पेप्रात बरीच सदरं येतात. त्यातली काही "विचारा तुमच्या शंका" किंवा "इथे मिळतील सल्ले" स्टाइल असतात.
त्यातील काही टिपिकल प्रश्न गविकाकांना विचारावेत म्हटलं. त्यांचाही झटकन प्रतिसाद आला.
तुम्हालाही काही प्रश्न व शंका असल्यास गविकाकांना सल्ला विचारु शकाल.
एक टेम्प्लेट केस येथे देत आहे.
प्रश्न:
काका, मी इयत्ता दहावीत आहे. आमच्या शेजारी एक ताई राहते. तिच्याविषयी माझ्या भावना वेगळ्या आहेत.
मला ती खूप आवडते. ती जाता येता माझ्याशी बोलते. नुकतीच ऑफिसला जाताना एकदा ती मला "बाsय" असं म्हणाली. यामुळे तिच्याही मनात फीलिंग्ज आहेत हे मला समजलं.
तेव्हापासून माझं तिच्याकडेच लक्ष लागलेलं असतं. तीही जाता येता माझ्याशी बोलते. मी तसं अजून तिच्यापाशी बोललो नाहिये. पण मी सुरुवात कशी करु याविषयी कृपया सल्ला देणे. माझे अभ्यासाचेही नुकसान होत आहे.
एक विद्यार्थी.
.
.
गविकाकांचे उत्तरः
श्री. रा.रा. विद्यार्थी, नमस्कार.
गहन आहे प्रश्न.. पण करतो प्रयत्न.
तुम्ही दहावीत आहात. एका शैक्षणिक वर्षास एक मानवी वर्ष या प्रमाणात तुमचे आजपावेतोचे शिक्षण झाले आहे असे मी गृहीत धरतो. म्हणजेच आपण अंदाजे १४ वर्षाचे आहात.
तुम्ही उल्लेख केलेली "ती" ऑफिसात जाताना तुम्हाला निरोप घेण्यासदृश हावभाव आणि अविर्भाव करते. बालकामगार गुन्ह्याचे या बाबतीत उल्लंघन झालेले नसून "ती" नोकरी करण्याच्या कायदेशीर वयाची आहे असंही मी गृहीत धरतो. शिवाय ती ऑफिसात कामावर जाते, (बांधकामावर नव्हे) असं उल्लेखावरुन दिसत असल्याने तर्कदृष्ट्या ती किमान डिग्रीपर्यंत शिकली असावी. तस्मात तिचे वय वीस वर्षांच्या वर आहे असेही मी गृहीत धरतो.
याचाच अर्थ ती तुमच्यापेक्षा किमान सहा वर्षांनी मोठी आहे. तसे असण्यास काही हरकत नाही. तसे असल्यास ती आवडण्यासही काही हरकत नाही. पण जग हरकतींपेक्षा शक्यतांवर चालत असते हा एक मोठा दु:खद नियम आहे. त्यामुळे कु. (हेही एक गृहीतक मांडायचे अंमळ विसरलो) "ती" हिज आपण आवडत असलात तरी लैंगिक पुनरुत्पादनाच्या उद्देशाने (ज्याला अंकुरावस्थेत प्रेम असेही म्हणतात), आवडत असाल अशी शक्यता बिंदुवत वाटते. त्यामुळे तुमच्या भावनांशी पूर्णपणे सहानुभूति ठेवूनही तुम्ही उल्लेखलेली "ती" तुमची "ही" होण्याची शक्यता नगण्य असल्याने आपण खुद्द हपीसात जाण्याच्या वयापर्यंत कळ काढून त्या वेळी तत्कालीन दहावीतल्या "तीं"ना "हाय" करावेत असे सुचवून पाहतो.
तोसवर आपल्या भावनांचे दमन करण्याची गरज नाही. नैसर्गिक गोष्टींना अनैसर्गिक समजू नका इतकेच सांगतो. बाकी दहावीत असल्याने तुम्हांस अधिक स्पष्टीकरण नकोच अशी आशा.
आपला का?का?.
गवि.
.
.
.
ता.क.:
वाचकांनीही आपल्या आयुष्याशी संबंधित प्रश्न विचारावेत. दर आठवड्याला किंवा गविकाकांचे जेवण उत्तम झाले असल्यास केव्हाही निवडक प्रश्नांची उत्तरे देण्यात येतील.
द.ही.:
फाजील प्रश्नांना प्रश्नकर्त्याचे दुर्दैव समजले जाईल.
--मनोबा व गविकाका
प्रतिक्रिया
10 Jan 2014 - 10:27 pm | कवितानागेश
ते तुम्ही डायरी कुठे लिहिताय त्यावर अवलंबून असतं.
शिवाय तुम्ही डायरीत काय काय लिहिता त्यावरही अवलंबून आहे.
शिवाय तुम्ही डायरी कशाला समजताय, आणि लोक कशाला समजतील यावरही अवलंबून आहे.
पण डायरी लिहावी असच थोर थोर लोक सांगतात, तेंव्हा आपण आपली बिनधास्त लिहावी...
गविकाकापण हेच सांगतील, बघच तू! ;)
10 Jan 2014 - 8:25 pm | विकास
सहानुभूति ठेवूनही तुम्ही उल्लेखलेली "ती" तुमची "ही" होण्याची शक्यता नगण्य असल्याने
पायाच्या तळव्याला बाशिंग लावणार्यांना होप्सच देयचे असले तर आदीत्य पांचोली आणी झरीना वहाब ( मला वाटते १५ वर्षाचा फरक, अजून ही विवाहीत जोडपेच) अथवा डेमी मूर (१९६२) आणि अॅशटन कुचर (१९७८) - १६ वर्षाचा फरक (हे आठ वर्षाच्या विवाहसंबंधांनंतर आता वेगळे झालेत पण त्यांचे विवाहसंबंध होणे हे कायमच आगळेवेगळे राहील). ;)
10 Jan 2014 - 8:47 pm | जेनी...
गवी काका नवरा रोज अंघोळ करुन टोवेल बेडवरच टाकुन ऑफीसला पळतो ..
त्याला कसे सुधरवावे ? :(
10 Jan 2014 - 8:54 pm | शिद
त्याला टॉवेल वापरणे अथवा ऑफीसला जाणे बंद करावे. =))
10 Jan 2014 - 8:58 pm | जेनी...
:(
10 Jan 2014 - 9:02 pm | सूड
>>गवी काका नवरा रोज अंघोळ करुन टोवेल बेडवरच टाकुन ऑफीसला पळतो ..
कोणाचा नवरा?
10 Jan 2014 - 9:05 pm | जेनी...
नशीब माझं .. कोणाचा टोवेल ?
असं नै विचारलत :-/
10 Jan 2014 - 9:28 pm | सूड
छे छे, अभि हम आपको ओळखने लग्या हय !! ऐसा कैसे विचारेगा!! ;)
10 Jan 2014 - 9:46 pm | अत्रुप्त आत्मा
@नशीब माझं .. कोणाचा टोवेल ?
असं नै विचारलत>>> =))
10 Jan 2014 - 9:02 pm | प्यारे१
रोज आंघोळीला बंदी घालावी.
10 Jan 2014 - 9:32 pm | सुहास..
बेड बदला
टॉवेल बदला ( रुमाल देत जा ;) )
बेडरूम बदला (बाथरूम मध्ये बेड घालत जा )
जमल्यास .....हॅ हॅ हॅ
10 Jan 2014 - 9:54 pm | बर्फाळलांडगा
नक्कीच फरक पडेल. रिझल्ट जरुर क्ळ्वा.
10 Jan 2014 - 10:02 pm | जेनी...
हा सल्ला फार्फार आवडला =))
10 Jan 2014 - 10:06 pm | बर्फाळलांडगा
हा प्रतिसाद हमखास उड्व्णार वाटलं होत.... !
10 Jan 2014 - 10:12 pm | जेनी...
ओह्ह ख्म्मॉन बर्फु काका ... का बरं उडेल प्रतिसाद ... संपा काका असं कै पण नै उडवत :-/
बाकी सल्ला गहण रीत्या विचारात पाडणारा आहे खरं ! :D
10 Jan 2014 - 10:25 pm | प्यारे१
'आहे त्याच नवर्याची सवय सोडवायची' वगैरे काही अट नव्हती का गो बाळे?
नवीन नवरा जेवताना बोलत असेल, बोलताना थुंकी उडवत असेल, नांदण्यासाठी आवश्यक अमुक करत असेल तर????
परत चेन्ज????
10 Jan 2014 - 10:28 pm | आदूबाळ
"मला डाव्या हाताने उजवा कान खाजवायला मज्जा येते. मी काय करू?"
(मुक्तपीठ-प्रतिक्रिया-साम्राज्ञी पुण्यग्रामदैवत-उपाध्ये-उपनामभगिनी यांची ष्टाईल मारायचा क्षीण प्रयत्न)
10 Jan 2014 - 10:33 pm | जेनी...
=))
खाजवा
...
पण त्या आधी डावा हात डेटॉल साबनाने स्वच्छ धुतलेला असावा ...
:D
10 Jan 2014 - 11:09 pm | आनन्दिता
आणि कान सुद्धा!!
10 Jan 2014 - 10:55 pm | खटपट्या
अरे हे काय? थांबले का सगळे ?
येवूद्या अजून …
11 Jan 2014 - 10:11 am | कवितानागेश
गविकाका,
१. या मारकुटेकाकांना इतके प्रश्न का पडतात? ;)
२. मन (आयडी) कुठे गेलाय?
३. हे वरचे प्रश्न 'वैयक्तिक' होतात का?
४. गांडूळशेती कशी करावी?
11 Jan 2014 - 11:15 am | अत्रुप्त आत्मा
@गांडूळशेती कशी करावी?>>>. =))
13 Jan 2014 - 12:08 am | मन१
२. मन (आयडी) कुठे गेलाय?
मनोबांच्या हापिसातून मिपा उघडत नाही.
उर्वरित वेळात इंटरनेटसाठी वेळ काढणे जमत नाही. :(
13 Jan 2014 - 10:10 am | मारकुटे
प्रश्न पडणं हे जिवंत असल्याचं लक्षण आहे
11 Jan 2014 - 11:02 am | चाणक्य
मनराव, भारीच आयडिया येतात हो तुम्हाला.
11 Jan 2014 - 11:42 am | तिमा
तरुणपणी,माझ्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या एका मुलीवर, मी प्रेम केले होते. आता मी ८५ वर्षांचा विधुर असून ती ९१ वर्षांची आहे. नुकतेच तिचे मिस्टर ९५ वर्षांचे होऊन गेले. तर आता मी तिला प्रपोज करु का, याबद्दल द्विधा मनस्थिती झाली आहे. आपण यातून मार्ग दाखवू शकता का ?
11 Jan 2014 - 11:44 am | मारकुटे
वर्षभर वाट पहा. त्याकाळात गविकाकांनी चान्स नाही मारला तर तुम्ही प्रपोज करुन पहा. फक्त तेवढ्याकाळात तुम्ही खपू नका.
11 Jan 2014 - 12:20 pm | टवाळ कार्टा
=))
12 Jan 2014 - 10:24 am | Rahul Bhuskute
नमस्ते गविकाका
माझा प्रश्न असा आहे की ,
एका मित्राचे वय ३७ झाले आहे . पूर्वी ३ मुलीनी नकार दिला म्हणून प्रेमभन्गा तून आलेल्या नैराश्यामुळे अधिक मुली पाहिल्या नाहीएत .तसेच इतर कोणी कुटुम्बीय देखिल लग्नासम्बन्धी मदत करण्यास उत्सुक नाहित ,...
तर काय करावे ?
म्हणजे आध्यात्मिक प्रगती साठी हिमालयात जावे कि मुली बघणे साठी वगैरे प्रयत्न सुरु ठेवावेत ? आणखी किती काळ?
12 Jan 2014 - 6:06 pm | कवितानागेश
अध्यात्मिक प्रगतीसाठी मिपावरच यायला सांगा. ;)
13 Jan 2014 - 12:14 am | मन१
सर्व वाचक, प्रतिसादकांचे मनःपूर्वक आभार.
गविकाकांनी प्रतिसादातूनही बॅटिंग भारी केलिये.
.
हे सदर सुरु ठेवता येइल.
तुम्हा मंडळींकडे असले काही प्रश्न असतील तर बिन्दिक्कत मला पाठवा.
त्यातल्या काहिंना गविंनी दिलेली उत्तरं प्रकाशित केली जातील.
(त्यासाठी नवा धागा काढायचा कीए ह्याच धाग्यात ती अॅड करायची हे अजून ठरलेले नाही.)
दर आठवड्याला (किंवा दर धागा प्रकाशित होतेवेळी) एक "विनर" प्रश्न असेल.
त्या आयडीच्या खरडवहित मोठ्या, ठळक फॉण्टमध्ये "गविकाकांच्या सल्ल्याचे भाग्यवान विजेते" असं लिहिल जाइल.
तर मग एण्ट्री पाठवत रहा. तुमच्या म्नातल्या शंका...उत्तरं गविकाकांची.
प्रश्न तुमच्या डोक्यातले,कल्पित असले, तरी चालतील. तुमच्या ऐकण्यात कुणा परिचिताचे असले, तरी चालतील.
किम्वा पेप्रात छापून येतात, त्यावरून प्रेरित होउन त्यास्टाइलवर लिहिले असले तरी चालतील.
चला मग सुरु होउ द्यात मिपाकरांच्या सुपीक डोक्यतील प्रश्न शेती.
.
.
आणि हो.....गविकाकांचे विशेष आभार.
13 Jan 2014 - 6:16 am | श्रीरंग_जोशी
गविकाका गविकाका, सर्वसामान्यांच्य हितासाठी गेल्या पाच दशकांपासून दिवसरात्र झटणार्या बारामतीच्या काकांना यंदा पंतप्रधानपदी बसवण्यासाठी काय करता येईल?
बारामतीच्या काकांखेरीज इतर कुणी मराठी माणूस भविष्यात भारताचा पंतप्रधान बनू शकेल अशी शक्यता आज तरी दिसत नाही.
13 Jan 2014 - 10:29 am | विटेकर
या धाग्याचे नाव " गविकाकांचा सल्ला " अस स्पष्ट असून्देखील अनेक प्राणिमात्रांनी सल्ले दिलेले आहेत. (त्यात मान्नीय संपादक सुद्धा आले !) तेव्हा सं म ने याची खबरदारी घ्यावी ही विणंती ! आणि अन्य प्रतिसाद उडवून धाग्याचे शुद्धीकरण करावे हा सल्ला !
छ्या .. मेली एक गोष्ट शिस्तित होत नाही मिपावर ! शिस्तच नाही आजिबात !
13 Jan 2014 - 11:45 am | पैसा
असल्या मौजमजेच्या धाग्यावर बाकी लोकांनी लिहूच नये असं तुमचं म्हणणं आहे का? मग इतर गंभीर धाग्यांवर अवांतर तर काहीच शिल्लक ठेवता कामा नये!
13 Jan 2014 - 12:00 pm | विटेकर
मौजमजा???
लोक इथे शिरियशली काहीतरी विचारत आहेत , गविंसारखे मातब्बर त्यांचे शंका समाधान करत आहेत आणि समं ला इथे मौजमजा सुचते आहे ??????
लोक हो, आम्हाला "भाकर मिळत नसेल तर शिरापुरी खा "सुप्रसिद्ध झरिना वाक्याची आटव्ण झाली आणि ड्वोळे पाणावले !!
.
.
.
.
.
.
.
मा. केजरीवाल - या अन्यायाकडे लक्ष देतील काय ? ( हल्ली त्यांनी सर्व " अन्यायाचे " घाऊक कंत्राट घेतले आहे..म्हनून त्याना विचारत आहे !)
13 Jan 2014 - 12:14 pm | कवितानागेश
असे करु नका. कुणीतरी यायचं लगेच 'केजरीवाल' आयडी घेउन! :P
13 Jan 2014 - 12:16 pm | बॅटमॅन
रशियावाली झरिना नै हो, मेरी आंत्वानेत फ्रान्सची.
13 Jan 2014 - 12:21 pm | विटेकर
ग्लतीची मिस्टेक झाली .. का कुणासठाउक ती झरीनाच माझ्या डोक्यात बसली आहे...
ही चूक मी दुसर्यांदा केली..
गविकाका-
चूक दुसर्यांदा का होते ? काही उपाय ?
13 Jan 2014 - 1:59 pm | शिद
गविकाका - येथील पुरुष सदस्य स्त्री सदस्यांना "माझ्याशी मयत्रि कर्नर का?" असे का विचारतात? ;)
13 Jan 2014 - 7:41 pm | जेपी
गवि काका गवि काका , डुआयडी कसा मिळवावा ?
13 Jan 2014 - 7:46 pm | गवि
डु आयडी जन्माने नव्हे तर कर्माने बनतो..
13 Jan 2014 - 7:49 pm | बॅटमॅन
जन्मना वर्जिनल आयडी, डुआयडी कर्मणा भवेत् |
-मिपास्मृति.
21 Jan 2014 - 12:55 pm | प्रसाद गोडबोले
१०० प्रतिसाद येतील अशी कविता कशी लिहावी ?
21 Jan 2014 - 1:03 pm | जेपी
@ प्रसाद गोडबोले ,
सतिश भाऊचां वारसा चालवा .100 काय 200 पण मिळतील