विनोद

बाळासाहेब चौगुले's picture
बाळासाहेब चौगुले in जनातलं, मनातलं
12 Dec 2007 - 1:17 pm

एक गाव असत. त्या गावाच्या बाजूलाच एक जंगल असत. त्या जंगलात एक वाघ राहत असतो. तो वाघ रोज रात्री गावात येऊन एका बकरीला खात असतो, तसेच गावात हिंसा माजवत असतो. मग गावातले लोक एक सभा घेतात आणि ठरवतात की त्या वाघाला मारायचे... पण मारणार कोण???
मग एक शिकारी येतो तो म्हणतो मी त्या वाघाला मारीन पण मी मागेल ते तुम्ही मला द्यायचे. गावकरी खुश होतात आणि ठरवतात की तो जे मागेल ते देवूया, वाघ मेल्याशी कारण........
तो शिकारी म्हणतो आज रात्री मी त्या वाघाला मारायला जंगलात जाणार. रात्री एक वाजेपर्यंत तुम्हाला 3 गोळयांचा आवाज येईल . तो आवाज आल्याआल्या तुम्ही समजायाच की मी वाघाला मारले, आणि तुम्ही लगेच तिकडे या. पण फक्त एक काम करा मला जाताना एक गायीच कातडे द्या, म्हणजे वाघाला वाटेल गाय आली आणि तो गायीला खायला येईल त्याचवेळी मी वाघाला मरीन.
गावकरी त्याला गायीच कातडे देतात आणि तो रात्री 12 वाजता जंगलात जातो.
1 वाजतात तरी गोलीचा आवाज येत नाही 2 वाजतात 3 वाजतात 4 वाजतात तरीही गोलीचा आवाज येत नाही. शेवटी 5 वाजता गावकरी काय झाल हे बघायला जंगलात जातात.

तेव्हा त्याना आस दिस्त की एका मोठ्या झाडामागे शिकारी घाबरून उभारलेला आहे .एका झाडामागे बंदूक पडलेली आहे. आणि त्यासमोर गायीच कातडे फाटून पडलेले आहे .हे पाहून गावकरी विचारतात काय झाल? वाघ मेला का? त्यावर शिकारी म्हणतो वाघाच काय विचारतय? मला पहिल्यांदा हे सांगा की जंगलात बैल कोणी सोडला???

हे ठिकाण

प्रतिक्रिया

आनंदयात्री's picture

12 Dec 2007 - 1:21 pm | आनंदयात्री

अन वाघाचा रंगपण पिवळा झाला असेल नाही का ?

बाळासाहेब चौगुले's picture

12 Dec 2007 - 1:30 pm | बाळासाहेब चौगुले

आभारी आहे. पण समजले नाही.

विसोबा खेचर's picture

12 Dec 2007 - 1:53 pm | विसोबा खेचर

मस्त! :)

साला गाईला पाहून भलतंसलतं करणार्‍या बैलाचा बाकी पचकाच झाला! :)

तात्या.

दिनेश५७'s picture

12 Dec 2007 - 9:28 pm | दिनेश५७

बैलपण कातडं पांघरलेलाच असता तर?

प्राजु's picture

13 Dec 2007 - 12:55 am | प्राजु

एकदा जंगलात एक माणूस वाट चुकतो. थोडा घाबरलेला असतो. अचानक त्याच्या समोर वाघ येतो. अगदी खराखुरा. तो आणखीच घाबरतो. आणि पट् कन हात जोडून डोळे मिटून रामरक्षा म्हणायला लागतो. मध्येच डोळे उघडून पाहतो तर वाघ समोर उभाच असतो. पुन्हा डोळे मिटून रामरक्षा पूर्ण म्हणतो आणि डोळे उघडून समोर पाहतो..
आता वाघ हात जोडून, डोळे मिटून उभा असतो... आणि काहीतरी म्हणत असतो. वाघाचंही म्हणून होतं...
माणूस म्हणतो.." मला तुझी खूप भिती वाटली म्हणून मी रामरक्षा म्हणत होतो. पण तू काय म्हणत होतास?"
वाघ म्हणतो .." मी 'वदनी कवळ घेता' म्हणत होतो...."............

- प्राजु.

विसोबा खेचर's picture

13 Dec 2007 - 12:57 am | विसोबा खेचर

सही...! :))

गारंबीचा बापू's picture

13 Dec 2007 - 1:50 pm | गारंबीचा बापू

प्राजु,

विनोद आवडला गं.

बापू

सुनील's picture

13 Dec 2007 - 1:45 am | सुनील

"चर्चा", "काव्य" आणि "साहित्य" ह्यांच्या बरोबरीने "विनोद" नावाचा एक कप्पा उघडलात तर सर्व विनोद एकाच ठिकाणी वाचावयास मिळतील.

"मिपा" च्या प्रशासकांनी यावर विचार करावा.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

विसोबा खेचर's picture

13 Dec 2007 - 6:52 am | विसोबा खेचर

"चर्चा", "काव्य" आणि "साहित्य" ह्यांच्या बरोबरीने "विनोद" नावाचा एक कप्पा उघडलात तर सर्व विनोद एकाच ठिकाणी वाचावयास मिळतील.

सुनिलराव, आपल्या सूचनेचं स्वागत आहे. कृपया नीलकंतला पोष्टकार्ड पाठवा ही विनंती...

"मिपा" च्या प्रशासकांनी यावर विचार करावा.

एक नम्र निवेदन! मिपावर 'प्रशासक' या शब्दाला मज्जाव आहे. कृपया 'पंचायत समिती', 'सरपंच' या शब्दांचा वापर करावा! :) प्रशासकबिशासक वगैरे सगळं तिकडे, त्या तिथे पलिकडे! इकडे नाही! :))

आपला,
(प्रशासक या शब्दातच 'मुजोरी' हा अर्थ दडलेला आहे, असा आंतरजालीय शोध लागलेला) तात्या.

गारंबीचा बापू's picture

13 Dec 2007 - 1:53 pm | गारंबीचा बापू

प्रशासकबिशासक वगैरे सगळं तिकडे, त्या तिथे पलिकडे! इकडे नाही! :))

खरं आहे. प्रशासक हा शब्द हल्ली मराठी आंतरजालावर शिवी म्हणून वापरण्यात येतो.

त्यांना तिथंच राहू द्या, त्यांच्या सोवळ्याच्या निर्‍या सांभाळत.

प्रशासक वगैरे भानगड इथे नको.

बापू

बेसनलाडू's picture

13 Dec 2007 - 1:57 pm | बेसनलाडू

त्यांना तिथंच राहू द्या, त्यांच्या सोवळ्याच्या निर्‍या सांभाळत.
हो आणि आम्ही कमरेचे डोक्याला बांधून नंगानाच करतो. म्हणजे 'कपडे घालणे' ही फन्डामेन्टल गोष्ट गेली चुलीत! बरोबर आहे.
(सवस्त्र)बेसनलाडू

विसोबा खेचर's picture

13 Dec 2007 - 2:19 pm | विसोबा खेचर

बेसनलाडवाचा प्रतिसाद येथे अपेक्षितच होता! :)

हो आणि आम्ही कमरेचे डोक्याला बांधून नंगानाच करतो. म्हणजे 'कपडे घालणे' ही फन्डामेन्टल गोष्ट गेली चुलीत! बरोबर आहे.

वर तुम्ही 'आम्ही' असा शब्द वापरलाय. म्हणजे त्यात तुम्हीही आलात का? की तुमच्या व्यतिरिक्त इतर मिसळपाव सभासदांबद्दल तुम्ही बोलत आहात?

एक अवांतर प्रश्न - कमरेचे सोडून डोक्याला बांधून नंगानाच करणे ही गोष्ट आपल्या मते वाईट आहे काय? आणि तसे असेल तर इथे येता कशाला?

अर्थात, हा आपला फक्त आमचा प्रश्न हो! ज्याला मराठीत लिहायची/वाचायची आवड आहे असा कुठलाही मनुष्य इथे अगदी अवश्य येऊ शकतो हे निश्चित!

तात्या.

विसोबा खेचर's picture

13 Dec 2007 - 1:07 pm | विसोबा खेचर

येथील बरेचसे प्रतिसाद गायब झालेले दिसतात. पंचायतीवरील मंडळी जागेवर आहेत म्हणायची! :)

तात्या.

बेसनलाडू's picture

13 Dec 2007 - 1:16 pm | बेसनलाडू

पंचायतीवरील मंडळी जागेवर आहेत म्हणायची! :)
--- पंचायतीवरील मंडळी जागेवर होतीच; जागी होती/आहेत का, हे महत्त्वाचे. मला ती अर्धवट झोपेत/ खोटी खोटी झोपलेली वाटतात.
(जागरुक)बेसनलाडू

मिसळपाव पंचायत समिती's picture

13 Dec 2007 - 1:22 pm | मिसळपाव पंचायत समिती

येथील बरेचसे प्रतिसाद गायब झालेले दिसतात. पंचायतीवरील मंडळी जागेवर आहेत म्हणायची! :)

पंचायतीवरील सदस्यांकडे काही सदस्यांनी व्य नि पाठवून तक्रार केल्यामुळे पंचायतीने आपल्या अधिकारांचा वापर करत येथील काही लेखन आणि त्याला आलेले संबंधित प्रतिसाद उडवले आहेत!

कळावे,
(लोकनियुक्त) मिसळपाव पंचायत समिती.

बेसनलाडू's picture

13 Dec 2007 - 1:25 pm | बेसनलाडू

तक्रार करण्यासाठी व्यनि पाठविणे आवश्यक आहे की जाहीर तक्रार / विनंती करता येईल?
कळावे.
(जाहीर)बेसनलाडू

मिसळपाव पंचायत समिती's picture

13 Dec 2007 - 1:29 pm | मिसळपाव पंचायत समिती

तक्रार करण्यासाठी व्यनि पाठविणे आवश्यक आहे की जाहीर तक्रार / विनंती करता येईल?

जाहीर तक्रार/विनंती/निवेदनही अवश्य करता येईल.

कळावे,
(लोकनियुक्त) मिसळपाव पंचायत समिती.

बेसनलाडू's picture

13 Dec 2007 - 1:46 pm | बेसनलाडू

तत्पर प्रतिसादाबद्दल अभिनंदन आणि अनेक आभार
(आभारी)बेसनलाडू
तक्रार - 'फुकटेगिरी' या शीर्षकाखाली धोंडोपंतांकडून लिहिल्या गेलेल्या किश्शांवर तात्यांचा (विसोबा खेचर या आय डी ने दिलेला) 'शेजारच्या वाड्यातील सून बाळंत...खरवस...चीक मागण्यासाठी जाणे...' इ. असलेला प्रतिसाद सार्वजनिकदृष्ट्या निखालस किळसवाणा, निर्लज्ज, तसेच आणि आक्षेपार्ह आहे. तो लवकरात लवकर काढून टाकण्याची मी समितीला जाहीर नम्र विनंती करतो.
(तक्रारखोर)बेसनलाडू
मागण्या / सूचना - १. आजानुकर्णाच्या खालील प्रतिसादावर सखोल विचार करावा. त्यातील काही ठराविक सदस्यांच्या प्रतिसादांच्या बाबतीत कारवाई होताना पक्षपातीपणा होऊ नये, हा कर्णाचा मुद्दा मला पूर्ण मान्य आहे. आणि असा पक्षपातीपणा येथे होतो, असे माझे निरीक्षण/ठाम मत आहे. असा पक्षपातीपणा लोकशाहीप्रिय(!!) मिसळपावला शोभत नाही, असे वाटते. बाळासाहेब चौगुल्यांच्या काढल्या गेलेल्या एका प्रतिसादात असा स्पष्ट आरोप होता, त्याबद्दलच समितीचे मत काय, हे स्पष्ट करावे.
२. आजानुकर्णाने म्हटल्याप्रमाणे किळसवाणे, अश्लील काय आहे/काय नाही, हे व्यक्तिनिरपेक्ष असेल (मी व्यक्तिशः या मताशी पूर्ण सहमत नाही), तर त्या स्वरूपात नक्की कोणत्या प्रकारचे लेखन बसते, हे समितीने स्पष्ट करावे. त्यासंबंधीची मार्गदर्शिका उपलब्ध करून द्यावी.
पुनश्च धन्यवाद.
(सूचक)बेसनलाडू

आजानुकर्ण's picture

13 Dec 2007 - 1:44 pm | आजानुकर्ण

फुकटेगिरी या लेखाला आलेला एक प्रतिसाद अश्लील असल्याचे बेसनलाडू यांनी जाहीररीत्या कळवले होते व सूचित केले होते. हे पहा http://www.misalpav.com/node/402#comment-5472

मात्र त्या प्रतिसादावर काहीही कार्यवाही न करता बाळासाहेबांच्याच प्रतिसादावर कार्यवाही व्हावी हा दुटप्पीपणा आहे असे कोणा सदस्याला वाटले तर त्याचे पंचायत समिती काय उत्तर देईल याची एक पंचायत समिती सदस्य या नात्याने आम्हाला काळजी वाटते.

ऑल आर ईक्वल बट फ्यू आर मोअर इक्वल असे वाटत नाही का?

(समतोल) आजानुकर्ण

विसोबा खेचर's picture

13 Dec 2007 - 1:49 pm | विसोबा खेचर

विल्मिंगटनच्या काकांनी चांगले कान फुंकले आहेत म्हणायचे! :))

गारंबीचा बापू's picture

13 Dec 2007 - 2:17 pm | गारंबीचा बापू

विल्मिंगटनच्या काकांनी चांगले कान फुंकले आहेत म्हणायचे! :))

काका आणि काकू ,

काका "बिचारा"कामावर तरी जातो पाट्या टाकायला. काकू तर दिवसभर घरी मोकळ्याच.

त्यामुळे हे मार्गदर्शन काकूंकडून येण्याची शक्यता जास्त. बेसनाचे लाडू करता करता "*** रेसिपिज"च्या नावाखाली ह्या पाकक्रिया पण शिकवतात वाटतं.

बापू

बेसनलाडवा,

हलकेच घे रे. अरे ही गंमत चाललेय. तुझ्यावर काही माझा वैयक्तिक राग नाही. तात्याचाही नाही.

रागावू नकोस.

बापू

बेसनलाडू's picture

13 Dec 2007 - 2:26 pm | बेसनलाडू

काका "बिचारा"कामावर तरी जातो पाट्या टाकायला. काकू तर दिवसभर घरी मोकळ्याच.
त्यामुळे हे मार्गदर्शन काकूंकडून येण्याची शक्यता जास्त. बेसनाचे लाडू करता करता "*** रेसिपिज"च्या नावाखाली ह्या पाकक्रिया पण शिकवतात वाटतं.
--- वा! तुम्हाला काकाकाकूंची इत्थंभूत माहिती आहे म्हणायचे :)
तुझ्यावर काही माझा वैयक्तिक राग नाही.
--- धन्यवाद.
तात्याचाही नाही.
--- हे सुद्धा तुम्हाला माहीत आहे?!?!?! कमाल आहे बापू तुमच्या नेटवर्कची ! ;)
(नेटवर्क्ड्)बेसनलाडू

आजानुकर्ण's picture

13 Dec 2007 - 1:28 pm | आजानुकर्ण

सदर तक्रारी मलाही आल्या होत्या. मात्र काय अश्लील आहे व काय नाही हे व्यक्तिनिरपेक्ष असल्याने केवळ काही लोकांच्या तक्रारीनंतर अशी कारवाई करणे योग्य नाही असे मला तरी वैयक्तिकरीत्या वाटते.

हवे असल्यास तसे मतदान घेता आले असते. उद्या अमुकतमुक लेख (उदा. रौशनी) अश्लील आहे अशी मी तक्रार केली तर तो काढला जाणार का?

(तसा तो काढला जाऊ नये असे वाटते.)

सबब पंचायत समितीच्या सदर निर्णयाबद्दल खेद वाटतो.
(सखेद) आजानुकर्ण

बेसनलाडू's picture

13 Dec 2007 - 1:34 pm | बेसनलाडू

समतोल, समयोचित, सूचक आणि मुद्देसूद, तत्त्वनिष्ठ प्रतिसाद. आवडला. अभिनंदन. या प्रतिसादामुळे आणि समितीने जाहीर तक्रार करणे रास्त असल्याचे सांगितल्यास माझ्या एका तक्रारीला पाठबळ मिळेल, असे वाटते.
(आनंदित)बेसनलाडू

गारंबीचा बापू's picture

13 Dec 2007 - 1:30 pm | गारंबीचा बापू

बाळासाहेब चौगुले नावाने वावरणार्‍या व्यक्तिने विनोदाच्या नावाखाली प्रसिद्ध केलेले अत्यंत ओंगळवाणे लेखन पटावरून उडविल्याबद्दल मिसळपाव पंचायत समितीला धन्यवाद.

चावटपणा आणि अश्लीलता यातला फरक त्याला अजून माहीत नाही.

त्याच्या लेखनावर समितीने लक्ष ठेवावे आणि मर्यादांचे उल्लंघन होईल तेव्हा तात्काळ योग्य ती कारवाई करावी अशी मागणी मी करतो.

बापू

गारंबीचा बापू's picture

13 Dec 2007 - 1:43 pm | गारंबीचा बापू

(उदा. रौशनी) अश्लील आहे अशी मी तक्रार केली तर तो काढला जाणार का?

बाळासाहेब चौगुल्याचे अश्लील, फालतू विनोद आणि तात्याची आयुष्यात आलेल्या ज्वलंत अनुभूतींचे चित्रण करणारी उच्च साहित्यिक मूल्य असलेली रौशनी ही लेखमाला, यांची तुलना तुम्हाला कराविशी वाटते, ही कीव करण्यायोग्य गोष्ट आहे.

या दोन गोष्टी कुठल्याच पातळीवर एकत्र येऊ शकत नाहीत हे कृपया लक्षात घ्या.

बापू

आजानुकर्ण's picture

13 Dec 2007 - 1:49 pm | आजानुकर्ण

कोणतीही साहित्यकृती कोणाला कशी वाटेल हा वैयक्तिक अभिरूचीचा व आवडीनिवडीचा प्रश्न आहे. बाळासाहेबांनी ज्या धर्तीचे विनोद सांगितले तसेच विनोद आम्ही मित्रमंडळींना सांगत आलो आहोत. आणि त्यात कोणालाही अश्लील वाटलेले नाही. ही मित्रमंडळी उच्च पदांवर व प्रतिष्ठित आहेत हे आवश्यकता नसतानाही स्पष्ट करतो.

यापूर्वी एक छंदोबद्ध स्वरूपातील कविता येथे प्रसिद्ध झाली होती जी अश्लील आहे असे आमच्या एका मित्राचे मत होते, त्याला आम्ही "ती कविता वाचू नको" हा सल्ला दिला. केवळ निवडून आलेल्या पंचायत समितीची मनमानी चालत असेल तर लोकशाही व हुकूमशाहीमध्ये तत्त्वतः काय फरक राहिला.

(तर्कशुद्ध) आजानुकर्ण

बेसनलाडू's picture

13 Dec 2007 - 1:52 pm | बेसनलाडू

केवळ निवडून आलेल्या पंचायत समितीची मनमानी चालत असेल तर लोकशाही व हुकूमशाहीमध्ये तत्त्वतः काय फरक राहिला.
या तर्कशुद्धतेशी पूर्ण सहमत आहे.
(सहमत)बेसनलाडू

विसोबा खेचर's picture

13 Dec 2007 - 1:58 pm | विसोबा खेचर

या तर्कशुद्धतेशी पूर्ण सहमत आहे.

असणारच!

विल्मिंगटनच्या नाव बदलू पोष्ट्याकाकाचा विजय असो!!

तात्या.

बेसनलाडू's picture

13 Dec 2007 - 2:02 pm | बेसनलाडू

नाव बदलणे आणि नावे ठेवणे यातला फरक सदैव नावे ठेवणार्‍यांना कळेल, अशी तसूभरही अपेक्षा नाही.
(निरपेक्ष)बेसनलाडू

विसोबा खेचर's picture

13 Dec 2007 - 1:57 pm | विसोबा खेचर

कोणतीही साहित्यकृती कोणाला कशी वाटेल हा वैयक्तिक अभिरूचीचा व आवडीनिवडीचा प्रश्न आहे.

धत तेरीकी! थोडक्यात तुला रौशनी आवडलेली नाही हे सांग की स्पष्टपणे! :)

हरकत नाही! तुम्हा मंडळींना जर ती अश्लील वाटत असेल तर रौशनीचे पुढचे भाग माझ्या ब्लॉगवर लिहीन आणि त्याचा दुवा इथे देईन. मला खात्री आहे, इच्छुक लोक तिथे येऊनही वाचतील!

केवळ निवडून आलेल्या पंचायत समितीची मनमानी चालत असेल तर लोकशाही व हुकूमशाहीमध्ये तत्त्वतः काय फरक राहिला.

माझ्या मते पंचायत समिती ही निवडून आलेली आहे हाच मोठा फरक आहे! :)) हुकूमशाही मध्ये कुठले प्रशासन निवडून वगैरे आलेले असते हे मला माहीत नव्हते! हा शोध तुला कसा लागला ते सांगशील का? :)

तात्या.

आजानुकर्ण's picture

13 Dec 2007 - 2:16 pm | आजानुकर्ण

मला रौशनी हे लेखन आवडले की नाही हा प्रश्न नसून कोणाला कोणते लेखन कसे वाटावे याचे काही नियम नाहीत हा मुद्दा आहे. रौशनी ऐवजी मी दुसर्‍या लेखाचे नाव घेऊ शकलो असतो. परंतु रौशनीच घेतले कारण तुम्ही वैयक्तिकरीत्या फारसे मनावर घेणार नाहीत असे वाटले. असो.

पंचायत समिती निवडून आलेली असली तरी दैनंदिन कामामध्ये लोकांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे त्यालाच लोकशाही म्हणता येईल. पंचायत समिती एकदा निवडून आली की त्यांनी कसेही वागावे हे अपेक्षित नसून पंचायत समितीच्या कामकाजावर लोकांचा अंकुश असणे अपेक्षित आहे ही माझ्या मते लोकशाही आहे.

बेसनलाडू's picture

13 Dec 2007 - 2:20 pm | बेसनलाडू

पंचायत समिती निवडून आलेली असली तरी दैनंदिन कामामध्ये लोकांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे त्यालाच लोकशाही म्हणता येईल. पंचायत समिती एकदा निवडून आली की त्यांनी कसेही वागावे हे अपेक्षित नसून पंचायत समितीच्या कामकाजावर लोकांचा अंकुश असणे अपेक्षित आहे ही माझ्या मते लोकशाही आहे.
--- कर्णाशी पुन्हा एकदा सहमत आहे.
(सहमत)बेसनलाडू

विसोबा खेचर's picture

13 Dec 2007 - 2:35 pm | विसोबा खेचर

पंचायत समिती निवडून आलेली असली तरी दैनंदिन कामामध्ये लोकांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे त्यालाच लोकशाही म्हणता येईल.

असहमत आहे!

इथे कुठले लेखन ठेवायचे आणि कुठले ठेवायचे नाही हे ठरवण्याचा पूर्ण अधिकार पंचायतीकडे आहे असे निवडणूकपूर्व वेळोवेळी जाहीर केले आहे. त्यानंतर पंचायतीच्या निवडणुका झाल्या आहेत, त्यामुळे आता मिपाचे दैनंदिन कामकाज लोकांनी पाहावे असे नाही. कदाचित सर्व लोकांना तेवढा वेळही नसेल/नसतो. असं असताना मिपाच्या दैनंदिन कामकाजाची जबाबदारी पंचायतीवरच आहे. त्यात पुन्हा लोकांची ढवळाढवळ उपयोगाची नाही असे मला वाटते! ही लोकशाही आहे, त्यामुळे सध्याच्या पंचायतीचे कामकाज जर लोकांना पसंद नसेल तर मात्र लोक तसा अविश्वास ठराव अवश्य अगदी अवश्य आणू शकतात. त्यानंतर मिसळपाव निवडणूक आयुक्त लोकांच्या बहुमताने आलेल्या अविश्वास ठरावावर योग्य ती कार्यवाही करतीलच!

पंचायत समिती एकदा निवडून आली की त्यांनी कसेही वागावे हे अपेक्षित नसून पंचायत समितीच्या कामकाजावर लोकांचा अंकुश असणे अपेक्षित आहे ही माझ्या मते लोकशाही आहे.

मग आणावा की लोकांनी तसा अविश्वास ठराव! पाडावी सध्याची पंचायत समिती आणि त्यांच्या पसंतीची दुसरी पंचायत समिती पुन्हा एकदा बहुमताने निवडून द्यावी!

तात्या सरपंच.

गारंबीचा बापू's picture

13 Dec 2007 - 2:00 pm | गारंबीचा बापू

बाळासाहेबांनी ज्या धर्तीचे विनोद सांगितले तसेच विनोद आम्ही मित्रमंडळींना सांगत आलो आहोत. आणि त्यात कोणालाही अश्लील वाटलेले नाही. ही मित्रमंडळी उच्च पदांवर व प्रतिष्ठित आहेत हे आवश्यकता नसतानाही स्पष्ट करतो.

तुम्ही वैयक्तिक संवाद आणि व्यासपीठावरील लेखन यात गल्लत करीत आहात. बाळासाहेबांनी त्याचे विनोद त्याच्या खाजगी मित्रमंडळीत, नातेवाईकात अगदी त्याच्या पालकांना जरी ऐकवले तरी त्याला माझी हरकत नाही. हरकत असण्याचे काही कारणच नाही. ते त्याचं वैयक्तिक आयुष्य आहे.

पण जेव्हा एखाद्या व्यासपीठावार तो हे मांडतो तेव्हा त्याला मी आक्षेप घेणारच.

तुम्ही तुमच्या प्रतिष्ठित मित्रमंडळीना बाळासाहेबाच्या विनोदाच्या धर्तीच्या गोष्टी सांगितल्यात तरी माझी काही हरकत नाही. कारण ते तुमचे खाजगी आयुष्य आहे.

बापू

मिसळपाव पंचायत समितीवर जाहिर अविश्वास ठराव

ताबडतोब राजीनामे द्या व निवडणुका घ्या

नहि चलेगी नही चलेगी
दादागिरी नही चलेगी
बेसनलाडु आगे बढो
हम तुम्हारे साथ है

बेसनलाडू's picture

13 Dec 2007 - 2:01 pm | बेसनलाडू

१. समिती लोकनियुक्त आहे. मतदानाचे नियम, स्वरूप स्पष्ट असून त्यांनुसार निवडून आलेली आहे. तुम्हांला माहीत नसल्यास सांगतो.
२. माझ्या नावाने आगे बढोच्या घोषणा देणे निरर्थक, खोडसाळ आणि तार्किकदृष्ट्या चुकीचे आहे, कारण माझा समितीवर अविश्वास आहे, असे मी कोठेही म्हटलेले नाही.
बाकी तुमचे मोर्चे वगैरे चालू द्यात.
धन्यवाद.
(खुलासेवार)बेसनलाडू

अवलिया's picture

13 Dec 2007 - 2:05 pm | अवलिया

समिती लोकनियुक्त आहे. मतदानाचे नियम, स्वरूप स्पष्ट असून त्यांनुसार निवडून आलेली आहे. तुम्हांला माहीत नसल्यास सांगतो

लोकनियुक्त आहे म्हणुन अविश्वास आणता येत नाही असे थोडेच आहे‍.

माझ्या नावाने आगे बढोच्या घोषणा देणे निरर्थक, खोडसाळ आणि तार्किकदृष्ट्या चुकीचे आहे, कारण माझा समितीवर अविश्वास आहे, असे मी कोठेही म्हटलेले नाही

आम्ही तुम्हाला नेता मानुन पुढे नेतो तर तुम्ही पण बारामती सरदाराप्रमाणे शेपुट घालुन पळाले. धत.....

बाकी तुमचे मोर्चे वगैरे चालू द्यात
आता तुम्हीच नाही तर आम्ही काय करणार...

जावु द्या पुढील निवडणुकित पाहु.... कायः)

बेसनलाडू's picture

13 Dec 2007 - 2:08 pm | बेसनलाडू

लोकनियुक्त आहे म्हणुन अविश्वास आणता येत नाही असे थोडेच आहे‍.
लोकनियुक्त आहे म्हणुन अविश्वास आणता येत नाही, असेही मी कुठेच म्हटलेले नाही.
आम्ही तुम्हाला नेता मानुन पुढे नेतो तर तुम्ही पण बारामती सरदाराप्रमाणे शेपुट घालुन पळाले. धत.....
मला नेता माना, असेही मी म्हटलेले नव्हते/नाही किंवा मी नेता आहे, असेही म्हटलेले नव्हते/नाही
(सुस्पष्ट)बेसनलाडू

अवलिया's picture

13 Dec 2007 - 2:11 pm | अवलिया

मी कुठेच म्हटलेले नाही असेही म्हटलेले नव्हते/नाही

काय सगळेच नाही नाही
कधी तरी जबाबदारी स्विकारा हो म्हणा
नाहि नाही नाही

नाना

बेसनलाडू's picture

13 Dec 2007 - 2:13 pm | बेसनलाडू

जे करतो / करेन, म्हणतो / म्हणेन, लिहितो / लिहीन त्याची जबाबदारी स्वीकारतो / स्वीकारेन :)
(जबाबदार)बेसनलाडू

अवलिया's picture

13 Dec 2007 - 2:15 pm | अवलिया

आता तुमीच आमचे नेते
आमची जबाबदारी स्वीकारा

आदेश द्या लवकर

(कार्यकर्ता) नाना

विसोबा खेचर's picture

13 Dec 2007 - 2:02 pm | विसोबा खेचर

चेंगटराव,

तुम्हाला सभासदत्व घेऊन केवळ सहाच मिनिटं झालेली दिसतात! आणि आल्या आल्या बेसनलाडवाला जाहीर पाठिंबा? कमाल आहे बुवा बेसनलाडवाच्या नेटवर्कची! :)

एनीवेज, मिसळपावर हार्दिक स्वागत! :)

आपला,
(निरिक्षक) तात्या.

अवलिया's picture

13 Dec 2007 - 2:07 pm | अवलिया

बेसनलाडु पुचका निघाला
दम नाही
आहे तिथेच रहाणार
गां* मे नही गु और चले हग्गु

आता कोणाला द्यावा पाठींबा हे ठरवतोः)

मिसळपावर हार्दिक स्वागत! :)

बरे वाटलेः)

नाना

गारंबीचा बापू's picture

13 Dec 2007 - 2:23 pm | गारंबीचा बापू

नाना नमस्कार,

अहो मी बापू. अफाट बापू. गारंबीचा.

अण्णा खोताचा दुष्मन.

ओळखलेत का मला?

बापू

अवलिया's picture

13 Dec 2007 - 2:28 pm | अवलिया

तु़झ्या मायला

तुला बरा विसरेन
लेका काय चालु यंदाच्या मोसमात
अरे दे सोडुन दुश्मनी सध्या ज्वाइंट व्हेंचरचा जमाना आहे

तो विसोबा अन बेसनलाडु बघ
इथे मारामारी करतात पण त्यांचे चांगले गुळपीठ आहे
अरे आपण कायतरी शिकले पायजे यांच्याकडुन

कुठे त्या वकिलाला पैसे द्यायचे अन गरीबी पत्करायची
कर विचार

नाना

गारंबीचा बापू's picture

13 Dec 2007 - 2:34 pm | गारंबीचा बापू

नाना,

तुम्ही मारे बेसनलाडवाला एवढा पाठिंबा दिलात पण बेसनलाडू पुचाट निघाला.

त्यानं शेपूट घातलनीत.

बापू

सूचना - मिसळपाव पंचायत समिती सदस्यांना

वर उल्लेख केलेली 'पुचाट' ही कोकणात अत्यंत सोज्वळ शिवी समजली जाते. नाहीतर हे लेखन उडवायचात, त्या डबक्यातल्या प्रशासकाचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन.

नाना तुम्ही पण काहीतरी सांगा आपल्या कोकणी शिव्यांबद्दल.

अवलिया's picture

13 Dec 2007 - 2:40 pm | अवलिया

नाना तुम्ही पण काहीतरी सांगा आपल्या कोकणी शिव्यांबद्दल.

आता काय सांगायच यांना
यांची काय गंमत आहे सांगु काः)

लवंग खावुन तोंड येते अन वेलदोडा खावुन सर्दी होते

मिसळपाव नाव आहे पण यांना मिसळ गुळ घालुन लागते अन नंतर साखर तोंडात टाकतात

चालले आहे त्या मनोगताच्याच वाटंवर ... सगळ कस छान छान ... मज्जाच मजा.

तरी बर आहे सभ्य भाषेत आहेर करता येतात

ते जोवर आहे तोवर मजा आहे नायतर काय खर नाय

नाना

"मिसळपाव नाव आहे पण यांना मिसळ गुळ घालुन लागते अन नंतर साखर तोंडात टाकतात"

याबरोबरच काही विद्नान त्यावर ताक पिणे पसंद करतात......
च्यायला त्यापेक्षा श्रीखंड कावा म्हणाव

नंदा प्रधान's picture

2 May 2008 - 4:00 am | नंदा प्रधान

धोंडोपंत तुमचे हे बापूंच्या आयडीतुन दिलेले प्रतिसाद आपल्याला जाम आवडतात. सोडाहो तो कडमुड्या ज्योतिषी आणि हा गारंबीचा बापू आता बाहेर काढा.

गारंबीचा बापू's picture

13 Dec 2007 - 3:09 pm | गारंबीचा बापू

समारोप....

मंडळी या चर्चेचा समारोप मी करतोय. जोरदार चर्चा झाली. मजा आली.

एक गोष्ट मात्र शंभर टक्के खरी आहे की मिसळपाववरील सदस्यांची उपस्थिती ही तात्याच्या माणसं जोडण्याच्या कलेमुळे आहे.

येथे इतरही प्रतिभावान मंडळी येतात. त्यांचे लेखन करतात. अनुभव सांगतात, भांडतात, आयमाय काढतात, त्यामुळे इथे यायला आवडतं.

हेच मिसळपावच्या लोकप्रियतेचे कारण आहे.

एरव्ही इतक्या कमी कालावधीत इतकी लोकप्रियता दुसर्‍या कुठल्या मराठी संकेतस्थळाला लाभली असेल असे वाटत नाही.

मी सुद्धा इथे येतो तो तात्याच्या मैत्रीमुळेच. मोकळेपणा आहे, आपुलकी आहे, स्नेह आहे.

चार शिव्या द्यायच्या चार घ्यायच्या आणि सर्वांच्या नावानं चांगभलं म्हणून इथून जायचं.

बापू

दिनेश५७'s picture

13 Dec 2007 - 10:50 pm | दिनेश५७

बाळासाहेबांच्या विनोदावर आम्ही दिलेल्या प्रतिसादाचे काय?
केवढा मोठ्ठा फाटा फुटला हा `मधे'च....

काळा डॉन's picture

18 Jan 2009 - 2:20 am | काळा डॉन

पुण्याहून पत्र

प्रिय बाबा, शि. सा. न. वि. वि ..
मी पुण्यात सुखरूप पोहोचलो. इथे बऱ्याच गंमती पाहायला मिळत आहेत.
पुणेकरांचं जुनं वाहन म्हणजे सायकल. आपल्या गावात जसे देवाला सोडलेल्या रेड्याला काही करत नाहीत, तसंच इथे सायकलस्वारांना कोणतेही नियम लागू नाहीत. इथलं सध्याचं वाहन म्हणजे बाइक. त्यांना इंधनबचतीचं महत्त्व खूपच पटलं आहे. त्यामुळे ते दुचाकीवर तीनजण बसतात. सिग्नलपाशी लाल दिवा असला, तरी सहसा थांबत नाहीत. त्यामुळे पेट्रोल जास्त जळते ना. वळताना हात दाखवायचा, तर चौदा स्नायू वापरावे लागतात म्हणे! म्हणून हात दाखवण्याचे कष्ट कुणी घेत नाही. हात दाखवून अवलक्षण व्हायला नको म्हणून रिक्षावाले तर पायानं वळण्याचा इशारा करतात.

इथे सहा प्रवासी बसलेल्या रिक्षांना तीन आसनी रिक्षा म्हणतात आणि दहा प्रवासी बसलेल्या रिक्षांना सहा आसनी रिक्षा म्हणतात. आहे ना गंमत?