गविकाकाचा सल्ला.

मन's picture
मन in काथ्याकूट
10 Jan 2014 - 2:26 pm
गाभा: 

पेप्रात बरीच सदरं येतात. त्यातली काही "विचारा तुमच्या शंका" किंवा "इथे मिळतील सल्ले" स्टाइल असतात.
त्यातील काही टिपिकल प्रश्न गविकाकांना विचारावेत म्हटलं. त्यांचाही झटकन प्रतिसाद आला.
तुम्हालाही काही प्रश्न व शंका असल्यास गविकाकांना सल्ला विचारु शकाल.
एक टेम्प्लेट केस येथे देत आहे.

प्रश्न:
काका, मी इयत्ता दहावीत आहे. आमच्या शेजारी एक ताई राहते. तिच्याविषयी माझ्या भावना वेगळ्या आहेत.
मला ती खूप आवडते. ती जाता येता माझ्याशी बोलते. नुकतीच ऑफिसला जाताना एकदा ती मला "बाsय" असं म्हणाली. यामुळे तिच्याही मनात फीलिंग्ज आहेत हे मला समजलं.
तेव्हापासून माझं तिच्याकडेच लक्ष लागलेलं असतं. तीही जाता येता माझ्याशी बोलते. मी तसं अजून तिच्यापाशी बोललो नाहिये. पण मी सुरुवात कशी करु याविषयी कृपया सल्ला देणे. माझे अभ्यासाचेही नुकसान होत आहे.

एक विद्यार्थी.
.
.
गविकाकांचे उत्तरः

श्री. रा.रा. विद्यार्थी, नमस्कार.

गहन आहे प्रश्न.. पण करतो प्रयत्न.

तुम्ही दहावीत आहात. एका शैक्षणिक वर्षास एक मानवी वर्ष या प्रमाणात तुमचे आजपावेतोचे शिक्षण झाले आहे असे मी गृहीत धरतो. म्हणजेच आपण अंदाजे १४ वर्षाचे आहात.

तुम्ही उल्लेख केलेली "ती" ऑफिसात जाताना तुम्हाला निरोप घेण्यासदृश हावभाव आणि अविर्भाव करते. बालकामगार गुन्ह्याचे या बाबतीत उल्लंघन झालेले नसून "ती" नोकरी करण्याच्या कायदेशीर वयाची आहे असंही मी गृहीत धरतो. शिवाय ती ऑफिसात कामावर जाते, (बांधकामावर नव्हे) असं उल्लेखावरुन दिसत असल्याने तर्कदृष्ट्या ती किमान डिग्रीपर्यंत शिकली असावी. तस्मात तिचे वय वीस वर्षांच्या वर आहे असेही मी गृहीत धरतो.

याचाच अर्थ ती तुमच्यापेक्षा किमान सहा वर्षांनी मोठी आहे. तसे असण्यास काही हरकत नाही. तसे असल्यास ती आवडण्यासही काही हरकत नाही. पण जग हरकतींपेक्षा शक्यतांवर चालत असते हा एक मोठा दु:खद नियम आहे. त्यामुळे कु. (हेही एक गृहीतक मांडायचे अंमळ विसरलो) "ती" हिज आपण आवडत असलात तरी लैंगिक पुनरुत्पादनाच्या उद्देशाने (ज्याला अंकुरावस्थेत प्रेम असेही म्हणतात), आवडत असाल अशी शक्यता बिंदुवत वाटते. त्यामुळे तुमच्या भावनांशी पूर्णपणे सहानुभूति ठेवूनही तुम्ही उल्लेखलेली "ती" तुमची "ही" होण्याची शक्यता नगण्य असल्याने आपण खुद्द हपीसात जाण्याच्या वयापर्यंत कळ काढून त्या वेळी तत्कालीन दहावीतल्या "तीं"ना "हाय" करावेत असे सुचवून पाहतो.

तोसवर आपल्या भावनांचे दमन करण्याची गरज नाही. नैसर्गिक गोष्टींना अनैसर्गिक समजू नका इतकेच सांगतो. बाकी दहावीत असल्याने तुम्हांस अधिक स्पष्टीकरण नकोच अशी आशा.

आपला का?का?.

गवि.

.
.
.
ता.क.:
वाचकांनीही आपल्या आयुष्याशी संबंधित प्रश्न विचारावेत. दर आठवड्याला किंवा गविकाकांचे जेवण उत्तम झाले असल्यास केव्हाही निवडक प्रश्नांची उत्तरे देण्यात येतील.

द.ही.:

फाजील प्रश्नांना प्रश्नकर्त्याचे दुर्दैव समजले जाईल.

--मनोबा व गविकाका

प्रतिक्रिया

मारकुटे's picture

10 Jan 2014 - 2:31 pm | मारकुटे

प्रश्न जाहिर विचारायचे की व्यनीत?

हॅ हॅ. व्यनीत आलेले प्रश्न अग्राह्य धरले जातील. पब्लिक सदराचे प्रश्न पब्लिकमधेच विचारणे. :)

खाजगी असेल तर श्री. रा. रा. मन (सूत्रधार) यांस व्यनि करावा. ते नाव गाळून येथे प्रश्न आणतील.

कोणत्याही प्रश्नांची उत्तरे न देण्याचा हक्क राखून ठेवण्यात येत आहे.

उत्तरांना शिरेसली घेतल्यास जबाबदारी प्रश्नकर्त्याची राहील.

हा एक गंमतीचा कट्टा आहे हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही.

इत्यादि.

बाकी सूचनापाट्या बनवण्याची जबाबदारी पुणेकर असलेल्या मन यांजवर टाकत आहे.

मारकुटे's picture

10 Jan 2014 - 2:55 pm | मारकुटे

कित्ती छान छान उत्तरे देता तुम्ही गविकाका !

स्पा's picture

10 Jan 2014 - 2:34 pm | स्पा

गवी काका

लग्न करावे कि करू नये :P

लग्न करावे कि करू नये ?(वेडावणारे मुखचिन्ह)

उत्तरः

श्री. स्पा यांस अनेकोत्तम प्रणाम.

आपण विचारलेल्या प्रश्नाअखेरीस दिलेल्या चिन्हामुळे आपल्या प्रश्नात छद्माचा अंतर्भाव झाला आहे असे जाणवते. तेव्हा प्रथम सल्ला असा की लग्न करावे की नाही या प्रश्नाच्या गंभीर विचाराआधी लग्न या विषयाविषयीचे हे छद्म मनातून काढा.

आता तुमचा मूळ प्रश्नः लग्न करावे का नाही.

हा निर्णय तसा सोपा आहे. आर्थिक पैलूतून पाहता लग्न करणे हा एक अत्यंत खर्चिक मार्ग ठरु शकतो. मी सध्या आपल्या मनात फक्त भावनिक पैलू आहे असं गृहीत धरतो. म्हणजेच सध्या पोहोण्याच्या तलावाच्या काठावर उभे राहून नाक मुठीत धरुन उडी टाकू की नको अशा विचाराने तुम्ही पुढेमागे हेलकावत आहात.

सल्ला असा की उडी टाका. याचे कारण म्हणजे लग्न हे काही दिव्य अद्वितीय अनुभव आहे असे नव्हे, पण आयुष्यात पहिली वीसतीस वर्षे आपण एकटेच असतो. आणि कदाचित उत्तम आरोग्य असल्यास शेवटीही दहावीस वर्षे तरी एकटे असण्याची संधी किंवा सक्ती होण्याची बरीच शक्यता असते.

आयुष्य एकच आहे असे गृहीत धरता बिनएकटेपणा, अर्थात कायमचा जोडीदार असण्यातले सुख अनुभवण्याचा ऑप्शन मधल्या काळात घेतला नाही तर उघडं यायचं अन उघडं जायचं या दोन टोकांमधे पूर्णकाळ एकटे राहणे हा एकसुरी ऑप्शनच पदरी पडतो.

त्यामुळे एकूण दोन ऑप्शन्सपैकी दोन्ही अनुभवण्याचा ऑप्शन असल्याने एक ऑप्शन ऑप्शनला टाकू नये आणि विवाहसुख अनुभवावे असे सुचवून पाहतो.

त्याचे आणखी एक फळ म्हणजे पोरेबाळे. लग्न केल्यास रीतसर बाप होऊन बाळाची मायेची ऊब अनुभवता येते. लहानपणी खुद्द अनुभवलेल्या आईच्या ऊबेपेक्षा जास्त समाधान आणि शांती मिळते. बाकी सर्व रद्दबातल झाले तरी पोरांनी आपल्याला बाबा म्हणून कुशीत शिरणे या क्षणाचा अनुभव लग्नाचे बाकीचे संपूर्ण लडतर झेलण्यास पुरेसा ठरावा.

लग्नानंतर आपले अनुभव कळवावेत.

आपला काका.

अत्रुप्त आत्मा's picture

10 Jan 2014 - 7:25 pm | अत्रुप्त आत्मा

श्री. स्पा यांस अनेकोत्तम प्रणाम.
या प्रश्नाच्या गंभीर विचाराआधी लग्न या विषयाविषयीचे हे छद्म मनातून काढा.>>> http://www.sherv.net/cm/emo/laughing/rofl.gif

आता तुमचा मूळ प्रश्नः लग्न करावे का नाही.

हा निर्णय तसा सोपा आहे. आर्थिक पैलूतून पाहता लग्न करणे हा एक अत्यंत खर्चिक मार्ग ठरु शकतो. मी सध्या आपल्या मनात फक्त भावनिक पैलू आहे असं गृहीत धरतो. म्हणजेच सध्या पोहोण्याच्या तलावाच्या काठावर उभे राहून नाक मुठीत धरुन उडी टाकू की नको अशा विचाराने तुम्ही पुढेमागे हेलकावत आहात. >>> http://www.sherv.net/cm/emo/laughing/smiley.gif साफ खपल्या गेलो आहे =))

अर्धवटराव's picture

10 Jan 2014 - 9:00 pm | अर्धवटराव

>>लग्नानंतर आपले अनुभव कळवावेत.
-- त्याकरता मिपावर 'केवल वयोस्कोके लिये' दालन सुरु करावं काय? =))

विकास's picture

10 Jan 2014 - 9:20 pm | विकास

"दालन" म्हणायचे आहे का "सपोर्ट ग्रूप" (फॉर ग्रूप थेरपी)? ;)

अर्धवटराव's picture

10 Jan 2014 - 11:17 pm | अर्धवटराव

एकदा दालन तयार झालं कि मिपाकरांच्या सपोर्ट देण्या-घेण्याला तसाही ऊत येईल. आणि तिथेही कंपूबाजी करुन ग्रूप थेरपीची हौस भागवुन घेतील मिपाकर ;)

विनोद१८'s picture

10 Jan 2014 - 10:58 pm | विनोद१८

असे विचारायचे आहे का तुम्हाला ??

जेपी's picture

10 Jan 2014 - 2:38 pm | जेपी

गवि काका काथ्या किती कुटावा ?

गवि's picture

10 Jan 2014 - 2:53 pm | गवि

मा. श्री. तथास्तु.

आपणास कितपत मऊ क्वायर हवे आहे याची मर्यादा प्रत्येकाच्या गादीविषयक आवडीनिवडीवर ठरत असल्याने हा निर्णय अंदाजानेच घ्यावा असे माझे मत आहे. काथ्याच्या गादीवर बसल्यावर काही टोचू नये इतपत बारीक कुटावा.

धन्यवाद.

मारकुटे's picture

10 Jan 2014 - 2:39 pm | मारकुटे

गविकाका चड्डीला इलास्टीक असावी का नाडी?

चड्डीविषयी प्रश्न असल्याने प्रश्नकर्त्याचे वय दहा वर्षे किंवा कमी आहे असे गृहीत धरतो.

आपापला वयोगट समजून नाडी बांधता सोडता यायला लागेपर्यंत इलॅस्टिक वापरावे, अन्यथा लघुदुर्घटना होऊ शकतात.

तसेच कृपया फक्त गहन प्रश्नच विचारावेत.

कळावे.

मारकुटे's picture

10 Jan 2014 - 3:01 pm | मारकुटे

छे छे दहा वर्षे पण खुप झाले.
नुकताच जन्म झाला आहे आमचा ;)
एक महिना किंवा थोडा जास्त.
हा प्रश्न गहन कसा नाही यावर आपले मत मांडावे ही नम्र विनंती

अभ्या..'s picture

10 Jan 2014 - 2:45 pm | अभ्या..

गविकाका ,
फ़ाट्यावर मारण्याला माज म्हणतात का? असल्यास तो कसा उतरावावा?

पैसा's picture

10 Jan 2014 - 3:16 pm | पैसा

तुला धन्याच्या म्हशींबद्दलचं उत्तर हवं आहे का साधं सरळ??

मला फाटे न फ़ोडणारे उत्तर हवे आहे.

इरसाल's picture

10 Jan 2014 - 2:48 pm | इरसाल

अडचण-१ मी एक शाम-ळु तरुण आहे.आमची एक कुटुंब मैत्रिण आहे पण तिला सतत पट्ट्य्यानेच बोलायची सवय आहे कधी कधी ती तोंडातही मारते, क्रुपया काय करावे हे सुचवावे.
अडचण-२ तसेच माझे एकदा गावात व एकदा रात्रपाळीवर असताना दोन तरुणींशी संधान जुळले त्यातल्या दोघीही मला चुना लावुन घरातील तसेच माल मधील शोपिंग केलेले सामान(ते सामान नव्हे) घेवुन पळुन गेल्या सध्या मी एकटाच हात चोळत बसलो आहे काय करु ?

पैसा's picture

10 Jan 2014 - 3:24 pm | पैसा

या दोन्ही घटना तुमच्याबाबत घडल्या आहेत काय? चमचाभर पाण्यात नाक बुडवून वगैरे...

आमचेही २ प्रश्न

१) तुमच्याकडे कोल्हापुरी चपला आहेत का नाही? त्यांचा शस्त्र म्हणून वापर करता येतो हे माहित आहे का?

२) या दोन्ही तरुणी एकत्र पळून गेल्या किंवा कसे?

या दोन्ही तरुणी एकत्र पळून गेल्या किंवा कसे?

>>

षटकार!!!

इरसाल's picture

11 Jan 2014 - 9:57 am | इरसाल

१) दुसर्‍या कारणामुळे घरात एकही चमचा शिल्लक राहिलेला नसल्याने आपला सल्ला फॉलो करु शकत नाही क्षमस्व.

२) या दोन्ही तरुणी एकत्र पळून गेल्या किंवा कसे?
भेंडी हमने तो उ बारे में सोचा ही नही.इ तो नया अँगलवा आ गया, कहानी मा टिवस्ट !!!!

त्या पळुन गेल्यावर आम्ही पोस्ट इन्क्वायरी केलेली नाही.

टवाळ कार्टा's picture

10 Jan 2014 - 2:49 pm | टवाळ कार्टा

आत्तापर्यंतचा सर्वाधिक प्रतिसादांचा धागा कोणता???....असो.. ३००+ साठी शुभेछ्छा :)

मारकुटे's picture

10 Jan 2014 - 2:49 pm | मारकुटे

गविकाका थंडीत उब कशी आणावी?

मारकुटे's picture

10 Jan 2014 - 2:50 pm | मारकुटे

गविकाका प्रतिसाद किती मोठा असावा?

गविकाकांना विचारायचं असल्याने जरा विचार करुन विचारावं म्हणतो. ;)

मारकुटे's picture

10 Jan 2014 - 2:52 pm | मारकुटे

गविकाका विचार म्हणजे काय?

गविकाका मराठी टंकन करण्यासाठी चांगला कीबोर्डड्रायवर कोणता?

मारकुटे's picture

10 Jan 2014 - 2:54 pm | मारकुटे

गविकाका आत्मभान जागृत झाले असल्यास त्याला कसे झोपवावे?

काहीकाळ ते जागृत करणारे वाचन थांबवल्यास कंटाळून आत्मभानाच्या आत कर्बद्विप्रणील वायू जमा होईल आणि ऑपॉप पुन्हा झोपी जाईल.

यानेही फरक न पडल्यास तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा.

विडंबन आवडले आहे

इरसाल's picture

10 Jan 2014 - 2:57 pm | इरसाल

गगनविहारी म्हणजे काय ?

गवि's picture

10 Jan 2014 - 2:59 pm | गवि

श्री. इरसालजी.

गगनविहारी या शब्दाचा अर्थ "ग" ची बाधा झालेला आणि हवेत चालणारा मनुष्य असा होतो.

"ग"चा अर्थ माहीत नाही. क्षमस्व.

-काका

बर्फाळलांडगा's picture

10 Jan 2014 - 3:04 pm | बर्फाळलांडगा

ग गन विहारी म्हणजे अर्थ माहीत नसलेली बंदूक घेउन फिरणारा असा अर्थ होतो

बर्फाळलांडगा's picture

10 Jan 2014 - 3:05 pm | बर्फाळलांडगा

अर्थ नसलेली बंदूक घेउन आपण फिरणार नाही याची खात्री आहे

इरसाल's picture

10 Jan 2014 - 3:08 pm | इरसाल

माझ्या दोन अनुत्तरीत प्रश्नांचे काय ? (वर विचारलेले)

योगी९००'s picture

10 Jan 2014 - 3:04 pm | योगी९००

गविकाका मला वाचवा...

प्रश्न १
कुठ्ल्या मार्गाने माझ्या आत्म्याला अनुभूती मिळून माझ्या मनोज्ञ मानसिकतेला महदोत्क्ट प्रचिती मिळेल..?

प्रश्न २
माझा नवाकोरा महागडा मोबाईल हरवला आहे, तो मी कसा परत मिळवू?

गवि's picture

10 Jan 2014 - 3:22 pm | गवि

मा. श्री योगी९००जी.

प्रथम समस्या जटिल आहे. इसपगुल, धौतीयोग चूर्ण वगैरे वापरुन पहायला हरकत नाही. फायदा न झाल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा.

दुसर्‍या समस्येबाबतः समस्या जटिल किंवा गहन नसल्याने प्रश्न डिसक्वालिफाय होत आहे. क्षमस्व.

पैसा's picture

10 Jan 2014 - 3:04 pm | पैसा

बाकी पब्लिकने आपापले सल्ले द्यायला तात्त्विकदृष्ट्या हरकत नसावी!

गवि's picture

10 Jan 2014 - 3:06 pm | गवि

हो.. अगदी अगदी. मी आठवड्यातून एकदाच देणार आहे. बाकी सर्व पब्लिकच्या सल्ल्यांसाठीच आहे. :)

बर्फाळलांडगा's picture

10 Jan 2014 - 3:07 pm | बर्फाळलांडगा

उडवू नयेत यावर हरकत आहे काय त्यावर अवलंबून असेल नाही का ?

गविकाका मराठी सुधरावे यासाठी काय करु?

प्यारे१'s picture

10 Jan 2014 - 3:05 pm | प्यारे१

काका,
तुम्हाला टंचनिका आपलं टंकनिका कुठे मिळाली?
तिला तुम्ही कसे खुश ठेवता?
उत्तरांचे छाप तुम्ही तयार करुन ठेवलेत का?
तुम्ही गविकाका कसे झालात?

गविकाका न उडणारा प्रतिसाद कसा द्यावा?

पैसा's picture

10 Jan 2014 - 3:08 pm | पैसा

प्रतिसाद दिला नै की उडण्याचा सवाल येत नै!

मारकुटे's picture

10 Jan 2014 - 3:20 pm | मारकुटे

हे प्रश्नाचे उत्तर नाही. गांभीर्याने विचारलेल्या प्रश्नांना गांभीर्याने उत्तरे दिली जावीत अशी अपेक्षा गैर नसावी.
प्रदुषण झाले आहे श्वास घेतांना त्रास होतो काय करु या प्रश्नाला प्रदुषण झाले म्हणून श्वास घेऊ नका असे उत्तर चुकीचे असते.

मारकुटे's picture

10 Jan 2014 - 3:07 pm | मारकुटे

गविकाका तुम्हाला किती प्रतिसाद हवे आहेत?

हा प्रश्न गहन आहे. याला प्रश्नराज हा किताब दिला पायजे.

हा प्रश्न धागाकर्ते श्री. मन यांस विचारणे लागू ठरावे.

बाकी आपण एकटेसुद्धा पुरेश्या संख्येने प्रतिसाद देता आहातच त्यामुळे प्रतिसादसंख्येचा तुटवडा पडण्याची काळजी करणे हे उपाशी माणसाने आगोदरच हाजमोला मागवून ठेवण्यापैकी आहे.

तुमचे समाधान (एकदाचे) व्हावे ही आमची इच्छा

नाखु's picture

10 Jan 2014 - 3:29 pm | नाखु

समाधान हाच आमचा संतोष..

अस काहीसं गवि काकांच असाव असा कयास आहे.

नाखु's picture

10 Jan 2014 - 3:09 pm | नाखु

प्रश्न तुमचा उत्तर राजा गोसावींचे या सदराची आठवण झाली.
आता आमचा प्रश्नः
धर्म्/विज्ञान,जात्-पात,राजकारण,पुरोगामी/प्रतीगामी,निवासी/अनिवासी यावरील बिनबुडाचे वाद या पल्याड ही काही जग आहे हे जालीय (स्वयंभू)विचारवंताना *new_russian* \m/ \M/ कधी कळेल (आणि पचनी पडेल)*blush* :-[ :[ ;'> ;-. :blush:

सूड's picture

10 Jan 2014 - 3:11 pm | सूड

>>विचारवंताना
आपणास व च्या जागी 'ज' वापरायचा होता का?

आलटून्/पालटून(१) वापरण्याची प्रथा(२) आहे बुवा(३)...

तळटीपा:
१.आलटून्/पालटून म्हणजे तुमची बाजू कुठली "धागा कर्त्याची की विरोधी पक्षाची" त्यानुसार सोईस्कर.
२.प्रथा म्हणजे परंपरा नव्हे "परंपरा" म्हटले की तुम्ही रूढीवादी अगदी बुरसट्लेल्या विचारांचे गणले जाल.
३ सदर माहीती "जुण्या आणि जाणत्या" मिपाकराने नाव न सांगण्याचे अटीवर दिली आहे तेव्हा ईत्यलम.

आदूबाळ's picture

10 Jan 2014 - 7:01 pm | आदूबाळ

तुम्ही "कितवी" बाजू आहात?

इरसाल's picture

10 Jan 2014 - 3:25 pm | इरसाल

जिचारजंत म्हणायचे आहे काय ? ( हा परश्न गविकाकांला नाही आहे)

पिलीयन रायडर's picture

10 Jan 2014 - 3:10 pm | पिलीयन रायडर

गविकाका..

अर्धवट सोडलेले "वाड्यात.." कधी पुर्ण करणार?

प्यारे१'s picture

10 Jan 2014 - 3:11 pm | प्यारे१

+११११

केळ्याचं काय झालं?

मारकुटे's picture

10 Jan 2014 - 3:22 pm | मारकुटे

शिकरण केलं

बर्फाळलांडगा's picture

10 Jan 2014 - 3:10 pm | बर्फाळलांडगा

स्त्री अन पुरुष यात श्रेष्ठ कोण ?

माननीय बर्फाळलांडगा,

सदर धागा हा प्रश्न विचारुन उत्तरे मिळवण्यासाठी आहे. प्रश्न विचारुन पेच निर्माण करण्यासाठी नाही. तेव्हा प्रश्न विचारण्यामागे उत्तर मिळवण्याचा उद्देश असावा, उत्तरकर्त्याची उत्तरपूजा बांधण्याचा उद्देश नसावा.

स्त्रीपुरुष एकसमान आहेत असं म्हणून पाहतो.

टवाळ कार्टा's picture

10 Jan 2014 - 3:21 pm | टवाळ कार्टा

उत्तरकर्त्याची उत्तरपूजा बांधण्याचा उद्देश नसावा

=))

बर्फाळलांडगा's picture

10 Jan 2014 - 3:34 pm | बर्फाळलांडगा

:)

मुक्त विहारि's picture

10 Jan 2014 - 3:13 pm | मुक्त विहारि

आवडला.

बर्फाळलांडगा's picture

10 Jan 2014 - 3:16 pm | बर्फाळलांडगा

सदर कवा सुरु व्हनार ?

मुक्त विहारि's picture

10 Jan 2014 - 3:32 pm | मुक्त विहारि

जीवन भाऊ हे फार उत्तुंग व्यक्तीमत्व आहे.त्यामुळे त्यांनी स्वतःचा ब्लॉग पण काढला आहे.

आपण तिथे जावून त्यांना हवे ते विचारू शकता.

त्यांच्या ब्लॉगचा पत्ता देत आहे.

http://agakke.blogspot.in/2013/04/jay-maharastra.html

बर्फाळलांडगा's picture

10 Jan 2014 - 3:40 pm | बर्फाळलांडगा

व्हेन इट कम्स टु जीवन भाऊ ओन्ली मुवी फर्स्ट..

मुक्त विहारि's picture

10 Jan 2014 - 3:50 pm | मुक्त विहारि

ह्या अशा जीवनरंगी लेखांच्या बाबतीत आम्ही फर्स्टच आहोत आणि असणार.

त्याचे काय आहे, मुद्दाम गहन विचार कर्रुन पाडलेल्या बिन-केशरी आणि घट्ट पाकातल्या लेखांपेक्षा (प्रतिसादांपेक्षा) हे बरेच नाही का?

खटपट्या's picture

10 Jan 2014 - 10:45 pm | खटपट्या

जीवनभौ च्या बोल्गवर खालील ब्रीद वाक्य आढळले.

"मी मराठी मानुस माला नहीं कोणाची भीती ....जय महाराष्ट्र"

मला तर जलपर्णीबरोबर साक्षात भाऊंचं दर्शन झालं!

JB

मुक्त विहारि's picture

10 Jan 2014 - 10:58 pm | मुक्त विहारि

आता हेच चित्र पी.सी. वर लावतो.

बघू आता आम़च्या़ लि़खा़णा़त़ का़ही़ फ़ऱक़ प़ड़तो़ का़ ते...

बॅटमॅन's picture

11 Jan 2014 - 12:18 am | बॅटमॅन

भाऊ!!!!!!!!!!! _/\_

नाखु's picture

11 Jan 2014 - 9:38 am | नाखु

एक टीप टाका "कुणी तरी अशी आम्हाला गंमत सांगेल काय? या टोपीखाली दडलयं काय?

मदनबाण's picture

10 Jan 2014 - 3:23 pm | मदनबाण

गविकाका,

उलाला उलाला... हे गाणे पाहुन माइंड "डर्टी" झाल्यास काय करावे ? ;)

गविकाका संपादक होण्यासाठी काय करावे लागते?

पैसा's picture

10 Jan 2014 - 3:31 pm | पैसा

न उडणारे प्रतिसाद द्या. मग ऑपॉप संपादक कसं व्हायचं ते कळेल.

तेच तर विचारले आधी. त्याचे धड कुणी उत्तर देत नाही. याचाच अर्थ न उडणारे प्रतिसाद कसे द्यायचे कुणालाच माहित नाही. याचाच अर्थ आताचे संपादक त्या निकषानुसार संपादक झालेले नाहीत. म्हणूनच वरचा प्रश्न विचारला.

टवाळ कार्टा's picture

10 Jan 2014 - 3:34 pm | टवाळ कार्टा

याचाच अर्थ आताचे संपादक त्या निकषानुसार संपादक झालेले नाहीत

दिला पाय शेपटीवर.... :)

मारकुटे's picture

10 Jan 2014 - 3:40 pm | मारकुटे

अरे तुमची शेपुट होती का ती? आयमायस्वारी

टवाळ कार्टा's picture

10 Jan 2014 - 3:41 pm | टवाळ कार्टा

नाय नाय

संपादक न होणे हा आपल्या आयुष्यातला तातडीचा आणि गहन प्रश्न आहे का? बाकीचे प्रश्न पाहता तसं वाटत नाही.

मारकुटे's picture

10 Jan 2014 - 3:39 pm | मारकुटे

असु शकतो ना?

सुहास..'s picture

10 Jan 2014 - 8:53 pm | सुहास..

आलात का घुबडाच्या घरातुन बाहेर सल्लाकाका !! छान

नाखु's picture

10 Jan 2014 - 3:26 pm | नाखु

जीवन भौंचा साल्ला
बर्फाळलांडगा - Fri, 10/01/2014 - 15:16नवीन
सदर कवा सुरु व्हनार ?

हा साल्ला कोण???

प्यारे१'s picture

10 Jan 2014 - 3:27 pm | प्यारे१

पैसा हा गवि काकांचा ड्यु आय डी आहे का? ;)

पैसा's picture

10 Jan 2014 - 3:29 pm | पैसा

हा प्रश्न आहे की विधान?

प्यारे१'s picture

10 Jan 2014 - 3:34 pm | प्यारे१

९२.४५ % विधान नि ७.५५% (झाले का १००?) प्रश्न!

पैसा's picture

10 Jan 2014 - 3:37 pm | पैसा

प्यारे१ हा पण माझाच आयडी आहे. ;)

मारकुटे's picture

10 Jan 2014 - 3:38 pm | मारकुटे

खुलाशाबद्दल धन्यवाद.

टवाळ कार्टा's picture

10 Jan 2014 - 3:29 pm | टवाळ कार्टा

फाश्टेश्ट ५०??

इरसाल's picture

10 Jan 2014 - 3:31 pm | इरसाल

यांच्याकडील टंचनिकांची संख्या वाढलेली दिसतेय.

कोणाच्याही डोक्यावर मिरे वाटण्याची स्टँडर्ड ऑपरेटिङ्ग प्रोसिजर काय ?

कारण बराच गहन विचार आणि मुद्दाम वेळ खर्च कर्रून पण इथे बर्‍याच जणांना ते जमत पण नाही.

ह्यासाठी बहूदा नावीक होवून , चीनच्या समुद्रात बर्फाच्या रंगाच्या प्राण्याची सोबत घेत टंकत असावेत.

वरील उप-प्रतिसाद सूड यांनाच आहे. हे वेगळे सांगायला नकोच.

तेही खरंच मुविकाका. आता गविकाका काय म्हणतात ते बघू.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

10 Jan 2014 - 10:13 pm | विश्वनाथ मेहेंदळे

कोणाच्याही डोक्यावर मिरे वाटण्याची स्टँडर्ड ऑपरेटिङ्ग प्रोसिजर काय ?

संपादक व्हावे.
त्यांच्याही डोक्यावर मिरे वाटायचे असतील तर सामनामध्ये सदरलेखन करावे.

कवितानागेश's picture

10 Jan 2014 - 10:16 pm | कवितानागेश

हा प्रश्न प्रत्यक्ष सूडला पडावा? :)

अजया's picture

10 Jan 2014 - 3:51 pm | अजया

गविकाका
आपले लाडके नसलेल्यांचा धागा,त्यांची रनिंग कॉमेंट्री डोक्यात जात असेल तर इस्त्री शक्तीची जाज्वल्य पावर दाखवुन भरकटवावा का?

प्यारे१'s picture

10 Jan 2014 - 4:10 pm | प्यारे१

'पॉवरबाज इस्त्री'
खिक्क्क!

कवितानागेश's picture

10 Jan 2014 - 10:19 pm | कवितानागेश

त्यात विचारायचय काय? ;)

अजया's picture

11 Jan 2014 - 8:51 am | अजया

प्रत्येक्ष संपादकांचा पाठिंबा!!जय हो,जय हो ,बाबाजी!!

मी_आहे_ना's picture

10 Jan 2014 - 4:02 pm | मी_आहे_ना

मिपा ही विचारांचे आदान-प्रदान करण्याचे माध्यम आहे की विचार प्रसूती केंद्र
;)

मुक्त विहारि's picture

10 Jan 2014 - 4:18 pm | मुक्त विहारि

असे माझे मत आहे.

अर्थात बरेच जण अति विचार कर्रुन आणि मुद्दाम आपला आणि इतरांचा वेळ खर्च करतात, तो भाग निराळा.

आणि आजकाल असे बरेच जण ह्या दोन-चार महिन्यांत प्रकट झाले आहेत.

वरील उप-प्रतिसाद हा "मी_आहे_ना" ह्यांनाच आहे...

मारकुटे's picture

10 Jan 2014 - 4:08 pm | मारकुटे

गविकाका एका दिवसात किति धाग्यांवर प्रतिसाद द्यावे?

चिरोटा's picture

10 Jan 2014 - 4:25 pm | चिरोटा

गविकाका, खालील गाड्यांपैकी एक गाडी घ्यायची ठरवली आहे.कुठची घ्यावी(फक्त डिझेल मॉडेल)
१)मारुती स्विफ्ट-VDI
2)फियाट पुन्टो- MJD-Dynamic
3)टोयोटा एटियॉस लिव्हा
४)फोक्स्वॅगन पोलो
महिन्याला जास्तीत जास्त १०००कि.मी.,वापर दररोज.
कृपया सल्ला द्यावा.

गवि's picture

10 Jan 2014 - 4:57 pm | गवि

श्रीयुत चिरोटा,

आपला प्रश्न समजला. आपण आधीच उत्तम संक्षिप्त यादी बनवली आहे. यामुळे आता काम अत्यंत सोपे आहे. निर्दिष्ट चार वाहनांपैकी चौथ्या क्रमांकाचे फोक्सवॅगन पोलो हे वाहन या यादीतले सर्वाधिक खरेदीयोग्य वाहन आहे असे मत देत आहे.

जर्मन इंजिनियरिंगची तुलना बाकीच्यांशी होऊ शकत नाही. किंवा तुलनाच होऊ शकते आणि फोक्सवॅगन / स्कोडा या प्रॉडक्ट लाईनच्या मोटारी श्रेष्ठ ठरतात.

शुभेच्छा.

गविकाका

इरसाल's picture

10 Jan 2014 - 4:55 pm | इरसाल

ग्रँड आय १० घ्या

गविकाका पाशवी शक्तींना वेसण कशी घालावी?

प्यारे१'s picture

10 Jan 2014 - 5:00 pm | प्यारे१

यॉर्कर?????????

गवि's picture

10 Jan 2014 - 5:07 pm | गवि

रा. बॅटमॅन,

पाशवी शक्ती हा शब्द आपण "स्त्री"जमातीला उद्देशून वापरला आहात हे गृहीत धरतो. हेच का गृहीत धरतो याचं कारण म्हणजे वेड पांघरणे जमत नसणे या स्वरुपाचे आहे.

सल्ला असा की पाशवी शक्ती हा दुरित शब्द आधी आपल्या शब्दकोषातून काढून टाका. डीलीट करता न आल्यास हाईड तरी करा.

शिवाय कोणत्याही प्रकारची वेसण घालण्याची कोणतीही इच्छा मनात बाळगू नका.

वेसण घालणारे आपण कोण? अशा दृष्टीने स्वतःकडे पहा.

वरील सर्व मुद्दे स्त्रीशक्तीच्या समोर पुन्हापुन्हा बोलून मांडत रहा. त्यामुळे तुमच्याविषयीचे सर्व समज दूर होऊन काही काळात ऑपॉप त्यांना वेसण घातल्याप्रमाणे सर्व फायदे तुम्हाला मिळतील. फार जास्त वेसण बसल्यास विवाहाची जबाबदारीही आपणाकडे चालून येऊ शकते.

एकूण ध्येय साध्य करण्याकडे वाटचाल असणे महत्वाचे. प्रत्येक वेळी संघर्ष किंवा क्रांती हाच उपाय नव्हे.

आपला सौम्य
गविकाका

पाशवींचे पाशवीपण जावो अशा अर्थी विचारतो होतो हो ;) त्या पाशवीपणाला वेसण कशी घालावी ;)

तरी, सल्ल्याबद्दल धन्यवाद हेवेसांनल.

आपला (सौम्यरौद्रकरुणविनोदबीभत्समिश्रित) बट्टाचार्य.

पैसा's picture

10 Jan 2014 - 5:18 pm | पैसा

वेसण घालायचा प्रयत्न केल्यास शिंगे रोखून अंगावर येण्याची शक्यता अमर्याद प्रमाणात आहे. त्यापेक्षा प्रेमाने पेंड सरकी खायला घालावी.

जे आजपर्यंत कोणालाही जमलं नाही त्याची स्वप्ने कृपया बघू नयेत.

बॅटमॅन's picture

10 Jan 2014 - 5:22 pm | बॅटमॅन

हॅ हॅ हॅ. वाटलंच कोणीतरी प्रतिनिधी मध्ये येणारच.

प्रत्यक्षापेक्षा जाल भयंकर या नात्याने सर्व पाशवी शक्ती जालावर अजूनच जास्त नखरे करतात असे दिसते आहे. तस्मात प्रतिपादनास तितपतच महत्त्व दिलेले आहे.

कवितानागेश's picture

10 Jan 2014 - 10:21 pm | कवितानागेश

प्रत्यक्षापेक्षा जाल भयंकर!! =))

पैसा's picture

11 Jan 2014 - 12:35 am | पैसा

गविकाकांनी सांगितलं तेच सांगितलं बाबा तुला. तरी पटेना. लग्न झाल्यावर तुझं कसं व्हायचं लै काळजी लागून राहिलीय. तू आपला संकटांचा नाश करणारं मारुती स्तोत्र न चुकता म्हणत जा.

बॅटमॅन's picture

11 Jan 2014 - 12:51 am | बॅटमॅन

काय सारखं लावलंय हो मारुतीस्तोत्र आँ? हनुमद्गुग्गुळवटी देऊ का ;) =))

सस्नेह's picture

11 Jan 2014 - 8:39 pm | सस्नेह

लग्न झाल्यावर तुझं कसं व्हायचं लै काळजी लागून राहिलीय.

मला तर याच्या बायकोचं कसं व्हायचं याची जास्त काळजी लागून र्‍हायलीय.....a

चलो अच्छा है. कुणाला आमची तर कुणाला आमच्या होणार्‍या बायकोची चिंता लागलीये. तस्मात काळजी ब्यालन्स्ड झाली हे उत्तम झालं ;)

इरसाल's picture

11 Jan 2014 - 9:27 pm | इरसाल

लग्न झालं नाय सासवा आधीच तय्यार.

बघा की ओ. काय बाका प्रसङ्ग तो.

अभ्या..'s picture

12 Jan 2014 - 11:57 am | अभ्या..

तुला सांगतो ब्याट्या ,
आपल्या बघण्याचे, ठरल्याचे, झाल्याचे अन सुखात चालाल्याचे इथे अज्याबात सांगायचे नाही, दाखवायचे नाही अन कळु तर बिलकुल द्यायचे नै. ;-)
..................
हितचिन्तक अभ्या

टवाळ कार्टा's picture

12 Jan 2014 - 12:09 pm | टवाळ कार्टा

अन सुखात चालाल्याचे

हाच गैरसमज असतो :(

अभ्या..'s picture

12 Jan 2014 - 12:20 pm | अभ्या..

म्हणुनच ;-)

टवाळ कार्टा's picture

12 Jan 2014 - 12:28 pm | टवाळ कार्टा

अंह... जितका वेळ आपल्याला वाटते की आपण सुखात आहोत...तो पर्यंत "तीचे" "नवर्याला ताटाखालचे मांजर कसे बनवावे" याचे ट्रेनिंग चालु असते

यशोधरा's picture

12 Jan 2014 - 12:12 pm | यशोधरा

अच्छा! म्हंजे मनमें लड्डू फुटरैले तर! :D

अर्थातच ;) त्यात काय शंकाच नाय !!!!! त्यात सुद्धा कुणाला कळू द्यायचे नाही हे तर तुला ठाऊक असेलच =))

बर्फाळलांडगा's picture

11 Jan 2014 - 12:26 am | बर्फाळलांडगा

केल्यास शिंगे रोखून अंगावर येण्याची शक्यता अमर्याद

शिंगे आमच्याकडेही आहेत... याल अंगावर तर घेऊ शिंगावर!

बॅटमॅन's picture

11 Jan 2014 - 12:56 am | बॅटमॅन

याल अंगावर तर घेऊ शिंगावर!

आहूऽऽऽ!!!!!!!!!!!!!!!!

(त्रिशतस्पार्टनप्रेमी) बॅटोनायडस.

मुक्त विहारि's picture

10 Jan 2014 - 5:09 pm | मुक्त विहारि

"पाशवी शक्तींना वेसण कशी घालावी?"

आता खूद्द तुम्हालाच असा प्रश्र्न पडला म्हणजे कमाल झाली.

बहुदा "डु आय.डी" जास्त प्रबळ झालेल्या दिसत आहेत.

पण चिंता नसावी,

जी़व़ऩ भा़ऊंचा़ ले़ख़ वाचले आ़णि़ त्या़व़ऱ प्रति़सा़द़ दिले की अशा पाशवी शक्ती पळून जातात, असे अनूमान आहे.

बॅटमॅन's picture

10 Jan 2014 - 5:16 pm | बॅटमॅन

जीवनरंगी मिठाई खाल्ली की नथूगुग्गुळवटीच काय, पशूगुग्गुळवटीसकट सर्व वट्या खाणार्‍यांचा बन्दोबस्त पक्का हे बाकी खरं!!! अन पुल म्हणाले त्याप्रमाणे पेढा बनवण्यापेक्षा हलवायाची मैतरकी अधिक गोडीची. हलवाई इथे मिपावरच असल्याने टेण्षण इल्ले. धन्यवाद सल्ल्याबद्दल!!!

मुक्त विहारि's picture

10 Jan 2014 - 5:22 pm | मुक्त विहारि

तुमचे पंख आमच्या कडे वळू नयेत, ह्याचाच आम्ही प्रयत्न करतो.

(तुमच्या पंखाच्या नुसत्या दर्शनाने बर्‍याच जणांची धोतरे सुटली आहेत.)

ह.घ्या.

बॅटमॅन's picture

10 Jan 2014 - 5:25 pm | बॅटमॅन

हाहाहा =))

पण काका, आम्ही आपले गुणी पुतणे आहोत. तेव्हा कृपादृष्टी असू द्यावी.

( गुणांमध्ये आलोकनाथ आणि गटणे या दोघांना चीतपट करणारा) बट्टमण्ण.

मुक्त विहारि's picture

10 Jan 2014 - 5:31 pm | मुक्त विहारि

मी पण हेच म्हणणार होतो.

तो वामन परवडला, निदान स्वर्ग तरी मिळतो. तुम्ही १/२ वाक्यातच आस्मान दाखवता.

असो....

भले भले साक्षी आहेत (क्रुपया "सा" ह्या अक्षराच्या कान्हा/मात्रा ह्यांची तोडमोड करू नये आणि अनुस्वार तर बिलकूल देवू नये.मी "साक्षी"च म्हणालो आहे.)

भले भले साक्षी आहेत (क्रुपया "सा" ह्या अक्षराच्या कान्हा/मात्रा ह्यांची तोडमोड करू नये आणि अनुस्वार तर बिलकूल देवू नये.मी "साक्षी"च म्हणालो आहे.)

कान्ह्याची मोडतोड करणे कंस, जरासंध, पूतनामावशी वगैरे जबराट मंडळींनाही जमले नाही. आम्ही किस झाड के वटवाघूळ?

प्रमोद देर्देकर's picture

10 Jan 2014 - 4:59 pm | प्रमोद देर्देकर

हे असले धागे बरे सं.पा मंड्ळ उडवित नाहकाय? आणि आमचा "३१ डिसेंबरचा आंमंत्रणाचा" मात्र प्रकाशीत करण्यागजोगा वाटाला नाही हे कारण देवुन उडविला होता. का हो व गविकाका काय कारण होते आता तरी सांगाल काय?

त्यांनी आधीच सांगितलंय ना प्रश्न हे उत्तर मिळण्याच्या अपेक्षेने विचारलेले असावेत, पेचात टाकून उत्तरदात्याची उत्तरपूजा बांधण्यासाठी नव्हे. तुमचा प्रश्न दुसर्‍या क्याट्यागरीतला आहे.

मुक्त विहारि's picture

10 Jan 2014 - 5:12 pm | मुक्त विहारि

म्हणजे उत्तम सरासरी आहे.

व्वा!! बढि़या है!!!!

मुक्त विहारि's picture

10 Jan 2014 - 5:24 pm | मुक्त विहारि

फास्टेस्ट १००...

विनायक प्रभू's picture

10 Jan 2014 - 5:31 pm | विनायक प्रभू

टेन्शन च्या टेन्शन मुळे टेन्शन चा प्रॉब्लेम कसा सोडवावा?

अनुप ढेरे's picture

10 Jan 2014 - 5:44 pm | अनुप ढेरे

लोकांना संपादक का व्हावसं वाटतं?

पैसा's picture

10 Jan 2014 - 9:24 pm | पैसा

सुखाचा जीव दु:खात घालावासा वाटतो तेव्हा "येरे कुत्र्या आणि चाव मला" अशा भावविभोर अवस्थेत लोक संपादक व्हायला तयार होतात.

बर्फाळलांडगा's picture

11 Jan 2014 - 2:37 pm | बर्फाळलांडगा

कोणाला कुत्रा म्हणताय ते तरी स्पष्ट करा... माफी सुधा मागा जर स्त्रियाँ कडे बोट जात असेल तर.

पैसा's picture

11 Jan 2014 - 2:42 pm | पैसा

परत स्त्रिया? तुम्हाला एकतर स्त्रिया फार आवडतात किंवा अजिबात आवडत नाहीत! नेमका काय प्रकार आहे?

बाकी तुमचे विंग्रजीवरचे प्रभुत्व बघता तुम्हाला मराठी म्हणी वैग्रे माहिती असण्याची शक्यता फार कमी दिसते! म्हणून सांगते की "आ बैल मुझे मार" या अर्थाची ती मराठी म्हण आहे. एखादे म्हणींचे पुस्तक वाचलेत तर त्यात सापडेल.

एकदाच उत्तर देतो मला विविध स्त्रियाँ बद्दल प्रेम आदर ममत्व भीती तिरस्कार व कामेच्छा/वासना आशा व्यक्ती स्थिति परत्वे विविध भावभावना आहेत.

आपलाही मराठीचा अभ्यास कमी दिसतो अन्यथा ध चा मा केला तर काय घडते हे माहीत असता बैलाचा कुत्रा करून आता ती घोडचुक पोलिटिकली करेक्ट करायचा या प्रतिसादातुन प्रयत्न केला नसता हे लक्षात ठेवा.

टिप: हां उप प्रतिसाद सार्वजनिकआहे म्हणजेच मुद्दाम गहन विचार करून फक्त पैसा यांना मर्यादित ठेवलेला नाही हे सुज्ञास वेगळे ....

"आ बैल मुझे मार" या अर्थाची ती मराठी म्हण आहे

आदूबाळ's picture

10 Jan 2014 - 7:05 pm | आदूबाळ

गविकाकांच्या सल्ल्यावर मारकुटेकाकांचा हल्ला कसा थांबवावा?

अत्रुप्त आत्मा's picture

10 Jan 2014 - 7:34 pm | अत्रुप्त आत्मा

@ मारकुटेकाकांचा हल्ला कसा थांबवावा? >>> http://www.sherv.net/cm/emo/laughing/rofl-smiley-emoticon.gif संपादकांनी कात्री घेऊन रात्री ऑपरेशन करावे, << पक्षी >> हल्लेरूपी 'गळवं' काढून टाकावीत! :D

आदूबाळ's picture

10 Jan 2014 - 8:31 pm | आदूबाळ

हळवे न होता गळवे काढून टाकावीत

नाखु's picture

11 Jan 2014 - 9:45 am | नाखु

हळूच (अल्गद न कळत) काढावीत म्हंजे काढणार्याला दु:ख नाही आनि ईतरांना मन्स्ताप नाही.

जेपी's picture

10 Jan 2014 - 7:32 pm | जेपी

शतकी धागे कशे काढावे ?

हाहाहा मस्त बॅटींग केलीये गविकाकांनी :)
गविकाका गविकाका "डायरी लिहीण्याचे फायदे व तोटे" विषद कराल का?