गाभा:
आम्हाला कविता करन कधी जमलच नाही . पण कविता वाचायला भारी आवडत.
काही गोड प्रसंगी इतरांच्या कविता स्वतच्या नावावर खपवायचा प्रयत्न हि केला .
पूर्वी एका वर्तमान पत्रात कवितेचा एक खेळ यायचा .
तोच खेळ येथे देत आहे .
या खेळाचे नियम फार सोपे आहेत .
मी तुम्हाला काव्याच्या दोन पंगती देत आहे .
तुम्ही प्रतिसादात कमीतकमी दोन जास्तीतजास्त चार ओळी लिहा .
नवरसा पेकी कुठल्या हि रसाच्या आसु द्या .
फक्त वरच्याशी जुळणाऱ्या आणि खालच्याला पूरक आसु द्या .
मी खाली माझ्या दोन ओळी देत आहे .
" माझ्या मनात तुझे येणे -जाणे,
कठीणनच आहे शब्दात पकडणे "
प्रतिक्रिया
2 Dec 2013 - 11:11 am | पैसा
उदाहरण म्हणून तुम्हीच एक दोनोळी कविता द्या बघू!
2 Dec 2013 - 11:29 am | अनिल तापकीर
ध्यानी, मनी, स्वप्नी तुच तु |
माझी जीवनसाथी तुच तु |
जमले की नाही माहीत नाही पण असेच लिहले आहे.
2 Dec 2013 - 11:37 am | जेपी
" कुणी मोजले तारे अनंत , शिशीरांची पानगळ मोजलीय कुणी "
2 Dec 2013 - 11:46 am | मिसळलेला काव्यप्रेमी
तथास्तु! :)
2 Dec 2013 - 11:49 am | आनन्दा
माझे २ पैसे.
या विश्वाचा जो निर्माता
तुझा न माझा जीवनदाता
त्याचे या सार्यातील असणे
तसेच वाटे तुझे वाहणे
त्या देवाला कुणी पाहिले
मनात येता कैसे कळले
विश्वच त्याचे, त्याचे सारे
श्वासच त्याचे, शीतल वारे
त्या श्वासांसम शीतल परि तू
आनंदाची मंद झुळुकशी
कसे न कळले मला तुझे पण
श्वासांसोबत येणे जाणे
2 Dec 2013 - 11:52 am | अत्रुप्त आत्मा
@मी तुम्हाला काव्याच्या दोन ""पंगती"" देत आहे >>> =)) ठ्ठो! =)) ठ्ठो! =))
2 Dec 2013 - 11:55 am | मिसळलेला काव्यप्रेमी
आत्मुस.. मेल्या समजून घे रे... :-|
2 Dec 2013 - 11:59 am | थॉर माणूस
:))
चला पंगतीला बसू या...
2 Dec 2013 - 2:11 pm | बॅटमॅन
=)) =)) =))
2 Dec 2013 - 12:35 pm | वेल्लाभट
असा धागा एका दुस-या काव्यविषयक संकेतस्थळावर बघितला होता. एक काफिया घेऊन त्यावर शेर जोडत महागजल झाली होती.
हा काफिया बघा कसा वाटतो; त्यापुढे सुचल्यास आपले शेर जुळू द्यात.
स्वतःला असे मी जपावे कशाला
जगापासुनि मी लपावे कशाला
...
2 Dec 2013 - 1:00 pm | आनन्दा
माझीच माती, माझीच नाती,
पसार्यातुनी मी पळावे कशाला
2 Dec 2013 - 1:05 pm | पैसा
मस्त चाललंय! इथे विडंबन चालेल का नाही?
2 Dec 2013 - 1:11 pm | जेपी
चालेल हो ताई . नवरसापैकी काहीही चालेल
2 Dec 2013 - 1:26 pm | यसवायजी
'कठीणच आहे' का 'कठीण नच आहे'
मला एकंदरीतच कठीण वाटतंय.
2 Dec 2013 - 2:11 pm | बॅटमॅन
ऐयो काय श्लेष बे तोऽ, भाळ छंद अदं इदु!
2 Dec 2013 - 3:20 pm | ज्ञानोबाचे पैजार
माझ्या मनात तुझे येणे -जाणे,
कठीणच आहे शब्दात पकडणे
आज जरा भांडी नीट विसळणे
रोज खपवुन घेणार नाही
भांड्यांना पावडर तशीच रहाणे
आता वेल्लाभटांचा काफिया
स्वतःला असे मी जपावे कशाला
जगापासुनि मी लपावे कशाला
कंड सुटता हवे लाजणे ते कशाला
मुठी घट्ट आवळीत बसावे कशाला
काय म्हणावे अशा वागण्याला
त्वरीत करावे सुरु खाजवायला
3 Dec 2013 - 7:51 pm | सुहास..
_/\_
दंडवत घ्या बुवा !!
अरे क्काय दोन ओळीतच खाज काढली आहे ...लय भारी .
असो @ तथास्तु ..
तुमचा आजचा धागा, काही प्रतिसाद , व सही बघुन आम्हाला मच्या एक जुन्या मित्राची आठवण येत रहाते..असो ..
@वेल्लाभट ..
स्वतःला असे मी जपावे कशाला
जगापासुनि मी लपावे कशाला
पात्र असो वा नसो, मैदानात, उतरावे कशाला
बोर्ड फुकाट म्हणुनी काय लगेच नाचावे कशाला
हा घ्या ...पुढे
स्टॅमिनाचा कस आजमावत पावसांत दोने रेनकोट घालुन टृकिंग ला जाणारा ..
वाश्याकेष डिवचरकर ;)
3 Dec 2013 - 8:07 pm | जेपी
@सुहास जुन्या मित्रांची आठवण ठेवली आमची पण ठेवा .
सही -सही काय बदलत राहते . येथे सही विचारतात उद्या धनादेश पुस्तीका मागतील . ह घ्या .
(once upon a time in ... ) हे शिर्षक चोरलेला -तथास्तु
2 Dec 2013 - 5:14 pm | राजेंद्र मेहेंदळे
स्वतःला असे मी जपावे कशाला
जगापासुनि मी लपावे कशाला
======
भले किर्र अंधार वाटेवरी ह्या
तरी मार्ग सोडुनी जावे कशाला
असे रात्र थोडी आणि फार सोंगे
तरी खिन्न होउनी गावे कशाला
जरी भोवती गारठा भितीदायी
उद्याची असुदेत आशा मनाला
3 Dec 2013 - 7:30 pm | अभ्या..
स्वतःला असे मी जपावे कशाला
जगापासुनि मी लपावे कशाला
.
असता स्मार्टफोन उशाला.
रात्रभर जागावे कशाला.
.
इन्फेक्शन कासवाच्या घशाला.
काळजी का असावी सशाला.
.
है का अजुन कोणी यमक हराम ?;-)
2 Dec 2013 - 6:00 pm | प्रसाद गोडबोले
छान आयडीया !!
अवांतर : ह्यावरुन आठवले गेल्या कित्येक दिवसात काहीच नवीन काव्य बिव्य सुचलं नाहीये :(
3 Dec 2013 - 7:22 pm | देशपांडे विनायक
आता वेल्लाभटांचा काफिया
स्वतःला असे मी जपावे कशाला
जगापासुनि मी लपावे कशाला
स्वतःस शहाणे मानावे कशाला
मिपावरी जगावे कशाला
3 Dec 2013 - 7:28 pm | जेपी
स्वता:स शहाणे मानावे कश्याला ,
मिपावरी जगावे कशाला ,
प्रतिसाद तरी द्यावा कशाला ,
स्वता:चे हसे करावे करावे कशाला.
3 Dec 2013 - 7:40 pm | देशपांडे विनायक
माझ्या मनात तुझे येणे -जाणे,
कठीणच आहे शब्दात पकडणे
पाहुनी मित्रासवे तुझे बागडणे
कठीणच आहे तुझा हाथ पकडणे
4 Dec 2013 - 4:39 am | स्पंदना
माझ्या मनात तुझे येणे -जाणे,
कठीणच आहे शब्दात पकडणे
नको वाटतो मज फेर आठवांचा
नको लोभ पुन्हा त्या ओष्ठ्द्वयांचा
नको रात्र सारी तू स्वप्नात माळु
स्वप्नभंगात फिरुनी दुभंगुन जाणे
नको खेळ पुन्हा त्या जुन्या बंधनांचा
नको स्पर्शभास शरीरा तयाचा
नको रे पुन्हा त्या विरहात जाळु
नको पहाटेला दवथेंबात न्हाणे
नको वाटतो वायु यमुना तिरीचा
नकोच कदंब बिना सावलीचा
नको सूर वाहू जळी बासूरीचा
नको घटाचे दुभंगुन जाणे
का घडवीशी पाषाण या राधिकेचा
विसरली हास्य मधुर, विसर पडे जगाचा
तरीही श्वास घेणे हा नियम या धडाचा
........
कुणीतरी मदत करा भाऊ/तायांनो.
4 Dec 2013 - 9:34 am | पैसा
इथे काही खरेच चांगल्या कविता वाचायला मिळताहेत!
4 Dec 2013 - 5:17 pm | स्पंदना
उरे कैद शिल्पी ते स्मित जीवघेणे ॥
शेवटचे कडवे
का घडवीशी पाषाण या राधिकेचा
विसरली हास्य मधुर, विसर पडे जगाचा
तरीही श्वास घेणे हा नियम या धडाचा
उरे कैद शिल्पी ते स्मित जीवघेणे ॥
5 Dec 2013 - 3:56 pm | ऋषिकेश
या निमित्ताने फार वर्षांपूर्वी इथेच मिपावर मी आणि प्राजु यांनी मिळून एक गमतीदार खेळ सुरू केला होता त्याची आठवण झाली
त्याचे दुवे:
गोफ-१
गोफ-२
21 Dec 2013 - 2:42 pm | प्रीत-मोहर
अपर्णा तै __/\__