तळलेले पापलेट व पात्रानि मच्छी................

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in अन्न हे पूर्णब्रह्म
24 Dec 2013 - 2:26 pm

तळलेले पापलेट व पात्रानि मच्छी............

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

१९ ला पहाटे पुण्यातून निघालो आणि सरळ तारकर्लीला संध्याकाळी बरोबर ४ला पोहोचलो. केव्हा एकदा ५ वाजतायेत याची अतुरतेने वाट बघत व किनार्‍याची मजा बघत कसा वेळ गेला ते कळलेच नाही. शेवटी एकदाचे दूरवर ठिपके दिसायला लागले आणि आमचा जीव भांड्यात पडला. ते ठिपके जसे जवळ येत होते तसे आमची अतुरता वाढतच होती. मिळणार का आज ? काय भाव फुटेल ? मोठे का छोटे ? सुरमई कशी असेल, बांगडा घ्यावा की नाही....पेडवे घ्यावेच लागणार चटणीसाठी असा बराच खल चालू झाला. अखेरीस मच्छीमारांनी बोटी काठाला लावल्या आणि काठावर उड्या मारल्याबरोबर त्यांच्या हातातील क्रेट बघून आमचाही जीव भांड्यात पडला. त्यात चंदेरी रंग चमचमत होता तो बघून आम्ही सगळ्यांनी तिकडे धाव घेतली. थोड्याच वेळात तो वाळूचा किनारा गजबजून गेला. हातात पिशव्या घेतलेली माणसे माशांभोवती घिरट्या मारू लागली व ती गर्दी बघून एखाद्या सम्राटाचा चेहरा जसा अभिमानाने फुलून यावा तसा त्या समुद्राच्या बादशाहांचे चेहरे अभिमानाने फुलून आले. असो. त्या वेळेचे वर्णन केले तर कमीत कमी दहा पाने तरी होतील व मासे कसे केले ते मागेच राहील.....
लिलावात घेतले ते....१७ पापलेट, सुरमई व पेडवे.... घेऊन घरी आलो व लगेच कामाला लागलो. काय केले ते आता सांगतो. त्याला मी काही पाककृती म्हणणार नाही कारण आपण काही शेफ नाही.........सारंग्याचा आकार मोठा नसल्यामुळे आख्खेच तळायचे ठरविले त्याबरोबर पात्रानू मच्छी करावी असाही विचार केला. सगळ्या मित्रांना त्यांचे ग्लास घेऊन स्वयंपाकगृहात जबरदस्तीने गप्पा मारण्यास बसविले व चालू झाली आमची झटापट.......

पापलेट पात्रानि मच्छीसाठी एका विशिष्ठ पद्धतीने कापला.. म्हणजे त्याला पर्सला असतात तसे दोन्ही बाजूला कप्पे केले फक्त ते विरुद्ध दिशेला. पारशी लोक त्याचा काटा काढून वापरतात पण मला ते आवडत नाही. या माशांना लिंबू व मीठ लाऊन ठेवले.
चटणी : एक जुडी कोथिंबीर, १० ते १५ पुदिन्याची पाने. जास्त घेतली नाहीत मग त्याने जास्तच वास येतो. आल, लसूण, मिरच्या, मीठ, ओले म्हणजे हिरवे मिरे १० ते १५, एक मोठा कांदा, व कढिलिंबाची मुठभर पाने. एक आख्खा खोवलेला नारळ.
हे सगळे मिक्सरमधे बारीक वाटले. अगदी गंध केले नाही. वाटत आल्यावर त्यात एक लिंबू पिळले व मीठ टाकले. एक चमचा साखरही टाकली. मी सगळ्या मसाल्यात एक चमचा साखर टाकतोच...का ते विचारु नये. :-)
ही चटणी पापलेटच्या पर्समधे दाबून भरली. पटकन परसात जाऊन केळीची पाने तोडून आणली. ती काळजीपूर्वक कापावी लागतात नाहीतर फाटतात म्हणून जमिनीवर पसरुन कापली व ओल्या फडक्याने पुसून घेतली. प्रत्येक पानाचा मधला देठ काढल्यावर त्याचे दोन भाग झाले. प्रत्येक भागावर भरलेला पापलेट ठेवला व हलकेच त्या पानात गुंडाळला.....
एका मोठ्या पातेल्यात पाणी घेतले व त्यात पूर्ण बुडणार नाही अशा आकाराची चाळणी गावातून शोधून आणली ती त्यात बसवली. पाण्यात हिरवे मिरे, व हळद टाकली. (थोडी). हिरवी वस्त्रे परिधान केलेले चंदेरी रंगाचे मासे त्या वाफवणार्‍या यंत्रात ठेवले व वरुन झाकण ठेवले. थोड्यावेळाने झाकण काढून सुरी खुपसून ते शिजले की नाही ते बघितले. पानांचा रंगही बदलला होता. बाहेर येणार्‍या वाफेला मासा, चटणी, हळद व केळ्याच्या पानाच असा जबरदस्त सुवास येत होता की बस्स्स्स्स्स्स.......

पापलेट तळला त्याची गोष्ट....
याला नेहमी मारतात तसे खाप मारुन आणले होते. एका पातेल्यात मालवणी मसाला, आलं लसुण पेस्ट, (हे लिहायला विसरलो होतो. श्री. पेठकरांनी आठवण करुन दिली) चिमुटभर दालचिनी व मिर्‍याची पूड, चवीप्रमाणे मीठ व तिखट टाकले व त्याची तेल घालून मस्त पेस्ट केली. माशांना तासभर लावून ठेवली. तळायच्या अगोदर तांदूळाचे जाडसर पीठ लावून, पॅनमधे अर्धा से.मी. तेल घेऊन त्यात मस्त पैकी तळून काढले....जे तुम्हाला डावीकडे दिसत आहेत. पात्रानू मच्छी उजवीकडे केळीच्या पानात दिसत आहेत. खाण्याची गडबड उडाल्यामुळे अधीक फोटो काढता आले नाहीत त्या बद्दल क्षमस्व....

करुन बघा....
जयंत कुलकर्णी

प्रतिक्रिया

युगन्धरा@मिसलपाव's picture

24 Dec 2013 - 2:51 pm | युगन्धरा@मिसलपाव

तोंडाला पाणी सुटलं.... वा वा वा.
माशाचा मस्त घमघमाट इथे पर्यंत आला. . . .

खाण्याची गडबड उडाल्यामुळे अधीक फोटो काढता आले नाहीत
१ फोटो सर्व काहि साग्नतोय .
आवडलि .

दिपक.कुवेत's picture

24 Dec 2013 - 2:59 pm | दिपक.कुवेत

हि पाकृ "लेट" टाकुन तुम्हि "पाप" केलय जयवंतराव! बाकि पापलेट आपला जीव कि प्राण. कुठल्याहि डिशच्या रुपात तो आवडतो.

सुहास..'s picture

24 Dec 2013 - 3:17 pm | सुहास..

छानच

फिश लव्हर

प्रभाकर पेठकर's picture

24 Dec 2013 - 4:05 pm | प्रभाकर पेठकर

मस्तं बेत आहे. 'ग्लास' आणि पात्रानू मच्छी तसेच तळलेले मालवणी पापलेट हा योग जुळून आला म्हणजे पृथ्वीतलावरंच स्वर्ग अवतरला असा रोमांचित अनुभव म्हणावयास हवा.

प्रभाकर पेठकर's picture

24 Dec 2013 - 4:06 pm | प्रभाकर पेठकर

मालवणी पापलेट फ्रायला लसूण लावायचे नाही?

जयंत कुलकर्णी's picture

24 Dec 2013 - 5:30 pm | जयंत कुलकर्णी

अरेच्या विसरलो बघा.... आले लसुणाचे पेस्टही लावली हो.....! दुरुस्त करुन घेतो............

वासु's picture

24 Dec 2013 - 4:22 pm | वासु

व्वा खुपच मस्त होती पाकृ. तोन्डाला पाणी सुटल.

मुक्त विहारि's picture

24 Dec 2013 - 4:22 pm | मुक्त विहारि

अशीच छान संध्याकाळ असावी.आपण बाजार करावा.तो बायकोच्या स्वाधीन करावा.तिने त्यांना तव्यावर घेतले की, सोडा , बर्फ आणि ब्लॅक लेबल ग्लास मध्ये टाकावी.तिकडे ग्रामो फोन वर कुमार गंधर्वांनी सुरांची मैफील जमवावी तर इकडे मच्छीचे ताट समोर यावे. आधी तळलेली आणि दुसर्‍या पेगला भात आणि रश्श्याला सोबत करत यावी....

आणि तिसर्‍या पेगला उगाच आपले तळलेले बोंबील खाता खाता "पे चेक", "यु हॅव गॉट अ मेल" किंवा "वेट अन्टिल डार्क" सारखा सिनेमा बायको बरोबर बघावा.....

साधे-सोपे आणि सरळ आयुष्य....

ब़जरबट्टू's picture

24 Dec 2013 - 4:57 pm | ब़जरबट्टू

वा..क्या बात.. पण साल.. एवढ साधे-सोपे आणि सरळ आयुष्य असायलाही नशिबच पाहिजे...

फक्त आमचा कुमार गंधर्व ऐवजी कैलास खेर असतो... :)

बालगंधर्व's picture

5 May 2014 - 7:51 pm | बालगंधर्व

जयनतंत .. मर दाला तुमारे इस पप्लेत्ने. :) मला हलवा पन अवदतो. हलवाला हलद लवुन तेच कलवन करतात. इकदे घाटावर हलवा जासत भेतत नहे.

ब़जरबट्टू's picture

24 Dec 2013 - 4:53 pm | ब़जरबट्टू

पात्रानू मच्छी तर अतिशय आवडता प्रकार, तेल न वापरता केलेला मस्त पदार्थ.. :)

पटकन परसात जाऊन केळीची पाने तोडून आणली. ती काळजीपूर्वक कापावी लागतात नाहीतर फाटतात म्हणून जमिनीवर पसरुन कापली व ओल्या फडक्याने पुसून घेतली.
जर पाने शेगडीवर हलकेच गरम करुन घेतली तर ब-यापैकी मऊ होतात व फाटत नाहीत...

(पापल्रेट पंखा ) बजरु... :)

गणपा's picture

24 Dec 2013 - 5:02 pm | गणपा

निजधामास गेलो आहे.

जयंत कुलकर्णी's picture

24 Dec 2013 - 5:33 pm | जयंत कुलकर्णी

नकाहो असे वाईट साईट बोलू...........आम्ही कुणाकडे बघायचे.......:-)

सोत्रि's picture

25 Dec 2013 - 11:55 am | सोत्रि

आम्ही कुणाकडे बघायचे..

शेम टू शेम हेच बोल्तो!

- (गणपाचा फॅन) सोकाजी

मुक्त विहारि's picture

25 Dec 2013 - 2:25 pm | मुक्त विहारि

+ १०००

हाडक्या's picture

24 Dec 2013 - 5:46 pm | हाडक्या

एक नम्बर हो काका..!!
वाचूनच तोंडास पाणी सुटलेले आहे.. कुठला तरी मासा खाल्ल्याबिगार आमच्या आत्मास आज शांती मिळणार नाही.

पैसा's picture

24 Dec 2013 - 10:23 pm | पैसा

मस्तच दिसतायत! तारकर्लीला घर आहे तुमचं? नशीबवान आहात!

जयंत कुलकर्णी's picture

25 Dec 2013 - 10:05 am | जयंत कुलकर्णी

माझे तेथे घर असते तर तेथे कट्टा नसता का केला मस्त........नाही हो मित्राचे घर आहे जरा दूर...

जयंत कुलकर्णी's picture

25 Dec 2013 - 10:09 am | जयंत कुलकर्णी

माझे तेथे घर असते तर तेथे कट्टा नसता का केला मस्त........नाही हो मित्राचे घर आहे जरा दूर...

विजुभाऊ's picture

24 Dec 2013 - 10:27 pm | विजुभाऊ

या खाद्य प्रकाराचे नाव"पात्रानु मच्छी " असे नसून "पात्रामा मच्छी " असे आहे.
गुजराथीत "नु" हा प्रत्यय "चा ची चे" या अर्थीने वापरला जातो.
" मा " याचा अर्थ "मध्ये , आत" अशा अर्थाने येतो.
त्यामुळे पात्रामा मच्छी = पानातली मच्छी

पैसा's picture

24 Dec 2013 - 10:32 pm | पैसा

पारशी नाव आहे ते. असंच वाचलंय सगळीकडे.

मुक्त विहारि's picture

24 Dec 2013 - 10:52 pm | मुक्त विहारि

"पात्रानी मच्छी"

लिंक देत आहे....त्यातील फोटो बघा...

https://www.google.co.in/search?q=patrani+macchi&tbm=isch&tbo=u&source=u...

(बाय द वे, आज काल , धाग्याला अनावश्यक फाटे का बरे फुटायला लागले आहेत?

हे म्हणजे, सचीनने मुद्दाम गहन विचार करून ऑफच्या चेंडूला ऑन साईडला टोलावण्यासारखेच आहे.असो पुर्वीचे मिपा राहिले नाही आता.की काही डु-आयडी मुळे पुर्वीचे मिपा परत आले आहे? कोण जाणे.)

वरील प्रतिसाद हा "पैसा ताईंनाच" आहे. "बंडू" लोकांनी ह्यात नाक खुपसू नये.कारण मुद्दाम गहन विचार कर्रुन बंडू मामा काही तरी टंकतात आणि मग पळून जातात, हा नेहमीचा अनुभव आहे.

जयंत कुलकर्णी's picture

25 Dec 2013 - 7:18 am | जयंत कुलकर्णी

बरोबर याचे नाव पात्रानी मच्छीच आहे.....

प्रभाकर पेठकर's picture

25 Dec 2013 - 1:59 am | प्रभाकर पेठकर

विजुभाऊ,

ही पारशी पाककृती आहे आणि 'पात्रा नी मच्छी' म्हणजे पानांची (पानांत केलेली) मच्छी, हेच नांव आहे. ही केळीच्या पानांत बांधून वाफवतात किंवा कांही पद्धतीत फ्रायपॅनमध्ये तेल टाकून पानांत गुंढाळलेला मासा फ्राय सुद्धा केला जातो.
आपल्या पाककृतींमध्ये हळदीच्या पानांत गुंढाळूनही वरील पाककृतीला न्याय दिला जातो.

तुमचा अभिषेक's picture

24 Dec 2013 - 11:02 pm | तुमचा अभिषेक

फोटो काढताना पालापाचोळा जरा बाजूला सारायचा होता हो, म्हणजे आणखी चांगले दर्शन घडले असते... पापलेट आपलेही फेवरेट.. बाकी पाकृ काही वाचली नाही, ते आपले क्षेत्र नाही...

प्रसाद गोडबोले's picture

25 Dec 2013 - 1:26 pm | प्रसाद गोडबोले

तोंडाला पाणी सुटले !!

सानिकास्वप्निल's picture

25 Dec 2013 - 2:29 pm | सानिकास्वप्निल

आईशप्पथ!!!

खल्लास ... तोंपासू

सौंदाळा's picture

26 Dec 2013 - 3:20 pm | सौंदाळा

हे राहुनच गेले होते. जबरा.

त्या वेळेचे वर्णन केले तर कमीत कमी दहा पाने तरी होतील

होऊ देत की, तुम्ही लिहिलेला शब्द्न शब्द आम्ही नेहमीच आवडीने वाचतो. लिहाच आता.

व्हेज असुन फोटो आणि माहीती आवडली.. :)

प्यारे१'s picture

28 Dec 2013 - 6:18 pm | प्यारे१

+१

(खाण्याबाबत)व्हेज (झालो) असुन फोटो आणि माहीती आवडली..

सोनल मयुर's picture

14 Jul 2014 - 4:21 pm | सोनल मयुर

मस्त