गेले दहा एक वर्षे भारत देशाचे प्रधानमंत्री म्हणून कार्यरत असणारे. गेले तीन वर्षे " आता महागाई कमी " होईल असा
सूर लाउन रड्णार्या जनतेला " उगी उगी" म्ह्नणणारे शेतकर्याना ५०००० कोटी कर्ज माफी देणारे, जादूची कांडी माझ्याकडे नाही
असे म्हणणारे व तरीही जादूची काडी वाटेल असे अन्न सुरक्षा बिल आणणारे मनमोहन सिंग हे एकदा बोलते झाले.
लोकसभेतील आपल्या भाषणात त्यानी ब्राजील व तुर्कस्तान कडे बोट दाखवून भुकंपात त्यांचे हे घर कोसळायला आले आहे नुसत्या माझ्या घरावर टीका काय करताय असा सूर लावला. अनेक वाहिन्यावर चर्चांचे गुर्हाळ झाल्यावर अर्थ तज्ञ मनमोहन
साहेबानी त्या सगळ्या चर्चांचेच संपादन करून आपले भाषण केले आहे की काय असे वाटले.
कोळशाची आयात, सोन्याची आयात , व खनिज तेलाची आयात हे मुख्य तीन शत्रू या घसरणार्या रुपयाचे मानले जातात.
१९९१ साली करंट डेफिसीट दीड टक्का होते ते आता जवळ जवळ पाच टक्क्के झाले आहे म्हणे. गेले वीस वर्षाच्या आवो जावो घर तुम्हारा नीतीचे बीज रोवले गेले त्याचे हे फळ आज ना उद्या मिळणारच होते असे कम्युनिटांचे म्हणणे आहे. ते ईझमचे जाउ द्या . काळ बिकट आला आहे. हे मात्र भाजप सह सर्व मानतात. कॉग्रेस वाले मात्र २००८ साली अमेरिका बुडत असताना आपण वाचलो या पोथीचे पारायण करीत असतात. असो.
या रूपयाला जागेवर आणायचे असेल तर आमच्या सारख्या सामान्य माणसाच्या डोक्यात उपायांचा किडा वळवळला.
सोन्यावर ५०० टक्के आयत कर, खनिज तेलाचे रेशनिंग, व कोळसा गेटची रहस्य स्पेशल फोर्स नेमून लवकरात लवकर
शोधून देशांतर्गत कोळसा उत्पादनाला प्रोत्साहन हे उपाय करता येतील. मनमोहन सिंग हे करतील ? करण्यात काय अडचणी असतील , कोंण अडचणी आणच्याची शक्यता आहे ? मिपावरील विदापटू व अभ्यासक काही सांगतील काय ?
प्रतिक्रिया
30 Aug 2013 - 7:22 pm | चित्रगुप्त
... असेच म्हणतो.
30 Aug 2013 - 7:27 pm | मुक्त विहारि
भारत छोडो...
दुनिया बहूत बडी है.
30 Aug 2013 - 8:55 pm | श्रीरंग_जोशी
सरकार करेल ते उपाय करेलच पण सामान्य लोकही खारीचा वाटा नक्कीच उचलू शकतात.
सोने आयात करण्यात भारताच्या परकीय चलनाच्या गंगाजळीचा मोठा हिस्सा कामी येतो. नवी सोने खरेदी शक्य असेल तेवढी टाळावी. ज्या लोकांना गुंतवणूक म्हणून घेतलेले जुने सोने विकायचे असेल त्यांच्यासाठीही ही चांगलीच वेळ असू शकते (कदाचित अजून थांबले तर अधिक लाभ होईलही). तपापूर्वी सोन्याचा भाव साडेतीन्-चार हजाराच्या आसपास होता. तेव्हा खरेदी केलेले सोने विकल्यास ८-९ पट भाव मिळू शकतोय.
पंतप्रधान व त्यांच्या सहकार्यांना शुभेच्छा!!
30 Aug 2013 - 9:51 pm | हुप्प्या
आपण एक निष्प्रभ, निष्क्रिय नेता बनलेलो आहोत हे ह्या तथाकथित भीष्माचार्याच्या लक्षात आले तर बरे. आपल्याकडे कुठलाही करिष्मा नाही. इंदिरा गांधी, लाल बहादुर शास्त्री ह्यांनी केलेली आवाहने लोकांना भावली असे दिसते. तसे करण्याची कुवत ह्या पंतप्रधानाकडे नाही. नीरस, रटाळ भाषण, निर्विकार मुद्रा, बोलण्यात, वागण्यात कुठलाही आवेश, ऊर्जा नाही हे ह्या नेत्याचे वैशिष्ट्य. अंगात काही धमक असेल असे वाटायलाही जागा नाही. एखादे नवे धोरण राबवायचे ठरवले तर मंत्रीगण ह्या माणसाचे ऐकत असतील असेही वाटत नाही. ते म्याडम वा प्रिन्ससाहेबांकडे धाव घेणार.
काँग्रेसविरुद्धचा राग आणखी शिगेला पोचायच्या आत मध्यावधी निवडणुका घ्याव्यात आणि मग लोकांनाच ठरवू द्या काय करायचे ते.
30 Aug 2013 - 10:34 pm | सुधीर
रुपयाची घसरण चिंताजनक असली तरी ज्या वेगाने त्याची घसरण झाली (किंवा होते आहे) ही एक बाब आणि त्याचं अस्थिर असणं ही अजून एक दुसरी बाब घसरणीहून अधिक चिंताजनक आहे. घसरणीला कारणीभूत असलेल्या अनेक कारणांपैकी देशांतर्गत व्याजाचे दर हे एक कारण आहे. समजा ३% व्याज दरावर बँक ऑफ अमेरीकाकडून तुम्ही १०० डॉलर इतकी रक्कम कर्जावू घेवून ती ५० रुपये प्रति डॉलर या दराने ५००० रुपयामध्ये रुपांतरीत केलीत आणि त्यानंतर भारतीय बँकेत ८% दराने वर्षभरासाठी गुंतवलीत. तर वर्षअखेरीस व्याज आणि मुद्दलासहीत ५४०० रुपये तुमच्या भारतीय बँकेत जमा होतील. आता जर डॉलरच्या दरात बदल झाले नसतील तर ५० रुपयास १ डॉलर याच दराने तुम्ही ५४०० रुपये १०८ डॉलरमध्ये रुपांतरीत करू शकाल. त्यातले बँक ऑफ अमेरीकेला ठरल्या प्रमाणे १०३ डॉलर दिल्यावर वर्षभरात तुम्हाला या व्यवहारातून ५ डॉलर रुपये फायदा होईल. कुठलीही जोखीम न घेता, स्वत:च्या खिशातून गुंतवणूक न करता मिळालेल्या ह्या नफ्याला "आर्बिट्राज प्रॉफीट" म्हणतात. एखाद्या चलनाच्या भविष्यातल्या बोलीचे दर हे नेहमीच विना-जोखीम नफा मिळणार नाही अशा पद्धतीत लावले जातात. भविष्यातल्या बोलीचे हेच दर मग पुढे, भविष्यातल्या दराचे सूचक ठरतात. अर्थशास्त्रात यालाच "इंटरेस्ट रेट पॅरीटी" असं म्हणतात.
बर्याच तज्ञांचं मत ऐकून आणि वाचून मला असं समजलं, की चलनाच्या दराचा अचूक अंदाज बांधणं हे भल्या भल्यांना कठीण असतं. बर्याचवेळा व्यापारातल्या तूटीशी ह्याचं नातं जोडलं जातं आणि त्यात तथ्यही आहे, त्यामूळे काही ठिकाणी पेट्रोल वाचवा, सोन खरेदी करू नका अशा स्वरूपातले सल्ले वाचायला मिळतात जेणे करून तूट कमी होईल. त्यात किती तथ्य आहे ते माहीत नाही. कारण व्यापारी तूटीचा आणि चलनाचा संबंध थेट नाही (तूटीसोबत विकास ही अजून एक बाब तितकीच महत्त्वाची असते) असं हल्लीच एका लेखातून कळलं. (संदर्भः हा लेख) काही तज्ञांचं असं मत आहे की रुपयाच्या घसरणीत सरकारने वा आरबीआयने हस्तक्षेप न करता त्याला आपोआप स्थिर स्थितीला येऊ द्यावे तर काहींच मत असं पडतं की घसरणीमुळे आणि अस्थिरतेमुळे जे काही नुकसान होतयं ते होऊ नये यासाठी तात्पुरता हस्तक्षेप तरी करावा.
31 Aug 2013 - 6:58 am | चौकटराजा
आपल्या परिच्छेद एक .मधून विचार करण्यासाठी एक नवा कोन मिळाला या बद्द्ल फार आभारी आहे.
31 Aug 2013 - 9:23 am | क्लिंटन
हो बरोबर.अमेरिकेचा Current Account Deficit गेली अनेक वर्षे शून्यापेक्षा जास्त आहे.सध्या तो अमेरिकेच्या जीडीपीच्या ३.७% च्या आसपास आहे असे काल-परवाच कुठेतरी वाचले.तर भारताचा Current Account Deficit जीडीपीच्या ४.९% आहे.
Current Account मध्ये आयात-निर्यात आणि कर्ज/गुंतवणुकीवर मिळणारे/द्यावे लागणारे व्याज/लाभांश यांचा प्रामुख्याने समावेश असतो. (प्रत्यक्ष गुंतवणुक Capital Account मध्ये धरली जाते पण त्यावरील व्याज/लाभांश Current Account मध्ये). अगदी साध्या शब्दात Current Account Deficit जर Current Account च्या heads खाली देशातून बाहेर जाणारा पैसा देशात येणाऱ्या पैशापेक्षा जास्त असणे.ही परिस्थिती कधी उद्भवू शकते?जर निर्यातीपेक्षा आयात जास्त असेल तर. आणि दुसरे म्हणजे देशाबाहेरील कंपन्यांनी/संस्थांनी देशात गुंतवणुक केली असेल किंवा कर्जे दिली असतील तर त्या कंपन्यांना/संस्थांना लाभांश/व्याज देणे आले.अशा पध्दतीने पैसे देशाबाहेर जातील.त्याच पध्दतीने आपल्या देशातून इतर देशांमध्ये झालेल्या गुंतवणुकीपासून व्याज/लाभांश या मार्गे पैसे देशात येतील.अशाप्रकारे देशात आलेले पैसे हे बाहेर गेलेल्या पैशापेक्षा कमी असतील तर Current Account Deficit उद्भवतो तर देशात आलेले पैसे हे बाहेर गेलेल्या पैशापेक्षा जास्त असतील तर Current Account Surplus उद्भवतो.
समजा एखाद्या देशाचा Current Account Deficit आहे तर अकाऊंटिंगच्या परिभाषेत तो finance कसा करणार? तर इतर देशांकडून पैसे कर्जाऊ/गुंतवणुकीच्या माध्यमातून उभे करून म्हणजेच Capital Account मधून.समजा एका वर्षात Current Account Deficit १०० ने वाढला आणि Capital Account ९० ने वाढला तर परकीय चलनाची गंगाजळी १० ने कमी होईल.तेव्हा Current Account Deficit असेल तर तो finance कसा करायचा हा प्रश्न आहे.
अमेरिकेत Current Account Deficit finance करण्यात चीन आणि जपानने अमेरिकन सरकारचे विकत घेतलेले bonds, अनेक देशांच्या Sovereign Wealth Funds नी अमेरिकन कंपन्यांमध्ये केलेली गुंतवणुक यांचा वाटा मोठा आहे.२००८-०९ च्या आर्थिक संकटाच्या वेळी चीनच्या Sovereign Wealth Fund ने मॉर्गन स्टॅन्ले सारख्या अमेरिकन आर्थिक संस्थांमध्ये गुंतवणुक करून टेकू दिला होता कारण अमेरिकन अर्थव्यवस्थेचे आणखी नुकसान होऊ देणे चीनलाही परवडणाऱ्यातले नव्हते. तेव्हा सांगायचा मुद्दा हा की जर देशातील कंपन्यांमध्ये गुंतवणुक करावी असे योग्य वातावरण किंवा अन्य पर्याय नसणे अशी परिस्थिती असेल Current Account Deficit वाढला तरी चलनावर त्याचा फार परिणाम होणार नाही.
इथे दिल्याप्रमाणे अर्थमंत्री पी.चिदंबरम यांनी हा वाढता Current Account Deficit कसा finance करता येईल याविषयी सरकारच्या विचाराधीन असलेल्या मार्गांचा उल्लेख केला आहे.एकूणच काय की भारतात परदेशातून गुंतवणुक वाढविणे आणि भारतीय कंपन्यांना परदेशातून पैसे उभे करायला अधिक मोकळिक देणे या स्वरूपाचे हे उपाय आहेत.भारतातील सध्याचे वातावरण परदेशातून गुंतवणुक येण्यासाठी फारसे अनुकूल नाही.मध्यंतरी Arcellor Mittal, AES यासारख्या कंपन्यांनी भारतातून बाहेर पडणेच पसंत केले.कारण सध्याच्या ब्रम्हघोटाळ्यात प्रकल्प मार्गी लागणे, कार्यान्वित होणे आणि व्यवस्थित चालणे फार कठिण आहे असे या कंपन्यांना वाटले. मध्यंतरी India Today मध्ये एक लेख आला होता.त्यात म्हटले होते की २००७ मध्ये लक्ष्मीनारायण मित्तल यांनी IIT Powai च्या दीक्षांत समारंभात बोलताना म्हटले होते की मी जर आज विद्यार्थ्यांच्या वयाचा असतो तर भारतात राहणेच पसंत केले असते कारण भारत ही "happening" जागा होती.तर २०१३ मध्ये त्याच मित्तल यांनी IIM Ahmedabad च्या दीक्षांत समारंभानंतर पत्रकारांशी बोलताना म्हटले की भारतात गुंतवणुक करायचा त्यांच्या कंपनीचा इरादा नाही.तेव्हा गेल्या काही वर्षात Governance मध्ये जो सावळा गोंधळ चालू आहे त्यात परदेशातून गुंतवणुक येणे अजून कठिण झाले आहे.मध्यंतरी सरकारने एक लाख कोटींचे infrastructure प्रकल्प मंजूर केले.नुसते प्रकल्प मंजूर करून काय आहे?आधी मंजूर केलेल्या प्रकल्पांमध्ये सरकारच अडचणी उभ्या करत असेल (कोळसा नसताना वीज प्रकल्प मंजूर करणे, NHAI ने ८०% जमिन अधिग्रहित करून मगच रस्त्याचे काम सुरू होणे अपेक्षित असताना ते न करणे, विमानतळांवर User Development Fee वर धरसोडपणा इत्यादी) तर परदेशी सोडाच देशातील गुंतवणुकदारही या नव्या प्रकल्पांमुळे उत्साहित व्हायची शक्यता जरा कमीच वाटते. भारतीय कंपन्यांना जर परदेशातून पैसे उभे करायचे असतील तर गुंतवणुकीसाठी भारतीय कंपन्या परदेशी गुंतवणुकदारांना आकर्षक वाटायला हव्यात.आणि दुसरे म्हणजे २००६-०७ मध्ये अनेक भारतीय कंपन्यांनी परदेशातून Foreign Currency Convertible Bonds द्वारे पैसे कर्जाऊ उभे केले होते.त्यावेळी डॉलरचा दर होता ४०-४२ रूपयांच्या आसपास.पण २०११-१२ मध्ये जेव्हा bonds परत करायची वेळ आली तेव्हा तोच दर ५२-५४ रूपयांवर पोहोचला होता.त्याचा जोरदार फटका या कंपन्यांना बसला होता.तेव्हा सध्याच्या वातावरणात जोपर्यंत डॉलर दरातील अनिश्चितता कमी होत नाही तोपर्यंत किती भारतीय कंपन्या असे पैसे कर्जाऊ उभे करायला जातील याबद्दल प्रश्नचिन्हच आहे.दुसरे म्हणजे पैसे कर्जाऊ घेतले तरी प्रकल्पांमध्ये ते योग्य प्रकारे टाकता येतील अशी परिस्थिती आहे का?एकूणच काय की गुंतवणुकदारांचा सरकारवरील विश्वास उडला आहे असे आताचे चित्र आहे.
भारतात गुंतवणुक करून फायदा होईल असा विश्वास परदेशी गुंतवणुकदारांना नसणे आणि त्याचवेळी युरोप-अमेरिका थोडीथोडी सावरणे अशी परिस्थिती असताना भारतातून परदेशी गुंतवणुकदारांकडून डॉलर काढले जाणे स्वाभाविक आहे आणि त्याचा परिणाम म्हणून डॉलर वधारत आहे. या वधारलेल्या डॉलरचा IT कंपन्यांना किंवा इतर निर्याताभिमुख कंपन्यांना नक्कीच फायदा होईल.कारण रूपया जितका कमजोर तितकी आपली उत्पादने/सेवा डॉलरमध्ये स्वस्त पडतील.त्यातूनच निर्यात वाढून Current Account Deficit पहिल्यांदा stabilize आणि नंतर कमी होईल अशा प्रकारचे हे self correcting mechanism आहे. १९९१ मध्ये मनमोहन सिंहांनी रूपयाचे दोन वेळा अवमुल्यन करून हे मेकॅनिझम वापरले होते.पण आता सरकार भारतीय चलनाचा दर ठरवित नाही आणि तो बराचसा मार्कॆटवर अवलंबून असतो.तेव्हा याविषयी सरकारच्या हातात पूर्वीपेक्षा कमी पर्याय आहेत.तेव्हा जर रूपया सावरायचा असेल तर एक तर भारत हा गुंतवणुक करायला योग्य देश आहे असे वातावरण निर्माण व्हायला हवे.वर म्हटल्याप्रमाणे सध्याचे चित्र तरी गुंतवणुकदारांचा सरकारवर विश्वास राहिलेला नाही असे आहे.आणि निवडणुकांपूर्वी पुढील ६-८ महिन्यात हे चित्र बदलण्यात मनमोहन यशस्वी ठरतील हे जरा कठिणच वाटते.
रूपयाचे नक्की काय करावे याविषयी चार जणांची चार वेगळी मते असतील.त्यात माझे एक पाचवे मत म्हणजे सगळ्यात पहिले काही करता येईल तर सरकारने डिझेलवर चालणाऱ्या प्रवासी गाड्यांसाठी डिझेलवर सबसिडी पूर्ण बंद करावी.अमेरिकेत डिझेलचे भाव पेट्रोलपेक्षा जास्त असतात (निदान २००७ मध्ये मी तिथे असताना तरी होते) पण भारतात डिझेल जास्त स्वस्त आहे.याचे कारण म्हणजे प्रवासी वाहतुकीसाठीच्या बसगाड्या,रेल्वे, भाज्या-फळे-औषधे-अन्नधान्य यांची वाहतूक करणारे ट्रक हे डिझेल वापरतात या कारणाने सरकारची डिझेलवर सबसिडी जास्त आहे.पण डिझेल स्वस्त म्हणून लोक खाजगी गाड्या डिझेलवर चालणाऱ्या घेतात.जेव्हा जेव्हा पेट्रोलची दरवाढ होते तेव्हातेव्हा डिझेलच्या गाड्या विकत घ्यायला Perverse incentive लोकांना मिळतो.त्यामुळे पेट्रोल दरवाढीमुळे जो पेट्रोलवरील सबसिडीचा बोजा कमी होतो तो या Perverse incentive मुळे डिझेलवरील सबसिडीचा बोजा वाढतो.सर्वप्रथम तो प्रकार बंद व्हायला हवा.नाहीतर डिझेलवरील प्रवासी गाड्यांवर जबरदस्त कर लावून अशा गाड्या घेणे disincentivise केले पाहिजे.दुसरे म्हणजे परवा रूपया दाणकन आपटल्यानंतर सरकारने PSU बॅंकांकरवी डॉलर विकून रूपया सावरायचा प्रयत्न केला.असे करायला मर्यादा आहेतच.कारण हा प्रकार किती दिवस चालणार?कोसळत्या रूपयामुळे आयात महागणार आणि निर्यात अधिक किफायतशीर होणार.तसेच असे डॉलर अनंतकाळापर्यंत विकता येणार नाहीत. तेव्हा या गणितातून optimum solution मिळेल तोपर्यंत रूपया कोसळू द्यावा.अशा वेळी गुंतवणुकदारांना भारतातील गुंतवणुक फायदेशीर पडेल असे वाटणारा एखादा जरी महत्वाचा निर्णय घेतला तरी कोसळलेल्या रूपयामुळे भारतात डॉलर अधिक प्रमाणात येतील आणि रूपयाची घसरण थांबेल.आता या गणितात निवडणुका पण येणार आहेत तेव्हा हे सगळे होणे जरा कठिणच वाटत आहे.
31 Aug 2013 - 9:53 am | सुधीर
किचकट विषयावर एवढा लांबसडक आणि सोप्या भाषेत प्रतिसाद द्यायची तुमची (आणि काही इतर मिपाकरांची) हातोटी हेवा वाटण्याजोगी आहे.
सध्या रुपयाच्या घसरणीबरोबरच सिरीया प्रश्नामुळे क्रुड ऑईलही महागत चाललं आहे (दुष्काळात तेरावा महीना). त्यामुळे आता फुड-बील बरोबर डिझेल सबसिडीमुळे फिस्कल डेफिसीट (सरकारची मिळ्कत-खर्च) वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे डिझेल सबसीडी काढून टाकली पाहिजे हे वादातीत आहे. पण सरकार (कुठल्याही पक्षाचं) हा निर्णय घेईल का हा मुद्दा आहे. खासकरून निवडणूका तोंडावर आल्या असताना. हळूहळू ते सबसिडी कमी करत जातील असा माझा अंदाज आहे.
31 Aug 2013 - 10:06 am | चौकटराजा
किचकट विषयावर एवढा लांबसडक आणि सोप्या भाषेत प्रतिसाद द्यायची तुमची (आणि काही इतर मिपाकरांची) हातोटी हेवा वाटण्याजोगी आहे.
तरी अजून चार पाच आयडी अवतरायच्या बाकी आहेत. वाट पहातोय.
टीप- शरीर आहे म्हणून वैद्यक, नागरिक आहे म्हणून कायदा , व पैशाशिवाय पान हालत नाही म्हणून पैसा या त्रयींची माहिती
हाच खरा संस्कार . हे आमचे आपले मत आहे.
4 Sep 2013 - 2:29 pm | लॉरी टांगटूंगकर
डिझेलवरील सबसिडी कमी/बंद केल्यास एकंदर (भाज्या-फळे-औषधे-अन्नधान्य यांचे) स्थानिक पातळीवरचे भाव वाढतील.
दरडोइ उत्पन्न वाढवल्याशिवाय हा उपाय करणे कितपत फिजिबल आहे?
4 Sep 2013 - 10:49 pm | क्लिंटन
डिझेलवरील सबसिडी सरसकट बंद करा असे मी म्हणत नाही कारण सध्या तरी त्यासाठी परिस्थिती योग्य आहे असे वाटत नाही. माझा मुद्दा डिझेलवर चालणार्या प्रवासी गाड्यांविषयी आहे. एसी गाडीतून फिरणार्यांना सरकारने डिझेलवर सबसिडी देऊ नये असे मला वाटते.
4 Sep 2013 - 11:08 pm | श्रीरंग_जोशी
डिझेलवरची सबसिडी सरसकट संपवणे योग्य होणार नाही. त्याऐवजी डिझेलवर चालणारी वैयक्तिक वाहने खरेदी करणार्यांवर पुढील काही आर्थिक वर्षे (उदा ५ वर्षे) त्यांच्या आयकरावर अधिभार लावला जावा.
त्याचवेळी हायब्रिड अथवा विजेवर चालणारी वैयक्तिक वाहने खरेदी करणार्यांना आयकरात सुट द्यावी. अशा वाहनांवरील आयात कर देखील पुढील काही वर्षांसाठी कमी करावा.
31 Aug 2013 - 2:40 pm | खबो जाप
माझं ह्याबाबतीत अज्ञानाच आहे; पण माझ्या मते आपले पंतप्रधान एव्हढ्या मोठ्या अधिकारी पदावर असून रिमोट कंट्रोलचे आदेश पळत इतके दिवस गप्प बसले आणि आता नाकातोंडात पाणी जायला लागल्यावर पंतप्रधान पदाचा आपमान केला वेगेरे डायलोग मारू लागले आहेत.
सगळ्यात सोप्पा उपाय १०० च्या वरच्या सगळ्या नोटा बंद करून टाकाव्यात आणि १०००० च्या वरचे सगळे व्यवहार चेक किव्हा बँकेच्या मार्फत करणे बंधन कारक करावे; ३ महिन्यात सगळा छुपा पैसा परत मार्केट मध्ये येयील.
पंतप्रधानांच्या बाबतीत येव्हाडेच म्हणावेसे वाटत
आछे दिन पाछे गए, हरी से किया हेत |
अब पछताए होत क्या, चिड़िया चुग गयी खेत ||
किंव्हा
काय होतास तू , काय झालास तू
1 Sep 2013 - 2:46 pm | मुक्त विहारि
खाली लिंक देत आहे...
http://www.loksatta.com/lokrang-news/dr-manmohan-singh-and-congress-186238/
बाकी आपल्याला काही समजत नाही.
"छोडो भारत" हे एकच उत्तर.....
5 Sep 2013 - 9:09 am | मदनबाण
मनमोहन सरकार हे धोरण लखव्यासाठी आणि स्वतः मनमोहन सिंग हे त्यांच्या मौनासाठी प्रसिद्ध पावले आहेत !
देशात कमालीची अराजकता वाढली असुन सुशासन व्यवस्था कुठेही दिसुन येत नाही ! घोटाळे आणि बलात्कार यांच्या बातम्या रोजच्याच झाल्या असुन एकंदर जिवनमान फार कष्टप्रद झाले आहे.देशात स्त्री वर्ग सुरक्षित राहिला नसुन त्या वासनांध लिंगपिसाट नराधमांचे भक्ष झाल्या असुन त्यांना संरक्षण देणारे कोणीही नाही ! छत्रपती शिवाजी महाराजां वारसा सांगणार्या राज्यात रोज स्त्रीया / तरुणी आणि चिमुरड्यांची आब्रु लुटली जात आहे ! इथले राजकारणी मात्र स्त्रीयांची वस्त्रे फेडण्याची भाषा करतात आणि त्यांची कुटुंब वत्सल म्हणुन प्रशंसा केली जाते ! ही कुठली शिवशाही ? महाराजांच्या त्या पुतळ्यांनाही या मरण यातना आता सहन होत नसाव्यात...
आत्ताच रघुराम राजन एंट्री मारली असुन त्यांची तारेवरची कसरत येत्या काही दिवसात पहायला मिळणार आहे. अन्न सुरक्षा विधेयक या सरकारने आणले ज्या सरकार मधली मंडळी ५-१२-१५-२० रु जेवण मिळण्याचे दावे करत होते.ज्या देशाची अर्थव्यवस्था कोलमडायला उभी ठाकली आहे त्या अर्थव्यवस्थेचे कंबरडे येत्या काही वर्षात मोडले जाईल अशी व्यवस्थाच जणु या विधेयकांने केली आहे का ? असा प्रश्न सध्या भेडसावत आहे. ज्या देशातले सरकार साधे रस्ते त्यांच्या नागरिकांना देउ शकत नाहीत ते अन्न सुरक्षा काय घंटा देणार ? विकासाची दिशा कुठेच दिसत नसुन अर्थव्यवस्थेचे होकायंत्र दिशाहिन अवस्थेत फिरत आहे...देशातील राजकिय पक्षांना देशाची आणि नागरिकांची पर्वा राहिली नसुन त्यांचे जगणे आता राम भरोसे राहिले आहे.मतांसाठी दाढ्या कुरवाळण्याची स्पर्धा सुरु झाली असुन मदरशांना ९ कोटी ९० लाख जाहिर करणारे निधर्मी ? सरकार नागरिकांच्या सुरक्षतेसाठी सिसिटीव्ही बसवण्यास मात्र हतबल झालेले दिसते !
जाता जाता :- येणारा काळ कठीण असुन मोठ्या प्रमाण बेरोजगारी / नोकर्यांची कपात होण्याची लक्षणे दिसु लागली आहेत्,निवडणुका लवकर झाल्या तरच काही निभाव लागेल असे वाटु लागले आहे.
5 Sep 2013 - 8:54 pm | चेतनकुलकर्णी_85
मतांसाठी दाढ्या कुरवाळण्याची स्पर्धा सुरु झाली असुन मदरशांना ९ कोटी ९० लाख जाहिर करणारे निधर्मी ? सरकार नागरिकांच्या सुरक्षतेसाठी सिसिटीव्ही बसवण्यास मात्र हतबल झालेले दिसते !
ह्या १ ० कोटी मध्ये किती AK -४ ७ येतील नै ?
6 Sep 2013 - 11:18 am | खबो जाप
ते मदरशाच सोडा हे बघा हे जर खरे असेल तर ……….
आपल सेकुलर सरकार जम्मू काश्मीर मध्ये मारल्या गेलेल्या आतंकवाद्याच्या घरच्यांना नोकरी आणि पेन्शन देणार आहे म्हणे ……
https://www.facebook.com/photo.php?v=487697634659242
6 Sep 2013 - 4:59 pm | मदनबाण
हॅहॅहॅ ! हे पण वाचा मग !
नागपुरात 9,705 पाक नागरिकांचा अवैध मुक्काम
5 Sep 2013 - 2:57 pm | गुलाम
केवळ लवकर निवड्णुका होऊन उपयोग नाहीतर सत्तांतरदेखील व्हायला पाहिजे.अर्थात काँग्रेस सोडून बाकीचे पक्ष धुतले तांदूळ आहेत अशातला भाग नाही पण वाईट काम केलं तर सत्ता जाऊ शकते हा संदेश जाणं महत्वाचं.
पण ज्या पद्धतीनं सरकार आता लोकानुनयी (पॉप्युलिस्ट) घोषणांमागून घोषणा करत आहे आणि भाजप नेते आपल्याच नेत्यांचे पाय ओढण्यात मग्न आहे, ते पाहता सत्तांतर म्हणजे केवळ भाबडा आशावाद वाटतोय. कारण आपल्या देशातल्या फार मोठ्या वर्गाला भ्रष्टाचार, अर्थव्यवस्था, जीडीपी वगैरेशी काहिही घेणं-देणं नसतं आणि मिपावर किंवा ऑफिसमधल्या कॉफी मशीनपाशी तावातावाने त्यावर चर्चा करणारे लोक (यात मीपण आलोच) मतदानच करत नाहीत.
5 Sep 2013 - 9:26 pm | दशानन
सरकार हे भारत सरकार आहे, ते कोणा एका पक्षाचे सरकार नाही हे, त्या त्या पक्षाचे नेते व जनता यांना समजेल तेव्हा अनेक प्रश्न चुटकी वाजवल्यासारखे सुटलेले असतील. विरोधाला विरोध हे विरोधी धोरण व त्यातून होणारी जनतेची घुसमट यावर उत्तर शोधणे हे जिकरीचे झालेले आहे.
एखादे चांगले काम जर एखादे सरकार करत असेल तर लगेच विरोधी पक्ष त्याचा विरोध करणार, मग करोडो रुपये वाया घालवून चालू असलेले सत्र बंद केले जाणार हे आधी थांबायला हवे, मग सरकार कोणाचे ही असो, अगदी कोग्रेस - भारतीय जनता पक्ष किंवा सपाचे.. अगदी मनसे, शिवसेनेचे असले तरी!
पण बोलणार कोण? पुढाकार घेणार कोण?
हा प्रश्न, जनता सोडवू शकते योगायोगे जनतेकडे आपली ताकत दाखवण्याची संधी पुढे दिसत आहे, गरज आहे ती एका ट्रिगरची..
माझे मी ठरवले आहे, की जो पक्ष भारतीय जनतेव्या बाजूने निर्णय घेण्याची क्षमता जवळ ठेवत आहे, त्याच्या निवडनूक कार्यक्रमात जाती, धर्म, राजकारण सोडून भारत देश हा पुढे असेल त्यांनाच मी मत देईन, मग ते भले कॉग्रेस असो, बीजेपी असो, सपा, शिवसेना, मनसे... अगदी आम आदमी सारखा नवीन पक्ष!
व सगळ्यात महत्वाचे... आपल्या देशात व्यक्तीपुजा होणे बंद होणे फार फार गरजेचे आहे हो..... हे सगळ्यांना लागू होते आहे हेच सर्वात जास्त वाईट आहे. मान्य आहे, टिळकांनी, गांधीनी, नेहरूंनी, हेगडेवारयांनी, सावरकर यांनी व अश्याच लाखो लोकांनी वेळोवेळी देशासांठी प्राण दिले आहेत, कधी कधी व्यक्तीगत / राजकीय लॉस विसरून स्वतःचे विचार स्पष्टपणे व्यक्त केले आहेत, पण तो इतिहास आहे, इतिहास हा त्याच त्याच चुका पुन्हा पुन्हा करत रहा हे कधी शिकवत नाही, उलट त्या चूकातून योग्य तो बोध घेऊन नव्याने इतिहास रचा असे इतिहास शिकवतो..!
असो, माझ्या पेक्षा जास्त जाणकार असे व्यक्ती येथे लिहीत आहेत.. मी आपले सामान्य मत व्यक्त केले ऐवढेच!
6 Sep 2013 - 9:32 am | चौकटराजा
माझ्या मर्यादित माहितीप्रमाणे भारतीय राज्य घटनेत विरोधी पक्ष च काय पक्ष याचीही व्याख्या नाही. असेल तर माझे मत मी बदलण्यास तयार आहे. समजा पक्षाची व्याख्या घटनेत असेल तर मत पक्षाला द्यायला पाहिजे व लोकसभेतही पक्षानेच मतदान केले पाहिजे . समजा आपल्या घटनेप्रमाणे आपली लोकशाही पक्ष व व्यक्ति दोन्हीवर आधारित आहे. तर प्रश्नच नाही. आता निवडणुकी पूर्वी पक्ष तसेच व्यक्तीनी जाहीरनामा काढण्याचे बंधन असलेच पाहिजे व त्यात वीसेक मुलभूत मुद्यांवर मी कोणत्या बाजूने मतदान करणार याचे कायदेशीर वचन पक्षाने व व्यक्तीने दिले पाहिजे . त्याची करार म्हणून रीतसर नोंदणी झाली पाहिजे. म्हणजे मला प, बंगाल मधे कोच फॅक्टरी देणार असाल तरच अणुकरारावर अनुकूल मत देतो असा निवडून आल्यानंतरचा व्यापार नेत्याना करता येणार नाही.
आता भारत देशात हिंदू मुस्लीम वाद राहिलेला नाही. तर नवे दोन धर्म निर्माण झाले आह्वेत. न-राजकीय व राजकीय हे ते दोन तट आहेत. त्यात राजकीय लोकांवर अंकुश आणण्याचे लोकांचे प्रयत्न राजकीय लोक हाणून पाडणार आहेत. डागी नेत्यांच्या संदर्भात न्यायपालिका व राजकीय लोकांमधील हाणामारी आपण पाहतच आहोत. आर टी आय दुरूस्ती विधेयक
चटकन संमत होणारच आहे. फ्रेंच राज्यक्रांति वारंवार होत नसते.
6 Sep 2013 - 12:51 pm | सुहासदवन
पक्ष कोणाला म्हणायचं हे माहित नसतं पण पक्षातील लोकांना मात्र काय बोलायला पाहिजे तेही कळू नये.
आपले पंतप्रधान एका पक्षाचे आधी आहेत कि ह्या देशाचे पंतप्रधान आधी आहेत. भारताचे पंतप्रधान म्हणून तरी त्यांनी ह्या देशाच्या वतीने अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर खुलेआम बोलायला पाहिजे. पण प्रत्येक वेळी ते बोलणार ते पक्षाचे प्रवक्ते असल्यासारखे. अहो खुले आम स्पष्टपणे बोललात आणि बोलताना थोडे चुकलात तर काय एवढे.
आपले नेते मुळात बोलायला घाबरतात किंवा अगदी तोलून मापून बोलतात ते ह्या साठी की ते कोणत्याही पदावर असले तरी त्यांना कोणाची न कोणाची तरी मर्जी सांभाळावी लागते.
निदान पंतप्रधान आणि मुख्यमंत्री म्हणून निवडून आल्यावर त्या टर्म पुरत्या तरी ही पदे त्यांच्या पक्षा पेक्षाही वेगळ्या ठेवल्या आणि ओळखल्या गेल्या पाहिजेत.