तु फक्त एकदा हो म्हण...
तु फक्त एकदा हो म्हण
तुझी व्हायला तयार आहे..
तु फक्त एकदा हो म्हण
सगळं जग विसरायला तयार आहे..
तु फक्त एकदा हो म्हण,
सगळं समर्पित करायला तयार आहे..
तु फक्त एकदा हो म्हण
तुझ्यात आकंठ बुडायला तयार आहे..
तु फक्त एकदा हो म्हण
पूर्णपणे तुझ्यात सामावयाला तयार आहे..
तु फक्त एकदा हो म्हण..
आपल्या मैत्रीला सुंदर प्रेमाचं रुप द्यायला तयार आहे..
तु फक्त एकदा हो म्हण.... तु फक्त एकदा हो म्हण.....
प्रतिक्रिया
25 Aug 2013 - 1:42 am | पाषाणभेद
हो.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
कविता आवडली हो.
25 Aug 2013 - 2:09 am | प्रभाकर पेठकर
किती ते गळ्यात पडायचं?
25 Aug 2013 - 2:13 am | चित्रगुप्त
कशाला हो म्हणायचं आहे ? आणि किती जणांनी ?
25 Aug 2013 - 2:19 am | जेनी...
हो
बास का गं ....?? का आणखी एकदा म्हणु?? अं???
25 Aug 2013 - 11:40 pm | पैसा
तू म्हणून काय उपेग? बुवांनी म्हटलं तर पुरे!!
26 Aug 2013 - 10:09 am | कोमल
:)) :)) :))
बुवांनी पण म्हटलं की पैकातै..
25 Aug 2013 - 11:01 pm | अत्रुप्त आत्मा
हो.............................................! =))
.
.
.
.
.
.
.
पुन्हा एकदा हो........! =))
25 Aug 2013 - 11:01 pm | K Sangeeta
:)
26 Aug 2013 - 10:28 am | दादा कोंडके
हा हा... (किंवा हो..हो..)
बोल्ड कविता आवडली. :)
26 Aug 2013 - 10:40 am | जेनी...
कोंडु काका लैच बोल्ढुन र्हायले राव तुमी :D
26 Aug 2013 - 10:43 am | अभ्या..
नेक्स्ट ssssssssss
26 Aug 2013 - 11:20 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सॉरी....! :)
-दिलीप बिरुटे
26 Aug 2013 - 12:06 pm | रुमानी
ये काय गं हे ...आता कसे म्हणु ..! :)
27 Aug 2013 - 4:55 am | स्पंदना
अग नुसत म्हणायच तर आहे. पुढं काही होणार नाही!
चल आपण दोघी मिळुन म्हणु....१...२...३
हो!
27 Aug 2013 - 11:14 am | रुमानी
बरं बाई तु सोबत आहेस तर बिनधास्त हो......!
27 Aug 2013 - 1:00 pm | बॅटमॅन
हो!
(तेवढाच आमचाही लंबर लागेल)
28 Aug 2013 - 9:43 am | मनीषा
संगीताने फक्त "त्याला" हो म्हणायला सांगितले आहे.
इथे सगळेच "हो", "नाही" करायला लागले आहेत..
कठीण आहे .. :)
28 Aug 2013 - 9:55 am | दादा कोंडके
कशावरून? हे तुम्हाला कवितेत कुठे दिसले?
28 Aug 2013 - 10:41 am | जेनी...
अगदि बरोब्बर कोंडु काका !
सन्गीता ने तर " तु " असं लिवलय ... वाचताना तर ती आम्हालाच हो म्हनायला
सान्गते असं स्पष्ट जानवतं हो कि नैओ कोंडु काका ??
28 Aug 2013 - 11:56 am | दादा कोंडके
हो हो...
28 Aug 2013 - 12:17 pm | चित्रगुप्त
अहो, त्यांनी हे बिल गेट्स साठी लिहिलंय, सगळी संपत्ती त्यांच्या नावे करून द्यायला 'हो' म्हणण्यासाठी.

तुमच्या-आमच्या सारख्यांनी हो हो हो करून काय होणार?
31 Aug 2013 - 2:20 pm | K Sangeeta
total dhamaal:)
1 Sep 2013 - 12:39 am | संजय क्षीरसागर
योग्य व्यक्तीला एसेमेस केली असती तर... एव्हाना पाळणा म्हणायची वेळ आली असती.
4 Sep 2013 - 3:33 pm | भावना कल्लोळ
किती ते नामोहरम…. करावे म्हणते मी एका उदयोन्मुख कवियत्रिचे, कुठे फेडल हे पाप, उगी ग संगिते, बाकी माझा पण हो हा …….
4 Sep 2013 - 3:56 pm | अत्रुप्त आत्मा
आं....म्ही(सर्वांनी) कुठे ना मोहरम केलं??? =)) ,
आंम्ही (अता इथे मी) तर फक्त हो'च म्हटलं!
4 Sep 2013 - 4:24 pm | भावना कल्लोळ
भा. पो हा, अ. आ. http://www.sherv.net/cm/emo/happy/content-and-happy-smiley-emoticon.gif