५ राज्यांच्या डिसेंबर २०१३ मधील निवडणुका - भाग २

विकास's picture
विकास in काथ्याकूट
8 Dec 2013 - 7:55 am
गाभा: 

५ राज्यांच्या डिसेंबर २०१३ मधील निवडणुका हा श्रीगुरुजी यांचा धागा दोन पानाहून जास्त झालेला असल्याने निवडणुकांचे काही तासात लागणारे निकाल ट्रॅकींग करणे आणि त्यावर / त्यासंदर्भात चर्चा करणे अवघड जाऊ शकते. म्हणून हा धागा काढत आहे आणि त्या धाग्याऐवजी हा धागा वापरण्याची विनंती करत आहे.

काही मुलभूत माहिती:

२०१३ अंदाज

राज्य
२००८

 
काँग्रेस
भाजप

मध्य प्रदेश
७१
१४३

राजस्थान
९६
७८

दिल्ली
४३
२३

छत्तीसगड
३८
५०

 

प्रतिक्रिया

क्लिंटन's picture

8 Dec 2013 - 8:01 am | क्लिंटन

मतमोजणी सुरू झाली आहे (बरोबर ८ वाजता).पहिले कल अजून १५ मिनिटात येणे अपेक्षित आहे.

क्लिंटन's picture

8 Dec 2013 - 8:11 am | क्लिंटन

पहिला कल मध्य प्रदेशातून. टिकमगढमधून कॉंग्रेस आघाडीवर. २००८ मध्ये कॉंग्रेसने ही जागा ९ हजार मतांनी जिंकली होती.

क्लिंटन's picture

8 Dec 2013 - 8:38 am | क्लिंटन

मध्य प्रदेश: भाजप-११, कॉंग्रेस-८
राजस्थान: भाजप-२, कॉंग्रेस-३
छत्तिसगड: भाजप-६, कॉंग्रेस-५
दिल्ली: आआपा: १

अजून पोस्टाने आलेल्या मतांची मोजणी चालू आहे आणि मशीनमधील मतांची मोजणी सगळीकडे सुरू झालेली नाही.

विकास's picture

8 Dec 2013 - 8:51 am | विकास

शीला दिक्षित पुढे आहेत. याचा अर्थ केजरीवाल मागे आहेत का त्या दोन ठिकाणाहून उभ्या राहील्या आहेत? तसेच पोस्टातून आलेली मते हा प्रकार कायम असतो का? आधी कधी ऐकल्याचे आठवत नाही...

क्लिंटन's picture

8 Dec 2013 - 8:59 am | क्लिंटन

शीला दिक्षित नवी दिल्लीमधून पुढे आहेत. केजरीवाल आणि भाजपचे विजेंद्र गुप्ता मागे आहेत.

पोस्टाने पाठवलेली मते नेहमी असतात. लष्करात नोकरी करणार्‍या मतदारांसाठी पोस्टाने मते पाठवता येतात. इतर कोणी अशी मते पोस्टाने पाठवू शकतो की नाही माहित नाही. अर्थातच अशी मते फार नसतात.आणि ही मते मतपत्रिकेच्या स्वरूपात असल्याने ती मते मोजायला वेळ लागतो.

चिगो's picture

8 Dec 2013 - 11:57 am | चिगो

पोस्टाने पाठवलेली मते नेहमी असतात. लष्करात नोकरी करणार्‍या मतदारांसाठी पोस्टाने मते पाठवता येतात. इतर कोणी अशी मते पोस्टाने पाठवू शकतो की नाही माहित नाही. अर्थातच अशी मते फार नसतात.

सध्या परिस्थिती थोडी वेगळी आहे. आता निर्वाचन प्रक्रियेत सहभाग असलेल्या सगळ्या लोकांना म्हणजे Presiding Officers, Polling officers (Polling Party), Drivers, Handymen अश्या सगळ्यांनापण पोस्टल बॅलट द्यावं लागतं.. अटीतटीच्या लढतीत ही मतं आता फार महत्त्वाची ठरु शकतात.. आमच्याइथे एक निकाल पोस्टल बॅलेटच्या मोजणीनंतर पलटला होता..

क्लिंटन's picture

8 Dec 2013 - 12:00 pm | क्लिंटन

माहितीबद्दल धन्यवाद.

क्लिंटन's picture

8 Dec 2013 - 9:02 am | क्लिंटन

मध्य प्रदेश: भाजप-२१, कॉंग्रेस-१०
राजस्थान: भाजप-३१, कॉंग्रेस-७
छत्तिसगड: भाजप-९, कॉंग्रेस-९
दिल्ली: भाजप:१०, कॉंग्रेस:५ आआप: ५, बसप आणि इतर: ५

छत्तिसगड आणि दिल्ली इंटरेस्टींग वाटत आहेत. छत्तिसगडमध्ये राज्याच्या दक्षिण भागात भाजप मागच्या वेळेपेक्षा पिछाडीवर आहे.भाजपसाठी ही वाईट बातमी आहे.

विकास's picture

8 Dec 2013 - 9:05 am | विकास

शीला दिक्षित पुढे आहेत ते... म.टा. / टाईम्स नाऊ मधे आलेल्या फोटो प्रमाणे त्यांच्या घरी त्यांच्या कार्यकर्त्यांकडून त्या जिंकून याव्यात म्हणून होम-हवन चालू आहे.

Sheela Dikshit Home

बरं झालं त्या महाराष्ट्रात नाहीत नाहीतर अंधश्रद्धा निर्मूलन वटहुकूमाखाली उगाच कारवाई झाली असती! ;)

क्लिंटन's picture

8 Dec 2013 - 9:06 am | क्लिंटन

छत्तिसगडमध्ये २००३ आणि २००८ मध्येही अशीच चुरस होती.या राज्यातील निकाल केरळप्रमाणे थोड्या फरकाने ठरविले जातात.दोन्ही वेळा कधी भाजप पुढे होता तर कधी कॉंग्रेस. शेवटी भाजपने दोन्ही वेळा विजय मिळवला. यावेळी बघू काय होते ते.

विकास's picture

8 Dec 2013 - 9:19 am | विकास

दिल्ली - एनडीटिव्ही ९:१८ एएमः आम आदमी १७ आणी भाजपा २० ने पुढे आहेत तर काँग्रेस ८ ने (गेल्या वेळपेक्षा २३ ने मागे)

छत्तीसगढ मधे काँग्रेस पुढे आहे काँग्रेस १६ भाजपा १५ (गेल्या वेळ पेक्षा ४ ने मागे)

क्लिंटन's picture

8 Dec 2013 - 9:22 am | क्लिंटन

मध्य प्रदेश: भाजप-५८, कॉंग्रेस-२१, इतर:३
राजस्थान: भाजप-७२, कॉंग्रेस-२१, इतर:५
छत्तिसगड: भाजप-१६, कॉंग्रेस-१८, इतर:१
दिल्ली: भाजप:२२, कॉंग्रेस:८ आआप: १८, बसप आणि इतर: ३

मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये भाजपला landslide विजय मिळणार असे दिसते. कालच फेसबुकवर माझे स्टेटस होते:

In 1998, no exit/opinion poll gave more than 120 seats to Congress and fewer than 70 seats to BJP in Rajasthan. What was the result? Congress won 153 and BJP won 33!! Similarly no exit/opinion poll gave more than 120 seats to Congress and fewer than 170 seats to BJP in MP (including Chhattisgarh back then). What was the result? Congress won 172 and BJP won 118!!. Exit/opinion polls had failed to judge the level of anger against Vajpayee government at the center, which was grappling with onion crisis and continuous threats by Jayalalitha's AIADMK.

In the state assembly elections of December 2013, IMO exit/opinion polls seem to have failed to gauge the level of anger against Manmohan Singh's UPA government at the center. I would not be surprised if BJP actually wins 160 seats in MP and 140 seats in Rajasthan. Let's wait till tomorrow to see if this actually comes true or not.

तेव्हा I am feeling vindicated :)

पैसा's picture

8 Dec 2013 - 9:23 am | पैसा

आत्ता केजरीवाल म्हणत आहेत की कोणालाच पाठिंबा देणार नाही पण मला वाटतं की आताचा कल पाहता (२१-१८-८)काँग्रेस ३ नंबरला राहील आणि शेवट कोणत्याच पक्षाच्या बाजूने स्पष्ट निकाल नसल्यामुळे केजरीवालंना सरकार बनवायला बाहेरून मदत करील.

विकास's picture

8 Dec 2013 - 9:25 am | विकास

तात्विकदृष्ट्या जर केजरीवाल कुणाला पाठींबा देत नसतील तर त्यांनी कुणाचा पाठींबा घेऊ देखील नये.

पण जर अशी वेळ आली तर अजून एक व्हेरीएबल असेलः ते स्वतः हरणार आहेत असे दिसते त्यामुळे त्यांचे स्वतःचे वजन किती राहू शकेल हे पहावे लागेल.

क्लिंटन's picture

8 Dec 2013 - 9:29 am | क्लिंटन

छत्तिसगडमध्ये काँग्रेस आता बर्‍यापैकी पुढे आहे. काँग्रेसला २८ आणि भाजपला १७.

प्रचेतस's picture

8 Dec 2013 - 9:31 am | प्रचेतस

नक्षलवाद्यांनी केलेल्या कॉन्ग्रेसी नेत्यांच्या हत्येमुळे मिळालेल्या सहानुभूतीचा परीणाम असू शकतो काय?

विकास's picture

8 Dec 2013 - 9:33 am | विकास

असे आत्ता एनडीटिव्हीवर म्हणले जात आहे.

जर छत्तिसगढ मधे भाजपा हरले आणि दिल्लीत त्रिशंकू आले तर काँग्रेसचे नेते म्हणू लागले आहेत की मोदी फॅक्टर नाही म्हणून. मोदी फॅक्टर आहे का नाही माहीत नाही, पण राहूल फॅक्टर जबरीच दिसत आहे. ;)

प्रचेतस's picture

8 Dec 2013 - 9:36 am | प्रचेतस

अगदी. :)

बाकी नवी दिल्लीचे सध्याचे स्टॅटस काय? शीलाबेन पुढे आहेत का केजरीवाल अण्णा?

क्लिंटन's picture

8 Dec 2013 - 9:34 am | क्लिंटन

तसे नक्कीच वाटत आहे. अर्थात महेंद्र कर्मा आणि इतर नेते असते तर काँग्रेसने किती जागा जिंकल्या असत्या हे सांगता येणे शक्य नाही पण राज्याच्या दक्षिण भागात काही प्रमाणात काँग्रेसला नक्कीच फायदा झाला असावा असे वाटते.

वेगवेगळ्या चॅनेलवर वेगळे आकडे येत आहेत.

क्लिंटन's picture

8 Dec 2013 - 9:52 am | क्लिंटन

मी एन.डी.टी.व्ही बघत आहे. गेल्या अनेक निवडणुकांचा अनुभव आहे की एन.डी.टी.व्ही वर सगळ्यात लेटेस्ट आकडे असतात.

विकास's picture

8 Dec 2013 - 9:55 am | विकास

सहमत.

विकास's picture

8 Dec 2013 - 9:30 am | विकास

छत्तिसगढ काँग्रेसच्या पारड्यात जाऊ शकते अशी चिन्हे दिसत आहेत.

क्लिंटन's picture

8 Dec 2013 - 9:36 am | क्लिंटन

अभिषेक मनू सिंघवी म्हणतातः नरेंद्र मोदींचा काहीच परिणाम दिसत नाही. अगदी हीच गोष्ट कोणाकडून तरी ऐकायची वाट मी बघत होतो. आता ते मिपावर कोण म्हणतो तेच बघायचे. :)

पैसा's picture

8 Dec 2013 - 9:39 am | पैसा

राऊलबाबाला पाठवू नका असं काँग्रेसचेच लोक म्हणतात म्हणे! :D P

मंदार कात्रे's picture

8 Dec 2013 - 9:37 am | मंदार कात्रे

Delhi-
BJP-26
INC-09
AAp-21

क्लिंटन's picture

8 Dec 2013 - 9:39 am | क्लिंटन

मध्य प्रदेश: भाजप-८१, कॉंग्रेस-३२, इतर:४
राजस्थान: भाजप-९६, कॉंग्रेस-२७, इतर:९
छत्तिसगड: कॉंग्रेस-३३, भाजप:२५
दिल्ली: भाजप:२८, आआप: २०, कॉंग्रेस:१२, बसप आणि इतर: २

मंदार कात्रे's picture

8 Dec 2013 - 9:39 am | मंदार कात्रे

भाजप-१५
कोन्ग्रेस-२०

क्लिंटन's picture

8 Dec 2013 - 9:46 am | क्लिंटन

छत्तिसगडमध्ये आता काँग्रेस ३४ आणि भाजप ३१. तेव्हा छत्तिसगडमध्ये जोरदार चुरस चालू आहे.हे बघता अगदी २००३ ची आठवण येत आहे.

विकास's picture

8 Dec 2013 - 9:56 am | विकास

दिल्लीत भाजपा ३३ आप २३ काँग्रेस ९

क्लिंटन's picture

8 Dec 2013 - 9:55 am | क्लिंटन

मध्य प्रदेश: भाजप-९९, कॉंग्रेस-४५, इतर:६
राजस्थान: भाजप-११९, कॉंग्रेस-२९, इतर:१८
छत्तिसगड: कॉंग्रेस-३७, भाजप:३३
दिल्ली: भाजप:३३, आआप: २४, कॉंग्रेस:९, बसप आणि इतर: २

विकास's picture

8 Dec 2013 - 9:59 am | विकास

भाजपा ३७ काँग्रेस ३३

अगदी काँटेकी टक्कर चालू आहे म्हणजे.

पैसा's picture

8 Dec 2013 - 10:01 am | पैसा

शीला दीक्षित मागे पडल्या.

क्लिंटन's picture

8 Dec 2013 - 10:02 am | क्लिंटन

हो छत्तिसगडमध्ये शेवटचा निकाल येईपर्यंत कोणतेही अनुमान काढणे घाईचे ठरेल. अजून एक-दोन वेळा राज्यातील कल वरखाली झाले तरी त्यात आश्चर्य वाटायला नको.

दिल्लीमध्ये ६८ पैकी ३४ ठिकाणी भाजप पुढे.

प्रचेतस's picture

8 Dec 2013 - 10:05 am | प्रचेतस

दिल्लीत कॉन्ग्रेसचा पूर्ण सफाया झालेला दिसतोय. 'आप' ने भाजपापेक्षा कान्ग्रेसी मते खाल्लेली दिसत आहेत.

क्लिंटन's picture

8 Dec 2013 - 10:15 am | क्लिंटन

मध्य प्रदेश: भाजप-१२५, कॉंग्रेस-५६, इतर:१०
राजस्थान: भाजप-१३१, कॉंग्रेस-२६, इतर:२०
छत्तिसगड: कॉंग्रेस-३९, भाजप:३४
दिल्ली: भाजप:३२, आआप: २४, कॉंग्रेस:१२, इतर: १

विटेकर's picture

8 Dec 2013 - 10:18 am | विटेकर

ऊप्देत

विकास's picture

8 Dec 2013 - 10:20 am | विकास

दिल्लीमध्ये भाजपा ३१ आम २४ आणि काँग्रेस १४ अपक्ष ३(सकाळचे १०:१९)

जर असेच सगळे फायनल निकाल आले तर भाजपाला राज्य करण्यासाठी ३ अपक्षांचा पाठींबा लागेल आणि काँग्रेस/आम ची अलिप्तता.. इंटरेस्टींग!

पिंपातला उंदीर's picture

8 Dec 2013 - 10:41 am | पिंपातला उंदीर

सौ बातो की एक बात. कांग्रेस चा धुव्वा उडाला आहे. देशाच्या या भागात कांग्रेस विरोधी लाट आहे हे स्पष्ट आहे. पण मोदी लाट आहे का याबद्दल माझ्या मनात काही शंका आहेत . मध्य प्रदेश मधल्या विजयाचे श्रेय शिवराज सिंग चौहान याना जाइल . त्यांनी सरकार खूप चांगल्या प्रकारे चालवले. दिल्ली आणि छत्तीसगड मध्ये मोदी factor फारसा चालला नाही हे तर स्पष्टच आहे . राजस्थान मध्ये मात्र मोदी factor चालला असे मानायला भरपूर वाव आहे. या विजयाने भाजप हुरळून जाणार असेल तर ती मोठी चूक ठरेल . २००३ मध्ये भाजप ने विधानसभा निवडणुकात असाच clean स्वीप केला होता मात्र लोकसभा निवडणुकीत त्याना पराभव स्वीकारावा लागला . यावेळेस्चे भाजप नेतृत्व अति आत्मविश्वास मोड मध्ये जाण्याची चूक करणार नाही हि अपेक्षा . बाकी दोन मोठ्या पक्षाना उरावर घेऊन दिल्ली मध्ये घवघवीत यश मिळवणारे अरविंद केजरीवाल आणि सुशासन देऊन आक्रस्ताळा प्रचार न करता सलग ३ री टर्म मिळवणारे शिवराज सिंग चौहान हे पप्पू आणि फेकू पेक्षा या निवडणुकांचे मोठे नायक .

बाकी कॉंग्रेस आणि भाजप हे दोन्ही भ्रष्ट पक्ष हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असे रास्त मत असणार्या अनेक लोकांच्या मनात आप च्या यशाने आशा पालवल्या आहेत .

अर्धवटराव's picture

8 Dec 2013 - 11:21 am | अर्धवटराव

मी तर म्हणेल कि मोदी फॅक्टर कुठेच चालला नाहि... तसा तो चालायचं काहि कारणच नाहि. हि चारही राज्ये त्यांच्या स्वभावानुसारच वागलीत. राजस्थान आलटुन पालटुन सत्ता फिरवत असतो. म.प्र. मधे आरएसेसचा प्रभाव बर्‍यापैकी आहे व चौहान साहेबांनी कामही चांगलं केलं म्हणतात. मग मतदार आपला कौल का बदलतील... छ.गडची केमेस्ट्री फार वेगळी आहे व त्यात गुजराथी मोदी फॅक्टरचा तसाही काहि रोल नाहि... आणि दिल्लीत यंदा काँग्रेसची पिछेहाट अटळ होती... मोदींनी एक धक्का जास्तीचा दिला बस.

या निवडणुकांवर मोदी इफेक्ट काय होता यापेक्षा मोदींवर या निवडणुकीचा काय परिणाम होणार हे महत्वाचं आहे. तसच राहुल गांधींचं देखील... ज्या परिस्थितीत सोनीया गांधींनी काँग्रेसचा ताबा घेतला तशीच कमकुवत काँग्रेस राहुलची वाट बघतेय का कोण जाणे. नॉट गुड फॉर राहुल. काँग्रेस हालाखीच्या परिस्थितीत असताना गांधी फॅमिलीने तारणहार पाठवणं हा फॉर्म्युला कामाचा आहे...पण त्या घराण्याचे दोन मेंबर्स सर्वोच्च पदी असताना जर काँग्रेस हरली तर युवा गांधी नेतृत्वाकरता ते शुभ नाहि.

प्यारे१'s picture

8 Dec 2013 - 1:13 pm | प्यारे१

>>>मी तर म्हणेन कि मोदी फॅक्टर कुठेच चालला नाही... तसा तो चालायचं काहि कारणच नाही.

खरंच आहे. त्यामुळेच लोकसभा निवडणुकीवेळी चित्र फार वेगळं असणार नाही असं वाटतं.

पूर्ण प्रभाव असलेली राज्ये : दिल्ली , राजस्थान , मध्यप्रदेश , पंजाब (शि अ द बरोबर) , गुजरात , उत्तराखंड , हिमाचल प्रदेश , छत्तीसगड, गोवा (६५% जागा)
अंशतः : महाराष्ट्र , कर्नाटक , आंध्र , बिहार, उत्तरप्रदेश, झारखंड, हरयाणा, ओरिसा (२०-२५% जागा)

एवढ्या राज्यांच्या जोरावर भाजपा वैयक्तिक सरकार बनवू शकतो? नाही.
तसं झालं तर पुन्हा एन डी ए कडबोळे: तेलगू देसम, जयललिता, शिवसेना, अजितसिंग, सु स्वामी, नवीन पटनाईक इ.इ.

त्यांच्या सगळ्यांच्या मध्ये सहमती होऊन मोदी पंतप्रधान बनणं हे चेपुवरच्या स्टेटस अपडेटएवढं सोपं नक्कीच नाही.

सहमत. मोदी फॅक्टरपेक्षाहि लोकांच्या मनात काँग्रेसविषयीचा संताप आणि त्याहीपेक्षा पुन्हा काँग्रेस सत्तेवर आली तर काय हाल करेल याची भीती याचा परीणाम नक्कीच ह्या निकालावर झाला आहे.

चौकटराजा's picture

9 Dec 2013 - 7:46 am | चौकटराजा

भाजप च्या यशात मोदी फॅक्टर कमी असावा. पण मोदींसारखा वक्ता पक्षाकडे असणे फार गरजेचे आहे. चिदम्बरम, सिब्ब्ल, दिग्विजय ई कडे ते कौशल्य तर नाहीच पण पक्षाला अडचणीत आणण्याचे कसब मात्र आहे. मनमोहन सिंग व सोनिया यानी तर या कलेचे पाठ घ्यावेत अशी स्थिति आहे. लोकांशी प्रेमाने संवाद साधणारा नेता ऐहिक पातळीवर काहीसा अपयशी असला तरी चालतो. मोदींवर दंगलीचा काळा डाग त्यासाठीच सामान्य माणूस विसरायला लागला आहे. आता मोदीनी आपल्या देशाचे नक्की काय चुकतेय याचा उल्ल्लेख वारंवार लोकांसमोर करून त्यावरील उपाय सुचविले तरच त्यांचा फॅक्टर चालेल नुसती इतर पक्षांवर टीका करण्याच्या भारतीय जनतेला उबग आलेला आहे .

क्लिंटन's picture

8 Dec 2013 - 10:50 am | क्लिंटन

मध्य प्रदेश: भाजप-१४५, कॉंग्रेस-५९, इतर:१४
राजस्थान: भाजप-१३३, कॉंग्रेस-३२, इतर:१९
छत्तिसगड: भाजप:४४, कॉंग्रेस: ४४
दिल्ली: भाजप:३४, आआप: २४, कॉंग्रेस:९, इतर: ३

छत्तिसगडमध्ये खूपच चुरस चालू आहे.नक्की काय होणार हे सांगता येणार नाही.मागच्या वेळी अपडेट लिहिल्यापासून दोन वेळा कल पुढे-मागे झाले.

विटेकर's picture

8 Dec 2013 - 11:09 am | विटेकर

प्लीज

विटेकर's picture

8 Dec 2013 - 11:09 am | विटेकर

प्लीज

पैसा's picture

8 Dec 2013 - 11:13 am | पैसा

भाजपा.... काँग्रेस ................. इतर
दिल्ली ३५..... ७ ..... २५ (आआपा).... ३ == ७०/७०
मप्र १५१ .... ६२ .... == २२९/२३०
राज १३८ .... ३२ .... == १८९/१९९
छत्तीसगड ४५ .... ४५ .... == ९०/९०

क्लिंटन's picture

8 Dec 2013 - 11:17 am | क्लिंटन

मध्य प्रदेश: भाजप-१५०, कॉंग्रेस-६२, इतर:१७
राजस्थान: भाजप-१३७, कॉंग्रेस-३१, इतर:२२
छत्तिसगड: भाजप:४५, कॉंग्रेस: ४५
दिल्ली: भाजप:३५, आआप: २५, कॉंग्रेस:७, इतर: ३

छत्तिसगडमध्ये फोटोफिनीश होणार बहुतेक.

प्रचेतस's picture

8 Dec 2013 - 11:21 am | प्रचेतस

छत्तीसगड मध्ये ४५-४५ अशी स्थिती असेल आणि आमदारांची फोडाफोडी झाली नाही तर राज्यपाल कोणाला सत्तास्थापनेसाठी आमंत्रण देऊ शकतील?
दोन्ही पक्ष समान आणि एकही अपक्ष अथवा इतर नाही. मजेशीर स्थिती आहे ब्वॉ.

अर्धवटराव's picture

8 Dec 2013 - 11:26 am | अर्धवटराव

क्लोज मार्जीनने जींकणारे २-४ कॉग्रेस आमदार राजीनामा देतील व भाजपतर्फे निवडुन येतील.

क्लिंटन's picture

8 Dec 2013 - 11:28 am | क्लिंटन

काही प्रमाणात अशी परिस्थिती १९८९ मध्ये गोव्यात आली होती. ४० पैकी कॉंग्रेसला १९, म.गो.पक्षाला १९ आणि २ जागा अपक्षांना होत्या.एका अपक्षाचा पाठिंबा कॉंग्रेसला तर दुसऱ्याचा पाठिंबा म.गो.पक्षाला होता.त्यामुळे पेचप्रसंग निर्माण झाला होता.त्यानंतर महिनाभर राष्ट्रपती राजवट होती.दोन्ही अपक्षांनी आमदारकीचे राजीनामे दिले आणि तिथे पोटनिवडणुक होऊन दोन्ही ठिकाणी कॉंग्रेसचे उमेदवार निवडून आले.त्यानंतर जानेवारी १९९० मध्ये कॉंग्रेसचे प्रतापसिंह राणे मुख्यमंत्री झाले.

छत्तिसगडमध्ये अजूनही काहीही होऊ शकते.तरी जर ४५-४५ अशी परिस्थिती आली तर भाजपला राज्यपालांनी सरकार बनवायला पाचारण करू नये असे माझे वैयक्तिक मत आहे.याचे कारण बहुमत (अर्ध्यापेक्षा एक जास्त) मिळविण्यात अपयश येणे हा सध्याच्या मुख्यमंत्र्यांचा पराभव मानला जावा.त्यातही त्रिशंकू विधानसभा असेल आणि इतरांचा पाठिंबा घेऊन सध्याचे मुख्यमंत्री परत सरकार स्थापन करू शकत असतील तर ती गोष्ट वेगळी आहे.पण ही परिस्थिती तसेही नाही.

प्रचेतस's picture

8 Dec 2013 - 11:35 am | प्रचेतस

माहितीबद्दल धन्यवाद.
एकंदरीत छत्तीसगडचा निकाल बघणे रोचक ठरावे.

राजेश घासकडवी's picture

8 Dec 2013 - 11:50 am | राजेश घासकडवी

सध्या सत्ताबदलाची स्थिती अशी आहे -
मध्यप्रदेश - भाजपाला ७ जागा गेल्यावेळपेक्षा जास्त. कॉंग्रेसला ३ जागा कमी. सत्ताबदल - नाही. सत्ताधारी पक्षाची स्थिती थोडी बळकट. (भाजपा +)
राजस्थान - भाजपाला ५५ जागा गेल्यावेळपेक्षा जास्त. कॉंग्रेसला ३४ जागा कमी. सत्ताबदल - हो. सत्ताधारी पक्षाचा धुव्वा. (कॉंग्रेसचा धुव्वा)
छत्तीसगड - भाजपाला ५ जागा गेल्यावेळपेक्षा कमी. कॉंग्रेसला ७ जागा जास्त. सत्ताबदल - ? सत्ताधारी पक्षाची स्थिती थोडी कमकुवत. (भाजपा -)
दिल्ली - भाजपाला १४ जागा गेल्यावेळपेक्षा जास्त. कॉंग्रेसला ३१ जागा कमी. सत्ताबदल - हो. सत्ताधारी पक्षाचा धुव्वा. (कॉंग्रेसचा धुव्वा)

एकंदरीत कॉंग्रेस सत्ताधारी आहे तिथे धुव्वा, सत्ताबदल दिसतो आहे. आणि भाजपा सत्ताधारी आहे तिथे थोडासाच बदल दिसतो आहे.

क्लिंटन's picture

8 Dec 2013 - 12:03 pm | क्लिंटन

मध्य प्रदेश: भाजप-१५२, कॉंग्रेस-६६, इतर:१२
राजस्थान: भाजप-१४०, कॉंग्रेस-३५, इतर:२३
छत्तिसगड: कॉंग्रेस: ४९, भाजप: ३९
दिल्ली: भाजप:३२, आआप: २४, कॉंग्रेस:११, इतर: ३

विटेकर's picture

8 Dec 2013 - 12:26 pm | विटेकर

चछत्तिस ग ड गेल"

ब्याड.न्यूज

क्लिंटन's picture

8 Dec 2013 - 1:07 pm | क्लिंटन

मध्य प्रदेश: भाजप-१५०, कॉंग्रेस-६९, इतर:११
राजस्थान: भाजप-१४३, कॉंग्रेस-३२, इतर:२५
छत्तिसगड: भाजप: ४५, कॉंग्रेस: ४२
दिल्ली: भाजप:३२, आआप: २८, कॉंग्रेस:८, इतर: २

बराच वेळ छत्तिसगडमध्ये कॉंग्रेस पक्ष पुढे होता आता भाजप पुढे दिसत आहे. एकूणच छत्तिसगड सगळ्यात इंटरेस्टींग वाटत आहे.

पैसा's picture

8 Dec 2013 - 1:10 pm | पैसा

छत्तिसगड मधे हे ३ "इतर" कोण आहेत?

क्लिंटन's picture

8 Dec 2013 - 1:11 pm | क्लिंटन

इतर बहुदा बसपा/अपक्ष असावेत.

सुहास..'s picture

8 Dec 2013 - 1:13 pm | सुहास..

I Heartly congrats to Mr. Arvind Kejriwal !!

जागृत मतदारांना जागृत केल्याबद्दल !!

मोदी प्रभाव वाटत नाही .ते सभेमध्ये बोलण्यापेक्षा बडबडतात आणि राहूलही तेच करतो .

कॉन्ग्रेसने गरीबांसाठी धडाधड योजना फेकल्या त्याचे काय झाले ?
जुलैमध्ये राजस्थानात महिलांना बस तिकीटांत तीस टक्के सवलत दिली !

आधार ,केशरी काडवाल्यांना दीड लाखांची वैद्य सेवा वगैरे मते फिरवणार का ?

जेपी's picture

8 Dec 2013 - 1:27 pm | जेपी

mp- cong-64
bjp-154

delhi - cong-8
bjp-33
aap-28

chg-cong-41
bjp-48

raj-cong-34
bjp-142

प्यारे१'s picture

8 Dec 2013 - 1:29 pm | प्यारे१

>>>chg-cong-41
>>>bjp-48

हे असंच आहे का?

पैसा's picture

8 Dec 2013 - 1:31 pm | पैसा

एकसारखे कल बदलत आहेत तिथे.

जेपी's picture

8 Dec 2013 - 1:34 pm | जेपी

@प्यारे 1
होय बिजेपी 49
आणी
कॉग्रेस 40 आहे आता
.
छत्तिसगड

प्यारे१'s picture

8 Dec 2013 - 1:38 pm | प्यारे१

येताना बघून आलो तेव्हा बीजेपी का ४-० का सपना टूटा वगैरे जाहीर करुन झालं होतं एबीपी न्यूज वर.

ह्यावेळी नक्कीच एव्हीएम मध्ये घोळ घातला गेलेला आहे. ;)

१९६९ नंतरचा चा कॉग्रेस पक्ष हा शिवसेनेसारखाच व मनसेसारखाच हुकुमशाही घराणे शाही ई ई बिरूदे मिरविणारा पक्ष आहे. पण शिवसेना वा मनसे कुटील पक्ष आहेत हे मी मानायला तयार नाही.

दलित व मुस्लीम समाजांचे ( खरे नाहीच ) तुष्टीकरण व त्या पक्षाचा खरा अजेंडा.पण तो मायवती मुलायम यानी ढापला बेंका, सोसायट्या, साखर कारखाने व आता दूध उत्पादक संघ यांच्या साच्यातून फक्त कर्यकर्त्यांचे उखळ पांढरे करत जायचे ही ती संस्कृति आहे ती पण हळू हळू भाजपाने ढापली आहे. व पंचाईत सुरू झाली. त्यात त्यांचा गड असेलेल्या महाराष्ट्र राज्यात पवारानी पाडलेले खिंडार बंगाल मधे ममतानी पाडलेले खिंडार ई अनेक गोष्टी त्यांच्या विरोधात काम करू लागल्या आहेत. भाजप हा धुतल्या सारखा स्वच्छ नाहीच पण दगडापेक्षा वीट मउ आहे.
आपले काही चुकते आहे हे कोंग्रेस पक्ष कधीच मानायला तयार नसतो कुमार केतकर हे त्यांचे प्रवक्ते (?) हे याचे उत्तम
उदाहरण आहे. निवडणुका आल्या की सरकारी पैसा वाटत सुटायचा हे तंत्र आता चालणार नाही. जो सुशासन देणार नाही त्याला जावेच लागेल. कारण आता जातीच्या राजकारणा पेक्षा कार्यकत्यांच्या राजकारणापेक्षा रोजगाराचे, राज्यकारणाचे
राजकारण येईल. अर्थात हे काही जादूने होणार नाही. कारण अजूनही दलितांचे मुस्लीमांचे मुद्दे काँगी सोडणार नाहीत अन
अनिच्छेने का होईना राममंदिरासारखा भावनिक मुद्दा भाजप उगाळत राहील.

क्लिंटन's picture

8 Dec 2013 - 2:15 pm | क्लिंटन

मध्य प्रदेश: भाजप-१५६, कॉंग्रेस-६४, इतर:१०
राजस्थान: भाजप-१५२, कॉंग्रेस-२९, इतर:१९
छत्तिसगड: भाजप: ४७, कॉंग्रेस: ४३
दिल्ली: भाजप:३२, आआप: २९, कॉंग्रेस:८, इतर: १

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Dec 2013 - 2:25 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

जर आआपा ने कॉंग्रेसला पाठिंबा मागितला तर तो आम्ही देऊ. -शकील अहमद.

अधिकृत निकालाना सुरुवात

-दिलीप बिरुटे

सचिन कुलकर्णी's picture

8 Dec 2013 - 3:11 pm | सचिन कुलकर्णी

अगदी खरे बोललात सर..

आता आआप दिल्लीत काय बनवेगिरी करतात ते पाहु .

विरोध करणे ठीक आहे पण राजकारणात पडल्यावर शब्द गिळावे लागतात .
कसे आणि किती वेळ लावतात आणि किती फाटाफूट करतात यावर पुढील भवितव्य ठरेल.

संसद आणि सभा सोडून 'आजचा सवाल ' इत्यादि कार्यक्रमांत आपला पापड सांभाळून दुसऱ्यांचा मोडण्याचा खेळ नेते खेळू लागले की पक्षावरचा विश्वास उडायला वेळ लागत नाही .

इष्टुर फाकडा's picture

8 Dec 2013 - 2:58 pm | इष्टुर फाकडा

ठ्ठो प्रतिसाद :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Dec 2013 - 3:07 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

भाजपा काँग्रेस आप अन्य.
३४. ०८ २७ ०१

बहुमतासाठी ३६ मतं लागतात आता राजकारणात सत्तेसाठी काय होतं ते पाहणं गमतीचे ठरेल.

२:२७ मिनिटाला शकील अहमद म्हणाले की आआपा ने समर्थन मागितले तर आम्ही देऊ आता ३: ०८ मिनिटे झाली आहेत. शकील अहमद म्हणताहेत आआपा ला समर्थन देण्याचा काही प्रश्न नाही.

(च्यायला, काही लोकांना लिंबाच्या झाडाला बांधून ओल्या फोकानं टींगरं फोडून काढली पाहिजेत. ) :)

-दिलीप बिरुटे

मुक्त विहारि's picture

8 Dec 2013 - 3:56 pm | मुक्त विहारि

ही अशी माणसे....बंड्याची पण मती गूंग करणार बघा......

इष्टुर फाकडा's picture

8 Dec 2013 - 3:09 pm | इष्टुर फाकडा

आत्तापर्यंत मोजणीच्या आधारे बलाबल पुढीलप्रमाणे :

१. मध्य प्रदेश : भाजपा : १५९ , काँग्रेस : ६३
२. छत्तीसगढ : भाजपा : ४७ , काँग्रेस : ४३
३. दिल्ली : भाजपा : ३४, काँग्रेस : कचरा, आप : २७
४. राजस्थान : भाजपा : १५७, काँग्रेस : २४

इष्टुर फाकडा's picture

8 Dec 2013 - 3:23 pm | इष्टुर फाकडा

२२ ००० मतान्नी हारल्या !! ही ही ही ही

जेपी's picture

8 Dec 2013 - 3:29 pm | जेपी

Delhi
bjp-34
aap-26
con-8
oth-2
केजरीवाल 22000 मतांनी विजयी .
Mp
bjp-160
con-61

raj
bjp-160
con-24

chg

bjp-47
con-43

दर्यावर्दी's picture

8 Dec 2013 - 3:45 pm | दर्यावर्दी

अण्णा आणि केजरीवाल यांच्यामुळे बीजेपीला फायदा झाला

वेताळ's picture

8 Dec 2013 - 5:00 pm | वेताळ

राहुल गांधीना परत सर्वसामान्य लोकांसाठी काम करण्याची इच्छा जागृत झाली.

आता सोनीया गांधी ची पत्रकार परिषद पाहीली .
शेजारी उभ्या राहुल बाबाचा चेहरा बघन्या लायक होता .

दर्यावर्दी's picture

8 Dec 2013 - 6:38 pm | दर्यावर्दी

काँग्रेस लोकसभेत जिंकेलच...

विद्युत् बालक's picture

8 Dec 2013 - 6:40 pm | विद्युत् बालक

कसे ते सांगू शकाल का? श्रेष्ठी पेक्षा तुम्हालाच जास्त आत्मविश्वास दिसतोय!

क्लिंटन's picture

8 Dec 2013 - 5:15 pm | क्लिंटन

मध्य प्रदेशात शिवराजसिंह चौहानांनी २००८ पेक्षा जास्त जागा जिंकल्या (२००८ मध्ये १४३ तर २०१३ मध्ये १६२) तर गुजरातमध्ये नरेंद्र मोदींनी २०१२ मध्ये २००७ पेक्षा कमी जागा जिंकल्या (२००७ मध्ये ११७ तर २०१२ मध्ये ११५) म्हणून नरेंद्र मोदींचा प्रभाव नाहीच अशी पोपटपंची होईलच.ती आधीच preempt करण्यासाठी हा प्रतिसाद लिहित आहे.

१. शिवराजसिंह चौहान नोव्हेंबर २००५ मध्ये मुख्यमंत्री झाले तर नरेंद्र मोदी ऑक्टोबर २००१ मध्ये.तेव्हा २०१२ च्या निवडणुकीपर्यंत मोदींनी मुख्यमंत्रीपदी ११ वर्षे पूर्ण केली होती तर २०१३ च्या निवडणुकीपर्यंत शिवराजसिंह चौहानांनी ८ वर्षे पूर्ण केली होती. तसेच मोदी सत्तेवर यायच्या ६ वर्षे आधीपासून गुजरातमध्ये भाजपचे सरकार होते तर चौहान सत्तेवर येण्यापूर्वी मध्य प्रदेशात २ वर्षे आधीपासून भाजपचे सरकार होते. तेव्हा अधिक काळ सत्तेत राहिल्यानंतर अधिक प्रमाणात प्रस्थापितविरोधी मतांचा फटका बसतो हा अनुभव अनेक ठिकाणी आला आहे त्यानुसार २०१२ च्या निवडणुकीत गुजरातमध्ये भाजपविरोधी odds २०१३ च्या निवडणुकीत मध्य प्रदेशात असलेल्या odds पेक्षा बरेच जास्त होते.

२. गुजरातमध्ये २००७ मध्ये भाजपला ४९.१% मते होती तर मध्य प्रदेशात २००८ मध्ये मध्य प्रदेशात भाजपला ३७.६% मते होती.गुजरातमध्ये ४९% या मोठ्या बेसवर सत्तेत जवळपास १७ वर्षे (आणि एकाच मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वाखाली ११ वर्षे) राहिल्यानंतर भाजपला मध्य प्रदेशात ३७.६% या त्या मानाने लहान बेसवर सत्तेत १० वर्षे (आणि एकाच मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वाखाली ८ वर्षे) राहिल्यानंतर नक्कीच जास्त resistance होता.

३. २००८ मध्ये उमा भारतींच्या भारतीय जनशक्ती पक्षाने ४.७% मते खाऊन भाजपचे नुकसान केले.तर २०१२ मध्ये केशुभाई पटेलांच्या गुजरात परिवर्तन पक्षाने २.५% मते घेऊन भाजपचे तसेच नुकसान केले.या निवडणुकीच्या वेळी उमा भारतींचा पक्ष भाजपमध्ये विलीन झाला होता त्यामुळे त्या पक्षाने २००८ मध्ये घेतलेल्या ४.७% मतांपैकी बहुसंख्य मते भाजपकडे आली असणार यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही.तेव्हा २०१३ मध्ये शिवराजसिंह चौहानांच्या नेतृत्वाखाली भाजपला २००८ च्या तुलनेत ही मते नक्कीच मिळणार असल्यामुळे तो advantage होताच. तेव्हा जर तुलना करायची असेलच तर गुजरात-२०१२ आणि मध्य प्रदेश-२००८ मध्ये केल्यास ती सफरचंद-सफरचंद तुलना असेल. गुजरात-२०१२ आणि मध्य प्रदेश-२०१३ ही सफरचंद-सफरचंद तुलना होणार नाही.

४. गुजरातमध्ये नरेंद्र मोदींनी अक्षरश: एकहाती प्रचार सांभाळला पण मध्य प्रदेशात शिवराजसिंह चौहानांच्या मदतीला तेच नरेंद्र मोदी प्रचाराला होतेच. म्हणजे जर दिल्लीमध्ये बहुमताला २ जागा कमी आणि छत्तीसगड मध्ये काठावर बहुमत असेल तर मोदी इफेक्ट चालला नाही असे म्हणणारे मध्य प्रदेशात आणि राजस्थानात तो इफेक्ट चालला हे म्हणणार नाहीत यातच त्यांचा पूर्वग्रह दिसून येतो.

अर्थातच शिवराजसिंह चौहान यांचे यश कमी महत्वाचे आहे असे अजिबात नाही.पण त्यावरून मोदींचा प्रभाव कसा नाही अशी पोपटपंची कोणी करायला लागले तर त्याला उत्तर दिलेच पाहिजे म्हणून हे मुद्दे लिहिले आहेत. थोडक्यात गुजरात-२०१२ आणि मध्य प्रदेश-२०१३ मधील निकालांची त्लना करणे म्हणजे भारतातील खेळपट्ट्या आणि दक्षिण आफ्रिकेतील खेळपट्ट्यांवरील सामन्यांच्या निकालांची तुलना करण्यासारखे आहे.

दुश्यन्त's picture

8 Dec 2013 - 6:33 pm | दुश्यन्त

बाकी गुजरात मध्ये 2012 नंतरच्या पोटनिवड्णुका मिळून (आज देखील एका जागेचा निकाल भाजप च्या बाजूने आला आहे) सध्याच्या विधानसभेत भाजपकडे 120 आमदार आहेत.182 च्या विधानसभेत जवळपास 2/3 बहूमत आहे. असे असले तरी मोदिन्ची पंतप्रधान पदाच्या उमेदवारीची घोषणा केली नसती तरी मप्र आणि राजस्थान भाजपने जिंकले असते असे मानायला हरकत नाही.याचे कारण मप्र मध्ये शिवराज यांचे काम आणि दोन्ही राज्यातील पक्ष संघटना आणि समर्थ नेतृत्व. मोदी घटकामुळे यशात आणखी हातभार लागून त्याचे घावघवीत यशात रुपांतर झाले.

विकास's picture

8 Dec 2013 - 8:29 pm | विकास

तुमच्या मताशी सहमत आहे. मोदी फॅक्टर चालला नाही असे म्हणणार्‍यांचे मुद्दे पटत नाहीत. तरी देखील वादापुरते मान्य करूयात की प्रभाव नव्हता. पण मोदी विरोधकांनी अगदी २००२-०३ पासून सातत्याने या माणसास आणि त्याच्या पक्षास आणि त्यांना पाठींबा देणार्‍यांना राक्षस ठरवले होते. त्यांचे गेल्या वर्षात राष्ट्रीय रंगमंचावर आगमन झाल्यावर परत परत तेच बोलले गेले, आठवण करून दिली गेली. त्याने जमले नाही मग स्नुपिंग प्रकरण काढून बघितले. पण कशाच निगेटिव्ह प्रभाव पडला नाही.

आत्ता नुसते निकाल आले आहेत. विष्लेषण होण्यात काही दिवस जातील. त्यात मुस्लीम गरीब आणि तरूण यांची मते कशी कुणाला पडली यावरूनही बरेच समजू शकेल. जर यातील कुठलाही फॅक्टर हा भाजपाच्या विरोधात गेला तर ते माध्यमात तात्काळ येईल आणि मोदी विरोधात कोण कसे आहे यावर चर्चा होईल. पण तसे झाले नसले तर "तसे झाले नाही" असे माध्यमात बोलले गेले नाही तरी आश्चर्य वाटणार नाही.

आता मोदींच्या संदर्भात काही नवीन उकराउकरी चालू झाली तर आश्चर्य वाटायला नको. तेहेलका "निस्तेज" झाले असले तरी कोब्रापोस्ट वगैरे आहेतच... :)

इष्टुर फाकडा's picture

9 Dec 2013 - 1:19 pm | इष्टुर फाकडा

चारी राज्यात मिळून एकूण सत्तर टक्के मते भाजपला मिळाली आहेत! एका राज्यात भाजपने जिंकेल्या जागा यांची संख्या चारही राज्यात मिळून कॉंग्रेस ने जिंकलेल्या जागांपेक्षा जास्त आहे ! हे मोदी परीमाणाशिवाय अशक्य होते. कारण याआधी कधीही ते भाजपला जमलेले नाही. शिवाय मला वाटते कि दिल्लीतही भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला याचे कारणही मोदीच आहे. इतर राज्यांपेक्षा तिसर्या पर्यायाची गरज जनतेला दिल्लीत सर्वात जास्त होती. या तिसर्या पर्यायाच्या लाटेत भाजपही सहज वाहून गेला असता जर मोदींची लाट नसती तर.

श्रीगुरुजी's picture

9 Dec 2013 - 2:12 pm | श्रीगुरुजी

>>> हे मोदी परीमाणाशिवाय अशक्य होते.

मोदींनी छत्तीसगडमध्ये एकूण ९० मतदारसंघापैकी ७७ मतदारसंघांच्या क्षेत्रात सभा घेतल्या. त्यातील ४९ जागा भाजपने जिंकल्या (प्रमाण ६३ टक्के). १० वर्षे राज्य केल्यामुळे निर्माण झालेला मतदारांचा प्रस्थापितविरोधी कल व जून २०१३ मध्ये २५-३० काँग्रेस नेत्यांच्या नक्षलवाद्यांनी केलेल्या हत्येमुळे काही प्रमाणात काँग्रेसविरोधी निर्माण झालेली सहानूभूती यामुळे रमणसिंगांपुढे मोठे आव्हान होते. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा ४९ जागा मिळविल्यामुळे मोदींचा प्रभाव नक्कीच पडलेला असणार.

तिमा's picture

8 Dec 2013 - 5:28 pm | तिमा

मोदींचा परिणाम या निवडणुकीवर नक्कीच झाला आहे. पण काही लोकांना निपक्षपाती विचारच करता येत नाही. आप पार्टी पुढे कशी वागेल ते सांगता येत नाही. पण त्या निमित्ताने, लोकांना स्वच्छ आणि प्रामाणिक लोकांनी सत्तेवर यायला हवे आहे, याचा स्पष्ट कौल मिळाला आहे.

देव मासा's picture

8 Dec 2013 - 5:57 pm | देव मासा

केजरीवाल नामक बम फट गया..!!
भाजपा घायल और कांग्रेस की मौत........

शाब्बस आम आदमी

विकास's picture

8 Dec 2013 - 6:05 pm | विकास

आत्ताच केजरीवालांचे भाषण ऐकले. विरोधी पक्षात बसणार, कुणाचे समर्थन घेणार नाहीत आणि कुणाला देणार नाही.

क्लिंटन's picture

8 Dec 2013 - 6:16 pm | क्लिंटन

म्हणजे बहुदा लोकसभा निवडणुकांबरोबर दिल्ली विधानसभेच्या निवडणुका परत होणार :(

दुश्यन्त's picture

8 Dec 2013 - 6:45 pm | दुश्यन्त

आत्ता कोणि काही म्हणाले तरी तडजोड होऊन सरकार बनेल असे वाटत आहे.
पर्याय 1) इतर 2 तसेच कॉंग्रेस किंवा आप मधून काहीजण फूटून भाजप बरोबर येतील . कॉंग्रेसला फोडणे जास्त सोपे राहील कारण एकून 8 मधून 3 आमदार फुटले तरी त्यांचा वेगळा गट बनू शकतो.
पर्याय 2) काही आमदार किंवा आपपार्टी मत दानाला तटस्थ राहू शकते. आणि भाजपचे सरकार बनू शकते.
3) कॉंग्रेस/ इतरच्या मदतीने आप सरकार बनवू शकते.

श्रीगुरुजी's picture

8 Dec 2013 - 6:56 pm | श्रीगुरुजी

आआपने मुख्यत्व: काँग्रेसविरोधात निवडणुकीत लढविलेली होती. जर त्यांनी काँग्रेसचा पाठिंबा घेतला तर त्यांच्या अनेक समर्थकांचा संताप होईल. त्यांनी तटस्थ राहणेच योग्य. जर कोणीच सरकार बनवू शकले नाही तर राष्ट्रपती राजवट येईल. भाजपचे चाणक्य काँग्रेसच्या ८-९ पै़की दोन तृतीयांश आमदार फोडून पाठिंबा मिळविण्याचा प्रयत्न करतील असे वाटत आहे.

इथले काँग्रेससमर्थक (ग्रेटथुंकर आणि मंडळी) कुठे आहेत?

४ पैकी ३ राज्ये भाजपने जिंकली हे उत्तम झाले.

क्लिंटन's picture

8 Dec 2013 - 7:06 pm | क्लिंटन

इथले काँग्रेससमर्थक (ग्रेटथुंकर आणि मंडळी) कुठे आहेत?

ही मंडळी या चर्चेत कशाला यायला हवी आहेत हे समजले नाही.काँग्रेस समर्थक असण्यावर नक्कीच आक्षेप नाही.पण आक्षेप आहे उगीचच खोडसाळ प्रतिसाद देऊन वातावरण बिघडवायला.अशा निकोप चर्चेत अशी मंडळी खरे सांगायचे तर अजिबात सूट व्हायची नाहीत.

ती *dash1* मंडळी परत कधीच दिसु नयेत.

विनोद१८

सुहासदवन's picture

9 Dec 2013 - 12:07 pm | सुहासदवन

ही मंडळी कदाचित दिल्लीला आपले मत द्यायला गेली असतील.
मिझोराममध्ये निकाल दिसू लागले की येतील परत.

मुक्त विहारि's picture

8 Dec 2013 - 8:21 pm | मुक्त विहारि

+ १

दुश्यन्त's picture

8 Dec 2013 - 6:37 pm | दुश्यन्त

छत्तीसगढबद्दल अजूनही वेग वेगळी माहिती मिळत आहे. एकीकडे रमणसिंघ परत सत्तेवर आले आहेत तर दुसरी कडे अजूनही काट्याची लढत असे अपडेटेस दाखवत आहे.खरे काय?

श्रीगुरुजी's picture

8 Dec 2013 - 6:51 pm | श्रीगुरुजी

छत्तीसगडमध्ये भाजपने ४६ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळविल्याची बातमी दीड तासांपूर्वीच आली. सध्या भाजपने ४८ जागा जिंकलेल्या आहेत.

विकास's picture

9 Dec 2013 - 9:35 am | विकास

कधी कधी माध्यमांना आणि राजकारण्यांना किती घाई झालेली असते या संदर्भात ह छत्तिसगढचे उदाहरण...

विकास's picture

8 Dec 2013 - 6:57 pm | विकास

नजिकच्या सत्तेचे राजकारण तुर्तास बाजूस ठेवले तर आत्ता तात्काळ जे वाटले ते:

सगळ्यात पहील्यांदा आम आदमी पार्टी आणि केजरीवाल यांचे अभिनंदन
राजकीय पक्ष म्हणून शुन्यातून सुरवात करून वर्षभरात दोन प्रमुख पक्षांना धक्का दिला आहे. ही गोष्ट कुठल्याही देशात/राज्यात सत्तेच्या राजकारणात सोपी नाही. तरी देखील तेलगू देसम सारखे उदाहरण आधीच्या काळातले आहे नाही असे नाही.

आम आदमीचे यश
आम आदमी पार्टीला जरी मोठे यश मिळाले असले तरी सत्ता मिळाली नाही हे जनतेप्रमाणेच त्यांच्यासाठी पण चांगले झाले असे वाटते. विधमंडळाचा कुठलाही अनुभव नसलेल्या संपूर्ण पक्षास अचानक देशाच्या राजधानीची सत्ता जाणे अवघड ठरले असते. यात जशा त्यांच्याकडून उत्साहाच्या भरात काहीतरी चुका घडू शकतात तसेच केंद्रसरकारचा दिल्लीवर काही झाले तरी कंट्रोल असल्याने (उ.दा. पोलीसदल) त्यांना (आप ला) चूक ठरवणे देखील सोपे जाऊ शकले असते. क्रांती होण्यापेक्षा उत्क्रांती होणे हे त्यांच्या आणि जनतेच्या/देशाच्या हिताचे आहे.

भाजपा
भाजपाने चार राज्यात एकत्रीतपणे मला वाटते साधारण ७०% जागा जिंकल्या. हे नक्कीच मोठे यश आहे. तरी देखील दोन राज्यात निर्विवाद बहुमत नाही. त्यामुळे मोदी तसेच इतर नेत्यांना जरा चेक बसलेला आहे. आपापल्या राज्यात "डिलिव्हरेबल्स" देणे आणि तसेच उगाच जास्त तोंडाळ न होणे...

काँग्रेस
ये तो होना ही था! असेच म्हणावेसे वाटते आहे. काँग्रेसला विरोध म्हणून नाही पण ज्या पद्धतीचे राज्य (आणि देश) चालवणे चालले आहे त्यातून काँग्रेस जिंकावे असे जर कुणाला कुठल्याही कारणामुळे वाटत असेल तर कठीण आहे... अर्थात काँग्रेस काही शिकायला तयार नाही हे सोनीयाजींच्या बोलण्यावरून समजते. त्यांनी आत्ता स्वतःस अथवा राहूलला कुठेच जबाबदार धरले नाही. स्थानिक नेत्यांना जबाबदार धरले. राहूल गांधींकडून कुठलीच अपेक्षा करता येत नाही. तरी देखील काँग्रेस ही सरंजामी पार्टी असल्याने, तमाम काँग्रेसजन "हाजी हाजी" ला पर्याय नाही असेच समजत राहतात. त्यांचे पार्टी कल्चर, भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचारी नेत्यांकडे दुर्लक्ष, कधीकाळी चाललेले व्होट बँक पॉलीटीक्स याच्यापुढे जर त्यांना विचारच करता येत नसेल तर काय बोलणार, शेवटाची सुरवात (beginning of end) आहे.

इतर पक्ष
इतर पक्षांच्या नेत्यांना टिव्हीवर येण्याचा चान्स देखील न मिळणे स्वागतार्ह आहे. दिल्ली सोडल्यास फक्त काँग्रेस-भाजपा आणि दिल्लीत आम आदमी देखील. कम्युनिस्ट, समाजवादी, बहुजन समाजवादी वगैरे कुठेच नाही. तरी देखील थर्ड फ्रंट ची टूरटूर करतील ते वेगळेच... असो.

क्लिंटन's picture

8 Dec 2013 - 7:10 pm | क्लिंटन

विधमंडळाचा कुठलाही अनुभव नसलेल्या संपूर्ण पक्षास अचानक देशाच्या राजधानीची सत्ता जाणे अवघड ठरले असते. यात जशा त्यांच्याकडून उत्साहाच्या भरात काहीतरी चुका घडू शकतात

याला अगदी +१००. तरीही अण्णा हजारेंचा उपोषणाचा असंवैधानिक मार्ग सोडून अरविंद केजरीवालांनी आम आदमी पार्टी स्थापन करून निवडणुकांचा मार्ग अवलंबला हे खूपच चांगले झाले.

श्रीगुरुजी's picture

8 Dec 2013 - 7:16 pm | श्रीगुरुजी

"विधमंडळाचा कुठलाही अनुभव नसलेल्या संपूर्ण पक्षास अचानक देशाच्या राजधानीची सत्ता जाणे अवघड ठरले असते. "

वरील वाक्य वगळता प्रतिसादाशी सहमत. अनेकवेळा कोरी पाटी असलेलेच चांगल्या कृती करू शकतात.

मंदार कात्रे's picture

8 Dec 2013 - 7:17 pm | मंदार कात्रे

आप व केजरीवाल यान्चे अभिनन्दन !

पण त्यानी नक्की कोणाच्या जागा कमी केल्या? न्कोन्ग्रेस च्या की भाजप च्या ?हा प्रश्न राह्तोच!

मंदार कात्रे's picture

8 Dec 2013 - 7:20 pm | मंदार कात्रे

जसे मनसे ने मागच्या वेळी महाराश्ट्रात सेना-भाजपच्या तोन्डचा घास काढून खान्ग्रेस ला दिला , तसा काही डाव होता का?

मंदार कात्रे's picture

8 Dec 2013 - 7:47 pm | मंदार कात्रे

काय गंमत आहे बघा. अरविंद केजरीवाल हा अत्यंत हुशार माणूस खर्‍या अर्थाने प्रसिद्धीत आला तो अण्णांच्या आंदोलनात सहभागी झाल्यावर. आज दिल्लीत त्याच्या पक्षाच्या इतक्या जागा निवडून आल्यायत म्हणजे हा माणूस किंगमेकर होणार हे उघड आहे, पण नेमके या वेळी अण्णा कुठायत ? तर केजरीवालपासून दूर पडून राळेगणच्या देवळात बसून पुढच्या उपोषणाच्या तयारीला लागलेत.
आज केजरीवाल यांच्या बरोबर अण्णा असते तर खरोखरच भ्रष्टाचाराविरुद्ध काहीतरी करून दाखवायची सुवर्ण संधी त्यांच्या हातात आली होती. भ्रष्टाचाराविरुद्ध प्रामाणिक लढाई लढायची असल्यास रस्त्यापेक्षा विधानसभा हे अधिक चांगले माध्यम असेल हे अण्णाना कोण सांगणार ? अण्णांच्या खांद्यावर बंदूक ठेवून केजरीवालने मात्र बरोब्बर शिकार साधली आहे.
जेव्हा आपल्या मेहनतीचे खरोखर काहीतरी मोठे फळ मिळायची शक्यता निर्माण होते तेव्हा मराठी माणूस आपल्या धोरणीपणाच्या अभावामुळे दिल्लीच्या राजकारणात किती आणि कसा कमी पडतो ते पुन्हा एकदा दिसून आले. आपले मराठी लोक फक्त इथे महाराष्ट्रातच जातीपातीत काड्या घालून त्यांना आपापसात लढवण्याचे क्षुद्र राजकारण खेळू शकतात. अत्यंत स्वस्तात मॅनेज करणे सोपे असल्याने आपल्या मराठी लोकांना राष्ट्रीय पातळीवरच्या राजकारणात कोणी खिजगणतीतही धरत नाही हेच खरे .....

सन्दर्भ-Uday Joshi

+ १

चिरोटा's picture

9 Dec 2013 - 1:45 pm | चिरोटा

अण्णांच्या खांद्यावर बंदूक ठेवून केजरीवालने मात्र बरोब्बर शिकार साधली आहे.

मी अण्णांची सगळी भाषणे ऐकली नाहीत तर बर्‍याच वेळा ते 'काहीही बोलतात' असे वाटायचे.मी दिल्लीतल्या काही मित्रांशी बोललो. आम आदमीच्या प्रचारासाठी अनेकजण(हजारात) दिल्लीबाहेरून्/भारताबाहेरून(होय्,मेणबत्तीवालेच!!)सुट्टी काढून आले होते. १२/१४ तास दारोदार प्रचार्,योग्य (social,personal)प्रचाराचे जाळे,लोकांना पटतील असेच मुद्दे लढवणे ह्या बाजू आहेत.

विकास's picture

8 Dec 2013 - 7:09 pm | विकास

आत्ताच वाचले: Congress in MP complains that EVMs were tampered by BJP in many constituencies.

सुब्रम्हण्यम स्वामींनी पार्टी बदलली का? ;)

हो, त्यानी त्यान्चा 'जनता पक्ष' भा.ज.पा. मध्यी विलिन केला. ते सध्या भा. ज. पा. चे प्रवक्तेसुद्धा आहेत.

विनोद१८

श्रीगुरुजी's picture

8 Dec 2013 - 7:10 pm | श्रीगुरुजी

छत्तीसगडविषयी अजूनही खात्रीशीर बातमी का येत नाही?

विकास's picture

8 Dec 2013 - 7:37 pm | विकास

एनडीडिव्हीवर जाहीर केले आहे.

BJP's Super Sunday: 4-0

... In Chhattisgarh, the BJP and Congress have run neck and neck all day. But by late evening, Congress' Ajit Jogi conceded defeat...

कदाचीत काही कॉंग्रेस आमदार फुटतील . कारण ते स्वबळावर जिकंलेत .
आप ने मात्र खरोखरच धमाल उडवली .

दुश्यन्त's picture

8 Dec 2013 - 7:40 pm | दुश्यन्त

आता भाजपा 32 आणि आप 28 असे दाखवत आहे. दोन्ही पैकी कुणाला तरी सरकार बनवावेच लागेल.राज्यपाल भाजपाला (जास्त जागा असल्याने) प्रथम संधी देतील. नाहीतर त्रिशंकू सभागृहात राष्ट्रपती राजवट येऊ शकते. राष्ट्रपती राजवट किंवा लगेच परत निवडनुका टाळणे आणि सरकार बनवणे हे आव्हान भाजप किंवा आपला घ्यावेच लागेल.

दुश्यन्त's picture

8 Dec 2013 - 8:14 pm | दुश्यन्त

छत्तीसगड
भाजप: 47, कॉंग्रेस: 41, इतर: 02
भाजपने सत्ता राखली.

नितिन ग्डकरि टीव वर बोलत होते, आपचि मदत न घेता सरकार बनवनार, म्हन्जे घोडे बाजार सुरु होनार का ?

विकास's picture

8 Dec 2013 - 9:03 pm | विकास

हर्षवर्धन यांनी एनडीटीव्हीवर जाहीर केले की आम्ही विरोधी पक्षात बसणार म्हणून.

इष्टुर फाकडा's picture

8 Dec 2013 - 9:16 pm | इष्टुर फाकडा

दिल्लीमध्ये आम्ही सरकार बनवायचा प्रयत्न करणार नाही- हर्ष वर्धन
खतरनाक खेळी भाजपकडून ! आवडलेलं आहे.
केज्रीवालचा इंटरव्यु पहिला त्याचा अरोगन्स डोक्यात जायला लागला आहे.

लोणचं मुरलं नाहि हो अजुन... थोडं दमाने घ्या :)

देव मासा's picture

9 Dec 2013 - 3:26 am | देव मासा

आप आनि आरविंद केज्ररिवाल यन्च्या सोबत, आणखि एक नाव कानि पडत आहे. डॉ.कुमार विश्वास, हिंदी कवि आहे म्हने,यान्च्या बदल काहितरि सांगा, एकायला आणी वाचायला आवडेल...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Dec 2013 - 8:44 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

www.misalpav.com/node/24764

-दिलीप बिरुटे

कंजूस's picture

9 Dec 2013 - 6:31 am | कंजूस

#मंदारकात्रे १+

कालचा धुरळा बसला असावा .भाजपाच्या गोटात उकाडा सुरू झाला असेल .

अरविँदानी अण्णांना थोडेतरी श्रेय दिले का ?

झाडूला लांब काठी लाऊन वरची जळमटे काढणार का ?

आता कॉंग्रेस तेलंगणाचा निर्णय फिरवेल या धास्तीने नेते दिल्लीत धावले आहेत .

राहूलने लोकसभा निवडणूकी अगोदर दोनाचे चार केलेतर देशाचे भले करता येईल .

सोनियांची पत्रकार परिषद "लोकसभा चे निकाल वेगळे लागतील " आणि 'मेरे पास मां है 'छाप गालातल्या गालात हसतांना राहूल बाबा .

राहूलसाठी नवे PSLV शोधावे लागणार .अगोदरचे (ममोसिंगना चुकीचे ठरवण्याचे)इंधन फुसके निघाले . आणि आता लोकल/मेट्रो प्रवासाचे तिकीटही वाढले आहे .

दिल्लीतले राजकीय हवामान तज्ञ यांना आनंदाच्या उकळ्या ,वानखेडेला२६-२६वर अडून बसणार ?

विमेंचा बंड्या कुठे आणि कोणाशी पट मांडून बसणार ?

दर्यावर्दी's picture

9 Dec 2013 - 9:04 am | दर्यावर्दी

भाजपाला फक्त एकाच राज्यात सत्ता मिळाली बाकीची राज्य त्यांनी 'राखली' आहेत.त्यामुळे मोदी इफेक्ट वगैरे खोटारडेपणा आहे,
दिल्लीत तर केजरीवालांनी या मोदीं लाटेची हवाच काढून घेतली.
आपल्यासाठी मॅन ऑफ द मॅच 'अरविंद केजरीवाल'...

नाखु's picture

9 Dec 2013 - 9:19 am | नाखु

अभिनंदन..(बिनबुडाचे विधानाबद्दल)
राजस्थानात भाजपाची सत्ता होती का? मध्यप्रदेश मध्ये १४१ वरून १६५ होणे म्हणजे सत्ता राखणे होय?
अज्ञ बालक
नाद खुळा

तीनवेळा निवडून आलेले मप्र चौहान देखील लाट निर्माण करू शकतात .

उद्दाम's picture

9 Dec 2013 - 9:42 am | उद्दाम

खर्च न खुट लागो
चोर ना लुटे
दिन दिन बढत ही जायो
पायोजी मैंने रामरतन धन पायो..

:)

भाजपाप्रेमींना त्यांच्या भाषेत मनःपूर्वक शुभेच्छा.

( आम्ही कुठे गेलो नाही, आम्ही इथेच आहोत. :) )

विटेकर's picture

9 Dec 2013 - 10:08 am | विटेकर

मध्य प्रदेश आणि छत्तिसगड
या दोन्ही निकालांमुळे मी व्यक्तिश: खूप समाधानी आहे. दोन्ही कडे विकासाला आणि गुड गवर्नन्स ला लोकानी मतदान केले आहे. हे मतदान सकारात्मक आहे आणि प्रतिक्रियात्मक नाही.
सरकारने काम चांगले केले म्हणून ते पुन्हा निवडून आले, त्याच बरोबर विरोधी पक्षांकडे टिका करण्यापेक्षा काही ही सकारात्मक नव्हते .. आणि हे लोकशाही म्याच्युर झाल्याचे लक्षण आहे .. ही अत्यंत समाधानाची बाब आहे.
"मोदी-करिश्मा" नसेल तर आणखीनच समाधानाची बाब आहे!भारतीय मानसिकता " हिरो वर्शिपिंगची" आहे, जेवढ्या लवकर हा घाणेरडा प्रकार संपेल तेवढ्या लवकर आपण प्रगत होऊ.. कारण प्रत्येक व्यक्ती स्खलनशील असते .. त्याला कोणीही अपवाद नाही !!!!
दिल्ली आणि राजस्थान इथे प्रतिक्रियात्मक मतदान झाले. दिल्लीत नक्कीच "केजरीवाल करिश्मा" आहे आणि मला भीती वाटते की हे यश त्यांच्या डोक्यात जाईल. आपण हे विसरून चालणार नाही की ज्या आण्णांच्यामुळे केजरिवाल इथे पोहोचले , त्यांना डच्चू दिला गेला आहे.. आता यश मिळाल्यावर कितीजण त्यांच्याबरोबर राहतील? जोडीला भाजप / कॉग्रेस आआप च्या आमदारांना गाजर दाखवतील ते वेगळेच ! हे निवडून आलेले बहुतांशी आमदार आआप च्यापूर्वी भाजप / कॉग्रेस पैकी एकाशी निष्ठावान होतेच की! स्वगृही जाण्याची किंमत वसूल करतीलच ! तेव्हा दिल्लीतील घोडेबाजार अटळ आहे...!
राजस्थान बद्द्ल वरती लिहिलेच आहे.. "मोदी-करिश्मा" आणि "महाराणी" हे महत्वाचे मुद्दे ठरले ! वास्तविक गेहलोत इतके वाईट नव्हते ! आजच्या घडीला राजस्थान कॉन्ग्रेस आणि राजस्थान भाजप यामध्ये गुणात्मक काहीही फरक नाही ! आपण कॉन्ग्रेस्पेक्षा वेगेळे आहोत हे सिद्ध करण्याची फार मोठी जबाबदारी महराणींवर येऊन पडली आहे.

चिरोटा's picture

9 Dec 2013 - 11:20 am | चिरोटा

भाजप व आम आदमीचे अभिनंदन. आम आदमीची सुरुवात झाल्यापासूनच सिब्बलछाप राजकारणी आणि त्यांच्या पत्रकारवर्गाकडून आम आदमीबद्द्ल हेटाळणी,टवाळकी चालु होती.मेणबत्तीवाल्यांचा पक्ष,'बदल हवेत तर आधी निवडणूका जिंकून दाखवा' वगैरे डोस तिवारी,लालु,पवार्,दिगिव्जय्,दीक्षित मंडळी देत होती.
नेहरू,गांधी,आंबेडकर्,शिवाजी,इकडचे भैय्ये,तिकडचे भैय्ये ह्यापैकी कशालाही महत्व न देता केवळ मुख्य मुद्द्यांवरच आम आदमीने निवड्णूका लढवल्या.धर्म्,व्यक्ती करिश्मा,जात,भाषा ह्यापलिकडे जावूनही राजकारण करता येते हे दाखवून दिले.

श्रीगुरुजी's picture

9 Dec 2013 - 2:25 pm | श्रीगुरुजी

या सर्व गदारोळापासून मनमोहन सिंग अत्यंत अलिप्त राहिले आहेत. काँग्रेसच्या पराभवाचे त्यांना ना सोयर ना सुतक ना खेद ना खंत. ते प्रतिक्रिया द्यायला सुद्धा आले नाहीत. उर्वरीत ४-५ महिने आपली खुर्ची कशी टिकविता येईल एवढाच त्यांचा मर्यादित उद्देश असावा. राज्यातील पराभवात केंद्राचा सुद्धा वाटा असतो हे त्यांना मान्य नसावे.

निर्गुण, निराकार, स्थितप्रज्ञ, आज्ञाधारक, विश्वासू अशी गुणांची खाण असली तरी देश चालविताना हे गुण उपयोगी पडलेले दिसले नाहीत. अणुकरार वगळता गेली ९-१० वर्षे त्यांचे अस्तित्व कधीही जाणविले नाही. सोनिया गांधी 'राष्ट्रीय सल्लागार समिती'च्या माध्यमातून कोणतीही अधिकृत जबाबदारी न घेता व सर्व हक्क उपभोगून देश आपल्या व आपल्या निधर्मांध व डाव्या विचारांच्या सल्लागारांच्या सल्ल्यानुसार चालवित होत्या. मनमोहन सिंग यांची भूमिका केवळ नामधारी, सोनियांच्या निर्णयाची अंमलबजावणी करणारे एवढीच मर्यादित होती. अमर्यादित अधिकार असलेले पद असून सुद्धा त्यांनी आपली भूमिका मर्यादितच ठेवली. यात त्यांचाच जास्त दोष आहे.

आता कदाचित मनमोहन सिंगांना हटवून त्याजागी सुशीलकुमार शिंदे किंवा मीराकुमार यांना आणून दलित/महिला कार्ड खेळले जाईल. किंवा कदाचित आंध्रातल्या एखाद्या वरिष्ठ नेत्याला आणून तिथली धग कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल जेणेकरून तेलंगण निर्मिती सोपी व्हावी.

चिरोटा's picture

9 Dec 2013 - 4:01 pm | चिरोटा

गम्मत म्हणून कुमार केतकर संपादक असलेला दिव्य मराठी उघडला आणि संपादकिय वाचले.काही वाक्ये
१) अजूनही काँग्रेसच्या दृष्टिकोनातून वेळ गेलेली नाही.
२)वस्तुत: शीला दीक्षित यांची प्रतिमा आणि त्यांचा कारभार याबद्दल मतदारांनी समाधान व्यक्त केले तरी त्यांच्याच मतदारसंघात त्यांचा पराभव झाला.
३)राजस्थानमध्ये काँग्रेस सरकारने अनेक लोककल्याणकारी योजना अमलात आणल्या. मोफत/ स्वस्त वैद्यकीय उपचार, अन्न सुरक्षा, पेन्शन वगैरे. पण त्यांचा उपयोग झाला नाही. याचे मुख्य कारण काँग्रेसचा लोकसंपर्क, लोकसंग्रह आणि लोकसंवाद जवळजवळ संपला होता.
गिरी तो भी टांग उपर. मनमोहन सिंग ह्यांनी कुमार केतकरांकडून बरेच शिकण्यासारखे आहे.

विकास's picture

9 Dec 2013 - 8:39 pm | विकास

Prime Minister Manmohan Singh congratulates Vasundhara Raje, Shivraj Singh Chouhan, Raman Singh

उद्या काँग्रेसपरत केंद्रात सत्तेवर येवोत अथवा न येवोत, मनमोहन सिंग पंतप्रधान होण्याची शक्यता नाही हे सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे स्वतः सिंग यांनी काँग्रेसेतर मुख्यमंत्र्यांशी चांगले संबंध ठेवले तर आश्चर्य वाटणार नाही. कारण काँग्रेसमधे गांधी घराण्याबाहेरील कुठल्याही नेत्यास एकदा का निवृत्त झाले की कस्पटाला पण मान मिळेल अशी वागणूक मिळते. शिवाय अपयशाचे खापर (जनता नाराज आहे) हे शेवटी पंतप्रधान म्हणून मनमोहनसिंग यांच्याच डोक्यावर फोडले जाणार आहे, हे नक्की...

विद्युत् बालक's picture

9 Dec 2013 - 8:49 pm | विद्युत् बालक

मनमोहन सिंगांचा पी वी नरसिंहराव होणार तर !

दिल्लीमध्ये सर्वाधिक जागा जिंकलेल्या भाजपनं, आवश्यक बहुमत नसल्यानं विरोधी पक्षात बसण्याची तयारी दाखवलेली आहे आणि आम आदमी पार्टीनं कुणाचा पाठिंबा घ्यायला किंवा कुणाला पाठिंबा द्यायला स्पष्ट नकार दिलाय.
त्रिशंकू निकालामुळे पुन्हा निवडणुका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जर पुन्हा निवडणूका झाल्या तर आताच्या निकालात किती आणि काय बदल होऊ शकतात?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Dec 2013 - 7:46 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>>>> जर पुन्हा निवडणूका झाल्या तर आताच्या निकालात किती आणि काय
बदल होऊ शकतात?

मतदारान्ना आपलं मत आआपा ला टाकलं तर ते वाया तर जाणार नाही, असे वाटल्यामुले त्यांनी भाजपा ला मतदान केलं आहे, आता जर निवड णु का झाल्यातर आआपा ला बहुमत मिळेल असे वाटते.

-दिलीप बिरुटे

विकास's picture

9 Dec 2013 - 7:55 pm | विकास

काही होऊ शकेल.

जर परत निवडणूका स्वतंत्रपणे झाल्यातर आप ला बहुमत मिळण्याची शक्यता जास्त आहे.
जर लोकसभेबरोबर झाल्या तर तत्कालीन राजकारणाप्रमाणे जर भाजपा वरचढ असेल तर "बाय वन गेट वन फ्री" होऊ शकते. तो पर्यंत मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तिसगढ मधील राज्यशकटावर जनता कशी खुष आहे हे ते दाखवू शकतात.

त्या व्यतिरी़क्त मला स्वतःस उत्सुकता आहे की "आप" किती मतांनी जिंकले आहे (जागांनी नाही). विशेष करून जिथे त्यांनी भाजपाच्या उमेदवारांना हरवले आहे तिथे. जर फरक जास्त नसेल तर ते अजून एक वाईल्ड कार्ड ठरू शकते.

अजून एक गोष्ट म्हणजे जर "आप" ने आम्ही पाठींबा देणार नाही, पण सरकारी तिजोरीवरील खर्च वाचवण्यासाठी भाजपाच्या सत्तेस विरोध देखील करणार नाही असे जाहीर केले तर त्यांचे वजन वाढू शकते. त्यासाठी त्यांना केवळ विश्वासदर्शक ठरावात अलीप्त रहावे लागेल. पण ते न करता केवळ हट्टीपणा केला तर नवीन आणि आदर्शवाद घेऊन आलेली पार्टी म्हणून त्यांच्यावर जास्त जबाबदारी राहते, आणि त्याचा वापर केला जाऊ शकतो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Dec 2013 - 9:53 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>> त्या व्यतिरी़क्त मला स्वतःस उत्सुकता आहे की "आप" किती मतांनी जिंकले आहे (जागांनी नाही). विशेष करून जिथे त्यांनी भाजपाच्या उमेदवारांना हरवले आहे तिथे. जर फरक जास्त नसेल तर ते अजून एक वाईल्ड कार्ड ठरू शकते.

दुव्यावरुन आपल्या लक्षात येईल की मतांचा फरक किती होता. आम आदमी पार्टी बारा ठिकाणी मला दुस-या क्रमांकावर दिसत आहे, एक दोन मोठे फरक सोडले तर पाचहजाराचा फरक आहे, अर्थात हा फरक मोठाच आहे. पण, ३२६, १७९६, १११२, २८०९ अशा फरकाने आम आदमी पार्टीचे उमदेवार पराभूत झालेले दिसतात.

हे चारही जरी निवडून आले तरी ३२ ही संख्या होत होती आणि भाजपची २८. असो, हे जरी सोडले तरी मतांची गोळाबेरीज पाहता आमाआदमी पार्टीने मतं खूप घेतली आहेत, आणि निवडणूक झाली तर आआपाला खूप संधी आहे, असे वाटते.

मायबोलीवर एक दिल्लीकर म्हणत होती की तिच्या आजूबाजूच्या लोकांना आआपाची इतकी लोक निवडून येतील असं वाटलं नव्हतं म्हणून काहींनी भाजपाला तर काहींनी काँग्रेसला मतदान केलं. आता संधी मिळाली तर ते मतदार आआपाला मतदान करतील. अर्थात आपले हे तर्कच.

-दिलीप बिरुटे

विकास's picture

9 Dec 2013 - 8:28 pm | विकास

आप ला जे काही यश मिळाले आहे त्यात केजरीवाल यांनी घेतलेला राजकारणात शिरण्याचा निर्णय आणि त्यातील धोका निश्चितच कौतुकास्पद आहे. पण तरी देखील काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे वाटते...

  1. केजरीवाल हे अण्णांच्या आंदोलनात सहकारी-नेते होते, असे आंदोलन ज्याला दिल्लीत (आणी इतरत्रही) प्रचंड पाठींबा मिळाला होता.
  2. हे आंदोलन गेल्याच वर्षी झाल्याने आणि त्यात अण्णांच्या खांद्यास खांदा लावून नेतृत्व केल्याने केजरीवाल यांना नवीन पक्षस्थापनेस लागणारे नैतिक भांडवल मिळाले (इतर आर्थिक भांडवल त्यांना भारतातून आणि परदेशातून मिळाले हा भाग सोडून द्या).
  3. निवडणूका लगेच असल्याने त्या नैतिक भांडवलाचा नक्कीच फायदा झाला आणि त्यात गैर काही नाही, योग्यच होते.
  4. पण आता जनतेने निवडून दिले आहे. आता कुठलेही आंदोलन चालू नाही आणि तसे देखील तेच तेच आंदोलन करून काही फायदा होत नाही हे देखील वास्तव आहे. ते व्हिपि सिंगनी पाहीले आहे, अडवाणी-भाजपाने पाहीले आहे आणि केजरीवाल देखील बघतील. (रामदेवबाबांचे आंदोलन देखील त्यांचे फॉलोअरपब्लीक विसरले). जनतेला सकारात्मक देखील हवे असते.
  5. जर दिल्लीत कुणाचेच राज्य आले नाही आणि राष्ट्रपती राजवटीमुळे सहा महीन्यांनी निवडणूका घेण्याची वेळ आली तर आप च्या आमदारांना काही काम दाखवायची अथवा जनतेसमोर सकारात्मक गोष्टी करून दाखवता येणार नाही ज्यासाठी जनतेने त्यांना निवडून दिले आहे. थोडक्यात एक अण्णांच्या आंदोलनाचे अपत्य इतका बायोडेटा सोडल्यास बाकी अनुभव शून्य! त्याचे कसे परीणाम होतील अथवा त्यासाठी आप चे नेते कसे धोरण आखतील यावर त्यांचे भविष्य ठरेल असे वाटते.

(मला स्वत:स आप एक पक्ष म्हणून पुढे यावा असे वाटते, फक्त "क्यो ना, करले आप से प्यार हम, आहीस्ता आहीस्ता" असेच. ;) )

विद्युत् बालक's picture

9 Dec 2013 - 8:47 pm | विद्युत् बालक

केजारीवांची "आप" सध्या टिळकांच्या कोन्ग्रेस सारखी स्वछ वाटत जरी असली तरी काही सदस्यान वरून तिचे गांधीची कोन्ग्रेस व्यायला जास्त वेळ लागणार नाही .
शिवाय त्यांनी ज्या अव्यावहारिक घोषणा केल्या आहेत त्याचे काय ?
भारताला सध्या अत्यंत कणखर दट्ट्या मारून काम करून घेणाऱ्या व प्रसंगी वेठीस धरून अधिकाऱ्यांकडून कामे करवून घेणाऱ्या पंतप्रधानाची सक्थ गरज आहे !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Dec 2013 - 9:58 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अरविंद केजरीवालांना लोकप्रियता अण्णांमुळे मिळाली असे ग्रहित धरले तरी ऐन निवडणूकीच्या वेळी श्री अण्णांनी आणि रामदेव बाबांनी खुल्या दिलानं फूल सपोर्ट अरविंद केजरीवालांना केलेला नाही, श्री अण्णा जर अरविंद केजरीवालांसोबत राहीले असते तर आणखी आआपाच्या काही उमेदवारांना फायदा झाला असे वाटले. अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या टीमचाच हा सध्याचा विजय आहे, असे मला वाटते.

बाकी, भांडवलाच्या मुद्याशी सहमत. तो फायदा आआपाचा झालाच आहे. दिल्लीत तरी आआपाला सत्ता स्थापन करायची संधी मिळायला पाहिजे होती असे व्यक्तिगत मला वाटते.

-दिलीप बिरुटे

अधिराज's picture

9 Dec 2013 - 10:52 pm | अधिराज

दिल्लीत तरी आआपाला सत्ता स्थापन करायची संधी मिळायला पाहिजे होती असे व्यक्तिगत मला वाटते.

+१, असेच वाटते.

>> थोडक्यात एक अण्णांच्या आंदोलनाचे अपत्य इतका बायोडेटा सोडल्यास बाकी अनुभव शून्य!
-- आप ला गव्हर्नन्सचा अनुभव नसला तरी या एका निवडणुकीचा अनुभव बक्कळ आहे. ते आपल्या विधानसभा सीटा नक्की राखतील. सर्वात महत्वाचं म्हणजे "आप"कडे लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुका लढवायला मुद्दा एकच आहे. त्यांना एकाच प्रयत्नात, खर्चात लोकसभा आणि विधानसभेचा प्रचार करता येईल आणि पब्लीक विल डेफीनेटली बाय देअर मॅनीफेस्टो. किंबहुना हि आप करता फार मोठी इष्टापत्ती व संधी देखील असेल. दिल्ली काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत विजयाची तशीही काहि आशा नाहि. मोदीला रोखायला काँग्रेस आपली सगळी छुपी मदत आप च्या मागे एकटवेल. अण्णा हजारेंना आप ला मदत न करण्याची चुक उमगली आहे. त्यांचे रिसेण्ट स्टेटमेण्ट्स त्याची साक्ष देतात. पुढील निवडणुकीत अण्णांचा सक्रीय पाठिंबा आप ला मिळाला तर आश्चर्य वाटायला नको. केजरीवालला हे समीकरण अगोदरच उलगडलं असणार... म्हणुनच ते दिल्ली राज्य सरकार बनुच नये या प्रयत्नात आहेत.

कुठले मतदारसंघ हे अटीतटीने लढले गेले हे ठरवण्यासाठी ५% पेक्षा जिथे (जिंकलेल्यात आणि हरलेल्यात) कमी फरक आहे असे शोधले तर काय दिसते?

भाजपाने असे आप कडून २ तर काँग्रेसकडून ० जिंकलेत (बाकी जिंकलेले आप संदर्भात ५% च्या वर ६७% पर्यंत आहे तर काँग्रेस संदर्भात ६२% पर्यंत आहेत).

"आप" ने भाजपा कडून ७ जिंकले आहेत आणि इतर ५%च्या वर ४०% पर्यंत आहेत तर काँग्रेसकडून ५% च्या आत ० आहेत ५%च्या वर ५८% मतांनी जिंकले आहेत.

काँग्रेसने आप कडून ५% च्या १ आणि उरलेल्या २ जागा २७% आणि ५२% इअक्या फरकाने जिंकल्यात तर भाजपाकडून एक जागा ५% च्या खाली तर उरलेल्या ४ जागा या २५-४७% इतक्या फरकाने जिंकल्यात...

याचा "काहीसा" अर्थ आप लगेच निवडणूका झाल्या तर ७+२+१ म्हणजे १० जागा, अर्थात ३ अधिक जिंकू शकतो कारण त्या डायसी आहेत अथवा तितक्याच गमावू देखील शकतो. थोडक्यात आत्ताच्या गणिताने २८+३ म्हणजे बहुमतास कमीच पडण्याची शक्यता अधिक वाटत आहे. अर्थात हे अतिसुलभ विश्लेषण आहे याची मला कल्पना आहे आणि ते केवळ पटकन करता येण्यासारखे विश्लेषण म्हणून केले आहे... आप कसे हरू शकते वगैरे दाखवायला नाही. ते कळण्यासाठी अभी दिल्ली बहौत दूर है! :)

पण लोकसभेसोबतच विधानसभा पुनर्मतदानासंबंधी एका वाक्यात शक्यता मांडायची असल्यास सर्वात जास्त फायदा आप चा होईल असं मला वाटतं.

विकास's picture

9 Dec 2013 - 6:07 pm | विकास

राहूल गांधीं आणि सोनीया गांधींच्या प्रभावी नेतृत्वामुळे काँग्रेसला आज मिझोराममधे निर्विवाद बह्मत प्राप्त झाले आहे! तेंव्हा (त्या निमित्ताने) अभिनंदन! ;)

टवाळ कार्टा's picture

9 Dec 2013 - 6:42 pm | टवाळ कार्टा

गिरे तोभी टांग उप्पर :)

बॅटमॅन's picture

9 Dec 2013 - 6:44 pm | बॅटमॅन

मध्ये कधीतरी नेमके असेच होऊनही बीजेपी तोंडावर पडली होती. तेव्हा नमो पंतप्रधान होण्याअगोदर जरा दमानं ;)

दर्यावर्दी's picture

9 Dec 2013 - 7:40 pm | दर्यावर्दी

अभिनंदन, खरोखरच फेकूची लाट कुठेच नाही.

विद्युत् बालक's picture

9 Dec 2013 - 7:49 pm | विद्युत् बालक

तुम्ही सर्व तिघे चौघे मिळून कोपरयात आत्ममंथन का करीत नाही ?

बाकी ग्रेट्या च्या "जहाजाचे " तुम्ही दर्यावर्दी का?

विकास's picture

9 Dec 2013 - 8:01 pm | विकास

फेकूची लाट कुठेच नाही कारण फेकू कोणीच नाही आहे. तो शब्दप्रयोग करणारे दिग्गीराजा देखील तो शब्द आता वापरेनासे झाले आहेत. आणि तसे देखील त्यांचे (मोदींचे) विरोधक लाटेला घाबरण्याऐवजी त्यांची क्रेडीबिलीटी कमी करण्याची इच्छा बाळगून होते आणि ते भाजपला अपयश आले असते तरच झाले असते. असो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Dec 2013 - 10:24 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

दिल्लीचं काय ठरतंय म्हण ?

-दिलीप बिरुटे