गाभा:
आशिया चषकातंर्गत बांग्लादेशविरुद्ध सामन्यात सचिन तेंडुलकर ९७ धावांवर खेळतोय. सचिन महाशतक पूर्ण करेल, असे वाटते. १०० झाले तर धागा ठेवतो. नै तर...
सचिन तेंडुलकरने आज वर्षभराच्या प्रतिक्षेनंतर भारतीय क्रिकेट प्रेमींना महाशतकाची भेट दिली. अनेकांचा लाडका सच्या महाशतक कधी करतो इथपासून तर सच्यानं आता रिटायर व्हायला हवं अशी कुजबुज करणार्यांना आपल्या लौकिकाला (?) साजेशी खेळी करत गेल्या काही दिवसापासून फॉर्ममधे नसलेल्या सच्यानं आज जगभरातल्या क्रिकेट रसिकांना आज महाशतकी खेळी करुन एक आनंदाची मेजवानी दिली.
सच्याचे मनःपूर्वक अभिनंदन. :)
सच्याच्या महाशतकाची यादी [दुवा म.टा] आणि सच्याची क्रिकेट कारकिर्द [दुवा क्रि. इन्फो]
[छा. जालावरुन साभार]
प्रतिक्रिया
8 Nov 2013 - 12:51 pm | यशोधरा
घ्या की वाव! कोणी थांबवलय तुम्हांला? :D
8 Nov 2013 - 4:46 pm | प्यारे१
काय टिपर्या खेळणं चाललंय रे?
- वयाने नि आकाराने मोठ्या ;) वल्ल्याचा लहान काका प्यारे
8 Nov 2013 - 5:14 pm | बॅटमॅन
तुम्हाला कस्ली टिपीरघाई लागलेय प्यारेकाका ;)
अति अवांतरः रायगड ट्रेक, विशेषतः खाली उतरताना एकदम अविस्मरणीय आहे असे ऐकून आहे, त्याबद्दल कांय मत आहे ;)
8 Nov 2013 - 5:27 pm | प्यारे१
अतिअवांतर साठी :
स्पोर्ट शूज ने दगा दिला रे. त्यामुळे घसरत होतो.
विशेष काही नाही, तंतरलो होतो.
तुझ्या मराठीत फा ट ली होती.
:)
8 Nov 2013 - 5:30 pm | बॅटमॅन
कर्तनविषयक उपरोल्लेखित शब्द आमच्या मराठीत असून तुमच्या मराठीत नसल्याचे भासवण्याचा केविलवाणा प्रयत्न केल्याबद्दल प्यारेकाकांना शुभेच्छा!!
9 Nov 2013 - 9:35 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
चलो वानखेडे स्टेडियम. सच्याचा आंतराष्ट्रीय कारकिर्दीतील अखेरेचा सामना मुंबईत होतोय. सच्याचे कोणी फ्यान म्याच बघायला जाणार असतील तर लाइव्ह अपडेट्स टाका प्लीज.
-दिलीप बिरुटे
9 Nov 2013 - 9:40 am | प्रचेतस
सच्याचे डायहार्ड फ्यान ठाणेकार माननीय किसनरावजी शिंदेसाहेब वानखेडेवर जातील असे वाटतंय तर खरं.
9 Nov 2013 - 9:47 am | पैसा
कुठेतरी वाचलं की ७०% तिकिटे राखीव आहेत आणि साधी तिकिटे उपलब्ध आहेत. पहिली म्याच अडीच दिवसात संपली हे पाहता दुसर्या म्याचची ४थ्या ५ व्या दिवसाची तिकिटे विकत घ्यायची म्हणजे रिस्कच!
9 Nov 2013 - 9:50 am | प्रचेतस
अहो मा. किसनरावजी म्हणजे अगदी डायहार्ड फ्यान सच्याचे. सच्याने आधीच ५०० तिकिटे मागून राखून ठेवलीत म्हणे. किसनदेवांना देईल की तो एक तिकिट हाकानाका.
9 Nov 2013 - 9:52 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नै नै मला नै वाटत ते म्याच पाह्यला जातील. सर्व सच्या फ्यान क्लबचं असंच आहे. हापिसात लै कामं आहेत म्हणतील. आणि अधून मधून या धाग्यावर सच्यावर काही लिहून आलं की उपप्रतिसाद लिहितील.
-दिलीप बिरुटे
9 Nov 2013 - 10:04 am | प्रचेतस
मग ह्यांना खरंच फ्यान म्हणायचं का?