जाणीव

मनीषा's picture
मनीषा in जे न देखे रवी...
6 Oct 2008 - 10:06 am

कुठेतरी दुःख माझं
कण्हत राहतं
अश्र्रुंना वाट
देत राहतं

आयुष्य संपलेलं
कणाकणांनी
जाणीवेच्या टोकांनी
बोचत राहतं

नाही कधी केला
विचार अधिकाचा
जे सामोरं आलं
तेच माझं होतं

एकेक धागा उकलून
आयुष्याची वीण
उसवलेली
आणि सांधण्यासाठी
सुईचं टोक
मोडलेलं असतं

नजरांचे ते असंख्य वार
अन बोचर्‍या शब्दांचे आघात
सहन करून,
भावनांचं तळं
गोठत राहतं

कशाची तक्रार?
चिंता ही कसली?
दुसरं टोक आयुष्याचं
आपणहून
जवळ येत जातं

यातनांनी मात दिली
माझ्या जाणीवांना
आणि मानलं मी
की आभाळच माझं
तितकंसं मोठं नव्हतं

कविता

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

6 Oct 2008 - 10:12 am | मदनबाण

यातनांनी मात दिली
माझ्या जाणीवांना
आणि मानलं मी
की आभाळच माझं
तितकंसं मोठं नव्हतं

व्वा..सही..

"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda

विसोबा खेचर's picture

6 Oct 2008 - 11:31 am | विसोबा खेचर

वा!

जयवी's picture

6 Oct 2008 - 4:28 pm | जयवी

मनिषा....... प्रचंड आवडली कविता :)

मीनल's picture

6 Oct 2008 - 4:40 pm | मीनल

छान आहे कविता.
दुसरं टोक आयुष्याचं
आपणहून
जवळ येत जातं

हे तर फार सत्य आहे .

मीनल.

राघव's picture

7 Oct 2008 - 10:18 am | राघव

एकेक धागा उकलून
आयुष्याची वीण
उसवलेली
आणि सांधण्यासाठी
सुईचं टोक
मोडलेलं असतं

हे आवडले.
मुमुक्षु

मनीषा's picture

10 Oct 2008 - 7:39 am | मनीषा

--मनःपूर्वक आभार !!!

अनिल हटेला's picture

10 Oct 2008 - 7:54 am | अनिल हटेला

सारो छे !!!

आवडली कविता !!!

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

श्रीकृष्ण सामंत's picture

10 Oct 2008 - 8:10 am | श्रीकृष्ण सामंत

कविता आवडली
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

भाग्यश्री's picture

10 Oct 2008 - 8:52 am | भाग्यश्री

खूप आवडली!!

प्रमोद देव's picture

10 Oct 2008 - 8:58 am | प्रमोद देव

खूपच छान!

पद्मश्री चित्रे's picture

10 Oct 2008 - 10:00 am | पद्मश्री चित्रे

छान लिहिल आहेस