नोव्हेंबर-डिसेंबर २०१३ मध्ये दिल्ली, म.प्र., छत्तीसगड, राजस्थान व मिझोराम या राज्यात विधानसभेच्या निवडणुका आहेत.
१) म.प्र. (१९८५ - काँग्रेस, १९९० - भाजप, १९९३ - काँग्रेस, १९९८ - काँग्रेस, २००३ पासून भाजप सत्तेत आहे)
एकूण जागा - २३०
२००८ ची परिस्थिती - भाजप (१४३), काँग्रेस (७१)
२०१३ चा अंदाज - भाजप (१४८-१६०), काँग्रेस (५२-६२)
http://ibnlive.in.com/news/prepoll-survey-bjp-sweeps-madhya-pradesh-may-...
२) छत्तीसगड (२०००- काँगेस, २००३ पासून भाजप सत्तेत आहे)
एकूण जागा - ९०
२००८ ची परिस्थिती - भाजप (५०), काँग्रेस (३८)
२०१३ चा अंदाज - भाजप (६१-७१), काँग्रेस (१६-२४)
http://ibnlive.in.com/news/prepoll-survey-bjp-set-to-rout-congress-in-ch...
३) राजस्थान (१९८५ - काँग्रेस, १९९० - भाजप, १९९३ - भाजप, १९९८ - काँग्रेस, २००३ - भाजप, २००८ - काँग्रेस, २००८ पासून काँग्रेस सत्तेत आहे)
एकूण जागा - २००
२००८ ची परिस्थिती - भाजप (७८), काँग्रेस (९६)
२०१३ चा अंदाज - भाजप (११५-१२५), काँग्रेस (६०-६८)
http://ibnlive.in.com/news/prepoll-survey-bjp-may-storm-to-power-in-raja...
४) दिल्ली (१९९३ - भाजप, १९९८ पासून काँग्रेस सत्तेत आहे)
एकूण जागा - ७०
२००८ ची परिस्थिती - भाजप (२३), काँग्रेस (४३)
२०१३ चा अंदाज - भाजप (२२-२८), काँग्रेस (१९-२५), आम आदमी पक्ष (१९-२५)
http://ibnlive.in.com/news/prepoll-survey-hung-assembly-in-delhi-as-aap-...
दिल्लीत अत्यंत चुरशीची स्थिती आहे. अरविंद केजरीवालांच्या आम आदमी पक्षाने जबरदस्त आव्हान उभे केले आहे. या पक्षाची लोकप्रियता वेगाने वाढते आहे. कदाचित शेवटी या पक्षाला पूर्ण बहुमत मिळू शकेल.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीचा अंदाज -
२००९ ची स्थिती - युपीए (२५५. यात काँग्रेसचा वाटा २०६), एनडीए (१६१. यात भाजपचा वाटा ११६)
२०१४ चा अंदाज - युपीए (१३४-१४२. यात काँग्रेसचा वाटा ११६-१२४), एनडीए (१८७-१९५. यात भाजपचा वाटा १७१-१७९)
http://ibnlive.in.com/news/big-gains-likely-for-bjp-nda-in-lok-sabha-pol...
काँग्रेस व पर्यायाने युपीएची जबरदस्त पीछेहाट होण्याचा अंदाज असून अनेक मित्रपक्ष व स्वकीय सोडून गेलेले असताना सुद्धा भाजप व पर्यायाने एनडीएची परिस्थिती खूपच सुधारत आहे. हाच मोदी इफेक्ट असेल का?
प्रतिक्रिया
1 Nov 2013 - 10:57 pm | लॉरी टांगटूंगकर
रिझल्टची बरीच उत्सुकता आहे, मोदी एकटे किती ठिकाणी पुरे पडणार असा एक प्रश्न पडतोय. लोकल उमेदवाराच्या मतांवर याचे कसे परिणाम होतात अन् केजरीवाल काय मिळवू शकतात हे पाहणे लै इंत्रेष्टिंग असणार आहे.
1 Nov 2013 - 11:02 pm | मुक्त विहारि
हात दाखवून अवलक्षण न करणेच योग्य.
७०% मतदान झाले तर, मुद्दाम गहन विचार करणार्यांची अवस्था बेकार होईल.
1 Nov 2013 - 11:18 pm | अपूर्व कात्रे
कुठल्यातरी एका वाहिनीने केलेले prepoll surveyचे (मर्यादित) निष्कर्ष कितपत सत्य ठरू शकतात?
1 Nov 2013 - 11:31 pm | आतिवास
या वाहिनीने मागच्या दोन-तीन निवडणुकांत वर्तवलेले अंदाज कितपत बरोबर निघाले होते याविषयी काही माहिती आहे का? त्यावरुन मग यावेळच्या अंदाजाला कितपत महत्त्व द्यायचे याचा एक अंदाज बांधता येईल :-)
अवांतरः आपल्या देशात अशी सर्वेक्षणं म्हणजेही मतदारांना प्रभावित करण्याचा एक मार्ग असतो अशी अनेकदा शंका येते.
2 Nov 2013 - 10:24 am | श्रीगुरुजी
>>> या वाहिनीने मागच्या दोन-तीन निवडणुकांत वर्तवलेले अंदाज कितपत बरोबर निघाले होते याविषयी काही माहिती आहे का? त्यावरुन मग यावेळच्या अंदाजाला कितपत महत्त्व द्यायचे याचा एक अंदाज बांधता येईल
अवांतरः आपल्या देशात अशी सर्वेक्षणं म्हणजेही मतदारांना प्रभावित करण्याचा एक मार्ग असतो अशी अनेकदा शंका येते.
पूर्वी अनेक वेळा मतदाता चाचण्यांचे निष्कर्ष आश्चर्यकारकरित्या खरे ठरले आहेत. 'इंडिया टूडे'ने १९८० साली काँग्रेसला ३५३, १९८४ ला ३६०+ व १९८९ ला १९५ जागांचा अंदाज दिला होता. प्रत्यक्षात काँग्रेसला १९८० मध्ये ३५५, १९८४ मध्ये ४१४ व १९८९ मध्ये १९५ जागा होत्या. म्हणजे हे अंदाज खूपच अचूक होते. नंतर बर्याच वाहिन्यांनी कोणत्या तरी एका पक्षाच्या विचारसरणीला वाहून घेतल्यामुळे त्यांचे अंदाज पक्षपाती होऊ लागले. तरीसुद्धा अशा चाचण्यांवरून वारे कोणत्या दिशेने वाहत आहे याचा अंदाज येतो.
2 Nov 2013 - 10:51 am | चौकटराजा
ही सर्व्हे म्हणजे एक फालतू गिरी आहे असे मला ही प्रथम वाटायचे. पण त्यांचा सॅम्पल कमी असला तरी ते वाईड सॅम्पल घेतात असे कळते आहे. सबब हवामान खात्याचा अंदाज हा जसा आता चेष्टेचा विषय राहिलेला नाही तद्वत हे सर्व्हे म्हणजे ही अगदीच बकवास नाही.
आम आदमी पार्टी दिल्लीत स्थिरावली तर मला व्यक्तिशः आनंद होईल . कारण तो पक्ष म्हणजे राज ठाकरेंचा मनसे नव्हे की शरद पवारांचा रा का नव्हे. तो पूर्ण पणे नवीन पक्ष असणार आहे.
नमो अजूनही अर्थिक नीति, पराराष्ट्र धोरण, सुशासन याविषयी जो पर्यंत काही क्रांतिकारी बोलत नाहीत. तो पर्यंत नुसत्या
गुजरातची प्रगति ची पारायणे करून काहीही साध्य होणार नाही. केजरीवाल ही या आघाडीवर कच्चे खेळाडू वाटतात मला.
2 Nov 2013 - 10:58 am | श्रीगुरुजी
>>> आम आदमी पार्टी दिल्लीत स्थिरावली तर मला व्यक्तिशः आनंद होईल .
आम आदमी पक्षाला दिल्लीत पूर्ण बहुमत मिळावे अशी माझी इच्छा आहे. इतर राज्यात काँग्रेसचा दणकून पराभव व्हावा व भाजपला बहुमत मिळावे असे वाटते.
2 Nov 2013 - 11:30 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
+५००
3 Dec 2013 - 7:25 pm | विवेकपटाईत
श्री गुरुजी तुम्हाला दिल्लीची कल्पना नाही. लोक सत्तापक्ष पासून नाराज आहे. हे थिंक टेंक ने आधीच ओळखले आहे. रणनीती आधीच आखून ठेवली आहे. बहुतेक कांग्रेस मधून निघालेले (?) आणि मोठे-मोठे प्रापर्टी डीलर आम आदमीच्या तिकीटा वर उभे आहे. अधिकांश कार्यकर्ता 'मानधन' घेत आहे. (अस ऐकिवात आहे) आमच्या बिंदापूर येथून वर्ष भर आधी कांग्रेस सोडलेला व्यक्तीच आम आदमी कडून उभा आहे. (बिंदापूर एक्स्टेंशन- दोन वर्षांपासून पाणी येत नाही आहे, पिण्याच्या पाण्यासाठी टेन्कर येतात). कांग्रेस उम्मिद्वाराचा प्रचार थंड आहे, शिवाय या भागात (जिथे पाणी येत नाही) जुने कार्यकर्ते आपचा प्रचारात मग्न आहे. आणखीन एक नारा आहे 'दिल्लीत केजरीवाल आणि लोकसभेत मोदी' लोकांना हा नारा आवडतो आहे. अर्थात भाजपला नुकसान पोह्चणारच. (मत विभाजणीचा कांग्रेसला फायदा होऊ शकतो मागे ४६% वोट मिळाले होते आणि भाजपला ३६%. आता कॉंग्रेसला ३०% मते मिळाली तरी नैया पार लागू शकते. म्हणून श्रीमती दीक्षित (यांचे पूर्वज ही महाराष्ट्रातून उत्तरांचल येथे येऊन स्थायी झाले होते) यांचा आत्मविश्वास ढळला नाही आहे. थंड प्रचार ही विजय मिळवून देऊ शकतो. ही आशा. शेवटी बहुमत नाही मिळाले तर आप + कॉंग्रेस युती होईलच. (सांप्रदायिक शक्तींना दूर ठेवण्यासाठी, नेहमीचाच बहाणा). मला वाटते निवडूकीनंतर सर्वाना घोर निराशा होईल.
4 Dec 2013 - 1:49 pm | श्रीगुरुजी
तुम्ही म्हणता त्यात तथ्य आहे. जर भाजपला ७० पैकी किमान ३६ जागा मिळाल्या नाहीत (अगदी ३४ जरी मिळाल्या तरी) तर उर्वरीत सर्वांना एकत्र आणून बहुमत जमविण्याची काँग्रेसकडे क्षमता आहे. काँग्रेस ब्यूरो ऑफ इनव्हेस्टिगेशनची भीति दाखवून बसपला फरफटत आणता येईल. अपक्ष व आम आदमी पक्षाचे जिंकलेले उमेदवार अगदी सहज स्वस्तात विकत मिळतील. असे करून ३६ आमदारांची जमवाजमव काँग्रेस सहज करू शकते.
मार्च २०१२ मध्ये झालेल्या उत्तराखंड निवडणुकीत ७० पैकी भाजप ३१ व काँग्रेस ३२ अशी त्रिशंकू परिस्थिती होती. पण उर्वरीत ७ आमदारांपैकी (त्यातले ३ बसपचे होते) एकही आमदार भाजपच्या गळाला लागला नाही. सर्वजण काँग्रेसकडे जाऊन काँग्रेसने बहुमत मिळविले.
यावेळी दिल्लीत त्रिशंकू परिस्थितीचा अंदाज आहे. म्हणजेच काँग्रेसच शेवटी सत्ता स्थापन करणार.
4 Dec 2013 - 6:56 pm | नितिन थत्ते
अरेरे !! निराश होऊ नका.
5 Dec 2013 - 11:30 am | मृत्युन्जय
त्यांना सांगता आहात की स्वतःला समजावत आहात चाचा?
4 Dec 2013 - 8:27 pm | ग्रेटथिन्कर
भारतीय झंगड पार्टी सारख्या टीनपॉट पक्षाला घरीच बसवावे.
4 Dec 2013 - 8:52 pm | लोटीया_पठाण
इनो वगैरे घ्याव अधुन मधुन ....इतकी जळ्जळ बरी नव्हे
5 Dec 2013 - 1:20 pm | श्रीगुरुजी
>>> इनो वगैरे घ्याव अधुन मधुन ....इतकी जळ्जळ बरी नव्हे
ते नथु गुग्गुळचे अॅडिक्ट आहेत. नथु गुग्गुळचीच किक त्यांना बसते.
5 Dec 2013 - 1:14 am | विनोद१८
नमो नमः हुच्च विचारवन्त..... ---------^---------
आपली सिग्नाचर लाइन अशीच हवी हो :-
आपले मत धर्मनिरपेक्ष, पुरोगामी, अती भ्रष्टाचारी व सर्वात लूटारू पक्षालाच द्या
कसे ????
विनोद१८
5 Dec 2013 - 11:29 am | मृत्युन्जय
आपले मत धर्मनिरपेक्ष, पुरोगामी, अती भ्रष्टाचारी व सर्वात लूटारू पक्षालाच द्या
नाही भ्रष्टाचारी आणि लुटारु कोण ते समजले पण धर्मनिरपेक्ष आणि पुरोगामी असणारा पक्ष कुठला म्हणे? भाजपाला लुटारु आणि भ्रष्टाचारी म्हणता येणार नाही. पुरोगामी म्हणता येइल पण धर्मनिरपेक्षा मानणे जरा अवघड जाउ शकते लोकांना. पक्ष मुसलमानविरोधी नसला तरी हिंदुत्वाकडे झुकणारा आहे हे अमान्य करुन चालणार नाही. थोडक्यात भाजप तर एकाच विशेषणावर खरा उतरतो.
भ्रष्टाचारी आणि लुटारु असे दोन्ही असणारा पक्ष आपल्या सगळ्यांना माहिती आहेच. पण त्या पक्षाला धर्मनिरपेक्षपणाचा केवळ देखावाच करता आलेला आहे बाकी लांगुलचालन तर एकाच धर्माचे चालु आहे आणि त्या पक्षाला पुरोगामी म्हणणे ही "पुरोगामी" शब्दाची क्रुर थट्टा आहे.
त्यामुळे थोडा संभ्रम झाला आहे तो कृपया दूर करावा.
5 Dec 2013 - 11:55 am | ग्रेटथिन्कर
भारतीय जमालगोटा पार्टी पुरोगामी?????..n*हहपुवा
5 Dec 2013 - 11:58 am | मृत्युन्जय
हहपुवा
वात झालाय का?
5 Dec 2013 - 12:58 pm | श्रीगुरुजी
>>> आणि त्या पक्षाला पुरोगामी म्हणणे ही "पुरोगामी" शब्दाची क्रुर थट्टा आहे.
हाच तथाकथित "पुरोगामी" पक्ष एका बाबाला पडलेल्या एका अत्यंत हास्यास्पद स्वप्नावर विश्वास ठेवून कुठल्यातरी किल्यात उत्खनन करतो, त्यासाठी लाखो रुपयांचा चुराडा करतो आणि तिथून रिकाम्या हातांनी परतून जगभर भारताचे हसे करून ठेवतो.
5 Dec 2013 - 3:56 pm | ग्रेटथिन्कर
आणि भाजपाचा मुरली जोशी पाचशे कोटीचे ज्योतिष विद्यापीठ उभे करणार होता तो कोणता पुरोगामी विचार होता?...
आणखि एक जोशी गणपतीला दूध पाजायला गेला होता आणि बाहेर येऊन गणपतीने दूध पिले अशी लोणकढी थाप मारण्याचा 'पुरोगामी'प्रयत्न केला होता...
5 Dec 2013 - 4:10 pm | अनुप ढेरे
हा काय प्रतिवाद आहे मला समजलं नाही. काँग्रेसच्या प्रतिगामित्वाचं उदाहरण देऊन, काँग्रेस ही पुरोगामी नाही अशी आर्ग्युमेंट असताना भाजपाच्या मूर्खपणाचा दाखला देण्याचं प्रयोजन नाही समजलं.
5 Dec 2013 - 4:13 pm | लोटीया_पठाण
तेच म्हणतो … भाजप कडून पुरोगामी पुरोगामी करत उर बडवलेला अजून पाहण्यात आला नाही.
5 Dec 2013 - 4:35 pm | नितिन थत्ते
वर मृत्युंजय यांच्या प्रतिसादात वरून चौथ्या ओळीत भाजपला पुरोगामी म्हणता येईल असं न्हटलं आहे. त्याला उत्तर दिलेलं असावं
5 Dec 2013 - 4:36 pm | नितिन थत्ते
या प्रतिसादात
5 Dec 2013 - 7:12 pm | श्रीगुरुजी
सत्यसाईबाबांना सरकारी बंगल्यात बोलावून त्यांची पाद्यपूजा करणारा कोणत्या "पुरोगामी" पक्षाचा होता?
सत्यसाईबाबांच्या जीवनावरील धडा बालभारतीच्या पाठ्यपुस्तकात टाकणारा कोणत्या "पुरोगामी" पक्षाचा होता?
ज्योतिषांचा सल्ला घेऊन निवडणूक लढविणारे कोणत्या "पुरोगामी" पक्षाचे असतात?
धीरेंद्र ब्रह्मचारी, स्वामी अग्निवेश, चंद्रास्वामी इ. भोंदू बाबा कोणत्या "पुरोगामी" पक्षाशी संबंधित होते?
5 Dec 2013 - 7:29 pm | ग्रेटथिन्कर
ब्वॉर...
मग हे काय पुरोगामी काम करत होत तेही लिहा.
5 Dec 2013 - 7:36 pm | श्रीगुरुजी
ते काही पाद्यपूजा करताना दिसत नाहीत किंवा त्यांचा धडादेखील अभ्यासक्रमात टाकलेला नव्हता किंवा आपण "पुरोगामी" आहोत अशी खोटी जाहिरातबाजी देखील करताना दिसत नाही. इतर तथाकथित "पुरोगामी" पक्षांसारखे त्यांचे दाखवायचे व खायचे दात वेगळे नसतात.
5 Dec 2013 - 7:43 pm | ग्रेटथिन्कर
यात काय करतायत...
नतमस्तक झाले पण पाद्यपूजा केली नाही..यालाच म्हणायचं खरा "पुरोगामी"
5 Dec 2013 - 7:46 pm | श्रीगुरुजी
तुम्ही इथे जो फोटो टाकलाय त्याचे ३ निष्कर्ष निघतात.
(१) सत्यसाईबाबांबरोबर असणे हे पुरोगामीपणाचे लक्षण नाही. म्हणजे आपल्या सरकारी बंगल्यात बोलावून त्यांची पाद्यपूजा करणारे व त्यांचा धडा पाठ्यपुस्तकात टाकणार्यांचा पक्ष सुद्धा पुरोगामी नाही.
किंवा
(२) सत्यसाईबाबांशी संबंध असणे हे पुरोगामीपणाचे लक्षण आहे. म्हणजे वाजपेयी व त्यांचा पक्ष सुद्धा किंवा पुरोगामी आहे.
किंवा
(३) सत्यसाईबाबा जर भाजप नेत्यांबरोबर असतील तर ते प्रतिगामी आणि ते जर काँग्रेसवाल्यांबरोबर असतील तर ते पुरोगामी.
तुमचा व तुमच्या पक्षाची ढोंगी विचारसरणी लक्षात घेता, तुम्ही निष्कर्ष क्र. (३) काढणार हे उघड आहे.
5 Dec 2013 - 7:55 pm | ग्रेटथिन्कर
निष्कर्ष १ आपण काँग्रेसला लावणार
निष्कर्ष २ भाजपला लावणार...
घ्या लावून..
5 Dec 2013 - 7:59 pm | श्रीगुरुजी
तुम्ही कोणतेही निष्कर्ष कोणालाही लावा. तुमचा पराभव अटळ आहे. असो. बहुत काय लिहिणे.
5 Dec 2013 - 8:13 pm | श्रीगुरुजी
अरेरे! पराभवाच्या भीतिने ग्रेटथुंकरांसारख्या पुरोगाम्यांनी सूंबाल्या केलेला दिसतोय.
8 Dec 2013 - 10:22 am | सुहासदवन
सध्याच्या निवडणुकीत समोर पराभव दिसत असताना हे पहा पुरोगामी म्हणवणारे काय करताहेत ते.
शीला दीक्षित यांच्या विजयासाठी कार्यकर्त्यांचं होमहवन.
8 Dec 2013 - 10:23 am | सुहासदवन
https://plus.google.com/photos/117182536131445242815/albums/595487820549...
5 Dec 2013 - 11:00 pm | विकास
बाईंचे देऊळ
पंतप्रधान रामाची आरती करत आहेत आणि बाईसाहेब थांबा तरी म्हणत आहेत अथवा "हाताच्या पंजाने" आशिर्वाद देत आहेत. तेहेलकात गुंतवणूक करणारे कपिल सिबल पण हसताना दिसत आहेत.
5 Dec 2013 - 11:26 pm | विद्युत् बालक
होली शिट =))
6 Dec 2013 - 2:16 pm | श्रीगुरुजी
शेवटचा फोटो भारतीय घटनेत १९७५ साली टाकलेल्या "धर्मनिरपेक्षता" या तत्वाचे प्रतीक आहे. बुरसट व प्रतिगामी हिंदू धर्माचे प्रतिनिधी असलेले श्रीराम व श्रीलक्ष्मण यांची पूजा एक शीख व्यक्ती करत असून ख्रिश्चन महिला आनंदाने सूचना देत आहे व सिब्बल, शीलाआज्जी यांसारख्या निधर्मांच्या चेहर्यावर हसू फुलले आहे.
धर्मनिरपेक्षता व एकात्मता अजून वेगळी असते का?
7 Dec 2013 - 2:09 am | शिद
बुल्सआय प्रतिसाद.. ._/\_दडंवत घ्या गुरुजी...!!!
7 Dec 2013 - 10:48 am | डॉ सुहास म्हात्रे
तो फोटो आणि प्रतिसाद ... लंबर वन्न !
7 Dec 2013 - 12:06 pm | लोटीया_पठाण
@ ग्रेटथिंकर,
तुम्हाला सर्व मुद्दे समजले अन अनिच्छेने का होईना पटले पण आहेत, फक्त प्रतिवाद करता येत नाही म्हणून अजूनही निरागस असल्याच ढोंग करत आहात असं वाटून राहिलंय.
6 Dec 2013 - 1:17 am | विकास
भाजपाचा मुरली जोशी पाचशे कोटीचे ज्योतिष विद्यापीठ उभे करणार होता तो कोणता पुरोगामी विचार होता?...
वैचारीक विरोधक असले तरी किमान वय पाहून "अरे-तुरे" करू नये असे वाटते. अर्थात हा भारतीय संस्कृतीचा भाग झाला आणि तुम्हाला संस्कृती बाळगणे मान्य नसेल असे तुमचे प्रतिसाद वाचून वाटते. असो. आता जे काही लिहीत आहे ते मुरली मनोहर जोशी यांची अथवा भाजपाची बाजू घेण्यासाठी नाही किंवा ज्योतिषाच्या बाजूने अजिबातच नाही. पण तुमचे (या प्रतिसादात) वर चिकटवलेले विधान खोटे असावे असे वाटते. "वाटते" अशा साठी म्हणतो कारण मला तशी माहिती कधी वाचल्याचे आठवत नाही, आत्ता देखील शोधली तेंव्हा मिळाली नाही. पण तुम्ही जर काही संदर्भ दिलात तर मोकळ्यामनाने घेण्याची तयारी आहे याची १०००% खात्री देतो. पण देऊ शकत नसलात तर अतिशयोक्ती केलीत का खोटेपणा हे येथे सांगावेत ही विनंती....
आता तुमचेच वरचे (कळत का नकळत माहीत नाही पण) दिशाभूल करणार्या विधानाची सत्यासत्यता शोधताना मला मुरली मनोहर जोशींची १७ सप्टेंबर २००१ चा इंडीया टूडे मधील एक मुलाखत वाचायला मिळाली: "Astrology Course Isn't My policy. That's UGC's Baby." ती मुलाखत मुळातून वाचण्यासारखी आहे. कारण त्यात त्यांची मते स्पष्टपणे आलेली आहेत... सगळ्यात महत्वाचे म्हणणे असे आहे की, " The UGC takes independent decisions. The ministry does not order the UGC. In the NCERT, I am the chairman. In the UGC, I am nobody." त्या व्यतिरीक्त असेही दिसले की हे कोर्सेस "आर्टच्या" यादीत आहेत, "सायन्सच्या" नाही. त्यांचे एक म्हणणे मला तर अजूनच पटले (आणि मजेदार वाटले) की मार्क्सवाद हा चुकीचा ठरला तरी देखील तो आपल्याकडील विद्यापिठात का शिकवला जातो? (हा प्रतिवाद त्यांनी ज्योतिष शिकवण्याच्या संदर्भात केलेला नसून मार्क्सवादी नेते त्यांच्याविरोधात जे काही ओरडत होते त्यासंदर्भात केलेला दिसला.
आता घटकाभर असे समजूयात की मनुष्यबळ विकासमंत्री या नात्याने त्यांनी मनुष्यबळ विकास खात्याच्या अख्त्यारीतील युजिसीवर छुपा दबाव आणला... राजकारणात असे सहजशक्य आहे. पण मग याचीच corollary काय ठरू शकते? की गेल्या ८-९ वर्षात युपिएचे राज्य आल्यापासून ज्योतिषशास्त्र शिकवणे हे युजिसीने बंद करायला हवे (कारण आताचे मनुष्यबळ विकास मंत्री आणि त्यांचा पक्ष हा पुरोगामी तसेच सेक्यूलर आहे). पण दिसते भलतेच... आजही अनेक (मनुष्यबळ विकास खात्याच्या अख्त्यारीतील) युजीसीमान्य विद्यापिठात ज्योतिषशास्त्र विषयात एम एच काय अगदी पिएचडी पण करता येते?
अजून एक गंमत म्हणजे डॉ. नारळीकर (ज्यांच्याबद्दल मला नितांत आदर आहे आणि ज्यांच्या लेखनाचा मी पंखा आहे) ते त्यांच्या एप्रिल २०१३ च्या An Indian Test of Indian Astrology लेखात लिहीतात, "Its main government funding agency, the University Grants Commission, provides support for BSc and MSc courses in astrology in Indian universities". पण खाली दिलेली सुची पाहीलीत तर लक्षात येईल की शास्त्रातील पदवी कोणतेच विद्यापिठ देत नाही, मग डॉ. नारळीकरांसारखी शास्त्रज्ञ व्यक्ती असे खातरजमा न करता कसे लिहीते?
मग आता ते कॉंग्रेसचे काय झाले, कम्युनिस्टांचे काय झाले, तथाकथीत सेक्यूलर विचारवंतांचे काय झाले आणि तेंव्हा सातत्याने या विषयाच्या मागे लागणार्या माध्यमांचे काय झाले? सगळेच भंपक झालं. असो...
6 Dec 2013 - 1:23 pm | अनिरुद्ध प
विकासभाऊ,
ईतक्या उत्क्रुष्ठ आणि प्रगल्भ माहिती साठी,निदान आतातरी,मुद्दाम हुच्च विचार करणार्याचे समाधान झाले तर ठीकच्,असो माहीतीसाठी परत अनेक धन्यवाद.
6 Dec 2013 - 2:18 pm | श्रीगुरुजी
विकास,
जबरदस्त व अभ्यासू प्रतिसाद! पण डोळ्यांवर काँग्रेसी विचारांची निधर्मी झापडे बांधलेल्यांना जाग येणार नाही.
6 Dec 2013 - 6:05 pm | विकास
अहो असले काँग्रेसी विचारांचे पण नसतात. काँग्रेसवाले स्वतःस विचारवंत वगैरे समजत नाहीत. स्वतःला विचारवंत म्हणवत खोटे बोलणे आणि इतरांची दिशाभूल करणे इतकाच यांचा रिकामटेकडा उद्योग असतो. खोटारडेपणा आहे झालं सगळा... असो.
5 Dec 2013 - 11:50 pm | विनोद१८
तेच तेच वाचुन कन्टाळा आला हो म्हटले जरा काही बदल सुचवून पाहु, कदाचित दुसरे काहीच सुचत नसेल...... . मी जे बदल सुचविले त्याचा अर्थ फक्त शब्दश: तेथे वस्तुस्थितीला धरून आहे, त्याशिवाय त्या पक्षाची ओळख पूर्ण होउ शकत नाही.
विनोद१८
2 Nov 2013 - 12:36 pm | तर्री
दिल्ली मध्ये आम आदमी पार्टी ने चुरस निर्माण केली आहे. त्यांना चांगली मते ही मिळतील पण जागा किती मिळतील ह्या बद्दल मी शशांक आहे. भाजप निसटते बहुमत मिळवेल असा अंदाज आहे ( आणि मग आम आदमी पार्टी च्या खऱ्या अर्थाने राजकारणात प्रवेश होईल. )
१.माध्यमांचा / सेफोलोजीस्तचा कल नेहमी तिसरा पक्षाकडे (तृतीय पंथ-डोळा मिचकावून )झुकलेला असतो किंवा त्यांचा अंदाज जनता चुकवते असे वारेच वेळा दिसते.
१.१ गुजराथ आणि कर्नाटक मध्ये गुपप आणि कजप यांच्या निवडणूक पूर्व जागांचे अंदाज साफ चुकले आहेत. त्यांना अपेक्षेपेक्षा जागा कमी मिळाल्या. शेवटच्या निर्णायक टप्प्यात मतदारांचा मानस बदलतो. तो बदल एक्क्षिट पोल मध्ये स्पष्ट दिसून येवू शकतो.
२.अलीकडच्या काळात जनतेने "त्रिशंकू" कौल दिलेला नाही.उत्तर प्रदेश मध्ये चौरंगी लढतीमध्ये सपा मिळालेला अनेपेक्षित आणि स्पष्ट कौल अलीकडची मतदारांची मानसिकता दर्शवतो. निवडणूक पूर्व आणि नंतरचे अंदाज तेथेही चुकले. संपला निसटते बहुमत मिळेल असा अंदाज होता आणि कोन्ग्रेस व भाजप ह्याना बर्यापैकी यश मिळेल असा अंदाज होता पण ३/४ क्रमांकाच्या पक्षाची वाताहत झाली.
३.तिसऱ्या स्थानाची मते आणि जागा यांचे वर्तमान काढणे तुलनेने कठीण आहे. ज्यांना स्टतिस्टिक ह्या विषयाची ओळख आहे त्यांना ही हे जाणवेल .
४. अनपेक्षित पणे आआप दुसऱ्या स्थानावर (आणि कोन्ग्रेस स्लिपरी स्लोप मुळॅ तिसऱ्या स्थानावर ?? ) दिसेल का ? अगदीच अशक्य नाही.
५.दिल्ली मध्ये जर जनतेने कोन्ग्रेस ला तिसऱ्या जागी फेकले तर भाजप लोकसभेत २५० आणि एन डी ए २७२ जागा मिळवेल
2 Nov 2013 - 12:41 pm | विजुभाऊ
तर्री भौ तो शब्द " साशंक " असा आहे हो. शशांक म्हणजे चंद्र.
असो.
कोणत्याही मध्यावधी निवडणूकीत बहुतेकदा विरोधी पक्षाचीच सरशी होते.
2 Nov 2013 - 1:24 pm | तर्री
संपादित करायचे राहून गेले - बऱ्याच चुका आहेत - क्षमा असावी विजुभाऊ !
3 Nov 2013 - 12:19 am | क्लिंटन
इथे मध्यावधी निवडणुक नक्की कुठे होत आहे? या पाचही राज्यांमध्ये पाच वर्षे झाल्यानंतरच निवडणुक होत आहे.
2 Nov 2013 - 12:46 pm | उद्दाम
आज पेप्रात बातमी आहे. मोदी लताबै ना भेटले. फार बरं वाटलं.
:)
भाजपेयी लताबैना भेटले, तर बै बोलल्या होत्या, मी यांची मुलगी.
आणि ते निवडणुकीत पडले.
आता मोदी लताबैना भेटले. त्या बोलल्या हे माझे भाऊ.
आता भाऊंना कधी धक्का मिळणार ? :)
2 Nov 2013 - 10:27 pm | मन१
.
3 Nov 2013 - 3:51 am | विजुभाऊ
भाजप आणि अविवाहीत यांचा बराच जवळचा संबन्ध आहे.
अडवाणी जर अविवाहीत असते तर ते बहुतेक पम्तप्रधान झाले असते.
4 Dec 2013 - 8:39 pm | राजेंद्र मेहेंदळे
भाजप हे संघपरीवाराचे पिल्लु आहे...आणि बरेचसे आघाडीचे(जुन्या पिढीतले) नेते हे संघात स्वयंसेवक होते.संघकार्यासाठी अविवाहीत राहीले होते
3 Nov 2013 - 10:49 am | रमेश आठवले
आजच times मध्ये वाचले कि कॉंग्रेस निवडणूक आयोगाकडे अर्ज करणार आहे की असे जनमत चाचणीचे सर्वे बंद करावे..याचा अर्थ इतरांना काहीही वाटो कॉंग्रेसचा श्रीगुरुजी यांनी वर दिलेल्या आकड्यावर विश्वास आहे. आणि त्यांना पुढील चाचणीत आपले पितळ आणखी उघडे पडेल असे वाटते आहे ..
एक गोष्ट लक्षात घ्यावयास हवी हे आकडे राजदीप सरदेसाई सारख्या कायम भाजप विरोधी असलेल्या माणसांनी दिले आहेत.
3 Nov 2013 - 3:59 pm | क्लिंटन
याचा अर्थ एकच की मोदींमुळे काँग्रेस पक्षाची भयंकर भंबेरी उडाली आहे. इतकी वर्षे जनमत चाचण्यांना फाट्यावर मारणारा काँग्रेस पक्ष आता या चाचण्यांवर बंदी घालायची मागणी करेल याची तर्कसंगती लागत नाही. १९९८ च्या मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपचा विजय होणार असे सगळ्या चाचण्यांनी सांगितले होते पण प्रत्यक्षात जिंकला काँग्रेस पक्ष. २००४ मध्ये काय झाले हे वेगळे लिहायलाच नको. तेव्हापासून जनमत चाचण्यांना काँग्रेस पक्षाने फारसे महत्व दिलेले नव्हते. मग आताच काय बदलले? दुसरे म्हणजे मध्य प्रदेशातील कमळे असलेले तलाव झाकावेत अशी अंमळ वेडसर मागणी काँग्रेस पक्षाने केली. त्याचे कारण काय? तर कमळांचे तलाव बघून मतदार आपोआप भाजपकडे आकर्षित होतील!! प्रत्यक्ष २०१४ मध्ये काय होईल हे सांगता येत नाही पण मोदींमुळे काँग्रेस पक्षाच्या पायाखालची वाळू सरकली आहे हे नक्की.
3 Nov 2013 - 4:25 pm | ध्यानस्थ बगळा
मोदी हा मिडीयाने मोठा केलेला माणूस आहे.
3 Nov 2013 - 8:17 pm | श्रीगुरुजी
पुढील काही महिन्यात काँग्रेस मोदींना कोणत्यातरी खटल्यात गुंतवायचा आटोकाट प्रयत्न करेल अशी चिन्हे आहेत. फॅसिस्ट प्रवृत्तीचा हा पक्ष निवडणुका जिंकण्यासाठी, सत्ता टिकविण्यासाठी व विरोधकांना नेस्तनाबूत करण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो हे गेली ६६ वर्षे भारतीय जनता अनुभवत आहे. आणिबाणी, न्यायालयाचे निकाल फिरविणे, आपल्या विरूद्ध पक्षात असणार्या शत्रुघ्न सिन्हा, किशोरकुमार इ. कलाकारांची मुस्कटदाबी करणे, पैसे देऊन लोकसभेत खासदारांची मते विकत घेणे (१९९३ आणि २००८) असे अनेक कुमार्ग या पक्षाने यापूर्वी यशस्वीरित्या हाताळले आहेत. जानेवारी १९९६ मध्ये ऐन निवडणुकीच्या तोंडावर कोणतेही पुरावे असताना नरसिंहरावांनी विरोधी पक्षातील अडवाणी, शरद यादव इ. बरोबर स्वपक्षातील माधवराव शिंदे, कमलनाथ इ. विरोधकांना खोट्या खटल्यात गुंतवून त्यांच्या निवडणुकीत अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. आता मोदींच्या बाबतीत तसेच होण्याची शक्यता आहे.
21 Nov 2013 - 12:55 pm | मालोजीराव
म्हणून हा पक्ष इतकी वर्षे सत्तेत आहे आणि इथून पुढेही राहणार
3 Nov 2013 - 9:44 pm | विनोद१८
विनोद१८
4 Nov 2013 - 12:17 pm | श्रीगुरुजी
>>> असा एक हल्ला श्री. अटलबिहारी वाजपेयीन्वर एका प्रचारसभेत अहमदाबाद्जवळ साधारणपणे २५ वर्षापूर्वी झाला होता, श्रीमती इन्दिरा गान्धीचा काळ होता तो.
गुजरातेत मेहसाणा येथे वाजपेयींवर काँग्रेस कार्यकर्त्यांनी हल्ला करून त्यात त्यांना जखमी केले होते. हा हल्ला इंदिरा गांधींच्या हत्येनंतर लगेचच म्हणजे नोव्हेंबर १९८४ मध्ये झाला होता.
4 Nov 2013 - 12:38 pm | श्रीगुरुजी
भाजपला तामिळनाडू (३९ खासदार), केरळ (२०), प. बंगाल (४२), जम्मू-काश्मिर (६), ओरिसा (२१) आणि आंध्रप्रदेश (४२) या ६ राज्यातील व आसाम वगळता ईशान्येतील राज्यांतील ८ जागा मिळून एकूण १७८ जागांपैकी फारतर ३-४ जागा मिळतील (आंध्रप्रदेशात १-२, ओरिसात ०-१ व ईशान्येकडील राज्यात एखादी जागा). त्यामुळे उर्वरीत ३६५ जागांपैकी किमान २७० जागा (म्हणजे अंदाजे ७५ टक्के जागा) भाजप व मित्रपक्षांना मिळवाव्या लागतील. भाजपला तामिळनाडू, प.बंगाल व केरळ राज्यात ५-६ टक्के मते मिळतात, पण एकही खासदार स्वबळावर निवडून येत नाही. आंध्रप्रदेश व ओरिसात भाजपला १० टक्क्यांहून अधिक मते मिळतात. तिथे कदाचित १-२ खासदार निवडून येऊ शकतील.
सद्यपरिस्थितीत उर्वरीत भारतात भाजपला कर्नाटकात ४-६, महाराष्ट्रात १२-१४, गुजरातेत २०-२१, गोव्यात १, छत्तीसगडमध्ये ७-८, म.प्र. मध्ये १८-२०, राजस्थानमध्ये २०-२१, पंजाबमध्ये १-२, दिल्लीत ३-४, हरयानात २-३, हि.प्र.मध्ये ३, उत्तराखंडमध्ये ४, उ.प्र.मध्ये २५-३०, बिहारमध्ये १५-२०, झारखंडमध्ये ६-७ व आसाममध्ये २-३ जागा मिळू शकतील. एकंदरीत भाजपला सध्या १५०-१७५ च्या आसपास जागा मिळण्याची शक्यता आहे. शिवसेना १२-१३ व अकाली दल ६-७ जागा मिळवू शकेल. एकंदरीत एनडीए १८० च्या आसपास जाईल. अगदी सर्वोत्तम कामगिरी केली तर भाजप १७५ व एनडीए १९५ पर्यंत जाईल.
त्यामुळे बहुमतासाठी किमान ८० जागा कमी पडतील. काँग्रेसप्रणीत युपीए १५० च्या आतच राहील व इतरांना २०० च्या आसपास जागा मिळतील. बहुमतासाठी भाजपला नवीन मित्र शोधणे आवश्यक आहे. अद्रमुक, तेलगू देसम व येडीयुरप्पा बरोबर आले तर भाजपच्या किमान ५-६ जागा वाढतील व एनडीएच्या किमान ५० जागा वाढतील. तरीसुद्धा २०-२५ जागा कमी पडतील.
एकंदरीत काँग्रेसच्या बाह्य समर्थनाने तिसर्या आघाडीचे सरकार येण्याची शक्यता आहे. काँग्रेस कदाचित दलित कार्ड खेळून मीराकुमार किंवा सुशीलकुमार शिंदेंचे नाव पुढे आणून इतर पक्षांच्या सहाय्याने सरकार स्थापन करायचा प्रयत्न करेल. मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपचे सरकार स्थापन होण्याची शक्यता धूसर आहे. भाजप कदाचित अडवाणी किंवा सुषमा स्वराजांचे नाव पुढे आणून अजून काही पक्षांचा पाठिंबा मिळवायचा प्रयत्न करेल.
पण कोणतेही सरकार स्थापन झाले तरी ते २ वर्षांहून अधिक काळ टिकणार नाही व २०१५ किंवा २०१६ मध्ये मध्यावधी निवडणूक होईल.
4 Nov 2013 - 12:55 pm | प्यारे१
+११११
कालच हया विषयावर (नेहमीप्रमाणं) चर्चा सुरु होती.
इन मिन तीन राज्यांत भाजप सरकार आहे.
सोशल नेटवर्कींग साईटवर मोदी 'आले नि न पाहताच झाले'च्या थाटात चर्चा सुरु आहे.
बाकी काँग्रेस अत्यंत धूर्तपणं निवडणुका जिंकतं, किमान 'हरत नाही' हा पूर्वानुभव आहे.
मीराकुमार ची शक्यता जास्त आहे. सुशिलकुमार ना इतर उत्तरभारतीय पसंती देणार नाहीत.
15 Nov 2013 - 11:19 pm | arunjoshi123
या १७८ जागांपैकी १०० जागा भाजपला मिळतील. मोदींची हवा अशीच कायम राहीली पाहिजे.
4 Nov 2013 - 6:29 pm | रमेश आठवले
जयललिता यांचे सध्याचे धोरण द्र . मु. क. ला विरोध एवढेच आहे. त्यामुळे स्वत:ला पी म बनता येणार नाही याची खात्री झाली तर त्यांच्या गटाची मते भाजप च्या बाजून होतील..
महाराष्ट्रात ४८ पैकी शिवसेनेबरोबर २४ पेक्षा जास्त जागा मिळतील.
देशाच्या घटने प्रमाणे स्थिर सरकार होऊ शकले नाही तर पुन्हा निवडणुका घ्याव्या लागतील. हे कोणालाच रुचणार नाही. त्यामुळे -जिकडे सरशी तिकडे पारशी - हे धोरण असलेलेले तृणमूल आणि बिजू जनता दल, अग अग म्हशी मला कुठे नेशी असा कांगावा करीत भा ज पा च्या कडे येतील.
4 Nov 2013 - 8:12 pm | श्रीगुरुजी
>>> त्यामुळे -जिकडे सरशी तिकडे पारशी - हे धोरण असलेलेले तृणमूल आणि बिजू जनता दल, अग अग म्हशी मला कुठे नेशी असा कांगावा करीत भा ज पा च्या कडे येतील.
नवीन पटनाईक व तृणमूल काँग्रेसने कोणत्याही इतर पक्षांच्या कुबड्या न घेता स्वबळावर बहुमत मिळविलेले आहे. त्यांना इतर पक्षांची गरज नाही. उलट भाजप व काँग्रेसला त्यांची गरज आहे. नवीन पटनाईकांना व ममता बॅनर्जींना राष्ट्रीय महत्त्वाकांक्षा नाही. त्यामुळे ते आपले राज्य सोडून केंद्रात येण्याची शक्यता कमी आहे. आपल्या पक्षाचे राज्य असताना औटघटकेच्या पंतप्रधान पदाच्या मोहामुळे आपण दिल्लीत गेलो तर काही महिन्यातच पंतप्रधानपद जाईल आणि राज्यात आपल्यामागे मुख्यमंत्रीपदावर बसलेला प्रतिस्पर्धी आपल्याला निर्माण होईल या भीतिने देखील ते केंद्रात जायच्या मोहात पडणार नाहीत. त्याऐवजी किंगमेकरच्या भूमिकेत राहणे त्यांना आवडेल.
याऊलट जयललिता, पवार व नितीशकुमार यांना पंतप्रधानपदाची महत्त्वाकांक्षा आहे. पंतप्रधानपदाच्या खूर्चीवर १ सेकंद बसायला मिळणार असेल तरी ते हातातली उरलेली सर्व पदे सोडून धावत येतील. उद्या पंतप्रधानपद गेले तरी जयललिता नि:संकोच परत तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदावर बसेल. पवारांना तर गमावण्यासारखे काहीच नाही व महाराष्ट्रात मिळविण्यासारखे काहीच नाही, त्यामुळेच ते गेली अनेक वर्षे गुडघ्याला बाशिंग बांधून ताटकळत उभे आहेत. नितीशकुमार औटघटकेच्या पंतप्रधानपदावर खुष असेल आणि नंतर देवेगौडा सारखा कालबाह्य होईल.
4 Nov 2013 - 9:49 pm | रमेश आठवले
नवीन आणि ममता, बाजपेयी यांच्याबरोबर बरोबर राहिले होते त्यानंतर ममता या कॉंग्रेस सरकारात घटक झाल्या होत्या..आपण म्हणता त्याप्रमाणे ते दोघे एकच राज्यात प्रभावी असल्याने पी म पदासाठी प्रयत्न करणार नसावेत .
नितीश कुमार यांनी अवेळी 'हात' दाखवून अवलक्षण करून घेतले आहे . लालूजी जेल मध्ये आहेत. भा ज पा ने धूर्तपणाने विधान सभेत विरोधी पक्षाचे नेतेपदी सुशील कुमार मोदी यांच्या ऐवजी कोणी यादव याना नेमले आहे. या वरून बिहार मधे भा ज प ला ४० पैकी २० पेक्षा जास्त जागा मिळतील असा माझा अंदाज आहे.
त्या शिवाय अपक्ष आहेतच..
5 Nov 2013 - 2:57 am | रमेश आठवले
मला वाटते की ओरिसा मधे बिजू दल आणि भा ज प यांचे संयुक्त सरकार होते.
त्यावेळी क्न्धाल येथील स्वामींचा खून आणि त्या नन्तरच्या उसळलेल्या ख्रिश्चन - हिंदू दंगलीमुळे नवीन ने भा ज पा ची साथ सोडली. हा निर्णय घेताना नवीन यांनी त्यांच्या पक्षाच्या मोह्पात्रा या राज्यसभेच्या सदस्यांचा सल्ला महत्वाचा मानला होता. आता नवीन आणि मोह्पात्रा यांचे बिनसले आहे असे समजले.. स्वामींच्या मारेकऱ्यांना नुकतीच शिक्षा झाली आहे. तरी या वातावरणात बिजू दल आणि भा ज प यांना दिल्लीत हातमिळवणी करणे जड जाणार नाही
4 Nov 2013 - 7:59 pm | चौकटराजा
भाजपाला सर्व प्रतिकूल प्रवाहांची जाणीव आहे. त्यांची एकच आशा त्याना आहे की २०० च्या आसपास ते व त्यांचे आताचे
सहकारी आले तर उरलेले आयाराम त्याना येऊन मिळतील.
बाकी कोण्त्याही कारणाने भाजपाला यश मिळणे शक्य नाही. मोदीनी अगदी क्रांतिकारी मुद्दे आणले तरी ग्रामीण भागातील
लोकाना त्याचे काही सोयरसुतक असणार नाही.
7 Nov 2013 - 3:20 pm | श्रीगुरुजी
एबीपी न्यूज्-दैनिक भास्कर यांच्या मतदान चाचणीनुसार छत्तीसगडमध्ये भाजपला ९० पैकी ६० जागा (४४ टक्के मते) मिळण्याची शक्यता आहे.
http://www.hindustantimes.com/specials/coverage/myindia-myvote/chunk-ht-...
याआधी आयबीएन-लोकमतचा अंदाज देखील बराचसा असाच होता (भाजप ६१-७१ जागा, ४६ टक्के मते).
8 Nov 2013 - 2:21 am | विजुभाऊ
भाजपाला बहुमत मिळेल ही शक्यता कमी आहे. गडकरींची मनीमॅजीक चालली आणि शरदपवार भाजपच्या ताटात जाऊन बसले तर मात्र काही साम्गता येत नाही. पण बहुमत मिळाले तरी काठावरचे मिळेल
भाजप आणि संघ यांची अवस्था असून अडचण नसून खोळंबा अशी झालेली आहे.
8 Nov 2013 - 1:19 pm | श्रीगुरुजी
हा इंडीया-टुडेचा नवीन पोल
http://indiatoday.intoday.in/story/india-today-org-poll-2014-general-ele...
या पोलनुसार खालील परिस्थिती असेल.
१) म.प्र. - भाजप (१४०), काँग्रेस (७८)
२) छत्तीसगड - भाजप (४६), काँग्रेस (४२)
३) दिल्ली - भाजप (३६), काँग्रेस (२२), आआप (८)
४) राजस्थान - भाजप (१२०), काँग्रेस (७६)
झी न्यूज्-सी फोर चे अंदाज
१) म.प्र. - भाजप (१००-११०), काँग्रेस (९९-१०९)
२) छत्तीसगड - भाजप (४१-४६), काँग्रेस (४१-४६)
15 Nov 2013 - 8:49 pm | श्रीगुरुजी
आज वानखेडेवर सामना बघण्यासाठी पप्पू आल्याआल्या लगेचच प्रेक्षकांनी "मोदी", "मोदी" अशा घोषणा सुरू केल्या. त्यानंतर बरेच इन्टरेस्टिंग ट्वीट्स पण आले.
http://indiawires.com/26262/news/national/rahul-gandhi-comes-to-wankhede...
4 Dec 2013 - 8:47 pm | राजेंद्र मेहेंदळे
सोशल नेटवर्कींग साईटस वरचे ट्वीट आणि फिरणारे मेसेजेस हा एक निव्वळ भंपक प्रकार आहे. एखाद्या उमेदवाराची किंवा पक्षाची ईमेज तयार करण्यासाठी अशी कामे करणार्या बर्याच कंपन्या आहेत
15 Nov 2013 - 11:12 pm | arunjoshi123
मोदींच्या लाटेने भाजपला पूर्ण बहुमत मिळेल. जिथे भाजप नाही तिथे त्याला प्रवेश मिळेल. हे कर्नाटकात होताना मी पाहिले आहे. इतके काही अवघड नाही. फक्त निवडणूक येईपर्यंत भाजपकडून काही मोठी चूक व्हायला नको.
15 Nov 2013 - 11:22 pm | चेतनकुलकर्णी_85
सहमत आहे !
सौथ मधील स्थानिक लोकांशी पण बोलताना मोदी बाबत असलेले समर्थन वाढीस लागलेले स्पष्ट दिसते :)
16 Nov 2013 - 9:29 pm | नितिन थत्ते
>>हे कर्नाटकात होताना मी पाहिले आहे
कधी?????
18 Nov 2013 - 12:59 pm | श्रीगुरुजी
http://maharashtratimes.indiatimes.com/nation/Rahul-Rally-a-flop-Show-in...
18 Nov 2013 - 1:15 pm | मारकुटे
मुलायमसिंग पंतप्रधान होऊ शकतात.
21 Nov 2013 - 12:42 pm | श्रीगुरुजी
http://www.newsbullet.in/india/34-more/47958-abp-news-poll-predicts-bjp-...
या नवीन सर्वेक्षणानुसार म.प्र. मध्ये भाजप २३० पैकी १५५ जागा मिळवून पूर्ण बहुमत मिळविण्याची शक्यता आहे.
21 Nov 2013 - 12:55 pm | क्लिंटन
कालच्या टाईम्स ऑफ इंडियामध्ये आले होते की मोदींच्या मध्य प्रदेशातील सभांना फारशी गर्दी झाली नव्हती. पण अशा स्वरूपाची बातमी इतर कुठल्याही वर्तमानपत्रात वाचायला मिळाली नाही.मोदींच्या सभेचा फज्जा झाला तर ती वर्तमानपत्रांसाठी फार मोठी बातमी होईल आणि त्यावर भरपूर चर्वितचर्वण चालेल हे वेगळे सांगायला नकोच.या दुव्यावर मध्य प्रदेशातील सभांचे व्हिडिओ दिले आहेत.ते बघून खरोखरच गर्दी नव्हती का याची खातरजमा करायला मला वेळ मिळालेला नाही.पण त्याचबरोबर ज्योतिरादित्य शिंदे म्हणतात की मध्य प्रदेशात मोदींना बोलावावे लागले याचाच अर्थ भाजपला विजयाची खात्री नाही !! म्हणजेच मोदी भाजपची मते वाढवू शकतात हे एका परिने ज्योतिरादित्यांनी मान्यच केले की नाही? तेव्हा नक्की काय चालू आहे हे समजत नाही.
29 Nov 2013 - 2:15 pm | श्रीगुरुजी
एबीपी न्यूज च्या नवीन सर्वेक्षणानुसार दिल्लीत अशी परिस्थिती असेल.
भाजप - ३२, काँग्रेस - २५, आम आदमी पक्ष - १०, इतर - ३
http://indiatoday.intoday.in/story/hung-house-in-delhi-bjp-largest-party...
इंडिया-टुडे च्या नवीन सर्वेक्षणानुसार दिल्लीत अशी परिस्थिती असेल.
भाजप - ४०, काँग्रेस - १८, आम आदमी पक्ष - १०, इतर - २
एकंदरीत दिल्लीत काँग्रेसचा पराभव नक्की दिसतो, पण बहुमत कोणाला मिळेल हे अजून नक्की नाही.
2 Dec 2013 - 1:14 pm | श्रीगुरुजी
इंडिया न्यूज-सी व्होटर च्या नवीन सर्वेक्षणानुसार दिल्लीत अशी परिस्थिती असेल.
भाजप - २९, काँग्रेस - २७, आम आदमी पक्ष - १०, बसप - २, इतर - २
एकंदरीत दिल्लीत काँग्रेसचा पराभव नक्की दिसतो, पण बहुमत कोणाला मिळेल हे अजून नक्की नाही. वरील आकडे खरे ठरले तर काँग्रेसला जास्त संधी आहे. बसप काँग्रेसलाच पाठिंबा देणार (नाही दिला तर काँग्रेस ब्यूरो ऑफ इन्वेस्टिगेशनचा बडगा आहेच). इतर्/अपक्ष वगैरे काँग्रेसकडेच जातील. आआपचे काही आमदार काँग्रेसच्या गळाला लागतील. नाहीतर केजरीवालांवर काँग्रेस ब्यूरो ऑफ इन्वेस्टिगेशनच्या माध्यमातून दडपण आणून काँग्रेसलाच पाठिंबा द्यायला लावतील.
2 Dec 2013 - 1:15 pm | आशु जोग
असले रीपोर्टस हे देतातच कसे
या न्यूज चॅनेल्सना इन्कम टॅक्सची नोटीस पाठवावी
सी बी आय चा झक्कू मागे लावावा
झालंच तर विनयभंग, बला... च्या दोन चार केसेस टाकणेही सरकारला अवघड नाही
2 Dec 2013 - 2:19 pm | सौंदाळा
राजस्थानमधे तर वसुंधराबाईंना आताच अभिनंदनाचे संदेश यायला लागलेत म्हणे.
१० डिसेंबरला शपथविधी!! यतपत तयारी चालु केलीये भाजपाने.
2 Dec 2013 - 3:50 pm | देव मासा
देशात घडलेल्या अशा कुठ्ल्या घटना आहेत , ज्याचा प्रतिकुल/अनुकूल परिनाम २०१३ मधील निवडणुकान वर होऊ शकतो?
3 Dec 2013 - 12:26 am | बाप्पू
उघडकीस आलेले बरेच नवीन घोटाळे, वाढलेले दहशतवादी हल्ले, वाढलेली महागाई , वाढलेली जातीय तेढ, सरकारने निवडणुकीच्या तोंडावर जाहीर केलेले महत्वपूर्ण निर्णय ( अन्न सुरक्षा विधेयक, कसाब आणि अफजल गुरु ची फाशी ई. ) गोष्टी अनुकूल किंवा प्रतिकूल परिणाम करतील असे मला वाटते.
5 Dec 2013 - 1:18 pm | श्रीगुरुजी
>>> देशात घडलेल्या अशा कुठ्ल्या घटना आहेत , ज्याचा प्रतिकुल/अनुकूल परिनाम २०१३ मधील निवडणुकान वर होऊ शकतो?
खालील गोष्टींचा काँग्रेससाठी अनुकूल व भाजपसाठी प्रतिकूल परीणाम होऊ शकतो.
- अत्यंत स्वच्छ प्रतिमा, जागतिक कीर्तिचे अर्थतज्ज्ञ, अत्यंत कणखर, अत्यंत कार्यक्षम पण तरीही मितभाषी व नम्र असलेल्या मनमोहन सिंगांचे धडाडीचे नेतृत्व
- भ्रष्टाचार व दहशतवाद याविरूद्ध त्यांनी घेतलेली अत्यंत कठोर भूमिका व त्याविरूद्ध "झिरो टॉलरन्स" धोरण
- गेल्या ९-१० वर्षात न भूतो न भविष्यति अशी प्रगती करून जागतिक महासत्ता बनलेला भारत देश
- जागतिक नेता म्हणून मनमोहन सिंगांना मिळालेली मान्यता व त्यांचा जगभर पसरलेला दबदबा
- पाकिस्तान, चीन, श्रीलंका, बांगलादेश इ. खोडकर शेजार्यांवर त्यांनी बसविलेली जरब
- सोनियाजींचा त्याग व त्यांची गरीब, दलित, महिला, आदिवासी, अल्पसंख्याक इ. विषयी असलेली तळमळ
- राहुलजींचे सळसळते व स्फूर्तीदायी युवा नेतृत्व
- भाजपचा जातीयवाद
- इतर विरोधी पक्षांचा नाकर्तेपणा
- सर्व जातीधर्मांना बरोबर घेऊन जाणारा, धर्मनिरपेक्ष असलेला, समाजवादी विचारांचा,गरीब, दलित, महिला, अल्पसंख्याक, आदिवासी यांच्या बाजूने लढणारा काँग्रेस पक्ष
- दिग्विजयसिंग सारख्या आधुनिक चाणक्यांचे मार्गदर्शन
हे सर्व मुद्दे बघितले तर २०१४ निवडणुकीत काँग्रेसला एकट्याच्या बळावर दोन तृतीयांश बहुमत मिळेल.
3 Dec 2013 - 8:32 am | ग्रेटथिन्कर
काँग्रेसला पर्याय नाही हेच खरे.
3 Dec 2013 - 4:46 pm | ऋषिकेश
माझे अंदाज ऐसीवर दिले आहेत त्याचे फक्त दुवे देतो:
मध्य प्रदेश
छत्तीसगढ
राजस्थान
याव्यतिरिक्त दिल्लीमध्ये विरोधकांची मते दुभागली जाऊन काँग्रेसला निसटते बहुमत मिळेल असे वाटते.
5 Dec 2013 - 10:41 am | ऋषिकेश
इग्झिट पोल्स सत्याच्या जवळ असतील तर माझे छत्तीसगढ वगळता सगळेच अंदाज साफ चुकले आहेत :(
निव्वळ आकड्यांवरून हे अंदाज बांधायला अधिक विदा हवा अशी खूणगाठ बांधली आहे.
8 Dec 2013 - 12:11 pm | हुप्प्या
काँग्रेसला निसटते बहुमत? ह्ह्पुवा! जनतेच्या सुदैवाने आणि काँग्रेसमिंध्यांच्या दुर्दैवाने काँग्रेसला निसटते बहुमत न मिळता निसटते मत मिळाले.
आप की ख्वाहिश पूरी!
4 Dec 2013 - 7:05 pm | विवेकपटाईत
वोट टाकून आलो. तिन्ही पार्टीनच्या टेबलांवर सारखीच गर्दी दिसत होती. खरी परिस्थिती ८ तारखेलाच कळू शकते.
4 Dec 2013 - 9:05 pm | मंदार कात्रे
4 Dec 2013, 2035 hrs ISTTweet
दिल्लीत भाजपला बहुमत मिळत नसले तरी सर्वात मोठा पक्ष ठरतोय. राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजपच्या हाती सत्तेची चावी येण्याची शक्यता आहे. तर मिझोरममध्ये कॉंग्रेस बहुमताच्या जवळ पोचणार असल्याचा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे.
4 Dec 2013 - 10:57 pm | दुश्यन्त
चारहि राज्यात भाजप सत्तेत येइल असा माझा अन्दाज आहे. रमण सिन्ग (छत्तीसगढ), शिवराज (मप्र) आणि आता हर्षवर्धन (दिल्ली) हे चार चान्गले चेहरे भाजपाने दिले आहेत.गोव्यामधील पर्रिकरपण या यादीमध्ये येतात.
4 Dec 2013 - 11:04 pm | विकास
दुवा: एनडीटिव्ही
5 Dec 2013 - 12:16 pm | दिनेश चिले
कुणीतरी त्यामिझो राम कडेही लक्ष दया हो. ते राज्यही आपल्याच देशात आहे. भले छोटे राज्य का असेना.
बहुतेक तिकडे एक्झिट पोल वाले फिरकले नसणार.
5 Dec 2013 - 1:44 pm | उद्दाम
आता अयोद्येच्या रामालाच वाळीत टाकले आहे. त्या कोपर्यातल्या मिझो रामाला कोण इचारणार?
5 Dec 2013 - 1:57 pm | इष्टुर फाकडा
चांगला जोक आणि तोही तुमच्याकडून ! असो, ते रामाला (अयोध्येच्या) वाळीत टाकले ते चांगले कि वाईट ? वाळीत टाकल्यावर भाजप धर्मनिरपेक्ष झाला का ? भाजपने रामाला वाळीत टाकायला हवे होते कि नाही ?
माझे टंकनश्रम नेहमीप्रमाणे फुकट आहेत पण क्लिंटन च्या पायावर पाय ठेवून लिहित आहे. तुम्ही शेपूट घालून पळणार हे नक्की आहेच !
5 Dec 2013 - 2:08 pm | उद्दाम
ते भाजपावाल्यांना इचारा. रामाला वाळीत त्यानी टाकलं. आम्ही न्हाई.
त्यान्नी आधी राम सोडला.
मग ते कलम ३७० की काय ते सोडलं.
भाजपाच्या सगळ्या गोष्टी आता काँग्रेससारख्याच होणार. मग सरळ भाजपा काँग्रेसातच विलिन का नाही करत? :)
5 Dec 2013 - 3:34 pm | अनिरुद्ध प
काय म्हणता? ही शॉकिंग न्युज आहे(असो निदान काँग्रेससारखे अस्तिवातच नव्हता असे नाही म्हटले हे ही नसे थोडके.)
5 Dec 2013 - 3:40 pm | इष्टुर फाकडा
माणूस आहात का ढोल ? सोडला तरी शिव्या धरला तर कम्युनल ! विचारांमध्ये स्पष्टता आणण्यासाठी वाचन करून अभ्यास वाढवा असे नम्रपणे सुचवतो ;)
6 Dec 2013 - 2:47 am | विकास
ते भाजपावाल्यांना इचारा. रामाला वाळीत त्यानी टाकलं.
किमान आत्तापर्यंतच्या कागदोपत्री तरी आपले विधान चुकीचे आहे असे म्हणावे लागत आहे. २००९ च्या Party Manifesto मध्ये पृष्ठ क्रमांक ३ वर खाली "Defending the Civilisation" मध्ये "The BJP remains committed to the construction of a grand Ram Mandir at Ayodhya." असे लिहीले आहे.
आता २०१४ चा Party Manifesto अजून जाहीर होयचा आहे. त्यात काय म्हणतात ते पाहूयात आणि मग बोलूयात.
5 Dec 2013 - 4:07 pm | ग्रेटथिन्कर
नथुराम श्रीराम मिझो राम ....छ्यॅ.. यांच्या पक्षात राम नाहीच
5 Dec 2013 - 4:22 pm | मृत्युन्जय
खरे आहे. काँग्रेसकडे सीताराम (केसरी) तरी होते.
5 Dec 2013 - 4:31 pm | क्लिंटन
यावरून मिपावरच मागे लिहिलेली एक गोष्ट आठवली. ती परत एकदा लिहितो.
१९९८ च्या लोकसभा निवडणुकांनंतर अटलबिहारी वाजपेयींचे सरकार सत्तेवर आले. मार्च १९९८ च्या शेवटच्या आठवड्यात त्यांच्या सरकारवरील विश्वासदर्शक ठरावावर लोकसभेत चर्चा चालू होती.
रामविलास पासवान: ये भाजपावाले बोलते है की उनके पास राम है. उनके पास राम कहा है? राम तो यहा है जनता दल मै (स्वतःला उद्देशून)
त्यावर शिवसेनेचे ठाण्याचे खासदार प्रकाश परांजपे म्हणाले: अरे ये तो विलासी राम है. सच मे राम हमारे यहा ही है (राम नाईकांकडे बोट दाखवत).
यावर सगळ्या सभागृहात हशा पिकला. स्वतः रामविलास पासवानांनाही हसू आवरणे कठिण गेले.
5 Dec 2013 - 4:43 pm | शिद
चांगला हजरजबाबीपणा दाखवला प्रकाश परांजपे यांनी... बाकी निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता लागली आहे.
5 Dec 2013 - 4:50 pm | विटेकर
अहो कोकणी माणूस अस्तोच हजरजबाबी ! आणि वेळेवर काका-पुतण्याचा सोगा प़कडून हृद्यसम्राटांना अपशकुन केला ती समयसूचकता ही कौतुकास्पदच म्हणायला हवी !
5 Dec 2013 - 11:44 pm | खटपट्या
वाजपेयी एकदा म्हणाले होते की "राम तो हराम मे भी होता है".
6 Dec 2013 - 2:52 am | विकास
९०च्या दशकात, वाजपेयी विरोधीपक्ष नेते असताना, "हम वो बदलेंगे, ये बदलेंगे..." अशा थाटात "बदल" करण्याची भाषा जोरात करत होते. तेंव्हा त्यांना एका काँग्रेसच्या मंत्र्याने/खासदाराने थांबवत (उपहासाने) विचारले, "लेकीन आप तो 'अटल' हो"... वाजपेयींनी मिष्कीलपणे त्यांच्याकडे बघत उत्तर दिले, "हां लेकीन मै बिहारी भी हूं!" दोन्ही बाजूंनी एकदम हशा पिकला!
6 Dec 2013 - 2:25 pm | श्रीगुरुजी
या निवडणुकीच्या निकालानंतर लक्षात येईल की काँग्रेसमध्ये अजिबात 'राम' राहिलेला नाही. निकाल लागल्यावर लगेचच काँग्रेस 'हे राम' म्हणून शेवटचा 'राम' म्हणणार. अर्थात व्यक्ती गेली तरी तिचे विचार मरत नाहीत. तसेच काँग्रेस पक्ष संपला तरी काँग्रेसची "भ्रष्टाचार, लूटमार, गुन्हेगारी, देशद्रोह, जातीयवाद" इ. विचार व तत्वे राष्ट्रवादी, समाजवादी, बसपा इ. इतर पक्षांच्या माध्यमातून जिवंतच राहणार.
6 Dec 2013 - 3:50 pm | ग्रेटथिन्कर
असेच स्वप्न पहात बसा....
5 Dec 2013 - 4:42 pm | विटेकर
:- Hello, Movers n Packers?
:- Haanji , Kaun?
:- Sheila Dixit..
ग्रेट स्टींन्कर .. तुम्ही केला का फोन Movers n Packers ला?
5 Dec 2013 - 10:34 pm | ग्रेटथिन्कर
भारतीय टीनपॉट पार्टीला फोन केला होता..
अनेक वर्ष जनतेने प्रत्येक इलेक्शनमध्ये त्यांना प्यॅक करुन त्यांच्याच घरात मूव्ह केले.. त्यामुळे त्यांनीच हा धंदा सुरु केलाय...
6 Dec 2013 - 12:12 am | विनोद१८
नमो नमः हुच्च विचारवन्त..... ---------^--------- *new_russian* \m/ \M/
आपली सिग्नाचर लाइन अशीच हवी हो :-
आपले मत एक-धर्मनिरपेक्ष, पुरो-पुरोगामी, अती-भ्रष्टाचारशिरोमणी व सर्वात लूटारू पक्षालाच द्या.....!!!!
कसे ????..... *biggrin* :-D :D +D =D :biggrin:
विनोद१८
7 Dec 2013 - 2:38 pm | श्रीगुरुजी
>>> भारतीय टीनपॉट पार्टीला फोन केला होता..
हा काय चावटपणा आहे? तुम्ही कधी काँग्रेसला काँग्रेस म्हणता, कधी भारतीय टीनपॉट पार्टी म्हणता, कधी भारतीय जमालगोटा पार्टी म्हणता तर कधी भारतीय झंगड पार्टी म्हणता. १२८ वर्षे जुन्या असलेल्या अशा वयोवृद्ध पक्षाची अशी हेटाळणी बरी नव्हे. एक काहीतरी म्हणा.
7 Dec 2013 - 2:45 pm | ग्रेटथिन्कर
128 वर्ष जुना पक्ष पोलाद असला पाहीजे ..त्याला टीनपॉट कशाला कोण म्हणेल?..
ज्या पक्षाला फक्त २८च वर्षे झालीत आणि ज्या पक्षात सगळेच अपना हाथ जगन्नाथ पंथाचे आहेत त्यांनाच मी टीनपॉट म्हणालो...
7 Dec 2013 - 10:07 pm | श्रीगुरुजी
>>> ज्या पक्षाला फक्त २८च वर्षे झालीत आणि ज्या पक्षात सगळेच अपना हाथ जगन्नाथ पंथाचे आहेत त्यांनाच मी टीनपॉट म्हणालो...
हे वर्णन फक्त "इंदिरा काँग्रेस" म्हणजेच काँग्रेस (आय) या पक्षालाच लागू पडते. हा पक्ष तुम्ही म्हणता तेवढाच जुना आहे व "हात (दाखवून अवलक्षण)" हे त्यांचे चिन्ह असल्याने त्या पक्षात सगळेच "अपना हाथ जगन्नाथ आणि मतदारांना घाला लाथ" या पंथाचे आहेत. म्हणजे तुम्ही काँग्रेसला टिनपाट असे म्हणता तर. अगदी यथार्थ वर्णन आहे.
5 Dec 2013 - 7:16 pm | श्रीगुरुजी
एबीपी न्यूज च्या सर्वेक्षणानुसार दिल्लीत शीला दीक्षीत केजरीवालांविरूद्ध निवडणूक हरण्याची शक्यता आहे. दीक्षीतांना ३१ टक्के व केजरीवालांना ३६ टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे.
दिल्लीत काँग्रेस हरणार यावर विश्वास ठेवता येईल पण प्रत्यक्ष शीला दीक्षीत पडतील असे वाटत नाही. सुदैवाने तसे झालेच तर त्या राजकारणातून कायमच्या हद्दपार होतील व आआपला बहुमत न मिळतासुद्धा केजरीवाल 'मॅन ऑफ द मॅच' ठरतील.
5 Dec 2013 - 7:32 pm | श्रीगुरुजी
कृपया हा धागा निवडणुकीचे निकाल लागेपर्यंत म्हणजे निदान ९ डिसेंबर २०१३ पर्यंत तरी वाचनमात्र करू नये किंवा नष्ट करू नये ही नम्र विनंती.
धागे बंद पाडणार्या काही नेहमीच्याच यशस्वी कलाकारांनी या धाग्यावर आपल्या नेहमीच्या शैलीत प्रतिसाद द्यायला सुरूवात केली आहे. असे प्रतिसाद देऊन त्यांनी यापूर्वी इतर अनेक धागे यशस्वीरित्या बंद पाडले आहेत. तसेच इथे होऊ नये ही अपेक्षा आहे.
5 Dec 2013 - 10:09 pm | जानु
सद्य स्थितीमध्ये भा. ज. पा. आला तरी त्यावर मोदीचेच वरचष्मा राहणार.
7 Dec 2013 - 10:31 am | सचीन
मोडी प्रधानमंत्री होवो कि शहानवाझ हुसेन वरचष्मा संघाचाच राहणार
7 Dec 2013 - 2:33 pm | श्रीगुरुजी
>>> मोडी प्रधानमंत्री होवो कि शहानवाझ हुसेन वरचष्मा संघाचाच राहणार
राहू देत की. संघासारखी गेली ८८ वर्षे देशाकरता सर्वस्व देणारी संघटना देशहिताचेच मार्गदर्शन करणार. "१०, जनपथ" किंवा जामा मशिदीतून होणार्या मार्गदर्शन वजा आदेशापेक्षा संघासारख्या देशप्रेमी संघटनेचा वरचष्मा देशहिताचा आहे.
7 Dec 2013 - 2:58 pm | ग्रेटथिन्कर
मोदी(फेकू) हे जातीने तेली आहेत, तेली तांबोळी विधीमंडळात जाऊन तागडी तोलणार आहेत काय?, असा जातीयवादी प्रश्न टीळकांनी विचारला होता..हारेसी मानसिकता त्याच पठडीतली आहे..
प्रतिगामी हारेसेस मोदींना वापरुन ओबिसींची मते लाटू पहात आहे,मोदींना चायवाला असे प्रोजेक्ट करुन श्रमकर्यांची मते मिळवण्याचा प्रयत्न आहे ,अंतिमतः सत्ता ही तेल्या तांबोळ्यांपेक्षा साडेतीनटक्क्यांकडेच कशी राहीले हे आरेसेसवाले बघणार ..ओबिसिंनी असल्या जातीयवादी पक्षाला मतदान करु नये...
7 Dec 2013 - 8:42 pm | सचीन
अगदी योग्य बोललात
7 Dec 2013 - 10:55 pm | अर्धवटराव
साडेतीन ट्क्केवाल्यांनी ( यु.पी. तलं प्रमाण १० %) सर्वात जास्त काळ प्रधानमंत्री पद उपभोगुन देखील त्यांचं समाधान होत नाहि...
6 Dec 2013 - 2:51 pm | सुहासदवन
कोणत्याही पक्षाची बाजू न घेता लोकांच्या बाजूने विचार केला की सरळ दिसते.
कॉंग्रेस काय किंवा भाजपा काय कोणत्याही पक्षाचा उमेदवार हा स्वच्छ आणि निर्दोष नसणार ही नामुष्की आपल्यावर आली आहे, कोणताही पक्ष सत्तेत आला तर भ्रष्टाचार हा होणारच. ह्या वृत्तीचा बिमोड इतक्यात तरी होणार नाही.
निवडणुकांत एवढा पैसा लावायचा, तो निवडून आल्यावर कसातरी वसूल करावा लागणारच.
हे चित्र आपल्याला विधानसभांच्या, लोकसभेच्या आणि इतर निवडणुकांमध्ये देखील दिसते.
म्हणून बदलाची गरज आहे.
लागोपाठ तीन वेळा कॉंग्रेस इतर पक्षांबरोबर हात मिळवणी करून सत्तेवर आली.
भारताची प्रगती काय, हे साऱ्यांना स्वच्छ दिसत आहे.
मग जर विचार करा काहीही करून, पुन्हा कॉंग्रेस सत्तेवर आली, तर जो मतदार / नागरिक आज एवढा निराश आहे तो कॉंग्रेसच्या त्या विजयानंतर किती निराश होइल.
त्याचा भारतीय निवडणुकांवर, शासनावर आणि यंत्रणेवर असणारा विश्वास उडणार नाही?
पुन्हा काय म्हणून तो मत द्यायला जाईल?
आणि कॉंग्रेस सारख्या पक्षाचं काय? आज त्यांची मजल जे अनेक वाईट धंदे करण्याकडे आहे ती मजल त्या पुढे किती जाईल त्याची कल्पनाच करवत नाही.
भाजपची सत्ता येवो ना येवो पण निदान कॉंग्रेसला अद्दल घडविण्यासाठी तरी आणि लोकशाहीची तत्वे शाबूत राहण्यासाठी तरी कॉंग्रेसची सत्ता गेली पाहिजे.
6 Dec 2013 - 4:01 pm | इष्टुर फाकडा
लाख बोललात !
6 Dec 2013 - 10:32 pm | श्रीगुरुजी
आयबीएनच्या मतदानोत्तर चाचणीनुसार दिल्लीत अशी परिस्थिती असेल.
भाजप - ३२ ते ४२, आम आदमी पक्ष - १३ ते २१, काँग्रेस - ९ ते १७
काँग्रेस तिसर्या क्रमांकावर असेल.
एकंदरीत बरीच संदिग्ध परिस्थिती दिसत आहे. भाजपला बहुमत मिळेल किंवा सर्वात मोठा पक्ष असेल. दुसर्या क्रमांकावर काँग्रेस किंवा आआप असेल. दिक्षित आज्जी पडण्याची शक्यता आहे. आआपच्या मतदारांना मुख्यमंत्रीपदी केजरीवाल हवे आहेत तर पंतप्रधानपदी मोदी हवे आहेत. पप्पू आणि त्याची मम्मी कोणाच्या खिजगणीतही नाही.
दिल्लीत निवडणुकीनंतर राष्ट्रपती राजवट येणार बहुतेक.
6 Dec 2013 - 10:47 pm | श्रीगुरुजी
काँग्रेससाठी अत्यंत खालावलेली परिस्थिती दिसत आहे. या पार्श्वभूमीवर २०१४ साठी काँग्रेस आपल्या ठेवणीतल्या यशस्वी युक्त्या बाहेर काढणार.
प्रत्येक निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस मतदारांना राखीव जागा, स्मारके, नामांतर, सवलतींचा वर्षाव, कर्जमाफी इ. अफूच्या गोळ्या निवङणुकीच्या तोंडावर मतदारांना चारून मते मिळविली जातात व नंतर पुढील चार साडेचार वर्षे मतदार त्याच धुंदीत असतात.
आता पुढील काही महिन्यात मराठा, गुज्जर, जाट, मुस्लिम इ. साठी राखीव जागांचे गाजर दाखविले जाईल; आंबेडकर, अण्णाभाऊ साठे इ. ची स्मारके; पुणे विद्यापीठाचे नामांतर; आयकरात सवलती; सेवाकरात सवलती; पेट्रोल्/डिझेल/गॅस इ. भावात घट; सरकारी नोकरांना महागाई भत्त्यात वाढ; शेतकर्यांना कर्जमाफी इ. अफूच्या गोळ्या वाटल्या जातील.
आंध्राचे विभाजन करून निदान तेलंगणातील १७ जागा तरी मिळाव्यात याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे आंध्रात दंगलीचा भडका उडून आपल्या पोळ्या भाजण्याची काँग्रेसला आयती शेकोटी मिळणार. पण सर्वात भयंकर कृती म्हणजे हैद्राबादला दोन्ही राज्यांची संयुक्त राजधानी करणे (जे दोन्ही राज्यांना मान्य होणार नाही व एक नवीन धगधगता प्रश्न निर्माण होईल) आणि दोन्ही राज्यांना ३७१ वे कलम लागू करणे ज्यामुळे इतर कोणत्याही राज्यातील लोकांना तिथे स्थायिक होता येणार नाही व तिथे स्थावर मालमत्ता घेता येणार नाही. हे कलम आधीच काश्मिर व हि.प्र., ईशान्येकडील राज्ये यांना लागू आहे व त्याचे दुष्परिणामही दिसलेले आहेत. त्यात आता अजून या २ राज्यांची भर पडणार. हैद्राबादमध्ये जागतिक व भारतातील अनेक आयटी कंपन्यांनी मोठी गुंतवणूक केली आहे. हे कलम लागू झाले तर त्यांना बाहेरून कर्मचारी आणता येणार नाहीत किंवा गाशा गुंडाळून दुसर्या राज्यात जावे लागेल. अंतिमतः या २ राज्यांनाच त्याचा तोटा होईल.
निवडणुका जिंकण्यासाठी काँग्रेस कोणत्याही थराला जाउ शकते, अगदी देशाचे अहित होत असले तरी काँग्रेस त्याची पर्वा करत नाही.
6 Dec 2013 - 10:59 pm | ग्रेटथिन्कर
अण्णाभाऊ साठे,आंबेडकरांचे स्मारक ही अफूची गोळी????
मग सावरकरांच्या स्मारकाला नथुगुग्गुळवटी म्हणावे का?....?...
6 Dec 2013 - 11:01 pm | विकास
अहो ते अफुची गोळी वगैरे दूर राहूंदेत. पण तुम्ही जे इतरांच्या विरोधात लिहीता ते खरे असते का खोटे त्या प्रश्नाचे उत्तर देयचे का टाळत आहात?
7 Dec 2013 - 11:10 am | उद्दाम
:)
6 Dec 2013 - 11:14 pm | अर्धवटराव
तुम्ही म्हणताय तसे उपाय करुन काँग्रेस आपले बुडत्याचे पाय आणखी खोलाकडे नेणार नाहि. त्यापेक्षा काँग्रेसची सारी भिस्त आता भाजप, त्यातल्यात्यात मोदी, काहि मोठी चुक करतील काय यावर असेल. शिवाय, कर्मधर्मसंयोगाने एखादी "त्यागाची" लाट निर्माण करणे शक्य असल्यास काँग्रेस तेही पडताळुन पाहिल. आता काँग्रेसची सर्वात मोठी डोकेदुखी म्हणजे काँग्रेस वगळता इतर सर्व पक्ष, इन्क्लुडींग एन.सी.पी आणि रा.ज.द., काँग्रेसचं जास्तीत जास्त नुकसान करण्याचा प्रयत्न करतील. निवडणुकीपुरतं तरी काँग्रेस वि. नॉनकाँग्रेस असा सामना असेल. दूरदृष्टीने पाहता हे राहुल गांधींच्या पथ्यावर पडेल आणि त्याची जाण सोनीयाजींना निश्चित असेल. राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली अस्थीर कोईलेशन सरकार बनवण्यापेक्षा काँग्रेस समर्थीत तीसरी आघाडी किंवा राहुल गांधीच्या अविरोध नेतृत्वात प्रमुख विरोधीपक्ष अशी भुमीका सोनीया गांधी पत्करतील. त्यांचे पुढील प्रयत्न याच दिशेने असतील.
6 Dec 2013 - 11:22 pm | श्रीगुरुजी
>>> तुम्ही म्हणताय तसे उपाय करुन काँग्रेस आपले बुडत्याचे पाय आणखी खोलाकडे नेणार नाहि. त्यापेक्षा काँग्रेसची सारी भिस्त आता भाजप, त्यातल्यात्यात मोदी, काहि मोठी चुक करतील काय यावर असेल. शिवाय, कर्मधर्मसंयोगाने एखादी "त्यागाची" लाट निर्माण करणे शक्य असल्यास काँग्रेस तेही पडताळुन पाहिल.
बरोबर आहे. अजून एक कृती म्हणजे स्वतःची रेघ मोठी करण्यापेक्षा दुसर्याची रेघ पुसणे. गेल्या अनेक वर्षांपासून मोदींना कोणत्यातरी खटल्यात अडकविण्याचा जोरदार प्रयत्न सुरू आहे. अजून तरी त्यात यश आलेले नाही. श्रीकुमार, संजीव भट्ट, प्रदीप शर्मा अशा तुरूंगात असलेल्या अनेकांना अभय देऊन व त्यांच्याकडून मोदिंविरोधात प्रतिज्ञापत्रे घेऊन मोदींना अडकविण्याचे आजवर असंख्य प्रयत्न झाले. आता काँग्रेस ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन आपल्याकडील गुप्त माहिती कोब्रापोस्ट, गुलैल इ. टॅब्लॉईड संस्थांना लीक करून मोदींची बदनामी करण्याचा जोरदार प्रयत्न करत आहे. पुढील काही महिन्यात हे प्रयत्न वाढतील, बेसावध असलेल्या भाजप नेत्यांविरूद्ध तहलकासारखी स्टिंग ऑपरेशने करून भाजपची रेघ लहान करण्याचा प्रयत्न राहील.
7 Dec 2013 - 1:50 am | विकास
अटलजींच्या भाषणाच्या दोन छोट्या फिती आत्ता जे काही राजकारण होणार आहे त्यावर भाष्य करतात असे वाटले...
7 Dec 2013 - 10:29 am | सचीन
भाजपा निवडणुकीच्या टायमाला राममंदिराचा मुद्दा काढतो ते काय अफूचा गोळा.
निवडणुका जिंकण्यासाठी काँग्रेस कोणत्याही थराला जाउ शकते, अगदी देशाचे अहित होत असले तरी काँग्रेस त्याची पर्वा करत नाही.>>>>>>कॉंग्रेस च्या ऐवजी भाजपा वाचावे काय ?
7 Dec 2013 - 2:35 pm | श्रीगुरुजी
>>> कॉंग्रेस च्या ऐवजी भाजपा वाचावे काय ?
नाही. काँग्रेस ऐवजी "राष्ट्रवादी काँग्रेस", "बसप", "समाजवादी", "कम्युनिस्ट" असे वाचले तरी चालेल.
7 Dec 2013 - 2:41 pm | सचीन
नाही भाजपा त्यात फिट बसतोय
7 Dec 2013 - 10:09 pm | श्रीगुरुजी
>>> नाही भाजपा त्यात फिट बसतोय
ते कसं काय ब्वाँ?
8 Dec 2013 - 7:58 am | विकास
पुढील चर्चा याच धाग्याच्या भाग २ मध्ये चालू करूयात.
8 Dec 2013 - 8:05 am | क्लिंटन
काही आय.डी मिपावरील वातावरण मुद्दामून बिघडविण्यासाठी खोडसाळपणा करत आहेत.अशा तत्वांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करावे असे आवाहन इतर सर्वांना करत आहे.आपल्या आडाणीपणाचा इतरांवर काही परिणाम होत नाही हे लक्षात येऊन तरी असे प्रकार ही मंडळी बंद करतील अशी अपेक्षा.
10 Nov 2017 - 2:45 pm | अनुप ढेरे
इथे ही स्पॅम!
16 Nov 2017 - 2:56 pm | prekhshasharma
Nice blog i must say u had done a tremendous job here thanks for all the efforts you made.Please visit our official website for necessary information we provided-Packers and Movers Kolkata
16 Nov 2017 - 2:57 pm | prekhshasharma
Packers And Movers Kolkata to Mumbai
Packers And Movers Kolkata to Haridwar
Packers And Movers Kolkata to Noida
Packers And Movers Kolkata to Leh
Packers And Movers Kolkata to Guntur
Packers And Movers Kolkata to Muzaffarpur
Packers And Movers Kolkata to Indore
Packers And Movers Kolkata to Surat
16 Nov 2017 - 2:58 pm | prekhshasharma
Packers And Movers Cooch Behar
Packers And Movers Darjeeling
Packers And Movers Midnapore
Packers And Movers Birbhum
Packers And Movers Bankura
Packers And Movers Bardhaman
Packers And Movers Hooghly
Packers And Movers Howrah
Packers And Movers Jalpaiguri
Packers And Movers Malda
Packers And Movers Murshidabad
Packers And Movers Nadia
Packers And Movers North 24 Parganas
Packers And Movers North Dinajpur Uttar
Packers And Movers Purulia
Packers And Movers South 24 Parganas
Packers And Movers South Dinajpur Dakshin
Packers And Movers West Medinipur
Packers And Movers West Midnapore
16 Nov 2017 - 2:58 pm | prekhshasharma
Packers And Movers Kolkata to Bangalore
Packers And Movers Kolkata to Delhi
Packers And Movers Kolkata to ahmedabad
Packers And Movers Kolkata to Gurgaon
Packers And Movers Kolkata to jaipur
Packers And Movers Kolkata to Chennai
Packers And Movers Kolkata to Pune
Packers And Movers Kolkata to Hyderabad
Packers And Movers Kolkata to Bhubaneswar
Packers And Movers Kolkata to Bhopal
Packers And Movers Kolkata to Lucknow
Packers And Movers Kolkata to Chandigarh
Packers And Movers Kolkata to Patna
Packers And Movers Kolkata to Mumbai
16 Nov 2017 - 4:02 pm | श्रीगुरुजी
हे काय चाललंय इथे?
16 Nov 2017 - 4:07 pm | गॅरी ट्रुमन
विटेकरकाकांच्या या प्रतिसादामुळे मुव्हर्स आणि पॅकर्सवाल्या बॉटला या धाग्यात मुव्हर्स आणि पॅकर्सविषयी चर्चा चालू आहे असा गैरसमज झाला असावा म्हणून तो बॉट हे प्रतिसाद द्यायला लागला आहे :)
16 Nov 2017 - 7:33 pm | श्रीगुरुजी
बॉट प्रतिसाद देऊ शकतो. परंतु त्यासाठी आधी सदस्यनाम मिळवावे लागेल. बॉटने सदस्यनाम कसे मिळविले असावे?
बॉटने अजून एका नवीन सदस्यनामाने ४-५ नवीन धागे तयार केले आहेत. संकेतस्थळाची सुरक्षाव्यवस्था वाढविली पाहिजे.