Positive Psychology – दोन सुंदर एक्सरसायजेस- आणि वेल बिइंग ची व्याख्या !
माझ्या वाचन प्रवासात सध्या मार्टीन सेलींगमन या ग्रेट सायकॉलॉजिस्ट ची काही पुस्तके आलीत. हा फ़ार वेगळा विचार करणारा मानसशास्त्र्ज्ञ आहे. हा अमेरीकन सायकॉलॉजिकल असोसीएशन चा प्रेसीडेंट असतांना साधारण १९९८ मध्ये याने पॉझिटीव्ह सायकॉलॉजी या अगदी नविन अशा अभ्यासशाखे ची मुहुर्तमेढ रोवली. नावाप्रमाणेच ही शाखा मानवी जीवनात जे काही पॉझिटीव्ह आहे ते शोधण्याचा प्रयत्न करते या शाखेचे ध्येय च आहे की एक्सप्लोअरींग व्हॉट मेक्स लाइफ़ वर्थ लीव्हिंग ! आणि बिल्डींग द एनेबलींग कंडीशन्स ऑफ़ अ लाइफ़ वर्थ लीव्हींग. इतना खुबसुरत मोड मार्टीन जी ने आजतक की सायकॉलॉजी की स्टडी को दे दिया. सेलींगमन म्हणतो की आजपर्यंत मानसशास्त्र केवळ निरनिराळ्या विकृतींना समोर ठेउन च अभ्यास करत असे. मानवी जीवनाच्या नकारात्मक पैलुंवर च मानसशास्त्राचा फ़ोकस होता. त्याने तो म्हणतो की जे प्रॅक्टीशनर रीसर्चर होते त्यांच्या वर याचा विपरीतच परीणाम होत असे. जो माणुस आयुष्याच्या नकारात्मकच पैलु वर फ़ोकस होउन काम करतो तो कीतीही स्वत:ला वाचवल तरी शेवटी स्वत: डीप्रेशन आदि नकारात्मकतेकडे च झुकत असे. या नविन सकारात्मक ध्येयाचा पहीला परीणाम सेलींगमन म्हणतो पॉझिटीव्ह सायकॉलॉजी च्या अभ्यासकां वरच होतो. अर्थात इतका मर्यादीत याचा हेतु कधीच नाही. तर अल्पावधीत ही शाखा झपाट्याने प्रगती करत आहे. व अनेक सुंदर एक्सरसायजेस, ईंटरव्हेंशन्स, टुल्स या शाखेच्या अभ्यासकांनी बनविलेले आहेत.
पॉझिटीव्ह साय़कॉलॉजी मानवाच्या विकनेसेस पेक्षा त्याच्या स्ट्रेंथ्स वर अर्थातच फ़ोकस करते. या अनुसार प्रत्येक व्यक्ती मध्ये त्याच्या स्वत:च्या अशा अनेक स्ट्रेंथ्स असतात आणि त्यात ही काही फ़ारच खास अशा असतात ज्यांना सिग्नेचर स्ट्रेंथ्स असे म्हटले जाते. आता तुमच्या सिग्नेचर स्ट्रेंथ्स तुम्हाला एकदा व्यवस्थित कळल्या की त्यांचा तुम्ही अगदी पुरेपुर वापर करुन तुमचे प्रश्न सोडवु शकतात. यासाठी पॉझीटीव्ह सायकॉलॉजी ने भरपुर रीसर्च करुन अगदी शास्त्रीय अशा टेस्ट्स विकसीत केलेल्या आहेत. त्यातील ही खालील एक क्वेश्चनरी आहे जी तुम्ही प्रामाणिकपणे या साइट वर सोडवुन बघा एकदा सर्व उत्तरे दिलीत( बरेच प्रश्न आहेत थोडा धीर ठेउन सोडवा) की मग ते तुमच्या पाच सिग्नेचर स्ट्रेंथ्स दाखवुन देते. वुइच विल बी व्हेरी युजफ़ुल फ़ॉर यु सो प्लीज प्रोसीड... आणि ही साइट ही एकदा नीट बघा फ़ार सुंदर साइट आहे. जवाब देते वक्त एक ही चीज बहोत जरुरी है वो है इमानदारी!
साइट लिंक
http://www.authentichappiness.sas.upenn.edu/Default.aspx
सिग्नेचर स्ट्रेंथ टेस्ट लिंक
http://www.authentichappiness.sas.upenn.edu/Entry.aspx?rurl=http://www.authentichappiness.sas.upenn.edu/tests/SameAnswers_t.aspx?id=310
यांचे काही एक्सरसायजेस शेअर करतो तुम्हाला कल्पना यावी म्हणुन. या शाखेने अगदी काटेकोर सायंटीफ़ीक रीसर्च करुन अनेक जणांवर केलेल्या प्रयोगातुन काही सहज सुंदर एक्सरसायजेस बनविलेले आहेत. उदा. आपण सर्वच कधी ना कधी आयुष्यात फ़ारच निराश काही ना काही कारणाने होत असतो. माणुस हा स्खलनशील आहे हे एकदा स्वीकारल की चुका करण ,कोसळण परत उसळण इ. गोष्टी आयुष्याचा भाग च आहेत. तर जेव्हा निराशा उदासी तुम्हाला घेरते व नकारात्मकता तुमच्यावर अगदी हावी होते तेव्हा आणि हो तुम्ही अगदी नॉर्मल आहात तेव्हा ही टु फ़ील मोअर बेटर मोअर पॉझिटीव्ह इ. इ. तुम्ही हे खालील दोन एक्सरसाइज करु शकतात. एक कायम लक्षात ठेवा या एक्सरसाइजेस मागे अतिशय भरभक्क्म असा विदा आहे रीसर्च आहे. यांची परीणामकारकता अनेक मेझरमेंट ने एन्स्युअर्ड केलेली आहे. हे काही सेल्फ़ हेल्प बुक च्या सारखे तकलादु उपाय निश्चीतच नाहीत.
व्हॉट वेंट वेल-
रोज रात्री झोपण्यापुर्वी एक १० ते १५ मिनीटांचा वेळ फ़क्त द्या जेव्हा झोप येईल असे वाटेल तेव्हा थोड अगोदर थोडा एकांत साधुन तुमच्या एका स्पेशल वही/डायरी/पीसी त आज दिवसभरात ज्या तुमच्या साठी पॉझिटीव्ह घटना/प्रसंग झालेले आहेत. त्या आठवुन बघा शोधुन काढा,. आता हे जरुरी नाही अजिबात की घटना कींवा तुम्ही केलेले वा झालेले काम अगदी ग्रेट च असल पाहीजे ते अगदी साधे लहान ही असु शकते. अगदी अगदे सुक्ष्म का असेना चालेल. ते तुम्ही तुमच्या वहीत नीट लिहुन ठेवा. त्याचे जमेल तितके सुंदर शब्दात वर्णन करा. त्या होण्यामागची कारणीमीमांसा लॉजिक जमेल तितक थोडक्यात मांडा. असे रोज प्रत्येक दिवशी ३ प्रसंग शोधुन काढुन लिहुन ठेवा. यात साध्या आनंदाचे प्रसंग असु शकतील, यश असेल एखादे मिळालेले, एखादा जुना प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला असेल कोणी जुना मित्र भेटलेला असेल प्रत्येक व्यक्ती प्रमाणे काहीही असु शकते. तर असे केवळ ३ सुंदर सकारात्मक आनदाचे वा समाधानाचे प्रसंग शोधण अगदी ओढुन ताणुन भलेही पण का असेना रोज एकदा लिहीण सुरु तर करा. आणि हा डेटा सांभाळुन ठेवा. हे काम रात्रीच झोपतांनाच करा हे झाल्यावर सो जाओ ! या साध्या सवयीचा कीती खोलवर आणि सुंदर परीणाम होउ शकतो याची तुम्ही कल्पना करु शकत नाही. सो जस्ट डु इट आणि मग बघा. ( हे रात्री अशासाठी सांगितलेले आहेत की झोपतांना तुमचा जो शेवटचा विचार असतो तो तुमचा सकाळी उठल्यावर चा पहीला विचार असतो. रात्रीचे शेवटचे विचार डीप सबकॉन्शस मध्ये पोहोचतात व रात्री झोपेतही काम करीत असतात असे अनेक पैलु या एक्सरसाइज मागे आहेत ज्यांच्या आधारवर हे बनविलेले आहेत.) सो कीप इट अप!
रायटींग अ ग्रॅटीट्युड लेटर
तुमच्या जीवनात एकदा थोडे आठवुन बघा तुम्हाला अनेक व्यक्ती अशा आढळतील की ज्यांनी तुमच्यासाठी काही ना काही स्वरुपात चांगले असे केले आहे. अनेक प्रकारे तुम्हाला मदत मार्गदर्शन प्रेम मिळालेले असेल. असा क्वचितच कोणी असेल की ज्याला संपुर्ण आयुष्यात अशी व्यक्ती भेटलीच नाही. तर तुम्ही आठवड्यातुन एखादा तास थोडा मोकळा वेळ काढा. एकांतात जा थोड आणि ट्राय टु रीमेंबर इन अ डीटेल की कोणी आपल्या वर लहानपणी वा कुठल्याही वयात वा सध्या असे प्रेम/ मदत/ मार्गदर्शन/सेवा केलेली आहे. वा आपल्या जीवनात कुठल्या ना कुठल्या स्वरुपात आनंद दिलेला आहे. ती व्यक्ती भले ही तुम्हाला व्यक्तीगत ओळखत नसेल पण उदा. एखादी गायिका जीच्या गाण्यांनी तुम्हाला अवर्णनीय आनंद दिलेला असेल, कोणाच्या पत्राने तुम्हाला संकटात धीर दिलेला असेल अनेक प्रसंग व्यक्ती असु शकतात. तर तुम्हाला शोधुन काढायच आहे आणि मग त्यांना तुम्हाला एक पत्र लिहायच आहे की माय डियर किशोरी.........तुझ्या गाण्यान मला.....तुमच्या प्रेमान......तुम्ही दिलेल्या मार्गदर्शनाने तुमच्या त्या संकटातील मदतीने................... तुमच्या दिलेल्या धीराने वगैरे वगैरे तर तुम्ही तुमच्या पत्रातुन अगदी डीटेल मध्ये सुंदर शब्दात त्या व्यक्तीचे आभार मानणार तिच्या त्या कृत्यासाठी कृतज्ञता अगदी मनापासुने व्यक्त करावयाची आहे ... जी अगोदर तुम्ही प्रत्यक्षात त्या व्यक्ती कडे बोलुन व्यक्त केली असो वा नसो. आता पत्रात अगदी हातच काही न राखता करावयाची आहे. अर्थात यात इमानदारी अगदी च महत्वाची आहे. तुम्हाला आतुन कृतज्ञता वाटत असेल खरीखुरी तरच ते पत्र त्या व्यक्तीला लिहा. आता हे असे पत्र प्रत्यक्षात पोस्ट करुन पोहोचविले तरी ठीक नाही पोहोचवले तुमच्या जवळच जपुन ठेवले तरी काहीच हरकत नाहे. हे पुर्णपणे तुमच्यावर सोपवितो.
आणि आनंद देणारी प्रत्येक वेळेस व्यक्ती च असावी अशी अट नाही ह, एखादी निर्जीव वस्तु ही असु शकते तुमचा जुना रेडीयो, एखाद पेंटींग तुमच घर एखाद झाड अगदी अगदी एनीथिंग वुइच गेव्ह यु जेन्युइन प्लेझर इन लाइफ़ फ़ॉर वुइच यु फ़ील ग्रेटफ़ुल फ़्रॉम द बॉटम ऑफ़ युवर हार्ट,
अशी कीमान १० लेटर्स लिहीण्याचा प्रयत्न करा तुमच्या सवडीने आणि निवांतपणे लिहा मात्र अगेन येथे ही एकच गोष्ट महत्वाची ती म्हणजे इमानदारी ! तुम्हाला अगदी आतुन वाटल तरच लिहा नाही आढळत असेल कोणी तस तर प्रामाणिक पणे वाट पहा पण खोटी कृतज्ञता नको.
तर वरील दोन एक्सरसायजेस या पॉझिटीव्ह सायकॉलॉजीच्या कामाच स्वरुप थोडक्यात स्पष्ट करतात. पण मला अतिशय रस वाटला तो मार्टीन सेलीगमन ने त्याच्या फ़्लरीश या पुस्तकात जो वेल बिइंग ची थेअरी मांडली त्यामध्ये. यात जो वेल बिइंग ( मराठी प्रतिशब्द कल्याण कसा वाटतो ? पण याला थोडा धार्मीक टच येतो व थोडा विचीत्र भासतो कृपया एखादा अचुक मराठी शब्द सुचवावा तो पर्यंत वेल बिइंग च वापरतो). तर सेलींगमन हा मानवाच वेल बिइंग म्हणजे नेमक काय असत कशात असत हे डीफ़ाइन करण्याचा एक असामान्य सुंदर व शास्त्रीय असा प्रयत्न करतो. त्यासाठी तो व्हेदर (हवामान) या शब्दाच उदाहरण वापरतो तो म्हणतो की व्हेदर हा जसा तापमान,आर्द्रता,हवेची गती इत्यादी या सर्वांच मिळुन एक कन्स्ट्रक्ट आहे. यातील प्रत्येक ईंडीव्हीज्युअल घटक हा व्यवस्थित शास्त्रीय रीतीने मोजता अभ्यासता येतो. या सर्व घटकांच मिळुन व्हेदर डीफ़ाइन करता येते.
तर याच रीतीने तो मानवाचे वेल बिइंग कशात आहे ते डीफ़ाइन करण्याचा एक शास्त्रीय प्रयत्न करतो. त्याची म्हणजेच इन जनरल पॉझीटीव्ह सायकॉलॉजीची माणसाच्या वेल बिइंग ची व्याख्या खालीलप्रमाणे केली जाते ती अशी की तो म्हणतो की वेल बिइंग इज लाइक अ व्हेदर नो सिंगल मेझर (घटक) डीफ़ाइन्स इट एक्सहॉस्टीव्हली बट सेव्हरल थिंग्ज कॉन्ट्रीब्युट टु इट. या घटकांना तो म्हणतो की हे वेल बिइंग चे एलीमेंट्स आहेत आणि सर्वात महत्वाच म्हणजे हे शास्त्रीय रीतीने मोजता येतात.आणि प्रत्येक माणुस स्वतंत्रपणे एक एक एलीमेंट्स प्राप्त करण्यासाठी धडपडत असतो. तर आता महत्वाच म्हणजे वेल बिइंग चे घटक नेमके कोणते ?
पहीला घटक- पॉझीटीव्ह इमोशन ( सकारात्मक भावना)
दुसरा घटक – एंगेजमेंट ( स्व ची सुयोग्य कामात गुंतवणुक)
तिसरा घटक- मिनिंग ( आयुष्यातील अर्थपुर्णता)
चवथा घटक- अक्म्पलिशमेंट ( यशप्राप्ती)
पाचवा घटक- पॉझीटीव्ह रीलेशनशिप्स( सकारात्मक नाती)
तर वेल बिइंग चे हे पाच महत्वाचे एलीमेंट्स आहेत, प्रत्येक माणुस स्वतंत्रतेने एक वा अधिक एलीमेंट्सच्या मागे धडपडत असतो.( उदा. यशप्राप्ती साठी धडपडणारा नात्याप्रंती उदासीन असु शकतो मात्र त्याच वेळी एंगेजमेंट साठी स्वतंत्रपणे प्रयत्न ही चालु असु शकतो) आणि पॉझीटीव्ह सायकॉलॉजी नुसार प्रत्येक घटक हा मेझरेबल आहे. एखाद्या च्या आयुष्यात वेल बिइंग चे प्रमाण कीती हे सर्वसाधारणपणे जोखता येउ शकते असा याचा अर्थ. आणि म्हणुन ही व्याख्या शास्त्रीय आहे असे.]
आता थोडा एक एक घटक घेउन समजु या
पॉझीटीव्ह इमोशन म्हणजे आयुष्यात सर्वसाधारणपणे प्रत्ययास अनुभवास येणारी प्लेजंट लाइफ़ फ़ीलींग जी आयुष्यात आनंद आणि समाधाना च्या अनुभवाने निर्माण होते.
एन्गेजमेंट म्हणजे माणसाचे दैनंदिन कार्य म्हणुया वा त्याचे रुटीन टास्क ज्यात तो स्व ला सुयोग्य रीतीने गुंतवतो त्याचा व्यवसाय वा नोकरी वा पत्करलेले काम अशा अर्थाने ज्यात तो स्व ला फ़िजीकली व मेंटली इन्व्हेस्ट करतो.
वरील दोन्ही अगदी स्वतंत्रपणे माणसाकडुन परस्यु केल्या जाउ शकतात उदा एखादा स्व ला एन्गेज करतांना अक्म्प्लीशमेंट चा विचार करेल च असे नाही. एखाद्या संगीताच्या आनंदासाठी वा समाजसेवेतही कोणी एन्गेजमेंट शोधु शकतो परस्यु करु शकतो त्यात अक्म्पलीशमेंट चा विचार असेल च असे नाही हा स्वतंत्र हवा असलेला घटक आहे. तसेच पॉझीटीव्ह इमोशन संदर्भात ही म्हणता येते. जस्ट बाय डोनेटींग अ ब्लड एखादा पॉझीटीव्ह इमोशन शोधत असु शकतो त्यात काही रोजची नियमीत एन्गेजमेंट मिळावी असे काही त्याच्या डोक्यात नसेल ही. तर वरील दोन्ही स्वतंत्रपणे परस्यु केल्या जाउ शकतात. इनफ़ॆक्ट केल्या जातात.
मिनींग इन लाइफ़- प्रत्येक माणुस आपल्या जीवनाला एक अर्थ देत असतो शोधत असतो मानत असतो. या संदर्भात इन सर्च ऑफ़ मीनींग हे अडलर यांचे अप्रतिम पुस्तक जरुर वाचावे. तर येथे अपेक्षीत आहे. प्रत्येक माणसाची स्वत:ची आयुष्याच्या अर्थपुर्णते विषयीची धारणा जो ती तो त्याच्या स्व पेक्षा सर्वोच्च मानतो. ही परत व्यक्तीपरत्वे वेगवेगळी असु शकते. कोणती गोष्ट त्या व्यक्तीला अर्थपुर्ण वाटते जी आयुष्याला त्याच्या दृस्ष्टीकोणातुन अर्थपुर्ण बनविते. मिनींग शिवाय माणुस जगु शकत नाही. (वेल बिइंग च्या संदर्भात) काहीं ना दान करण्यात काहीं ना पैसा कमविण्यात काहींना समाजसेवेत काहींना धार्मीक ध्येयात अर्थपुर्णता वाटु शकते. मिनींग वुइच इज बिलॉंगिंग टु , आणि सर्व्हींग समथींग यु बीलीव्ह इज बिगर दॅन युवरसेल्फ़ ( व्हॊट यु बिलीव्ह हे अतिशय महत्वाचे) अनेक उदाहरणे देता येतील उदा. अभिजीत या तरुण मिग पायलट मुला च्या मृत्यु नंतर त्याच्या आईच्या आयुष्यात एकच ध्येय महत्वपुर्व ठरले सदोष मिग विमानांना भारतीय सैन्यदलातुन काढुन तरुण पायलटांची प्राणहानी टाळणे. धीस टास्क शी बिलीव्ड हॅड मिनींग इन हर लाइफ़ असे... हा तीने शोधलेल मिनींग होत. जितक्या व्यक्ती तितक्या प्रवृत्ती ....
अक्म्पलीशमेंट- यश हे अनेकदा फ़ॉर द सेक ऑफ़ इट परस्यु केले जाते. त्यात मिनींग नसेल ही, त्याने पॉझीटीव्ह इमोशन मिळत असेलच असेही नाही. ते इंडीपेंडटली परस्यु करता येते.
पॉझीटीव्ह नाती- हा सर्वात महत्वाचा घटक माणुस जन्मापासुन मरेपर्यंत अनेक सजीव निर्जीवांशी नातं जोडत असतो. ( इथे राजु परुळेकरांनी संवाद या मालिकेत सानिया या लेखिकेला विचारलेला एक मार्मीक प्रश्न आठवतो की माणस वारंवार नात्यांनी पोळल जाउन ही जीवनात पुन्हा पुन्हा नात्यातच आयुष्याच श्रेयस का शोधतात त्याएवजी (?) असे का करत नाही अशा अर्थाचा तो दुसरा पर्याय काय होता नेमक आठवत च नाही ) तो ये एक मोस्ट इम्पोर्टंट एलीमेंट है माणसाच्या वेल बिइंग ला डीफ़ाइन करणार. तर माणसाच नातं या सजीव निर्जीवांशी कीती प्रमाणात कस सकारात्मक आहे हे बघण महत्वाच आहे.
तर वरील ज्या रीतीने पॉझीटीव्ह सायकॉलॉजी ने माणसाच वेल बिइंग कशात आहे कस बघितल जाव कुठल्या घटकांच ते संमिश्रण आहे. ही जी काय मांडणी करण्याचा प्रयत्न केला तो मला फ़ार मोलाचा महत्वाचा वाटतो. कारण तो अगदी शास्त्रीय असा प्रयास आहे.
या एकंदरीत वेल बिइंग च्या मांडणीविषयी आणि पॉझीटीव्ह सायकॉलॉजी या मानसशास्त्राच्या शाखे विषयी आपणांस काय वाटते हे चर्चेच्या माध्यमातुन जाणुन घ्यायला मला आवडेल. यावर उहापोह व्हावा ही अपेक्षा !
वर्गीकरण
प्रतिक्रिया
मी माझ्या व्यक्तिमत्वाबद्द्ल 240 प्रश्नाची उत्तरे द्यायची ?
आणि हो
छान लेख....मार्टीन सेलींगमनचे
लेख आवडला
मला बर्याचदा अशा प्रकारचे
यात जो वेल बिइंग ( मराठी
वेल बिइंग
होय स्वास्थ्य शब्द चपखल वाटतो
स्वास्थ्य हाच शब्द आहे!
ओके...
सॉलीड लॉजीक लावलय निष्कर्ष
हे सरांनी
इतका वेळ हा लेख शोधत बसले
त्याच लेखातील हे वाक्य -
घाटपांडे जी हा रीसर्च बेस्ड वाला प्रकार आहे.
लेख आवडला, या विषयावर फारसं
सर्व्हे दिला -
शेवटची ओळ आवडली.
self disciplime etc is
शुचि अभिनंदन तुम्ही प्रत्यक्ष कृती करुन फायदा करुन घेतला !
नक्की मारवा जी
गुलफिशानी,
>>> टू बी इग्झॅक्ट, शांत
संजय जी पॉझीटीव्ह सायकॉलॉजी ने दुसरी बाजु ही विचारात घेतली आहे
संजय जी पॉझीटीव्ह सायकॉलॉजी ने दुसरी बाजु ही विचारात घेतली आहे
होय माझा रोख सेल्फ हेल्प च्या
तुम्ही स्वतः किती वर्ष हे प्रयोग केलेत?
संजय जी एक अनुभव सांगतो
कृतज्ञा विधायकतेला जन्म देते हे निर्विवाद आहे
संजय जी संवेदनाशील प्रतिसादासाठी मनापासुन धन्यवाद !
इतक्या पातळी वर मी कधी पोहोचु शकेल असे अजिबात वाटत नाही
धन्यवाद!
मस्त लेख
पोसिटि निगेटि जाउदे खड्यात
मला वाटते ते मूल्याधारित
होय मला संस्कार हाच शब्द वापरायचा होता.
चांगला लेख
विवेक म्हणजे? बोली भाशेत सोपा
चांगला लेख
सिग्नेचर स्ट्रेंथ टेस्ट