शेवटची भेट!!!

क्षितिजा's picture
क्षितिजा in जनातलं, मनातलं
1 Oct 2008 - 10:08 am

आज तुला शेवटची भेटायला आलेय.
तुझ्या मैत्रीच्या सर्व आठवणींची
आज मी समग्र मूर्ती झालेय.
आज तुला शेवटची भेटायला आलेय.

हो रे! कुणाला न सांगता, लपुन छपुन.
तुझ्याशी भेटण्याचं मनात आलं
आणि तडक आलेय निघून.
हो रे! कुणाला न सांगता, लपुन छपुन.

या नंतर असे येता येणार नाही.
संसाराची गाडी ओढताना
हे समजून घ्यावे लागेल तुलाही.
या नंतर असे येता येणार नाही.

मैत्रिणीची आठवण ठेवशील ना?
दोघेही व्यवहारात रमल्यावर
माझी विचारपूस करशील ना?
मैत्रिणीची आठवण ठेवशील ना?

ही माझ्या लग्नाची पत्रिका.
चार दिवसांनी तुझी बायको झाल्यावर
आतल्या मैत्रिणीला विसरायचं नाही बरका!
ही माझ्या लग्नाची पत्रिका.

प्रेमकाव्य

प्रतिक्रिया

ऍडीजोशी's picture

1 Oct 2008 - 12:46 pm | ऍडीजोशी (not verified)

लय भारी

अवांतर - एक और शहीद हुआ :)

सहज's picture

1 Oct 2008 - 1:10 pm | सहज

छान आहे.

:-)

अवलिया's picture

1 Oct 2008 - 1:19 pm | अवलिया

चार दिवसांनी तुझी बायको झाल्यावर
आतल्या मैत्रिणीला विसरायचं नाही बरका!

बायको काही आली नाही पण विसरु नको सांगणा-या मैत्रिणी आम्ही विसरलो नाही तरी आम्हाला विसरुन गेल्या हो...

:))

ब्रिटिश's picture

1 Oct 2008 - 8:46 pm | ब्रिटिश

>>चार दिवसांनी तुझी बायको झाल्यावर
आतल्या मैत्रिणीला विसरायचं नाही बरका!

अवांतर : माज माजे बायकोवर परेम हाय कारन मना लायसनवाल्याच आवरतान

मिथुन काशिनाथ भोईर
(जल्ला सगला काय नावानच हाय)

घासू's picture

1 Oct 2008 - 4:41 pm | घासू

सही आहे लगे रहो

मीनल's picture

1 Oct 2008 - 4:58 pm | मीनल

मस्त आहे .
शेवट अनपेक्षित आहे .
मीनल.

टारझन's picture

1 Oct 2008 - 5:12 pm | टारझन

-- ( टारझन ऊर्फ खवीस )
वाहनचालक मुली पाहिल्या की आमचं अँड्रिनलीन वाढतं

ऍडीजोशी's picture

1 Oct 2008 - 9:39 pm | ऍडीजोशी (not verified)

टारू बाळाशी सहमत. मैत्रीण आणि बायको एकच :O आयला काहीच व्हेरायटी नाही :''(

प्राजु's picture

1 Oct 2008 - 7:03 pm | प्राजु

मस्त आहे.
छान कविता..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

सचिन जाधव's picture

1 Oct 2008 - 7:43 pm | सचिन जाधव

खरच खुप छान कविता आहे.
प्रेम आणि लग्न किति सुरेख कल्पना आहे.......
अस फार् कमी घड्त नाही?

खादाड_बोका's picture

2 Oct 2008 - 1:31 am | खादाड_बोका

माझाही प्रेमविवाह झाला. अगदी लग्नांच्या चार दिवस आधी होणार्‍या बायकोची ,मैत्रिण म्हणुन शेवट्ची भेट सुद्धा झाली. पण बरे झाले की आमच्या बायडीनी ही कविता म्हंटली नाही.

मी तर ऐकुनच बेशुद्ध झालो असतो. :O :O

कारण तिला मराठी येत नाही.... =)) =))

अवांतर्....ही कवीता फार छान आहे... :) :)

मला तर स्वप्नातही भुक लागते....

जयवी's picture

2 Oct 2008 - 4:23 pm | जयवी

कविता छान आहे. अशाच अर्थाची तुषार जोशींची कविता वाचल्याचं आठवतंय.

अनिल हटेला's picture

2 Oct 2008 - 4:47 pm | अनिल हटेला

सही !!!

चार दिवसांनी तुझी बायको झाल्यावर
आतल्या मैत्रिणीला विसरायचं नाही बरका!

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

प्रभाकर पेठकर's picture

2 Oct 2008 - 5:22 pm | प्रभाकर पेठकर

खूप छान आहे कविता. त्या मागील विचार, शेवटाचे धक्का तंत्र, त्यातील आशय आणि एकूणच सादरी करणाची 'ईष्टाईल' आवडली.

अभिनंदन.

संदीप चित्रे's picture

2 Oct 2008 - 7:37 pm | संदीप चित्रे

कवितेचा शेवट तर एकदम अप्रतिम :)

ही माझ्या लग्नाची पत्रिका.
चार दिवसांनी तुझी बायको झाल्यावर
आतल्या मैत्रिणीला विसरायचं नाही बरका!
ही माझ्या लग्नाची पत्रिका.

चतुरंग's picture

2 Oct 2008 - 8:03 pm | चतुरंग

एकदम अनपेक्षित कलाटणी!
झकास!!

चतुरंग

विसोबा खेचर's picture

2 Oct 2008 - 8:10 pm | विसोबा खेचर

कविता क्लासच आहे.. :)

जियो...!

तात्या.