्प्लीशमेंट चा विचार करेल च असे नाही. एखाद्या संगीताच्या आनंदासाठी वा समाजसेवेतही कोणी एन्गेजमेंट शोधु शकतो परस्यु करु शकतो त्यात अक्म्पलीशमेंट चा विचार असेल च असे नाही हा स्वतंत्र हवा असलेला घटक आहे. तसेच पॉझीटीव्ह इमोशन संदर्भात ही म्हणता येते. जस्ट बाय डोनेटींग अ ब्लड एखादा पॉझीटीव्ह इमोशन शोधत असु शकतो त्यात काही रोजची नियमीत एन्गेजमेंट मिळावी असे काही त्याच्या डोक्यात नसेल ही. तर वरील दोन्ही स्वतंत्रपणे परस्यु केल्या जाउ शकतात. इनफ़ॆक्ट केल्या जातात.

मिनींग इन लाइफ़- प्रत्येक माणुस आपल्या जीवनाला एक अर्थ देत असतो शोधत असतो मानत असतो. या संदर्भात इन सर्च ऑफ़ मीनींग हे अडलर यांचे अप्रतिम पुस्तक जरुर वाचावे. तर येथे अपेक्षीत आहे. प्रत्येक माणसाची स्वत:ची आयुष्याच्या अर्थपुर्णते विषयीची धारणा जो ती तो त्याच्या स्व पेक्षा सर्वोच्च मानतो. ही परत व्यक्तीपरत्वे वेगवेगळी असु शकते. कोणती गोष्ट त्या व्यक्तीला अर्थपुर्ण वाटते जी आयुष्याला त्याच्या दृस्ष्टीकोणातुन अर्थपुर्ण बनविते. मिनींग शिवाय माणुस जगु शकत नाही. (वेल बिइंग च्या संदर्भात) काहीं ना दान करण्यात काहीं ना पैसा कमविण्यात काहींना समाजसेवेत काहींना धार्मीक ध्येयात अर्थपुर्णता वाटु शकते. मिनींग वुइच इज बिलॉंगिंग टु , आणि सर्व्हींग समथींग यु बीलीव्ह इज बिगर दॅन युवरसेल्फ़ ( व्हॊट यु बिलीव्ह हे अतिशय महत्वाचे) अनेक उदाहरणे देता येतील उदा. अभिजीत या तरुण मिग पायलट मुला च्या मृत्यु नंतर त्याच्या आईच्या आयुष्यात एकच ध्येय महत्वपुर्व ठरले सदोष मिग विमानांना भारतीय सैन्यदलातुन काढुन तरुण पायलटांची प्राणहानी टाळणे. धीस टास्क शी बिलीव्ड हॅड मिनींग इन हर लाइफ़ असे... हा तीने शोधलेल मिनींग होत. जितक्या व्यक्ती तितक्या प्रवृत्ती ....

अक्म्पलीशमेंट- यश हे अनेकदा फ़ॉर द सेक ऑफ़ इट परस्यु केले जाते. त्यात मिनींग नसेल ही, त्याने पॉझीटीव्ह इमोशन मिळत असेलच असेही नाही. ते इंडीपेंडटली परस्यु करता येते.

पॉझीटीव्ह नाती- हा सर्वात महत्वाचा घटक माणुस जन्मापासुन मरेपर्यंत अनेक सजीव निर्जीवांशी नातं जोडत असतो. ( इथे राजु परुळेकरांनी संवाद या मालिकेत सानिया या लेखिकेला विचारलेला एक मार्मीक प्रश्न आठवतो की माणस वारंवार नात्यांनी पोळल जाउन ही जीवनात पुन्हा पुन्हा नात्यातच आयुष्याच श्रेयस का शोधतात त्याएवजी (?) असे का करत नाही अशा अर्थाचा तो दुसरा पर्याय काय होता नेमक आठवत च नाही ) तो ये एक मोस्ट इम्पोर्टंट एलीमेंट है माणसाच्या वेल बिइंग ला डीफ़ाइन करणार. तर माणसाच नातं या सजीव निर्जीवांशी कीती प्रमाणात कस सकारात्मक आहे हे बघण महत्वाच आहे.

तर वरील ज्या रीतीने पॉझीटीव्ह सायकॉलॉजी ने माणसाच वेल बिइंग कशात आहे कस बघितल जाव कुठल्या घटकांच ते संमिश्रण आहे. ही जी काय मांडणी करण्याचा प्रयत्न केला तो मला फ़ार मोलाचा महत्वाचा वाटतो. कारण तो अगदी शास्त्रीय असा प्रयास आहे.

या एकंदरीत वेल बिइंग च्या मांडणीविषयी आणि पॉझीटीव्ह सायकॉलॉजी या मानसशास्त्राच्या शाखे विषयी आपणांस काय वाटते हे चर्चेच्या माध्यमातुन जाणुन घ्यायला मला आवडेल. यावर उहापोह व्हावा ही अपेक्षा !

प्रतिक्रिया

ते सुधा मी माझ्याबद्दल जाणुन घ्यायला ? कहर आहे. अहो जगातल्या कोणत्याच एका व्यक्तिमत्वाबाबत मला इतके प्रश्नही पडत नाहित :(

आत्मशून्य's picture

28 Apr 2014 - 4:25 am | आत्मशून्य

लेख आवडला ' मनाचे व्यायामहि फार सुरेख आहेत. अतिशय धन्यवाद, लेख इथे आणल्याबद्दल.

छान लेख....मार्टीन सेलींगमनचे 'Learned Optimism' हेही खूप छान पुस्तक आहे. त्याच्या विचारांच थोडक्यात पण सुंद परीचय करूण दिल्याबद्दल धन्यवाद!

पैसा's picture

28 Apr 2014 - 1:14 pm | पैसा

सकारात्मक विचार करणारा लेख आवडला. मात्र ऑनलाईन प्रश्नावल्या फार काही काम करतात असं वाटत नाही. त्यामुळे त्या साईटवरचं ते सोडून बाकी वाचायला हरकत नाही.

प्रकाश घाटपांडे's picture

28 Apr 2014 - 7:35 pm | प्रकाश घाटपांडे

मला बर्‍याचदा अशा प्रकारचे लेखन हे शब्दांचे बुड्बुडे वाटतात. सीबीटी किंवा रॅशनल इमोटिव्ह थेरपी मधे पण अशा प्रकारच्या शाब्दिक कसरती असतात. अर्थात हे माझे आकलन आहे. सर्वांनाच तसे वाटत असेल असे नव्हे.

यात जो वेल बिइंग ( मराठी प्रतिशब्द कल्याण कसा वाटतो ? पण याला थोडा धार्मीक टच येतो व थोडा विचीत्र भासतो कृपया एखादा अचुक मराठी शब्द सुचवावा तो पर्यंत वेल बिइंग च वापरतो).

वेल बिइंग = निरामयता?

आयुर्हित's picture

30 Apr 2014 - 12:50 am | आयुर्हित

वेल बिइंग चा मराठी अर्थ आहे "स्वस्थ" (स्व+स्थ) म्हणजेच जो नेहमी आपल्या जागी स्थायी(present)असतो, किंवा ज्याच्या चित्तवृत्ती स्थिर असतात!

होय स्वास्थ्य शब्द चपखल वाटतो आहे.

संजय क्षीरसागर's picture

30 Apr 2014 - 1:30 am | संजय क्षीरसागर

आणि मजा म्हणजे स्वास्थ्य ही स्थिती आहे, प्रोसेस नाही. त्यामुळे स्वास्थ्य हे कोणत्याही प्रोसेसनं गवसू शकत नाही!

आत्मशून्य's picture

30 Apr 2014 - 1:36 am | आत्मशून्य

मजा म्हणजे स्वास्थ्य ही स्थिती आहे, प्रोसेस नाही. त्यामुळे स्वास्थ्य हे कोणत्याही प्रोसेसनं गवसू शकत नाही

म्हणजे तुम्हाला असे म्हणायचे आहे काय प्रोसेस अन स्थिती या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. व एक प्रोसेस नेहमी दुसर्‍या प्रोसेसलाच जन्म देउ शकते स्थितीला नाही ?

सॉलीड लॉजीक लावलय :) निष्कर्ष बरोबर काढला आहे.

आत्मशून्य's picture

30 Apr 2014 - 2:05 am | आत्मशून्य

म्हणून दाखवावं तर मानलं...!

इतका वेळ हा लेख शोधत बसले होते

- In recent years, however, our obsession with positive aspects of thought and behavior may have been taken to far, especially since the hijacking of positive psychology by the self-help movement.
_____________________________
मला स्वतःला फेसबुकवरती जो सकारत्मकतेचा मारा होतो ना तो अतिशय निर्बुद्ध अन भाबडा अन ओ येणारा वाटतो.

त्याच लेखातील हे वाक्य -

Barbara Ehrenreich showed how America's relentless obsession with optimism undermines rationality and self-knowledge while promoting intellectual and cultural decline.

घाटपांडे जी सेल्फ हेल्प पुस्तकांचा मोठ्या प्रमाणात सुकाळ झाल्याने तुम्हाला कदाचित असे शाब्दीक बुडबुडे वाटत असतील. त्याच प्रकारच साहीत्य मोठ्या प्रमाणावर सर्वत्र आढळल्याने अशी धारणा होणे साहजिकच आहे त्यात काही गैर नाही. पण एक वेगळेपणा असा आहे की यातील प्युअर सायकॉलॉजिकल सायंटीफीक रीसर्च बेस्ड जे साहीत्य आहे ते असे नसते त्यात फार मोठे दावे ही केले जात नाहीत. हा जो मार्टीन सेलींगमन विषयी वर आलेले आहे त्यांच लर्न्ड ऑप्टीमीझम हे पुस्तक आपण जरुर वाचावे त्यांने उंदरावर अनेक प्रयोग केलेले आहेत. सर्व्हे केलेले आहेत, मेट लाइफ या इन्स्युरन्स कंपनी च्या सेल्समन वर ही मोठे काम करुन अनेक हजारो पानांचा भरभक्कम विदा पुरावे शास्त्रीय रीतीने गोळा केलेले आहेत.
एखाद्या ने नुसतेच काहीतरी फेकणे आणि एखाद्याने अनेक वर्षांच्या शास्त्रीय संशोधनातुन निष्कर्ष काढणे यातील फरक तर उघड आहे.
एक रॅशनल अप्रोच म्हणुन संशोधनाधिष्ठीत निष्कर्षांना अधिक गंभिरतेने घेण्यास हरकत नसावी,
बाकी प्रत्येक शास्त्रीय संशोधनाला ही अखेर मर्यादा परत आहेच. असणारच कारण सायन्स इज अ जर्नी नॉट अ डेस्टीनेशन

लॉरी टांगटूंगकर's picture

28 Apr 2014 - 10:52 pm | लॉरी टांगटूंगकर

लेख आवडला, या विषयावर फारसं वाचन नाहीये. लिंक आरामात पाहण्यात येतील.

शुचि's picture

28 Apr 2014 - 11:19 pm | शुचि

सर्व्हे दिला -

Your Top Strength

Modesty and humility
You do not seek the spotlight, preferring to let your accomplishments speak for themselves. You do not regard yourself as special, and others recognize and value your modesty.

Your Second Strength

Zest, enthusiasm, and energy
Regardless of what you do, you approach it with excitement and energy. You never do anything halfway or halfheartedly. For you, life is an adventure.

Your Third Strength

Citizenship, teamwork, and loyalty
You excel as a member of a group. You are a loyal and dedicated teammate, you always do your share, and you work hard for the success of your group.

Your Fourth Strength

Honesty, authenticity, and genuineness
You are an honest person, not only by speaking the truth but by living your life in a genuine and authentic way. You are down to earth and without pretense; you are a "real" person.

Your Fifth Strength

Capacity to love and be loved
You value close relations with others, in particular those in which sharing and caring are reciprocated. The people to whom you feel most close are the same people who feel most close to you.

Strength#6

Industry, diligence, and perseverance
You work hard to finish what you start. No matter the project, you "get it out the door" in timely fashion. You do not get distracted when you work, and you take satisfaction in completing tasks.

Strength#7

Fairness, equity, and justice
Treating all people fairly is one of your abiding principles. You do not let your personal feelings bias your decisions about other people. You give everyone a chance.

Strength#8

Hope, optimism, and future-mindedness
You expect the best in the future, and you work to achieve it. You believe that the future is something that you can control.

Strength#9

Social intelligence
You are aware of the motives and feelings of other people. You know what to do to fit in to different social situations, and you know what to do to put others at ease.

Strength#10

Spirituality, sense of purpose, and faith
You have strong and coherent beliefs about the higher purpose and meaning of the universe. You know where you fit in the larger scheme. Your beliefs shape your actions and are a source of comfort to you.

Strength#11

Creativity, ingenuity, and originality
Thinking of new ways to do things is a crucial part of who you are. You are never content with doing something the conventional way if a better way is possible.

Strength#12

Appreciation of beauty and excellence
You notice and appreciate beauty, excellence, and/or skilled performance in all domains of life, from nature to art to mathematics to science to everyday experience.

Strength#13

Curiosity and interest in the world
You are curious about everything. You are always asking questions, and you find all subjects and topics fascinating. You like exploration and discovery.

Strength#14

Love of learning
You love learning new things, whether in a class or on your own. You have always loved school, reading, and museums-anywhere and everywhere there is an opportunity to learn.

Strength#15

Bravery and valor
You are a courageous person who does not shrink from threat, challenge, difficulty, or pain. You speak up for what is right even if there is opposition. You act on your convictions.

Strength#16

Kindness and generosity
You are kind and generous to others, and you are never too busy to do a favor. You enjoy doing good deeds for others, even if you do not know them well.

Strength#17

Caution, prudence, and discretion
You are a careful person, and your choices are consistently prudent ones. You do not say or do things that you might later regret.

Strength#18

Gratitude
You are aware of the good things that happen to you, and you never take them for granted. Your friends and family members know that you are a grateful person because you always take the time to express your thanks.

Strength#19

Judgment, critical thinking, and open-mindedness
Thinking things through and examining them from all sides are important aspects of who you are. You do not jump to conclusions, and you rely only on solid evidence to make your decisions. You are able to change your mind.

Strength#20

Leadership
You excel at the tasks of leadership: encouraging a group to get things done and preserving harmony within the group by making everyone feel included. You do a good job organizing activities and seeing that they happen.

Strength#21

Forgiveness and mercy
You forgive those who have done you wrong. You always give people a second chance. Your guiding principle is mercy and not revenge.

Strength#22

Perspective (wisdom)
Although you may not think of yourself as wise, your friends hold this view of you. They value your perspective on matters and turn to you for advice. You have a way of looking at the world that makes sense to others and to yourself.

Strength#23

Humor and playfulness
You like to laugh and tease. Bringing smiles to other people is important to you. You try to see the light side of all situations.

Strength#24

Self-control and self-regulation
You self-consciously regulate what you feel and what you do. You are a disciplined person. You are in control of your appetites and your emotions, not vice versa.

_____________________

ब्रेव्ह वगैरे चूकीचे आले आहे. सर्व्हे खास वाटला नाही. ऑनेस्टी पहीली स्ट्रेन्थ यायला पाहीजे होती अन दुसरी प्रेम करण्याची अन रिसीव्ह करण्याची क्षमता.

का माहीत नाही पण स्वतःला ओळखण्यात अन या सर्व्हेच्या नीरीक्षणात गॅप आहे :(

आत्मशून्य's picture

29 Apr 2014 - 6:44 am | आत्मशून्य

खरे तर इतके प्रश्नांची उत्तरे नाडी पट्टिसाठी सुधा द्यावी लागत नाहित. लेख आवडला पण तिथेच गोंधळ झाला जेंव्हा नुसता सर्वे करायला रेजुस्ट्रेशन करावयाला भाग पाडले. मार्केटिंग आहे नुसतं साइट्चे. आता रिजल्ट नाही पटला तर सदस्यत्व कोण रद्द करणार ?

शुचि's picture

29 Apr 2014 - 6:46 am | शुचि

:) self disciplime etc is totally humbug!!! I simply lack discipline. The survey is not accurate for sure!!!

शुचि तुम्ही सर्व प्रश्नांची उत्तरे देउन हे जाणुन घेण्याचा प्रयत्न केला हीच मुळात चांगली सुरुबात आहे. त्यातला काही भागाशी असहमत असाल तर तेवढा सोडुन द्या की जितक्या प्रमाणात पटलय त्याचा आनंद घ्या आणि त्या स्टेंथ्स वाढवा. आणि निकालात ते एकुण टॉप अधिक इतर ५ अशा एकुण ६ स्ट्रेंथ्स देत असतात (एकुण २४ पैकी हे महत्वाचे) तर टॉप सोडुन बाकी ५ या समान च पातळीवर गृहीत धरलेल्या आहेत सोयीसाठी १ ते ५ क्रमांक आहेत इतकेच त्यामुळे तुलना टॉप व इतर ५ समान अशी आहे त्या पाच समान मध्ये तुलने ची गरज नाही

शुचि's picture

29 Apr 2014 - 12:56 pm | शुचि

नक्की मारवा जी :)

संजय क्षीरसागर's picture

29 Apr 2014 - 11:07 am | संजय क्षीरसागर

विधायक मनोदशा (PMA) या विषयावर वर अनेक पाश्चात्य मनोतज्ञ श्रीमंत झालेत. Wayne Dyer पासून ते I am OK you are OK (Thomas Harris) ते The Power of Positive Thinking (Norman Peale) आणि आपल्याकडचे सध्याचे Happy Thoughts (Tej Gyan Foundation) सगळे एकाच माळेचे मणी आहेत.

सर्वांच्या विचारसरणीत एकच खोट आहे, ती म्हणजे, एक विचार दुसर्‍या विचाराला बरोबर घेऊन येतो, या मनाच्या फंडामेंटल गोष्टीचा विसर. थोडक्यात Positivity, Negativity ला बरोबर घेऊन येते; कुणीही सदासर्वकाळ पॉजिटिव राहू शकत नाही कारण त्यानं नेगटिवीटी दडपलेली असते. त्यामुळे तुम्ही वर्णन केलेल्या विचारसरणीचा फायदा काही काळ होऊ शकेल पण ते कायमचे उत्तर नाही.

याचं कारण देखिल वास्तविक आहे, जीवनात यश आणि अपयश दोन्ही आहे. नुसत्या यशाकडे पाहून किंवा त्याच्या सतत स्मरणानं अपयशाचे विचार फक्त दडपले जातात आणि एखाद्या बेसावध क्षणी उसळी मारुन ते तुम्हाला ओवरटेक करतात. अशा वेळी पुन्हा काही तरी यशस्वी घडेपर्यंत मनोदशा विधायक होत नाही. आणि हे सत्र अव्याहत चालू राहातं.

मनाच्या एका भागानं दुसर्‍यावर मात होत नाही. मन हे ध्वनीरुप आहे. त्यामुळे मोठ्या आवाजनं लहान आवाज दबला असं वाटलं तरी शांतता लाभत नाही. आणि शांतता हे साध्य आहे; यशापयश गौण आहे. यशापयश तुमच्या हातात नाही, ते परिस्थितीजन्य आहे पण शांतता तुमचा मूळ स्वभाव आहे. अपयशात (किंवा बिकट प्रसंगात) तुम्ही शांत राहू शकण्याची कला साधलीत तर जीवन आनंदाचं होतं.

टू बी इग्झॅक्ट, शांत चित्तदशेचा परिणाम विधायक मानसिकता आहे. विधायक मानसिकतेचा परिणाम म्हणून शांत चित्तदशा गवसत नाही. याचं कारण समहाऊ, तुम्ही नेगटिवीटी दडपलेली असते; ती केंव्हा वर येईल याची शाश्वती नसते. या दडपलेल्या मानसिकतेची तुम्हालाही जाणीव असते, आणि नेमकी तीच आंतरिक अस्वास्थ्य कायम ठेवते.

प्यारे१'s picture

29 Apr 2014 - 2:18 pm | प्यारे१

>>> टू बी इग्झॅक्ट, शांत चित्तदशेचा परिणाम विधायक मानसिकता आहे. विधायक मानसिकतेचा परिणाम म्हणून शांत चित्तदशा गवसत नाही.

शांत चित्तदशा कशी प्राप्त होते? ती जर असतेच तर मग बाकीचे गोंधळ का? ते कसे आवरणार?
विधायक मानसिकता जाणीवपूर्वक अवलंबली तर चित्त शांत व्हायला मदत होत नाही का?


आपण जर मार्टीन सेलींगमन चे लर्न्ड ऑप्टीमिझम वाचले तर त्यात फ्लेक्सीबल ऑप्टीमीझम नावाचे एक पुर्ण स्वतंत्र मोठे प्रकरण च दिलेले आहे. ज्यात माणुस कायम पॉझीटीव्ह राहु शकत नाही या वास्तवाचा पुर्ण स्वीकार आहे तसेच नकारात्मक व्यक्तीचे वास्तव परीस्थीतीचे आकलन अधिक अचुक असु शकते (तुलनेने केवळ पॉझीटीव्ह विचार करणारया व्यक्त्तीच्या) या तथ्याचा ही स्वीकार आहे. आणि म्हणुन च ऑप्टीमिझम रीजीड नसुन फ्लेक्सीबल कसा ठेवणे योग्य आहे व त्यासाठी काय अप्रोच असला पाहीजे याचा अगदी सखोल असा मुळातुनच केवळ वाचण्या सारखा रीसर्च मांडलेला आहे. व अत्यंत वास्तववादी असे मार्गदर्शन ही आहे.

सप्रेशन वा दमन केल्याने कुठलीही वृत्ती कधीही पुर्णपणे संपत नाही, सप्रेशन चे दुष्परीणाम काय आहेत याचे पुर्ण भान फ्रॉइड च्या अभ्यास परंपरेत ने च सुरुवात करणारया या ब्रॅचला अर्थातच आहे. कीमान आधुनिक मानसशास्त्राला हा भाग फारच बेसीक आहे.

कंसीडरींग ऑल अबोव्ह पॉसीबीलीटीज अ‍ॅन्ड फॅक्टर्स पॉझीटीव्ह सायकॉलॉजी या नव्या शाखेने एक प्रयास अतिशय वास्तव पायावर आधारित आणि संशोधनातुन्/प्रयोगातुन/विश्लेषणातुन आधुनिक अभ्यास तंत्रे वापरुन केलेला आहे की ज्या योगे माणसाच्या विधायक बाजु वर लक्ष केंद्रीत करुन त्याच्या क्षमतांचा विकास करुन त्याने विकास कसा साधता येईल हा हेतु आहे. त्या सर्व मंथनातुन वर जसे दोन एक्सरसायजेस दिलेले आहेत तसे मेहनतीने बनविलेले आहेत.

आता या सायन्स चा अंगिकार करावा की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. उदा. माझी दातांची काही समस्या आहे तर माझ्या पुढे दोन पर्याय असतात एक मी व्यवस्थित शास्त्र शाखा आहे अशी जी डेन्ट्रीस्टी तीचा अभ्यास केलेल्या डेन्टीस्ट कडुन उपचार घ्यावेत का तर त्याच्या मागे एक शास्त्रीय संशोधन केलेल्या अनेकांच काम उभ आहे. त्याने त्याच रीतसर प्रशिक्षण घेतलेल आहे त्याच्याक्डे विदा आहे त्याच्याक्डे लॉजिक आहे. दुसर मी कुणा गावठी वैदु कडे ही जाउ शकतो ज्याच्या कडे कुठलही शास्त्र संशोधन विदा याच पाठबळ नाही.

तुम्ही वर जी उदाहरणे दिलेली आहेत त्यातले सर्व सेल्फ हेल्प वाले आहेत. त्यात आणि रीसर्च मध्ये वर मारवा यांनी म्हटल्या प्रमाणे तुलना केवळ अशक्य च आहे मार्टीन आणि कंपनी रीसर्च बेस्ड आहे यातच सर्व आल.

आता प्रत्येक शास्त्राची असते तशी मर्यादा अर्थातच पॉझीटीव्ह सायकॉलॉजी ला वर म्हटल्याप्रमाणे असु शकते पण तो दुसरा भाग झाला म्हणजे सर्वात चांगल उदाहरण अ‍ॅलोपॅथी च घ्या आजही तीच्या कडे अनेक रोगांवर पुर्ण इलाज नाही वा परंतु आजपर्यंत जे संशोधनाने उपलब्ध आहे ते बेस्ट आहे. म्हणुन वैदु कडुन उपचार घेण योग्य आहे असे होत नाही. कारण कुठल्याही चांगल्या शास्त्राप्रमाणे संशोधन ही एक अखंड चालणारी प्रक्रीया आहे.

वरील सर्व पॉझीटीव्ह सायकॉलॉजी त काम करणारे व्यावसायिक च आहेत ते उघड सत्य आहे आपण केलेल्या चांगल्या मेहनतीने केलेल्या कामाचे पैसे घेण्यात श्रीमंत होण्यात काहीच गैर मला तरी वाटत नाही.


आपण जर मार्टीन सेलींगमन चे लर्न्ड ऑप्टीमिझम वाचले तर त्यात फ्लेक्सीबल ऑप्टीमीझम नावाचे एक पुर्ण स्वतंत्र मोठे प्रकरण च दिलेले आहे. ज्यात माणुस कायम पॉझीटीव्ह राहु शकत नाही या वास्तवाचा पुर्ण स्वीकार आहे तसेच नकारात्मक व्यक्तीचे वास्तव परीस्थीतीचे आकलन अधिक अचुक असु शकते (तुलनेने केवळ पॉझीटीव्ह विचार करणारया व्यक्त्तीच्या) या तथ्याचा ही स्वीकार आहे. आणि म्हणुन च ऑप्टीमिझम रीजीड नसुन फ्लेक्सीबल कसा ठेवणे योग्य आहे व त्यासाठी काय अप्रोच असला पाहीजे याचा अगदी सखोल असा मुळातुनच केवळ वाचण्या सारखा रीसर्च मांडलेला आहे. व अत्यंत वास्तववादी असे मार्गदर्शन ही आहे.

सप्रेशन वा दमन केल्याने कुठलीही वृत्ती कधीही पुर्णपणे संपत नाही, सप्रेशन चे दुष्परीणाम काय आहेत याचे पुर्ण भान फ्रॉइड च्या अभ्यास परंपरेत ने च सुरुवात करणारया या ब्रॅचला अर्थातच आहे. कीमान आधुनिक मानसशास्त्राला हा भाग फारच बेसीक आहे.

कंसीडरींग ऑल अबोव्ह पॉसीबीलीटीज अ‍ॅन्ड फॅक्टर्स पॉझीटीव्ह सायकॉलॉजी या नव्या शाखेने एक प्रयास अतिशय वास्तव पायावर आधारित आणि संशोधनातुन्/प्रयोगातुन/विश्लेषणातुन आधुनिक अभ्यास तंत्रे वापरुन केलेला आहे की ज्या योगे माणसाच्या विधायक बाजु वर लक्ष केंद्रीत करुन त्याच्या क्षमतांचा विकास करुन त्याने विकास कसा साधता येईल हा हेतु आहे. त्या सर्व मंथनातुन वर जसे दोन एक्सरसायजेस दिलेले आहेत तसे मेहनतीने बनविलेले आहेत.

आता या सायन्स चा अंगिकार करावा की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. उदा. माझी दातांची काही समस्या आहे तर माझ्या पुढे दोन पर्याय असतात एक मी व्यवस्थित शास्त्र शाखा आहे अशी जी डेन्ट्रीस्टी तीचा अभ्यास केलेल्या डेन्टीस्ट कडुन उपचार घ्यावेत का तर त्याच्या मागे एक शास्त्रीय संशोधन केलेल्या अनेकांच काम उभ आहे. त्याने त्याच रीतसर प्रशिक्षण घेतलेल आहे त्याच्याक्डे विदा आहे त्याच्याक्डे लॉजिक आहे. दुसर मी कुणा गावठी वैदु कडे ही जाउ शकतो ज्याच्या कडे कुठलही शास्त्र संशोधन विदा याच पाठबळ नाही.

तुम्ही वर जी उदाहरणे दिलेली आहेत त्यातले सर्व सेल्फ हेल्प वाले आहेत. त्यात आणि रीसर्च मध्ये वर मारवा यांनी म्हटल्या प्रमाणे तुलना केवळ अशक्य च आहे मार्टीन आणि कंपनी रीसर्च बेस्ड आहे यातच सर्व आल.

आता प्रत्येक शास्त्राची असते तशी मर्यादा अर्थातच पॉझीटीव्ह सायकॉलॉजी ला वर म्हटल्याप्रमाणे असु शकते पण तो दुसरा भाग झाला म्हणजे सर्वात चांगल उदाहरण अ‍ॅलोपॅथी च घ्या आजही तीच्या कडे अनेक रोगांवर पुर्ण इलाज नाही वा परंतु आजपर्यंत जे संशोधनाने उपलब्ध आहे ते बेस्ट आहे. म्हणुन वैदु कडुन उपचार घेण योग्य आहे असे होत नाही. कारण कुठल्याही चांगल्या शास्त्राप्रमाणे संशोधन ही एक अखंड चालणारी प्रक्रीया आहे.

वरील सर्व पॉझीटीव्ह सायकॉलॉजी त काम करणारे व्यावसायिक च आहेत ते उघड सत्य आहे आपण केलेल्या चांगल्या मेहनतीने केलेल्या कामाचे पैसे घेण्यात श्रीमंत होण्यात काहीच गैर मला तरी वाटत नाही.

होय माझा रोख सेल्फ हेल्प च्या फुटलेल्या काँग्रेस गवती, पेवाकडेच होता. आपला पहीला मुद्दा रोचक वाटतो आहे. माहीतीबद्दल धन्यवाद.

कारण फार पूर्वी मी हे प्रयोग करुन पाहिले आहेत. इट इज अ विशियस सर्कल. जस्ट टू रिमेन पॉजिटीव इज इटसेल्फ अ‍ॅन एफर्ट.

`फ्लेक्सीबल ऑप्टीमीझम' म्हणजे नक्की काय? आयदर यू आर पॉजिटीव ऑर नेगटीव. वन मे बी न्यूट्रल बट दॅट इज नॉट एक्स्पेक्टेड इन द प्रोसेस.

सप्रेशननं प्रश्न सुटत नाहीत म्हटल्यावर या प्रोसेसमधे नेगटीविटी कशी हँडल केली जाते?

तुम्ही दोन प्रक्रिया वर्णन केल्यात; एक : व्हॉट वेंट वेल, आणि दोन : रायटींग अ ग्रॅटीट्युड लेटर

माझ्या आकलनानुसार वॉट वेंट वेल लिहीतांना वॉट वेंट राँग दडपावं लागतं कारण इट इज इंपॉसिबल दॅट नथींग वेंट राँग इन द डे. त्याचप्रमाणे ग्रॅटिट्यूड लेटर लिहीतांना आपसूकच जे लोक आपण केलेलं विसरुन वागले त्यांची आठवण येते. इट इज जस्ट द अदर साइड ऑफ द कॉइन. वॉट टू डू विथ दॅट? कुणाचा तरी हिशेब चुकवावा असं मनात राहातं, त्याचं काय करणार?

तुम्ही आनंदात असाल (आणि या लेखावरनं तरी सध्या तसं दिसतायं), तर माझे विचार बाजूला ठेवून आणि तुमची प्रोसेस चालू ठेवा.

कालांतरानं जर तुम्हाला प्रोसेस उपयोगी वाटेनाशी झाली तर माझं लेखन कामी येईल.

आनंद हा कोणत्याही गोष्टीचं कारण नाही. त्यामुळे जेंव्हा आपण आनंदात असतो तेंव्हा त्याची कारणमिमांसा न करणं श्रेयस ठरतं. आनंद ही निष्कारण अवस्था आहे. थिंग्ज मे गो राइट ऑर राँग दॅट इज नॉट द इश्यू बिकॉज ब्लिस इज नॉट अ‍ॅन आऊट कम ऑफ इवेंट्स. इट इज नॉट अ कॉज-इफेक्ट फिनॉमिना, इट इज सिंप्ली देअर. विधायक विचार करुन आनंद होत नाही, आनंदात असणार्‍या व्यक्तीचे विचार विधायक असतात.

आणि एक गोष्ट, कृतज्ञता हा आनंदी व्यक्तीचा स्थायी भाव आहे. ही फिल्स ग्रॅटिट्यूड नॉट बिकॉज समथिंग हॅज गॉन द वे ही थिंक्स गुड, इट इज बिकॉज ही इज ब्लिसफुल. साधं जीवंत असणं ही गोष्ट देखिल आनंदी व्यक्तीसाठी कृतज्ञ असायला पुरेशी आहे.

गुल-फिशानी's picture

30 Apr 2014 - 9:53 am | गुल-फिशानी

मी जेव्हा पहील्यांदा ग्रॅटीट्युड लेटर रायटींग साठी बसलो आणि विचार करु लागलो तेव्हा मला सुरुवातीला वाटल की अरे कोण असेल इतक की ज्याच्यावीषयी मला इतक ग्रेटफुल वाटेल ? पण जस जसा विचार करु लागलो तस तस मन भरुन आलं. की कीती तरी माणसं मला आठवु लागली ज्यांना कीत्येक वर्षापासुन संपर्क ही नव्हता आणि त्यांनी काय काय आनंद मला दिला काय सपोर्ट केला अडचणीच्या काळात, काय शिकवलं एक ना अनेक प्रसंग डोळ्यासमोर तरळु लागले. जस जस एक एक करुन लिहीत गेलो तर मला जे काय वाटल म्हणजे जे बर वाटल तितक बर कधीच वाटल नव्हत इट वॉज परहॅप्स द ग्रेटेस्ट पॉझिटीव्ह इमोशन आय एव्हर फेल्ट इन माय लाइफ. मोअर दॅन दॅट एक अतिशय निष्कारण संताप मनात गोळा झालेला होता ज्या काळात मी खरोखर फारच निगेटीव्ह बनलेलो होतो व कुणाशीही निष्कारण आरग्युमेंट्स मधे अडकत होतो, त्या काळात नेमक फार गरज होती अशा काळात मनाला एक फार खोलवर अशी सांत्वना आणि प्रेरणा मिळाली. हा दृस्ष्टीकोणातला अनुभवातला बदल फार उपयोगी पडला प्रॉब्लेम सर्व सुटले अस नाही पण त्यांना फेस करण्याची स्ट्रेंथ स्वतःमध्ये मिळाली. आनंद झाला मात्र आध्यात्मिक ब्लिस वगैरे सारखा काही अदभुत नाही वा अगदी संत वगैरे झालो असही नाही. पण सकारात्मक बदल आसपासच्यांना ठळक जाणवण्याइतका झाला. मुळात मला स्वतःला फार फायदा झाला व हा नविन अ-धार्मीक असा पर्याय आवडला भावला म्हणुन तो शेअर केला इतकचं
महत्वाच म्हणजे देअर इज नथिंग टु बी अ‍ॅग्रेसीव्ह अबाउट इट मला जे आवडल ते शेअर केल इतकचं
आणि ही एक्सरसायजेस तुम्हाला एक काँक्रीट अ‍ॅक्शन देतात टु डु समथींग टु चेंज युवरसेल्फ पॉझीटीव्हली म्हणुन आवडली.
व एकुण विचारसरणी त्यातील शास्त्रीयतेने पटली. शक्य झाले तर मला स्वतःला अशा एखाद्या क्षेत्रात रीसर्च करायला रीतसर शिक्षण घ्यायला आवडेल इतकच

आय विल टेक यू टु अ हायर डायमेंशन. कधी सुट्टीच्या दिवशी भल्या पाहाटे जाग आल्यावर, शांतपणे पाठ टेकून तुमच्या बाल्कनीत किंवा टेरेसवर (आकाशाशी संपर्क येईल असे) स्वस्थ बसा. कोणतीही प्रक्रिया करण्याची काहीही आवश्यकता नाही. एखाद्या कमालीच्या स्वास्थ्यपूर्ण चित्तदशेत तुमच्या लक्षात येईल, आपला श्वास चालू आहे हीच किती अनाकलनीय आणि गूढ घटना आहे. अस्तित्त्वावर आपण कोणताही उपकार केला नसतांना जीवंत आहोत. द एग्झिस्टन्स इज किपींग द ब्रेथ गोईंग आणि आपल्याला याची साधी जाणीव देखिल नाही. कधी दखल घेतलीच तर तीही अत्यंत पुसटशी आणि क्षणकाला पुरती होती. वी वेर मिसींग द वेरी बेसिक फॅक्ट ऑफ लाईफ.

यू विल बिकम ग्रेटफुल टू द होल एग्झिस्टन्स, अँड रिमेन सो ऑल द टाईम... फॉर द रेस्ट ऑफ योर लाईफ.

मी देखिल अहमिकेनं विरोधी भूमिका मांडत नाहीये. पाश्चात्य विचरसरणी एका ठराविक मर्यादेपलिकडे उपयोगी होत नाही हे सांगण्याचा प्रयत्न करतोयं.

यू विल बिकम ग्रेटफुल टू द होल एग्झिस्टन्स, अँड रिमेन सो ऑल द टाईम... फॉर द रेस्ट ऑफ योर लाईफ.

मात्र एखादा जो कोणी असा अनुभव करत असेल तर ते कीती सुंदर असेल याच्या कल्पनेनेही रोमांचीत झालो. पण प्रत्यक्षात मात्र मी ज्या पातळी वर आहे त्याच्याशी इमानदारी बाळगतो. आणि असा काही अदभुत अनुभव मला कधी येइल का ? या विषयी शंकाच आहे. (कारण घडण बरीच अश्रद्द अशी आहे)
तुम्हाला आला असेल तर तुमच्या बाबतीत असे म्हणावे लागेल की यु आर रीअली फॉरच्युनेट टु हॅव सच अ‍ॅन अमेझिंगली इम्पॉसीबल एक्सपेरीयन्स व्हेअर वन बिकम्स ग्रेटफुल टु द व्होल एकसीस्टंन्स!

संजय क्षीरसागर's picture

30 Apr 2014 - 1:38 pm | संजय क्षीरसागर

पण यात भाग्यशाली असण्याचा प्रश्न नसावा. अस्तित्त्वाशी समरुपता ही आता, या क्षणी, आपण आहोत तिथे आणि आहोत त्या स्थितीत, वास्तविकता आहे. खरं तर अस्तित्त्वापासनं आपण वेगळे होऊच शकत नाही. कधी प्रयत्न करुन पाहा, सोपं आहे आणि एकदा उलगडा झाला, अनुभव आला, की मग तो पुसला जाण्याची शक्यताच नाही.

मुक्त विहारि's picture

29 Apr 2014 - 2:49 pm | मुक्त विहारि

वाखूसा

आत्मशून्य's picture

29 Apr 2014 - 5:47 pm | आत्मशून्य

विवेक कशाला म्हणावे व तो वाढिस कसा लागावा यावर शास्त्रीय संशोधन कोणी केलय का ?

प्रत्येक गोष्ट विवेकाच्या कसोटीवर घासून बघा तुम्हा स्वत: व इतरांच्या सर्व सकारात्मक नकारात्मक गोष्टीचा आलेख मिळेल तो सुधा प्रश्नमंजूषा न छापता. आणी एकदा खिशात असा गोळा झालेला डाटा व मनात विवेक जमा असेल की मग जग तुमचेच.

मला वाटते ते मूल्याधारित शिक्षणाच्या अंतर्गत यावे. पण असे शिक्षण जीवनात आई-बापाव्यतीरीक्त कुठे मिळते ते माहीत नाही.

पण अनेक जन्मजात बंडखोरही आश्चर्य वाटावे असा विवेक बाळगुन निर्णय घेताना पाहिले आहेत म्हणून मी तो मोह टाळला.

Prajakta२१'s picture

29 Apr 2014 - 10:08 pm | Prajakta२१

आणि चांगली चर्चा

सिद्धेश महाजन's picture

5 May 2014 - 8:19 pm | सिद्धेश महाजन

विवेक म्हणजे? बोली भाशेत सोपा शब्द काय?

नया है वह's picture

10 Aug 2017 - 12:00 pm | नया है वह

+१

पंतश्री's picture

10 Aug 2017 - 12:12 pm | पंतश्री

सिग्नेचर स्ट्रेंथ टेस्ट लिंक
http://www.authentichappiness.sas.upenn.edu/Entry.aspx?rurl=http://www.a...

उघडत नाहि आहे.