मुळ्याचे पराठे

स्वाती दिनेश's picture
स्वाती दिनेश in पाककृती
5 Feb 2014 - 6:03 pm

सध्या आमच्याकडे इतकी बेक्कार करडी,ढगाळ,कंटाळवाणी हवा आहे,फारसं करता येण्यासारखं काही नाही म्हणून एखादा जुना हिंदी सिनेमा टाइमपास म्हणून लावावा असं मनात आलं आणि मग तेच केलं..
आणि कोणत्याही पॅकेज डिल मध्ये येतात तसे 'बी ए पास' आणि बेटे के लिए खाँस 'मुली के पराठे','गाजर का हलवा','खीर' इ. इ... आलेच त्याबरोबर..
खूप खूप दिवसात हे 'मुली के पराठे' आपणही केले नसल्याचा साक्षात्कार झाला आणि मग लागलेच मी मुळा किसायला..
तर पेश है हिंदी सिनेमाने फेमस केलेले 'मुली के पराठे'..
साहित्य- मुळ्याचा किस २ वाट्या,
१ लहान सिमला मिरची किसून(हा माझा शोध- भोपळी मिरचीमुळे एक वेगळाच फ्लेवर येतो.)
१ ते १.५ चमचा तिखट,१/२ चमचा हळद,१ चमचा ओवा,१ चमचा धनेपूड,
फोडणीचे साहित्य, तेल, मीठ, डाळीचे पीठ,कणिक

कृती- मुळा किसून घ्या, सिमला मिरची किसून घ्या. त्यात तिखट,हळद,ओवा,धनेपूड,मीठ घालून मिक्स करुन घ्या.
एका कढईत १ ते १.५ टेबल स्पून तेल गरम करुन फोडणी करुन घ्या. त्यात हे मुळ्याचे मिश्रण घाला व परता. अंदाजाने २ ते २.५ चमचे डाळीचे पीठ घालून परता, व झाकण ठेवून वाफ काढा. म्हणजेच चक्क मुळ्याची पीठ पेरुन भाजी करुन घ्या. ती पूर्ण थंड होऊ द्या.
पोळ्यांना भिजवतो तशी कणिक भिजवा.
भाजी गार झाली की पराठे करायला घ्या.
नेहमीच्या पुरीवढ्या दोन पुर्‍या लाटून घ्या. एका पुरीवर सारण घाला. दुसरी पुरी त्यावर ठेवून दाब देऊन बंद करा. हलक्या हाताने पराठा लाटा. तव्यावर तेल सोडून भाजा.
दही+ चाट मसाला, लोणचे, चटणी, सॉस.. हवे त्याबरोबर खा.

.

जोडीला त्याबरोबर हवा असला तर गाजर का हलवा

प्रतिक्रिया

"तुम्हारे फूफाजी को मूली के पराठे बहुत पसंद थे. एक बार मैने बडी मेहेनत कर के उनके लिए बनाए. एक पराठा खा के वो टेबल पे ही चल बसे. एक बार तुम्हारी शादी हो जाय, मै हर रोज तुम्हारे लिए मूली के पराठे बनाऊंगी"

कोणता चित्रपट??

गणपा's picture

5 Feb 2014 - 6:33 pm | गणपा

उत्पल दत्तचा गोलमाल. :)

स्पंदना's picture

17 Feb 2014 - 4:09 am | स्पंदना

तुम उससे शादी करोगी जीसे मै प्यार करता हुं।

फोटो बघून भूक चाळवली.

असले सारणाला आपल्या आतं कैद करुन ठेवलेले पराठे(पुरणपोळ्या आदी पदार्थ ) करायचे तर स्त्रीच्या जन्मालाच यावं लागतं बहुतेक.
आमचं म्हणजे शर्ट्च्या बटणांतुन सुटलेली ढेरी हळुच डोकावावी तसला प्रकार असतो. ;)

परांठे झक्कास. :)

प्यारे१'s picture

5 Feb 2014 - 10:03 pm | प्यारे१

>>>आमचं म्हणजे शर्ट्च्या बटणांतुन सुटलेली ढेरी हळुच डोकावावी तसला प्रकार असतो.

त्याशिवाय काय खाल्लं ते कळणार कसं? ;)
-कुकनं बनवलेल्या सगळ्या पदार्थांची सारखीच चव खाऊन कावलेला आवला आपलं आवले!

असं कसं? असं कसं? पुरणपोळीत व्यवस्थित पुरण भरुनही ते जराही बाहेर दिसू न देणं यात खरं कौशल्य आहे. जे नेहमी बर्‍याचदा आपल्या आदल्या किंवा त्याच्याही आदल्या पिढीलाच अवगत असतं.

(अजूनही पुरण बाहेर न दिसणारी पुरणपोळी बनवायचा प्रयत्न करणारा) सूड ;)

>>>जे नेहमी बर्‍याचदा आपल्या आदल्या किंवा त्याच्याही आदल्या पिढीलाच अवगत असतं.

ह्याच्याशी सहमत!
तुला नाही जमायचं म्हणून घरातली फक्त वयानुसार निवृत्तीकडं झुकलेली बाई तब्बेत बरी नसताना मग पदर खोवते , होत नसताना उसनं अवसान आणते नि काय काय होत रहातं. पोळी आणखीच गोड लागते.
मावळतीकडं ढळता सूर्य हे मुख्य कारण असतं. चक्र सुरुच राहतं...!
असो. नैतर स्वाती तै हाणायची!

सानिकास्वप्निल's picture

5 Feb 2014 - 6:35 pm | सानिकास्वप्निल

आईग्ग्ग्ग्गं कसले दिसतायेत... लगेच खावेसे वाटतायेत :)
पाकृ आवडली +१

दिपक.कुवेत's picture

5 Feb 2014 - 8:01 pm | दिपक.कुवेत

फोटो काय देखणा आलाय. असं वाटतय त्यातला एक पराठा लगेच उचलुन खावा. पराठा बनवायची (नविन) पद्धत पण आवडली. पण सीमला मिरची किसली जाते?

मुक्त विहारि's picture

5 Feb 2014 - 9:40 pm | मुक्त विहारि

पीठातच किसलेला मूळा घालते.

बाकी, तुमची रेशीपी तिला दाखवली.किसलेल्या सिमल्या मिरचीची कल्पना तिला आवडली आहे.

(आता ह्या पीठात ती काय काय किसून घालेल , काही सांगता येत नाही.)

पैसा's picture

5 Feb 2014 - 10:03 pm | पैसा

मस्तच! वेगळा प्रकार! करून बघायला हवेत.

प्यारे१'s picture

5 Feb 2014 - 10:05 pm | प्यारे१

सुंदर दिसत आहेत!

मस्त पराठे ! सिमला मिर्चीचा समावेश आवडला. :)

(खादाड)

अत्रुप्त आत्मा's picture

5 Feb 2014 - 11:39 pm | अत्रुप्त आत्मा

लै भारी स्मायली केल्ये पराठ्यांची.. मी ती खाणार आता! http://www.sherv.net/cm/emoticons/hungry/hungry.gif

http://www.sherv.net/cm/emoticons/eating/lemon-smiley-emoticon.gif

फोटू छान आलाय. ढब्बू मिरची किसून घालण्याची सूचना आवडली. आता अश्याप्रकारे करून पाहीन.

मधुरा देशपांडे's picture

6 Feb 2014 - 12:41 am | मधुरा देशपांडे

मुळा आवडत नाही पण सिमला मिरची सोबत कदाचित चालून जाईल. करून बघायला हवे.

प्रभाकर पेठकर's picture

6 Feb 2014 - 3:33 am | प्रभाकर पेठकर

सारणवाले मुळ्याचे परोठे कधी केले नाहीत. आता करून पाहीन.

माझी पाककृती म्हणजे. मुळा किसून घ्यायचा त्याला थोडे मिठ लावून १० मिनिटे ठेवून द्यायचं. नंतर किस पिळून मुळ्याचे पाणी एका वाडग्यात काढून घ्यायचं.

मुळ्याच्या पानांमधील जाड देठ वेगळा काढून मिक्सरवर वाटून घ्यायचा. बाकी पाने बारीक चिरुन घ्यायची. कणकेत वाटलेला देठ, बारीक चिरलेली पाने, आलं, लसूण, हिरव्या मिरच्यांची पेस्ट आणि चवीपुरतं मीठ (पाण्यात आधीच आहे हे विसरायचं नाही) घालून पिठ मुळ्याच्या रसात/पाण्यात भिजवायचं. आता ह्याचे परोठे/ठेपले लाटायचे आणि भाजायचे.

पाणी पिळलेल्या मुळ्यात बारीक चिरलेल्या मिरच्या, दाण्याचा कूट, कोथिंबीर, दही घालून कोशिंबीर करायची आणि वरील परोठ्यांबरोबर मजेत खायची.

कवितानागेश's picture

13 Feb 2014 - 3:59 pm | कवितानागेश

मुळा पार्टी! :)
दोन्ही पाकृ छान आहेत.

मस्त्च... मला पण खुप आवडतात मुळ्याचे पराठे. मागच्याच आठवड्यात केले होते. मस्त लागतात एकदम.

असे मिरची घालून सारणाचे कधी केले नाहीत.हेही छान दिसत आहेत. आवडले.

सुहास झेले's picture

9 Feb 2014 - 4:17 pm | सुहास झेले

सहीच... ती मिरची हसून खुणावतेय... मला खा. मला खा ;-)

जबरी पाककृती :)

आरोही's picture

16 Feb 2014 - 9:56 pm | आरोही

आवडले खुप ....करुन बघेन.......

स्पंदना's picture

17 Feb 2014 - 4:12 am | स्पंदना

सिमला मिरचीने स्वाद एकदम वेगळा आला असेल ना?
बघतेच हं करुन.