निळा पक्षी (बुकोवस्कीची क्षमा मागून)

मनिष's picture
मनिष in जनातलं, मनातलं
10 Feb 2014 - 3:52 pm

बुकोवस्की ३-४ दिवसांपुर्वी अचानकच सापडला, आणि मग त्याने झपाटलेच. अतिशय सरळ, रोजच्या बोलण्यातली भाषा. अगदी रांगडी किंवा कधीतरी शिवराळ म्हणता येईल अशी...रोजच्याच घटना, पण बघण्याचा त्याचा एक 'खास' दृष्टीकोन. बुकोवस्की आजपर्यंत माहित कसा नव्ह्ता हेच कळत नाही. काहिही असो. पण त्याची भाषा, त्याचे अनुभव, त्याचा अविष्कार हे मला खूपच जवळचे वाटले. त्याच्या कवितांशी एक वेगळेच नाते जुळले.

आधी ब्लॉगवर लिहिल्याप्रमाणे बुकोवस्कीची 'Bluebird' वाचली आणि ती फारच खोलवर रुतली. गेल्या वर्षी बुकोवस्की माहितही नव्ह्ता तेंव्हा साधारण तशाच कल्पनेवर आधारीत माझ्या काही ओळी खरडल्या होत्या. आता काल बुकोवस्कीची ब्ल्यूबर्ड वाचल्यावर ते भूत काही मानेवरून उतरत नाही. It is indeed haunting & inspiring poem. त्याच तंद्रीत अजून काही ओळी लिहिल्या आणि ही कविता पुर्ण केली. लिहितांना बुकोवस्कीच्या ब्ल्यूबर्ड चा अनुवाद करायचा नाही किंवा संपुर्ण त्या कवितेवर आधारीत कविता लिहायची नाही हे नक्की होतं. नंतर लिहिलेल्या काही कडव्यांवर अर्थातच बुकोवस्कीचा प्रभाव जाणवेल, पण तरीही ती बर्‍यापैकी स्वतंत्र झाली आहे असं मला वाटतं. बुकोवस्की माहित नसतांना जी कविता मनात जाणवली होती पण शब्दात उतरली नव्हती, ती शब्दबध्द करण्याचा प्रयत्न केलाय...

निळा पक्षी

पाठीवर सारे निळे आभाळ घेऊन,
माझ्या खिडकीत बसलेला निळा पक्षी
गाणे स्वच्छंदी आकाशाचे गातो.

खुर्चीतुन पाहणारा मी,
एक मोठा उसासा टाकून
काँप्युटरवर काम करत बसतो.

एक कॉफिचा मग घेऊन,
कुठलीतरी एक मेल उघडून
मी स्क्रीनकडे बघत राहतो,

निळा पक्षी निळाईतच झेपावतो,
मग खिडकीकडे एक नजर टाकून
मी माझ्या खुर्चीत विसावतो

माझ्या आतले निळे आभाळ,
आणि आत चिवचिवणारा निळा पक्षी
आतल्या आतच हिरमुसतो

मनातले आभाळ डोळ्यात
अजिबात उतरू न देता,
मी सराईतपणे सावरतो.

कधीतरी रात्रीच्या नीरव वेळी
स्वांनंदी गाणारा निळा पक्षी
माझ्या आतच गुणगुणतो

त्याच्या सुरात सूर मिसळून
डोळ्यातल्या पावसात त्याला भिजवून
मी हलकेच त्याला गोंजारतो

एरवी स्वतःला कामात गुंतवून,
आणि जगापासून त्याला लपवून,
मी अगदी इतरांसारखाच वावरतो!

खरंतर ही कविता 'जे न देखे रवी...' मधे हवी होती, पण त्यात माझी इतरही बडबड यात असल्याने 'जनातलं, मनातलं' ह्यातच टाकली. निदान काही लोकं धागा उघडतील तरी! :P

बुकोवस्कीची मुळ कविता ब्ल्युबर्ड इथे वाचता येईल. त्याच्या इतर कवितासुध्दा त्याच साईटवर वाचता येतील.

कविता

प्रतिक्रिया

कवितानागेश's picture

10 Feb 2014 - 4:18 pm | कवितानागेश

छान आहे. :)

बुकोवस्की यांचं काहीही वाचलं नाही आजतागायत - आता वाचते.
परिचय करुन दिल्याबद्दल आभार.

मनिष's picture

11 Feb 2014 - 12:21 am | मनिष

इथे वाचता येईल -
http://hellopoetry.com/charles-bukowski/

सांजसंध्या's picture

26 Feb 2014 - 2:23 pm | सांजसंध्या

हेच म्हणायचं होतं.

पैसा's picture

12 Feb 2014 - 9:06 am | पैसा

मूळ कविता अजून वाचली नाही. पण तुमचं रूपांतर फार आचडलं! अजून लिहा!

आवर्जुन प्रतिसाद देणार्‍या वाचकांचे आभार!

धर्मराजमुटके's picture

26 Feb 2014 - 11:30 am | धर्मराजमुटके

क्षमा कसली मागताय बुकोवस्कीची ? छान आहे कविता.
बुकोवस्कीनेच म्हटयलं ना !
“Find what you love and let it kill you.”

यशोधरा's picture

26 Feb 2014 - 11:42 am | यशोधरा

मस्त :)

मुक्त विहारि's picture

26 Feb 2014 - 11:55 am | मुक्त विहारि

झक्कास

लेख आवडला

सांजसंध्या's picture

26 Feb 2014 - 2:25 pm | सांजसंध्या

बुकोव्हस्कीची कविता माझ्या वॉलवर टाकता येईल का ? (प्रताधिकाराचा उल्लेख नाही म्हणून )

सांजसंध्या's picture

26 Feb 2014 - 2:29 pm | सांजसंध्या

मराठीत निळा पक्षी म्हटलं की त्याचा अर्थ जसा घेतला त्याच अर्थाने बुकोव्हस्कीची कविता वाचली.. पण गंडल्यासारखं वाटतं. इथे ब्ल्यू बर्ड म्हणजे काय समजायचं हे प्लीज सांगा..

हे वाचून बघा - बुकोवस्कीच्या ह्या कवितेचे दीर्घ रसग्रहण आहे -
http://edaportfolio.weebly.com/analysis-of-poetry.html

जर कविच्या नावासकट कविता वॉलवर शेअर केली आणि साईट/ब्लॉगची लिंक दिली तर चालेल असे वाटते.