नोकरित होणारा अन्याय

Prajakta२१'s picture
Prajakta२१ in काथ्याकूट
9 Feb 2014 - 6:04 pm
गाभा: 

नोकरित होणारा अन्याय

मी एका सहकारी बँकेत नोकरी करते माझा विभाग हा kind ऑफ back office आहे आणि २४*७ असल्यामुळे शिफ्ट्स मध्ये काम करावे लागते मी आणि माझी एक सहकारी अशा दोघीच यासाठी आहोत पण तिने तिचे संध्याकाळचे कॉलेज असते असे सांगून morning शिफ्ट मिळवली आहे आमच्या senior authority कडून (३ महिन्यांसाठी )

त्या senior बॉस ने पण दोन्ही बाजू समजून न घेता एकदम मलाच सेकंड शिफ्ट करायला लावली आहे( ३ महिन्यांसाठी ह्यात लेखी काही नाही हे सगळे फक्त तोंडी एका आमच्या तिघींच्या मीटिंग मध्ये ठरले आहे मी मला continuously सेकंद शिफ्ट जमणार नाही असे सांगून सुद्धा )

ठीक आहे असे समजून मी ते करायला तयार पण झाले पण त्या सहकारीचे उद्धट आणि अरेरावीचे वागणे फारच वाढले ( तिला first शिफ्ट मिळाल्यानंतर ) मी हे वेळोवेळी आमच्या तिथल्या senior स च्या लक्षात आणून दिले तर मलाच adjust करण्याच सल्ला मिळाला शेवटी एका दिवशी फारच issue झाल्यावर मी माझ्या आत्तापर्यंतच्या कामाचा आणि जर एखाद्या दिवशी काही भांडणे झाली असतील तर त्याचा एक report तयार ठेवला होता तो आमच्या त्या senior बॉस आणि अजून ४ senior ना पाठवला for their reference तर त्यावर त्या boss चा reply आला आहे कि ती माझी आणि तिची branch ला ट्रान्सफर करणार आहे
ह्यात मी हे त्या इतर २ सरांना पण विचारले तर ते म्हणाले कि त्यांना काही authority नाहीये त्यामुळे त्यांची फक्त बघ्याची भूमिका आहे
मी फक्त फोर reference report पाठवले होता तर असे झाले आहे

ह्या सगळ्या प्रकारामुळे मला खूपच मानसिक त्रास झाला आहे आणि काही प्रश्न पण पडले आहेत:-
१) कामापेक्षा नुसत्या तुमच्या बाह्य दिसण्यावर आणि गोड गोड बोलण्यावर सगळे काही अवलंबून असते का?
२) जिथे खूप साऱ्या मुली/बायका असतात तिथे कामापेक्षा इतर गोष्टींकडेच लक्ष दिले जाते का?( माझा आत्ताचा इथला अनुभव तसाच आहे )
३) जे कोणी अब्राह्मण senior असतात ते त्यांच्या ब्राम्हण junior सोबत असेच वागतात का ?( हे पण मी माझ्या इथल्या अनुभवावरून लिहित आहे )
४)seniors ने दोन्ही बाजूंचे unbiasdly ऐकून घ्यावे हि अपेक्षा चूक आहे का?

जाणकारांनी मार्गदर्शन करावे

प्रतिक्रिया

उडन खटोला's picture

9 Feb 2014 - 6:21 pm | उडन खटोला

तुमच्याबद्दल पूर्ण सहानुभूति आहे. तुमचि सहकारी दिसायला देखणी ,तरुण व "बॉसला खुश" ठेवणारी असेल तर तुमच्यावर अन्याय होत असण्याची शक्यता नाकारता येत नाही .

शक्य असल्यास लेबर कोर्टात जाता येइल का?? यावर सिनियर मिपाकर मंडळी मार्गदर्शन करतीलच.!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Feb 2014 - 6:31 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

३) जे कोणी अब्राह्मण senior असतात ते त्यांच्या ब्राम्हण junior सोबत असेच वागतात का ?

माणसाची वृत्ती उन्नीस बीस असू शकते 'जात' हा मुद्दा तीतकासा रुचत नाही. पण हल्ली असं ब-याच ठिकाणी ऐकायला मिळतं. ते 'अमूक' आहेत म्हणून म्ह्णून ते 'अमुकांना' त्रास देतात. माणसाच्या स्वभावाचा तो भाग मला वाटतो जातीचा नाही.

-दिलीप बिरुटे

प्यारे१'s picture

9 Feb 2014 - 6:41 pm | प्यारे१

बरोबर म्हणावंसं वाटतंय पण म्हणत नाही. हे सगळीकडंच काही ना काही कारणानं असतंच.
जातीचा आधार घेतला जातो ही वस्तुस्थिती आहे.

>>> जे कोणी अब्राह्मण senior असतात ते त्यांच्या ब्राम्हण junior सोबत असेच वागतात का ?
उलटंही म्हणता येऊ शकतंच की!

@प्राजक्ता,

तुमच्या केसमध्ये न्युसन्स वॅल्यु वाल्या लोकांकडं सीनियर जास्त लक्ष देत नाहीत. लिखीत रिपोर्ट बनवून त्यात इलॅबोरेट केलं असल्यास त्यामुळं तुमची केस जरी स्ट्राँग झाली तरी सीनियर लोक ही बाई उद्या आपल्याला सुद्धा अशा लिखित स्वरुपात अडकवू शकते, कशाला भानगडीत पडा असा ही एक अ‍ॅप्रोच असतो.

पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!

जेपी's picture

9 Feb 2014 - 6:37 pm | जेपी

सहकार आणी 24*7 .

सिनीयर अब्राहम आणी ज्युनी ब्राहम .

कुछ तो गडबड है दया .

(सहकार मंत्री ) जेपी

सुहास झेले's picture

9 Feb 2014 - 6:41 pm | सुहास झेले

अब्राह्मण ??? जात कुठून आली मध्येच?

असो... खेदाने म्हणावे लागेल थोडं कमीजास्ती प्रमाणात, पण हेच सध्याचे टिपिकल कॉर्पोरेट कल्चर आहे आणि ह्या प्रश्नांसाठी एच आर वगैरेशी बिनधास्त चर्चा करावी. Company Code of conduct ला आधारून तुम्ही तक्रार देऊ शकता. नीट माहिती विचारून घ्या. खूप अश्या गोष्टी असतात ज्या आपल्याला माहित नसल्याने, आपण हे सहन करत राहतो.

ज्ञानव's picture

9 Feb 2014 - 6:44 pm | ज्ञानव

मूळ मुद्दा काय आहे? शिफ्ट्स
शिफ्ट्सची वाटणी हा मूळ मुद्दा असेल तर त्याबाबत बँकेची नियमावली काय आहे? बाकी स्त्रीत्व, जात हे दुय्यम विचार आहेत किंबहुना तुमच्या हताश मनाचे बाय प्रोड्क्ट आहेत. तुम्ही तुमचा फोकस बँकेच्या नियमांवर आणि स्वतःला दिलेल्या कामावरच केंद्रित करा. नोकरी जाण्याची दहशत हि एकच सर्वाला कारणीभूत मानसिकता आहे पण जर तुम्ही बँकेचे नियम वाचले असतील तर भांडणे सोपे जाईल.
तुम्ही जो रेफरन्स रिपोर्ट पाठवलात त्यांने वरिष्ठांनी असा सोयीस्कर अर्थ लावला की तुम्हाला इथे ह्या ब्रांचला त्रास होतोय म्हणून तुमची बदली जी नियमानुसारच आहे हे सांगण्यासाठी तुमचा रिपोर्ट त्यांना पुरेसा आहे. आणि वरिष्ठ नेहमी नियमला धरूनच राजकारण करतात असा अनुभव आहे. ते चुकले तरच तुम्हाला संधी मिळेल. मी ब्राम्हण आहे, इतर बायकांसारखी नाही वगैरे तुमचे वैयक्तिक तर्क दाखले झाले ते नियमाचा आधार होऊ शकत नाहीत.

तेव्हा आपण जिथे नोकरी करतो त्या ठिकाणाचे नियम काय आहेत ते आधी पडताळून नव्हे मुखोद्गत करून ठेवणे आवश्यक आहे पण दुर्दैवाने ते कुणी करत नाही आणि मग त्रास होतो.

(हे माझे वैयक्तिक मत आहे. अनुभवी मिपाकर तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतीलच. )

सुबोध खरे's picture

9 Feb 2014 - 7:47 pm | सुबोध खरे

+१

सुहास झेले's picture

9 Feb 2014 - 6:49 pm | सुहास झेले

आणि एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ऑफर लेटर स्वीकारताना, आपण स्वत: त्यावर सही करतोच की न वाचता :)

त्यात असे अनेक बारीकसारीक मुद्दे समाविष्ट असतात. वाचून बघा हवं तर. मी स्वतः २४*७ सपोर्ट सिस्टीममध्ये कामाला आहे. आमच्या इथे हे असे प्रसंग नेहमीच होत असतात.. त्यामुळे आपले हक्क जाणून घ्या इतकंच सांगेन..... :)

काळजी घ्या !!

आत्मशून्य's picture

9 Feb 2014 - 7:50 pm | आत्मशून्य

१) कामापेक्षा नुसत्या तुमच्या बाह्य दिसण्यावर आणि गोड गोड बोलण्यावर सगळे काही अवलंबून असते का?

होय. दिसणे हातात नसते परंतु गोड नक्किच असते. त्यामुळे गोड बोलणे अन सोबतिला कश्ट पसुन त्याचा देखावा करता येणे हे कामाच्या ठिकाणी सगळ्यात आवश्यक असते.

२) जिथे खूप साऱ्या मुली/बायका असतात तिथे कामापेक्षा इतर गोष्टींकडेच लक्ष दिले जाते का?( माझा आत्ताचा इथला अनुभव तसाच आहे )
होय. विशेषतः कॉल सेंटर.

३) जे कोणी अब्राह्मण senior असतात ते त्यांच्या ब्राम्हण junior सोबत असेच वागतात का ?( हे पण मी माझ्या इथल्या अनुभवावरून लिहित आहे )
अजिबात नाही. पण ज्याचा टक्का जास्त तो हरामखोरपणा करायला धजावतो हे भारतिय कॉर्पोरेट जगातिल वास्तव आहे. अर्थात योग्य बुध्दीभेदाचे कौशल्य हाती असलेस जात हमखास झक मारते हा माझा अनुभव आहे. केस स्टडीसाठी व्यनी केलात तरी चालेल.

४)seniors ने दोन्ही बाजूंचे unbiasdly ऐकून घ्यावे हि अपेक्षा चूक आहे का?
होय. अर्थात जर कंपनिचे नुकसान होत नसेल तरच. अन्यथा त्यांना फक्त आपलेच ऐकुन घेता आले पाहिजे हे कौशल्य विकसीत करणे आवश्यक आहे.

पैसा's picture

9 Feb 2014 - 8:26 pm | पैसा

सहकारी बँक. हम्म. ओके. सहकारी बँकांमधे सगळे काही नियमानुसार चालत नाही तर त्यात प्रचंड प्रमाणात राजकारण असते हे आतापर्यंत तुम्हाला माहिती असायला हवे होते. जिच्यामुळे त्रास होतोय तिचे हात फार वरपर्यंत पोचलेले असू शकतात. तुमच्या वरिष्ठांच्या मनात असो नसो, त्यांच्याहीवरून तोंडी आदेश आला तरी ते काही करू शकणार नाहीत ही फार मोठी शक्यता आहे. (त्यांना काही अधिकार नाही हे त्यांनी कबूल केलेच आहे.)

शिफ्ट्सबद्दल बोलायचे तर सरकारी बँकांमधे ६ महिने एका जागी (एका विभागात)काम करायचे असा सामान्य नियम आहे. सहकारी बँकांमधे कागदोपत्री तसेच नियम असावेत असे गृहीत धरते. याचे कारण म्हणजे फ्रॉड करायला संधी मिळू नये हा उद्देश असतो. नियमानुसार व्यवस्थापन तुम्हाला ६ महिने याच शिफ्टमधे काम करायला लावू शकते. ते नको असेल तर बदली घ्या हा त्यांचा साधा हिशेब असावा.

तुमच्या बँकेत कर्मचारी युनियन कितपत स्ट्राँग आहे माहित नाही. आम्ही मात्र असले कित्येक प्रकार थांबवले आहेत. आमच्या युनियनने आवाज केल्यावर सगळे रीजनल मॅनेजर गुपचूप आम्हाला पाहिजे ते करून देतात. केवळ कर्मचार्‍यांच्या बाबतीत नव्हे तर भरपूर पैसे खाऊन गैरसोयीच्या जागी रीजनल ऑफिस हलवायची सगळी तयारी झाली होती. अ‍ॅग्रीमेंट सुद्धा झाले होते. ते आम्ही हाणून पाडले आहे. तशी चांगली मजबूत युनियन असेल तर तुम्ही हा प्रश्न युनियनकडे नेऊ शकता.

तुमच्याबाबतीत अन्याय होतोय हे स्पष्टच आहे आणि सहानुभूती आहे. पण याबाबत सगळे नियम माहित करून घेणे आणि प्रसंगी वाईट ठरायची तयारी दाखवून आवाज उठवणे आवश्यक आहे. ते जमणार नसेल तर बदली मिळेल तिथे आनंदाने काम करणे हेच श्रेयस्कर.

जातींचा कोणताही परिणाम असल्या गोष्टीत कधी होत नाही. वरिष्ठांची वैयक्तिक आवड-निवड असू शकते. तशीच तुमची न्युइसन्स व्हॅल्यू किती आहे यालाही महत्त्व आहे. मऊ लागेल तिथे कोपराने खणणे हे सगळीकडेच चालते. त्यात जातीचा काही संबंध नसतो.

नोकरी करायची असेल तर जास्त टेन्शन न घेता करा एवढेच सांगेन. कारण त्यात मिळणार्‍या पैशांपेक्षा होणारा त्रास कधी कधी त्याच्या वेळ/पैसे या किंमतीपेक्षा जास्त असतो. वर आलेल्या बहुतेक प्रतिक्रियांशी सहमत आहे. तुम्हाला शुभेच्छा!

आत्मशून्य's picture

9 Feb 2014 - 8:37 pm | आत्मशून्य

मऊ लागेल तिथे कोपराने खणणे हे सगळीकडेच चालते.

परंतु लेखिकेची ऑफिसमधील कंपुबाजी पुरेशी ताकतवान भासत नाही. हेच एकमेव माउपणाचे प्रमुख कारण वाटत आहे. नक्किच संख्याबळ कमी आहे.

Prajakta२१'s picture

9 Feb 2014 - 10:02 pm | Prajakta२१

सगळ्यांना मार्गदर्शनाबद्दल मनापासून धन्यवाद आणि शुभेच्छा

माहितगार's picture

9 Feb 2014 - 11:04 pm | माहितगार

@Prajakta२१ अशा गोष्टींची चर्चा करण्याकरता एक ऑफिस बाहेरची एखादी सिनीअर करिअर गाईड व्यक्ती पण त्याच क्षेत्रातील ओळखिची असलेली चांगली. पण नसेल तर बर्‍याच प्लेसमेंट सर्वीसेस मध्ये एच आर मधील रिटायर्ड व्यक्ती असतात त्यांचाही सल्ला उपयूक्त ठरू शकतो नाही असे नाही. ऑफीशीअल कम्यूनिकेश आणि रिलेशनशीप्स येणारे प्रॉब्लेम्सबद्दल इंग्लिश मध्ये शोध घेतला तर इंटरनेटवर अगदी छोट्या छोट्या गोष्टींबद्दलही चांगल्या टिप्स मिळतात.

एवढ्या अल्प माहितीवर असा दुरून आंतरजालावरून मी सल्ला देणे कितपत सयुक्तीक आहे मला माहित नाही. खासकरून सहकारी बँकेत एखाददोन मोठ्या प्रोफेशनल सहकारी बँकाही आहेत. सल्ला देणे सोपे आहे पण प्रत्यक्षात अवघडही असू शकते बहुधा सध्या तुम्ही इमोशनली रिअ‍ॅक्ट करता आहात किंवा कसे हे एकदा स्वतःस विचारून इमोशन मध्ये काही प्रॅक्टीकल अस्पेक्ट सुटणार नाही हे बघीतलेले बरे.

पैसाताई म्हणतात त्याप्रमाणे युनियनचा सपोर्ट नसेल तर तुम्ही सहकार क्षेत्रात आहात हे लक्षात घ्या; सध्या तुम्ही ज्या स्टेजला आहात तेथे बहुधा तुम्हाला बँकेची अधिक गरज आहे का बॅंकेला बॉसला तुमची आहे हे पाहून प्रॅक्टीकल निर्णय घेण म्हणजे जस की किमान काही कालावधी करता ट्रान्सफरला किमान तोंडदेखल तोंडी हो म्हणण अधिक चांगल. तुमच्या बॉसला तुमच्यापेक्षा अधिक चांगली व्यक्ती मिळाली नाही तर समोरून कॉल येईल. नाही आलातर सध्याचा न सोडता सावकाश पणे दुसर्‍या जॉबच्या शोधात तुम्ही राहू शकता. मुख्य म्हणजे तुमचे न पटणारी दुसरी व्यक्ती अधिक शिक्षण घेत असेल आणि दुसरे करिअर घेणार असेल तर त्यानंतर निवांतपणे आधीची जागा पुन्हा मागून घेण्याचा मार्ग मोकळा राहतो.

आपला पहिला आणि तिसर्‍या क्रमांकाचा प्रश्न दिसणे जात वगैरे गोष्टी एंट्रीलेव्हल जसे कि जॉब मिळताना महत्वाचे असूही शकते. ऐन हातात कंप्लेंट असताना अशा गोष्टींचा बॉसेसच्या प्रतिक्रीयेवर परिणाम होत नाही किंवा बॉसलाही तुम्हाला सुचतय ते सर्व सुचण्याची आणि खास करून तेवढ सुचण्याकरता बँकींग क्षेत्रातील सिनीयर व्यक्तीस वेळ असण्याची शक्यता कमी. हां तुम्ही ज्याची कंप्लेंट घेऊन गेलाय त्याची चेअरमनशी ओळख वगैरे या गोष्टी अजिबात परिणाम करणार नाहीत असे नाही पण त्याने फारतर प्रतिक्रीयेत सावधपणा येतो.

प्रश्न क्रमांक २ इतर स्त्रियांवर सोडलेला चांगला.

प्रश्न क्रमांक ४ seniors ने दोन्ही बाजूंचे unbiasdly ऐकून घ्यावे हि अपेक्षा चूक आहे का?

बाकीचे लोक सहानुभूती दाखवत असताना माझ याच उत्तर जरा शॉकींग वाटू शकेल तुम्ही हे कस ठरवता आहात की बॉस बायस्डच आहे म्हणून. व्यक्ती बायस्डही असू शकते किंवा ह्युमन रिसोर्स हँडल करण्याच प्रत्येक व्यक्तीच स्किल कमी जास्त असू शकत. दुसर तुमच काही चुकल आहे का? माझ्या मतानुसार काही स्टेप्स सोडून लास्ट बटवन स्टेप लेखी देण्याची स्टेप या बाबतीत कदाचित घाई झाली असण्याची शक्यता आहे का हे पडताळून पाहील पाहीजे.

१) आपल्या कंप्लेंटचा आणि रिअ‍ॅक्शन्स अनऑफीशिअल पिअर डिस्कशन्स आणि प्रेशर मधून येत असतील आणि त्यातून आपल्याकडून काही नकारात्मक रिअ‍ॅक्शन होत नाहीएना हे पडताळून पहावयास हव. कारण भावनेच्या भरात एखाद्या विषयाला आपल्याकडून अनड्यू वेटेज दिल जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

२) ज्या व्यक्तीशी पटत नाहीए त्या व्यक्तिशी ओव्हर अ कप ऑफ टी सरळ डायरेक्ट चर्चा करून अ ब क आणि ड हे विषय खुपताहेत हे शांतपणे सांगावे. बदलण्याची संधी द्यावी.

३) बॉसकडे परस्पर जाण्यापेक्षा त्याव्यक्तीला सांगाव की माझ अजून समाधान झाल नाहीए आपण बॉसकडे दोघे मिळून जाऊ ती व्यक्ती सोबत येतच नाही म्हणाली तर मग बॉसकडे डायरेक्ट जा.

४) बॉसकडे सुद्धा समाधान नाही झाल अजून वरचा बॉसकडे जायचे असेल तर तेव्हाही आपण सोबत जाऊन वरच्या बॉसकडे जाऊ म्हणुन सांगा तोही सोबत येत नाही म्हणाला तरच डायरेक्ट वरच्या बॉसकडे जा.

५) त्यातही समाधान नाही झाल तर मी वर म्हटल्या प्रमाणे करिअर गाईडशी किंवा रिटायर्ड अनुभवी एचा आर शी चर्चा करून पत्र वगैरे द्याव.

ह्या स्टेप खूप आक्रमक नाही पण तुम्हाला डिप्लोमॅटीकली सेफ रहात आपला अधिकार मागण्यात प्रॅक्टीकली मदत करतात.

अर्थातच हा दुरून दिलेला सल्ला आहे यास मर्यादा आहेत. एनी वे शुभेच्छा.

बँकींग मधला एखादा अ‍ॅडव्हान्स अभ्यासक्रम असतो का? तो करा. सहकारी बँका तशा ही डुबणारच आहेत. तेव्हा ती नोकरी सोडून प्रायव्हेट बँकेतली जास्त कामाची, जास्त अनुभव देणारी, जास्त ताणाची नोकरी स्विकारा. अ‍ॅडिशनल स्कील्स अपडेट करा. ईंग्लीश फर्डे करून घ्या. देशभर जायला तयार रहा. जमल्यास देशाबाहेर जा. कुठे या फालतू सहकारी बँक, गव्हर्नमेंट सर्व्हिस वगैरे कीडामुंगी लोकांच्या नादाला लागत बसता? जातीय राजकारण करत, टेबलाखालचे पैसे स्विकारत, रिझर्वेशन कडे डोळे लावून खड्डे असलेल्या रस्त्यात स्कूटर आदळत शिव्या देत जगणारे लोक हे. प्रयत्नाने, अभ्यासाने प्रगती साधून घ्या आणि यातून बाहेर पडा.

ज्ञानव's picture

10 Feb 2014 - 8:42 am | ज्ञानव

पण हे पहाडी थिंकिंग पचवायला खूप कठीण जाते बर्याच जणांना. मिळाले-दिले तर प्रमोशन म्हणजेच आपले स्वतःचे अपग्रेडेशन ह्या विचाराचेच लोक जास्त असतात. समोरचे मला संधी देतच नाहीत म्हणतात पण तू स्वतःला किती संधी दिलीस हा विचारच नाही.

बाकी A१ प्रतिसाद...प्रजाक्ताजीना जमेल का ?

माहितगार's picture

10 Feb 2014 - 12:51 pm | माहितगार

चढाओढ राजकारण सारीकडेच होते. सहकारी बँका राहोत अथवा डुबोत त्या बाबीशी देण घेण न ठेवता प्रायव्हेट बँकेच्या नौकरीत प्रोफशनल फील अधिक चांगला मिळू शकतो. काळापहाडचे म्हणणे वेगळ्या शब्दात सांगायचे झाले तर स्वतःवर विश्वास असेल तर नौकरीच्या क्षेत्रातला उंबरठा ओलांडून चाकोरी बाहेरचा विचार करण्यास हरकत नाही. अर्थात प्रत्येकाच्या क्षमता मर्यादा जबाबदार्‍या वेगवेगळ्या असतात. खाली पि.डां.च्या मताशी सुद्धा बर्‍यापैकी सहमत

पिवळा डांबिस's picture

10 Feb 2014 - 12:17 pm | पिवळा डांबिस

तुमचे स्वतःचे तुमच्या पोझिशनसाठी आवश्यक असलेले क्वालिफिकेशन, तुमचा अनुभव आणि तुमची भविष्यातली मेहनत करण्याची तयारी यावर तुमचा जर पूर्ण विश्वास असेल तर दुसरी नोकरी शोधा आणि ती मिळाल्यावर ह्या नोकरीवर लाथ मारा...
वाटल्यास त्या वेळेस ह्या सर्व वरिष्ठांची शाब्दिक निर्भत्सना करा...
जिच्याजवळ ह्या वरील सर्व गोष्टी असतील तिची प्रगती कोणीच रोखू शकत नाही....
पण ह्या गोष्टी जर नसतील तर दुसरीचे देखणेपण, जात वगैरे गोष्टींबद्दल तक्रार करणे बंद करून आपली आहे ती नोकरी अधिकाधिक परिश्रम करून टिकवा असा आमचा स्पष्ट सल्ला आहे....
स्पष्टोक्तीबद्दल क्षमस्व...

वाटल्यास त्या वेळेस ह्या सर्व वरिष्ठांची शाब्दिक निर्भत्सना करा...

मी हा सल्ला देणार नाही. रेफरन्सेस ची गरज कधीही पडू शकते. रिलेशन्स अशा प्रकारे बिघवडणे हा शहाणपणा नव्हे. तुम्ही आपला फायदा बघताय, दुसर्याचा तोटा होतोय का ते पहायची गरज नाही.

बाळ सप्रे's picture

11 Feb 2014 - 12:00 pm | बाळ सप्रे

सहमत.. नोकरी सोडताना उगाच वाईटपणा घेण्यात काही अर्थ नाही.. आपले नोकरी सोडण्याचे कारण स्पष्ट पण चांगल्या शब्दात सांगावे..

माणसानं आधीचे 'पूल' तोडू नयेत ह्याबाबत सहमत.

बंडा मामा's picture

11 Feb 2014 - 6:00 pm | बंडा मामा

उगाच ऑनलाईन सल्ले ऐकुन तडका फडकी नोकरी सोडणे वगैरे खूळ करू नका.

प्रभाकर पेठकर's picture

10 Feb 2014 - 1:53 pm | प्रभाकर पेठकर

मी मला continuously सेकंद शिफ्ट जमणार नाही असे सांगून सुद्धा

तुमच्या सहचारीणीला आणि वरिष्ठांना चांगले ठाऊक आहे की कांही झाले तरी तुम्ही नोकरीचा राजीनामा देणार नाही, तुमची 'वर'पर्यंत पोहोच नाही किंवा/आणि पत नाही. म्हणजेच तुम्हाला त्यांच्या मनाप्रमाणे वाकविण्यास तुम्ही एक 'सॉफ्ट टार्गेट' आहात.

ठीक आहे असे समजून मी ते करायला तयार पण झाले

'सॉफ्ट टार्गेट'चा माझा मुद्दा इथे सिद्ध होतो. नोकरी सोडण्याची धमक किंवा कर्मचारी संघटणेचे पाठबळ नसेल तर आपल्या मुद्द्यांना वजन येत नाही.

पण त्या सहकारीचे उद्धट आणि अरेरावीचे वागणे फारच वाढले (तिला first शिफ्ट मिळाल्यानंतर)

ह्याला वरील विवेचन, तिचा आत्मविश्वास, वरीष्ठांचे पाठबळ आणि उद्दाम स्वभाव हेच कारणीभूत आहे.

ती माझी आणि तिची branch ला ट्रान्सफर करणार आहे

ह्या शक्यतेचा तुम्ही तक्रार करण्याआधी विचार करायला हवा होता. संघर्षात, लढाईत नुसते आपल्याजवळ काय काय हत्यारे आहेत ह्याची जाण पुरेशी नसते. शत्रूपक्षाकडे काय काय शस्त्रे आहेत आणि ती वापरली तर आपण स्वतःचे संरक्षण कसे करणार ह्याची परिपूर्ण योजना हाती असावी लागते.

ह्यात मी हे त्या इतर २ सरांना पण विचारले तर ते म्हणाले कि त्यांना काही authority नाहीये त्यामुळे त्यांची फक्त बघ्याची भूमिका आहे

हे धोरणी उत्तर आहे. व्यवस्थापनात हे असेच होत असते. स्वतःच्या अंगाला कांहिही लावून न घेता तक्रारकर्त्याला वाटाण्याच्या अक्षता लावणे हे स्वतःचे स्थान सांभाळण्यासाठी त्यांना आवश्यकच असते. तुम्ही सारख्या सारख्या दुसर्‍यांच्या (अगदी योग्य असल्या तरी) तक्रारी करीत असाल तर ते कावलेले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे चर्चेच्या भानगडीत पडून तुम्हाला न्याय देण्याऐवजी तुम्हाला परस्पर पिटाळून लावणे त्यांच्यासाठी कमी श्रमाचे (अधिकार पदावर असल्याने) आणि जास्त सोयीचे असते.

कामापेक्षा नुसत्या तुमच्या बाह्य दिसण्यावर आणि गोड गोड बोलण्यावर सगळे काही अवलंबून असते का?

ह्या वाक्यातून तुमचे वैफल्य दिसून येते बाकी काही नाही. एकूण प्रसंगात ह्या विधानाला/प्रश्नाला कांहीच अर्थ नाही. उलट तुम्ही लढाई लढण्या आधीच 'हार' स्विकरल्याचे संकेत देत आहात.

जे कोणी अब्राह्मण senior असतात ते त्यांच्या ब्राम्हण junior सोबत असेच वागतात का ?

मला नाही वाटत. पण तुमच्या कचेरीत ब्राह्मण-अब्राह्मण वाद जोरात असेल आणि तुम्ही ब्राह्मण आहात म्हणून हिरीरीने ब्राह्मणांच्या बाजूने वादात उतरला असाल तर तुम्हाला टार्गेट केले जाणे शक्य आहे. अशा परिस्थितीत तुमचे मरण तुम्ही स्वतःच ओढावून घेतले आहे. नोकरीत असताना (किंवा इतर परिस्थितीतही) तोंड बंद ठेवून सतत परिस्थितीचे अवलोकन करणे आणि आपल्या प्रत्येक वाक्याचा आजूबाजूच्या माणसांच्या विचारसरणीवर काय परिणाम होणार आहे, आपल्याबद्दल काय मत होऊ शकते ह्याचा विचार करूनच तोंड उघडणे महत्त्वाचे असते.

seniors ने दोन्ही बाजूंचे unbiasedly ऐकून घ्यावे हि अपेक्षा चूक आहे का?

दुर्दैवाने ह्याचे उत्तर 'होय' असेच आहे. वरीष्ठ धोरणी असतात. स्वतःची खुर्ची ही त्यांची सर्वोच्च प्राथमिकता असते. हाताखालच्या लोकांचा न्याय-अन्याय ह्याच्याशी त्यांना कांही घेणं-देणं नसतं.

आता माझी नोकरीतील कैफियत मांडतो.
इथे आखातात आमच्या कचेरीत मलबार्‍यांचे वर्चस्व होते. त्यात त्यांचा शिवसेवरचा आणि मराठी माणसावरचा राग मला पहिल्या आठवड्यातच अनुभवास आला. २९ जणांच्या कचेरीत २ मँगलोरी, १ सिंधी आणि मी एक मराठी बाकी सगळे (२६) मलबारी असे प्रमाण होते. नोकरी टिकविणं ही जेंव्हा माझी गरज होती तो पर्यंत न्याय-अन्यायाचा विचार न करता मी सर्वांशी दोस्ती करून राहिलो. (मराठीबाणा जपत, तो सोडला नाही). जेंव्हा माझी नोकरी सोडण्याची तयारी (मनाने) झाली होती तेंव्हाच वरीष्ठांसमोर प्रमोशनची विनंती मांडून ती पूर्ण न झाल्याने शांतपणे नोकरी सोडून व्यवसाय सुरु केला.
सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. आपली उद्दीष्ट नजरेसमोर ठेवून ती साध्य होई पर्यंत आवश्यक त्या तडजोडी स्विकाराव्या लागतात. एकदा उद्दिष्ट साध्य झालं की आपला दगडाखालचा हात मोकळा होतो आणि आपण समोरच्याच्या कानाखाली भडकवायला मोकळे होतो.
त्यामुळे उगीच त्रागा, तणतण करून आपली असहाय्यता सर्वांसमोर उघडी करून हसं करून घ्यायचं नाही. दुसरी नोकरी शोधायची (तिथेही राजकारणं असणारच आहेत हे लक्षात घेऊन) आणि पहिल्यानोकरीवर तत्त्वाच्या मुद्द्यावर (त्याची त्या वेळी जाहिरात करून), लाथ मारून बाहेर पडायचं.

प्रत्येकाची वैयक्तिक परिस्थिती, जबाबदार्‍या वेगळ्या असतात. तेंव्हा मी म्हणतो आहे ते सर्वच लागू होईलच असे नाही. पण मतितार्थ लक्षात घेऊन, आपल्या परिस्थितीशी साजेशी कारवाई करावी.

प्यारे१'s picture

10 Feb 2014 - 1:59 pm | प्यारे१

अगदी योग्य.

थोडक्यात अधून मधून फुत्कारत रहा.
निपचित पडून राहू नका.
सारखं डसूही नका.
मुळात 'नाग' असणं मह्त्वाचं. (जहाल विष इथे सामर्थ्य/क्षमता)

काळा पहाड's picture

10 Feb 2014 - 3:05 pm | काळा पहाड

एकदा उद्दिष्ट साध्य झालं की आपला दगडाखालचा हात मोकळा होतो आणि आपण समोरच्याच्या कानाखाली भडकवायला मोकळे होतो.

तुमच्या सर्व विधानांशी सहमत, हे एक सोडून. कानाखाली भडकवण्यात शक्ती खर्च करणे म्हणजे शक्तीचा अपव्यय. सचिन तेंडुलकर चे पहा. सर्व हल्ल्यांना तो बॅटने उत्तर देतो.

प्रभाकर पेठकर's picture

11 Feb 2014 - 5:50 pm | प्रभाकर पेठकर

दोन वेगळी उदाहरणं आहेत. सचिनला त्याचा बॉस (कर्णधार), निवड समिती रोज रोज छळत नाही/नव्हती. त्याच्यावर अन्याय केला जात नव्हता. लेखिकेच्या नोकरीतील समस्येची सचिनच्या कारकिर्दीशी तुलना होऊ शकत नाही. असो.
तरी पण त्याने जसे तोंड बंद ठेवून बॅटने उत्तर दिले तसेच >>>आपली उद्दीष्ट नजरेसमोर ठेवून ती साध्य होई पर्यंत आवश्यक त्या तडजोडी स्विकाराव्या लागतात.<<<
ह्या विधानात येताजाता तोंड उघडून विरोध करू नका हा सल्ला अंतर्भूत आहे. आपल्या व्यवसायातील गरजेनुसार आपले कौशल्य वाढवत ठेवणे ही तर प्रत्येक व्यवसायाची गरज असते. (सचिन बॅटने उत्तर द्यायचा) त्यासाठी वेगळा कांही सल्ला देण्याची गरज नाहीए असं मला वाटतं.

>>>>एकदा उद्दिष्ट साध्य झालं की आपला दगडाखालचा हात मोकळा होतो आणि आपण समोरच्याच्या कानाखाली भडकवायला मोकळे होतो.<<<<

ह्याचा शब्दशः अर्थ घेऊ नका. वरीष्ठांच्या बाबतीत हा सल्ला नसून सहकार्‍यांच्या संबंधात हा सल्ला आहे. परिस्थितीवर आपले नियंत्रण नसताना (हात दगडाखाली असताना) तडजोडी स्विकारून शांतपणे काम करीत राहणे, आपले कौशल्य वाढवित राहणे हा मार्ग सुचवला आहे. एकदा राजीनामा दिला (दगडाखालचा हात मोकळा झाला) की छळणार्‍या सहकार्‍याला मोका बघून चारचौघात अपमानकारक चार खडे बोल सुनविता येतात. ह्यालाच मी कानाखाली भडकविणे म्हणतो आहे. हे कानाखाली भडकविणे शारीरिक नसून शाब्दीक आहे. असो.
प्रत्येक ठिकाणची परिस्थिती, प्रत्येकाचा स्वभाव, प्रत्येकाची ताकद सारखीच नसते. तेंव्हा परिस्थिती आणि आपल्या प्रकृतीनुसारच निर्णय घ्यावा.

प्रसाद१९७१'s picture

10 Feb 2014 - 3:44 pm | प्रसाद१९७१

नंबर १ चा सल्ला

मृत्युन्जय's picture

11 Feb 2014 - 12:15 pm | मृत्युन्जय

योग्य सल्ला.

शिद's picture

11 Feb 2014 - 3:28 pm | शिद

अतिशय उत्तम सल्ला... आजकालच्या सगळ्याच कॉर्पोरेट लाईफ मध्ये कमी-अधीक प्रमाणात उपयुक्त असा.

पिलीयन रायडर's picture

11 Feb 2014 - 4:58 pm | पिलीयन रायडर

अत्यंत उत्तम प्रतिसाद! प्रिंट काढुन जवळ ठेवावा असा..!

ताई, ह्या पेक्षा अजुन चांगलं काहीही उत्तर तुम्हाला मिळु शकणार नाही..

अवांतरः- ताईंच्या लेखातील इंग्रजी शब्द अजुन कुणीही वेचुन काढले नाहीत म्हणजे टॉपिक भलताच जिव्हाळ्याचा आहे असं दिसतय!

ह्या शक्यतेचा तुम्ही तक्रार करण्याआधी विचार करायला हवा होता. संघर्षात, लढाईत नुसते आपल्याजवळ काय काय हत्यारे आहेत ह्याची जाण पुरेशी नसते. शत्रूपक्षाकडे काय काय शस्त्रे आहेत आणि ती वापरली तर आपण स्वतःचे संरक्षण कसे करणार ह्याची परिपूर्ण योजना हाती असावी लागते.

मी फॉर reference म्हणून report पाठवला होता त्यांना माझी बाजू कळण्यासाठी तर त्यांची अशी reaction असेल असे वाटले नव्हते

मला नाही वाटत. पण तुमच्या कचेरीत ब्राह्मण-अब्राह्मण वाद जोरात असेल आणि तुम्ही ब्राह्मण आहात म्हणून हिरीरीने ब्राह्मणांच्या बाजूने वादात उतरला असाल तर तुम्हाला टार्गेट केले जाणे शक्य आहे. अशा परिस्थितीत तुमचे मरण तुम्ही स्वतःच ओढावून घेतले आहे. नोकरीत असताना (किंवा इतर परिस्थितीतही) तोंड बंद ठेवून सतत परिस्थितीचे अवलोकन करणे आणि आपल्या प्रत्येक वाक्याचा आजूबाजूच्या माणसांच्या विचारसरणीवर काय परिणाम होणार आहे, आपल्याबद्दल काय मत होऊ शकते ह्याचा विचार करूनच तोंड उघडणे महत्त्वाचे असते.

नाही वाद असा काही नाहीये हो
थोडेसे अप्रत्यक्षपणे हे चालते असे माझे निरीक्षण मी मांडले उघड वाद असा काहीच नाहीये

प्रत्येकाची वैयक्तिक परिस्थिती, जबाबदार्‍या वेगळ्या असतात. तेंव्हा मी म्हणतो आहे ते सर्वच लागू होईलच असे नाही. पण मतितार्थ लक्षात घेऊन, आपल्या परिस्थितीशी साजेशी कारवाई करावी.

होय आपल्या मार्गदर्शनाबद्दल आभार आणि शुभेच्छा

ज्ञानव's picture

11 Feb 2014 - 12:28 pm | ज्ञानव

होण्याआधी किंवा सगळे प्रतिसाद वाचून(म्हणजे "असे करा" "असे करून पहा" "असे करू नका") प्राजक्ताजींनी काय ठरवले ते वाचायला आवडेल.

बंडा मामा's picture

11 Feb 2014 - 6:02 pm | बंडा मामा

प्राजक्ता इथे तुम्ही फक्त तुमची बाजू मांडली आहे. अर्थातच ह्याला तुमची फर्स्ट शिफ्टवाली सहकारी आणि व्यवस्थापन ह्यांचीही बाजू असणार आहे. मिपाकरांनी सल्ला देताना हे ही विचारात घ्यावे.

सध्या ट्रान्स्फर order ची वाट पाहत रोज तिथेच कामाला जात आहे ( त्या senior ने ७-८ दिवसात होईल असे सांगितले आहे)
काही अजून बदल झाले तर सांगेन.

होय आणि बँकिंग मधला advanced course करण्याचे ठरवले आहे

परत एकदा सर्वांचे मनःपूर्वक आभार आणि शुभेच्छा

असंका's picture

12 Feb 2014 - 12:10 pm | असंका

बँकेत कुठलं काम 24/7 करावं लागतं....मला लक्षात येत नाहिये. आपण सांगू शकाल का?

Prajakta२१'s picture

6 Jul 2016 - 5:01 pm | Prajakta२१

त्यानंतरचे update :
ह्या गोष्टीनंतर सुमारे ५-६ ,महिन्याने माझी एक ठिकाणी (ब्रान्चला )बदली झाली (जेव्हा सगळे निवळले होते असे वाटत होते तेव्हा ) ती स्वीकारून मे तिथे जॉईन झाले तिथे गेल्यावर लक्षात आले ही भांडणे त्या संस्थेत सर्वत्र आहेत फक्त ब्रांच ला लोड असल्याने भांडणे तिथल्या तिथे मिटवावी लागतात एवढाच फरक .
माझ्या बदलीच्या वेळेस ती मुलगी मेडिकल वर होती आणि त्यानंतर तिने १५ दिवसात तो जॉब सोडून दिला
कोणाही काहीही न सांगता . ज्या वरिष्ठाने माझी बदली केली होती तिने पण तिची चूक मान्य केली पण मला तिकडे परत बोलावले नाही
ब्रांच ला गेल्यावर एक वर्षाने मे तेथील परीक्षा देऊन कायम झाले तसे एक बँकिंग चे प्रमाणपत्र पण मिळवले आणि आत्ता तिथेच चालू ठेवले आहे तरीपण झालेलं प्रकार कायम मनाला छळत असतो
दोन्हीकडच्या कामात आणि वातावरणात खूप च फरक असल्याने नवीन ठिकाणी मे अजून ही समरस झालेली नाहीये पण इलाज नसल्याने चालू ठेवलेय एवढेच