असते मनात काही उमजून येत नाही
वाटे किती फुलावे उगवून येत नाही
घनघोर मंथनाची आश्वासने फुकाची
नुसतेच भोवरे पण घुसळून येत नाही
कुंकू पुसून केली तलवार रक्तवर्णी
बलिदान त्याविना हे उजळून येत नाही
तू बोल ऐकतो मी माझेहि ऐक काही
मौनात प्रेमगाणे उमलून येत नाही
पेरून चिंतना घे शिंपून लेखणीला
शब्दास अर्थ आता लगडून येत नाही
-- अमेय
प्रतिक्रिया
30 Dec 2013 - 3:12 pm | कवितानागेश
जरा कठीण वाटतेय... वाचते परत.
13 Jan 2018 - 12:01 pm | राघव
ही रचना कशी काय सुटली ब्वॉ.. आवडले! :-)
14 Jan 2018 - 6:01 pm | शार्दुल_हातोळकर
उत्कृष्ट !!
15 Jan 2018 - 1:54 pm | विशाल कुलकर्णी
सुरेख झालीय. शक्यतो सुट घ्यायचे टाळता आले तर बघा, त्याने गजल निर्दोष राहात नाही.