समुद्रपक्षी (प्रकाशचित्रे)

लिखाळ's picture
लिखाळ in कलादालन
27 Sep 2008 - 2:55 am

नमस्कार मंडळी !
मध्यंतरी जर्मनीच्या उत्तर किनार्‍यावर फिरायला गेलो होतो. त्या बाजूला लहान लहान अशी काही बेटे आहेत आणि त्या बेटांवरील खारी हवा श्वसनाच्या आजारांवर लाभदायी असल्याने बरेच लोक मुक्कामासाठी येत असतात.
तेथे फिरताना सर्वप्रथम आपले स्वागत करतो तिथला दीपस्तंभ.

मला तिथे समुद्रपक्ष्यांची काही चित्रे काढता आली. या पक्षाचे सामान्य इंग्रजी नाव आहे हेरिंग गल.

समुद्राच्या किनारी चालताना

चोचीखालचा लाल ठिपका लक्ष वेधून घेतो.


समुद्रामध्ये भक्ष्य शोधताना

पोट भरल्यावर :)

--(भटक्या) लिखाळ.

प्रवास

प्रतिक्रिया

भाग्यश्री's picture

27 Sep 2008 - 3:06 am | भाग्यश्री

मस्त फोटोज!! :)

प्राजु's picture

27 Sep 2008 - 8:13 am | प्राजु

राजबिंडा दिसतो आहे... खास!
हाच तो सी गल ना?
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

लिखाळ's picture

27 Sep 2008 - 4:22 pm | लिखाळ

सीगल या पक्ष्याची ही एक जात आहे.
--लिखाळ.

विसोबा खेचर's picture

27 Sep 2008 - 8:29 am | विसोबा खेचर

क्या बात है!

अत्यंत सुरेख आणि लोभसवाणा पक्षी आहे!

लिखाळगुरुजी, आपल्यातल्या प्रकाशचित्रण कलेला सलाम...

माझ्या मते येत्या काही कळात, मिपाचं कलादालन हे कुठल्याही आर्ट गॅल्लरीपेक्षा अधिक उत्तम ठरावं! :)

आपला,
(पक्षिवेडा) तात्या.

लिखाळ's picture

27 Sep 2008 - 4:25 pm | लिखाळ

पक्षी खरेच सुंदर आणि उमदा दिसतो. आणि आकाराने मोठा असल्याने कॅमेर्‍यात पकडायला सोपा !

>>लिखाळगुरुजी, आपल्यातल्या प्रकाशचित्रण कलेला सलाम..<<
आभार (कस्सं कस्स्सं !) :)
--(पक्षीमित्र) लिखाळ.

मिंटी's picture

27 Sep 2008 - 10:57 am | मिंटी

मस्त फोटो........

सगळेच फोटो उत्तम.....

तुम्ही लिहिल्याप्रमाणे चोचीखालचा लाल ठिपका लक्ष वेधुन घेतोय...

सुचेल तसं's picture

27 Sep 2008 - 11:06 am | सुचेल तसं

लै भारी लिखाळ साहेब,

आपल्याला तर ह्या पक्षाचे डोळे फार आवडले......

Finally I will be so matured that I will react to nothing.
अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com

मदनबाण's picture

27 Sep 2008 - 1:16 pm | मदनबाण

वा सर्वच फोटो छान..

मदनबाण>>>>>

"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda

प्रभाकर पेठकर's picture

27 Sep 2008 - 1:56 pm | प्रभाकर पेठकर

मस्त आहेत सगळे फोटोज्. अभिनंदन.

जैनाचं कार्ट's picture

27 Sep 2008 - 1:58 pm | जैनाचं कार्ट (not verified)

छान, सुंदर छायाचित्रे !

आवडली बॉ !

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग

झकासराव's picture

27 Sep 2008 - 4:13 pm | झकासराव

ब्युटिफुल "गल"ची सुन्दर प्रकाशचित्रे. :)
आवडली....
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao

प्रियाली's picture

27 Sep 2008 - 4:16 pm | प्रियाली

फोटो मस्तच. हेरिंग-गलच्या चोचीवरील रक्तवर्णी ठिपका मस्त. दिपगृहही आवडले

अवांतरः
याचे विडंबन म्हणून मुंबईतील एखादी धूर ओकणारी चिमणी आणि कावळे कसे होईल? ;)

लिखाळ's picture

27 Sep 2008 - 4:26 pm | लिखाळ

>>अवांतरः
याचे विडंबन म्हणून मुंबईतील एखादी धूर ओकणारी चिमणी आणि कावळे कसे होईल? <<

हा हा हा.. आणि समुद्राच्या लाटेसोबत येणार्‍या प्लॅस्टिकच्या पिशव्या...
विडंबन मस्त होईल :)
--लिखाळ.

विसोबा खेचर's picture

27 Sep 2008 - 5:38 pm | विसोबा खेचर

हा हा हा.. आणि समुद्राच्या लाटेसोबत येणार्‍या प्लॅस्टिकच्या पिशव्या...
विडंबन मस्त होईल

वाट पाहतो आहे!

आपला,
(गेटवे ऑफ इन्डियापाशी उभा असलेला आणि आपल्याच देशबांधवांना परक्यांच्या देशात राहून आपल्या देशातील एका शहराचे हास्यास्पद विडंबन करू इच्छिणार्‍या विडंबनकारांच्या कलाकृतीची वाट पाहणारा एक मुंबईप्रेमी) तात्या.

--

दोन वेळच्या भाकरीकरता आपली मातृभूमी सोडून जाण्याची वेळ माझ्यावर आली नाही हे मी माझं भाग्य समजतो! समृद्ध आयुष्याच्या, संपन्न आयुष्याच्या प्रत्येकाच्या कल्पना वेगळ्या असतात हेच खरं!

लिखाळ's picture

27 Sep 2008 - 9:18 pm | लिखाळ

क्षमा करा विनोदात लिहिताना ते मुंबईबद्दल होत आहे ते लक्षात आले नाही. ती विडंबनाची साधारण कल्पना होती. हे चित्र भारतातलेच असावे असे बंधन नाही. घाण सर्वत्रच असते :)

भारतातली घाण आणी त्यावर केलेले मतप्रदर्शन भारतात बसुन केले तर काही वाटत नाही. पण एकदा भारत सोडला की आमचा भारतावर आणि तिथल्या परिस्थितीवर काही अधिकार-आपुलकी राहत नाही असे लोकांचे मत बनत असते हे मी अनेकदा बघितले आहे. यावर मला अधिक बोलायचे नाही.

--लिखाळ.

बेधुन्द मनाची लहर's picture

27 Sep 2008 - 5:42 pm | बेधुन्द मनाची लहर

सहीच फोटो.............

पुनम...
देखने ते रूप जे प्रन्जळचे आरसे, सावळे की गोमटे या नाही मोल फारसे.

बेधुन्द मनाची लहर's picture

27 Sep 2008 - 5:43 pm | बेधुन्द मनाची लहर

पुनम...
देखने ते रूप जे प्रन्जळचे आरसे, सावळे की गोमटे या नाही मोल फारसे.

स्वाती दिनेश's picture

27 Sep 2008 - 5:45 pm | स्वाती दिनेश

सुरेख फोटो..
स्वाती

ऋषिकेश's picture

27 Sep 2008 - 6:05 pm | ऋषिकेश

वा!
लिखाळा, पक्षी छान अहेच पण मला दिपस्तंभ आवडला.. त्याचा आब....त्याची भव्यता मस्त पकडली आहेस
मध्यापासून किंचीत डावीकडे का घेतला आहे माहित नाहि पण त्याने अजून चित्र मस्त वाटतंय

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

शितल's picture

27 Sep 2008 - 8:31 pm | शितल

अरे वा.
मस्त फोटो आहेत सगळे.
सेंट पॉल ला असताना अमरने हेरिंग गल चे काही फोटो काढले आहेत.
मी ते फोटो नंतर प्रतिसादात देते.
:)

लिखाळ's picture

27 Sep 2008 - 9:19 pm | लिखाळ

द्या फोटो..पहायला आवडतील.
--लिखाळ.

यशोधरा's picture

27 Sep 2008 - 10:31 pm | यशोधरा

सुरेख फोटो, आवडले.

रेवती's picture

28 Sep 2008 - 4:51 am | रेवती

फोटो छान आलेत. समुद्रकिनारी हे पक्षी नेहमीच हक्काची जागा असल्यासारखे वावरत असतात. त्यांच्या नजरेत तसे दिसते.

रेवती

अद्वैत जोशी's picture

28 Sep 2008 - 1:05 pm | अद्वैत जोशी

सुंदर फोटो ......
ह्यांचे भाईबंध ठाण्या-मुंबईतही दिसतात - हिवाळ्यात, समुद्र व खाडीच्या जवळपास.

लिखाळ's picture

28 Sep 2008 - 2:01 pm | लिखाळ

असेल ... ठाणे खाडीवर तर बरेच पक्षी येत असतात.. या गल्सचे जातभाई येत असतील :)
--लिखाळ.

सहज's picture

28 Sep 2008 - 1:25 pm | सहज

आवडले.

देवदत्त's picture

28 Sep 2008 - 2:32 pm | देवदत्त

सुंदर पक्ष्याची सुंदर छायाचित्रे :)

(छायाचित्रे आणि प्रकाशचित्रे ह्यात फरक काय? :? )

लिखाळ's picture

28 Sep 2008 - 2:37 pm | लिखाळ

छायाचित्र आणि प्रकाशचित्र म्हणजेच फोटो. पण फोटो मध्ये प्रकाशाच्या तीव्रतेचा ठसा उमटतो म्हणून प्रकाशचित्रे हे नाव चपखल वाटते. छायाचित्रे चपखल वाटत नाही.

छाया चित्रे आणि प्रकाश चित्रे ह्यात फरक काय?
हे दोघे नवरा बायको आहेत ;)

--लिखाळ.

बेसनलाडू's picture

28 Sep 2008 - 3:28 pm | बेसनलाडू

फोटो आवडले.
(आस्वादक)बेसनलाडू

छोटा डॉन's picture

28 Sep 2008 - 3:35 pm | छोटा डॉन

लिखाळसाहेबांनी काढलेले फोटो मनापासुन आवडले ...
खास करुन "पोट भरल्यानंतर" चा, काय मस्त पोज आहे ...
धन्यवाद !

अवांतर : ह्या दौर्‍यामध्येच लिखाळगुरुजींकडुन फोटोग्राफीची दिक्षा घ्यावी म्हणतो ...

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

चतुरंग's picture

28 Sep 2008 - 10:33 pm | चतुरंग

हे पक्षी कायम आपल्याच मस्तीत असतात असे वाटते.

चतुरंग