प्रेरणा स्त्रोत : http://misalpav.com/node/22376
राम राम मंडळी
अधुन मधून कुणीतरी काहीतरी माहिती इमेलवर देत असतं.
कुठल्या तरी लिंका असतात.
काहीतरी अनुमान, निष्कर्ष असतात,
काही मजेशीर असतात.
काही गंभीर असतात.
अशीच एक लिंक नुकतीच मिळाली.
त्यात तुमचा दिवस उत्तम जाण्यासाठी काय करावे ही माहिती होती.
त्यात इसबगुल चांगले की कायम चूर्ण या विषयी सल्ले होते.
तसेच वेगवेगळ्या रेचकांसंबन्धी रोचक अशी काही माहिती त्यात दिली आहे.
मिपावर अनेक सदस्य रेचक विषयाबद्दल बरेच काही जाणून असतात अशी खात्री आहे.( इनो आणि त्याचा स्टॉक याबद्दल तर हमखास)
तेव्हा या लिंकमधे असलेल्या माहितीत कितपत तथ्य आहे, याबद्दल विचारावे म्हणून धागा काढला आहे.
या यादीत पेरु ,पपई . चिंच , टॉमॅटो ,चेरी , सफरचंदाचा रस ,जर्दाळू ,चिकोरी , आंबा , चिंगम ,द्राक्षे , बदाम, संत्री , खजूर, आमटी ( कढी?) , चहा या सर्वांचाच उल्लेख रेचक म्हणून केला आहे . यातच पाम ट्री( नारळाचे झाड?) याचाही उल्लेख रेचक म्हणून केलेला आहे. ( नारळाच्या झाडाचा रेचक म्हणून कसा वापर करायचा ते कोणाला ठौक आहे का? त्याचे काही पथ्य आहे का?
(एकोळी धागा समजून रेचकीय कारवाई होऊ नये म्हणून दोन चार ओळी सुद्धा टंकल्या आहेत )
प्रतिक्रिया
30 Jul 2012 - 12:49 pm | इरसाल
एक बदल अपेक्षीत
इसबगुल = इसम गुल.
हे रेचक प्रमाणा बाहेर घेतल्यास इसबगुलचा इसमगुल होवु शकतो.
30 Jul 2012 - 12:50 pm | गवि
अत्यंत रेचक आपलं, रोचक लेख.... तज्ञांचे मत जाणण्यास उत्सुक..
आलोच पाच मिनिटांत... ;)
30 Jul 2012 - 5:34 pm | स्पंदना
नारळाच्या झाडाचा रेचक म्हणून कसा वापर करायचा ते कोणाला ठौक आहे का?
आता? प्रश्नातच उत्तर हाये विजुभु. ठोक ठोक ठोकुन रेचायच्! हाय काय अन नाय काय? काय?
बाकि ते बावडी बद्दल लिहिणारे तुम्हीच विजुभाउ ना?
31 Jul 2012 - 10:39 pm | किचेन
नारळाच्या झाडाला कल्पव्रुक्ष म्हन्तात....असेल रेचक म्हणुनहि कहिना काहि उप्योग होत असेल.
31 Jul 2012 - 11:28 pm | पैसा
पथ्य आहे. त्यामुळे प्रतिक्रिया नंतर.
11 Nov 2013 - 7:21 pm | विजुभाऊ
अरेरे.इतक्या जिव्हाळ्याच्या विषयावर मौन का बाळगलय?
11 Nov 2013 - 8:13 pm | चित्रगुप्त
वेचक आणि चेचक
पाचक आणि वाचक
रोचक आणि बोचक
म्हणिजे रेचक नव्हे
सूचक आणि मूचक
लुंचक आणि तुंचक
खेचक आणि भेचक
म्हणिजे रेचक नव्हे
अंतुरी सासूसि खाय
गर्दभीस च्यार पाय
रेचक म्हणिजे काय
मज निरोपावे.
जय जय रघुवीर समर्थ.
11 Nov 2013 - 9:50 pm | खटासि खट
एक फणसाची गोष्ट आठवली.
12 Nov 2013 - 3:34 pm | जेपी
त्रिफळा चुर्णा घ्या आता .
धाग्याच त्रिफळा उडालाय केव्हांच
12 Nov 2013 - 4:54 pm | अनुप ढेरे
हे नाना चेंगट आता का लिहित नाहीत? काही लेख आवडले होते त्यांचे.