केवळ चार वर्षाचं छोटसं पिल्लु.... आत्ताशी कुठे शाळेच्या फुलपाखरी विश्वात प्रवेश केलेला..... सगळं जग खुप गोड आणि रंगिबेरंगी वाटणारं वय....
आणि अचानक तिच्या आयुष्यात काहितरी वेगळच घडत....काय घडलं ? कसं घडलं ? हे पण कळलं नसेल तिला....
रोज भेटणारे बसमधले काका आपल्याशी असे का वागले हे पण कळलं नसेल.....
कसं सहन करायचं ते तिनं.....
चार वर्षांच्या चिमुरडीवर ओढवलेल्या प्रसंगाने अस्वस्थ झालेय मी कालपासुन....
माणसं इतकी विक्रूत का होत असतील.....?
कालच्या ईसकाळ मद्धे मी ही बातमी वाचली....आणि मनात खुप प्रश्ण निर्माण झाले.....
काल घरी गेल्या गेल्या माझ्या ३.५ वर्षाच्या मुलीला पोटाशी घेउन बसले.....डोकं सुन्न झालं होता.....माझ्या ईतक्याश्या पिल्लाला मी हि घटना समजावुन सांगु शकत नाही.....
असे लोक समाजात असतील तर आमच्या मुलीला आम्ही कसं जपायचं.....?
कुठल्या भाषेत समजावायचं इतक्या चिमुकल्यांना....?
अनोळखी माणसांशी बोलु नका , त्यांच्याकडुन काही घेउ नका हे तर कधीच सांगुन आणि शिकवुन झालय....पण ओळखिची माणसं पण असं काही वागत असतील तर ? अशावेळी काय शिकवायचं मुलांना.....?
३-४ वर्षांच्या छोट्या मुलांना स्वतःचा बचाव वगैरे करण कसं काय जमेल....?
मग आम्ही त्यांना कसं समजावणार जपुन रहायला....? आणि कोणाकोणापासुन ?
मिपा वर विविध क्षेत्रातले तज्ञ आहेत....
छोट्या मुलांना या बाबतीत सावध रहायला आम्ही कसं शिकवु याबद्दल कोणी मार्गदर्शन करेल का प्लीज ?
- एक अस्वस्थ आई....
प्रतिक्रिया
8 Apr 2014 - 1:13 pm | कवितानागेश
हम्म. कळू शकतेय अस्वस्थता.
याच्यावरचा आमिरखानचा सत्यमेव जयते मधला एपिसोड चांगला आहे.
हा विषय अंगावर येतो खूप, त्याबद्दल वाचताना किंवा माहिती घेताना.
पण लहानपणापासूनच काही सुअरक्षिततेच्या गोष्टी मुलांना सांगणं आवश्यकच आहे.
8 Apr 2014 - 6:54 pm | सखी
स्मिता अस्वस्थता कळू शकतेय....आपण यातुन काय करु शकतो हे ही सुरु होईल यामुळे असे वाटतयं सत्य मेव जयते हे एक पाऊल झालं, त्यामुळे लोकांचा अवेअरनेस वाढतोय हे चांगल पण तितक्यावर थांबायला नको. त्या लेकरासाठी खरच जीव तळमळतो.
गविंनी लिहलेली आईसक्रिमवाले गंदे अंकल कथा आठवलीच, तशी लोक तरी पालक बाजुला ठेवु शकतात, पण अशा लोकांच काय ज्यांचा रोज सामना करायला लागतो.
8 Apr 2014 - 1:20 pm | कवितानागेश
ही लिन्क
http://www.satyamevjayate.in/child-sexual-abuse/childsexualabuse.aspx
8 Apr 2014 - 2:56 pm | माहितगार
लीमाउजेट यांनी दिलेल्या दुव्यावरील किड्स वर्कशॉपची कंसेप्ट उपयूक्त असू शकेल असे वाटते. तज्ञ म्हणून नाही पण एक पालक आणि मिपावरील चर्चा करणारे म्हणून शेअर करता येऊ शकेल.
एक भाग असा आहे ज्याला आम्ही विरोध करत नाही. अगदी परवाच इलेक्शनचा प्रचार करण्यासाठी एक चांगलीच व्यक्ती माझ्याकडे आली, मला प्रश्न पडला सहसा कार्यकर्ता असा असू शकत नाही माणूस पेड कार्यकर्तापण वाटत नाही म्हणून चौकशी केली तर त्या व्यक्तीने सांगितल कि ती निवडणूकीस उभ्या व्यक्तीच्या शिक्षण संस्थेत काम करते इलेक्शन असल की प्रचाराच्या पडेल त्या कामाला जावं लागत. म्हणजे पडेल ती कामे करणारी चांगली माणसच संस्थेच्या कँपसच्या बाहेर पाठवली की कँपसच्या आत कुणाच राज्य राहणार ? शिक्षण संस्थांच संस्थानिकीकरणामुळे राजकीयीकरणामुळे ओळखी पाळखीचा म्हणून बाकी बॅकग्राऊंडची चौकशी न करता नौकर्या द्यायच्या मग राजकीय दबावामुळे नौकरी दिलेली व्यक्ती चांगली नसेल तरी त्याला झाकुन नेण्याचे प्रयत्न. या सर्वच सहकारी क्षेत्रातली वतनादारी मोडीत काढण्याची गरज आहे. अर्थात पालक जाऊन शिक्षण संस्था संचालक पदावर पालकांचे प्रतिनिधी असावेत म्हणणार नाहीत आणि शिक्षण संस्थेच्या मालकांना दर १०-१५ वर्षांनी पालकांच्या परिक्षेला बसवल्या शिवाय फारसा फरक पडणार नाही.
पण राजकीय परिस्थिती राजकारणात नसलेली मंडळी बदलू शकणार नाहीत. आपल्या हाती पालक म्हणून अजून काय काय काळजी घेता येऊ शकेल ? समस्या तीन ठिकाणी येऊ शकतात शाळेत पुरेसा महीला कर्मचारी वर्ग आहे हे पहाणे आणि शिक्षीका रोजच्या रोज मुलांच्या छोट्या छोट्या कंप्लेंट स्वतःहून विचारता आहेत अशी शाळेत पद्धत असणे आणि रेग्युलर पॅरेंट टिचर मिटींग्स करता इन्सिस्ट करणे. रिक्षा व्हॅन जिथे शाळेची स्वतःची नसतात तेथे जबाबदारी शाळेची नसली तरी बॅकग्राऊंड चेक आणि स्कूल रिकमंडेड लिस्ट असण्याची जबाबदरी स्कुलची असावयास हवी या करता पॅरेंन्ट्स स्वतः सजग असावयास हवेत. स्कूल व्हॅन्स करता लेडीज ड्रायव्हर्स मिळावयास हवेत पण प्रत्यक्षात का शक्य होत नाही आहे ड्रायब्व्हींगचे शिक्षण घेणार्या स्त्रियांना गाड्या विकत घेण्याकरता फायनान्स मिळणे आणि गाडी प्रॉफीट मध्ये चालेल एवढा मोबदला अथवा नौकरी मिळवून देण्यात पालक संघटनांनी पुढाकार घ्यावयास हवा. पुणे आयटीआय महीलांना ड्रायव्हींगचे प्रशिक्षण देते पण लगेच जॉब्स न मिळाल्यास सराव न राहील्यास पुन्हा जॉब मिळण्याची शक्यता मंदावते या पेक्षा शाळांनीच गरजू महिलांचे चालक वाहक प्रशिक्षण स्पॉन्सर करून किमान स्वरूपाची जॉब/मोबदला गॅरंटी द्यावयास हवी पालकांनी दबाव आणि सहकार्य अशी दुहेरी भूमीका घ्यावयास हवी.
अर्थात जिथे तेही शक्य नाही तेथे नेहमी शक्य नसेल तरी पालकांनी आलटून पालटून ड्यूटी घेऊन बस/व्हॅनच्या मागे आपल्या गाडीने स्वतंत्र पणे जाऊन लक्ष ठेवावे. इतर पालकांसोबत नाही पण मी माझ्या पाल्यांच्या व्हॅनच्या मागे मागे आधून मधून जात असे आणि त्याची कल्पना व्हॅन चालकास असे.
घरच्या करीता पाळणा घरे असतात पण त्यांच्या वेळेच्या मर्यादा बर्याचदा त्रास दायक असू शकतात.जिथे दोघेही पालक कामावर जातात अशा कुटूंबातील 'समजदार' आयांनी दादी-नानी द्वेष कितीही असेल तरीही बाजूला ठेऊन आपली मूल किमान दहा वर्षांची होई पर्यंत जमवून घेणे गरजेचे असते याला प्रॅक्टीकल दुसरा खर म्हणजे पर्याय नाही. अडी अडचणीला शेजारी स्त्रीयांची मदत उपलब्ध आहे हे पहाणेही गरजेचे असते. पालकांनी अगदीच लहानग्याशी टिचर टिचर सारखा खेळ खेळून शाळेत आणि येई पर्यंत काय काय घडले याची माहिती अलगद पणे मुलांकडून जाणून घेतली पाहिजे. या गोष्टी क्षूल्लक वाटतात पण पालक या कडे खरेच कितपत लक्ष देतात ?
प्रत्यक्षात पालक मोबाईलवर व्यस्त असतील, टिव्ही पहातील शेजार्यांशी गप्पा मारतील कुणीच नाही मिळाले तर घरातील कामवाल्यांशी गप्पा मारतील. मुलांशी गप्पा झाल्याच तर त्यात मी काय सांगतो/ते मला काय पाहिजे ते ऐक; तुझ कस चालू आहे तुला काय पाहीजे हे साधे प्रश्न? ज्याला यू अॅप्टीट्यूड (श्रोताभिमुख अभिवृत्ती ) म्हणतात ते पालक पाल्यच नव्हे महाराष्ट्रीय संस्कृतीत हे संवाद कौशल्य पुर्वी होते किंवा नाही माहित नाही पण आज आहे का या बद्दल मी साशंक आहे. ज्या पालकांना बाब गांभीर्याने घ्यावयाची वाटते त्यांनी स्वत;च्या भावनांचा आदर करताना लॉजीकल स्टेप्स मीस न करणे चांगले. अर्थात बाकी मिपाकरांचीही स्वतःची वेगवेगळी मते असू शकतात.
8 Apr 2014 - 3:29 pm | अत्रन्गि पाउस
बातमी अतिशय संतापजनक...
खरं सांगायचं तर आपण आपल्या पिल्लाची जेवढी काळजी घेऊ तेवढीच काय ती खरी...
बाकी सिस्टीम/नियम/कायदे/आजूबाजूची नितीमत्ता ह्यावर जेवढे कमी अवलंबून राहता येईल तेवढे बरे...
8 Apr 2014 - 3:31 pm | समीरसूर
बातमी वाचून सुन्न झालो. तुझी काळजी रास्त आहे. अधिकाधिक जपणं हेच आपल्या हातात आहे. विकृतीने भरलेल्या या आपल्या ढोंगी समाजाला बदलणं शक्य नाही. हेच विकृत लोकं गणेशोत्सवात आवेशाने ढोल बडवत असतील आणि 'गणपती बाप्पा मोरया' ओरडत असतील. चेहरा ओळखता येत नाही; मग काळजीच घेतलेली बरी.
आणि मला वाटते आजकाल अधिकाधिक चांगल्या शाळांमध्ये टाकण्याची जी स्पर्धा पालकांमध्ये असते त्यामुळे लांब-लांबच्या शाळांमध्ये मुलांना दाखल केलं जातं कारण तथाकथित चांगल्या शाळा आजकाल शहराबाहेर आहेत. शाळांविषयीचा आणि १७६० प्रकारचे क्लासेस लावण्याचा अट्टहास थोडा कमी करून जवळच्या पण दर्जेदार शाळांचा विचार केला तर ही काळजी थोडी जास्त घेता येईल.
8 Apr 2014 - 4:17 pm | माहितगार
सर्वच दृष्टीने शाळा जवळची दहा एक मिनीटांच्या असणे सर्वात चांगले. सुशिक्षीत पालकांनी शाळेत शिकवण्यास, शिक्षक पालक संभांना वेळ दिल्यास आणि शालेय व्यवस्थापनात सकारात्मक सहभाग दाखवल्यास सर्वच शाळा चांगल्या योग्यतेच्या होऊ शकतात.
8 Apr 2014 - 3:37 pm | पैसा
कसं सांगायचं आणि काय सांगायचं... वर्कशॉप्स घ्या आणि आणखी काही. ४ वर्षाचं पोर घाबरलं आणि रडायला लागलं की त्याला हे सगळं आठवणार आहे का? तसं तर कुठेच काही सुरक्षित नाही. किती जपणार आपण?
8 Apr 2014 - 4:03 pm | स्मिता श्रीपाद
>>४ वर्षाचं पोर घाबरलं आणि रडायला लागलं की त्याला हे सगळं आठवणार आहे का? तसं तर कुठेच काही सुरक्षित नाही. किती जपणार आपण?>>
अगदी अगदी माझ्या मनातलं....
:-(
वॅन / बस च्या मागे तरी किती वेळा जाणार आपण ?
( आजचा पेपर वाचुन मी पण वॅन ला फॉलो करत शाळेपर्यण्त गेले ही गोष्ट वेगळी )
8 Apr 2014 - 3:54 pm | मृत्युन्जय
धक्कादायक बाब अशी की त्या हरामखोर माणसाचे नीच कृत्य शाळेच्या नजरेस आणुन दिल्यानंतरही शाळेने काहिही कारवाई केली नाही उलट दुसर्या दिवशी त्यालाच कामावर पाठवले. शाळा प्रशासन जर इतके निष्काळजी, बेदरकार, हरामखोर, निलाजरे, षंढ, गुन्हेगारांना पाठीशी घालणारे असेल तर असल्या शाळांमध्ये मुलांना घालावे कशाला. ही शाळा बादवे सिंहगड स्प्रिंग डेल स्कूल आहे.
यात शाळेने उलटा कांगावा करत चालक आणि मदतनिसाची बाजू घेत पालकांना सांगितले की "आम्ही त्यांना चार वर्षांपासून ओळखतो. ते असे करणार नाहीत,'
त्यावर कडी करत नवलेने पालकांचा राग अनावर झाल्यावर "संस्था स्तरावर संबंधितांवर कारवाई करू, " असले षंढ आश्वासन दिले. संस्थास्तरावर हा बलात्काराबद्दल कारवाई करणार? संस्थेने पोलिसात तक्रार दाखल करायला नको? नवले काय स्वतःला सुप्रीम कोर्ट समजायला लागला का?
आणी या असल्या गुन्हेगारी प्रव्रुतीच्या षंढ लोकांनी वर पालकांविरुद्धच तक्रार दाखल केली:
संस्थाचालक मारुती नवले यांना मारहाण, संस्थेच्या स्वागत कक्षातील टीव्ही, खिडकीच्या काचा आणि फर्निचरची तोडफोड केल्याप्रकरणी सुरक्षा अधिकारी रामदास निवृत्ती कुदळे यांनी फिर्याद दिली आहे.
मारुतीचा लोकांनी जीव घेतला नाही यातच त्याने धन्यता मानावी.
http://online3.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5616724406355060657&Se...
8 Apr 2014 - 3:57 pm | मनिष
+१
8 Apr 2014 - 4:03 pm | आदूबाळ
अगदी अगदी. ही सर्वात संतापजनक गोष्ट आहे.
शाळा प्रशासनाने याबाबत उलटा कांगावा करू नये म्हणजे मिळवली. "कशावरून ही घटना घडली होती? बाकी कोणाची तक्रार नाही. चार वर्षाच्या पोरीला काय कळतंय?" वगैरे "युवर-वर्ड-वर्सेस-माय-वर्ड" या थराला हे प्रकरण जाऊ नये अशी इच्छा.
12 Apr 2014 - 3:28 pm | बालगंधर्व
असलया हरमकोर लोकानना एका अनधारी कोहोलीत दमबुन थेवावे. अनि मग तयना पओउर्नपने नन्ग करुन सेनतरला विशाअरी उनदीर सोदावे. जे विशाआरे उनदेर तय लोकनचे इजजत अतमधए खौन तकतेल . सलग २ दिवस तेन्ना अस थेवल तर ते लोक पुरुश महनायचया लयकेचे उरनर नहे. करन हे विशरे उनदेर विशिशत परकरचे असतत. त्यएना पुरुशनचे वीरय कहयला अवदते.
12 Apr 2014 - 4:20 pm | टवाळ कार्टा
त्यापेक्शा तुम्हीच एखादा लेख लिहा...आपण त्या कैद्यांना मोठ्याने वाचायला लावू... =))
(कुरुपय हलके घ्य्ने)
12 Apr 2014 - 4:22 pm | टवाळ कार्टा
=))
=))
12 Apr 2014 - 6:19 pm | कवितानागेश
विषय गंभीर आहे याचे कृपया भान ठेवावे.
12 Apr 2014 - 6:38 pm | टवाळ कार्टा
स्वारी
सहमत...पण रहावले नाही :)
8 Apr 2014 - 3:54 pm | अत्रन्गि पाउस
कचेरीत बसून प्रक्षुब्ध व्हायला होतंय...
समीर सूर म्हणालेत ते अगदी बरोबर आहे...
खरं तर आपणच आजूबाजूच्या ढासळत्या नितीमत्तेला कारणीभूत आहोत ..कारणे काहीही असली तरी आपण ते घडू दिलेले आहे..
आणि अगदी मनापासून सांगायचे तर काहीही होप्स नाहीयेत ते सुधारण्याचे...
8 Apr 2014 - 3:56 pm | मनिष
मलाही फार अस्वस्थ झाले बातमी वाचून. त्याहिपेक्षा संताप संस्थाचालकांनी जी 'मला काय त्याचे' ही भुमिका घेतली त्याबद्दल - मला वाटते, त्याचमुळे बहुसंख्य पालक चिडले!
गुड अच, बॅड टच व्हिडीओ दाखवा आणि आपल्या मुलांची काळजी घ्या, अजून काय बोलणार? :(
8 Apr 2014 - 4:13 pm | पिलीयन रायडर
प्रकार संतापजनक आहेच..
ह्यात आपण आपल्या पाल्याला स्वतः शाळेत सोडायला जाणे अथवा एखाद्या घरातल्या विश्वासु व्यक्तिची मदत घेणे शक्य नाही का? केवळ चांगल्या शाळेसाठी रोज मुलांना एवढ्या ट्रॅफिक मध्ये आणि असल्या नराधमांच्या सोबत पाठवायचे का?
दुसरे असे.. केवळ लहान मुलांसाठी नाही तर सर्वच स्त्रियांसाठी..
पुरुषांना नेमक्या जागी एक लाथ घातली तर त्यांचे प्राण घशाशी आपण आणु शकतो ही महत्वाची महिती कुणी खुले आम का देत नाही मुलींना? आम्हाला सुचकपणे हे १२वी मध्ये सांगितलं होतं.. पण ही सुचकपणे सांगायची बाब नाही.. एका पुरुषाला नामोहराम करण्याचा हा एकमेव आणि सर्वोत्तम उपाय आहे.. कुणी त्रास देत असेल तर फक्त काहिही करुन आपल्याला एक लाथ मारायची आहे.. ती ही जीवाच्या आकांताने.. बास.. संपला तो तिथेच..
स्त्रीला एवढी वेदना कदाचित केवळ मारुन देता येत नसेल जेवढी एका प्रहाराने पुरुषाला देता येऊ शकते..
२-४ जण असतील तर स्त्रीच काय एकटा पुरूष सुद्धा काही करु शकणार नाही..पण पुरुष जनरली घाबरुन जात नाहीत.. ते फाईट करत रहतात.. स्त्री पटकन धीर सोडते.. त्यामुळे हातपाय मारायला शिकवायलाच हवे..एक लाथ तुम्हाला थोडा वेळ मिळवुन देऊ शकते..
बचावाचे उपाय लहानपणापासुन शिकवायलाच हवेत..
8 Apr 2014 - 4:17 pm | बॅटमॅन
धागा अन प्रतिसाद वाचून हेच मनात आलं होतं.
अगदी सहमत आहे, पण वय वर्षे ३-४ साठी हे होणे नाही. अर्थात लहानपणापासून सजगता शिकवणे मस्ट आहेच.
8 Apr 2014 - 4:21 pm | मृत्युन्जय
पुरुषांना नेमक्या जागी एक लाथ घातली तर त्यांचे प्राण घशाशी आपण आणु शकतो ही महत्वाची महिती कुणी खुले आम का देत नाही मुलींना?
४ वर्षांच्या मुलीला काय शिकवणार हे पिरा?
8 Apr 2014 - 4:29 pm | पिलीयन रायडर
असं म्हणुन तर लिहीलय ना मी.. ४ वर्षाच्या मुलीने स्वतःला सांभाळणे शक्यच नाही.. त्यासाठी एका वयापर्यंत पाल्याच्या सुरक्षिततेची जवाबदारी पालकंचीच आहे (शाळेची सुद्धा मानु नये.. कारण काही घडलं तर ते हात वर करणार.. संबंधितांना काडुन टाकणार.. पण काही होऊच नये म्हणुन १००% प्रयत्न करतीलच असं नाही..)
पण एका वयानंतर हे मुलांना शिकवणं आवश्यक आहे..
सध्या तरी ह्यावर उपाय म्हणजे स्वतः थोडे कष्ट घेऊन मुलांना शाळेत सोडणे व आणणे..
दोघेही नोकरी करत असतील तर फ्लेक्सी टायमिंग असल्यास त्याचा फायदा होईल.. आमच्या कंपनीत अशा एखाद्या विशिष्ट वेळेची अडचण असेल तर सुट मिळते.. सर्वात उत्तम म्हणजे मुलाला जवळच्या शाळेत घालणे.. तसंही शाळेचा आणि प्रगतीचा काही संबंध नसतो..
आयुष्याची काही वर्ष मुलामुळे थोडे ऑफिस वगैरे मध्ये कसरत करावी लागणे होणारच.. पण ते अत्यावश्यक आहे..
8 Apr 2014 - 6:24 pm | उदय के'सागर
+१
पालक त्यांच्या दृष्टीने जी चांगली शाळा असते मग भले ती फार दुर असेल त्यात पाल्याला टाकून स्वतः हात वर करतात की आता शाळाच आपल्या पाल्याला घडवेल. त्यापेक्षा जवळच्या मग साधारण शाळा का असेना त्यात पाल्याला टाकून थोडी आपणही त्याला/तिला घडवण्याची जवाबदारी घेतली तर त्याच्या/तिच्या वर अभ्यासाव्यतिरिक ही अजून चांगले संस्कार होतील.
8 Apr 2014 - 4:26 pm | Prajakta२१
असल्या नराधमाना नाझींच्या gas चेम्बरमध्ये कोंडून मारले पाहिजे तरच जरब बसेल आणि असले प्रकार कमी होतील
पण ह्या मानवतावादी देशात हे होणे अशक्यच
8 Apr 2014 - 4:34 pm | मितान
माहितगार आणि मनिष ने दाखवलेला विडिओ या दोन्हीबद्दल सहमत.
मला पालकांना सरसकट दोषी म्हणायचं नाही पण....
एक मुलगी स्कॉलरशिप्च्या परीक्षेसाठी जाते. तिथे परीक्षकच तिला त्रास देतो. ती हे रडत पेपर संपल्यावर बापाला सांगते. बाप तिला घेऊन घरी जातो.
माझा प्रश्न : तुम्ही तक्रार का नाही केली?
मुलगी : आई बाबा म्हणाले आता कुठे कधी संबंध येणारंय त्या शाळेचा.
बाबा : मला त्यावेळी मुलीला शांत करणं ( ??? ) महत्त्वाचं वाटलं म्हणून तिकडे परत न जाता घरी आलो. नंतर वर्किंग डे मुळे वेळ नाही मिळाला तिथे जाऊन मु अ जवळ तक्रार करायला.
मी सेशन संपवताना थंड आवाजात त्या पालकांना सांगितलं की यानंतर तिच्याबर बलात्कार झाला तरी ती तुम्च्याकडे येऊन सांगणार नाही !
बहुतेक आई लोक मुलांना असे काही घडले तर 'दुर्लक्ष कर, विसरून जा' असले दिव्य सल्ले देतात. काय कप्पाळ बडवायचं यांच्यासमोर !
ही जाहिरात नाही पण सांगावसं वाटतंय. माझ्या प्रोफेशनचा सामाजिक दायित्वाचा भाग म्हणून मी विविध शाळांमध्ये बाल लैंगिक शोषण या विषयासंदर्भात मुलांची आणि पालकांचीही सत्र घेते. ( कोणतीही फी घेत नाही. )
ज्या शाळेतून बोलावलं तिथे येते. गेल्या वर्षभरात पिंची परिसरातल्या १३ शाळांमध्ये गेले आहे. सगळीकडे मुलं जे शेअर करतात ते ऐकून सुरुवातीला मळमळ नि निद्रानाश असा त्रास व्हायचा. आता कमी होतो. पण याचा परिणाम म्हणून लैं शोषण करणारांबद्दल मनात टोकाची अतिरेकी धारणा तयार झाली आहे.
असो. प्रतिसादात काही अवांतर आले असल्यास उडवावे.
एक महत्त्वाचे : बाल लैंगिक शोषण केवळ मुलींचेच नाही तर फार मोठ्या प्रमाणात मुलांचेही होते.
8 Apr 2014 - 4:50 pm | मनिष
खरे आहे. लैंगिक शिक्षणासंबधी काम करणार्या एका ग्रुपबरोबर मीही व्हॉलंटीअर होतो, पण खूप त्रास व्हायला लागला स्वतःलाच, नुसताच अनुभवंचा नाही तर स्वतःला तज्ञ म्हणवणर्या व्यक्तिंचे असलेले पुर्वग्रह ऐकुनही...मग थांबवले ते काम! :(
8 Apr 2014 - 5:27 pm | बॅटमॅन
अशी तुरळक उदा. जवळून पाहिलेली आहेत. थोरले भाऊच आपल्या लैंगिक भुकेचं शमन करण्यासाठी धाकट्या भावाचा वापर करतात. अर्थात थोरल्यांनाही नुक्तं मिस्रुड फुटू लागलेलं असल्याने त्यांनाही काय करायचं ते कळत नाही, शिवाय आईवडिलांचा धाकही असतो. पण स्वस्थ तर बसवत नाही. मग लहान भावाशी विशिष्ट तर्हेने खेळणे, इ.इ. प्रकार सुरू होतात. सुरुवातीला कै वाटत नै, पण नंतर त्रास व्हायचा तो होतोच........
8 Apr 2014 - 5:36 pm | मितान
बॅटमॅन खरे आहे.
बहुतेक प्रकार हे नातेवाईक किंवा नित्य संपर्कातल्या ओळखीच्या व्यक्तींकडूनच होत असतात.
यासंदर्भात काही वर्षांपूर्वी मीना नाईक यांनी 'वाटेवरती काचा गं' हा पपेट्स वापरून बसवलेला नाटकरूपातला कार्यक्रम आठवतो. मी काही दिवसांपूर्वी त्यांच्याशी संपर्क साधला असता आता त्याची सी डी आहे आणि ती मुंबईत कुठेतरी मिळते असे त्यांनी सांगितले. ज्यांना शक्य आहे त्यांनी ते नाटुकलं आपल्या पिल्लांसोबत नक्की बघावं.
या विषयाचा अभ्यास करताना पिंकी विराणीचं 'बिटर चॉकलेट' हे पुस्तक वाचलं होतं. ते ही इच्छुकांनी नक्की वाचावं.
8 Apr 2014 - 5:45 pm | बॅटमॅन
अगदी सहमत!!!!
बाकी या पिंकी विराणींचं नाव कुठंतरी ऐकल्यागत वाटतंय. कैक वर्षे कोमात असणार्या एका स्त्रीचं चरित्र लिहिणार्या याच काय? त्या स्त्रीवर भौतेक बलात्कार झाला होता कोमाआधी. अरुणा शानभाग असं नाव आठवतंय, पण तपशिलात चूक असू शकते.
8 Apr 2014 - 6:35 pm | आदूबाळ
हो त्याच त्या. "अरूणाज स्टोरी" असं नाव आहे पुस्तकाचं.
"बिटर चॉकलेट" वाचून अगदी अस्वस्थ व्हायला होतं. मान्सून वेडिंग हा सिनेमा सुद्धा त्यावरच आहे.
8 Apr 2014 - 7:20 pm | बॅटमॅन
अच्छा, धन्यवाद!
8 Apr 2014 - 7:40 pm | शुचि
होय "बिटर चॉकलेट" वाचलं आहे. अस्वस्थ करणारं आहे.
8 Apr 2014 - 7:32 pm | स्वप्नांची राणी
>> बहुतेक प्रकार हे नातेवाईक किंवा नित्य संपर्कातल्या ओळखीच्या व्यक्तींकडूनच होत असतात. >>> १००% खर आहे. आणि नातेवाईक ईतका जवळचा असतो कि त्याच्याविरुद्ध तक्रार केलेली कोणि ऐकुनपण घेत नाही. नंतर नंतर तक्रार करायची पण भिती वाटु लागते. मग घरचे लक्ष देत नाहित म्हणुन बाहेरच्यांचा आधार शोधला जातो....बाहेरचा आधार देतो खरा पण कधी कधी पुर्ण किंमत वसुल करुन...
दुष्ट्चक्र असतं हे...
9 Apr 2014 - 6:22 am | स्पंदना
:(
8 Apr 2014 - 5:46 pm | रेवती
बाल लैंगिक शोषण केवळ मुलींचेच नाही तर फार मोठ्या प्रमाणात मुलांचेही होते.
अगदी सहमत. मला हे अनेकदा ऐकून घ्यावे लागते की " तुझे काय बरे आहे , तुला मुलगा आहे." आधी तळमळीने सांगायचे पण अनेक मुलांच्या आया ज्याप्रकारे निवांत असतात (आपल्याला मुलगा आहे) ते बघून काळजी वाटते. मुले स्वत:चे थोडेफार संरक्षण करण्याच्या वयाची होईपर्यंत आपणच काळजी घ्यायची, इलाज नाही. आपले ते कर्तव्यही आहे. माझी एक खरोखरीच चांगली मैत्रिण माझ्या मुलाला तिच्या मुलांबरोबर खेळायला बोलवायची. सहसा त्या दोन ते तीन तासात माझे दोन फोन जातात. एकदा ती अचानक, कल्पना न देता मुलांना बाहेर पिझा खायला घेउन गेली, दुसर्यांदा एका गेमींग सेंटरला! मग काहीही कारण न देता माझ्या मुलाला पाठवणे बंद केले. ती स्वत: एक आई आहे पण जबाबदार आई असणे महत्वाचे आहे. नंतर पुढच्या प्लेडेटला तिला सांगितले की मला कल्पना दिल्याशिवाय त्याला कोठेही नेलेले आवडणार नाही. आता मी क्वचितच पाठवते.
एकदा माझ्या नव्या घरी मुलाच मित्र येणार होता पहिल्यांदाच! त्याची आई विश्वास ठेवून "काही होत नाही, तू शाळेतून परस्पर घेऊन जा" म्हणत होती, तिला निक्षून नाही म्हणून सांगितले. "तू आधीच्या घरी आली असशील, नव्या घरी येऊन तुझा मुलगा कोठे जाणार आहे हे बघून जा, नाहीतर मी त्याला नेणार नाही" असे सांगितल्यावर तिला ते समजले.
माझ्या भावाला माझे कडक धोरण माहीत आहे म्हणून अगदी मामाजवळ त्याला थोडावेळ ठेवायची वेळ आल्यावर तो लगेच "ताई, मी त्याला घेऊन सगळ्यांबरोबर प्लेग्राऊंडला खेळतो" म्हणाला. आजीआजोबांनीही आधीच जाहीर केले आहे की आता त्यांना डोळ्यांना कमी दिसणे, नीट ऐकू येणे या प्रश्नांमुळे नातवंडे सांभाळायला जमणार नाही. आपली लिमिटेशन्स ओळखणे फार महत्वाचे!
आताही आफटरस्कूल प्रोग्रॅमनंतर मला जायला जी काही दोन पाच मिनिटं लागतात त्यावेळात त्याला एकट्याला ठराविक ठिकाणी वाट बघत उभे राहण्यास सक्त मनाई केली आहे. जिथे सगळी मुले खेळात असतील तिथेच उभे रहावे/खेळावे, अन्यथा अनेक मुले शाळेच्या कोणत्यातरी कोपर्यात आपापल्या सेलफोन्सवर गेम्स खेळत राहतात व वेळाचे, एकटेपणाचे भान रहात नाही.
10 Apr 2014 - 1:38 am | शुचि
प्रतिसाद आवडला.
8 Apr 2014 - 4:38 pm | मनिष
मुलांना स्वतः सोडणे-आणणे खरच शक्य नसते - किंवा स्वतःच्या दुचाकीवर/कारमध्ये नेण्या-आणण्यापेक्षा शाळेची स्कुल-बस करेतर ९९% वेळा जास्त सुरक्षित आणि सोयीस्कर असते. कित्येक शाळांमधे शाळेची बस ही अनिवार्य आहे. आई-वडील आधीच सॉफ्ट टार्गेट आहेत - त्यांना अजून गिल्टी करू नका.
अशा केसेसमधे १००% चूक त्या नराधमांची आणी शाळेच्या प्रशासनाची आहे. आज मुलाला शाळेत सोडतांना कित्येक पालक हेच सांगत होते - सर्वांनाच काही कारवाई न करणार्या शाळेच्या प्रशासनाची चीड येत होती.
8 Apr 2014 - 4:57 pm | पिलीयन रायडर
मी कुणी थर्ड पार्टी नाहिये हो.. मी पण एका लहान मुलाची आई आहे.. मी फक्त उपाय शोधतेय..
काहितरी तर उपाय हवच ना?
8 Apr 2014 - 5:21 pm | आत्मशून्य
हे वाचुन तर भयानक चिडचिड झाली. याआधी सुधा त्यांनी हा प्रकार केला असेल तर मरेपर्यंत फाशीसुधा द्यावी कसलीच सहानुभुती नको. (वाइट वाटते त्यांच्या कूटुंबियांबद्दल पण नाइलाजच आहे. जरब बसवायचा दुसरा मार्गही नाही)
मुलांशी रोजचे रोज बोलणे व त्यांच्या कलाने घेत घेत अधुन मधुन आजुअबाजुच्यांचे वर्तन कसे असते याबद्दल माहिती मिळवत राहणे हेच काय ते करता येउ शकते.
8 Apr 2014 - 6:00 pm | रेवती
आत्ता सकाळमध्ये बातमी वाचली. बेजबाबदारपणाचा कळस आहे. काही बोलायला शिल्लक नाही. महिला कर्मचारी बसवर असावयास हव्या आहेत पण नसतात हाच पहिला नियमभंग! तश्या त्या नाहीत म्हटल्यावर लग्गेच जीवनाचे विकृत रूप दिसायलाच हवे का? म्हणजे महिला कर्मचारी रजेवर जाण्याची वाट पहायलाही कमी करणार नाहीत हे हैवान! त्या महिला कर्मचार्यावर अप्रत्यक्षपणे कोणत्या कामाचा ताण येणार आहे? फक्त महिला असणे पुरेसे आहे का? या महिला कर्मचार्याचा डोळा चुकवून असले काम होणार नाही याची खात्री देता येईल का? बाई असण्याचा ताण किती आहे हे इथे लक्षात घेणे आवश्यक नाहीये का? ताण हा मनावर असतो व परिणाम महिलांच्या शरिरावर होणार, अश्या कित्येक (जवळजवळ सगळ्या म्हणावयाचे आहे पण म्हणत नाही) महिलांचे आरोग्य रोजच्यारोज कणाकणाने ढासळत असेल?
8 Apr 2014 - 6:17 pm | आनंदराव
लहान मुले खरोखर खुप निरागस असतात. एखदी लहान मुलगी कशला खोटे बोलेल? तॅ सुद्धा अशा बाबतीत!
कसला गुन्हा नोंदवत बसलेत.
सरळ कोर्टकदुन ऑर्डर घ्यायची आणि त्यांचे लिंग कापून टाकायचे आणि सोडून द्याय्चे.
फासी फार किरकोळ शिक्षा झाली.
आयुष्यभर ल्क्षाअत रहील आणि दुस्सर्यांना पण धडा मिळेल
10 Apr 2014 - 2:14 am | आत्मशून्य
ती मानसिक असते. लिंग कापून त्याला अजुन विकृत बनायला खतपाणी नकोच.
चाईल्ड अब्यूज अथवा सामूहिक बलात्कार , फक्त फाशीच. तर आणी तरच नियन्त्रण येइल.
8 Apr 2014 - 8:00 pm | शिद
मुळात कायद्याची भीती ह्या अश्या हरामखोरांना राहिलेलीच नाही. गुन्हेगारांना वाटते की ह्या लफड्यातून आरामात सुटू म्हणून त्यांची एवढी हिम्मत होते. महाराजांच्या नियमाप्रमाणे "चौरंगा" करुन टाकायचा अश्या नराधमांचा.
आजची बातमी: परदेशी युवतीचा विनयभंग; विद्यार्थिनीवर बलात्कार
सौजन्यः सकाळ वृत्तपत्र.
8 Apr 2014 - 8:16 pm | प्यारे१
अगदी हेच मत.
आठ दहा जण फाशी अथवा इतर अतिशय कठोर शिक्षेच्या अम्मलबजावणीनं मेले की हे प्रकार होणार नाहीत.
फास्ट ट्रॅक कोर्ट मध्ये खटले चालवावेत.
9 Apr 2014 - 12:14 am | यशोधरा
ऑफिसात असताना ह्या पिल्लाच्या जीवाबद्दल फार वाईट बातमी ऐकली की लिहायला पण धजावत नाही.. खरे आहे का? :( टीव्हीवर वगैरे काही सांगितले?
बातमी खरी नसो, अशी इच्छा..
ही मुलगी सुखरुप आहे असे आज वाचले पेपरात तेह्वा बरे वाटले..
9 Apr 2014 - 12:55 pm | मृगनयनी
सकाळपासून वॉस्सप'वर अश्या काही न्यूज येताहेत, की
""" रेप वगैरे काही झालेले नाही. बसमध्ये बसायला जागा नव्हती, म्हणून "त्या"ने पीडीत मुलीला आपल्या मांडीवर बसवले. बलात्कार सोडाच.. साधा विनयभंग देखील त्याने केलेला नाही.... हा सर्व पॉलिटिकल स्टंट आहे. कालच्या प्रकारात एका राजकीय व्यक्तीने शाळेतील काही पालकांना मुद्दाम चिथावून नवले व अन्य एक शिक्षिका यांना चोपायला सांगितले गेले होते. आश्चर्य म्हणजे, पीडीत मुलीच्या पालकांनी अजून शाळेत तोंडही दाखवलेले नाही. किन्वा कश्यावरच काहीच भाष्य केलेले नाही!!!!! """
खरे खोटे.. देव जाणे!!!! अर्थात या प्रकरणात खरंच कुणी दोषी असेल.. तर अतिकठोर कार्यवाही झालीच पाहिजे!!.. पण हा केवळ राजकीय स्टंट असेल, तर काय करायचे?
9 Apr 2014 - 1:06 pm | पिशी अबोली
स्प्रिंगडेलच्या स्कूल बस मुलांच्या संख्येप्रमाणे असतात ना? मग बसायला जागा नाही असं कसं होईल?
10 Apr 2014 - 9:03 am | माहितगार
पुणे मीरर मधील बातमी अधीक नेमकी असण्याची आणि स्त्री पत्रकाराने दिलेली दिसते.
टाइम्स ऑफ इंडीयातील कारवाई बाबची आजचे वृत्त
या दोन्हीवरून वर मृगनयनी यांनी नमुद केलेला व्हॉट्स अॅपवरील संदेश साशंकीत करणारा वाटतो.
9 Apr 2014 - 3:09 am | बहुगुणी
इथे विषयाला तोंड फोडल्याबद्दल धागालेखिकेचे आभार, आणि मितान, मनीष, माहीतगार यांच्या प्रतिसादातील माहितीबद्दल धन्यवाद!
माहीतगार यांनी म्हंटल्याप्रमाणे स्कूल व्हॅन्स करता लेडीज ड्रायव्हर्स मिळावयास हवेत पण प्रत्यक्षात का शक्य होत नाही?
अशी स्वतंत्र सेवाच कोणी पुढाकार घेऊन सुरू केली तर पाठिंबा मिळेल का?
(आणि कदाचित अवांतर वाटेल, पण राहवत नाही म्हणून विचारतो: इतक्या लहान कोवळ्या मुलांना शाळेत घालणं याला निदान ७-८ वर्षांपर्यंत होम स्कूलिंग हा पर्याय असू शकतो का? 'समवयस्क मुलांशी संपर्क, धीटपणा' वगैरे शाळेत जाण्याचे फायदे मान्य केले तरीही समाजाला लागलेली ही गलिच्छ कीड आणि त्यामुळे मुलांचे आयुष्यभराचे मातेरे होण्याचा तोटा कितीतरी आधिक आहे असं कधीकधी वाटतं...आणि होम स्कूलिंग ची संकल्पना रुजली तर 'न्युक्लिअर' कुटुंबांऐवजी आणि 'लॅच की किड्ज' ऐवजी आजी-आजोबांना सामावून घेणारी समाजरचनाही पुन्हा रुचेल कदाचित...)
9 Apr 2014 - 4:35 am | स्पंदना
काल वाचल्या पासून संतापाने मन भरुन गेलय.
अश्या परिस्थीतीत काही न लिहीणच उत्तम म्हणुन गप्प बसलेय. कारण आताश्या कश्याबद्दल बोलायच म्हणजे लगेच नाही नाही ते आरोप अन लात मारायची प्रवृत्ती बळावलेय.
स्मिता भावना समजल्या. मनात त्याच भावना आहेत. आई म्हणुन मुलीची तशीच मुलाचीही काळजी वाटते. मी माझ्या गरजा कमी करुन मुले झाल्यापासुन घरीच रहाते. काय नाही जाता येणार हॉलीडेजना. नाही वापरायला मिळणार गॅजेटस. मुलांनाही मी याची सरळ जाणीव करुन देते की आपण सिंगल पर्सन अर्निंग फॅमिली आहोत. आता मुलगा थोडा मोठा होतोय. आता बघेन काही करता येते का.
9 Apr 2014 - 5:33 am | नगरीनिरंजन
आपणही कितीही गोड मूल असले तरी दुरुनच त्याच्याशी बोलण्याची शपथ घेऊ या आणि तशीच संस्कृती निर्माण करु या म्हणजे मुलांना अनावश्यक स्पर्शाबद्दल लगेच कळेल.
काही लोक गोड मूल दिसले की पापे घेणे, जवळ घेणे असे प्रकार करतात. भावना कितीही शुद्ध असली तरी असे करणे टाळणेच उत्तम. मुलांना तशी सवय नसणे हे सुरक्षिततेच्या दृष्टीने चांगले होईल.
9 Apr 2014 - 6:39 am | श्रीरंग_जोशी
लेखात मांडलेल्या काळजीयुक्त भावनांशी सहमत.
प्रतिसादांतून चांगली चर्चा झाली आहे.
अमेरिकेत सार्वजनिक ठिकाणी गोंडस लहान मुले दिसतात. त्यांना आम्ही दुरूनच हाय हॅलो करतो. त्यांचा व त्यांच्या पालकांचाही त्याला प्रतिसाद मिळतो. पण इथल्या संस्कृती / पद्धतींनुसार चुकूनही जवळ जात नाही. अंगवळणी पडलेल्या या सवयीमुळे भारतीय मंडळी दिसली तरी या आचरणात फरक पडत नाही.
नाईलाजाने का होईना हिच पद्धत भारतातही मोठ्या प्रमाणावर पाळली जाऊ लागणे हेच इष्ट.
9 Apr 2014 - 7:42 am | खटपट्या
असाच प्रकार ठाण्यामधील एका शाळेत घडला आहे. आणि गुन्हेगाराला पाठीशी घालणे वगैरे सर्व तसच घडले आहे. काय करावे सुचत नाही. माझही मुलगी हि त्याच शाळेत जाते.
9 Apr 2014 - 9:22 am | माहितगार
थोड्या फार प्रयत्नाने शक्य असल्यास शाळा बदलावी. कदाचित सध्याची चांगलीही असेल, अधिक सुरक्शीततेची शाळा काळजीही घेत असेल पण ऑफीसात काम करताना मन मात्र चिंतेने व्यस्त राहण्या पेक्षा घाई न करता अधन मधन दुसर्या शाळांच्या मुख्याध्यापकांशी चर्चा करून शाळा बदलण्यास हरकत नसावी.
तसे शक्य नसेल तर सध्याच्या शाळेच्या व्यवस्थापनात स्वतः किंवा कुटूंबीयांनी आणि इतर ओळखीच्या पालकांनी वेगवेगळ्या प्रकारे सहभाग वाढवावा जेणे करून पालकांचा दबदबा वाढेल. आणि केवळ काळजी करण्या पेक्षा काळजी घेतल्याचे समाधान वाढेल ते महत्वाचे.
9 Apr 2014 - 9:37 am | खटपट्या
धन्यवाद माहितगार
11 Apr 2014 - 12:31 pm | अभिजित - १
शाळेचे नाव द्या कि . लाजू / घाबरू नका ..
एखादेवेळेस हा मेसेज शाळे पर्यंत पोचून शाळा सुधारेल पण.
11 Apr 2014 - 10:43 pm | खटपट्या
सरस्वती विद्यालय, राबोडी ठाणे.
11 Apr 2014 - 10:47 pm | शुचि
मला वाटत होतं तुम्ही नाही देणार. अजूनही माझं मत आहे संपादित करुन घ्या अन नावे द्यायचे टाळा. बाकी तुमची मर्जी :(
9 Apr 2014 - 9:11 am | नाखु
महत्वाचे मुद्दे:
घरापासून लांब असेल पण नावजलेली आहे म्हणून अश्या शाळेत पाठवू नका.
जर मोठे मूल त्या शाळेत अगोदरच (किमान १०-१२ वयाचे) असेल तर्च छोटुल्याला त्याच शाळेत पाठवा.
घरापासून १ते२ किमि परिघात शाळा असावी ईतर बाल्-विकास अतिरिक्त "छंद्-आवड" वर्ग लावून जोपासता येतात.
शाळा लांब असेल तर शाळेशी/शिक्षकांशी वारंवार संपर्क राहत नाही.
यात मतमतांतरे अशू शकतील्.पण मी हे केले आहे.
एक बे*जबाबदार पालक
(बे*-२ मुलांचा))
ईतरांचे सजगतेचे विचार वाचण्यास ऊत्सुक
(छोट्या परीचा काळजी बाबा)
9 Apr 2014 - 10:19 am | मदनबाण
यात नविन ते काय ? असे अतिशय खेदाने विचारावेसे वाटते ! :(
अशा लोकांना तुडवुन तुडवुन ठार मारणे हाच काय तो उपाय वाटतो. नाशकात गुंडांच्या त्रासाने विटलेल्या जनतेने असेच ठेचुन मारले होते. तुम्ही अशा विकॄत माणसांना नराधम म्हणता ना ? मग त्यांना दया-माया दाखवण्याचा प्रश्नच कुठे येतो ?
9 Apr 2014 - 10:28 am | यशोधरा
आजही वर्तमानपतात बातमी आहे की प्रचार करणार्या जीपखाली चिरडून ५ वर्षांची मुलगी ठार आणि अजून पिल्लू जखमकार्जीपमधील कार्यकर्ते मद्यधुंद होते!:अशा बातम्या वाचूनही संताप होतो आहे! इतकी बेपर्वाई!
9 Apr 2014 - 11:46 am | मेघना मन्दार
काल पुण्यात सहा बलात्काराचे गुन्हे दाखल झाले आहेत.. खूप सन्ताप आणि दु़ख़़् होतय हे वाचुन :-( कुठे चालला आहे पुणे?? आणि कुठे चालला आहे आपला देश?? :(
9 Apr 2014 - 12:20 pm | मदनबाण
आपल्या देशात माणसांना सोडुन इतर सर्व गोष्टींना किंमत आहे, हे सत्य जर तुम्हाला उमजले नसेल तर तुम्ही कुंभकर्णा सारख्या गाढ निद्रेत आहात असे समजा.
अराजकता अराजकता म्हणजे नक्की काय हे अश्या आणि रोजच्या अनेक बातम्या वाचुन सुद्धा तुम्हाला दिसत नसेल तर तुम्ही धॄयराष्ट्रा पेक्षा जास्त आंधळे आहात असे खुशाल समजा.
जाता जाता :- पुढचे कारगिल अंदमान-निकोबार मधे घडेल असे कोणी कोणाला सांगितले हे जाणुन घेण्यासाठी गुगलबाबाला विचारणा करुन पहा.
10 Apr 2014 - 8:44 am | माहितगार
एक संबंधीत दुवा : नॅशनल कमीशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाईल्ड राईट्स
10 Apr 2014 - 2:46 pm | _मनश्री_
माझा धाकटा भाऊ ज्या शाळेत जायचा तिथे एक व्हॅन चालक लहान मूली आणि मुलांशी
वाटेल ते चाळे करायचा ,मांडीवर घेऊन त्यांच्या अंगावरून हात फिरवायचा ,मिठया मारायचा
आणि बरच काही
ते सुध्दा ओपनली
पण शाळेच सम्पूर्ण दुर्लक्ष
त्यामुळे मी रोज त्याला आणायला आणि सोडवायला जायचे
आणि दुसर्या वर्षी आम्ही त्याची शाळा बदलली
अशा नराधमांना फक्त फाशी ही एकच शिक्षा असली पाहिजे
10 Apr 2014 - 4:59 pm | पिलीयन रायडर
एक प्रश्नः-
इथे अवांतर वाटत असेल तर दुसर्या एखाद्या संबंधित धाग्यावर हलवावा..
माझा मुलगा अत्ता पावणे दोन वर्षाचा आहे. तो एका पाळणाघरात जातो त्यामुळे तसाही दिवसभर लहान मुलांमध्ये असतो. तिथे दर महिन्याचा अभ्यासक्रम असतो. त्यानुसार मुलांना त्या महिन्यामधल्या विशेष गोष्टी (सण, ऋतु इ.), ठराविक आकडे, गाड्या, अवयव इ ची ओळख, चित्रकला, हातांचे ठसे इ मधुन चित्र बनवणे, बागेत खेळायला जाणे, गाणी म्हणणे इ शिकवतात..
सध्या माझ्या मुलाला १-१० आकडे, सगळे वार, पुस्तकातली चित्रे वगैरे ओळखणे, गाण्यातल्या १-२ ओळी म्हणणे जमते..
३ र्या वर्षी मी त्याला शाळेत घातले तर ह्या हुन वेगळे काय शिकवतात (प्लेग्रुप, मिनी केजी, सिनिअर केजी मध्ये)?
मी माझ्या मुलाला ४/५ व्या वर्षी शाळेत घालु शकते का?
विचारण्याचे कारण की मुलगा कंपनीच्याच पाळणाघरात जातो, त्यामुळे माझ्या सोबत येतो आणि जातो.. पण त्याला ह्या व्यतिरिक्त अजुन दुसर्या शाळेत घातले तर (कदाचित) मला त्याला व्हॅन / बस लावावी लागेल.. इतक्या लहान मुलाला असे शाळेत पाठवणे मला पटत नाही. आणि २ तास त्या शाळेत नक्की तो काय वेगळं शिकणारे ते कळत नाही..
जे काही अभ्यासक्रमात फरक असतील ते जर पालकांनी घरी शिकवुन भरुन काढले तर मुलाला उशीरा शाळेत घालता येते का? म्हण्जे हे बस मधुन इतक्या लहान वयात पाठवणे टाळता येईल..
10 Apr 2014 - 5:11 pm | आदूबाळ
माझ्या अंदाजाप्रमाणे काही अडचण येऊ नये.
शाळेत घालायचं सर्कारी वय "चार पूर्ण" आहे. त्याआधी केज्याबिज्या निव्वळ टाईमपास असतो. अभ्यासक्रमात फरक वगैरेचं लोड इतक्यात नका करुन घेऊ पिरातै.
एकाच गोष्टीची खात्री करा. शाळांना केजी जोडून असते. त्यामुळे थेट पहिलीत प्रवेश मिळण्याचे वांदे असतात. "चांगली" शाळा हा निकष असेल तर त्या शाळेत केजीत घालणं चांगलं.
10 Apr 2014 - 5:16 pm | पिलीयन रायडर
हं हेच.. हाच प्रॉब्लेम मला वाटत होता..
पण त्यातही ट्विस्ट आहे..
माझी कंपनी २-३ वर्षांसाठी दुसर्या लोकेशनला जात आहे.. जे माझ्या घरापासुन १५ किमी वर आहे. कंपनीच्या बसने मी मुलाला स्वतःसोबतच नेऊन दिवसभर तिथेच पाळणाघरात ठेवु शकते.. आता जर शाळेत घालायचं झालं तर कोणत्या घालावं? घरा जवळच्या (कारण अल्टीमेटली कंपनीसुद्धा ३ वर्षांनी घराजवळच येणार आहे..)? की सध्या जिथे स्थलांतर होणार आहे तिकडच्या? (पण मग २-३ वर्षांनी परत शाळा बदलावी लागणारच..)
10 Apr 2014 - 6:18 pm | रेवती
आत्ता आणि पुढे काही वर्षे आईवडीलांची सोय, बाळाची सुरक्षितता याशिवाय इतक्या लहान वयात तरी काहीच महत्वाचे नाही. अभ्यासाची इतक्यात काळजी करावी असे वाटत नाही.
आपण बाळापर्यंत १० मिनिटाच्या अंतरात असणे फायदेशीर आहे. नेहमीच शक्य नसते पण तुला शक्य आहे तर त्याचा फायदा घ्यावास असे वाटते.
10 Apr 2014 - 6:26 pm | पिलीयन रायडर
माझंही हेच मत आहे रेवती.. कारण अभ्यास काय घरातही होईल. तेवढ्यासाठी इतक्या लहान मुलाला उगाच २ तास बस मध्ये घालवायला लावणे असुरक्षित आणि मुलाला दमविणारे आहे.
माझा चांगलीच शाळा (म्हणाजे बेस्टच हवं..वाला) अट्टाहास नाही.. फक्त पुढे जाऊन अॅडमिशनला खुप त्रास होईल का अशी शंका वाटते..
10 Apr 2014 - 6:34 pm | शिद
धन्यवाद...माझ्या मनातील प्रश्न विचारला नेमका.
चर्चा वाचत आहे.
12 Apr 2014 - 12:27 am | बहुगुणी
इतक्या लहान कोवळ्या मुलांना शाळेत घालणं याला निदान ७-८ वर्षांपर्यंत होम स्कूलिंग हा पर्याय असू शकतो का?
12 Apr 2014 - 12:33 am | कवितानागेश
मला देखिल हाच प्रश्न पडलाय.
जरा समज आणि ताकद येइपर्यंत मुलांना एकट्याना कुठेही पाठवणं नको होतं..
शिवाय निदान लहानपणीतरी मुलांना मोकळेपणानी घरी खेळू द्यावं असं पण वाटतं.
त्यांची दप्तरे बघवत नाहीत.
12 Apr 2014 - 12:43 am | यशोधरा
माझ्या एका मैत्रिणीने आपल्या मुलासाठी होम स्कूलिंगचा पर्याय निवडला आहे. तिच्याशी बोलताना समजलं की पुण्यामध्ये बर्याचजणांनी सद्ध्या हा पर्याय निवडला आहे आपल्या पाल्यांसाठी.
12 Apr 2014 - 1:04 am | अनन्त अवधुत
म्हणजे होम स्कूलिंग साठी कोठे नोंदणी करावी लागते का?
अभ्यासक्रमाचे तपशील कोठे आणि कसे ठरतात?
परीक्षा कोठे देणार?
पालकांचा अथवा जो कोणी शिक्षक आहे त्यांची काही विशिष्ट शैक्षणिक पात्रता हवी का?
12 Apr 2014 - 1:04 am | आत्मशून्य
पण होम स्कूलिंगचा पर्याय निवडणार्यांचे अभिनंदन व कौतुक वाटते.
12 Apr 2014 - 2:16 am | अनन्त अवधुत
पण होम स्कूलिंगचा पर्याय निवडणार्यांचे अभिनंदन व कौतुक वाटते.
12 Apr 2014 - 6:18 am | रेवती
त्यांची दप्तरे बघवत नाहीत.
मलाही ती दप्तरे बघवत नाहीत. आजच खांदे दुखण्याची तक्रार आमच्याघरी आलीये.
14 Apr 2014 - 1:17 pm | पिलीयन रायडर
नाही.. मला होम स्कुलींग करायचं नाही..
माझा मुलगा शाळेत जायला हवाच आहे.. कारण शाळेत मुलं अजुन मुलांना भेटतात.. त्यांच्यात जास्त रमतात.. रोज नियमित कुठेतरी ठरल्या वेळेला जाण्याची सवय होते.. आणि जगात आपण एकमेव मुल नाही ह्याची जाणिव होते!
माझा मुद्दा असाय की माझा मुलगा तसाहि ८ तास पाळणाघरात असतो.. तिथेही त्याला अभ्यासक्रम आहेच.. कदाचित शाळेएवढा भरीव नसेल पण बेसिक शिकवत आहेतच.. मग आणखिन "शाळा" म्हणुन वेगळ्या ठिकाणी पाठवायची खरच गरज उरते का? अभ्यासक्रमातला फरक मी घरी भरुन काढु शकेन आणि शाळेचे बाकी फायदे पाळणाघरात आहेतच..
होम स्कुलिंग बद्दल मितान सांगु शकेल..
10 Apr 2014 - 6:27 pm | रेवती
नुकत्याच झालेल्या पेनसिल्वेनिया स्टॅबिंग केसमुळे कालची संध्याकाळ मुलाला इंन्स्ट्रक्षने देण्यात गेली. शिवाय माझा मुलगा व त्याचा मित्र एकदा बंदुकीबद्दल (सहज) बोलत होते तरी ते ऐकून एकाने तक्रार केली व आम्हाला शाळेकडून तसे कळवण्यात आले होते. त्यावेळी लगेच पोहोचता येण्याचे मह्त्व समजले. नंतर माझा मुलगा व त्याच्या मित्राला ३ दिवस आपापल्या आईवडीलांनी शाळेत सोडावे असे सुचवण्यात आले. त्यामुळे असे बोलणेही लोकांना किती घाबरवू शकते हे त्यांना समजले. आज त्याच्या प्रॉजेक्टचा काही भाग शाळेच्या मैदानावर जाऊन करायचा आहे तरी मला धाकधुक वाटत आहे. मागल्या वर्षी कनेटिकट येथे बंदुकीने विद्यार्थ्यांची टीनएजरने केलीली कत्तल, काल परवाचे स्टॅबिंग अशाने शाळेकडून, समाजाकडून आपण, आपल्याकडून मुलांनी, मुलांकडून आपण/ शिक्षकांनी नक्की काय अपेक्षा करावी हेच समजेनासे होते. आता पिक अपला आईवडील पोहोचण्यापूर्वीचा थोडा वेळ मुलांनी शाळेच्या आत उभे राहणे सुरक्षित की बाहेर? काही सुचत नाही. हे असले विचार डोक्यात होते म्हणून पहाटेच दचकून जाग आली.
10 Apr 2014 - 6:39 pm | पिलीयन रायडर
बापरे.. इतकी भीती आहे तिकडे पालकांच्या मनात...
अवघड आहे असं तर मग..
10 Apr 2014 - 6:45 pm | रेवती
सतत भीतीच असते असे नाही पण काही घडले की बरेच दिवस काळजी करण्यात आणि घेण्यात जातात. लहान मुले निदान आपल्या नजरेसमोर असतात पण मोठ्या मुलांना सारखे घरात बांधून ठेवता येत नाही व ते बरोबरही नव्हे. थोडेथोडे एकटे सोडणे वगैरे करताना जिवाची घालमेल होते. मुलेही नवीन धाडस करू पाहतात.
10 Apr 2014 - 6:48 pm | शुचि
खरं आहे. कालच मुलगी म्हणत होती की १६ वर्षाची झाली की ती कार शिकणार्/चालवणार वगैरे. मी एकदम काळजीची प्रतिक्रिया दिली. त्यावर ती म्हणते - Mama, you cannot keep me kid all the time.
मी म्हटलं - Unfortunately not :(
10 Apr 2014 - 6:56 pm | मार्मिक गोडसे
३० एक वर्षापूर्वी मी आणि मा़झे काही मित्र एका 'सिंहांच्या' मंडळाचे नाममात्र वर्गणी भरुन 'छावा' सदस्य झालो. वैद्यकिय शिबिरे, अपंगांना चाकांची खुर्ची वाटप अशी अनेक सामाजिक कार्यक्रमात आम्ही छावे भाग घ्यायचो. सिंह् सदस्य हे समाजातील सर्व थरातील प्रतिष्ठित व्यक्ति होत्या, त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करायला मजा वाटत होती. आजुबाजूचे आमच्याकडे आदराने बघायचे. एकदा एका अनाथाश्रमाला मदतीच्या कार्यकामाला आम्ही गेलो होतो, अनाथाश्रमातील मुलींनी सांस्क्रुतिक कार्यक्रम सादर केले. कार्यक्रम आटोपल्यावर आश्रमातील महिला कर्मचार्याबरोबर आमचे 'सिंह' सभासद एका खोलीत मिटिंगसाठी गेले व दरवाजा बंद केला . थोडया वेळाने एका महिलेबरोबर आश्रमातील १०-१२ तरुण मुली त्याच खोलीत शिरल्या व दरवाज्या आतून बंद केला. बराच वेळ झाला तरी मिटिंग संपत नव्हती, आमच्यातील एकाने कुतूहल म्हनून त्या खोलीकडे गेला व दरवाज्याच्या फटितून आत बघितले, त्याने हळुच आम्हाला खुणेने बोलावले, आम्ही फटितून जे काही बघितले ते पाहुन आम्हालाच शरम वाटली. जे हात एरवी सराईतपणे शस्त्रक्रिया करत तेच हात आज कोवळ्या शरिरावरुन फिरत होते. आश्रमाच्या मदतीच्या बदल्यात तेथील महिला व्यवस्थापक मंडळाने कोवळ्या कळ्या कुस्करायला मदत केली. त्या मुली सुरक्षित हातात नव्ह्त्या.
आम्ही सर्वकाही चोरुनच बघितले होते, व जाब विचारण्याईतके 'मोठे' ही झालो नव्हतो. हळूहळू आमच्यातील एक एक छावा मंडळ सोडू लागला शेवटी फक्त सिंह्च उरले, सिंह कसले लांडगेच होते ते.
पालकांच्या पंखाखाली जी मुले सुरक्षित नाहीत तेथे अनाथ मुलांची सुरक्षितता कोणाच्या भरोशावर सोपवावी ?
10 Apr 2014 - 6:58 pm | पिलीयन रायडर
अहो .. वाचुन धडधडतय मला.. तुम्ही का नाही तक्रात केलीत?? का नाही पोलीसात कळवलत? किती भयंकर गोष्ट आहे ही.. मला लिहीतानाही त्रास होतोय..
10 Apr 2014 - 7:02 pm | पैसा
...
11 Apr 2014 - 10:50 pm | खटपट्या
बापरे. खूपच भयानक आहे.
तुम्हाला तो लांडग्यांचा क्लब माहित असेल तर अजून सुद्धा तुम्ही त्यांचा बुरखा फाडू शकता.
12 Apr 2014 - 12:24 am | बहुगुणी
तुमची खात्रीपूर्वक माहिती पोलिसांना/ महिला आयोगाला कळवा; ती कळवल्याने आजही तुम्ही काही अश्राप स्त्रियांना वाचवू शकता (ती न कळवल्याने मात्र अजाणता तुम्ही त्यांच्या शोषणात सहभागी व्हाल!)
(त्या 'संस्थे'चं नाव इथे जाहीर करण्याचं टाळा; मिपा व्यवस्थापनाला विनाकारण बदनामीकारक मजकूर पसरवण्याबद्दल गोत्यात येऊ शकेल असं वाटतं.)
13 Apr 2014 - 4:33 pm | मार्मिक गोडसे
तुमचे म्हणणे मान्य आहे. ३० एक वर्षापुर्वीची ही घटना. आमच्यातील एका मित्राला समाजसेवेची आवड होती, तो घुसला त्याने आम्हालाही खेचले. आमच्यामध्ये सक्रिय कार्यकर्ते कमी व माझ्यासारखे खोगिरभरती कार्यकर्ते जास्त होते. मोठ्या होटेलातील मिटिंग व तेथिल मेनुचे आकर्षण अधिक. त्या वयात अशा घटना हाताळण्याचे कौशल्य निदान माझ्याकडे तरी नव्हते.
परंतु १० वर्षापुर्वी आमच्या रहिवासी सोसायटित एकाने अनधिकृत ट्रांसपोर्ट सुरु केले होते. त्यांच्या कामगारांमुळे सोसायटितील माहिलांना त्रास होत असे. तक्रार करुनहि सोसायटीने कोणतीहि कारवाही केली नाहि. अखेर मी व माझ्या वडिलांनी एके दिवशी त्याच्या कर्मचार्यांना शिवागीळ करुन धमकावले. प्रकरण पोलिस स्टेशन पर्यंत गेले. व तेथेच मिटले. व ते कार्यालय कायमचे बन्द झाले. सोसायटितील महिला सुरक्षित झाल्या.
त्या पापातून थोडं तरी मुक्त झालो. परंतू अपराधि भावना कायम आहे. तुम्ही जाणीव करुन दिल्यापासून ती अधिकच वाढली.
12 Apr 2014 - 11:29 pm | आत्मशून्य
रच्याकने कंच्या गावच्या कट्याची गोश्ट हाये ही ? न्हाइ लै परतिषीस्टीत लोग्जस या कट्याचे सडस्य गावोगावी असतात म्हणौन इचारले.
11 Apr 2014 - 9:09 am | मदनबाण
आपल्या देशातील *** राजकारणी !
बलात्कार करणाऱ्याला फाशी कशाला द्यायला हवी-मुलायम
यालाच म्हणतात "यादवी माजणे". माझा आपल्या देशातील राजकारण्यांवर राग या आणि अशाच अनेक कारणांसाठी आहे.ही राजकारण्यांची हरामखोर अवलाद आपल्याच देशातील जनतेचे आणि देशाचे लचके तोडण्यास बसलेली आहे.
11 Apr 2014 - 10:29 am | पैसा
आरोपी (गुन्हेगार) एका विशिष्ट धर्माचे असल्याने हे सेक्युलर मसीहा असले बोलत आहेत. मुल्ला यम सिंगांचा इतिहास बघता ते स्त्रियांबद्दल सहानुभूतीसुद्धा बाळगून कधीच राहिले नव्हते. त्यांच्या स्वतःच्या २ बायका अनेक वर्षे एकाच वेळी जिवंत होत्या. या लोकांना सामान्य लोकांचे कायदे लागू होत नाहीत बहुतेक. त्यांची पहिली पत्नी प्रदीर्घ मानसिक आजरानंतर कोणत्याही उपचारांशिवाय २००३ साली वारली. त्यांच्याकडून कसल्या अपेक्षा करायच्या? :(
11 Apr 2014 - 11:01 pm | आजानुकर्ण
कुठल्या बलात्कार खटल्यातील आरोपी एका विशिष्ट धर्माचे आहेत?
(मुलायमची प्रतिक्रिया मूर्खपणाची आहे हे अधोरेखित करतो.)
राजकारणी लोकांच्या बायकांबाबत सहमत. मुलायम-करुणानिधीसारखे दोनदोन बायका करतात किंवा इतर नेत्यांसारखे असलेल्या बायकांना परित्यक्ता करतात.
11 Apr 2014 - 11:34 pm | पैसा
मतांसाठी कायपन! आणि खाजगी वागणूक कशी असेल ते मात्र कोणी विचारू नये. सामान्य लोकं बसतात भांडत, अमका पक्ष बरा आणि तमका नेता वाईट म्हणत. :(
11 Apr 2014 - 11:42 pm | आजानुकर्ण
मूळ आक्षेप विशिष्ट धर्माचेच लोक जास्त बलात्कार करतात व मुलायम अशा धर्मीयांची मते मिळवू पाहण्यासाठी बलात्काराचा गुन्हा सौम्य करु पाहतो या (व अशा सौम्यीकरणाला विशिष्ट धर्माचे लोक बळी पडून व मतेही देतील असे गृहितक असणाऱ्या) आरोपाला आहे. पुण्यातील मुलीसंदर्भात झालेला प्रकार किंवा मुंबई/दिल्लीतील घटना यात या एका विशिष्ट धर्माचेच लोक जबाबदार होते असे आढळले नाही.
खाजगी वागणूक कोणाचीही विचारु नये. मोदी असो वा मुलायम हे मान्य.
11 Apr 2014 - 7:41 pm | शुचि
http://www.cnn.com/2014/04/11/world/europe/vatican-pope-sex-abuse/index....
चर्चच्या पाद्र्यांनी लहान मुलांचे जे लैंगिक शिषण केले, त्याबद्दल पोपने माफी मागितली व हेही सांगीतले की गुन्हेगारांना शिक्षा होइल व असे प्रकार झाल्यास चर्चवर निर्बंध घातले जातील, यापुढे चर्च कर्मचार्यांना ट्रेनिंगही देण्यात येईल.
12 Apr 2014 - 3:00 am | अगोचर
लहान मुलामुलिंना काय शिकवावे आणि कसे शिकवावे या बद्दल माहिती इथे आहे
12 Apr 2014 - 8:34 am | माहितगार
या धाग्यावर आलेले काही प्रतिसाद 'काळजी घेणे' पेक्षा 'काळजी करणे' कडे झूकलेले वाटतात त्यात काही ठिकाणी सेपरेशन अँक्झायटीही दिसते. समस्या असतात नाही असे नाही तरीपण बहुतांश वेळा बहुतांश जग व्य्वस्थीत चालू असत याचा नकारात्मक बातम्यांच्या भडीमारा खाली विसरही पडू देऊ नये. आयूष्यात जोखीम ही सर्वत्र असते ती दारी असते तशी घरीही असते. जोखीमीच्या स्थिती कशा हाताळाव्यात याचे प्रशिक्षण महत्वाचे.
सांगण्याचा उद्देश प्रोटेक्शन आवश्यक असतेच पण केअर अँड प्रोटेक्शन ओव्हरप्रोटेक्शन मध्ये एंड अप होऊ नये. बंधने घालताना मुले त्यांच्या नैसर्गिक विकासापासून वंचीत होणार नाहीत धीट होतील याचा समतोलही सर्व पालक पाहतच असतात तरी पण एक स्मरण करणे गरजेचे म्हणून हा प्रतिसाद
12 Apr 2014 - 8:58 am | अप्पा जोगळेकर
रोज एक वैताग देणारी गोष्ट कळतेच. लहान मुलाला किंवा मुलीला थेट चॉकलेट न देता पालकांकडे देण्याची प्रथा मी माझ्यापुरती सुरु केली ती याच कारणामुळे. पण जर फक्त आई - मूल दोघेच असतील तर पंचाईत. म्हणजे आईचा भलताच गैरसमज व्हायचा आणि फटके पडायची वेळ येईल.