सच्याचे शंभर.........

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे in काथ्याकूट
16 Mar 2012 - 4:27 pm
गाभा: 

आशिया चषकातंर्गत बांग्लादेशविरुद्ध सामन्यात सचिन तेंडुलकर ९७ धावांवर खेळतोय. सचिन महाशतक पूर्ण करेल, असे वाटते. १०० झाले तर धागा ठेवतो. नै तर...

सचिन तेंडुलकरने आज वर्षभराच्या प्रतिक्षेनंतर भारतीय क्रिकेट प्रेमींना महाशतकाची भेट दिली. अनेकांचा लाडका सच्या महाशतक कधी करतो इथपासून तर सच्यानं आता रिटायर व्हायला हवं अशी कुजबुज करणार्‍यांना आपल्या लौकिकाला (?) साजेशी खेळी करत गेल्या काही दिवसापासून फॉर्ममधे नसलेल्या सच्यानं आज जगभरातल्या क्रिकेट रसिकांना आज महाशतकी खेळी करुन एक आनंदाची मेजवानी दिली.

सच्याचे मनःपूर्वक अभिनंदन. :)

सच्याच्या महाशतकाची यादी [दुवा म.टा] आणि सच्याची क्रिकेट कारकिर्द [दुवा क्रि. इन्फो]

Sachin-Tendulkar
[छा. जालावरुन साभार]

प्रतिक्रिया

दादा कोंडके's picture

16 Mar 2012 - 4:32 pm | दादा कोंडके

अवांतरः खुद्द संपादकाचाच (शतकी प्रतिसादाच्या लोभाने काढलेला) एकोळी धागा बघून कुणा-कुणाला एक मिपाकर म्हणून शरम वाटली, त्यांनी हात वर करा बघू! :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 Mar 2012 - 4:41 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सच्याचे अभिनंदन.......! :)

सच्याच्या नावावर कोणी काहीही लिहिलं (भलं बुरं ) तरी शंभर प्रतिसाद येतील. सच्याविषयी सर्वांनाच खूप बोलायचे असणार आहे. एकाच विषयावर असे खूप धागे येऊ नये म्हणून मी पुढाकार घेतला. अर्थात अन्य कोणीही धागा काढला तरी माझी कै हरकत असणार नाही. असं माझं मत आहे.

-दिलीप बिरुटे

दादा कोंडके's picture

16 Mar 2012 - 6:46 pm | दादा कोंडके

भर घालतो रे बाबा अन्य संपादकाला सांगून

धपमन्यवाद!

उद्या वृत्तपत्रांमध्ये बजेटच्या ऐवजी याच बातम्यांनी पानं भरतील. शेवटी लोकांच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे हा. (असा एक अकारण हिणकस शेरा मारून मधल्या आळीचं नाव सार्थ करीत हा प्रतिसाद पूर्ण करतो.) :)

यकु's picture

16 Mar 2012 - 4:37 pm | यकु

100 !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

झाले एकदाचे. सुटला बिचारा.

मृत्युन्जय's picture

16 Mar 2012 - 4:43 pm | मृत्युन्जय

तो कसला आपण सुटलो. आता सचिन ६ वर बाद झाल्यावर सचिन फिर एक बार १०० वे शतक से चूके वगैरे हास्यास्पद विधान ऐकायला मिळणार नाही याचा प्रचंड आनंद होतो आहे.

१०० बे शतक काय हो तो करणारच होता. त्याने नाही करायचे तर अजुन कोणी करायचे

बाकी देवाचे काय अभिनंदन करायचे म्हणा.

सुटतोय कसला? आता वनडेतल्या ५० व्या शतकाचा पाठलाग! आता "फिर एक बार ५० वे शतक से चूके!" चूकना इज डेस्टिनी! आणि स्टार न्यूज्/इंड्या टीव्ही (आणि तत्सम मानसिकतेची लोकं) बरोब्बर तेच पकडणार! तू असो, मी असो, देव असो, कुणी असो!

कापूसकोन्ड्या's picture

16 Mar 2012 - 4:39 pm | कापूसकोन्ड्या

सचिन सचिन सचिन सचिन सचिन सचिन सचिन सचिन सचिन सचिन सचिन सचिन सचिन सचिन सचिन सचिन सचिन सचिन सचिन सचिन सचिन सचिन सचिन सचिन सचिन सचिन सचिन सचिन सचिन सचिन सचिन सचिन सचिन सचिन सचिन सचिन सचिन सचिन सचिन सचिन सचिन सचिन सचिन सचिन सचिन सचिन सचिन सचिन सचिन सचिन सचिन सचिन सचिन सचिन सचिन सचिन सचिन सचिन सचिन सचिन सचिन सचिन सचिन सचिन
दुसरे नावच येत नाही काय करू????

सुटला गं बाई सुटला...शतक करून सच्या गं बाई सुटला...हुश्श्श्श्श्श्श्श..................

स्पंदना's picture

16 Mar 2012 - 4:51 pm | स्पंदना

ह्येच म्हणेन! शेवटी बांगलादेशात जाउन च कराव लागल का? जरा नामवंता समोर ठोकाय्च होत दणक्यात. पण काही का असेना आम्हाला त्याच अभिनंदन करायला अतिशय आनंद होतोय. उगा कोणी का कळमळतेस अस म्हणायला नको.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 Mar 2012 - 5:01 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मी मागे कोणत्या तरी एका धाग्यात प्रतिसादात म्हटलं होतं की सच्याच्या महाशतकासाठी बांगलादेश किंवा नेदरलँड्शी एकदिवसीय सामने आयोजित करावेत. आणि नेमकं सच्याने आज आशिया चषकाच्या अंतर्गत बांग्लादेशविरुद्ध शतक पूर्ण केले. च्यायला, माझं म्हणनं इतकं खरं ठरेल असं वाटलं नव्हतं. ;)

अर्थात सच्या बाद झाला तो फटका तर लैच वाईट होता. असो...

-दिलीप बिरुटे

याआधीची पाच - आफ्रिका, इंग्लंड, आफ्रिका, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया यांच्याविरूद्ध आहेत. आता टेन्शन फ्री झाल्यावर पूर्वीसारखा खेळला तर मजा येइल.

मेघवेडा's picture

16 Mar 2012 - 5:47 pm | मेघवेडा

बांगला विरूद्ध असले म्हणून काय झाले

+१. मी जरी बोलिंग टाकली तरी त्याला रन्स स्कोअर करावेच लागतात! माझ्यासारखा टुकार बोलर आहे म्हणून १०० फुकट मिळत नाहीत!

नाही, आणि शतकांची आकडेवारी बघाच :

वि. ऑस्ट्रेलिया - २०
वि. श्रीलंका -१७
वि. द. आफ्रिका - १२
वि. इंग्लंड -९
वि. झिंबाब्वे - ९ (नव्वदच्या दशकात दरवर्षी पाडवा, बैसाखी, मोहरम, गणपती, रमजान ईद, दसरा, दिवाळी, नाताळ सगळं साजरं करायला झिंबाब्वे आपल्याकडे यायची हे लक्षात घ्यावं!)
वि. पाकिस्तान - ७ (आपण सामनेही कमीच खेळलोत पाकिस्तानसोबत. तरी ७!)
वि. विंडीज - ७
आणि बांग्लाविरुद्ध ६! त्यातही वनडेतलं पहिलंच.

बांग्लादेशने पकिस्तानला या अगोदर दण्का दिलाय हे विसरताय वाटतं

शेखर काळे's picture

19 Mar 2012 - 12:46 am | शेखर काळे

बांगलादेशाच्या विरुद्ध हे त्याचे पहिलेच शतक आहे .. ते कधीतरी करायलाच पाहिजे होते.
ते नेमके शंभरावे झाले.
आणि नामवंत म्हणजे कसं ? बांगलादेशाने देखील भारताला हरवलेच ना ?

- शेखर काळे

स्पा's picture

16 Mar 2012 - 4:44 pm | स्पा

चला सचिन ची ब्रांड व्यालू परत वाढेल.. अजून खर्बो रुपये कमवेल. .चालुन्द्यात

कापूसकोन्ड्या's picture

16 Mar 2012 - 5:02 pm | कापूसकोन्ड्या

चला सचिन ची ब्रांड व्यालू परत वाढेल.. अजून खर्बो रुपये कमवेल. .चालुन्द्यात

का हो असे? वाढूदेत की ब्रांड व्यालू तुम्हाला काय ती द्यावी लागते. उगाच काहीतरी किफलक बदवताय?
इनो घ्यायला सुद्धा माणूस बरोबरीचा असावा लागतो
असो! अभिनंदन!

इनो घ्यायला सुद्धा माणूस बरोबरीचा असावा लागतो

मला इतकं आवडलय म्हणुन सांगु हे वाक्य...!!!!

काको आणि पिरा,
स्पावड्‍यानं मुद्दाम खवचटपणा केलाय हो... तो पण तिकडे फटाके फोडत असेल.. ;-)
पण 'इनो घ्यायला पण माणूस बरोबरीचा लागतो' या मौक्तिकाची भर घातल्याबद्दल थँक्यू.. ;-)

:)

येश्या लेका.. तू पण लगेच कशाला स्पष्टीकरण देत बसतोस :)

अत्रुप्त आत्मा's picture

17 Mar 2012 - 9:26 am | अत्रुप्त आत्मा

@तू पण लगेच कशाला स्पष्टीकरण देत बसतोस >>> बघा बघा यक्कूशेठ ,कोणाकोणाला कुठेकुठे फटाके फोडायची इच्छा असते ते... ;-)

sneharani's picture

16 Mar 2012 - 4:46 pm | sneharani

सचिनचे अभिनंदन १०० व्या शतकासाठी!!मस्त वाटलं ऐकून!
बिरुटे काका धागा अपडेट करा प्रतिसाद लिहून!!! ;)
:)

अत्रुप्त आत्मा's picture

16 Mar 2012 - 5:12 pm | अत्रुप्त आत्मा

खरचं सुटला....एकदाचा.... अभिनंदन त्याचे.. :-)

पण अता खरोख्खर सुटतील त्या सगळ्या वाहिन्या...अनेकांनी आपापली तळी ट्यार्पी वाढायच्या मळीने भरुन ठेवली असतील..

इरसाल's picture

16 Mar 2012 - 4:51 pm | इरसाल

आता आपल्या नातु पणतूंना सांगेल कि जेव्हा सच्याचे १००चे १०० झाले तेव्हा मीपण त्याच्या बरोबर मैदानात होतो.

अमोल केळकर's picture

16 Mar 2012 - 4:54 pm | अमोल केळकर

अभिनंदन .
सचिनची ही घौडदौड अशीच कायम रहावी

अमोल केळकर

श्रीरंग's picture

16 Mar 2012 - 6:09 pm | श्रीरंग

'अशीच' कायम रहावी??
अरेरेरे!!!

मोहनराव's picture

16 Mar 2012 - 4:57 pm | मोहनराव

हुश्श!! झाले एकदाचे शतकाचे शतक!! बजेटच्या दिवशी लोकांना एक चांगली बातमी!!

पिलीयन रायडर's picture

16 Mar 2012 - 4:57 pm | पिलीयन रायडर

सच्याची सेंच्युरी झाली रे....!!!

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

16 Mar 2012 - 5:08 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

धत्तड तत्तड!! धत्तड तत्तड!! धत्तड तत्तड!! धत्तड तत्तड!! धत्तड तत्तड!! धत्तड तत्तड!!
धत्तड तत्तड!! धत्तड तत्तड!! धत्तड तत्तड!! धत्तड तत्तड!! धत्तड तत्तड!! धत्तड तत्तड!!
धत्तड तत्तड!! धत्तड तत्तड!! धत्तड तत्तड!! धत्तड तत्तड!! धत्तड तत्तड!! धत्तड तत्तड!!
धत्तड तत्तड!! धत्तड तत्तड!! धत्तड तत्तड!! धत्तड तत्तड!! धत्तड तत्तड!! धत्तड तत्तड!!
धत्तड तत्तड!! धत्तड तत्तड!! धत्तड तत्तड!! धत्तड तत्तड!! धत्तड तत्तड!! धत्तड तत्तड!!
धत्तड तत्तड!! धत्तड तत्तड!! धत्तड तत्तड!! धत्तड तत्तड!! धत्तड तत्तड!! धत्तड तत्तड!!
धत्तड तत्तड!! धत्तड तत्तड!! धत्तड तत्तड!! धत्तड तत्तड!! धत्तड तत्तड!! धत्तड तत्तड!!

प्रीत-मोहर's picture

16 Mar 2012 - 5:08 pm | प्रीत-मोहर

चला शेच्युरी झाली ते बर झालं आता सच्या रैवारच्या हाय प्रोफायल म्याच ला मस्त टेंशन फ्री खेळेल :)

विसुनाना's picture

16 Mar 2012 - 5:09 pm | विसुनाना

बॉटलनेक/ मेगाब्लॉक सेंचुरी झाली एकदाची. टेन्शन संपले.
आता १११ सेंच्युर्‍या होईपर्यंत निवांत खेळ रे.

श्रावण मोडक's picture

16 Mar 2012 - 5:14 pm | श्रावण मोडक

ओह्ह नो... ;)
इनफ इज इनफ!
आता एकदाची निवृत्ती जाहीर कर म्हणावं, बास्स झालं.
विसुनानांच्या प्रतिसादाचा सूर कळला आहे. पण तरीही हे लिहिलं, धागा गाजत राहिला पाहिजे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 Mar 2012 - 5:16 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>>>आता १११ सेंच्युर्‍या होईपर्यंत निवांत खेळ रे.

अरे बाप रे......! आज नै बोलणार या विषयावर. ;)

-दिलीप बिरुटे

विसुनाना's picture

16 Mar 2012 - 5:22 pm | विसुनाना

मला वाटलं होतं की तुम्ही अभिनंदनासाठी हा धागा काढला.
पण हा तर समारोपाचा निघाला. ;)
पक्के धोरणी आहात. (संदर्भ : लेखाचे विषय -धोरण + अभिनंदन)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 Mar 2012 - 5:38 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सच्या जेव्हा रिटायर व्हायचा तेव्हा होईन पण आज तुम्ही कितीही शब्दांच्या पसार्‍यात मला गुंतवा.
सच्यानं आता निवृत्तीची घोषणा करायला हवी असे मी आजच्या दिवशी तरी अजिबात म्हणनार नाही. :)

सर्व देश जेव्हा सच्याच्या महाशतकामुळे आनंदी झाला आहे. (महागाईच्या बजेटकडे दुर्लक्ष करुन ) तेव्हा तो आनंद आपण सर्वांनी आज साजरा करावा. कोणीही चर्चेला सच्याच्या निवृत्तीकडे आणि बजेटकडे घेऊन जाऊ नये, असे वाटते. :)

-दिलीप बिरुटे

मोहनराव's picture

16 Mar 2012 - 5:28 pm | मोहनराव

तेंडुलकर उवाचः
Tendulkar speaks: "It's been a tough phase for me. I started off the season batting reasonably well, i was luckless. I was not thinking about the milestone, the media started all this, where ever I went, the restaurant, room service, everyone was talking about the 100th hundred. Nobody talked about my 99 hundreds. It was slightly different, the ball was not coming onto the bat. It hasn't sunk in but I've definitely lost about 50 kilos. Doesn't matter how many hundreds you've scored, you still have to put your head down and score for the team. Dreams do come true. I had to wait for one for 22 years (the World Cup)."

क्रिकेटच्या देवाला आपला सलाम!!

श्रावण मोडक's picture

16 Mar 2012 - 5:44 pm | श्रावण मोडक

Tendulkar speaks: "It's been a tough phase for me. I started off the season batting reasonably well, i was luckless. I was not thinking about the milestone, the media started all this, where ever I went, the restaurant, room service, everyone was talking about the 100th hundred. Nobody talked about my 99 hundreds. It was slightly different, the ball was not coming onto the bat. It hasn't sunk in but I've definitely lost about 50 kilos. Doesn't matter how many hundreds you've scored, you still have to put your head down and score for the team. Dreams do come true. I had to wait for one for 22 years (the World Cup)."
पण जाऊ दे...

यकु's picture

16 Mar 2012 - 5:51 pm | यकु

>>> पण जाऊ दे...
जाऊ कसं द्यायचं? जाऊ कसं द्यायचं ?
त्यानं सगळ्यांना भो. जा. सांगायचं होतं का? म्हणजे त्याचे 50 किलो ‍गेले नसते? की सचिन झाला म्हणून त्याला लोकांच्या अपेक्षांचं ओझं, ती अपेक्षा पूर्ण करण्‍याची शिरशिरी येतच नाही?

विसुनाना's picture

17 Mar 2012 - 11:47 am | विसुनाना

It hasn't sunk in but I've definitely lost about 50 kilos.

-या वाक्याचा अर्थ लावताना रवी शास्त्रीचीही (संदर्भः आजच्या 'द हिंदू'तला त्याचा लेख) गल्लत झालेली दिसते. पण बरोबर अर्थ सौरव गांगुलीला लागलेला आहे.(संदर्भः आजच्या 'द हिंदू'तला त्याचा - म्हणजे गांगुलीचा लेख).

'हे शंभरावे शतक झाल्यानंतर मला कापसासारखे हलके वाटत आहे' हा सचिनच्या म्हणण्याचा मराठी भावार्थ आहे. शंभरावे शतक करण्याच्या काळजीने माझ्या शरीराचे वजन घटले असा त्याचा अर्थ नाही.

गल्लत झालीय खरी, तरीही

की सचिन झाला म्हणून त्याला लोकांच्या अपेक्षांचं ओझं, ती अपेक्षा पूर्ण करण्‍याची शिरशिरी येतच नाही?

अधोरेखित शब्दातून अभिप्रेत अर्थ आपोआप आलाय.. घटनानुसारी .
शब्द दगा देऊ शकतील, पण घटनेतून निघणारा आशय पुरेसा आहे.

श्रावण मोडक's picture

17 Mar 2012 - 2:28 pm | श्रावण मोडक

मी त्या वाक्याचा अर्थ 'मणामणाचं ओझं उतरलं' असा घेतला. शारीरिक वजन हा अर्थ अभिप्रेत नाहीच. ते म्हणजे अगदीच मेहता पुस्तकीय भाषांतर झालं असतं.
कसेही असो, माझे मत थोडं अधिक मांडतो. माझ्या मते, "हो, मला हे शंभरावे शतक करायचे होते" असे सचिनने म्हणायला हवे. त्याला तो अधिकार आहे. आणि त्या अधिकाराची मर्यादा त्याच्याकडून उल्लंघली गेलेली नाहीये अद्याप तरी. वर्षभर शतकासाठी लागलं हे खरंय. पण मधल्या काळात तो काही कशीबशी फलंदाजी करत नव्हता. तो शतक करू शकला नाही, पण लौकिकाला साजेसा खेळला नाही, असे अपवादात्मकच घडले आहे. शतक हे लक्ष्य होते, हे सचिननं म्हटलं असतं तर बिघडलं नसतं. पण त्यासाठी अंगातून टीशर्ट काढून गरागरा फिरवण्याची वृत्ती हवी. ती सचिनकडे नाही (ही त्याची मर्यादा, आणि तरीही व्याप्ती आहे).

हाहा..
मी पन्नास किलो वजन कमी झालं आणि हा बाबा खेळतोय कसा असं ओझरतं वाटलं होतं काहीतरी.. पण त्याकडे जास्त लक्ष दिलं नाही.
विस्तृत प्रतिसाद आवडला.
नुसती काही विसंगत वाक्ये हायलाईट आणि खाली "पण जाऊ दे " फारच क्रिप्टीक झालं होतं.

आणि हो, ( एफवायआय - आपल्या दयाळू माहितीसाठी) मी मेहताचा भाषांतरकार नाहीय, सध्या आम्ही गुगल, याहू आणि विंडोजची वाट लावतोय

श्रावण मोडक's picture

17 Mar 2012 - 3:19 pm | श्रावण मोडक

नुसती काही विसंगत वाक्ये हायलाईट आणि खाली "पण जाऊ दे " फारच क्रिप्टीक झालं होतं.

मोरे अवगुण चित ना धरो! ;)
आणि, मेहता हे तुमच्यासाठी नव्हतं मालक. आम्ही गुगल, याहूच्या वाटेलाही जात नाही. ;)

ऐन मार्च अखेरीस जाहिरातींचा पूर येणार. सर्व व्रुत्तपत्रं खूष!! :)

अविनाशकुलकर्णी's picture

16 Mar 2012 - 5:32 pm | अविनाशकुलकर्णी

मानल..

सलाम

अविनाशकुलकर्णी's picture

16 Mar 2012 - 5:33 pm | अविनाशकुलकर्णी

मानल..

सलाम

स्वातीविशु's picture

16 Mar 2012 - 5:42 pm | स्वातीविशु

झाले एकदाचे शतकी शतक. :) :party:
जीयो सचिन.

अस्मी's picture

16 Mar 2012 - 5:56 pm | अस्मी

खरंच..झाली एकदाची सेंचुरी!!!
सचिनचे अभिनंदन..!!! :)

तिमा's picture

16 Mar 2012 - 5:58 pm | तिमा

आकडेमोडीला भाव देत नाही. ९९ व्या शतका नंतर त्याच्या ९० ते १०० मधल्या अनेक खेळ्या मी शतकासमानच मानतो.
सचिन, मनापासून अभिनंदन रे!

चिगो's picture

16 Mar 2012 - 5:59 pm | चिगो

सचिनचे अभिनंदन...

बाकी हिंदी न्युजवाल्यांचे ज्योतिषी पावरबाज झालेयत वाटतं.. नाही, काल "महाशतका"चं भाकीत करत होते म्हणून म्हटलं..

जयवी's picture

16 Mar 2012 - 6:09 pm | जयवी

शेवटी हा सन्मान सचिनने बांग्लादेश ला दिला :)
तुस्सी ग्रेट सचिन :)

Tendulkar speaks:
"It's been a tough phase for me. I started off the season batting reasonably well, i was luckless. I was not thinking about the milestone, the media started all this, where ever I went, the restaurant, room service, everyone was talking about the 100th hundred. Nobody talked about my 99 hundreds. It was slightly different, the ball was not coming onto the bat. It hasn't sunk in but I've definitely lost about 50 kilos. Doesn't matter how many hundreds you've scored, you still have to put your head down and score for the team. Dreams do come true. I had to wait for one for 22 years (the World Cup)."

चौकटराजा's picture

16 Mar 2012 - 6:34 pm | चौकटराजा

मी दोन आठ्वड्यापूर्वी काय म्हणालो होतो ते पेस्ट करीत आहे. आता तरी चौकटराजा वाया गेला असे म्हणू नका लेको. तो वात्रट आहे हे प्रोफाईल
मधे आलेच आहे राव !
आता कट पेस्ट
सचिन काही नको रिटायर होउ !
प्रेषक चौकटराजा Sat, 25/02/2012 - 20:25.

सचिन तेडूलकर हा सर्वकालीन महाफलंदाज आहे .त्याने अनेक विक्रम केले आहेत पण तो सर्वोत्तम फलंदाज नाही. माझ्या आठवणी प्रमाणे त्याचा व ग्लेन मॅक्ग्रा चा खरा फारसा सामना झालेलाच नाही. त्याने अपयश पाहिले आहे व यश पुन्हा मिळू शकते हे ही पाहिले आहे. चाळीशी ला आल्याने त्याचे रिफलेक्स कमी होऊन तो बाद होत असावा. आपल्या निवृतीचे कारण गावसकरानी हेच दिले होते. पण सचिनने आणखी
एखाद्या सिरीजचा चान्स घ्यावा. त्याला १०० व्या महा शतकाचे आकर्षण असेल असे वाटत नाही. पण अजूनही तो विझलेला आहे असे मला
तरी वाटत नाही. त्याच्या पेक्षा चांगला गेल्या चार वर्षात कोण भारतीय खेळला आहे ?

------------------------------स्वाक्षरी आरंभ------------------------------------------------
असेल जर देव, सापडणार नाही कधी, कधी आकाशाहून मोठा तर सुक्ष्म अणूहूनही कधी
माणसाची झेप आकाशाइतकी नाही मोठी , मग भक्तीने तो बधेल ही आशा धरावी का खोटी ?
.......

कपिलमुनी's picture

16 Mar 2012 - 6:35 pm | कपिलमुनी

THIS CENTURY IS FIXED TO DEVIATE PEOPLE FROM BUDGET, INCREASED TAXES ...
NOW EVERYONE FORGET BUDGET AND TALK ABOUT CENTURY !!
;)

चौकटराजा's picture

16 Mar 2012 - 7:24 pm | चौकटराजा

THIS IS WHAT THINKIING " OUT OF BOX " IS ALL ABOUT !
मुनीराज धन्य आहे !

इष्टुर फाकडा's picture

16 Mar 2012 - 6:38 pm | इष्टुर फाकडा

सचिन आता क्रिकेट चा रजनीकांत झाला. जिवंत दंतकथा !

निश's picture

16 Mar 2012 - 6:38 pm | निश

सचिन ला मानाचा मुजरा.
खर तर सचिन सारखे लोक हि समाजाला मिळालेले अमुल्य वर आहेत.

खरा क्रिकेट चा सम्राट सचिन.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 Mar 2012 - 9:21 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हरलो म्याच. :(

च्यायला, सच्याचं महाशतक होऊनही आपण हरलो.
आपल्यकडे चव ना धवाचे बॉलर होते आज.

-दिलीप बिरुटे

मी-सौरभ's picture

16 Mar 2012 - 11:47 pm | मी-सौरभ

आजच ते गोलंदाज बिना चवी ढवीचे बरे झाले???
तुमचा तो सचिन काय दिव्य खेळला ते बघितलच...

रच्याकने: रविवारच्या युद्धाचा टीआरपी वाढावा म्हण्णूनच आज हरलो आपण :)

अरे अस कोणी बोलू नका रे... इनो घ्यायला पण हल्ली लायकी लागते म्हणे

- डोक्यातहाणीन धोंड्या

गोंधळी's picture

16 Mar 2012 - 9:54 pm | गोंधळी

सचिन देवाय नम:

नावातकायआहे's picture

16 Mar 2012 - 10:15 pm | नावातकायआहे

झाल एक्दाच...

सचिनचे मनापासून अभिनंदन

रमताराम's picture

16 Mar 2012 - 10:50 pm | रमताराम

सचिन, सचिनप्रेमी यांचे हार्दिक अभिनंदन.
याशिवाय "पुढून तुतारी मागून पिपाणी वाजवणार्‍यांचे"ही आभार. त्यांचे अभिनंदन कण्हत कुंथत आले असले तरी आमचे आभार 'तहे दिलसे' आहेत बरं का.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Mar 2012 - 8:04 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आम्ही पिपाण्या फुंकुच. सच्याच्या महाशतकानं वर्षभरातला खालावलेला परफॉर्मन्सचा बॅकलॉग भरुन काढला आहे इतकेच या निमित्तानं म्हणावसं वाटतं. बाकी, आपलं चालू द्या.

-दिलीप बिरुटे

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

16 Mar 2012 - 11:58 pm | निनाद मुक्काम प...

मुकेश अंबानी ह्यांना हे वर्षे काही बरे गेले नाही. बिचारे वास्तुदोष म्हणून जगातील सर्वात श्रीमंत घरात राह्यला जाऊ शकत नाही.
सध्या फोर्ब ने प्रसिध्द केलेल्या जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत त्यांचे स्थानात गेल्या वर्षीच्या तुलनेत कमालीची घसरण झाली आहे.
आता सचिनचे महाशतक झाले. म्हणजे मुंबई इंडियन ची ब्रांड वेल्यू जबरदस्त वाढणार.

सचिन चा मात्र ह्या आय पी ल मध्ये घामटा निघणार.
तेथे पाटा खेळपट्टीवर अनेक सुमार गंधर्व सुद्धा कुमार गंधर्वांच्या लयीत फटकेबाजी करतात. तेथे सचिन ला ह्या डब्लू डब्लू एफ च्या क्रिकेटच्या फडात पहावत नाही.

फारएन्ड's picture

17 Mar 2012 - 9:50 am | फारएन्ड

अरे तू मागच्या दोन आयपीएल स्पर्धा पाहिल्यास का? सचिनची बॅटिंग तेथेही बघायला सर्वात चांगली होती.

इरसाल's picture

17 Mar 2012 - 7:29 am | इरसाल

काल बाकीचे (बांगलादेश ब्याटिंगच्या वेळी) हरावेच असे खेळत होते. सालं...झाले ना ह्याचे शंभर मग हारूचया ही म्याच.

किसन शिंदे's picture

17 Mar 2012 - 9:04 am | किसन शिंदे

सहमत.

काय तो इरफान, लेकाचा फुलटाॅस चेंडू टाकत होता सिक्सर हाणण्यासाठी.. धोणीच्याही पोटात खुप दुखत असावं कदाचित, कारण एवढी घाणेरडी कॅप्टन्सी आधी कधीच पाहीली नव्हती.

बिचारा सचिन! :(

शतकानंतर मॅच हारलो म्हणून हे सचिनद्वेष्ट्ये त्याच्या नावाने शंख करायला मोकाट सुटतील आता.

बांगलादेश सारख्या संघाविरुध्द विकेट्स हातात असूनदेखील चाळिसाव्या षटकापर्यंत केलेली संथ फलंदाजी हे
पराभवाच्या अनेक कारणांपैकी एक होतं यात शंकाच नाही.
ज्या खेळपट्टीवर इतर सर्व फलंदाजांनी फटकेबाजी केली, तिथेच फक्त शतक पूर्ण करण्याच्या उद्देशाने अती सावध व संथ खेळणार्या सचिनला पाहून वाईट वाटलं.
संघहितापेक्षा वैयक्तिक विक्रमांना प्राधान्य देण्याची वेळ या महान खेळाडूवर यावी याहून वाईट दुर्दैव ते काय.

अन्या दातार's picture

17 Mar 2012 - 1:19 pm | अन्या दातार

२८९ ही त्या मानाने चांगली धावसंख्या असूनही तुम्ही असं म्हणताय?

ज्या खेळपट्टीवर इतर सर्व फलंदाजांनी फटकेबाजी केली, तिथेच फक्त शतक पूर्ण करण्याच्या उद्देशाने अती सावध व संथ खेळणार्या सचिनला पाहून वाईट वाटलं.

सेहवागसारखे वाट्टेल तशी बॅट फिरवून ४० पर्यंत धावा काढून बाद झाला असता तर "हॅ, यंदाही हुकलंच शतक. रिटायर हो म्हणाव" अश्या कॉमेंट्स लोकांनी केल्याच असत्या. नर्व्हस नायन्टीजचे प्रेशर आधीच अनुभवले असल्याने त्या धावपट्ट्यात संथ खेळला तर तुम्ही म्हणणार की वैयक्तिक विक्रमांना प्राधान्य दिले. मग नक्की सचिनने काय करायला हवे होते? जरा सांगता काय??

अत्रुप्त आत्मा's picture

17 Mar 2012 - 2:50 pm | अत्रुप्त आत्मा

+++++++++११११११११११११११११११११ टू अन्या... हेच म्हणणार होतो... कालच त्याची आयबिएन..लोकमत वर दाखवलेली मुलाखत या सर्व टिकाकारांना चोख उत्तर देणारी आहे... तेंडल्याची काही हृदयस्पर्शी वाक्य>>>>>

@खुप लोकांना या गेमबद्दलचे काहि कळत नसताना,बोललेली मत पाहुन वाइट वाटतं...

@माझं नव्व्याण्णवावं शतक होइपर्यंत शंभराव्याची चिंता कुणालाच नव्हती...पण ९९वं झाल्यावर जो तो...जिथे तिथे १०० कधी होणार अशी विचारणा करु लागला,ज्याचं माझ्यावर एक प्रकारचं नाहक प्रेशर आलं... मी फक्त भारतासाठीच खेळतो..(रेकॉर्ड्स होत जाणं..हा अनुषंगिक परिणाम..!)

@(लोक काहिही म्हणोत)...मी देव नाही...मी सचिन तेंडुलकर आहे...

कथित जिज्ञासुंनी अख्खी मुलाखत पहावी..अजुन २/३वेळातरी पुनःप्रक्षेपित होइल.. :-)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 Mar 2012 - 9:05 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपलं काय मत आहे ते सांगा की, उगाच सच्या यवं बोलला आणि त्यवं बोलला. क्रिकेट न कळणार्‍यांचे मथळ्यांचे मथळे वाचतोय (आदरणीय श्री अण्णा हजारेंच्या मताबद्दल बोलायचं आहे. पण आत्ता नाही. ) सच्याची फलंदाजी कशी आहे. सगळेच सच्या माझा जवळचा कसा आहे, सच्या एक शेजारी म्हणून कसा आहे, सच्या आमचा गल्लीतला म्हणून कसा आहे, सच्या कसा साधा आहे. च्यायला, नुसती गर्दी झाली प्रतिक्रियांची.

-दिलीप बिरुटे

श्रीरंग's picture

20 Mar 2012 - 8:36 pm | श्रीरंग

>>मी फक्त भारतासाठीच खेळतो..(रेकॉर्ड्स होत जाणं..हा अनुषंगिक परिणाम..!)<<<

मग मोजकीच षटकं आणी खूप विकेट्स बाकी असताना पॉवरप्ले मधे अत्यंत सावध खेळून अनेक चेंडू निर्धाव का बरं घालवले असावेत त्याने?

मी चाळिशीत फटकेबाजीचे प्रयत्न करून विकेट फेकण्याबद्दल म्हणत नाहिये. पण ८५ नंतर त्यानी जो रटाळपणा केला, त्याचा विपरीत परिणाम झालाच. गोलंदाजांनी पण माती खाल्ली हे कबूल आहेच. पण सचिनचा संथ खेळ पण पराभवास कारणीभूत ठरला.
वनडे खेळणे स्वेच्छेनी थांबवले असूनही कसोटीत धावा होत नाहियेत म्हटल्यावर वनडे मधे प्रवेश करणे, त्यातही न जमल्यामुळे बांगलादेशविरुद्ध अतीसावध खेळणे, हे सर्व सचिनने शतकाच्या घेतलेल्या दडपणाचे द्योतक आहे. असो. शेवटी तोही "माणूस"च. त्यालाही "मोह" व्हायचाच.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Mar 2012 - 4:01 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कालचा सामन्यात भारतीय संघाला धावसंखेचा डोंगर रचता आला नाही, त्याला संथ भारतीय फलंदाजी जवाबदार आहेच. बाकी, विक्रमादित्याची फलंदाजी लौकिकाला साजेशी नव्हती यात काही वाद नाही. काल ज्यांनी ज्यांनी सच्याची ब्याटींग पाहिली असेल त्यांनी जर काळजीपूर्वक धांवांचा रनरेट पाहिला तर शतकाच्या जवळ जाणा-या शेवटच्या पंचवीस धावांना लागणारा वेळ पाहिला तर सच्यालाही आता विश्वविक्रमासाठी लागणा-या शंभर धावा झाल्याच पाहिजे असे कालच्या खेळीवरुन तरी वाटत होते. खेळपट्टीवर चेंडु थांबून येत होता असे म्हटल्यामुळे १४७ चेंडुत झालेल्या ११४ धावांचं मोलही खूपच आहे, असे, नाविलाजाने म्हणावे लागते.

-दिलीप बिरुटे

जर शतक झाल नसत तर "बांगलादेशा विरुद्दही आता शतक काढता येत नाही होय, आता केनियाला बोलवा" अस म्हणायला सोकॉल्ड स्वघोशीत क्रिकेट जाणकार मागे हटके नसते.
म्हणुन कदाचित त्यांच्या भल्यासाठीच तो हळु खेळला असणार यात तिळमात्र शंका नाही. ;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Mar 2012 - 4:29 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बांगलादेशा विरुद्दही आता शतक काढता येत नाही होय, आता केनियाला बोलवा" अस म्हणायला सोकॉल्ड स्वघोशीत क्रिकेट जाणकार मागे हटके नसते.

स्वघोषित क्रिकेट जाणकार तर नक्कीच असे म्हणाले असते, यात काही वाद नाही. कशाला ताकाला जाऊन भांडं लपवायचं. :)

कालची विक्रमादित्याची फलंदाजी संघासाठीच होती असे ठासून सांगणा-यांची संख्या प्रचंड आहे. पण, कालची संथ फलंदाजी विक्रमासाठीच होती असेही काही म्हणणारे आहेतच. मतमतांतरे असणारच.

व्हिवियन रिचर्डचे मत सचिनला खूप पटलंय. 'सचिनला वाटतंय तो पर्यंत खेळू द्या' अनेक भावनाकुळ क्रिकेटप्रेमींचाही कंठ अशा उद्गारांनी तर खूपच दाटून येत असेल. ;)

-दिलीप बिरुटे

'सचिनला वाटतंय तो पर्यंत खेळू द्या'

अलबत.. तुम्हा-माझ्यासारख्या सामान्य लोकांपेक्षा, त्याच या खेळातल ज्ञान निश्चितच जास्त आहे.
मग त्याने कुठे थांबाव आणि कुठे नाही ते आपल्या वा त्या सोकॉलड क्रिकेट जाणकारांपेक्षा (कांबळी, साबा करीम, अंकोला ) त्याला जास्त चांगल कळत असेल नाही का?

मला तर कधी कधी कपील आणि सौरवच ही नवल वाटत. स्वतःची इतक चांगली उदाहरणं समोर असताना फुकाचे वकिली सल्ले देत असतात. =))

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Mar 2012 - 4:59 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

क्रिकेट जगणारे आणि क्रिकेट तज्ञांच्या मताला तुमच्या आमच्या सारख्यांच्या मतापेक्षा अधिक किंमत आहे, यात काही वाद नाही. सचिन व्हि. रिचर्ड्सच्या मताचा त्याचमुळे आदर करतोय. ( असे सांगत सुटला)
क्रिकेट जगणारे क्रिकेट पाहतात. क्रिकेटचे तज्ञ क्रिकेट पाहतात. क्रिकेट समालोचक क्रिकेट पाहतात आणि पोहचवतात त्याचबरोबर तुमच्या माझ्यासारखे हौशी लोकही क्रिकेट पाहतात. प्रत्येकाची आपली एक सच्याच्या खेळाकडे पाहण्याची दृष्टी आहे. आणि त्या आधारावर कोणी बोलत असेल तर फार महत्त्वाचे नसेलही परंतु प्रत्येकानं या निमित्तानं आपल एक मत व्यक्त केलं आहे, करताहेत.

सचिनला झाल्या शतकामुळे आपल्या भाषेत मणामणाचं ओझं कमी झाल्यासारखं वाटतंय त्याचा अर्थ असाही आहे की, सच्यालाही लोकभावना आणि काही तज्ञांची मतं कळताहेत. लोकांच्या प्रचंड अपेक्षा त्याच्याकडून असतात हेही त्याला ठाऊक आहे. आता या लोकभावना आणि तज्ञांची काय काय मत आहेत आणि त्याचे अर्थही काय आहेत हेही त्याला उत्तम कळतं. म्हणून तर त्याच्या भविष्यकाळाच्या खेळासाठी तो व्हि. रिचर्ड्सच्या मताचा दाखला देतो आणि माझ्यातला क्रिकेटचा फॉर्म अजूनही उत्तम आहे. आत्ता तर मी कुठे चांगला खेळतोय प्रत्येक वेळी लक असेलच असे नाही म्हणतो म्हणजे त्याच्या खेळातली भूक अजूनही खूप आहे ''मला अजून खेळवा'' असेच त्याला या महाशतकानिमित्तानं म्हणायचं आहे.

आपण कितीही म्हटलं त्यानं खेळलं पाहिजे आणि कितीही म्हटलं की आता त्याने नव्यांना जागा करुन दिली पाहिजे. तसंही, आपल्या मताला कोणतीच किंमत नाही. आपल्या हातात फक्त पाहणे आणि सोसणेच आहे.

-दिलीप बिरुटे

आपण कितीही म्हटलं त्यानं खेळलं पाहिजे आणि कितीही म्हटलं की आता त्याने नव्यांना जागा करुन दिली पाहिजे. तसंही, आपल्या मताला कोणतीच किंमत नाही. आपल्या हातात फक्त पाहणे आणि सोसणेच आहे.

हांगाश्श्शी. आता कस एकदम प्वाइंटाच्या मुद्द्यावर आलात सर.
ज्यांना पहायचय त्यांना पाहुद्या. ज्यांना ते सोसणे वाटते त्यांनी आपले डोळे कान बंद करुन घावे. काय म्हंता?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Mar 2012 - 6:40 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पाहणं आणि सोसणं हे सापेक्ष आहे. असो, आम्ही मात्र आपल्या सर्वांच्या वतीनं सच्याला मानाचा फेटा घातला आहे. आणि छायाचित्र आंतजालावरुन साभार असंही कोपर्‍यात लिहिलं आहे.

थोडक्यात आपलं मत असं दिसतं-

'' सचिन फक्त विक्रमासाठी खेळतो ' या टीकाकारांच्या टीप्पणीवर सचिन म्हणाला की, काही लोक असे आहेत ज्यांचा मी मान राखतो आणि काहींची भीड बाळगत नाही. ज्यांची मी भीड बाळगत नाही, त्यांच्या बोलण्याचा माझ्यावर काहीही परिणाम होत नाही. त्यांना जे बोलायचे ते बोलत राहू दे. माझे काम देशासाठी खेळणे आणि जिंकून देणे आहे.'' याला म्हणायचं पाहणं. :)

आणि

''माझ्यासाठी नाही, तर देशासाठी खेळणे हे माझे लक्ष असून ते जोपर्यंत पूर्ण होते आहे तोपर्यंत मी खेळत राहीन'' याला म्हणायचं सोसणं. :)

पळा आता...........!!!
(बातमी सौजन्य मटा)

-दिलीप बिरुटे

मला आठवतय, जर मी चुकत नसेल ती अहमदाबाद च्या मोटेरा वरची श्रीलंके विरुध्द ची टेस्ट होती व 434 व्या विकेट ची कपिल ला प्रतिक्शा होती व लंकेची एकच विकेट बाकी असतांना कुंबळे बिचारा दिड दोन हात बाहेर बॅालींग करत होता :-) न जानो चुकुन विकेट मिळालि तर, नंतर न्युझीलंड विरुध्द वगळल्या नंतर त्याने निव्रुत्ती स्विकारली,......त्याने सचिन ला निव्रुत्ती बद्दल काहि सांगावे? ये बात कुछ हजम नही हुवा पांजी

श्रीरंग's picture

20 Mar 2012 - 8:29 pm | श्रीरंग

खरंय. असाच प्रकार सचिनने देखील केला हे बघून आश्चर्य वाटलं.
१०-१२ षटकं शिल्लक असताना अती सावध खेळून त्यानी संघाचा घात केला.

पुढल्या निवड समितीचे अध्यक्ष म्हणुन श्रीरंगरावांचे नाव सुचवू इच्छितो. :)
दाखवा सगळ्या माजोरड्या म्हातार्‍यांना बाहेरचा रस्ता हो तुम्ही श्रीरंगराव.
आपला फुल्ल सपोर्ट आहे तुम्हाला.

समंजस's picture

17 Mar 2012 - 9:28 am | समंजस

सचिन चे अभिनंदन !
[ शेवटी सचिनची (शतकांची) शंभरी भरली म्हणायची तर :) ]

अवांतरः क्रिकेटच्या देवाचं अवतार कार्य आता संपलं असं म्हणता येईल का? क्रिकेटचा देव आता पुढील अवतारांना कार्य करण्यास संधि देईल का ? की परशूरामासारखं इतर अवतारांच्या मध्ये लुडबुड करणार?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Mar 2012 - 8:12 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

क्रिकेटच्या देवाचा अवतार एवढ्यात संपणार नाही. सचिन म्हणतो की, निवृत्तीचा विचार करायला लावणारे स्वार्थी वृत्तीचे आहेत. (कोण स्वार्थी आहे, हे मला अजिबात कळलं नाही) काही कळलं का तुम्हाला ?

-दिलीप बिरुटे

समंजस's picture

19 Mar 2012 - 6:09 pm | समंजस

नाहि ब्वॉ. आपल्याला माहित नाही ते कोण आहेत आणि तसेही सचिन खुपच समंजस असल्यामुळे तो कोणाचंही नाव घेणार नाही :) त्यामुळे हे रहस्यच राहणार बहूतेक :)

निवृत्ती केव्हा घ्यावी हे ठरवण्याचा अधिकार त्याला आहेच. फक्त एक भिती ही आहे की त्याचा रवि शास्त्रि होउ नये :)

अवांतरः [ थोरा/मोठयांनी सांगितलंय की थोडक्यात जी गोडी असते ती जास्तीत नाही :) ]

फारएन्ड's picture

19 Mar 2012 - 7:21 pm | फारएन्ड

निदान मी पेपरमधे वाचलेले आहे ते "खेळाच्या शिखरावर असताना निवृत्त होणे हे स्वार्थी आहे" असे म्हंटला आहे. ते चुकीचे नाही.
हे द्रविडला उद्देशूनही नसावे. ते दोघेही अशा पद्धतीने एकमेकांना टोमणे मारायच्या पेक्षा बर्‍याच वरच्या लेव्हलचे आहेत. द्रविडने इंग्लंड दौर्‍याआधीच ठरवले होते की इंग्लंड दौर्‍यानंतर निवृत्त व्हायचे. पण तेथे त्याचा 'टच' परत आल्याने ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर जाण्याचे ठरवले. तेथे पुन्हा अपयशी ठरल्यावर आता अजून ताणण्यात अर्थ नाही असे त्याला वाटले असेल.

मन१'s picture

17 Mar 2012 - 12:52 pm | मन१

अति होतय

च्यायला तु पण क्रिप्टिक कर.
काय अति होतंय ते तर सांगशील.

मन१'s picture

17 Mar 2012 - 1:27 pm | मन१

मिपाचं एकवेळ ठिक आहे हो, सचिन सोडून इतरही धागे वगैरे येताहेत.
सचिनच्या खेळाचा चाहता असूनही मिडियात, आणि एकूणच जनमानसात " महाशतक" हा एक एकच ज्वलंत राष्ट्रैय प्रश्न वगैरे जो बनला होता आणि जो मास हिसटेरिया झालाय त्याचे आश्चर्य वाटते.

कुंदन's picture

18 Mar 2012 - 2:14 am | कुंदन

मन१ बरोबर सहमत.

प्रा डॉ , तुमचा आयकर भरायला सचिन येणार आहे का? ;-)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 Mar 2012 - 8:58 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रा डॉ , तुमचा आयकर भरायला सचिन येणार आहे का?

माझा आयकर मलाच भरावा लागणार आहे. पण, सचिननं ज्या फलंदाजीने ब्रह्मानंदी टाळी लागण्याचा जो आनंद दिला त्याची तुलना कोणत्या कराशी कधीच होणार नाही. ष्ट्रेट ड्राइव्ह मारल्यानंतर आपल्या चेह-यावर आनंदाची जी लहेर उमटायची ती शब्दात पकडता येणार नाही. सचिननं पॅडलस्वीप मारायचा पवित्रा घेतल्यावर अनेकदा मला धडकी भरली भरली आहे. काय करायचां हा जीवघेणा स्वीप, या पेक्षा कितीतरी फटके तुझ्या भात्यात आहे, असे मनोमन बोलून मी कितीतरी वेळा त्याच्याशी मनातल्या मनात संवाद साधला आहे. माझ्या जगण्यातल्या अनेक भल्या-बुर्‍या प्रसंगातून मला या फलंदाजीनं खूप निरपेक्ष आनंद दिला आहे. सच्याचं ग्राऊंडवर दिसणं हाही आनंदाचा क्षण असायचा. असतो. हा आता त्याचा परफॉर्मन्स पूर्वी सारखा नसला तरी 'लाईक' वर आम्ही रसिक क्लीक करतोच. असो...

केवळ डॉलर आणि त्याच्या आजूबाजूलाच पाहणार्‍या आणि यंत्राप्रमाणे जगणा-या लोकांना आमच्या भाऊक लोकांच्या भावना काय समजायच्या. ;)

-दिलीप बिरुटे

दिपक's picture

17 Mar 2012 - 1:05 pm | दिपक

सचिनच शतक झालं की काहींजणांचा अपेंडिक्सचा त्रास बळावतो.... आणि तो सामना हरल्या शिवाय त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत नाही. मग त्यासाठी बिचार्‍या देवांना पाण्यात बसुन रहावे लागते. :)

तेव्हा तमाम सचिन द्वेष्ट्यांना सुदृढ आरोग्याच्या मनापासुन शुभेच्छा.
आणि या नेक कामासाठी भारतीय संघाचे मनःपुर्वक आभार. :)

खल्लास!
अपेंडिक्स होय? मग बरोबर आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Mar 2012 - 8:22 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>> सचिन द्वेष्ट्यांना सुदृढ आरोग्याच्या मनापासुन शुभेच्छा.

सचिन द्वेष्टे वगैरे कोणी नाही, नसेलही. सचिनबद्दल जगभरातल्या क्रिकेट रसिकांच्या कौतुकाच्या बातम्या वाचल्यानंतर कोणाही भारतियांची छाती अभिमानाने भरुन येईल असा हा प्रसंग आहे. कोणा क्रिकेट रसिकांचं काहीही मतं असलं तरी सचिन द्वेष्टे कोणी असेल असे वाटत नाही. त्यामुळे 'अपेंडिक्सचा त्रास' 'सचिन द्वेष्टे' हे प्रतिसादातील शब्द काही पटले नाहीत.

-दिलीप बिरुटे

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

17 Mar 2012 - 10:40 pm | निनाद मुक्काम प...

सचिनच्या मुलाखतीत कुठेतरी वाचले की हॉटेलात आणी रूम सर्विस सगळे एकच विचारत होते की शतक कधी होणार

हे वाचून मला आमचे जुने दिवस आठवले. आगाऊ पणा व भोसक पणा हे नखशिखांत आमच्या अंगात भरले असतात.

मधमवर्गीय जीव नवीन नवीन ह्या पंचतारांकित दुनियेत खुळ्यागत वागतात.

एकदा लक्ष्मी मित्तल ह्यांना तुम्ही देशाचे नाव मोठे केले मला तुमचा अभिमान वाटतो असे आमच्यापैकी एका दीड शहाण्याने मित्तल ह्यांना हॉटेलच्या भर लॉबी मध्ये म्हटले होते. आणि त्यांचा सारा कर्मचारी वर्ग क्षणभर पाहतच राहिले. नशीब त्यांच्या नोकरीवर गंडातर नाही आले.

आज मला स्पायडर मेन सिनेमातील एक वाक्य प्रकर्षाने आठवले.
"With great power comes great responsibility." This is my gift, my curse. Who am I
सचिन

रघु सावंत's picture

17 Mar 2012 - 11:39 pm | रघु सावंत

१०० बे शतक काय हो तो करणारच होता. त्याने नाही करायचे तर अजुन कोणी करायचे

बाकी देवाचे काय अभिनंदन करायचे म्हणा.

अत्रुप्त आत्मा's picture

18 Mar 2012 - 12:58 am | अत्रुप्त आत्मा

अता या धग्याला शंभरी भरवण्यासाठी कोण कोण खेळतं ते बघायचं,,! ;-)

केशवराव's picture

18 Mar 2012 - 4:51 am | केशवराव

हार्दिक अभिनंदन ! आणि शुभेच्छा !!

पैसा's picture

18 Mar 2012 - 6:56 am | पैसा

आणि धाग्याची शंभरी होण्यासाठी बिरुटे सरांना शुभेच्छा!

रमेश आठवले's picture

18 Mar 2012 - 11:27 am | रमेश आठवले

कपिलदेव यानी सचिनने निव्रुत्त व्हावे असा सल्ला नुकताच दिला होता.
कपिल यान्चिच एक प्रसिद्ध जाहिरात आहे- कपिलदा जवाब नही.
त्याचे उत्तर सचिनने दिले आहे--
कपिलदा जवाब है !

उदय's picture

18 Mar 2012 - 12:01 pm | उदय

सचिनने शतक केले म्हणून त्याचे अभिनंदन.

मला क्रिकेटबद्दल फारसे काही माहीत नाही, म्हणून लेखात दिलेला दुवा बघितला आणि शोधताना रेकॉर्डचे स्थळ दिसले. त्यावरून मला पडलेले काही प्रश्न.

कसोटी सामन्यात व वन-डे सामन्यात सर्वाधिक धावा म्हणून सचिन सर्वप्रथम स्थानावर आहे.
तसेच सर्वाधिक शतके म्हणून सुध्दा सचिन पहिला आहे आणि त्याची कारकीर्द १९८९ पासून सुरू झाली असे दिसते.

रिकी पोंटिंग व कालीस यांची ४१ व ४२ कसोटी शतके झाली आहेत आणि ते १९९५ पासून खेळत आहेत. मग ते सचिन इतके सरस नाहीत का? किंवा सचिनपेक्षा अजून ५-६ वर्षे खेळले तर त्याचे रेकॉर्ड ते मोडू शकणार नाहीत का?

इतर अनेक कॅटेगरी मध्ये सचिन पहिल्या ३ खेळाडूंमध्ये नाही. उदा. एका इनिंगमध्ये सर्वाधिक धावा, सामन्यात सर्वाधिक धावा, सिरीजमध्ये सर्वाधिक धावा, एका षटकात सर्वाधिक धावा, एका दिवसात सर्वाधिक धावा, सर्वाधिक धावा सरासरी वगैरे.

असे असताना सचिन म्हणजे क्रिकेटचा देव वगैरे इतका उदो उदो का होतो? त्याचे इतर काही विक्रम आहेत का जे तुटण्याची शक्यता नगण्य आहे? (ब्रायन लाराने केलेला ३७५ धावांचा विक्रम मोडला गेला, तर त्याने ४०० धावांचा विक्रम केला जो मोडणे कठीण आहे, असे मला वाटते. सचिनचे असे काही विक्रम आहेत का? ) मी विकिपिडीया बघीतला पण अशी काही माहिती मिळाली नाही. बहुतेक इतर विक्रम म्हणजे सर्वाधिक धावा/शतके यांचे sub-records आहेत असे वाटले.

मी प्रामणिकपणे शंका विचारली आहे. सचिन काय फालतू खेळाडू आहे किंवा इतर किती भारी खेळाडू आहेत, असे म्हणण्याचा अजिबात प्रयत्न नाही, हे कृपया लक्षात घ्यावे.

:)

कैनै १ रन कमी पडत होता.
तुमचं चालुद्या.

नावातकायआहे's picture

18 Mar 2012 - 12:49 pm | नावातकायआहे

सच्याचे झाले धाग्याचे कधी? ९९ वर अडकलाय धागा!

प्रा.डॉ. विरुटे सर,
ही घ्या या धाग्याची शंभरावी प्रतिक्रियेची (धावा) धाव.... झाली. झाली आपली पण सेंचुरी.... अभिनंदन....

आता सगळ्या प्रतिसादकांनी निवृत्त व्हावे काय ? ;-)

काय यशवंता शेंचुरी झाल्यावर गोलंदाज निवृत्त होतो होय?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 Mar 2012 - 9:56 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माझ्या आंतरजालावरील वावराला अनेक वर्ष झाली. किरकोळ लेखनाला किरकोळ प्रतिसादही तसे येतच असायचे. पण अशात मी जिथे गेलो तिथे माझे मित्र म्हणायचे शंभरी गाठणारा धागा कधी काढणार ? परंतु मी जे काही पाच पंचवीस प्रतिसाद मिळवणारे धागे यापूर्वी काढले त्याबद्दल कोणी कधी कौतुकानं बोलले नाही. प्रत्येकाला अशा शंभर प्रतिसादांचा मोह होता. आज यानिमित्तानं माझ्यावरील मणामणाचं दडपण कमी झालंय. माझ्याबद्दल कोण काय बोलतं त्याचा मी विचार करीत नाही. एका आंतरजालीय व्यक्तिमत्त्वानं म्हटलं होत़ं की, नेटाचं कनेक्शन एकदा डिसकनेक्ट झालं की आभासी जगतातून बाहेर पडायचं अशा विचारांबद्दल माझ्या मनात खूप आदर आहे. असो, यापुढेही मिपासाठी मी अधिकाधिक मरमर करायचा प्रयत्न करीन. ;)

असो, सच्याच्या कौतुकाच्या निमित्तानं सहभागी होऊन आपापली मतं टाकत धाग्याला शंभर प्रतिसादाच्या पुढे नेणार्‍या सर्व मिपाकरांचे आभार.......!!! :)

-दिलीप बिरुटे

चौकटराजा's picture

18 Mar 2012 - 10:02 pm | चौकटराजा

सगळ्या सचिन द्वेष्ट्यांसाठी नवीन प्वाईंट..

"आता तो १०० फिफ्टीज च्या मागे लागला आहे." म्हणून बहुदा ५२ / ५५ अशा रन काढतो आहे..

होवून जावूद्या यावरही काथ्याकूट... ;-)

श्रावण मोडक's picture

19 Mar 2012 - 11:17 am | श्रावण मोडक

फक्त एवढंच? नाही हो...
एक दिवसीय सामन्यातील शतकांचे अर्धशतक, अर्धशतकांचे शतक, टी-२० तील एकेक अर्धशतक आणि शतक, कसोटीतील बळींचे अर्धशतक... किती तरी बाकी आहे. लेट हिम प्ले... :)

लेट हिम प्ले.. मीन ही डझ नॉट डिझर्व टू प्ले अ‍ॅट ऑल..??

चिगो's picture

19 Mar 2012 - 12:17 pm | चिगो

ह्या महाशतकानंतर दिलेल्या मुलाखतीत सचिन बराच सडेतोड बोलला.. त्यातला एक मुद्दा मला खरंच आवडला. सचिन म्हणाला, "तुम्ही चांगलं खेळत असतांनाच तुम्ही निवृत्त व्हावं, असं बरेचजण सांगतात. मला वाटतं, की देशासाठी चांगलं खेळत असतांना आणि खेळू शकत असतांना वैयक्तिक स्वार्था-समाधानासाठी निवृत्त होणं मला पटत नाही. आणि तसंही, मी कसा खेळू शकतो हे मला इतरांपेक्षा जास्त चांगल्याने कळतं.."

तेव्हा सल्ले बंद व्हावेत, असं वाटतं.. मी स्वतः अख्ख्या आयुष्यात १० धवाही काढल्या नाहीत, उगाच कशाला सचिनला अक्कल शिकवावी मग, नाही का? ;-)

अश्विनसारखे गोलंदाजही सहज शतक करून जातात आणि सचिनसारखे महान खेळाडू कसेबसे १० धावा काढत बसतात तेव्हा निवृत्तीची योग्य वेळ केव्हाच टळून गेली आहे असे वाटते. आता उरलाय तो फक्त सोपस्कार.

आता एकच म्याच सहन करायचा आहे आपल्याला सच्या.आणि सच्या पुराण कायमचं इतिहासात जमा होईल. आता काळ विराट, रोहित,यांचा सुरु होईल. बाप रे, काय काय सहन करावं लागतंय सच्याच्या निमित्तानं. काय ते लाड. सच्याच्या त्यागाने मुंबईला म्याच काय ? पॅव्हिलियनला सचिन रमेश तेंडुलकर नाव काय ? आणि अजून काय काय !

देवा ही टेष्ट लवकर जिंकून लवकर मुंबईची म्याच सुरु होऊन पाच पन्नास रन सच्याचे होऊ दे, वाटल्यास शेवटच्या म्याचला शतक होऊ दे... आणि आम्हा रसिकांना शांतपणे झोप घेऊ दे. :)

-दिलीप बिरुटे

प्रचेतस's picture

8 Nov 2013 - 9:58 am | प्रचेतस

किती ते कटाऔट्स, प्रत्येक तिकिटावर सच्याची छबी. भगवंता. सोडव रे आता.

पैसा's picture

8 Nov 2013 - 10:10 am | पैसा

बिशनसिंग बेदीने विचारले ना, ही काय सचिन बेनिफिट सीरिज आहे का म्हणून!

प्रचेतस's picture

8 Nov 2013 - 10:15 am | प्रचेतस

=))
योग्यच बोललाय तो बेदी, नैतर सौथ आफिकेची टफ सिरीज अशी कातरली नसती त्यांनी.

पैसा's picture

8 Nov 2013 - 10:21 am | पैसा

पाकिस्तानचे काय हाल चाल्लेत बघा एकदा!

सिंग वॉज नेव्हर एव्हर अ किंग!

पैसा's picture

8 Nov 2013 - 10:23 am | पैसा

डावर्‍या स्पिनर्सचा राजा होता तो! आणि डिप्लोमॅटिक बोलायला कधीच जमत नै त्याला!

प्रचेतस's picture

8 Nov 2013 - 10:30 am | प्रचेतस

कटू सत्यच बोलतो तो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Nov 2013 - 10:33 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सहमत.

यशोधरा's picture

8 Nov 2013 - 10:33 am | यशोधरा

कप्पाळ! सरदार वगैरे ठीके. राजा कसला? बुद्रुक भटींडाचा?

अजय जडेजासारखा महान (फिक्सर) खेळाडु समोरच्या संघाचा कप्तान होता तेव्हाच सचिनच्या अखेरच्या रणजीचा शेवट नाट्यमय होणार असे वाटत होते आणि तसा तो झालादेखिल..

यशोधरा's picture

8 Nov 2013 - 10:08 am | यशोधरा

वल्ली, प्राडॉ., तुमचे बार फुसके निघाले हो! =))

आम्ही कसले फुसके तो तुमचा सच्या फुसका निघाला. काल आम्ही अंघोळ पांघोळ करुन सत्यसाईबाची प्रार्थना करुन आज सच्याचे शंभर होऊ दे म्हणून प्रार्थना केली पण तो सच्या फुसका निघाला दहा धावावर बाद झाला आत तो बादच नव्हता अशी वकिली सुरु झाली. क्रिकेटमधे काही फलंदाज असे बाद होतात पण चोवीस वर्ष खेळुनही ज्याच्या प्याडवर बॉल जातो याचा अर्थ त्याची बॉलवरची नजर कमी झाली, हे मान्य केलं पाहिजे.

-दिलीप बिरुटे

सत्यसाईबाची प्रार्थना करुन आज सच्याचे शंभर होऊ दे म्हणून प्रार्थना केली >> तुमची प्रार्थना मनापासून नव्हती राव! नै तर असं व्हईलच कसं! =))

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Nov 2013 - 10:25 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सच्यानं प्रार्थना मनापासून केली नै असं म्हणा. सच्याचा ब्याटीपेक्षा सत्यसाईबाबावर जास्त विश्वास आहे, असे मी म्हणनार नाही. सच्याचे गुरु सत्यसाईबाबा म्हणुन आम्ही रसिकांनी प्रार्थनेचा ट्राय मारुन पाहिला होता. आता सत्यसाईबाबाला आमची पार्थना नै पोहचली त्याला आम्ही करायचं.

-दिलीप बिरुटे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Nov 2013 - 10:27 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

च्यायला, गेला तुमच्या कटकटीने आमचार रोहीत शर्मा...१७७ व्वा. क्या ब्याटींग है. ऑफसाईडला बॉल चालला होता. पण दिला त्याला पायचित पण आम्ही अजिबात पंचाच्या नावानं रडणार नाही.

-दिलीप बिरुटे

प्रचेतस's picture

8 Nov 2013 - 10:28 am | प्रचेतस

a

सच्याला कारण नसताना शिव्या घालताय ती तुमची पापं भोवली त्या शर्माला. आता तरी सुधरा! :D

बिपिन कार्यकर्ते's picture

8 Nov 2013 - 12:37 pm | बिपिन कार्यकर्ते

जाऊद्या ताई! विझती काडी जळती ठेवायचा केविलवाणा प्रयत्न बघून भरून आलं! ;)

म्हणजे सचिन शेवटी विझती काडी आहे हे बिपिनदांना पटले तर एकदाचे. ;)

सचिनला शिव्या घालुन झाल्या असतील तर एक विचारु का ? तुम्ही शेवट्ची बॅट कधी हातात घेतली होती ? का कधीच नाही ?

२०११ ला शेवटची फलंदाजी केली. पुढे नोकरी मुळे माझा नियमित सराव सुटला. & पाच पंचवीस प्रत्येक सामन्यागणिक धावा आणि ओफ़्स्पिनर गोलंदाज म्हणून गोलंदाजी आणि माझ्या तालुक्यात उत्तम क्रिकेटचा पंच असे नावही मिळवले आहे.

आता आपण किती क्रिकेट खेळला ते सांगा ?

दिलीप बिरुटे

ब़जरबट्टू's picture

8 Nov 2013 - 12:57 pm | ब़जरबट्टू

थोडक्यात तुमची चुकामुक झाली प्रा.डॉ... त्यांनी २०१२ ला सुरुब्वात केली दिसतेय.. :)

बाबा पाटील's picture

8 Nov 2013 - 1:00 pm | बाबा पाटील

या वर्षी जी.पी.ए करंड्कला डिसें. च्या शेवटी फर्ग्युसन ग्राउड्ंला तसेच्,जाने.१०१४ ला डॉ.प्रिमिअर लिगला पुना क्लबला तुम्हाला निमंत्रण पाठवतो. नक्की या.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Nov 2013 - 1:09 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

निमंत्रणा बद्दल आभार. आता धावणे होत नाही, चेंडू मागे पळु शकत नाही. चार षटकं गोलंदाजी करता येणं शक्य नाही, फलंदाजी ला शेवट पर्यन्त चेंडू वर नजर ठेवू शकत नाही. थोडक्यात क्रिकेट मधून निवृत्त झालो आहे. उभं केले तर जमेल पण सच्यासार्ख हसू करून घेण्यात काही मतलब नाही असे वाटते.

बाबा पाटील's picture

8 Nov 2013 - 1:13 pm | बाबा पाटील

म्हणुनच तर सचिन सारखा दुसरा होणे नाही. या सम हाच.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Nov 2013 - 1:18 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सच्याने वयोमानाने निवृत्त व्हायला पाहिजे होतं आता मैदानावर विनाकारण उभं राहान्यात काय हशील होतं ?

-दिलीप बिरुटे

मागच्या वर्षी डी.पी. एल.पुना क्लबच्या हिरव्यागार पिचवर पहिल्याच षटकात पहिल्याच बॉलवर माझा ऑफ स्टंफ उखडणार्‍या पुणे साउथ झोनच्या डॉक्टरांच वय होत फक्त ४८ वर्ष.साला बाप फिटनेस होता माणसाचा,त्यामुळे मला नाही वाटत वयाचा खेळावर काही परिणाम होत.शेवटी पिंडी ते ब्रम्हांडी.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Nov 2013 - 1:27 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मीही लोकल क्ल्ब कडून खेळणारे वयस्थ गृहस्थ पाहिले आहेत गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हीत परफेक्ट. मुद्दा आहे सच्याचा. अनेक खेळाडूची कारकीर्द आणि स्वत:चा पर्फोर्म्स यासाठी निवृत्तिची वेळ होती वर्ल्ड कप.

पैसे, विविध कंपन्याशी करार, क्रिकेट नियामक मंडलाचा धंदा, क्रिकेटचे बाजारिकरणासाठी सच्या क्रिकेट ला आवश्यक होता त्याला रडत पडत खेळायला लावले, असे मला वाटते.

बजेटच्या दिवशी झाल्ते का शंभर ?
काँग्रेसचा हात दिसतोय, उगाच एमपी केलं का ? आँ ? पांग फेडलेस रे बाबा

प्रचेतस's picture

8 Nov 2013 - 11:53 am | प्रचेतस

म्हातारा तितुका मेळवावा

फोटू आंतरजालावरून
a

Now you know why he is Almighty GOD!

प्रचेतस's picture

8 Nov 2013 - 12:24 pm | प्रचेतस

=))
आमचे हेच म्हणणं आहे.
त्याला उगा देव बनवून देव्हार्‍यात बसवू नका. नव्या रक्ताला वाव द्या.