तळलेले पापलेट व पात्रानि मच्छी............
१९ ला पहाटे पुण्यातून निघालो आणि सरळ तारकर्लीला संध्याकाळी बरोबर ४ला पोहोचलो. केव्हा एकदा ५ वाजतायेत याची अतुरतेने वाट बघत व किनार्याची मजा बघत कसा वेळ गेला ते कळलेच नाही. शेवटी एकदाचे दूरवर ठिपके दिसायला लागले आणि आमचा जीव भांड्यात पडला. ते ठिपके जसे जवळ येत होते तसे आमची अतुरता वाढतच होती. मिळणार का आज ? काय भाव फुटेल ? मोठे का छोटे ? सुरमई कशी असेल, बांगडा घ्यावा की नाही....पेडवे घ्यावेच लागणार चटणीसाठी असा बराच खल चालू झाला. अखेरीस मच्छीमारांनी बोटी काठाला लावल्या आणि काठावर उड्या मारल्याबरोबर त्यांच्या हातातील क्रेट बघून आमचाही जीव भांड्यात पडला. त्यात चंदेरी रंग चमचमत होता तो बघून आम्ही सगळ्यांनी तिकडे धाव घेतली. थोड्याच वेळात तो वाळूचा किनारा गजबजून गेला. हातात पिशव्या घेतलेली माणसे माशांभोवती घिरट्या मारू लागली व ती गर्दी बघून एखाद्या सम्राटाचा चेहरा जसा अभिमानाने फुलून यावा तसा त्या समुद्राच्या बादशाहांचे चेहरे अभिमानाने फुलून आले. असो. त्या वेळेचे वर्णन केले तर कमीत कमी दहा पाने तरी होतील व मासे कसे केले ते मागेच राहील.....
लिलावात घेतले ते....१७ पापलेट, सुरमई व पेडवे.... घेऊन घरी आलो व लगेच कामाला लागलो. काय केले ते आता सांगतो. त्याला मी काही पाककृती म्हणणार नाही कारण आपण काही शेफ नाही.........सारंग्याचा आकार मोठा नसल्यामुळे आख्खेच तळायचे ठरविले त्याबरोबर पात्रानू मच्छी करावी असाही विचार केला. सगळ्या मित्रांना त्यांचे ग्लास घेऊन स्वयंपाकगृहात जबरदस्तीने गप्पा मारण्यास बसविले व चालू झाली आमची झटापट.......
पापलेट पात्रानि मच्छीसाठी एका विशिष्ठ पद्धतीने कापला.. म्हणजे त्याला पर्सला असतात तसे दोन्ही बाजूला कप्पे केले फक्त ते विरुद्ध दिशेला. पारशी लोक त्याचा काटा काढून वापरतात पण मला ते आवडत नाही. या माशांना लिंबू व मीठ लाऊन ठेवले.
चटणी : एक जुडी कोथिंबीर, १० ते १५ पुदिन्याची पाने. जास्त घेतली नाहीत मग त्याने जास्तच वास येतो. आल, लसूण, मिरच्या, मीठ, ओले म्हणजे हिरवे मिरे १० ते १५, एक मोठा कांदा, व कढिलिंबाची मुठभर पाने. एक आख्खा खोवलेला नारळ.
हे सगळे मिक्सरमधे बारीक वाटले. अगदी गंध केले नाही. वाटत आल्यावर त्यात एक लिंबू पिळले व मीठ टाकले. एक चमचा साखरही टाकली. मी सगळ्या मसाल्यात एक चमचा साखर टाकतोच...का ते विचारु नये. :-)
ही चटणी पापलेटच्या पर्समधे दाबून भरली. पटकन परसात जाऊन केळीची पाने तोडून आणली. ती काळजीपूर्वक कापावी लागतात नाहीतर फाटतात म्हणून जमिनीवर पसरुन कापली व ओल्या फडक्याने पुसून घेतली. प्रत्येक पानाचा मधला देठ काढल्यावर त्याचे दोन भाग झाले. प्रत्येक भागावर भरलेला पापलेट ठेवला व हलकेच त्या पानात गुंडाळला.....
एका मोठ्या पातेल्यात पाणी घेतले व त्यात पूर्ण बुडणार नाही अशा आकाराची चाळणी गावातून शोधून आणली ती त्यात बसवली. पाण्यात हिरवे मिरे, व हळद टाकली. (थोडी). हिरवी वस्त्रे परिधान केलेले चंदेरी रंगाचे मासे त्या वाफवणार्या यंत्रात ठेवले व वरुन झाकण ठेवले. थोड्यावेळाने झाकण काढून सुरी खुपसून ते शिजले की नाही ते बघितले. पानांचा रंगही बदलला होता. बाहेर येणार्या वाफेला मासा, चटणी, हळद व केळ्याच्या पानाच असा जबरदस्त सुवास येत होता की बस्स्स्स्स्स्स.......
पापलेट तळला त्याची गोष्ट....
याला नेहमी मारतात तसे खाप मारुन आणले होते. एका पातेल्यात मालवणी मसाला, आलं लसुण पेस्ट, (हे लिहायला विसरलो होतो. श्री. पेठकरांनी आठवण करुन दिली) चिमुटभर दालचिनी व मिर्याची पूड, चवीप्रमाणे मीठ व तिखट टाकले व त्याची तेल घालून मस्त पेस्ट केली. माशांना तासभर लावून ठेवली. तळायच्या अगोदर तांदूळाचे जाडसर पीठ लावून, पॅनमधे अर्धा से.मी. तेल घेऊन त्यात मस्त पैकी तळून काढले....जे तुम्हाला डावीकडे दिसत आहेत. पात्रानू मच्छी उजवीकडे केळीच्या पानात दिसत आहेत. खाण्याची गडबड उडाल्यामुळे अधीक फोटो काढता आले नाहीत त्या बद्दल क्षमस्व....
करुन बघा....
जयंत कुलकर्णी

याद्या
59267
प्रतिक्रिया
32
मिसळपाव
प्रतिक्रिया
तोंडाला पाणी सुटलं.... वा वा
खाण्याची गडबड उडाल्यामुळे
खाण्याची गडबड उडाल्यामुळे अधीक फोटो काढता आले नाहीत१ फोटो सर्व काहि साग्नतोय . आवडलि .अय्यो....
छानच फिश लव्हर
पापलेटास सद्गती लाभली.
लसूण???
In reply to पापलेटास सद्गती लाभली. by प्रभाकर पेठकर
अरेच्या विसरलो बघा.... आले
In reply to लसूण??? by प्रभाकर पेठकर
व्वा मजा आली
आयला ... तुमचे आमचे जमणार बघा,,,,,
जबरा...
In reply to आयला ... तुमचे आमचे जमणार बघा,,,,, by मुक्त विहारि
जयनतंत .. मर दाला तुमारे इस
In reply to आयला ... तुमचे आमचे जमणार बघा,,,,, by मुक्त विहारि
मस्तच...
पटकन परसात जाऊन केळीची पाने तोडून आणली. ती काळजीपूर्वक कापावी लागतात नाहीतर फाटतात म्हणून जमिनीवर पसरुन कापली व ओल्या फडक्याने पुसून घेतली.जर पाने शेगडीवर हलकेच गरम करुन घेतली तर ब-यापैकी मऊ होतात व फाटत नाहीत... (पापल्रेट पंखा ) बजरु... :)_/\_
नकाहो असे वाईट साईट बोलू.....
In reply to _/\_ by गणपा
+१००
In reply to नकाहो असे वाईट साईट बोलू..... by जयंत कुलकर्णी
सोकाजीशी सहमत....
In reply to +१०० by सोत्रि
एक नम्बर हो काका..!!
क्लास!
माझे तेथे घर असते तर तेथे
In reply to क्लास! by पैसा
माझे तेथे घर असते तर तेथे
In reply to क्लास! by पैसा
या खाद्य प्रकाराचे नाव
पारशी आहे ते
In reply to या खाद्य प्रकाराचे नाव by विजुभाऊ
अहो... त्या रेसिपीचे खरे नांव आहे....
In reply to पारशी आहे ते by पैसा
बरोबर याचे नाव पात्रानी
In reply to अहो... त्या रेसिपीचे खरे नांव आहे.... by मुक्त विहारि
पात्रा नी मच्छी..
In reply to या खाद्य प्रकाराचे नाव by विजुभाऊ
फोटो काढताना पालापाचोळा जरा
तोंडाला पाणी सुटले !!
आईशप्पथ!!!
हे राहुनच गेले होते. जबरा.
व्हेज असुन फोटो आणि माहीती आवडली.. :)
+१
In reply to व्हेज असुन फोटो आणि माहीती आवडली.. :) by अक्षया
मस्त