ट-२० विश्वचषक स्पर्धा

श्रीगुरुजी's picture
श्रीगुरुजी in काथ्याकूट
21 Mar 2014 - 10:28 pm
गाभा: 

ट-२० विश्वचषक स्पर्धा बांगलादेशात सुरू झाली आहे. स्पर्धेत एकूण १० संघ आहेत.

गट १ - श्रीलंका, इंग्लंड, द. आफ्रिका, न्यूझीलँड, नेदरलँड्स
गट २ - भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज, बांगलादेश

पहिला सामना भारत व पाक यांच्यात २१ मार्च रोजी आहे.

३ व ४ एप्रिलला उपांत्य फेरीचे सामने असून एप्रिलला अंतिम सामना आहे.

प्रतिक्रिया

देव मासा's picture

21 Mar 2014 - 10:36 pm | देव मासा

आताच भारत- पाक सामना पाहिला , स्टंप मध्ये लाइट ( दिवे) भरले आहेत, या आधी असे मी पहिले न्हव्ते , याला काय म्हणतात ?

श्रीगुरुजी's picture

21 Mar 2014 - 10:43 pm | श्रीगुरुजी

आजचा उद्घाटनाचा सामना भारताने जिंकून शुभारंभ केलेला आहे.

पैसा's picture

23 Mar 2014 - 3:24 pm | पैसा

श्रीगुरुजी, सामना झाला की इथे त्याचे अपडेट्स द्या! सामना कसा झाला इ. इ. म्हणजे लोकांना एकाच जागी त्यावर चर्चा करता येईल!

श्रीगुरुजी's picture

23 Mar 2014 - 9:05 pm | श्रीगुरुजी

आजचा पाकडे वि ऑस्ट्रेलिया हा सामना जबरदस्त झाला. पाकड्यांनी १९१ धावांचा डोंगर रचल्यावर ऑस्ट्रेलियाने पहिल्याच षटकात वॉर्नर व वॉट्सनला गमावले. २ षटके संपली तेव्हा ऑस्ट्रेलिया २ बाद १० होते व १० षटके संपल्यावर धावसंख्या २ बाद ११७ इतकी प्रचंड होती. मॅक्सवेलने तुफानी फटकेबाजी करून ३३ चेंडूत ७४ धावा केल्या. शेवटच्या १० षटकात ऑस्ट्रेलियाचे ८ गडी शिल्लक होते व फक्त ७५ धावा हव्या होत्या. त्याचवेळी अचानक ऑस्ट्रेलियाने नांगर टाकला. १२ व्या षटकात मॅक्सवेल बाद झाल्यावर पारडे फिरले व शेवटी ऑस्ट्रेलियाला सामना मोठ्या फरकाने हरावा लागला. अत्यंत मजबूत स्थितीतून सामना हरल्यामुळे ऑस्ट्रेलियाची चीड आली.

पैसा's picture

26 Mar 2014 - 4:42 pm | पैसा

मॅच फिक्स केलेली होती की काय??

श्रीगुरुजी's picture

23 Mar 2014 - 9:07 pm | श्रीगुरुजी

भारताने विंडीजला १२९ धावात रोखले आहे. भारताला अगदी सहज विजय मिळविता येईल. जर १६ षटकांत सामना जिंकला तर बोनस गुणसुद्धा मिळेल.

खेडूत's picture

23 Mar 2014 - 9:15 pm | खेडूत

पहात होतो, अगदी सहज शक्य असलेली संधी घालवली.

दुसऱ्या सामन्यात भारत विंडीज विरुद्ध खूप चांगल्या स्थितीत आहे. धोन्याने शेवटचे षटक भुवनेश्वर ला का दिले नाही हे कळले नाही ३-०-३-० असे विश्लेषण असून!
जडेजा ने २१ धावा दिल्या. १२९/७

भारत १८/ १९ षटकात सहज जिंकेल असे वाटतेय! नेट रन रेट चांगला ठेवावाच लागेल. ३८/१ (५)

उपास's picture

23 Mar 2014 - 9:27 pm | उपास

भुवनेश्वर कुमारला का दिली नाही शेवटची ओव्हर अनाकलनीय आहे.. त्याला सराव हवाच शेवटच्ञा ओव्हरच्या प्रेशरचा.. जडेजाला कुठे बॉल पिच करावा हेच कळत नव्हतं शेवटी!
पाकिस्तानच्या सईद अजमल ने मस्त टाकली बॉलिंग ऐन प्रेशरच्या वेळी.. मजा आली!

तुमचा अभिषेक's picture

24 Mar 2014 - 9:16 am | तुमचा अभिषेक

धोन्याने शेवटचे षटक भुवनेश्वर ला का दिले नाही हे कळले नाही ३-०-३-० असे विश्लेषण असून!
>>>>>>>>>>>>

त्याला शेवटचे षटक असेही द्यायचे नसल्यास तिथेच त्याची ४ षटके नवीन चेंडूवर संपवायला हवीत, खास करून जेव्हा त्याला खेळपट्टीकडून कालच्यासारखी मदत मिळत असताना.. अर्थात धोनीही चुकला असे म्हणू शकत नाही, २०-२० चे डावपेच म्हटले की काही पत्ते हातात ठेवावे लागतात, पुढेमागे गरज पडेल म्हणून.. पण आजवर भुवनेश्वर कुमारच्या ओवर शिल्लक ठेऊन त्याने शेवटच्या ओवरमध्ये काही भरीव केलेय असे घडले नाहीये..

खेडूत's picture

23 Mar 2014 - 10:15 pm | खेडूत

जिंकले एकदाचे.
पण ज्या प्रकारे खेळायला पाहिजे तसे नाही खेळले .
विसाव्या ओव्हर पर्यंत खेळत बसले!

उपास's picture

23 Mar 2014 - 10:18 pm | उपास

कधी शिकणार आपण समोरच्याला चिरडायला..
युवीला बॅटींग प्रॅक्टीस द्यायला खेळत होतो असं वाटलं.. ते ही जमलं नाही त्याला शेवटी!
आज पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाच्या शेपटीवर पाय दिलाय.. जबरदस्त बॅटींग लायन अप आहे ऑस्ट्रेलियाची.. त्यांच्याबरोबरची मॅच मोठ्या फरकाने हरलो तर जड जाऊ शकेल आपल्याला.. धोनीची तरी तिच इच्छा दिसतेय!

अत्रुप्त आत्मा's picture

24 Mar 2014 - 8:46 am | अत्रुप्त आत्मा

कालची आपली म्याच ठिकठाक झाली... पण आमच्या खाणकामगार-ह तोडी MAN ख्रिस गेल नी निराशा केली. :-/
३३ चेंडुत ३४ धावा,मंजे नुस्त आचमन करुनच पळाला. :-/
निदान सूर्याला ३/४ अर्घ्य तरी द्यायला हवी होती! :D
दु...दु... खवट! :-/

भारत विरुद्ध वेस्ट इन्डीज हा कालचा सामना. युवराजचा आत्मविश्वास हा त्याचा सगळ्यात मोठा प्लस point, पण काल तो कुठेच दिसला नाही.किती चान्चपडत खेळत होता. मला वाटत युवराज सम्पलाय आत्ता.

श्रीगुरुजी's picture

24 Mar 2014 - 1:00 pm | श्रीगुरुजी

कालचा भारत वि विंडीज सामना अत्यंत कंटाळवाणा झाला. त्यातुलनेत पाकडे वि ऑस्ट्रेलिया सामना अत्यंत चुरशीचा झाला. विंडीजच्या सामान्य गोलंदाजीसमोर १६ षटकात १३० धावा करून सामना जिंकला असता तर बोनस गुण मिळाला असता. पहिल्या ८ षटकात भारताने ६४ धावा केलेल्या होत्या. पण नंतर कुठेतरी माशी शिंकली (युवराज १९ चेंडूत फक्त १० धावा) आणि भारताला १३० धावा करायला तब्बल १९.४ षटके लागली. निव्वळ धावगतीतही भारत फार पुढे गेला नाही आणि बोनस गुणसुद्धा नाही.

आज द आफ्रिका वि न्युझीलँड आणि श्रीलंका वि नेदरलँड्स हे सामने आहेत. श्रीलंका आवडत नसल्याने नेदरलँड्स जिंकावे व श्रीलंका हरावे अशी इच्छा आहे. द आफ्रिका व न्यूझीलँड हे दोन्ही संघ आवडत असल्याने दोघांपैकी कोणीच हरू नये असे वाटते.

श्रीगुरुजी's picture

25 Mar 2014 - 5:12 pm | श्रीगुरुजी

काल न्यूझीलँड वि द. आफ्रिका सामना कमालीचा चुरशीचा झाला. जवळपास पूर्णपणे गमावलेला सामना डेल स्टेनने शेवटच्या षटकात अत्यंत प्रभावी गोलंदाजी करून खेचून आणला. न्यूझीलँडला शेवटच्या षटकात फक्त ७ धावा हव्या असताना स्टेनने ६ पैकी ५ चेंडूवर एकही धाव न देता २ फलंदाज बाद करून सामना जिंकून दिला.

आतापर्यंत द. आफ्रिकेचे दोन्ही सामने अत्यंत चुरशीचे झाले आहेत. पाकडे वि ऑसीज हा सामना देखील भन्नाट होता. त्यातुलनेत भारताचे दोन्ही सामने कंटाळवाणे झाले.

आज विंडीज वि बांगलादेश अशी लढत आहे. विंडीजच्या खेळाडूत पहिल्या सामन्यात अजिबात उत्साह दिसला नाही. सर्व खेळाडू कमालीचे मरगळलेले दिसत होते. निदान यापुढील सामन्यात तरी विंडीजची स्फोटक फलंदाजी बघायला मिळावी.

आनन्दा's picture

1 Apr 2014 - 12:25 pm | आनन्दा

भारताची मॅच जर शेवटच्या शटकापर्यंत लांबली तर मॅच चांगली झाली नाही, आणि बाकीच्यांची मॅच जर शेवटच्या षटकापर्यंत ताणली गेली तं मात्र "चुरशीची" :?

आत्मशून्य's picture

26 Mar 2014 - 1:28 am | आत्मशून्य

स्पर्धा आहे राव...

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

26 Mar 2014 - 4:15 pm | निनाद मुक्काम प...

सध्या भारतात राजकीय क्रीडा प्रकार तुफान लोकप्रिय झाला आहे. सगळीकडे त्याबद्दल चर्चा आहे.
केजू , नमो पुढे धोनी व विराट चा पाडाव लागत नाही आहे.
भारतीय राजकारणाचा हा परिवर्तनाचा, उत्कर्षाचा ,काळ की
भारतीय क्रिकेट चा अतिपरिचयात अवज्ञा अशी अवस्था झाली आहे हेच कळत नाही.

श्रीगुरुजी's picture

26 Mar 2014 - 5:25 pm | श्रीगुरुजी

गेल काल गुडघेदुखीमुळे अत्यंत हळू खेळला (४८ चेंडूत ४८ धावा). बर्‍याच वेळा २ धावा मिळत असताना एकच धाव पळून काढली. त्याला अशा अवस्थेत संघात घ्यायलाच नको होते. इतरवेळी गेलची फलंदाजी म्हणजे फटाक्यांची १० हजारांची माळ. पण काल गेल लवंगीच्या सरातले एक एक लवंगी वेगळे काढून उडवत होता.

श्रीगुरुजी's picture

28 Mar 2014 - 12:39 pm | श्रीगुरुजी

कालचे दोन्ही सामने अत्यंत चुरशीचे झाले. लिंबूटिंबू नेदरलॅण्ड्सने बलाढ्य द आफ्रिकेच्या तोंडचे पाणी पळविले होते. आफ्रिकेची अवस्था ८.५ षटकांत ८३ धावा इतकी मजबूत होती. पण शेवटी २० षटकांत त्यांना केवळ १४५ ची मजल मारता आली. नेदरलॅण्ड्सने जबरदस्त फलंदाजी करत सामना आवाक्यात आणला होता. त्यांना शेवटच्या ८ षटकात फक्त ३४ धावा हव्या होत्या व फक्त ४ खेळाडूच बाद झाले होते. तिथूनच नेदरलॅण्ड्सने कच खाल्ली आणि सामना ६ धावांनी गमावला.

दुसरीकडे श्रीलंकेच्या १८९ या बलाढ्य धावसंख्येचा इंग्लंडने यशस्वी पाठलाग करून सामना जिंकला. २ बाद ० अशा वाईट अवस्थेतून सामना जिंकला.

'अ' गटात जबरदस्त चुरस निर्माण झाली आहे. नेदरलॅण्ड्स बाहेर गेल्यातच जमा आहे (लागोपाठ २ पराभव). पण इंग्लंड व न्यूझीलँडने प्रत्येकी १ विजय व १ पराभव मिळविलेला आहे. श्रीलंका व आफ्रिकेने २ विजय व १ पराभव अशी आघाडी घेतलेली आहे. प्रत्येक संघाचा अजून किमान १ सामना शिल्लक असल्याने चांगलीच चुरस आहे.

आज ऑसीज वि विंडीज आणि भारत वि बांगला अशी लढत आहे. बांगला किंवा ऑसीज किंवा विंडीज आजचा सामना हरले तर बहुतेक त्यांच्या आशा संपुष्टात येतील.

श्रीगुरुजी's picture

30 Mar 2014 - 3:10 pm | श्रीगुरुजी

भारत आणि द. आफ्रिकेचा उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित झाला आहे. त्याचवेळी बांगलादेश, नेदरलँड्स् व इंग्लंडचे पॅकअप नक्की झाले. 'अ' गटातील श्रीलंका वि न्यूझीलँड या सामन्यातील विजेता हा 'ब' गटातील उपांत्य फेरीत जाणारा दुसरा संघ असेल. 'ब' गटात अजून खूपच चुरस आहे. विंडीजने ३ पैकी २ सामने जिंकले असून त्यांची निव्वळ धावगती खूपच जास्त आहे. पाकडे व ऑसीजचे अजून २ सामने शिल्लक आहेत. पाकने आतापर्यंत १ सामना जिंकला असून १ हरला आहे. ऑसीज दोन्ही सामने हरले आहेत.

विंडीज वि पाकिस्तान सामन्यात जर विंडीज जिंकले तर त्यांचा उपांत्य फेरीत प्रवेश नक्की आहे. जर पाकडे जिंकले आणि पाकडे आज बांगलाविरूद्ध पण जिंकले तर पाकडे पुढे जातील. आज पाकडे बांगलाविरूद्ध हरले तर मात्र विंडीज वि पाकिस्तान सामन्याचा काहीही निकाल लागला तरी बहुतेक विंडीजच पुढे जातील. अर्थात पाकड्यांनी विंडीजला खूप मोठ्या फरकाने हरविले तर पाकिस्तानला संधी असेल.

दुसरीकडे ऑसीजला उरलेले दोन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागतील (भारत आणि बांगलाविरूद्ध). त्याचवेळी पाकडे बांगलाविरूद्ध हरतील व विंडीजला हरवतील अशा आशेवर बसावे लागेल. एकंदरीत ऑसीजला फारच कमी संधी आहे. त्यामुळे बहुतेक पाकडे किंवा विंडीज यापैकी कोणतरी उपांत्य फेरीत येईल.

उपांत्य फेरीत भारत व द. आफ्रिकेच्या बरोबरीने विंडीज व न्यूझीलँड हे संघ उपांत्य फेरीत बघायला आवडतील. पाकडे, ऑसीज व श्रीलंका अजिबात उपांत्य फेरीत येऊ नयेत अशी इच्छा आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Mar 2014 - 6:53 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सामना सुरु होतोय. जिंकलो पाहिजे. युवीचा फॉर्म गेलाय. रन बनने चाहिये उसके.

-दिलीप बिरुटे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Mar 2014 - 7:31 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

49/2 इन 6.4 ओव्हर्स. विराट पोहोचला. युवराज बहरावा अशी माझी इच्छा दोन धावांवर खेळतोय. या नवज्योत सिद्धूचे समालोचन स्वतंत्र धाग्याचा विषय आहे.

पैसा's picture

30 Mar 2014 - 8:51 pm | पैसा

१५९/७ फायनल स्कोअर. युवराज बराच चांगला खेळला. पण ऑस्ट्रेलियाला हरवायला एवढ्या रन्स पुरेशा आहेत का?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Mar 2014 - 9:03 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

युवीच्या करियर साठी आजची खेळी आवश्यक होती आणि तो चांगला खेळला. सुरुवातीला चाचपडत होता मात्र शेवटच्या सहा चेंडूत त्याला फटकेबाजीची संधी होती मला तो फटका बेजबादारीचा वाटला. तोटल 180 व्हायला हवे होते.

160 तसा मोठा स्कोर नाही. AUS 19/1 in 3 overs बघू या कोण जिंकतय रोमांचकारी सामना व्हावा आणि खेळाबरोबर भारत जिंकावा.

दिलीप बिरुटे

श्रीगुरुजी's picture

30 Mar 2014 - 9:31 pm | श्रीगुरुजी

१०.३ षटकांत ६३/६. आज बहुतेक जिंकू. ऑसीज बाहेर पडतील. विंडीज वि पाकडे या सामन्यातील विजेता उपांत्य फेरीत पोहोचेल.

ऑस्ट्रेलिया ६३/६, रथी, महारथी तंबुत गेलेले आहेत.
सामना भारत जिंकेलच असे वाटतयं

७५/७, नामुष्कीजनक पराभव होतो की काय कांगारुंचा!!

तुमचा अभिषेक's picture

30 Mar 2014 - 10:27 pm | तुमचा अभिषेक

ऑट ऑफ फॉर्म युवराजचा फायनल स्कोअर ४३ चेंडूत ६०

४ षटकार आणि स्ट्राईक रेट १४० ..

आजच्या आपल्या डावाचा शिल्पकार

तो जेव्हा खेळतो तेव्हा त्याच्यासारखा स्ट्रोकप्लेअर नाही जगात, तरी आज १०० टक्के फुल फ्लो मध्ये वाटला नाही तो, अन्यथा बाद झाला तो चेंडू पण षटकार असता. तरीही ऑफला मारलेला षटकार भारीच ..

तुमचा अभिषेक's picture

30 Mar 2014 - 10:28 pm | तुमचा अभिषेक

भारत चारही सामने जिंकला, नुसते जिंकला नाही तर क्या बात थाटात जिंकला.
हक्क आहे आपला या विश्वचषकावर !!

पैसा's picture

30 Mar 2014 - 10:53 pm | पैसा

ऑस्ट्रेलिया आऊट ना?

तुमचा अभिषेक's picture

30 Mar 2014 - 10:57 pm | तुमचा अभिषेक

अहो ताई हा सामना खेळायच्या आधीच ते आउट आणि भारत ईन होता. हा सामना केवळ औपचारीकता म्हणून होता.
आता आपल्या गटातून वेस्टईंडिज आणि पाक यांच्यातून जो जि़ंकेल तो सेमीफायनलला जाईल. आणि इन्शाल्लाह पाकिस्तानच जिंकावी अशी ईच्छा, जेणेकरून भारत-पाक अंतिम सामन्याचा थरार अनुभवता येईल. हा विश्वचषक तर आपण असेही जिंकणार आहोतच, पण तेच अंतिम सामन्यात पाकिस्तानला मात देऊन पटकावला तर क्या बात !

पैसा's picture

30 Mar 2014 - 11:30 pm | पैसा

दोन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकले असते तर एक आऊटसाईड चान्स होता त्यांना! पण या ऑस्ट्रेलियात ती जुनी स्पिरीट दिसत नै!

तुमचा अभिषेक's picture

30 Mar 2014 - 11:37 pm | तुमचा अभिषेक

थांबा गुणतालिका समजावतो.

भारताचे ६ गुण असल्याने भारत सेमीमध्ये पोहोचला होता.
पाकिस्तानने दुपारी बांग्लादेशला हरवल्यावर त्यांचे ४ गुण झाले.
वेस्ट-ईंडिजचे देखील अगोदरच ४ गुण झाले आहेतच.
पाकिस्तान-वेस्टईंडिज यांचा आपापसातील सामना बाकी आहे ज्यात जो संघ जिंकणार त्याचे ६ गुण होणार आणि तो संघ भारताबरोबर सेमीमध्ये जाणार. जरी तो सामना अनिर्णित राहिला तरी त्या दोन्ही संघांचे प्रत्येकी ५ गुण होऊन धावगती सरस असलेला संघ अंतिम फेरीत गेला असता.

आता ऑस्ट्रेलिया - दोन सामने दोन पराभव शून्य गुण., उरेलेले सामने कितीही मोठ्या फरकाने जि़ंकले असते तरी यात बोनस गुण नसल्याने टोटल गुण ४ च्या वर गेलेच नसते.. तर ते बादच होते !

पैसा's picture

31 Mar 2014 - 12:36 am | पैसा

मी http://www.misalpav.com/comment/567634#comment-567634 या श्रीगुरुजींच्या प्रतिसादावरून लिहिलं होतं. त्याप्रमाणे ऑस्ट्रेलियाला दोन्ही सामने जिंकून फक्त भागत नाहीय तर आणखीही काही जर-तर अटी पुर्‍या व्हायला हव्या होत्या. म्हणून आऊटसाईड चान्स म्हटलेलं.

तुमचा अभिषेक's picture

31 Mar 2014 - 2:17 pm | तुमचा अभिषेक

ओके ताई, पण त्या पोस्टमध्ये देखील त्यांनी असे म्हटले होते.
<<<<<त्याचवेळी पाकडे बांगलाविरूद्ध हरतील व विंडीजला हरवतील अशा आशेवर बसावे लागेल.>>>>

आणि भारत-ऑस्ट्रेलिया सामना सुरू व्हायच्या आधी दुपारच्या सामन्यात पाकिस्तानने बांग्लादेशला मात देऊन ऑस्ट्रेलियाचे सारे दरवाजे बंद केले होते. :)

चला जाऊद्या आता आपण पुढच्या सामन्यांवर लक्ष केंड्रित करूया

श्रीगुरुजी's picture

31 Mar 2014 - 11:24 am | श्रीगुरुजी

>>> जरी तो सामना अनिर्णित राहिला तरी त्या दोन्ही संघांचे प्रत्येकी ५ गुण होऊन धावगती सरस असलेला संघ अंतिम फेरीत गेला असता.

सामना अनिर्णित राहू शकत नाही. दोन्ही संघांनी समान धावा केल्या तर सुपरओव्हर खेळून सामन्याचा निकाल लावलाच जातो. अर्थात सुपरओव्हर सुद्धा टाय झाली तर काय करणार हे मला माहिती नाही. परंतु दोन्ही संघांनी समान धावा करण्याची शक्यता ५ टक्क्यांहून कमी आहे. त्यानंतर सुपरओव्हर मध्ये सुद्धा समान धावा करण्याची शक्यता अजून तरी ० टक्के आहे (असा अजून एकही सामना झालेला नाही). त्यामुळे एखादा सामना सुपरओव्हरनंतर सुद्धा बरोबरीत सुटण्याची शक्यता अत्यंत दुर्मिळ आहे.

पावसामुळे सामना अनिर्णित / निकालात निघाला तर?

तुमचा अभिषेक's picture

31 Mar 2014 - 2:10 pm | तुमचा अभिषेक

सुपरओवर मला माहीत होतीच, मी देखील पावसावरच पोस्ट टाकली होती.

श्रीगुरुजी's picture

31 Mar 2014 - 5:34 pm | श्रीगुरुजी

ही शक्यता आहेच. ट-२० सामन्यात पावसाने व्यत्यय आणला तरी कमीतकमी ६ षटकांचा सामना खेळविता येतो, ज्यासाठी जास्तीत जास्त १ तास लागेल. याच स्पर्धेत इंग्लंड वि न्यूझीलँड सामन्यात इंग्लंडची पूर्ण फलंदाजी संपल्यावर न्यूझीलँडच्या फलंदाजीची ६ षटके संपल्यावर पावसामुळे पुढे खेळ झाला नाही. त्यावेळी डकवर्थ-लुईस प्रणालीनुसार किवींना विजयी घोषित करण्यात आले होते. त्यामुळे पावसामुळे कितीही वेळ गेला तरी मध्येच एखादा तास मिळू शकतो व त्यात ६ षटकांचा सामना होऊ शकतो.

पण पावसामुळे एकही चेंडू न पडता सामना झालाच नाही तर नक्की काय नियम आहेत याची कल्पना नाही.

तुमचा अभिषेक's picture

1 Apr 2014 - 9:26 am | तुमचा अभिषेक

पाऊस जोरदार झाला आणि मैदानाची लागली तर एक चेंडू होत नाही तिथे तास हि अपेक्षा खूप झाली, खास करून जो खेळ मुळातच ३-४ तासांचा असतो तो पुर्ण धुतला जाणे सहज शक्य असते.

असो,
"""पण पावसामुळे एकही चेंडू न पडता सामना झालाच नाही तर नक्की काय नियम आहेत याची कल्पना नाही."""

काही खास क्लिष्ट नियम नाहीत, बस दोन्ही संघांना एकेक गुण देतात.
जर सामना सेमीचा असेल तर त्यात त्या दोन संघातील जो संघ साखळी सामन्यात आपसात जिंकलाय किंवा ज्याचे तेव्हा जास्त पॉईंट होते, जो आपल्या गटात पहिला होता तो जिंकला असे काहीसे नियम असतात.
फायनलला शक्यतो राखीव दिवस असतो, पण त्यातही सामना न झाल्यास दोघांना सामाईक विजेते घोषित करण्यात येते.
आपण असे श्रीलंकेसह सामाईक विजेतेपद पटकावले आहे मागे एकदा एका आयसीसी स्पर्धेतच.

श्रीगुरुजी's picture

31 Mar 2014 - 11:25 am | श्रीगुरुजी

मला स्वतःला तरी भारताव्यतिरिक्त विंडीज, न्यूझीलँड व द. आफ्रिका हेच संघ उपांत्य फेरीत आलेले आवडतील.

श्रीगुरुजी's picture

1 Apr 2014 - 2:05 pm | श्रीगुरुजी

किवीज काल मूर्खासारखे खेळून बाहेर पडले. गोलंदाजांनी कमावून आणले होते तेच फलंदाजांनी गमावले. नको असलेले लंकन्स उपांत्य फेरीत आले. आज पाकडे हरावेत हीच आकाशातल्या बापाकडे प्रार्थना!

श्रीगुरुजी's picture

1 Apr 2014 - 8:57 pm | श्रीगुरुजी

विंडीज वि पाकडे सामन्यात विंडीजने पहिल्या १५ षटकांत फक्त ८४ धावा केल्या होत्या. पण शेवटच्या ५ षटकांत ८२ धावा चोपून १६६ अशी बर्‍यापैकी धावसंख्या रचली. आता पाकडे ३ षटकांत २ बाद ९ आहेत. विंडीज जिंकायलाच पाहिजेत.

श्रीगुरुजी's picture

1 Apr 2014 - 9:10 pm | श्रीगुरुजी

पाकडे ६ षटकांत ४ बाद १३. उर्वरीत १४ षटकांत ११ च्या धावगतीने १५४ धावा हव्या आहेत.

अत्रुप्त आत्मा's picture

1 Apr 2014 - 10:24 pm | अत्रुप्त आत्मा

पापस्तान खलाsssस!!! =)) सर्व ठार! ८२!!! =))
ए धतड तत्तज तत्तड तत्तड!!! :D

श्रीगुरुजी's picture

2 Apr 2014 - 1:07 pm | श्रीगुरुजी

विंडीज तुफान फॉर्मात आले आहेत. सॅमी प्रत्येक सामन्यात खालच्या क्रमांकावर येऊन जबरदस्त फटकेबाजी करतो. ड्वेन स्मिथ, ड्वेन ब्राव्हो, गेल जोरदार फटकेबाजी करत आहेत. लेंडल सिमन्स आणि सॅम्युअल्स उपयुक्त फलंदाजी करतात. गोलंदाजीत बद्रीची गोलंदाजी खेळणे इतरांना अवघड जात आहे. काल रामदीनने ४ जणांना यष्टिचित करून आपली कमाल दाखवून दिली. एकंदरीत यावेळीसुद्धा विंडीज जिंकण्याची चांगलीच शक्यता आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Apr 2014 - 9:22 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

भारताला जिंकण्यासाठी 18 मधे 23 पाहिजेत रैना आणि विराट जिंकुन देतील ?

दिलीप बिरुटे

अत्रुप्त आत्मा's picture

4 Apr 2014 - 11:21 pm | अत्रुप्त आत्मा

जबराट झाली म्याच! http://www.sherv.net/cm/emoticons/flags/flag-of-india.gif
अश्विनने बॉलिंग मधे धमाल केली ,काय वळत होता बॉल मेल्याचा! आफ्रिकन हुतुतू खेळतायत असं वाटत होतं! =)) आणि कोहोल्याने ४४ बॉलमधे ७२ असं धू धू धुतलं अफ्रिकेला! रहाणे आणि विशेष करून रैनाचा सपोर्टही चांगला होता.शेवटच्या २ ओव्हर मधे धोनीबाबा आणि कोहोल्यामधले कॉमेडी शीन बगायला लै मज्जा आली! http://www.sherv.net/cm/emo/happy/dancing-happy-star-smiley-emoticon.gif

अब आगे.... फायनल मे लंका के साथ टाका भिडनेवाला है। http://www.sherv.net/cm/emoticons/sport/playing-cricket-smiley-emoticon.gif

श्रीगुरुजी's picture

5 Apr 2014 - 12:35 pm | श्रीगुरुजी

आतापर्यंतचे सर्व सामने जिंकून भारत आलाच शेवटी अंतिम फेरीत! अंतिम फेरीत समोर विंडीज/द.आफ्रिका/न्यूझीलँड यापैकी कोणीतरी हवा होता. श्रीलंकेचा संघ मला अजिबात आवडत नाही. नेमके तेच कायम अंतिम फेरीत असतात.

असो. उद्या सहज जिंकू असं वाटतंय. श्रीलंकेची फिरकी आपल्यासमोर चालत नाही. मलिंगा आपल्यासमोर निष्प्रभ ठरतो. २ वर्षांपूर्वी भारताने ३२० धावांचा पाठलाग ४० षटकांच्या आतच करून सामना जिंकला होता. त्यावेळी मलिंगाची ७.२-०-९६-० अशी जबरदस्त धुलाई झाली होती. त्यानंतर तो भारताविरूद्ध कधीच प्रभावी ठरला नाही. आपल्याविरूद्ध फक्त जयवर्धने चांगला खेळतो. बाकी सगळे साधारण आहेत.

गत सामन्यांतल्या आकडेवारीला फारसा अर्थ नाही. हे सगळे शक्यतो आपल्या मनाला सुखावण्यासाठी असतं. :) जुन्या सामन्यांतले खेळाडू बदलले असतात, काही तेच खेळाडु असले तरी पुला खालून / वरुन बरच पाणी गेलेलं असू शकतं.
शेवटी ज्या दिवशी सामना आहे त्या दिवशी सांघीक खेळ कसा होतो, हवामान कसं असेल यावर सगळं आवलंबून आहे.

ते कितीही चांगले खेळले तरी
एक अतिशय समतोल संघ असुन देखील
गेल्या कित्येक मालिकांमध्ये उपांत्य फेरीच्या पुढे जाउ शकले नाहीत.....

श्रीगुरुजी's picture

5 Apr 2014 - 12:57 pm | श्रीगुरुजी

द. आफ्रिकेचं काही कळतच नाही. काल त्यांनी १७२ अशी चांगली धावसंख्या उभारली होती. तरी ते हारले. १५ षटकांत त्यांनी ३ बाद १२७ धावा केल्या होत्या. शेवटच्या ५ षटकात फक्त ४५ धावा केल्या. इतर कोणत्याही संघाने शेवटच्या ५ षटकात किमान ६०-६५ धावा केल्या असत्या. त्यांना किमान १९० धावा करणे सहज शक्य होते. पण तिथेच कच खाल्ली.

दक्षिण आफ्रिकेचं नाव खरं तर बदलून के एल पी डी असं ठेवलं पाहिजे.

खटपट्या's picture

7 Apr 2014 - 3:42 am | खटपट्या

के एल पी डी म्हंजे काय वो ???

बॅटमॅन's picture

7 Apr 2014 - 12:53 pm | बॅटमॅन

खास लम्हे पे धोका ओ ;)

श्रीगुरुजी's picture

6 Apr 2014 - 10:56 am | श्रीगुरुजी

आज भारत बहुतेक जिंकेल. अर्थात आयत्यावेळी काहीही होउ शकते. तरीसुद्धा भारत जिंकण्याची जास्त शक्यता आहे. आज मोहित शर्माऐवजी शमी एवढा एकच बदल अपेक्षित आहे. खरं तर प्रग्यान ओझा संघात हवा होता. पण त्याला १६ जणात नेलेलेच नाही. तो जास्त उपयुक्त ठरला असता. भुवनेश्वरला शेवटची देऊ नयेत. त्यात तो खूप मार खातो. पहिल्या १६ षटकातच त्याची षटके संपवून टाकावीत. धोनीने मागील सामन्यात रैनाला ४ षटके दिली होती तर जडेजाला फक्त २. आज तसे होऊ नये.

गो इंडिया गो!

म्हणून भारताने सामना त्यांना बहाल केला नाही म्हणजे मिळवले.....

नाही म्हणजे सचिन निवृत्त होण्याच्या काळात नाही का आपण वर्ल्ड कप आणि आइ.पी.एल. सुद्धा जिंकलो....
अगदी अनपेक्षित रित्या.....

सुहासदवन's picture

6 Apr 2014 - 7:17 pm | सुहासदवन

आणि पहिली बी बॅटिंग घ्यावी लागली.....
गेम पालटणार बहुतेक......
लवकर विकेट गेली नाही म्हणजे मिळवली....

पैसा's picture

6 Apr 2014 - 8:16 pm | पैसा

१६ ओव्हर्स-१११-२ विकेट्स. कै खरं नै.

तुमचा अभिषेक's picture

6 Apr 2014 - 8:23 pm | तुमचा अभिषेक

धोनीचा युवराजला रैनाच्या आधी पाठवायचा निर्णय अनाकलनीय आणि निव्वळ मुर्खपणाचा.
विकेट हातात असून मनासारखा स्कोर होत नाहीये...
युवराजला हिटविकेट करायला सांगा कोणीतरी..

तुमचा अभिषेक's picture

6 Apr 2014 - 8:46 pm | तुमचा अभिषेक

रैना फलंदाजीला आलाच नाही, कोहली शेवटपर्यंत खेळला, धोनी नाबाद आणि तरीही आपला स्कोअर फक्त १३० ... हार्ड टू बिलीव्ह ..
जसे आपण वेस्टैईंडिज आणि पाकिस्तानला हरवले तसे इथे श्रीलंका आपल्याला हरवतील असे सध्यातरी वाटतेय.. आणि तसे झाले तर आज वॉस्सअपवर युवराजच्या नावाचे मेसेज फिरणार असे दिसते.. ज्याचा जबाबदार खरे तर धोनीपण आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 Apr 2014 - 9:49 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

?

श्रीलंकेला 28/28 चला
शुभ रात्री :(

-दिलीप बिरुटे

श्रीगुरुजी's picture

6 Apr 2014 - 9:50 pm | श्रीगुरुजी

लंकेला ६ षटकात फक्त ४७ धावा हव्यात. आपण सामना हरल्यातच जमा आहे. युवराज व धोनी पराभवाचे शिल्पकार ठरतील. युवराजला कायमचा निरोप देण्याची वेळ आलेली आहे. आज तब्बल २१ चेंडू म्हणजे साडेतीन षटके खेळून त्याने फक्त ११ धावा केल्या व त्या सर्व धावा एकेरी धावा होत्या. त्याने मोठे फटके मारायचा प्रयत्न सुद्धा केला नाही. २१ चेंडूत किमान ३० धावा करायला हव्या होत्या. एका बाजूने कोहली चौकार, षटकार मारत १३० पेक्षा अधिक स्ट्राइक रेटने धावा करत असताना दुसर्‍या बाजूने त्याच वेळी, त्याच खेळपट्टीवर, त्याच गोलंदाजांसमोर युवराज झगडत जेमतेम ५० च्या स्ट्राइक रेटने धावा करत चेंडू वाया घालवत होता. २०११ चा युवराज आता राहिलेला नाही.

दुसरीकडे धोनीने देखील ७ चेंडू खेळून ४ धावा केल्या. रैनाच्या आधी युवराजला पाठविण्याचा त्याचा निर्णय अनाकलनीय होता.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 Apr 2014 - 9:56 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

धन्यवाद :(

-दिलीप बिरुटे

श्रीगुरुजी's picture

6 Apr 2014 - 10:10 pm | श्रीगुरुजी

हरलो एकदाचे. शेवट वाईट झाला. इतकी वाईट हार होईल असे वाटले नव्हते.

बॅटमॅन's picture

7 Apr 2014 - 12:14 am | बॅटमॅन

हरलो ते हरलो, डेस्परेट लोकांची अक्कल पहा. काय तर म्हणे १९९६ ला लंका वन डे वर्ल्ड कप जिंकली तेव्हा भाजपा सरकार आले होते, याहीवेळी तसेच होणार =))

अरे पण हेही लक्षात घ्या मूर्खांनो, तो ५० ओव्हरच्या खेळाचा वर्ल्ड कप होता. २०-२० चा वर्ल्ड कप जिंकला तर सरकार अल्पजीवी ठरेल की काय =))

सुहासदवन's picture

7 Apr 2014 - 12:51 am | सुहासदवन

आले भाजपा सरकार तर काय हरकत आहे....वर्ल्ड कप काय नंतर पण जिंकता येइल....

क्या हुआ जो वर्ल्ड कप हार गये यार..
पर अबकी बार मोदी सरकार...

बाबा पाटील's picture

7 Apr 2014 - 11:22 am | बाबा पाटील

भे..... देश हरल्याचे काय नाही,पण मॅच हरलो म्हणून भाजपा येणार असा संबध जर कोणी लावत असेल तर त्याला येड झवे पणा सोडुन दुसरा शब्द नाही.....

धोनीने त्याला बॅटींगला पाठवुन अक्कलशुन्य निर्णय घेतला होता. साला बॅटींग करत होता की झ्झिमा खेळत होता हेच समजत नव्हत.