अनैतिकता , संगीत दिग्दर्शक आणि Nostalgia चे उमाळे

पिंपातला उंदीर's picture
पिंपातला उंदीर in काथ्याकूट
12 Jan 2014 - 12:24 pm
गाभा: 

मी अशात ऐकलेली नवीन वैचारींक पिंक :

headphone वर गाणे ऐकत बसलो होतो .

बाजुच्या डेस्क वरचे काका ," काय रे ? काय ऐकत आहेस ? "

"आतिफ अस्लम ."

त्यांनी माझ्याकडे सहानुभूती पूर्वक कटाक्ष टाकला . त्याला माझा आक्षेप नव्हता . पण ते जे काही बोलले त्यामुळे मी पार भंजाळून गेलो . इतका की ते वाक्य पूर्ण पणे quote करण्याचा मोह आवरत नाही .

"तुमच्यासमोर दुसरे काही चांगले option नाहीत का रे ? हे आजकालची पोर (संगीत दिग्दर्शक ?) इंग्लिश गाणी चोरतात आणि तुम्हाला ऐकवतात . तुम्हाला पण जे काही बाही पाश्चमात्य ते सगळ गोड वाटत . आमची पिढी त्याबाबतीत खूप नशीबवान . काय ते दिग्गज एकेक संगीत दिग्दर्शक होते त्याकाळी . ओपी , बर्मन साहेब , सलिल चौधरी . वा वा ! देवाघरची माणस सगळी . त्यांनी या मातीतल संगीत दील . काय त्या रसाळ चाली . काय ती melody !आणि हे सगळ original बर का. तुमच्या अनु मलिक आणि प्रीतम सारख्या चोऱ्या नाही केल्या त्यांनी. "

असे कुणी पिढीचे हिशेब द्यायला लागले की टाळके सरकते . भारतीय चित्रपटा च्या इतिहासात मला रस असल्याने मी त्यावर थोड फार वाचन केल होत . त्यामुळे मला हे माहित होत की भारतीय चित्रपट हा plagiarism चा इतिहास अंगावर भरजरी दागिना बाळगावा त्याप्रमाणे वागवतात . अगदी सुरुवातीपासून . मग च्यामारी ह्या ५०, ६० आणि ७० च्या दशकातल्या म्युझिक directors एकदम कसे काय गुणवत्तेची खाण निपजले की त्याकाळातले लोक आज पण त्यांच्या नावाने उसासे टाकत असतात ? अशी कशी bollywood रुपी चिखलात हि कमळ उगवली ? दाल मे जरूर कुछ काला है म्हणून थोड अधिक संशोधन केल . मग कळल की पूर्ण दालच काली आहे .

म्हणजे अस बघा . आजा सनम मधुर चांदनी मे हम हे राज कपूर च्या चोरी चोरी मधल शंकर -जयकिशन च मधुर गाण एका गाण्यावरून (http://www.youtube.com/watch?v=U-xsosv6uM0) सरळ सरळ ढापल आहे हे कळाल्यावर धक्का नाही बसणार ? दिल तडप तडप के कह रहा है आ भी जा हे सलिल चौधरी च रसाळ गाण सही सही नक्कल (http://www.youtube.com/watch?v=jLijXZBsdbo) आहे हे कळाल्यावर धक्का नाही बसणार . आर ड़ि बर्मन आणि ओपी ची अख्खी कारकीर्द चोरलेल्या इंग्लिश गाण्याच्या पायावर उभी आहे हे कळल्यावर भारतीय म्हणून वस्त्रहरण झाल्याचा फील नाही येणार का ? आमच्या पिढीच एक ठीक आहे हो पण 'सुवर्ण काळाच्या ' आठवणी काढून उसासे टाकणाऱ्या व आजकालच्या संगीताला उठसुठ नाव ठेवणार्या बाजूच्या डेस्क वरच्या काकासार्ख्या लोकाना काय वाटेल ? ज्या nostalgia च्या आपण दिवसरात्र ढेकरा देतो तोच अनैतिक पायावर उभा आहे हे कळल तर पायाखालच जाजम काढून घेतल्यासारख feeling नाही येणार त्यांना ?

वस्तुस्थिती हि आहे की या तथाकथित 'सुवर्ण कालामधली ' अनेक गाणी ही त्याकाळच्या हिट इंग्रजी गाण्यावरून चोरलेली होती . त्यासाठी आपल्या गुणवान संगीत दिग्दर्शकांनी मुळ गाण्याची मालकी ज्यांच्याकडे होती त्यांच्याकडे परवानगी घेण्याची तोशीस पण घेतली नाही हे तर उघडच आहे . दुसऱ्या शब्दात सांगायचं तर हि शुध्द चोरी होती . या चोरी चे अनेक तपशील तुम्हाला इथे सापडतील .
http://mrandmrs55.com/2012/08/24/plagiarism-in-hindi-film-music-is-imita...

http://www.itwofs.com/hindi-opn.html

nostalgia चे उमाळे काढणाऱ्या लोकांचे आद्य सरदार जे की शिरीष कणेकर याना याबाबत कुणीतरी भर कार्यक्रमात प्रश्न विचारला . कणेकर काही क्षण नक्कीच गडबडले असतील पण त्यांनी जी मखलाशी केली ती मुळातून वाचण्यासारखी आहे . कणेकर म्हणतात ," त्यांनी गाणी चोरली हे अमान्य करण्यात अर्थ नाही पण त्यांनी या गाण्याचं 'भारतीयकरण ' केल आणि त्यात जी melody आणली त्याच श्रेय या संगीत दिग्दर्शकाना द्यायला हव ." म्हणजे चोरी ते चोरी वर सिनाजोरी ?

या निमित्तान काही प्रश्न उपस्थित होतात .
१) अन्नु मलिक , प्रीतम , ओपी आणि बर्मन पितापुत्र हे संगीत शर्विलक या एकाच श्रेणीतले म्हणून गणले जाणार का ?

२) आता सगळाच मामला चोरीचा आहे हे कळल्यावर तरी nostalgia चे उमाळे थांबतील का ?

३) ओपी नय्यर आणि तत्सम संगीत दिग्दर्शक चोर आहेत हे कळल्यावर त्यांच्या भक्तांच्या भावना बदलणार आहेत का ?

मी जमा केलेला संगीत चोरीचा डाटा बाजूच्या डेस्क वर च्या काकाना मेल करणार होतो . पण नाही केला . ज्याचा त्याचा nostalgia . हल्ली मी माझ्या डेस्कवर आमच्या रहमान च्या rockstar ची गाणी फुल आवाजात ऐकतो .

प्रतिक्रिया

फारएन्ड's picture

12 Jan 2014 - 12:56 pm | फारएन्ड

जुने संगीतकार सगळे पूर्णपणे ओरिजिनल संगीत देत होते व आत्ताचे टोटल चोरतात असे मी म्हणणार नाही पण येथे टीका जरा टोकाची वाटते. बरीच 'सरळ सरळ ढापल्या' चा उल्लेख केलेली उदाहरणे मूळच्या "रॉ" किंवा लोकसंगीतात लोकप्रिय असलेल्या चाली व संगीताच्या तुकड्यांवर संस्कार करून आपल्या लोकांना आवडेल असे रूप त्याला दिलेले आहे असे जाणवते.
सरळ सरळ ढापणे म्हणजे माझ्या दृष्टीने कोणीतरी आधीच लोकप्रिय केलेली चाल व संगीत जसेच्या तसे वापरणे. माकारेना ची हिन्दी व्हर्जन, डोण्ट ब्रेक माय हार्ट नावाचे ते नवीन यारानातील भंकस गाणे ही तशी वाटतात मला.

या वरच्या लिन्क्स तशा वाटत नाहीत. 'ये दिल ना होता बेचारा', 'दिल तडप तडप के', 'आजा सनम मधुर चाँदनी मे हम' ही उदाहरणे मला मूळच्या कच्च्या स्वरूपातील संगीतावर केलेले संस्कार वाटतात. या गाण्यांमधे मूळच्या चालीतील सार्धम्याबरोबरच भारतीय संगीतकारांचीही मेहनत आहे.

आणि या उदाहरणांतून ज्या पद्धतीने एसडी/आरडी वगैरेंना "डिसमिस" केलेले आहेस ते पटले नाही - दोन्ही बर्मनचे संगीत अनेक रूपांत आहे. दोघांची शास्त्रीय संगीतावर आधारित अनेक गाणी आहेत. तसेच दोघे बर्मन त्रिपुरा परिसरातील लोकगीते हिन्दीत आणण्याबद्दल फेमस होते. या वरच्या लिन्क्स मधली अनेक उदाहरणे (अगदी 'घर आया मेरा परदेसी' ऐकल्यावरही) ऐकल्यावर मूळ गाणे म्हणजे एखाद्या यंत्रात जाणारा मेटलचा ओबडधोबड ठोकळा व त्यावर आधारित हिन्दी गाणे म्हणजे फिनिश्ड प्रॉडक्ट वाटतो :)
(एस डी व जयदेव यांची याबाबतीत तुलना केलेली वाचली आहे. जयदेव आधी एस्डींचे साहाय्यक होते. जयदेव यांची गाणी एसडी इतकेच श्रेष्ठ असले तरी हम दोनो सारखा अपवाद सोडला तर त्या चाली, ते संगीत प्रचंड लोकप्रिय करण्यासाठी लागणारे कौशल्य एसडींकडे जास्त होते. हे मी वाचलेले आहे व मला पटले).

एकूण ही गाणी इतर गाण्यावरून सुचलेली नाहीत असे मी अजिबात म्हणत नाही. त्यांनी वेळोवेळी या मूळ गाण्यांचा उल्लेख करायला हवा होता. पण मूळचे गाणेच उचलून हिन्दीत आणले आहे याच्याशी सहमत नाही. बाकी देशोदेशीची लोकगीत ऐकून त्यावर गाणी बनवणे यात सहसा काही गैर मानले जात नाही.

मला नवीन लोकांबद्दल काहीच राग नाही. अगदी अन्नू मलिकची ही काही गाणी खूप छान आहेत. नॉस्टॅल्जियाच्या उमाळ्याबद्दल सहमत आहे. फक्त त्या ज्या काकांचा उल्लेख केलेला आहे त्यांचे म्हणणे हे एक टोक असेल तर ही वरची टीका जरा दुसरे टोक वाटली.

पिंपातला उंदीर's picture

12 Jan 2014 - 1:11 pm | पिंपातला उंदीर

काहीतरी गैरसमज होतो आहे . मी कुणालाही dismiss करत नाही आहे . अनेक जुन्या संगीत दिग्दर्शकांनी इंग्रजी गाणी ढापली आणि श्रेय स्वतः घेतलं याला माझा आक्षेप आहे . आणि तो काळ सुवर्ण काळ म्हणून ओळखला जातो आणि त्याचे reference आज पण दिले जातात हे दुर्दैव . चोरलेल्या गाण्या शिवाय त्यांनी स्वतःची काही चांगली गाणी दिली हे कबूल . पण ती सर्वाना माहीतच आहेत . पण या जुन्या संगीत दिग्दर्शकांचे पाय पण मातीचेच आहेत हे सांगण्यासाठी हा लेखन प्रपंच

पिंपातला उंदीर's picture

12 Jan 2014 - 1:26 pm | पिंपातला उंदीर

या वरच्या लिन्क्स मधली अनेक उदाहरणे (अगदी 'घर आया मेरा परदेसी' ऐकल्यावरही) ऐकल्यावर मूळ गाणे म्हणजे एखाद्या यंत्रात जाणारा मेटलचा ओबडधोबड ठोकळा व त्यावर आधारित हिन्दी गाणे म्हणजे फिनिश्ड प्रॉडक्ट वाटतो Smile

याचेच स्पष्टीकरण लेखातील कणेकरांच्या उदाहरणावरून दिले आहे . मूळ चालीचे 'भारतीयकरण ' करूनच ते इथे आणले जायचे .

पैसा's picture

12 Jan 2014 - 12:59 pm | पैसा

तसे तर पूर्णपणे भारतीय शास्त्रीय संगीतातील रागदारीवर आधारित गाण्यांना पण चोरी म्हणणार का? चोरी आणि प्रेरणा यात फरक कोणी कसा करायचा? कोणतीही कलाकृती मानवी जीवनावर, त्यातल्या अनुभवावर आधारित असतेच. मग ती सगळीच चोरी म्हणायची का?

पिंपातला उंदीर's picture

12 Jan 2014 - 1:18 pm | पिंपातला उंदीर

लोकसंगीत किंवा भारतीय संगीत यांचे reference घेणाऱ्या बद्दल आक्षेप नाही . कारण तिथे copy right चा मुद्दा नसतो . पण एका कलाकाराने दुसऱ्या कलाकाराची creation भ्रष्ट आणि सही सही नक्कल करणे आणि आपली म्हणून खपवणे हे नक्कीच आक्षेपार्ह आहे . जसे Frank Sinatra ची गाणी ओपी नय्यर ने स्वतःची म्हणून खपवली . आज लाखो भारतीयांना ती चाल नय्यर चीच आहे असे वाटते .

पण अगदी सही सही नक्कल आणि प्रेरणा घेऊन बनवलेले गाणे यात फर्क आता इतक्या वर्षांनी आपण कसा ठरवणार? "रहे ना रहे हम" आणि "सागर किनारे" ही गाणी "ठंडी हवाएं" वर आधारित असल्याचं त्या त्या संगीतकारांनी सरळ सांगितलं होतं. पण ही दोन्ही गाणी चोरीची आहेत असं आज म्हणता येईल का? याशिवाय "यही है तमन्ना" हे अजून एक गाणं याच सुरांचा उपयोग करून बनवलेलं. ही सगळी गाणी पहाडी रागावर आधारित असल्याचं म्हटलं जातं. मात्र यातील एकही गाणं कमी दर्जाचं आहे असं कोणीच म्हणू शकणार नाही. शेवटी सगळे ७ सूर. त्यातच काय ती कॉम्बिनेशन्स व्हायची.

विकास's picture

13 Jan 2014 - 8:33 pm | विकास

असे कुणी पिढीचे हिशेब द्यायला लागले की टाळके सरकते .

लेख/स्वानुभवातील हा मतितार्थ समजू शकतो आणि तेव्हढ्यापुरता सहमत देखील आहे.

कणेकर अथवा तत्सम काय म्हणतील हा वेगळा मुद्दा आहे.

पण एका कलाकाराने दुसऱ्या कलाकाराची creation भ्रष्ट आणि सही सही नक्कल करणे आणि आपली म्हणून खपवणे हे नक्कीच आक्षेपार्ह आहे .

पैसा यांनी लिहीले आहेच. त्यात अजून भर... तुम्ही दिलेले दोन्ही दुवे हे पाश्चात्य शास्त्रीय/क्लासिकल संगीतातले आहेत. पहीला दुवा, Tarantella Napoletana चा होता जो इटालीअन रिफ अथवा मेलडी पद्धतीतीवर आधारीत आहे. दुसरा दुवा Szla dzieweczka चा होता जो पोलीश लोकसंगीतावर आधारीत आहे. त्यामुळे त्यात प्रत्यक्ष नक्कल नाही, खपवणे वगैरे तर नक्कीच नाही.

जसे Frank Sinatra ची गाणी ओपी नय्यर ने स्वतःची म्हणून खपवली

नक्की कुठली? हा उत्सुकतेपोटी प्रश्न आहे.

माझ्या मते: पूर्वीच्या (म्हणजे आर डी पर्यंतच्या) संगितकारांनी अशा इतर देशातील धून घेतल्या असतीलही कदाचीत, पण त्याहून अधिक स्वतःचे संगीत देखील तयार केलेले आहे. त्यांचा (कणेकरी) डिफेन्स म्हणून म्हणत नाही, पण अगदी १००% देशी बनावटीची गाणीच करायची असे ठरवले असते तर त्यांनी ते करून दाखवले असते. पण त्यांच्या ऐकण्यात आलेल्या सप्तसूरातील काही आवडलेल्या ताना/धून यांना त्यांनी आपल्या अमूक गाण्यात चांगल्या दिसतील असे म्हणत घेतले असेल तर त्यात काहीच गैर नाही. मला वाटते एकदा नौशाद अथवा शंकर (जयकीशनमधला) च्या एका फुल खिले है.... मधील मुलाखतीत सांगितल्याचे आठवते, त्याप्रमाणे त्याने कधी कधी अशा धून घेतल्यात कुठून घेतल्यात हे सांगितले होते.

हृदयनाथांनी अनेकदा अनेक गाण्यांचे सांगितलेले मी ऐकलेले आहे. त्यात "रंगा येई ओ" ची चाल ही एका बंगाली आरतीवरून कशी सुचली ते आहे. त्यांच्याच वडीलांनी दिलेली, "सुहास्य तुझे मनासी मोही.."ची चाल "मी मज हरपून बसले ग..." ला कशी दिली वगैरे भरपूर येते.

माझ्या लेखी ज्याला चोरी म्हणता येईल असा प्रकार, बप्पी लाहीरीने सुरू केला. गाण्याला चाली देण्याआधी (त्याकाळात इतर पर्याय मर्यादीत असल्याने) हा कुठल्यातरी देशात जाऊन येतो असे म्हणायची पद्धत झाली होती. त्याच्यातली ओरीजिनॅलीटी म्हणजे अशी चोरी/ढापणे म्हणता येईल. त्याचे स्वतःचे असे काहीच दिसणार नाही. अजून एक अक्षरशः ढापलेले गाणे म्हणजे "मैने प्यार कीया" हे टायटल सॉंग (आय जस्ट वाँट टू से आय लव्ह यू). गाणेच काय, भावनापण ढापल्यात! (अर्थात हे बप्पीचे नसून रामलक्ष्मण असे नाव लावून संगीत देणार्‍या विजय पाटील यांचे हे संगीत आहे).

लोकसंगीत म्हणून सोडून देता येईल, पण एकदा वणीच्या देवीवर एक नवरात्रात दूरदर्शनवर कार्यक्रम चालला होता. त्यात एका स्थानिक भाविकाने वणीच्या देवीची आरती अथवा लोकगीत म्हणताना पार्श्वसंगीतासारखे लावले होते. ते ऐकून धक्काच बसला, कारण उषा खन्ना यांनी संगीत दिलेले आणि किशोर कुमारमुळे गाजलेले सौतन मधले "जिंदगी प्यार का गीत है.." ह्या गाण्याची चाल जशीच्या तशी होती!

कदाचीत तुम्ही म्हणाल पण पाश्चात्यांनी असे केलेले नाही. त्यांच्या गाण्यात (ढापून नाही पण त्यावर आधारीत म्हणता येईल असे) आत्ता पर्यंत चर्च संगीत म्हणता येईल असे आणि अर्थातच मोझार्ट आणि तत्सम दिग्गजांनी बांधलेल्या ट्यून्स वर आधारीत चाली दिसतील. त्यांनी आत्तापर्यंत भारतीय संगीताकडे (रवी शंकर वगैरे सोडल्यास) लक्षच दिले नव्हते. पण आता ते बदलत आहे. (जसे इतिहास म्हणले की यांची फक्त युरोप आणि इस्त्रायलपासूनच सुरवात होते तसेच संगीताबाबत आहे/होते.)

असो. आपल्याकडे केवळ व्यावसायीक संगीतकारांनीच संगीताची चोरी केलेली नाही तर तुम्ही म्हणता ती प्रत्येक चोरीच समजायची झाली तर तशी सरकारीपातळीवर पण झाली होती... कुठली? ;)

आदूबाळ's picture

13 Jan 2014 - 8:45 pm | आदूबाळ

चोरीच समजायची झाली तर तशी सरकारीपातळीवर पण झाली होती... कुठली?

शंकरदयाळ शर्मा राष्ट्रपती होते तेव्हा सव्वीस जानेवारीच्या एका कार्यक्रमात बोनी एमच्या "रासपुतीन" मधला एक तुकडा मिल्ट्री ब्यांड वाजवत होता आणि त्यावर परेड चालू होती.

मला "गो गो रासपुतीन, रशियाज ग्रेटेस्ट लव्ह मशीन, इट वॉज अ शेम हाऊ ही कॅरीड ऑन" वगैरे आठवत होतं आणि तिकडे शर्माजी गंभीरपणे सॅल्युट करत होते!

मला "गो गो रासपुतीन, रशियाज ग्रेटेस्ट लव्ह मशीन, इट वॉज अ शेम हाऊ ही कॅरीड ऑन" वगैरे आठवत होतं आणि तिकडे शर्माजी गंभीरपणे सॅल्युट करत होते!

अगागागागागा =)) =))

विकास's picture

13 Jan 2014 - 9:50 pm | विकास

हे काहीतरी भलतचं! कठीण आहे!

आम्ही फार साधे आहोत हो! ;)

आम्ही फक्त "हम होंगे कामयाब" हे आणिबाणीच्या काळात म्हणायला लागणार्‍या (आणि ज्याचा उपयोग नंतर "जाने भी दो यारो" मध्ये केला गेला) त्या संदर्भात बोलत होतो.

नंदन's picture

14 Jan 2014 - 10:55 am | नंदन

>>> इट वॉज अ शेम हाऊ ही कॅरीड ऑन
इन्डीड!

बॅटमॅन's picture

14 Jan 2014 - 1:09 pm | बॅटमॅन

हा हा हा =))

निवांत पोपट's picture

12 Jan 2014 - 1:13 pm | निवांत पोपट

ह्या संकेतस्थळावर सर्व काही सापडेल.. :)

सचिन तेंडुलकर आणि अतुल बेदाडे हे दोघेही आक्रमक खेळाडू..
पण सचिन लक्षात रहातो तो त्याच्या सातत्यामुळे.
अतुल बेदाडे एखाद दोन सामन्यात चमकतो आणि नंतर विस्मरणात जातो.

कुठलेही यश हे त्याच्या सातत्याच्या कसोटीवरही मोजायला हवे.

दिग्गज संगीतकारांच्या अविशमरणीय गाण्यांची टक्केवारी हे काही काळ चमकलेल्या आणि थोड्या फार चांगल्या रचना दिलेल्या संगीतकारांपेक्षा बरीच जास्त आहे.

बर्मन पितापुत्र, ओपी, शंकर जयकिशन यांची कारकीर्द, त्यांच्या उत्तम गाण्यांची यादी काढून प्रीतम, अन्नू मलिक अशा बेदाड्यांशी ताडून पाहिल्यास अनेक गोष्टी सुस्पष्ट होतील.

संगीतातील इलेक्ट्रॉनिक्सचा प्रभाव हासुद्धा एक मोठा फॅक्टर आहे.
सध्याच्या सिनेसंगीतामधे संगीतकारांचे श्रम किती आणि साऊंड डिझायनरचे [ एडिटरचे ] किती हाहे एक वादग्रस्त मुद्दा आहे..

आर ड़ि बर्मन आणि ओपी ची अख्खी कारकीर्द चोरलेल्या इंग्लिश गाण्याच्या पायावर उभी आहे हे कळल्यावर भारतीय म्हणून वस्त्रहरण झाल्याचा फील नाही येणार का ? >>>>

हे वाक्य लिहिणार्‍याला सांष्टाग दंडवत ...कहर....खर तर खुप राग ( गाण्यातला नव्हे ! ) आला होता पण असो ....

अवांतर : आज तात्या असता तर ?????

गाण्याबजावण्यातल्या तात्याचा फॅन

पिंपातला उंदीर's picture

12 Jan 2014 - 8:12 pm | पिंपातला उंदीर

हे वाक्य लिहिणार्‍याला सांष्टाग दंडवत ...कहर....खर तर खुप राग ( गाण्यातला नव्हे ! ) आला होता पण असो ....

मग?

सुहास..'s picture

13 Jan 2014 - 11:15 am | सुहास..

मग >>
हे आमच आजच्या संगीता विषयी मत !!
http://misalpav.com/node/14241

फार आधीच लिहुन झाल्याने आता त्याविषयी लिहीत नाही ..

बाकी तुमच्या खालच्या प्रतिसादाला ...

हेमराज माहीत आहे कोण होता ते ? त्याच मुंडक नाचवित असताना , पाकिस्तान्यांच्या चेहर्‍यावरचे भाव बघीतले आहेत का ? अश्या भोसडींच्याच्या इथले किंवा तेथील गायकाचा आवाज का ऐकु मी ??? सिएसटी ला जे मारले गेले त्यांच्या नातेवाई़आंना तुम्ही छाती ठोकपणे हे सांगु शकता का ??

असेल तर मग मात्र तुम्हाला हात जोडुन नमस्कार आहे ब्वा आमचा ..

शेवटाचा धन्यवाद !!

सुहास..'s picture

12 Jan 2014 - 1:20 pm | सुहास..

एक सांगायचे राहिले ...

अतिफ अस्लम हा पाकिस्तानी आहे आणि " भाई पॉलिटिक्स अपनी जगह , और संगीत कल्चर अपनी जगह " सारखं थर्ड क्लास वाक्य माझ्या पाहण्यात नाही

इष्टुर फाकडा's picture

12 Jan 2014 - 7:54 pm | इष्टुर फाकडा

हेच आणि हेच !

पिंपातला उंदीर's picture

12 Jan 2014 - 8:15 pm | पिंपातला उंदीर

आपली अनेक हिट गाणी पाकिस्तानी गाण्यावरून ढापली आहेत . किती लिंका देऊ ? तुम्हाला ऐकताना गोड वाटली असतील पण कबूल न करून जाता कुठे ?

मारकुटे's picture

12 Jan 2014 - 9:50 pm | मारकुटे

>>> भाई पॉलिटिक्स अपनी जगह , और संगीत कल्चर अपनी जगह "सारखं थर्ड क्लास वाक्य माझ्या पाहण्यात नाही

शमत आहे.
अत्यंत कर्मदरिद्री खाल्ल्या ताटात हागणारे विचारवंत असली भलामण करत असतात.

अनेको बोलीवुड गाणी पाकिस्तानी गीता वरून उचलली आहेत(अगदी रेहमान चे चैय्या छैय्या सुधा ) आणि ह्यासाठी स्वतंत्र धागाच हवा.

ज्ञानव's picture

14 Jan 2014 - 1:06 pm | ज्ञानव

लागे राहो सुहासजी,
आणि संगीतात राजकारण नसते कि काय?

आणि ओपी किंवा बर्मन किंवा सी रामचंद्र (संगीत शारदामधील "मूर्तिमंत भीती उभी..." ह्यावरून "यह जिंदगी उसीकी है ....")
पंडित हृदयनाथ मंगेशकर ह्यांनी तुम्ही म्हणता तशी "चोरी "(कारण चोरी हा शब्दच इथे गैर आहे. तुम्ही नकळत काही दिग्गजांचा अपमान आणि अतिफ असलमसारख्यांचा सन्मान करता आहात असे वाटून त्रास होतो.) केल्याने कुणाचे काही नुकसान झाले का? आम्हाला तर आनंदच, समाधानच मिळाले आणि त्यासाठी ह्या "चोरीचे" मी समर्थनच करीन.
आणि टाळके सटकलेच पाहिजे कारण इतके चिरंजीव संगीत बांधण्याची अक्कल जर हल्लीच्या पिढीत नसेल तर टाळके सटकलेच पाहिजे पण मग कृती करा.....तुम्ही म्हणता तसे ओरिजिनल ऐकवा. "फेविकॉल लगाले...." ओरीजीनलच आहे की...थोडे सुश्राव्यपण हवे. "...उशीर झायीला..वाट माझी बघतोय रिक्षावाला....." ओरिजिनलच आहे पण थोडे दर्जेदार असते तर बरे झाले असते.

बाकी तुम्ही मराठी संगीतकार सोडलेत ते "ओरिजिनल" म्हणून की त्यांच्या "ओरीजीण्यालीटीचा" स्त्रोत ज्ञात नाहीत म्हणून!!!!

अन त्या आजोबांना प्रत्युत्तर म्हणून लेख न्याय आहे. भलेही थोडा आक्रमक आहे तरी

आदूबाळ's picture

12 Jan 2014 - 1:29 pm | आदूबाळ

बरं क्षणभर धरून चालूया की केली चोरी. त्याने गाण्याच्या सु/कुश्राव्यतेत काही फरक पडणार आहे का? मदनमोहनची हळूवार गाणी आवडतात का प्रीतमचा दणदणाट हा आपापल्या आवडीचा प्रश्न आहे.

पण या जुन्या संगीत दिग्दर्शकांचे पाय पण मातीचेच आहेत हे सांगण्यासाठी हा लेखन प्रपंच

याला तर सडकून आक्षेप आहे. अकबर-बिरबलाची "हात न लावता रेघ लहान कर" ची गोष्ट आठवते. नव्यांची बाजू घेण्यासाठी जुन्यांनाही तोच दोष लागू होता हे सिद्ध करण्यात कशाला उर्जा घालवायची?

पिंपातला उंदीर's picture

12 Jan 2014 - 1:35 pm | पिंपातला उंदीर

बरं क्षणभर धरून चालूया की केली चोरी. त्याने गाण्याच्या सु/कुश्राव्यतेत काही फरक पडणार आहे का?

प्रश्न नैतिकतेचा आहे .

मदनमोहनची हळूवार गाणी आवडतात का प्रीतमचा दणदणाट हा आपापल्या आवडीचा प्रश्न आहे.

मान्य
नव्यांची बाजू घेण्यासाठी जुन्यांनाही तोच दोष लागू होता हे सिद्ध करण्यात कशाला उर्जा घालवायची?

मजा येते म्हणून : )

मी स्वप्न पडण्याच्या बाबतीत फार भाग्यवान माणूस आहे. मी नेहमी दुसर्‍या दिवशी सकाळी असा विचार करतो की कालचे स्वप्नातले दॄष्य आपण कोठे पाहिले होते काय? त्यावेळी निष्कर्ष असा असतो की काही वेळा परिचित व काही वेळा पूर्ण कल्पनापूर्ण अशी पार्श्वभूमी असते. कोणत्याही कलाकारीच्या बाबतीत असेच असते. आज मी ज्यावेळी की बोर्डवर काहीतरी वाजवितो त्यावेळी ओ पी नय्यर यांच्या फ्रेझेस माझ्या वाजविण्यातून आपोआप बाहेर येतात. ( अशा विशीष्ट गोष्टी केवळ नय्यरचा मेंदू निर्माण करू शकला असे माझे निरिक्षण आहे. व आग्रहाचे म्हणणेही) याचाच अर्थ असा की माझ्या मेंदूवर काही सांगितिक संस्कार नय्यर यांचा शैलीचे झाले आहेत. मग माझ्या वादनाला तुम्ही कॉपी म्हणणार का ? हा प्रश्न आहे.
आपल्याला संगीतात चोरी करण्याचा मोह झाला होता काय ? हा प्रश्न मी स्वता:च नय्यरना एक हजार कानांच्या साक्षीने विचारला होता.व त्याचे उत्तर " सुन सुन सुन सुन जालिमा" हे गीत चोरलेले आहे अशी त्यानी लगोलग कबुलीही दिली होती. परंतू त्यानंतरचे सगळे माझे स्वतः चे आहे हे ठासून सांगायला ही ते विसरले नव्हते. हे असो. पण त्यानाही ही काही चाली लोकगीतातून सुचल्या असणारच .तरीही मी त्याला कॉपी मानीत नाही. त्यांचे उदा. सांगायचे झाले तर " हमको तुम्हारे इश्कने क्या क्या बना दिया" हे गीत छायानट या रागावर आधारित आहे व ही चाल पारंपारिकपणे मुशायर्‍यात वापरली जात होतीच. म्हणजे खरे तर त्यांच्या मौसिकीला एक सोडून दोन आधार झाले तरीही ती चोरी नाही.
अशीच चाल एस डी नी प्यासा मधे ही वापरली आहे.
रोशन यानी तर कित्येक बंदिशी " गीत" म्हणून वापरल्या आहेत. तरीही त्यातील स्वरमेळ, वाद्यांची निवड, गायकाचा सुरेख उपयोग या साठी संगीतकाराला दाद ही दिलीच पाहिजे.
बर्मनदानी तर " खमाज" रागावर आधारित अप्रतिम व विविध रचना सादर केल्या आहेत. पण त्याला शास्त्रीय संगीताची
कॉपी असे मी म्हणू शकत नाही.
जाता जात मर्डर मधील 'दिलको हजार बार रोका रोका रोका" ही गीत नय्यरच्या " नीले आसमानी" याची आठवण करून
देते. " नीले आसमानी" हे ही एखाद्या परदेशी धुनीची आठवण करून देत असेल तरीही नय्यर यांचा ऑरकेस्ट्रा गीता दत्त च्या आवाजाचा थ्रो, अलिशा चिनाय चा " दिल को मधला मस्त उपयोग याचे श्रेय अनुक्रमे नय्यर व अनू मलिकला द्यायलाच हवे.
किरवाणी, अहीर भैरव हे राग अरेबिक संगीतात डोकावतात. भूप हा राग जपानी संगीतात डोकावतो. कशाला कॉपी व ओरिजिनल यांचा खल करायचा ?

पिंपातला उंदीर's picture

12 Jan 2014 - 1:45 pm | पिंपातला उंदीर

अभ्यासपूर्ण प्रतिसाद . . पण खरच नय्यर चा दावा खरा आहे ? खरच त्याने एकच गाण चोरलं आहे ?

ही लिंक बघा . original गाण्याच्या लिंक समोरच दिल्या आहेत . tally करून बघा

http://www.itwofs.com/hindi-opn.html

चौकटराजा's picture

12 Jan 2014 - 1:56 pm | चौकटराजा

अमोलसाहेब ,
मी नय्यरचा जाम पंखा असलो तरी मला 'लाखो है यहां दिलवाले' बद्दल गेली २५ वर्षे संशय होता. आपण दिलेली लिंक मी
ऐकली. तरीच नैयर आर डी ला एक प्रतिभावान कॉपी कॅट म्हणाले होते. असो. मूळ गीत मस्त आहे. पण त्या संगीत काराने
जर ओ पी ची कॉपी ऐकली तो तो ही म्हणला असता प्रत्याक्षाहून प्रतिमा उत्कट !

तिमा's picture

12 Jan 2014 - 1:56 pm | तिमा

जुन्या संगीतकारांनी गाणी जशीच्या तशी उचलली की त्यातून प्रेरणा घेतली याबाबत वरील साइटसवर स्पष्ट उल्लेख आहेत. आणि तरीही आम्हाला ती जुनी गाणीच गोड वाटतात. त्या जुन्या संगीतकारांना शास्त्रीय संगीताचेही ज्ञान होते. त्याचा अनेक गाण्यांवर स्पष्टपणे प्रभाव जाणवतो. वेगवेगळे ताल वापरले जायचे. आता चाराच्या पटीतच काथ्या कुटला जातो. रुपक, दादरा असे ताल असतात हे ह्यांच्या गावीही नसते. अर्थात कुणालाही जे संगीत आवडते ते त्याने ऐकावे. जुन्यांनी नव्यांना सांगू नये आणि नवीनांनी उगाच जुन्या संगीताबद्दल अनुदगार काढू नयेत.
आताच्या संगीतात भारतीय संगीताचा कणही दिसत नाही. एकतर संपूर्ण वेस्टर्न पद्धतीची रचना नाहीतर पंजाबी धुडगुस. आणि काव्याच्या दर्जाबद्दल तर बोलूच नये. ही झाली आम्हा म्हातार्‍यांची मतं. त्याहून तुम्हाला जे ऐकायचं ते ऐका ना, उगाच, आम्हाला 'उमाळे' वगैरे दूषणे देऊ नका.

चिन्मय खंडागळे's picture

12 Jan 2014 - 7:07 pm | चिन्मय खंडागळे

आपल्या हिरोजचे पाय मातीचे आहेत हे कळल्यावर माणूस कसा डिनायल मोडमध्ये जातो आणि आक्रमक होऊन प्रतिवाद करू लागतो त्याचं वरचे प्रतिसाद म्हणजे उत्कृष्ट उदाहरण आहेत. 'तुम्ही ज्याची पूजा करता आहात तो देव नाही, एक पाषाण आहे' असं सांगितलं तर लोक मारायला धावतातच.
तुम्ही सांगितलं आहे त्यात नवीन काहीच नाही. 'आयला, ते ४०-७० च्या दशकातले संगीतकार किती थोर्थोर! एवढ्या अद्भुत रचना एवढ्या सातत्याने देणं म्हणजे काय प्रतिभा असेल नै' अशी सर्वसाधारण रसिकाप्रमाणे माझीही कल्पना होती. हळूहळू पाश्चात्य संगीत ऐकण्याचं प्रमाण वाढत गेलं, तसतसे शॉक्स लागत गेले. पूर्वी आजच्यासारखा माहितीविस्फोट झाला नव्हता म्हणून या ढापू लोकांच्या चोर्‍या खपून जात. आजकाल लोक बर्‍यापैकी बहुश्रुत होत असल्यामुळे नव्यांच्या चोर्‍या तर पटकन समजतात, पण काही सणसणीत धक्केपण बसतात. युट्यूबसारख्या साईटवर व्हिडिओखालचं कॉमेंट सेक्शन वाचत जा. बर्‍याचवेळा ते गाणं कोणत्या गाण्यावरून ढापलं आहे त्याची थेट लिंक कोणीतरी दिलेली असते. माझ्या मते बहुतेक गाजलेल्या फिल्मी गीतांपैकी ९०% (याहून जास्त, बहुदा जवळजवळ सर्व!) गाणी ही आयदर अभारतीय संगीतातून कुठून ना कुठून ढापलेली, किंवा भारतातल्याच कुठल्यातरी प्रांतातील फोक ट्युनवर आधारीत, किंवा भारतीय शास्त्रीय संगीतातल्या एखाद्या जुन्या चीजेवर बेस्ड असतात. (दुसर्‍या आणि तिसर्‍या कॅटेगरीवर आक्षेप नाही). बरं या लोकांचं केवळ पाश्चात्य संगीतावर भागत नसे. जगाच्या कानाकोपर्‍यातून हे लोक बिनदिक्कत चाली उचलत, (आणि आजचेही उचलतात) मी वाचलं आहे त्याप्रमाणे चित्रपटाचा निर्माता तेव्हा गाजत असलेल्या पाश्चात्य गाण्यांच्या रेकॉर्ड्सची चळत आणून संगीत दिग्दर्शकासमोर टाकत असे, आणि 'ठोक यातून चारपाच चाली' अशी ऑर्डर टाकत असे. संगीत दिग्दर्शक साहेब मग तीच चाल जरा इकडून तिकडून फिरवून त्याचं अल्ट्रेशन, सॉरी सॉरी 'भारतीयीकरण' करून देत.

याउलट पाश्चात्य साँग-रायटर्सनी भारतीय गाण्यातलं एखादं टुंयटुंय जरी उचललं, (सँपलिंग केलं) तर आधी परवानगी घेतली जाते, गाण्याचे हक्क ज्याकडे असतील त्याला त्याचा मोबदला मिळतो, आणि क्रेडिट दिलं जातं. अलिकडच्या ग्रॅविटी चित्रपटात एक पात्र नुसतं 'मेरा जूता है जपानी' असं गुणगुणतं, तर एण्ड क्रेडिट्समध्ये त्याचा व्यवस्थित श्रेयोल्लेख केला होता.

अनेक जुन्या संगीत दिग्दर्शकांनी इंग्रजी गाणी ढापली आणि श्रेय स्वतः घेतलं याला माझा आक्षेप आहे . आणि तो काळ सुवर्ण काळ म्हणून ओळखला जातो आणि त्याचे reference आज पण दिले जातात हे दुर्दैव .

प्रिसाइजली!

तसे तर पूर्णपणे भारतीय शास्त्रीय संगीतातील रागदारीवर आधारित गाण्यांना पण चोरी म्हणणार का?

अर्थातच नाही, अभिजात भारतीय संगीत हे केवळ आपल्यासाठीच नाही, तर जगासाठी असलेला ठेवा आहे, पण असं बघा, नदीवर जाऊन पाणी आणणं, आणि शेजारच्याच्या विहीरीवरून त्याला न विचारता पाणी उपसणं, यात काही फरक आहे की नाही?

बाकी, काही 'अवीट चवीची' हिंदी-मराठी चित्रपटातली गाणी आणि त्यांची ओरिजिनल्स यांची काही उदाहरणं देणार होतो, पण ते म्हणजे समुद्रातल्या माशांच्या थव्यातले चारपाच मासे दाखवल्यासारखं होईल. अशा गाण्यांच्या साईट्सच्या साईट्स उपलब्ध आहेत. इच्छुकांनी शोधाव्यात. उदा. http://www.itwofs.com

बाकी, थोडाफार फेरफार केला तर ती काही चोरी नाही ठरत, असे म्हणणार्‍या वरच्या काही मंडळींनी मिसळपाववर यापूर्वी बरंच ओरिजिनल लेखन केलं आहे. त्यातलाच एखादा लेख, ललित, कविता कोणी उचलून, पात्रांची नावं बदलून, जरा इकडेतिकडे फेरफार करून आपल्या नावाने प्रसिद्ध केलं तर त्याला चोरी म्हणणार की कसं?

बर्फाळलांडगा's picture

12 Jan 2014 - 8:17 pm | बर्फाळलांडगा

.

आर. डी. बर्मन ची ४७ सर्वात जास्त. बाकिच्यांची (जुने बघितले फक्त - ओ. पी., ल. प्या., शं.ज., स.चौ) ३० हून कमी आहेत. असं समजू की ही लिस्ट उदाहरण म्हणून आहेत व प्रत्येकाने १०० चाली उचलल्या. तरीही खूपच कमी आहेत. आणि अर्थातच मूळ चाल व त्या चालीवरून बेतलेलं गाणं हे ९०% वेळा फारच वेगळं आहे. चाल उचलणं इतकं सोपं असतं तर आपण अ.उ. आणि चि.खं. ची खंडीभर गाणी नसतो का ऐकत बसलो? !

'योग्य श्रेयोल्लेख करणं गरजेचं आहे' आणि 'जुनं ते सोनंच' म्हणणं चूक आहे हा तुमचा मुद्दा पटला. पण तो सांगताना तुमच्याकडूनहि टोकाची भूमिका घेतली गेली.

आनन्दा's picture

13 Jan 2014 - 12:20 pm | आनन्दा

माझ्या मते फरक आहे...
आता मला सांगा, लव्ह ट्रॅन्गल या विषयावर कितितरी चित्रपट येत असतात.. यातल्या बर्याच चित्रपटांची कथा काही प्रमाणात साऱखीच असते.. त्या सगळ्यांना आपण चोरी म्हणणार का?

पिंपातला उंदीर's picture

12 Jan 2014 - 8:07 pm | पिंपातला उंदीर

+११११. जबरि. अप्रतिम.

दुसर्‍याच्या निर्मितीचं श्रेय स्वतः घेणं अयोग्य आहे हे निर्विवाद.

पण लेखात दिलेल्या दोन्ही लिंक्स अत्यंत लक्षपूर्वक ऐकल्यावर उल्लेखित गाण्यांच्या केवळ पहिल्या ओळींचा (नगण्य) भास होतो. यावारनं लेखकानं जे दिव्य निष्कर्श काढलेत :

दाल मे जरूर कुछ काला है म्हणून थोड अधिक संशोधन केल . मग कळल की पूर्ण दालच काली आहे .

...सरळ सरळ ढापल आहे ... सही सही नक्कल

ते आश्चर्यकारक आहेत.

आजा सनमचा नुसता पहिला पिक-अप म्युझिक पीस : सां-निसांप, पध़सांनिसां निसांप, पधसांरें/ग़ंरेंसांरेंनिध़पमग़रेसा आणि त्याला जोडून असलेला ही अत्यंत दिलखेचक रचना : मंध़ंमं-सांमंसां / गंपंगं-सांगंसा उल्लेखित सिंफनीच्या किती तरी पुढे आहे.

मोरे साजन ले चल मुझे तारोंके पार, लगता नही है दिल यहां... नंतर लतानं घेतलेली ती जागा... (पध़मप-मध़प) केवळ विलोभनीय आहे.

गाण्याच्या इंटरल्यूडचा तर जवाब नाही. ती दोन्ही इंटरल्यूडस वेगवेगळी आणि तितकीच आकर्षक आहेत. लिंकमधे दिलेली एकसुरी सिंफनी त्यापुढे झक मारते.

कडव्यांबद्दल तर बोलायलाच नको. आणि कडव्यातल्या ओळीतले पिक-अप्स तर लेखकाच्या बधीर श्रवणीयते पलिकडे आहेत.

पुन्हा समेवर येतांना केलेलं काँपोझिशन तर कहर आहे.

एखाद्या गाण्याचा समग्र अभ्यास केला तर अजय-अतुलनं म्हटल्याप्रमाणे `एकेक गाणं एकेक युनिवर्सिटी आहे'.

त्यामुळे लेखाच्या या शेवटाविषयी :

ओपी नय्यर आणि तत्सम संगीत दिग्दर्शक चोर आहेत हे कळल्यावर त्यांच्या भक्तांच्या भावना बदलणार आहेत का ?

इतकंच म्हणावंसं वाटतं, बाळ आधी नीट ऐकायला शिक.

ह्या गटातले आहेत हे.गाणे पुर्ण एकण्याआधी हे महाशय हे कुठुन बरे चोरले असणार ह्याचा शोध घेत असतात. दाल मैं कुछ काला है म्हणत सगळे गाणेच चोरले आहे असा निर्णय देतात.

संजय क्षीरसागर's picture

14 Jan 2014 - 1:04 am | संजय क्षीरसागर

पण उद्या कुठलाही सोम्या गोम्या येऊन अविस्मरणीय हिंदी सिनेसंगीताबद्दल काहीही भंकस करायला लागला तर लोकांची दिशाभूल व्हायला नको म्हणून प्रतिसाद दिले.

लेखात दिलेल्या दुसर्‍या गाण्याबद्दल (दिल तडप तडपके कहे रहा है आभी जा) लिहायचं तर एक पोस्ट होईल.

लताचा तो आलाप (सां / रेंगंरेंसांध़ / धध़पधध़ / धसांधपम) ही प्रेयसीनं प्रियकराला दिलेली इतकी आंतरिक साद आहे की नुसती ऐकत राहावी.

गाण्यात सतत येणारं `धध़म / धध़म' हे स्वरसंयोजन इतकं नजा़कतीनं केलंय की सलीलदांच्या सौंदर्यदृष्टीला सलाम करावासा वाटतो. आणि त्याचं टाईमिंग असं काही अफलातून आहे की ऐकणार्‍याचं मन गायला लागतं!

गाण्याचं इंटरल्यूड खर्जातले आणि कोमल सूर घेऊन केलंय : सा-रेसामरे-सारेसाध़ध / धंसारे़रे / गरेपग / सारेसाध़ध / सारेसाधम / सारेसापग / सारेसापग / सारेसाध़ध, आणि...

त्याची मध्यसप्तकातल्या `तू नही तो ये बहार क्या बहार है' शी केलेली चकित करणारी जोडणी केवळ मर्मज्ञच जाणू शकतो.

लेखात दिलेल्या सिंफनीचं स्वरसंयोजन इतकं उथळ आणि एकसुरी आहे की गाण्यातलं काहीही न समजणारा सुद्धा सलीलजींच्या काँपोझिशनला दाद देईल. आज चाळीस-पन्नास वर्ष ही गाणी गाजतायंत ती त्यांच्या स्वरसंयोजनामुळे. आणि ती तशीच अविस्मरणीय राहातील कारण प्रत्येक संवेदनाशिल व्यक्तीला हरेक युगात ती मोहवतील.

त्याला नॉस्टालजीया म्हणणं म्हणजे कर्णबधीरतेचं लक्षण आहे.

लेखाचा विषय चांगला आहे, पण मांडणी पोरकट आहे. जी जुनीच माहिती आहे, ती लेखकास नव्याने मिळाल्याने काहीतरी मोठे शस्त्र हाती लागल्यासारखे झाल्याने, लेख अत्यंत आक्रस्ताळा झाला आहे. आणि त्यात अनेक सरसकट वस्तुस्थितीची फारकत घेतलेली विधाने आहेत (उदा. एस. डी. बर्मन ह्यांचे बरेचसे संगीत 'चोरलेले'आहे वगैरे).

कणेकरांनी कुठल्याश्या जाहीर कार्यक्रमात नक्की काय म्हटले, ते 'मुळातून वाचण्यासारखे आहे' म्हणजे ते तुम्ही स्वतः ऐकलेले नाहीत. त्यांनी नक्की काय म्हटले हे माहिती नाही, तरीही तुम्ही जे quote केले आहेत, त्याचा मतितार्थ बरोबर आहे असे मी मानतो. तेव्हाचे संगीतकार अनेक पाश्चिमात्यच काय, अगदी आफ्रिकन वगैरे गीतांवरून आपली (सर्वच नव्हे, काही थोडीफार) गीते बेतत हे अर्धसत्य आहे. अर्धसत्य अशासाठी म्हणतो की, सर्वसाधारणपणे मुखडा तसा बेतलेला असे,पुढील सर्व साज-- गाण्याची इंटरल्यूड्स, त्यांचे अंतरे, त्यांचे ठेके इत्यादी बहुतांश सर्वच-- स्वरचित असे. (एखादे गाणे अगदी शब्दांपासून तसेच्या तसे घेतलेले असे, उदा. 'पप्पा सांगा कुणाचे'-- हे आपण थोडे अपवाद म्हणून सोडून देऊ). तुम्हीच लेखात दिलेल्या दोन गीतांचे अंतरे, त्यांची इंटर्ल्यूड्स, गाण्याच्या स्टाईल्स, अंतर्‍यांच्या चाली, ठेके इत्यादी सर्वच आक्रस्ताळेपणा न करता,नीट ऐकलेत तर हे तुमच्याच लक्षात आले असते! थोडक्यात त्यांचे 'भारतीयीकरण' असे ज्याला कणेकरांनी म्हटले आहे, असे तुम्ही सांगता, ते बरोबर आहे.

चाळीशीच्या दशकाच्या उत्तरार्धापासून, हिंदी चित्रपटसृष्टीत एक नवी लाट आली, ती बहुतांश 'मेलडी'ची होती. पण त्याचबरोबर त्यात अनाहूतपणे अनेक प्रवाहांना सहजपणे समाविष्ट करण्यात आले. शुद्ध हिंदीबरोबरच उर्दूच्या लहेज्यात लिहीणारे लिरीसिस्ट्स, पारंपारीक भारतीय वाद्यांबरोबरच पाश्चिमात्य वाद्यांचा समावेश, इतकेच नव्हे, तर पाश्चिमात्य वाद्यवृंदांच्या संकल्पनांचा वापर, अ‍ॅरेंजमेंट्स, कॉंट्राज, -- ज्यांत प्रामुख्याने गोवानीज ख्रिश्चन वादकांचा पुढाकार होता, असे बरेच काही त्या लाटेत आले. इतकेच नव्हे, पारंपरीक भारतीय लोकवाद्यांना नवी परिमाणे ह्यावेळी मिळाली (ढोलकचा नव्याने होत असलेला वापर, त्यातील प्रयोग इत्यादी), तसेच सतार, संतूर, वगैरे वाद्यांनाही ह्या युगात, सदर संगीतांत स्थान मिळाले. तुम्ही ज्या संगीतकारांना लेखात तुच्छतेने संबोधले आहे, त्या सर्वांचाच ह्यात महत्वाचा वाटा होता.आजच्या हिंदीठीत लिहायचे तर 'त्यांचे योगदान' होते!

त्या काळातील (४५ - ९०) संगीताचा एक चाहता, व त्याविषयी नॉस्टील्जिया बाळगणारा ह्या नात्याने इथे काही उपस्थित केलेल्या प्रश्नांना, व टीकेस उत्तरे देण्याचा प्रयत्न करतो.

ITWOFS साईट मी सुमारे १०- १२ वर्षांपूर्वी पाहीली असावी. त्यानंतर अशी माहिती येतच राहिली. त्यामुळे शंकर जयकिशन सारख्या संगीतकारांविषयीचा माझा आदर अजिबात कमी झाला नाही. कारण वर नमूद केलेच आहे-- ती गाणी तशीच्या तशी, सर्वच मूळ बाजासकट घेतलेली अजिबात वाटत नाहीत. त्यांच्या मुखड्यांवरून स्वतःचे संस्कार घडवून ते आपलेसे करणे हे कसब होते. नुसतीच येथून तिथून गाणी 'ढापणारे' हे संगीतकार असते, तर त्यांच्या गाण्यांवर त्यांचा स्वतःचा ठसा उमटता नसता. आजही आपण 'हे गाणे 'एस-जे'चे, हे 'ओ-पी'चे, हे सलील चौधरींचे 'हे सहज ओळखू शकतो. त्यांचेत्यांचे स्वतःचे संस्करण त्या गीतांवर झाले आहे, हे अगदी सहज जाणवते.

'तेव्हाचे संगीतकार 'चोर' होते' तसेच 'आताचे संगीतकार फालतू आहेत' अशा अर्थाची सर्वच विधाने पोरकट आहेत. काळानुसार आवडीनिवडी बदलतात, नवे येते, जुने मागे पडते, आपापल्या आवडीनिवडीनुसार आपणास हवे ते घ्यावे. मी त्या जुन्या गीतांत, त्या संगीतात रमलेला माणूस आहे असे मी म्हणतो, पण त्याचबरोबर मी असेही म्हणतो की आताचे संगीत मला आवडत नाही, कारण त्याच्या माझ्याशी सांधा जुळत नाही- त्याविषयीची माझी टीका इतकीच आहे. आपल्या परीने आजचे प्रथितयश संगीतकारही आपापल्या तर्‍हेने सर्जनशील असतीलच, तसे ते नसते, तर ते काँपिटीशनमधे इतके पुढे येते ना!

मात्र हिंदी चित्रपट संगीताचा एक अभ्यासक म्हणून मला जे जाणवते तेही इथे नमूद करतो. अगदी सुरूवातीपासून पाहिले तर ह्या वाटचालीचे चार खंड पडतात. पहिला, अगदी भारतीय शास्त्रीय संगीतांवर आधारीत, तबला इत्यादी निवडक प्रमुख वाद्यांनी नटलेल्या गीतांचा कालखंड. दुसरा, १९४५ च्या सुमारास सुरू झालेला, मेलडी प्रमुख बलस्थान असलेला कालखंड (ज्यातील बलस्थानांचे मी वर थोडे सविस्तर वर्णन केलेले आहे). कणेकरांनी ह्या कालखंडावर सुंदर टिपण्णी केली होती ती अशा अर्थाची, की तेव्हा हिरो बावळट होता, हिरोईन बर्‍यापैकी 'बोल्ड' होती (माझे शब्द, कणेकरांचे नव्हेत), चित्रपट हिरॉईन्सभोवती चालायचे, तेव्हा त्यांच्या मेलडीयुक्त गीतांना चित्रपटाच्या बलस्थानात महत्व होते. तिसरा कालखंड सत्तरीच्या सुरूवातीस आलेल्या 'दिवार' व 'जंजीर' पासून सुरू झालेला. हे अमिताभ युग, ज्यात हिरो 'मॅचो'झाला. चित्रपट त्याच्या ह्या मॅचोगिरीभोवती फिरू लागले. मेलडीयुक्त गीतांचे महत्व कमी झाले. ते तसे कमीकमीच होत गेले. गाणी बहुतांश त्याच पारांपारीक पद्धतीची येत गेली, पण त्यांवर चित्रपटांचा धंदा आता अवलंबून नसल्याने, ती secondary importance ची झाली. हा प्रामुख्याने भप्पी लाहीरीचा जमाना. हळूहळू चौथा कालखंड येऊ घातला होता, हा नव्वदीच्या दशकापासून सुरू झालेला visual महत्वाचा जमाना. आता गाण्याची (केवळ) श्रवणीयता राहिली नाही, कारण visual अंग आता महत्वाचे ठरू लागले. गाणी पडद्यावर कशी सादर केली गेली आहेत, ते आता महत्वाचे ठरू लागले. सध्या सुरू असलेला जमाना हाच होय.

तेव्हा जसजश्या गरजा बदलत गेल्या, तसतशी गाण्यांनी नवनवी वळणे घेतली. माझ्या (जुनाट माणसाच्या) मते ह्यात 'बरेवाईट' असे काही नाही. 'तो' एक जमाना होता, 'हा' आताचा जमाना आहे, इतकेच मी समजतो.

विषय जिव्हाळ्याचा असल्याने प्रतिसाद बराच पसरट झाला असल्याची शक्यता आहे.

प्रदीप's picture

13 Jan 2014 - 6:32 pm | प्रदीप

ते 'नैतिकते'बद्दल लिहायचं राहिलंच की!

त्याचं काय आहे, मी एक खास मध्यमवर्गीय माणूस असल्याने, माझी स्वतःचीच नैतिकता कचकड्याची आहे, अशी मला दाट शंका आहे, तेव्हा त्याविषयी मी पामर काय बोलणार?

अर्थात धागाकर्त्याने ज्या अर्थी हा मुद्द्दा कळकळीने मांडला आहे, आणि त्याविषयी सहमती दर्शवणारे प्रतिसाद व (इथे व 'तिथे' ही) आले आहेत, तेव्हा ह्या सर्वांची स्वतःची नैतिकता अभंग असावी, त्यांनी कधीही आयुष्यात खोटे सॉफ्टवेअर वापरले नसावे, अनधिकृत डाऊनलोड्स केले नसावेत, अनधिकृत मीडिया streaming केल्या नसाव्यात, असे मी मानतो, व शांतपणे ती चर्चा वाचतो. धन्यवाद.

चौकटराजा's picture

13 Jan 2014 - 6:53 pm | चौकटराजा

अगं बाबो ! हा तर फायनल नॉकिंग पंच मारला दोन्ही टीमला !

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 Jan 2014 - 7:15 pm | डॉ सुहास म्हात्रे

:)

चोरलेल्या गाण्या शिवाय त्यांनी स्वतःची काही चांगली गाणी दिली हे कबूल. पण या जुन्या संगीत दिग्दर्शकांचे पाय पण मातीचेच आहेत हे सांगण्यासाठी हा लेखन प्रपंच

पण आता मात्र झक मारली आणि मुंबै पाहिली असं झालं असेल!

विकास's picture

13 Jan 2014 - 8:55 pm | विकास

भारतीय चित्रपट नवीन तात्काळ युट्यूबवर येणे आणि जुने युट्यूब रांगायला लागल्यापासूनच असणे, ह्यात काही नवीन नाहीच. तेच नवीन चित्रपटांच्या १-२ डॉलरमधे (कधी कधी बरेच सामान घेतल्यास फुकटच) डिव्हीडी या भारतीय दुकानात मिळणे देखील येथे नवीन नाही. त्यावर एकदा एक जण तावातावाने नैतिकतेच्या समर्थनार्थ बोलत होता आणि हे चुकीचे कसे ते सांगत होता. त्यावर दुसरा म्हणाला, काय बिघडले अशा डिव्हीडीज् घेतल्यातर? नाहीतरी हे सिनेमे देखील स्टोरीलाईनची चोरीच करतात मग आपण तसेच बघितले तर काय बिघडले?

तात्पर्यः भारतीय माणूस हवे तसे लॉजिक वापरू शकतो, काळजी नसावी. ;)

बाळ सप्रे's picture

14 Jan 2014 - 11:43 am | बाळ सप्रे

धागाकर्त्याच्या नैतिकतेवर घसरण्याचे कारण नाही.. तसे असते तर कलमाडी वगैरे लोकांवर टीका करण्याचा कोणालाच अधिकार राहिला नसता.. कारण सगळ्यांचीच नैतिकता थोड्याफार प्रमाणात कचकड्याचीच ना!

धाग्याच्या विषयात तथ्य आहे.. संगीतकलेत चोरी आणि प्रेरणा यात फरक करणे फारच कठिण काम आहे.. तसच कॉपिराइटविषयी जागरुकता पूर्वी कमी होती.. ती आता वाढत आहे.. जी पाश्चिमात्य जगात जास्त आहे..

बाकी राहिले जुन्या पिढितल्या संगीतकारांना या उदाहरणांवरुन सरसकट चोर ठरवणे.. ज्यांनी अखंड कारकीर्दीत शेकडो लोकप्रिय गाणी दिली .. या वेबसाईट वरील १०-१५ उदाहरणे (ज्यात तथ्य नक्कीच आहे) ही ५-१० टक्क्यांहून कमी असल्याने त्यांच्या प्रतिभेवर प्रश्नचिन्ह असण्याचे काहीच कारण नाही.. धागाकर्त्याचेही तसे म्हणणे दिसत नाही .. आक्षेप एवढाच की जुन्या संगीतकारांच्या तुलनेत आजच्यांना चोरीच्या मुद्द्यावर मोडीत काढु नये!!!

बाकी आपली आपली आवड!!

संजय क्षीरसागर's picture

14 Jan 2014 - 12:33 pm | संजय क्षीरसागर

...त्यांच्या प्रतिभेवर प्रश्नचिन्ह असण्याचे काहीच कारण नाही

इतकंच म्हणणं आहे!

आक्षेप एवढाच की जुन्या संगीतकारांच्या तुलनेत आजच्यांना चोरीच्या मुद्द्यावर मोडीत काढु नये!

नव्यातल्या चांगल्याला निदान इथे तरी कुणी वाईट म्हटलेलं नाही. तो लेखकानं स्वतःचा उत्ताप इथे काढलायं.

मात्र तुमच्या प्रतिसादातला हा भाग :

धागाकर्त्याचेही तसे म्हणणे दिसत नाही ?

अमान्य आहे, कारण लेखकानं काय विद्वत्ता पाजळलीये पाहा :

मग च्यामारी ह्या ५०, ६० आणि ७० च्या दशकातल्या म्युझिक directors एकदम कसे काय गुणवत्तेची खाण निपजले की त्याकाळातले लोक आज पण त्यांच्या नावाने उसासे टाकत असतात ? अशी कशी bollywood रुपी चिखलात हि कमळ उगवली ? दाल मे जरूर कुछ काला है म्हणून थोड अधिक संशोधन केल . मग कळल की पूर्ण दालच काली आहे .

आणि त्याला तीव्र आक्षेप आहे!

बाळ सप्रे's picture

15 Jan 2014 - 10:07 am | बाळ सप्रे

धागाकर्त्याचाही इतरांच्या उमाळ्याला उत्तर देताना अतिरेक झालाय हे मान्य!!

विकास's picture

13 Jan 2014 - 8:48 pm | विकास

हा प्रतिसाद आत्ता वाचला. माहितीपूर्ण असल्याने अपेक्षापूर्ती झाली!

नंदन's picture

14 Jan 2014 - 11:04 am | नंदन

तुमच्याच प्रतिसादाची वाट पाहत होतो. नेमका प्रतिसाद!

अमोल मेंढे's picture

14 Jan 2014 - 12:27 pm | अमोल मेंढे

ITWOFS साईट मी सुमारे १०- १२ वर्षांपूर्वी पाहीली असावी.

अहो ही साइटच २००५ ला सुरु झालीय

प्रदीप's picture

14 Jan 2014 - 1:09 pm | प्रदीप

हे मी अंदाजाने लिहीले होते. ती नवी होती तेव्हाच पाहिली होती. त्याहीअगोदरपासून मी नियमीत,RMIM सारखा न्यूजग्रूप वाचत असे. तिथे बर्‍यापैकी सविस्तर आणि सखोल चर्चा होत, त्यातही हे उल्लेख आलेले आहेत.

मुद्दा हा आहे, की ही माहिती पब्लिक डोमेनवर नवी नाही.

मारकुटे's picture

12 Jan 2014 - 9:54 pm | मारकुटे

तद्दन बिनडोक आणि पोरकट लेख.
अभ्यास वाढवा !
आणि महत्वाचे म्हणजे मोठे व्हा* !!!

*कै श्रामोंची अनुज्ञा आहे असे धरुन

बॅटमॅन's picture

12 Jan 2014 - 10:21 pm | बॅटमॅन

नैतिकता वैग्रे १२ गडगड्यांच्या व्हिरीत घाला.

पण सगळे भामटे आजच उपटले अन पूर्वी कोणीही उधार उसनवार करीत नव्हते असा काङ्गावा चूक आहे हे मान्यच.

तरीही मी म्हणेन- पूर्वीही चोरी चालायची पण उस मे कुछ दम जरूर था. फक्त व्हर्बॅटिम चोरी नव्हती. थोडे ट्वीकिंगही असावे. पण जे काही होते ते ऐकायला आजही उत्तम वाटते. नैतर अलीकडे पहा, थोडे अपवाद वगळले तर गाणी श्रवणीय नसतात-चोरी ऑर नो चोरी.

तस्मात अलीकडच्यांना शिव्या घालायच्या तर चोरतात म्हणून नाही तर डोके वापरत नाहीत म्हणून घालायला हव्यात.

बाकी प्रदीप यांचा प्रतिसाद लैच आवडल्या गेला आहे. हॅट्स ऑफ!!!! _/\_

अप्पा जोगळेकर's picture

12 Jan 2014 - 10:45 pm | अप्पा जोगळेकर

तुम्ही ज्या साईट चे रेफरन्स दिले तिथुन हा लेख चोरला तर नाही ना?

अवतार's picture

12 Jan 2014 - 11:27 pm | अवतार

हा धंदा आहे. त्यात नैतिक - अनैतिकतेचे प्रश्न उपस्थित करणे हे दर्शकांना परवडण्यासारखे असले तरी पदरचे पैसे घालून चित्रपट बनवणाऱ्यांना परवडत नाही. मुळात चित्रपट संगीत हा संगीताचा दुय्यम प्रकार आहे. दुय्यम ह्या अर्थाने की चित्रपटात संगीत येते ते कथेची गरज म्हणून (निदान पूर्वीच्या चित्रपटांत तरी :) ). कणेकरांच्या "गाये चला जा" ह्या पुस्तकात सी. रामचंद्र ह्यांनी आधी चाल तयार करून मग त्यावर शब्दरचना करणाऱ्यांची शेलक्या शब्दांत लाज काढली आहे. पण ह्याच सी. रामचंद्र ह्यांनी स्वत: "ये जिंदगी उसीकी है" हे गाणे "मूर्तिमंत भीती उभी" ह्या मराठी गाण्यावरून घेतल्याचे मान्य केले आहे. आता कोणी कोणाकडे बोट दाखवायचे असा प्रश्न उपस्थित होतो.
बहुतेक सुधीर फडके ह्यांच्या चरित्रात वाचलेला हा प्रसंग आहे:-
बाबूजी आणि सी. रामचंद्र लोकल ट्रेन मधून प्रवास करत होते. बाबुजींनी मोठ्या उत्साहात सांगितले की आम्ही पंधरा दिवसांत एक गाणे तयार केले. त्यावर सी. रामचंद्र ह्यांनी चेहऱ्यावर तुच्छ भाव आणून सांगितले की आम्ही एक गाणे दीड दिवसात तयार करतो!
जिथे मुळात संगीत ह्या प्रकारालाच मुख्य भूमिका नाही तिथे ओरिजिनल आणि ड्यूप्लिकेट ह्यांची पर्वा कोणाला आहे?

शास्त्रीय संगीत ह्या प्रकारात चोरी करताच येत नाही. कारण तिथे संगीत ह्या विषयाबद्दलची स्वत:ची समज किती आहे हे मांडायचे असते. जिथे सूर महत्वाचे असतात आणि शब्द दुय्यम असतात ते खरे संगीत! कुमार गंधर्वांनी बालगंधर्वांची गाणी म्हटली होती पण ती स्वत:ची म्हणून नव्हे तर बालगंधर्वांना आदरांजली म्हणून. थोडक्यात म्हणजे फिल्मी संगीत ही कलाकृती आहे आणि शास्त्रीय संगीत ही कला आहे. कलाकृती चोरता येते पण कला चोरता येत नाही!

इष्टुर फाकडा's picture

12 Jan 2014 - 11:49 pm | इष्टुर फाकडा

व्वा प्रतिसाद खुप आवडला :)

चित्रगुप्त's picture

13 Jan 2014 - 12:01 am | चित्रगुप्त

काही वर्षांपूर्वी अमेरिकेत एका वृद्ध जोडप्याबरोबर प्रवास करत असता त्यांच्या गाडीतील रेडियोवर तिकडल्या कोणत्यातरी कार्यक्रमातील बरीच गाणी ऐकायला मिळाली. ती ऐकून मी अगदी थक्क झालो, कारण त्यापैकी जवळ जवळ प्रत्येक गाण्यावरून बेतलेले एकेक हिंदी गाणे मला आठवू लागले. आता त्यापैकी एकही लक्षात नाही, पण ती आपल्या इकडली उत्कृष्ट गाणी होती. खरेतर मला त्या भारतीय संगीतकारांचे फार कौतुक वाटले, कारण मूळ रचनेतील किंचितशी छटा घेऊन, त्याआधारे कल्पनाविस्तार करून, आपल्या शैलीचा साज चढवून जे काही मिश्रण त्यांनी केले होते, ते केवळ अद्भुत होते. त्या अमेरिकनांना मी म्हणालो, की या संगीतकारांचे आमच्यावर फार उपकार आहेत. माझ्यासारख्या हजारो-लाखो लोकांचा पिंड या संगीतावर पोसला गेलेला आहे, आणि त्याबद्दल आम्ही त्यांचे सदैव ऋणी राहू. हे ऐकून त्यांना फार आश्चर्य वाटले, त्यांच्यामते ते चौर्य होते. मी त्यांना म्हणालो, की माझ्यासारखे लहान शहरात, खेडेगावात लहानपण गेलेले जे लाखो लोक भारतात आहेत, ते कुठे स्पॅनिश, अरबी, मेक्सिकन, सांबा, जॅझ वगैरे किंवा मोझार्ट वगैरेंचे संगीत ऐकू शकत होते? (तेही त्याकाळी, जेंव्हा रेडियो सुद्धा फार कमी जणांकडे असायचे). हिंदी चित्रपट संगीतामुळे आम्हाला अनायसे हे सर्व ऐकायला मिळाले, आमची सांगीतिक अभिरूचि समृद्ध झाली. आज मी पाश्चात्त्य वा अरबी संगीताचा आनंद घेऊ शकतो, त्याचेशी समरस होऊ शकतो, याचे मूळ मी लहानपणी ऐकलेल्या त्या फिल्मी गाण्यांत आहे.
खरेतर कोणतीही कला हळूहळू समृद्ध होत जाते, त्यात पूर्वसुरींचा वाटा मोठा असतो. एकमेकांच्या खांद्यावर उभे रहात कलावंत आणखी उंच उंच जात असतात, नवनवी क्षितिजे सर करू शकतात. संगीत, चित्रकला, भाषा, विज्ञान आदि शिकताना शेकडो वर्षांपासून जे ज्ञान मोठ्या कष्टाने पूर्वसुरींनी मिळवलेले असते, ते आधी आत्मसात करावे लागते, मग त्या आधारे आपल्या स्वतःच्या रचना, शोध इ. करणे शक्य होत असते. आधुनिक काळात मात्र पूर्वीचे सरसकट नाकारून काहीतरी वेगळे, नवीन करण्याकडे प्रवृत्ती दिसून येते. उदाहरणार्थ संगीत अजिबात न शिकता एकाद्याने हार्मोनियम घेऊन त्याच्या पट्ट्यांवर कसेही हात मारले, तर काहीतरी ध्वनि हा निर्माण होणारच. हेच माझे संगीत. मी पूर्वीचे सगळे नाकारतो. असे म्हणून चार टाळ्या पिटणारे गोळा करून आपले प्रस्थ वाढवत नेऊन बघता बघता पुरस्कारादि मिळवणे, असेही प्रकार घडतात.
अर्थात कल्पकता आणि प्रयोगशीलता या कोणत्याही कलेच्या विकासासाठी अत्यंत महत्वाच्या बाबी होत, हे खरेच.

आवडला.

मन१'s picture

13 Jan 2014 - 12:15 am | मन१

धागा आवडला.
चर्चेतील प्रतिसादही आवडले.

चौकटराजा's picture

13 Jan 2014 - 10:35 am | चौकटराजा

सब जो गय बाग मेरा बुढ्ढा मी चला गया ' या संगम मधील गीतातील य ओळींची चाल हीच " हम तो त्तेरे आशिक है सदियो पुराने" या ओळींची आहे पण..... पण अंतर्‍यांची चाल, इंटरल्यूडस या बाबतीत हम तो तेरे आशिक है हे गीत सर्वस्वी वेगळे आहे व का करू राम मुझे बुढ्ढा मिल गया इतकेच लोकप्रिय झाले होते. म्हजे एल पी नी एस जे ची नक्क्ल केली म्हणायची का ? मी तरी म्हणेन फक्त 'बीज" उचलले..
जाता जाता- निरागस मनाचे स्नेहल भाटकर यानीही मग चोरी केली असे म्हणावे लागेल. त्यांचे हेमंतकुमारनी गायलेली " लहरोंपे लहर" या गीताच्या मुखड्याची चाल भाटकरानी पाश्च्यात चालीवरून घेतली आहे.( अरूण उगवला प्रभात झाली उठ महागणपती वाले भाट्कर ते हेच) पण त्याच गीतातील अंतरा ऐका....तो भाटकरांच्या मेंदूचाच अविष्कार आहे.

तेंव्हा आय माय स्वारी बुवा .आपण तर गीतातील पूर्णतेला संगीतकाराची निर्मीती मानतो.एखादे बीज वा रिदम उचलला
त्यासाठी श्रेय नामावलीत मूळ बीजाचे ऋण मान्य करायची गरज नाही पण....." दया घना " ची चाल मी बाबानी दिलेल्या पूर्वी रागातील एक चीजेवर आधारित केली आहे "असे मोकळेपणे सांगण्याचा मनाचा मोठेपणा ह्रुदयनाथ मंगेशकर दाखवितात तसा इतर " लीजंड" संगीतकारानी दाखवावयास हवा होता हे नक्की !

संजय क्षीरसागर's picture

13 Jan 2014 - 11:04 am | संजय क्षीरसागर

हृदयनाथ मंगेशकर दाखवितात तसा इतर " लीजंड" संगीतकारानी दाखवावयास हवा होता हे नक्की !

त्याबद्दल वादच नाही! पण लेखकाची पृच्छा :

आता सगळाच मामला चोरीचा आहे हे कळल्यावर तरी nostalgia चे उमाळे थांबतील का ?

लेखकाची श्रवणबधीरता दर्शवते. स्वरसंयोजन, ठहराव, ताल, दोन स्वरसंयोजनांतलं विलोभनीय जोडकाम याची लेखकाला शून्य समज आहे. आणि अशी बेफाम वक्तव्य करुन :

आर ड़ि बर्मन आणि ओपी ची अख्खी कारकीर्द चोरलेल्या इंग्लिश गाण्याच्या पायावर उभी आहे हे कळल्यावर भारतीय म्हणून वस्त्रहरण झाल्याचा फील नाही येणार का ?

लेखकाला `माधुर्य' या अप्रतिम सांगितिक परिमाणाचा गंध सुद्धा नाही असं दिसतं. एकूणात लेखकाचं (आणि पर्यायानं त्या विचारांच्या समर्थनार्थ दिलेल्या तश्याच प्रकारच्या प्रतिसादकाचं) सांगितिक निर्वस्त्रिकरण झालं आहे.

चौकटराजा's picture

13 Jan 2014 - 8:37 pm | चौकटराजा

आर डी चे ओ पी चे की आम्ही त्या दोघांचेही चाहते आहोत त्यांचे ?
त्यांचे झाले की नाही ते सांगायला ते आता या जगात नाहीत व भारतीय अ-भारतीय असा संगीतभेद आम्ही करीत नाही.
सात सुरोंका सागर है -कलाकार का उसमे खूबीसे तैरना जितना अहम उतनीही सुननेवालेकी काबिलियत भी !
सबब आमचं वस्त्रहरण व्हायचा प्रश्नच येत नाही.

अर्धवटराव's picture

13 Jan 2014 - 10:29 pm | अर्धवटराव

अन्य पर्याय काय?

प्रसाद१९७१'s picture

14 Jan 2014 - 7:23 pm | प्रसाद१९७१

त्यासाठी श्रेय नामावलीत मूळ बीजाचे ऋण मान्य करायची गरज नाही पण....." दया घना " ची चाल मी बाबानी दिलेल्या पूर्वी रागातील एक चीजेवर आधारित केली आहे "असे मोकळेपणे सांगण्याचा मनाचा मोठेपणा ह्रुदयनाथ मंगेशकर दाखवितात तसा इतर " लीजंड" संगीतकारानी दाखवावयास हवा होता हे नक्की !

ह्यात लीजंड वगैरे काही नाही. ध्वनीमुद्रीके वर काही असे छापले नव्हते. त्यांच्या भावसरगम ह्या कार्यक्रमा मुळे हे त्यांनी सांगीतले ( ते सुद्धा त्यांच्या बाबांची चीज होती म्हणुन )

बाकीचे संगीतकार पण मुलाखतीत अगदी गाउन पण दाखवतात की त्याची चीज काय होती ते किंवा कुठल्या लोकधुनी ची कॉपी आहे ते.

ह्रुदयनाथांची गाणी मला अत्यंत प्रिय आहेत. पण त्यांच्या नैतिकते बद्दल फार बोलू नये.

चिरोटा's picture

13 Jan 2014 - 11:11 am | चिरोटा

ह्या असल्या उचलेगिरीत संगितकार नौशाद अली मोडत नसावेत.निदान त्यांची बरीचशी गाणी ऐकून तरी तसे वाटते.
म्हणूनच अनेकदा मुलाखतीत ते 'मला चाली द्यायला खूप वेळ लागायचा.' असे म्हणत.वर्षाकाठी जास्तीत जास्त २ वा ३ चित्रपटांना त्यांनी संगीत दिल्याचे दिसते.

वेल्लाभट's picture

13 Jan 2014 - 1:55 pm | वेल्लाभट

एकदम सहमत आहे. माझ्याकडेही असा खुमखुमीतून जमवलेला थोडकाच, पण जुन्या चोरलेल्या गाण्यांचा साठा आहे. तुम्ही म्हटलेल्या गाण्यांपासून ते मेहबूबा मेहबूबा पर्यंत अनेक भारी गाणी त्याकाळच्या इंग्लिश गाण्यांवरून चोरलेली आहेत. त्यामुळे.... ते सांगूच नये कुणी. एवढचं काय ह्रुदयनाथ मंगेशकरांनीही अनेक बंदिशींच्या चाली जशाच्या तशा आपल्या गाण्यांना वापरल्या आहेत. जुन्या तमाम संगीतकारांची अनेक ओरिजिनल गाणीही आहेत; पण म्हणून त्यांनी चाली चोरल्याच नाहीत असा दावा..... ha!ha!ha... नकोच.

having said that; हे असं आहे; म्हणून प्रीतम किंवा आतिफ अस्लम सारख्यांना झुकतं माप मिळू नये. they are as bad as they can get. अर्थात आवडीचा भाग आहे तो.

बट धाग्यातील मतांशी मी सहमत.

गाईड या चित्रपटातील दोन गाणी..
"मोसे छल किये जाय..." आणि "क्या से क्या हो गया...."

एकाच चालीची दोन गाणी. एक आनंदी मूडमधील..दुसरे दु:खी.

एकाच सिनेमात एकाच चालीची पण दोन वेगळ्या गतीची, वेगळ्या मूडची गाणी देणार्‍या संगीतकारांच्या प्रतिभेबद्दल
" केवळ सुरावट एकच आहे " या आणि इतक्याच मुद्द्यावर बोलणार्‍यांनी पोलीस सेवेत दाखल व्हावे...

पंचनामा [ म्हशीचे एक शिंग दुसर्‍यापेक्षा ३ इंचे लहान होते वगैरे वगैरे..] करण्यासाठी पोलीसदलात अशा लोकांची नितांत गरज असते..

कानडाऊ योगेशु's picture

13 Jan 2014 - 8:37 pm | कानडाऊ योगेशु

पंचनामा ......
चुकुन मी पंचमनामा असे वाचले. ;)

चिगो's picture

13 Jan 2014 - 9:21 pm | चिगो

'अभी ना जाओ छोडकर' आणि 'जहां में ऎसा कौन है कि जिसको गम मिला नहीं'.. सारख्या सुरावटीची अत्यंत वेगवेगळा मुड दाखवणारी ेकाच चित्रपटातली दोन गाणी..

चौकटराजा's picture

13 Jan 2014 - 8:46 pm | चौकटराजा

तेरे प्यारका आसरा चाहता हू हे एन दत्ता यानी स्वरबद्ध केलेले लोकप्रिय गीत सर्वानी ऐकलेके असेलच याच चालीचे एक गीत अनिल विस्वास यानी त्या अगोदरच केले आहे. मग कोणी म्हणेल दत्तानी अनिल यांची कॉपी केली. नाही असे नाहीये.कारण अनिल विश्वास यानी हीच ती चाल उचललेलीच आहे. बिसमिल्लाखान ही धुन त्यांच्या सनईतून वाजवीत असतात. मग ही बिसमिल्ल्ला यांची रचना आहे का ? तर नाही .ती एक पारंपारिक धून आहे. तरीही एन दता , अनिल विश्वास , बिल्समिला यांच्या तीनही कलाकृती अत्यंत स्वतंत्रच वाटतात व उत्तम जमलेल्या आहेत. ये बात ४०-७० वाल्या संगीतकारांची आहे बाबानो !

सिद्धेश महजन's picture

13 Jan 2014 - 9:02 pm | सिद्धेश महजन

मस्त विश्लेशण अमोल.

मराठी_माणूस's picture

13 Jan 2014 - 9:56 pm | मराठी_माणूस

खरे तर अनुल्लेखाने मारण्याच्या योग्यतेचा लेख.
त्या निमित्ताने रसिक अभ्यासूँचे प्रतिसाद वाचायला मिळाले हा एक फ़ायदा

हुप्प्या's picture

13 Jan 2014 - 10:01 pm | हुप्प्या

एक गाणे ज्याची चाल एका मराठी गाण्यावरुन उचलली आहे
धूल का फूल मधले आशा भोसलेने गायलेले झुकती घटा गाती हवा सपने सजाए हे गाणे "फांद्यावरी बांधियले मुलीनी हिंदोळे" हे गजानन वाटव्यांच्या गाण्यावरुन. अगदी तीच चाल.

जुन्या गाण्याबद्दलचा अजून एक मुद्दा म्हणजे त्यांचे दीर्घ आयुष्य. त्या गाण्यांच्या अंगभूत गुणांमुळे ती गाणी ४०, ५०, ६० वर्षे उलटून गेली तरी ऐकली जातात. आजची किती गाणी इतकी वर्षे टिकतील? १९८० वा १९९० च्या दशकातील किती गाणी आज ऐकली जातात?

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 Jan 2014 - 10:08 pm | डॉ सुहास म्हात्रे

मिपावरचे अनेक धागे पाहून आम्हालापण असं काहितरी खळ्ळबळ्ळजनक लिहून शतकी जिल्बी पाडण्याची सुर्सुरी आली आहे...

कोणि शिक्वणि घेणर कं?

मारकुटे's picture

13 Jan 2014 - 11:47 pm | मारकुटे

उद्गीरकर क्लासेस लावा

स्वतःच्याच पोस्टवर`निव्वळ वाचनमात्र' राहावं लागणं फार क्लेष्दायक असणार इक्काजी!

शिल्पा ब's picture

14 Jan 2014 - 12:53 am | शिल्पा ब

उद्गीरकरांनी तुमची शिकवणी न लावल्याचा परिणाम आहे हा! आसं आम्हाला वाटतंय इतकंच. काही कमी जास्त बोलले असल्यास क्षमस्व.

मनःपूर्वक ऐकावित आणि गैरसमज पसरवू नयेत इतकंच. त्यांना काँपोझिशन समजणं फार पुढची गोष्ट आहे.

ज्ञानव's picture

14 Jan 2014 - 8:52 pm | ज्ञानव

साहेब, मी पास माझा धागा रांगत रांगत १० म्हणतो आणि "रामही"

राजेश घासकडवी's picture

14 Jan 2014 - 9:37 am | राजेश घासकडवी

नॉस्टेल्जियाचे उमाळे या शब्दप्रयोगामुळे अनेकांना राग आलेला दिसतो आहे. माझ्या मते लेखकाचा मुद्दा असा की इतर गाण्यांवरून चाली बेतण्याची परंपरा कायमच चालत आलेली आहे. सर्वांनीच ते केलेलं आहे. अशा चाली प्रेरणा म्हणून घेणं आक्षेपार्ह किंवा कसं हे स्वतंत्रपणे ठरवावं. पण आवडत्या संगीतकारांनी ते केलंच नाही, कारण ते थोर होते आणि आजकालचे तसलं करतात म्हणून ते कमी दर्जाचे असं म्हणण्यात एक दुटप्पीपणा आहे.

पूर्वीच्या संगीत दिग्दर्शकांनीही चोऱ्या केल्या. मूळ गाणं ऐकल्यानंतर एस डी बर्मनने 'हम थे वो थी और समा रंगी, समझ गये ना' हे गाणं ढापलेलं नाही असं जर कोणी म्हणत असेल तर त्यांच्याशी चर्चा करण्यात काही अर्थ नाही. चोरीला सरळ चोरी म्हणावं आणि चांगल्या गाण्याला चांगलं गाणं म्हणावं. दोनमध्ये गल्लत करू नये. जुन्यातलंही काही कचकड्याचं सोनं होतं हे मान्य करावं. त्यामुळे आपल्याला माहित नसताना चोरून सादर केलेल्या गाण्याने जो आनंद मिळाला तो हिरावला जात नाही.

प्रदीप's picture

14 Jan 2014 - 11:01 am | प्रदीप

माझ्या मते लेखकाचा मुद्दा असा की इतर गाण्यांवरून चाली बेतण्याची परंपरा कायमच चालत आलेली आहे. सर्वांनीच ते केलेलं आहे.

हेच, असेच आणि इतर स्वैर व बिनबुडाची शेरेबाजी न करता लिहीता आले असते, नाही?

मूळ लेखात व त्यावरील चर्चेत तुम्हाला फक्त इतकेच दिसत असेल, तर मग तुमच्याशी चर्चा करण्यात काही अर्थ नाही!

हे पूर्वीच पटलं आहे! त्यांचे सकाळचे मुद्दे दुपारी सेम राहातील की नाही सांगता येत नाही कारण सगळं डेटाबेस्ड! जरा कुठे विदा दिसला की हे फिदा! (मग मुद्दा काहीही असो) .नायतर यांना काय पडलीये इतक्या भंपक लेखाच्या समर्थनाची? पण विदा दिसला ना!

कुणी तरी अंकल अन्नू मलिक किंवा प्रितमविषयी विधान करतो आणि लेखक त्याला सुनवायच्या ऐवजी इथे लेख टाकून डायरेक्ट विचारतो :

अन्नु मलिक , प्रीतम , ओपी आणि बर्मन पितापुत्र हे संगीत शर्विलक या एकाच श्रेणीतले म्हणून गणले जाणार का ?सगळाच मामला चोरीचा आहे हे कळल्यावर तरी nostalgia चे उमाळे थांबतील का ?ओपी नय्यर आणि तत्सम संगीत दिग्दर्शक चोर आहेत हे कळल्यावर त्यांच्या भक्तांच्या भावना बदलणार आहेत का ?

आणि हे सदगृहस्थ म्हणतात : "जुन्यातलंही काही कचकड्याचं सोनं होतं हे मान्य करावं"!

म्हणजे लेखक म्हणतोयं सगळेच निकामी आणि त्याला सावरायला हे म्हणतात सोन्याचं ठीकाये हो पण कचकड्याकडे पाहा! आहे का नाही विनोद!

प्रदीप's picture

14 Jan 2014 - 1:30 pm | प्रदीप

माफ करा, संजय. राजेशशी चर्चा करण्यात अर्थ नाही, हे मी फक्त ह्या चर्चेच्या संदर्भात म्हटले आहे.

संजय क्षीरसागर's picture

14 Jan 2014 - 2:56 pm | संजय क्षीरसागर

मी माझा अनुभव सांगितला आणि या चर्चेला अनुसरुन तो मांडला इतकंच.

चौकटराजा's picture

16 Jan 2014 - 9:54 am | चौकटराजा

ओ पी व आर डी यांची अक्खी कारकीर्द ढापूगिरी वर आधारलेली आहे. हा शीध ज्याने लावला तो त्याला लखलाभ ! खास
गोष्ट अशी की चिकित्सक पुण्यात कोणत्या दोन संगीतकारांच्या वर जास्त कार्यक्रम होतात ते जरा विदा गोळा करून पाहावे.
आताच आजच्या १६ जाने च्या वर्तमान पत्रावर नजर जावी.

राजेश घासकडवी's picture

14 Jan 2014 - 3:22 pm | राजेश घासकडवी

हेच, असेच आणि इतर स्वैर व बिनबुडाची शेरेबाजी न करता लिहीता आले असते, नाही?

मुळात झालेल्या स्वैर आणि बिनबुडाच्या शेरेबाजीला प्रतिसाद म्हणून तो लेख आहे हे लक्षात घ्या. कोणी खोडी काढली तर त्यावर अवास्तव पातळीवर प्रतिसाद येणं हे काही नवीन नाही. मग दोष कोणाचा? अतिरेकी प्रतिसाद देणाराचा की खोडी काढणाराचा? की दोघे तत्त्वतः सारखेच दोषी?

प्रदीप's picture

14 Jan 2014 - 4:18 pm | प्रदीप

मुळात झालेल्या स्वैर आणि बिनबुडाच्या शेरेबाजीला प्रतिसाद म्हणून तो लेख आहे हे लक्षात घ्या.

मुळातील शेरेबाजी चुकीची होती, ह्याबद्दल वाद नाही.

कोणी खोडी काढली तर त्यावर अवास्तव पातळीवर प्रतिसाद येणं हे काही नवीन नाही. मग दोष कोणाचा? अतिरेकी प्रतिसाद देणाराचा की खोडी काढणाराचा? की दोघे तत्त्वतः सारखेच दोषी?

ही खोडी येथील चर्चांमधे अथवा कुठल्याही इतर लेखामध्ये काढलेली नाही.

आणि तशीही ती कुणी काढलीच, तरी त्यावर प्रतिसाद कसा द्यावा, हे ज्या त्या व्यक्तिमत्वावर अवलंबून असते. अत्यंत बोचरी टिका होऊनही शांत आणि मुद्देसूद, कुठेही पाय न घसरता प्रतिसाद देता येतात. तसे देणारे इथेही अनेकजण आहेत. कुणीतरी अत्यंत गैर टिका नव्या संगीतकारांवर केली, त्यात त्या व्यक्तिचे अज्ञान दिसलेच. परंतू ह्यामुळे एकदम बेताल (आणी बेसूर) होऊन स्वतःचे ह्या विषयावरील अज्ञान दर्शवणारी टिका 'त्या व्यत्किचे श्रद्धास्थान' वगैरे असलेल्या संगीतकारांवर करणे तुम्हाला पटते आहे, आणि मुळात तेव्हढेच तुम्हाला ह्या लेखात दिसत आहे, ह्याचे मला आश्चर्य वाटते आहे!

माझ्यापुरते सांगायचे झाले तर नॉस्टॅल्जियाच्या कुणी त्रयस्थाने केलेल्या उल्लेखाने मला काहीही वाटत नाही, तसे वाटलेही नाही. पण त्यानिमीत्ताने जी भरमसाट अतिशयोक्त उठवळ विधाने केली गेली, ती आक्षेपार्ह होती.

राजेश घासकडवी's picture

14 Jan 2014 - 9:38 pm | राजेश घासकडवी

परंतू ह्यामुळे एकदम बेताल (आणी बेसूर) होऊन स्वतःचे ह्या विषयावरील अज्ञान दर्शवणारी टिका 'त्या व्यत्किचे श्रद्धास्थान' वगैरे असलेल्या संगीतकारांवर करणे तुम्हाला पटते आहे

१. विषयावरचं ज्ञान त्यांनी व्यवस्थित गाण्यांचे आणि मूळ गाण्यांचे दुवे देऊन दाखवलेलं आहे.
२. श्रद्धास्थान म्हणजे काय, तर आवडीचा संगीतकार आहे. त्याने जर चोऱ्या केल्या असं सिद्ध केलं तर त्याला काय हरकत आहे?
३. मला लेखात दिसलेलं सगळंच मांडण्याची मला गरज वाटत नाही. तेव्हा कृपया मी काय लिहिलं नाही याबाबत माझ्यावर टीका करू नये.

राहता राहिला मुद्दा बेसूरपणाचा आणि कर्कशपणाचा. तो ज्याच्या त्याच्या कानावर अवलंबून आहे. कोणाला हळूवार, दर्दभरं संगीत आवडतं; कोणाला ढॅण ढॅण रॉक म्यूझिक आवडतं. कोणाचे कान नाजूक असतील, कोणाचे नसतील. चालायचंच.

अनुप ढेरे's picture

14 Jan 2014 - 10:11 pm | अनुप ढेरे

मग दोष कोणाचा?

त्यावर चर्चा करणार्‍यांचा

नाखु's picture

14 Jan 2014 - 11:48 am | नाखु

फक्त इतकेच माहीती कि:

  • मी घरी (माझ्या/मित्राच्या/नातेवाईंकाच्या) बनविलेल्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेताना हे कुणाचे पाहून (नक्कल) म्हनून बनविले हे पाहात नाही. काही पुस्तकात पाहून/जालावर वाचून अगदी हुकुमबर्हूकुम बनविले असतील तरी,बल्ल्वाचर्य्/र्यीचे हातगुण त्या पदार्थांवर संस्कार करतातच.
  • तत्द्वत हाटेलातून पदार्थ आणून ते घरीच केले आहेत असे भासविणार्यांच्या पंगतीत मि वरच्या नक्कल कारांना बसविणार नाही

पहिल्यामधल्यांनी किमान अक्कल्/श्रम्/प्रयत्न केलेले असतात दुसरयानी फक्त दिखावा (श्रेयासाठी)

आणि हो तिळगुळ घ्या गोड बोला.
घरोघरीच्या तिळगुळात मुख्य घटक तेच असले तरी प्रत्येकाची चव वेगळी असते,तोच दृष्टीकोण बेतलेल्या गाण्यांबाबत ठेवायला काय हरकत आहे?
बेतलेल्या हा शब्द हे दिलेल्या दुव्यावरिल इन्स्पायर्ड चे स्वैर भाषांतर आहे.
जागोजागी हाच शब्द वापरला आहे.

इस्पिक राजा's picture

14 Jan 2014 - 1:21 pm | इस्पिक राजा

रेहमान आणि अस्लम चोर नाहित आणि बर्मन आणि ओपी होते हा मुद्दा नसुन सगळेच चोर आहेत. उगाच दोघाचौघांना वेगळे काढुन कशाला मारता असा उद्गिरकरांचा सूर आहे जो माझ्या मते चुकीचा नाही. सगळेच चोर आहेत. फक्त इतकेच की काहिंनी अवीट गोडीच्या काही ओरिजिनल चाली पण दिल्या तर काहिंनी आयुष्यभर उष्टे खाण्यातच समाधा मानले. अन्नू मलिक नावाच्या एका महाभागाने तर एकाच गाण्यावरुन चोरलेली धून साधारणपणे एकाच वेळेस प्रदर्शित होणार्‍या दोन वेगवेगळ्या चित्रपटातल्या गाण्यांना देउन धमाल उडवुन दिली होती.

संजय क्षीरसागर's picture

14 Jan 2014 - 3:20 pm | संजय क्षीरसागर

तुम्ही म्हणतायं

सगळेच चोर आहेत.

आणि पुढे म्हणतायं

फक्त इतकेच की काहिंनी अवीट गोडीच्या काही ओरिजिनल चाली पण दिल्या

या अवीट गोडीच्या चालींची संख्या कॉपीजच्या कित्येक पट आहे, हा मुळ मुद्दाये. तुमचा सांगितिक अभ्यास असेल तर त्या युगातली अवीट गोडीची गाणी आणि पाश्चात्य सिंफनीजवरुन उचललेली गाणी यांचा रेशो काय आहे?

लेखक म्हणतो तशी `एकदम सही सही नक्कल' असलेल्या गाण्यांची यांची यादी देऊ शकाल काय? (त्यानं दिलेल्या दोन गाण्यांवर मी यथोचित प्रतिसाद दिलेत त्यामुळे त्या लिंक्सला काही अर्थ नाही.)

माझ्या मते `इतना ना मुझसे तू प्यार बढा' हे गाणं मोझार्ट्च्या Symphany-40 ची सहीसही कॉपी आहे. पण अशी नक्की किती गाणी आहेत? म्हणजे लेखक जे विधान करतो "सगळाच मामला चोरीचा आहे" (आणि ज्याला तुमचं अनुमोदन आहे) ते कितपत योग्य आहे?

लेखात दिलेली साईट अत्यंत भिकार आहे असं माझं मत आहे. अर्थात तिचा उपयोग केलात तरी हरकत नाही पण एकदा शहानिशा होऊन जाऊं दे!

पैसा's picture

14 Jan 2014 - 8:04 pm | पैसा

तुम्ही इस्पिकराजा यांना प्रतिसाद देताय इस्पिकचा एक्का यांना नव्हे!

डॉ सुहास म्हात्रे's picture

14 Jan 2014 - 8:58 pm | डॉ सुहास म्हात्रे

तो मी नव्हेच !

संजय क्षीरसागर's picture

14 Jan 2014 - 10:42 pm | संजय क्षीरसागर

काय काय वाचावं लागणार आहे इथून पुढे! बाय द वे, इक्काजी सॉरी.

प्रसाद१९७१'s picture

14 Jan 2014 - 7:17 pm | प्रसाद१९७१

सचिनदेव बर्मन ह्यांची कारकिर्द चोरलेल्या गाण्यांवर आधारीत होती हे वाचुन लेखकाच्या बुद्धीची कीव आली. त्यांनी, शंकर जयकीशन, कल्यांणजी-आनंदजी नी प्रत्येकी काही शे चांगली गाणी दिली आहेत. त्यातली १०-२० असतील चोरली, तर काय विषेश?

चैतन्य ईन्या's picture

14 Jan 2014 - 9:17 pm | चैतन्य ईन्या

कारकिर्द चोरलेल्या गाण्यांवर आधारीत होती हे जरा जास्त आहे पण तरीही आपण जर का काही चाली उचलल्या तर त्या सांगायला पाहिजेल होत्या हां खरा मुद्दा आणि तो मान्य करण्यात फार कोणाला त्रास नसावा.

उद्गीरकरांनी नवा आयडी घेतला वाटतं आणि मुहुर्ताच्या मागे लागले की काय ;)

चिरोटा's picture

15 Jan 2014 - 12:31 pm | चिरोटा

अभियांत्रिकीला असताना मास्तर म्हणायचे-दुसर्‍याची drawing sheet GT मारा,कॉपी करा पाहिजे तर! पण नीट समजून् घेवून .बिनडोकपणे कॉपी नको.

जेपी's picture

16 Jan 2014 - 11:10 am | जेपी

१००