पुण्यामध्ये सध्या ट्राफीक जाम मुळे वाहनाचा वेग कमीच ठेवावा लागतोय. पण त्यातूनही मला एक नवीन छंद जडलाय, काही वाहनांच्या मागे छान वाक्य वाचायला मिळताहेत.काही वाक्य सुरक्षे संबंधी तर काही विडंबनात्मक, काही विचार करायला लावणारी, अशी वेगवेगळी असतात. " सुरक्षित अंतर ठेवा " , "आईचा आशिर्वाद " या सारखी नेहमीच दिसणारी आहेतच पण वेगळी अशी वाचायला मिळालेली काही वाक्य.. ....
१) बघतोस काय रागानं, ओव्हरटेक केलयं वाघानं
२) योग्य अंतर ठेवा वाहनामध्ये ...आणि ...मुलांमध्ये..
३) कितने भी खरीद ले हिरे मोती,लेकीन कफ़नपर जेब नही होती
४) जळा पण प्रेमाने
५) Don't Kiss me.
६) एका मिनीडोअर (सहा आसनी) च्या मागे तर डब्लू डब्लू डब्लू.टमटम. काम असे वाक्य आहे.
७) अरे नाही , अहो रिक्शावाले म्हणा.
८) वाट पाहिन पण एस टी नेच जाईन .
९) Mom say's ,No Girl friend
मिपाकरानो,कदाचित आपणासही अशी अनेक वाचायला मिळली असतीलच. सांगा......
... आणि आमच्या परदेशातल्या मिपाकरानो तुम्हाला तिकडे अस काही वाचायला मिळतं काहो?
आपल्या गाडीच्यामागे काहीही लिहायची इच्छा नसेल तर गाडी क्रमांक तरी लिहा :)
वाचाळ --- निसर्ग
प्रतिक्रिया
26 Sep 2008 - 10:38 am | मनिष
आपून फिदा है रे इस डाईलॉग पे....
अजून एक फंडू वाक्य एका कारच्या मागे पाहिले होते -
Watch my rear, not her! ;)
26 Sep 2008 - 12:50 pm | प्रभाकर पेठकर
तसेच,
Don't touch me. I am not 'that' type of a car.
26 Sep 2008 - 11:30 am | गणा मास्तर
१. Mama says no girls papa says no race.
२. गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी ( हे लिहिलेला टेम्पो पौड रोडला आनंदनगर बसस्टॉपमागे बरेच दिवस पडुन होता, जुन्या आठवणी काढत असेल कदाचित)
३. हेही दिवस जातील
या पाट्यांमध्ये शुद्ध्लेखनाच्या चुकांमुळे आणखी गमतीजमती होतात
४. संत वहाते कृष्णामाई (पेंटरला संथ लिहायचे असावे)
इकडे जपानमध्ये मात्र असे काहीही लिहिलेले नसते
- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)
26 Sep 2008 - 1:02 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
कार भारी जरा दमानं
26 Sep 2008 - 1:17 pm | ऋचा
देखो मगर प्यार से
रीक्षा मागची ओळ....
"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
26 Sep 2008 - 2:50 pm | दिपोटी
पी आर के ५६९४
26 Sep 2008 - 3:03 pm | सुचेल तसं
1) Dad's Gift
2) नाद खुळा
३) नाद नाही करायचा ढाण्या वाघाचा
४) ऐ काय बघतोस?
५) जलो मगर दीपसमान
६) घर कब आओगे?
७) अनारकली भरके चली
Finally I will be so matured that I will react to nothing.
अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com
26 Sep 2008 - 3:34 pm | शाल्मली
अनेक ट्रकच्या मागे सिनेमांची नावे लिहिलेली असतात. त्यावरुन वाचलेला एक विनोद आठवला-
एका ट्रकच्या मागे लिहिले होते- 'सावनको आने दो'. एक दुसरा ट्रक येऊन या ट्रकला धडकतो.
पहिला ट्रकचालक भांडू लागतो. तोच दुसरा ट्रकचालक आपल्या ट्रक मागची पाटी दाखवतो-
'आया सावन झूमके! :)
--शाल्मली.
26 Sep 2008 - 5:16 pm | झकासराव
एक बायपासने कोथरुडला जाताना वाटेत एका ट्रकवर वाचलेल वाक्य.
"जली को आग केहते है
बुझी को राख
और जो चीज तुम्हारे पास नही है,
उसे हम हिन्दी मे दिमाग केहते है" :D
आणि त्याहुन जास्त विनोदि वाटत त्या ट्रकच्या नं प्लेटकडे पाहिल्यावर.
हरियाना पासीन्ग्ची गाडी होती आणि बाते दिमागकी :D
समस्त हरियाणा प्रेमीनी ह घ्या. ;)
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao
26 Sep 2008 - 5:18 pm | शिशिर
(१) १३ मेरा ७.......
(२) A जलता Q?
(३) पहा पन प्रेमाणे...
(४) जलो मगर प्यार से....
26 Sep 2008 - 5:59 pm | योगी९००
लहानपणी आवाजच्या अंकात एक चित्र बघितले होते.
एका माणसाच्या तोंडावर ट्र्क पाणी उडवतो. माणूस रागाने ट्र्ककडे पाहतो तर त्याला ट्र्कच्या मागील बाजूला खालील वाक्य दिसते
"बुरी नजरसे देखनेवाले तेरा मुंह काला !!!"
खादाडमाऊ
(लहानपणापासून आवाज वाचणारा)
27 Sep 2008 - 5:27 am | चतुरंग
'आवाज' मधे वाचण्यासारखं काही नसतं त्यामुळे वरचं वाक्य 'लहानपणापासून आवाज पहाणारा!' असे हवे! ;)
(खुद के साथ बातां : मी एकदा लहानपणी 'आवाज' ला हात लावला तर माझ्या कानाखाली 'आवाज' आलेला मला अजून ऐकू येतो! :O )
चतुरंग
13 Oct 2008 - 5:58 pm | धमाल मुलगा
मीही 'आवाज' चोरुन 'बघायचो' आणि सापडलो की रंगलेली कानशीलं चोळत घरातुन धुम ठोकायचो :)
26 Sep 2008 - 9:45 pm | रवि
I don't drive fast , I fly slow
You are behind the best
रवि
अनंत अमुची धेयासक्ती अनंत अन आशा ......
26 Sep 2008 - 10:58 pm | प्राजु
मिपा वर मी पूर्वी चालू केला होता..
इथे वाचावे..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
27 Sep 2008 - 5:49 pm | प्रभाकर पेठकर
१) May be I am slow, but still, I am ahed of you.
२) आई जेऊ घालीना, बायको रिक्षा चालवू देईना.
३) दम है तो पास कर नही तो बरदाश्त कर.
४)मुलगी शिक्ली परगती झाली.
५) वर लिहीले होते 'मित्रांची मदत'
खाली लिहीले होतं, 'पिंकी', अश्विनी आणि विरभद्र'
28 Sep 2008 - 8:56 am | रेवती
मागे लिहीले होते,
१ १३ ६ रा
एक तेरा सहा रा.
रेवती
28 Sep 2008 - 6:35 am | चतुरंग
'ब्बलू'
उच्चार करुन बघा! (त्याला 'बबलू' लिहायचे असावे हा माझा अंदाज - हे वाचताना मी हसून हसून सायकल वरुन पडायला आलो होतो! :D )
एका गाडीमागे 'If you can read this, then you are too close!' (मी लगेच माझ्या गाडीचा स्पीड कमी केला! ;) )
चतुरंग
28 Sep 2008 - 3:07 pm | पुष्कर
१. सायकलच्या मडफ्लॅपवर -
सायकल सोडून बोला (शहर - अर्थात पुणे!)
२. ट्र्कच्या मागे (खूप कॉमन दृश्य) -
(वरची ओळ) चिंकी पप्पू मन्नू राजू मुन्नी बिट्टू
(खालची ओळ) छोटा परिवार सुखी परिवार
(आजूबाजूला) हॉर्न . ओके. प्लीज.
28 Sep 2008 - 3:13 pm | विनायक प्रभू
http://vipravani.wordpress.com/
नसिब मे लिखा है दंड
कैसे खायेगा शीर्खंड
28 Sep 2008 - 11:31 pm | केशवराव
पुण्यातल्या रिक्षावर [. . . . . म्हणजे पाठीमागे!] , ' थांबा , आलोच! '
29 Sep 2008 - 9:14 am | एकलव्य
भगवान सबका भला करे
लेकिन शुरवात हमसे करे
12 Oct 2008 - 2:44 pm | पुष्कर
ट्रकच्या मागे
मालिक गाडी, ड्रायव्हर का पसीना
रोडपे चलती है, जैसे हसीना
12 Oct 2008 - 3:55 pm | देवदत्त
एका खाजगी बसच्या मागे नाही पण समोरील काचेवर लिहिलेले वाचले होते.
"All India Permit.
Valid in Maharashtra."
मला नाही अर्थ कळला ह्याचा.